अखिल भारतीय पॉमेरियन महाअधिवेशन नाशकात संपन्न

नाशिक- ३/१५/२०१२. अखिल भारतीय पॉमेरियन महाअधिवेशनाची सांगता नुकतीच पांडबाची बखळ, नाशिक येथे पार पडली. देशभरातून पॉमेरियन समाजाच्या ज्ञातीबांधवांनी या अधिवेशनात मोठ्या संख्येने लावलेली हजेरी, हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले.

‘भुंका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही एकेकाळची लोकप्रिय घोषणा. अनेक श्वानजातींनी ती अंमलात आणली व आपापल्या जातींची उन्नती करून घेतली, पण पॉमेरियनांमधल्या संघटनवॄत्तीच्या अभावामुळे व एकंदरीत मवाळ प्रवृत्तीमुळे त्यांना या घोषणेचा फायदा करून घेता आला नाही. परिणामी, एकेकाळी श्वानविश्वात मानाने मिरवणारे पॉमेरियन आज एकीकडे पडले आहेत. 'धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का' अशी दयनीय अवस्था आज या समाजाची झाली आहे. बुलडॉग, श्नॉझर, बीगल या पूर्वी फारसे महत्व नसलेल्या जाती आज डोईजड होऊन बसल्या आहेत. याउलट एकेकाळी श्रीमंत ललनांच्या मांड्यांवर अभिमानाने मिरवणारा पॉमेरियन समाज मात्र आता मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकला जात आहे.' असे उद्गार यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात श्री. बोझो यांनी काढले.

'आपल्या समाजाने या देशाला संस्कृती प्रदान केली. पॉमेरियनांपूर्वी या देशात अनार्य कुलुंगी व गावठी कुत्र्यांची संस्कृती होती. परंतु पॉमेरियनांचे हे योगदान आज कुणाच्याच लक्षात नाही. अल्सेशियन, डॉबरमनादी जाती केवळ ताकदीच्या जोरावर आज पॉमेरियनांची सर्व क्षेत्रात गळचेपी करत आहेत. 'आमचे पूर्वज एकेकाळी अभिजन होते, त्याची शिक्षा आम्हाला का?' असा सवाल आज अनेक पॉमेरियन युवक-युवती करत आहेत.' शक्तीच्या जोरावर सरकारला नमवून काही पदरात पाडून घ्यावे, हा मुळातच पॉमेरियनांचा पिंड नव्हे. या समाजात आंदोलन वगैरे करण्याची ताकद पूर्वीही कधी दिसली नाही आणि नजीकच्या काळातही असे काही घडेल, असे वाटत नाही. तरीही सद्यःपरिस्थिती कितपत चालवून घ्यावी हा प्रश्न उरतोच' असे मत प्रमुख वक्ते श्री. टॉमी यांनी व्यक्त केले.

'पॉमेरियन संस्कृतीचा मागोवा' या विषयावर प्रख्यात विदुषी ल्युसी यांचे भाषण झाले. पॉमेरियनांबद्दलचे अनेक लोकापवाद त्यांनी सप्रमाण खोडून काढले. 'पॉमेरियनांचा शुभ्र रंग, निळे डोळे तसेच लांब केस यावरून पॉमेरियन हे या देशात आलेले उपरे आहेत' या मताचा समाचार घेताना त्यांनी इतिहासकाळातील पॉमेरियन पंडितांनी लिहिलेल्या अनेक स्मृती, पुराणे व उपनिषदे यांचा आधार घेत पॉमेरियन हे मूळचे इथलेच, एवढेच नाही तर दत्ताबरोबर असणार्‍या श्वानांचेच ते वंशज कसे, हे सिद्ध करून दाखवले. शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा हा पॉमेरियनच. सध्या तो शिवाजी महाराजांचा कुत्रा नव्हताच असे दाखवून त्याची रायगडावरची समाधी हटवण्याचे जे अश्लाघ्य प्रयत्न अल्सेशियन ब्रिगेडच्या मंडळींनी चालवले आहेत, त्याबद्दल त्यांचा मी भूःक्कार करते' या त्यांच्या वाक्याला प्रचंड टाळ्या पडल्या.

यानंतर, पॉमेरियनांनीच भारतीय संस्कृती कशी जगभर पसरविली हे सिद्ध करणार्‍या 'सुमेरियन? छेः... पॉमेरियन' या पु. न्हा. भौक लिखित पुस्तकाचे प्रकाशन भुभुसेनाप्रमुख माननीय रॉजर भुंकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सुमारे साडेचारशे पॉमेरियन शावकांचा सामुदायिक कॉलरबंधन सोहळाही यावेळी पार पडला.

पॉमेरियन समाजाची वंशशुद्धता राखण्याच्या दिशेने काय करता येईल यावर झालेली खुली चर्चा, हे अधिवेशनाचे मुख्य आकर्षण. या चर्चेत भाग घेतलेल्या ज्युली, टायगर आणि जॅकी या त्रि-सदस्य समितिने नंतर खालीलप्रमाणे आचारसंहिता प्रत्येक पॉमेरियनासाठी निश्चित केली.

- पॉमेरियन समाजाच्या कुणाही व्यक्तिने पॉमेरियनेतर श्वानांशी रोटी-बेटी व्यवहार करू नये.
- पॉमेरियन व्यक्तिने नीच जातीच्या कुत्र्यांना हुंगू नये.
- इतर जातीयांबरोबर एका डिशमध्ये जेवू नये.
- ज्या घरात पॉमेरियन व पॉमेरियनेतर श्वान एकत्र पाळले जात असतील तेथे पॉमेरियनेतरांची पंगत काटकोनात मांडण्यात यावी.
- पॉमेरियन व पॉमेरियनेतर यांनी एकाच कमोडमधून पाणी पिऊ नये.
- पॉमेरियन व्यक्तिने शाकाहारी असणे अनिवार्य आहे. प्रत्येक पॉमेरियनाने आपल्या मालकापाशी शाकाहारी श्वान-खाद्यच आणण्यासाठी भू(ण)भू(ण) लावावी.
- स्नानाची आत्यंतिक नावड हे जरी सर्व श्वानजातीचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी ज्ञातीशुचिता पाळण्याच्या दृष्टीने पॉमेरियनांनी महिन्यातून एकदा स्नान घालण्यास आपापल्या मालकांना अनुमती द्यावी व फार खळखळ करू नये.
- प्रत्येक नर पॉमेरियन शावकाचा कॉलरबंधन विधी हा वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याअगोदर झालाच पाहिजे.
- कॉलरबंधन झालेल्या प्रत्येक पॉमेरियनाने टपालपेटी अथवा म्युन्सिपालिटीच्या खांबापाशी दररोज संध्या करणे अनिवार्य आहे.

मात्र यावेळी पाहुणे वक्ते म्हणून आलेले दैनिक भूंकसत्ताचे पुरोगामी संपादक विकी यांनी मात्र वेगळेच तुणतुणे चालू करून रसभंग केला. 'पॉमेरियनांनी आत्मपरिक्षण करावे' या भाषणात त्यांनी पॉमेरियन समाजावर अकारण कोरडे ओढले. 'पॉमेरियन समाज वंशश्रेष्ठतेच्या जुनाट कल्पनांनी स्वतःचेच नुकसान करून घेत आहे. आपल्या मनाभोवती विणलेली प्रतिगामी जळमटे दूर करून पॉमेरियन समाजाने मुख्य प्रवाहात एकरूप व्हावे' वगैरे असंबद्ध बडबड त्यांनी सुरू करताच सर्व सभा खवळली. विकी यांना चावे घेऊन व नख्यांनी ओरखडे काढून व्यासपीठावरून हाकलून लावण्यात आले. नंतर बोलायला उभ्या राहिलेल्या सर्व वक्त्यांनी विकी यांची मापे काढली. प्रा. टिमी यांनी त्यांना 'कुलुंगी कुत्रा' म्हणून हिणवले, तर श्रीमती ट्विंकी यांनी त्यांची 'पूडल-हुंग्या' म्हणून संभावना केली. ऍड. डॉन यांनी तर कहर करून विकी यांना 'मांजराची अवलाद' असे भर व्यासपीठावरून म्हणताच काही श्रोत्यांनी आपल्या पिलांचे कान झाकून घेतले.

पॉमेरियन अस्मिता चांगलीच जागृत झाल्याचे यावेळी दिसून आले. सभेची वेळ टळून गेली तरी वक्ते थांबण्याचे नाव घेईनात व श्रोतेही आपल्या जागी स्थानापन्न होऊन राहिले होते. अखेर प्रसंगावधान राखून आयोजकांनी एक चेंडू सभागृहाबाहेर फेकून 'फेच' म्हणताच वक्त्यांसुद्धा सर्वजण बाहेर पळाले व सभागृह क्षणार्धात रिकामे झाले.

field_vote: 
3.857145
Your rating: None Average: 3.9 (7 votes)

प्रतिक्रिया

ROFL ROFL

आधी हसून घेते मग प्रतिसाद देते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

साष्टांग...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भॉ भॉ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुर्निसात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खलास! मर्ढेकरांनी एका कवितेत केलेलं 'सह नौ टरक्तु, सहवीर्य डरवावहै!' हे विडंबन आठवलं.

सुमारे साडेचारशे पॉमेरियन शावकांचा सामुदायिक कॉलरबंधन सोहळाही यावेळी पार पडला.

भेदक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पॉमेरियनाना किती काळ झोडपणार ? " - ह मो पॉमारे
"पॉमेरियन का झोडपले जातात ? " संजय ऑल्शेशणी
"जय ऑल्शीधर्म ! जय माता ऑल्सेशु !" ऑल्शोत्तम खेडकर
"पूडल्स कोण होते ?" डॉ. भॉभॉसाहेब पूंडलकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अशक्य कमेंट आहे ही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

आमचे पूर्वज एकेकाळी अभिजन होते, त्याची शिक्षा आम्हाला का?' असा सवाल आज अनेक पॉमेरियन युवक-युवती करत आहेत.

आमचे पुर्वज एकेकाळी अभिजन होते यात आमचा काय दोष? असे म्हणणार्‍या पामरांना आम्ही म्हणतो कि तुम्हाला सात बारानुसार आलेली पुर्वजांची प्रॉपर्टी चालते तर त्याच पापपुण्याच्या हिशोबानुसार वंशज म्हणुन पापाच्या सातबार्‍याची मालकी का नको असे भॅरी भरके यांनी समस्त श्वान जातीच्या युवा संमेलनात प्रश्न केला होता. याची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सभेची वेळ टळून गेली तरी वक्ते थांबण्याचे नाव घेईनात व श्रोतेही आपल्या जागी स्थानापन्न होऊन राहिले होते. अखेर प्रसंगावधान राखून आयोजकांनी एक चेंडू सभागृहाबाहेर फेकून 'फेच' म्हणताच वक्त्यांसुद्धा सर्वजण बाहेर पळाले व सभागृह क्षणार्धात रिकामे झाले.

मस्तच..!!!

आपल्याकडिल विविध सम्मेलने आणि सभा गाजवणार्‍या वक्त्याना आवरण्यास असा काही उपाय वापरता येईल काय ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

ROFL ROFL

अरे आवरा या खवचटश्वानाला.. आपलं.. खवचटखानाला! नाहीतर हसवून हसवून जीव घेईल माझा.
आचारसंहिता वाचून तर गडाबडा लोळलो ROFL

शेवटच्या मुद्द्यात संध्या करताना कॉलर कानावर चढवायची की कसे ते सांगितले नसल्याने काही पॉमेरियन चुकीच्या पद्धतीने संध्या करताना दिसल्याचे काही वाचकांनी पत्र लिहून कळवले आहे असे समजते. Biggrin

अखेर प्रसंगावधान राखून आयोजकांनी एक चेंडू सभागृहाबाहेर फेकून 'फेच' म्हणताच वक्त्यांसुद्धा सर्वजण बाहेर पळाले व सभागृह क्षणार्धात रिकामे झाले.

साष्टांग दंडवत!

अवांतरः "आर्यांच्या यज्ञपार्टीत गणपतीचे खळ्ळखट्याक" ही बातमीही खानाने कव्हर करावी अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त आवडले.छान लिहीलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

साष्टांग देवा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

ब्राह्मणज्ञातीस ज्याप्रमाणे (विशेषेकरून इतरेजनांत) 'बामण' या संज्ञेने सामान्यतः उल्लेखिले जाते, तद्वत 'पोमेरियन' हे 'पॉमेरेनियन'चे अपभ्रष्ट रूप असावे काय?

असल्यास, (बोलीभाषेत ठीकच आहे, पण) पत्रकारितेत त्यास कितपत स्थान असावे, याबाबत साशंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमी भ्रष्ट अम्रिकनांचे भ्रष्ट अनुकरण करणार्‍यांपैकी आहोत. ते कसे अ‍ॅल्युमिनिअमला अ‍ॅल्युमिनम म्हणतात आणि आमचेच बरोबर म्हणून दडपून सांगतात, तद्वत आम्ही 'पॉमेरियन' आणि 'अ‍ॅक्सिलेटर' हेच शब्द बरोबर आहेत म्हणून दडपणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि लॅब्रॉट्री विसरू नका. (हा शब्द ऐकला की मला लॅव्हेटरी हाच शब्द आठवतो.) नेमाड्यांवर अम्रिकन प्रभाव आहे का? ते नाही का कादंब्री, लायब्री असं काही लिहीत!

असो. समस्त कुत्रे जातीची समस्त मानव जातीशी तुलना केल्याबद्दल आमच्या धुंडीराज*ने तुमचा निषेध कळवायला सांगितला आहे.

*हा सतत काहीतरी धुंडाळत असतो म्हणून मी त्याला धुंडीराज म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही काल एक बातमी ऐकली.
भावना दुखाववणारं लिखाण केलंय म्हणून पोलिस ख.खा.ला शोधतय.
आणि पोलिसात क्म्प्लेन्ट कोणी केलेय?

१. नाशिककर कारण सगळ्या भुक्कड गोष्टी नाशकात घडतात आणि चांग्ल्या मुम्बइ-पुण्यात घडतात म्हणून
२. गरीब ललनांच्या मांड्या कारण त्यांनी काय पाप केलंय. फक्त पैसेवाल्यांच्या मांड्यावर का म्हणून हे कुत्रे बसवायचे?
३ पोस्टाच्या पेट्या आणि विजेचे खांब कारण त्यांना सगळ्या संध्या (हो शांतारामांची पण आणि पालेकरांची पण) आवडतात. मग त्यांच्या अभिव्यक्ती स्वात्न्तर्याचं काय?
४. धर्मेन्द्र कारण हे कुत्ते कमीने नाहीत म्हणून ते धर्मेन्द्र्चा अपमान करतायत.

खरय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

मेलो हसून हसून!

पॉमेरियनांचा शुभ्र रंग, निळे डोळे तसेच लांब केस यावरून पॉमेरियन हे या देशात आलेले उपरे आहेत'

कॉलरबंधन झालेल्या प्रत्येक पॉमेरियनाने टपालपेटी अथवा म्युन्सिपालिटीच्या खांबापाशी दररोज संध्या करणे अनिवार्य आहे

ऍड. डॉन यांनी तर कहर करून विकी यांना 'मांजराची अवलाद' असे भर व्यासपीठावरून म्हणताच काही श्रोत्यांनी आपल्या पिलांचे कान झाकून घेतले.

ROFL ROFL ROFL

दंडवत स्वीकारा खानसाहेब!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ROFL ROFL

ज ह ब र्‍या !!
बर्‍याच दिवसांनी काहितरी वाचून येवढा खळखळून हसण्याचा आनंद मिळाला. पेश्श्ल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

ROFL
धो धो हसलो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आजचा दिवस सार्थकी लागणार.
ROFL ROFL

आवांतर : यांच्याच (म्हणजे पॉमेरियनच्या) एका अवलादिनं एकदा कृपाप्रसाद दिल्याने पोटात सुया टोचुन घ्याव्या लागल्याने या जाती बद्दल मुळ्ळी सुद्धा प्रेमभाव नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

अचाट. गडाबडा लोळत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरवातीला फक्त शंका होती पण आता मात्र तुमच्या आयडीची ओळख पटली.

वाचताना फारच मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल कुणीतरी कुत्र्याची मुंज केली म्हणे!
कुत्र्याची मुंज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही "मजा" तुम्हाला (वरकरणी) वाटते, तितकी निरागस नाही, एवढेच सुचवून गप्प बसतो.

बाकी चालू द्या. I've said my say. अब आइन्दा हम (इस बारे में) कुछ नहीं बोलेगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यनि करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अध्यक्ष महोदय, सोळा संस्कारातील सगळे विधीपण झालेच पाहिजेत श्वानकुळात.
Smile Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

आंतरजातीय विवाहावर भुंकणाऱ्या बद्दल पण येऊ देत एक. Biggrin
आणि हो पॉमेरिअन प्रजातीत मागासवर्गीयांना काय हक्काचे मिळणार की नाही. भूकमोर्चे काढायला लागतील बहुतेक.
आणि हो युरेशियात पण महाअधिवेशन झालेच पाहिजे. साडेतीन मुहूर्तावर.
Smile Wink Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

एक निरीक्षण नोंदवतो.

जेव्हा मालकांची इन्कमं कमी असतात. तेव्हा साधारणपणे मारुती ८००/अल्टो व पॉमेरियन अशा बारक्या व खायला खूप न मागणाऱ्या वस्तू मालक घेतात.

मालकांची इन्कमं जशी वाढू लागतात तशा येसयूव्ह्या आणि गोल्डन रिट्रीव्हर/ल्याब्रेडॉर वगैरे खायला जास्त लागणाऱ्या वस्तू मालक घेऊ लागतात.

तर मूळ लेखातील "पॉमेरियन" प्रवाहाबाहेर फेकले जाणे ही तक्रार मारुती ८०० सारखीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.