चविष्ट - यू ट्युब चॅनेल

नमस्कार ऐसी अक्षरे सदस्य व वाचक.
आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत.

तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल. चॅनेल व रेसिपी आवडल्यास सगळ्यांनी जरुर आमच्या चविष्ट चॅनेलला सब्सक्राईब करा तसेच येणा-या नविन रेसिपींवरही लाईक, कमेंट करा व आपल्या इतर मित्र परीवार, कुटुंबातील व्यक्तिंनाही शेयर करा. खाली आत्ता पर्यंत केलेल्या रेसिपीजच्या लिंक देत आहे.
Chavistha!- https://youtube.com/channel/UCZUKXjMnkZaGDrLSFRU3naQ

अळूचे किंवा टेरीचे फतफते/आमटी - https://youtu.be/alw-YwQxFAA
खेंगट - https://youtu.be/e4t_Z4N0lhw
मटार पॅटीस - https://youtu.be/OLv5iyQwX68
आंब्याची कढी - https://youtu.be/aFv7F4aA_RE
Blue lagoon mojito - https://youtube.com/shorts/JuxoKbYEa0c?feature=share
रानभाजी कुर्डू - https://youtu.be/u5iXgtqu_9o
व्हेज स्प्रिंग रोल - https://youtu.be/B8pFLgXcNl4
बोंबिल फ्राय - https://youtu.be/MNaQIABvkSY
रानभाजी - कुलू/फोडशी - https://youtu.be/TT2Xr9tERoo
कांदा भजी - https://youtu.be/eeGljj7MjgE
सेजवान पोटॅटो - https://youtu.be/MIjqz2KKufk
शेवळाची आमटी - https://youtu.be/mdmiKhKSkQA
करंदी - https://youtu.be/afzyEvjHIQg
जवळा - https://youtu.be/5y6wea39eeY

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुभेच्छा.

आजवर कधी कुर्डूची भाजी करून खाण्याचा धीर झालेला नाही. इथे ते आपल्या आपण बिया पेरून वेडपटासारखं वाढायला लागलं आहे. कदाचित तुमच्या व्हिडिओमुळे त्याची भाजी करून बघेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माठासारखीच लागते. फक्त खात्रीने कुर्डू आहे ना ते पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. 'कुर्डू' म्हणजे नक्की कोण?

२. दक्षिण महाराष्ट्रात कोठेतरी 'कुर्डूवाडी' नावाचे एक रेल्वेचे मोठे जंक्शन असलेले गाव आहे. त्याचा याच्याशी नक्की संबंध काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावाच माहित नाही मला. पण ही एक पालेभाजी आहे. परत लिंक टाकली आहे. ओपन करुन पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत सेलोसिया नावाच्या बिया मिळतात. आमच्याकडे वश्या आला की cockscomb नावाची बारकी रोपंही मिळतात. एकदा लावलं आणि त्याला बिया आल्या की ते सगळीकडे येत राहतं.

ह्या वर्षी आमच्याकडे अनपेक्षितरीत्या बऱ्यापैकी पाऊस आहे; सगळीकडे दिसत आहेत ही रोपं. ऑस्टिनात, साधारण हॅलोवीन, दिवाळीच्या सुमारास ती बऱ्यापैकी मोठी वाढलेली असतात, एखाद मीटर उंच. संपूर्ण झाड, सगळी पानं, आणि वरचे फुलांचे शंक्वाकृती तुरे, सगळंच लाल किंवा पिवळं होतं, झाडाच्या मूळ रंगानुसार. छान दिसतात तेव्हा.

मलाही हे नाव हल्लीच समजलं, भावाकडून. तो आजोळी गेला की तिकडून पाला आणतो. पण सेलोसिया म्हणजे कुर्डू हे फेसबुकवरच्या ग्रूपांवरून समजलं. राजगिरा (amaranth) या प्रजातीचं असतं. प्रत्येक मराठी माणूस 'गच्चीवरची मातीविरहीत बाग' नामक ग्रूपात एकदातरी असतोच. मला त्याचा खराच फायदा झाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणजे, थोडक्यात, कुर्डू बोले तो Celosia, नि Celosia बोले तो कुर्डू. ठीक.

राजगिरा (amaranth) या प्रजातीचं असतं.

मला पालेभाज्यांमध्ये फरक करता येत नाही, हा माझा लहानपणापासूनचा वीकनेस आहे. (लहानपणी कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडून भाज्या आणणे हे काम सहसा माझ्या गळ्यात पडायचे. तो हमखास गंडवायचा, तरीही! तर ते एक असो.) म्हणजे, लोकांना सगळे सरदारजी जेणेकरून सारखेच दिसतात, तद्वत, मला सगळ्या पालेभाज्या साधारण सारख्याच दिसतात.

हं, आता, त्यातल्या त्यात, करेक्ट मी इफ आय ॲम राँग, परंतु, राजगिऱ्याची पाने लालसर असतात (बरोबर?), म्हणून तेवढा तो एक वेगळा लक्षात राहिला होता खरा.

परंतु, हे आहे हे असे आहे. म्हणजे, पालेभाज्यांतली माझी जाण तुम्हाला आता चांगलीच लक्षात आली असेल. (असो बापडी!)

प्रत्येक मराठी माणूस 'गच्चीवरची मातीविरहीत बाग' नामक ग्रूपात एकदातरी असतोच.

म्हणजे एक तर मी मराठी माणूस तरी नाही (हं, मी माणूस नाही, असाही एक दावा असल्याकारणाने... असो.), किंवा, नाहीतर मग या नियमाला मी अपवाद तरी आहे.

(अर्थात, फेसबुक ग्रुपावर असण्याकरिता मुळात फेसबुकावर असावे लागते म्हणा. त्या संकल्पनेलाच मुळात टोकाचा तात्त्विक विरोध वगैरे असल्याकारणाने, वगैरे वगैरे...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी पालेभाज्या नसाल ओळखत, पण माठ कुठला ते कळत असेल ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोज सकाळी आरशात बघतो की.

किंबहुना, पालेभाज्यांच्या बाबतीत माठ असल्याकारणानेच तर चुका होतात. सगळा पालकांचा दोष - कधी शिकवले नाही ओळखायला ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप: अरे गाढवा, तुला शेपू आणायला सांगून शेवटी माठच आणलास? आता मातोश्री घराबाहेर काढतील तेव्हा अक्कल येईल

मुलगा: बाबा, एकत्रच निघूया. ही भाजी चवळीची आहे असं म्हणतेय आई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही फारसं कळत नाही. आणि लोक मोठ्या हौसेनं ज्या भाज्या खातात, त्या बघूनच मला नको होतं. उगाच, काही कारण नसताना! पण स्वतः बागकाम करायला लागल्यापासून गूग्गल-पांडित्य बरंच आलेलं आहे. कुर्डू राजगिऱ्याच्या जातीतलं, वगैरे गूग्गलपांडित्यच.

कुर्डू किंवा सेलोसियासुद्धा दोन रंगांत येतो. लाल किंवा पिवळा. सध्या बागेत आहेत त्यांची पानं हिरवी आणि देठ लाल किंवा पिवळसर आहेत. तुरे सध्या फिकट गुलाबट आहेत. ते तुरे पिवळे किंवा लाल होतील तेव्हा पानं, देठ, खोड सगळंच त्या-त्या रंगांचं होईल. त्याच्या बिया म्हणजे बारके काळे दाणे असतात, राजगिऱ्याच्या लाडवात जो दाणा दिसतो, तसेच. आणि त्याला खूप चकाकी असते. हातातून सहज निसटतात ते. रस्त्यावर किंवा सपाट भागावर पडल्या बिया*, तर गोळा करायचा प्रयत्न विनोदी दिसतो. एकतर खाली असा काळा कचरा म्हणजे प्लास्टिक वाटतं. आणि त्यातून खाली वाकून ते उचलायला जावं तर हातात येत नाही.

* ही झाडंसुद्धा अंमळ ढच असतात. रस्त्यावर बिया पाडून काही फायदा होणारे का!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही वर्णन केल आहे ते कुर्डूचच आहे. कुर्डूला गोंड्यासारखी गुलाबी फुले येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके मग करुनच बघा भाजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी ऐकल्या/वाचल्या जाणार्‍या कहाण्यांत "केनीकुर्डू"च्या भाजीचा उल्लेख असे. यातील केनी व कुर्डू या भाज्या वेगवेगळ्या आहेत की केनीकुर्डू नावाची एक वेगळी भाजी आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केन ची भाजी वेगळी व कुर्डू वेगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर कुर्डूच्या भाजीची एवढी चर्चा चाललेली पाहून कुतूहलाने संबंधित व्हिडियोच्या लिंकेवर क्लिकून पाहिले. Video unavailable असा संदेश येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुर्डू
https://youtu.be/u5iXgtqu_9o

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता दिसते का पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता दिसते आहे.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अय्या! असे वेगवेगळे मासे एखाच रश्श्यात घालू शकतो असा विचारच मी केला नव्हता. बोंबील फ्राय भारी आहे. मी लगेच करून बघणार. छोटे मासे नीट साफ कसे करायचे याचा थोडा झूम करून व्हिडियो बघायला आवडेल. सबस्क्राईब केलं आहे त्यामुळे नवीन माहिती मिळत राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सई मासे साफ करण्याचा एक वेगळा व्हिडिओ काढणार आहोत. Subscribe केलस ते बर झाल त्यामुळे तो व्हिडिओ तुला पाहता येईल लगेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकल्प चांगला आहे, उपयुक्त आहे, रोचक आहे. मात्र, दीर्घ काळात एक सुधारणा करून पाहता येण्यासारखी आहे. (घाई नाही. आणि, आहे तशीसुद्धा मांडणी चांगलीच आहे. परंतु तरीही.)

बोले तो, पाककृतीबद्दलची माहिती ही कॅप्शनींमधून दिलेली आहे. ते ठीकच आहे, परंतु, व्हिडियोबरोबरचा जो ऑडियो आहे, तो एक तर सायलेंट नाही तर ती भयाण ट्यून ठेवण्याऐवजी, काही तोंडी स्टेप-बाय-स्टेप रनिंग कॉमेंटरी वगैरे ठेवल्यास व्हिडियो अधिक रोचक, आकर्षक, चित्तवेधक तथा उपयुक्त होईल. एक तर सध्याचा ऑडियो (आहे तेथे) भयाण आहे, आणि, सायलेंट करून पाहिल्यास लवकरच बोअर होते. शिवाय, कॅप्शनी उपयुक्त असल्या, तरी, व्हिडियोपासून लक्ष विचलित करतात. एक तर व्हिडियो तरी पाहता येतो, नाहीतर कॅप्शनी तरी. नुसता व्हिडियो पाहून फारसा अर्थबोध होत नाही, नि कॅप्शनी पाहिल्या, तर व्हिडियोवरून लक्ष उडते. त्यापेक्षा, कॅप्शनींमधली माहिती (कॅप्शनींबरोबरच) तोंडी कॉमेंटरीद्वारे ऑडियो ट्रॅकवरसुद्धा टाकली, तर निश्चित उपयुक्त ठरेल, नि व्हिडियोसुद्धा रटाळ होणार नाही.

अर्थात, घाई नाही. आहे तो कंटेंटसुद्धा चांगलाच आहे. मात्र, ही सुधारणा केल्यास नक्की फायदा व्हावा, असे वाटले, इतकेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच लिहायला आलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करु. सध्या अजून काही टेकनिकल अडथळे जाणून घेतोय. शिवाय एकच जण रेसिपी करत नसल्याने प्रत्येकाचे बोलण्याचे स्किल वेगळे आहे. पण तुमच्या सुचनांचा नक्कीच विचार करु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सबस्क्राइब्, लाइक्, शेअर्, कॉमेंट् केले आहे.
पाकृ सादरीकरण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0