शेजारच्या काकांना जीवन कळल्याचं सगळ्यांना मान्य.

चांदणी चौक, पुणे, २२ ऑगस्ट. शेजारच्या काकांचं पुस्तक आमच्यापर्यंत व्हॉट्सॅपवरून पोहोचल्यामुळे, काकांच्या सुखी जीवनाचा साधासोपा मूलमंत्र वाचकांपर्यंतही पोचावा म्हणून हा खटाटोप.

शेजारच्या काकांचं पुस्तक व्हॉट्सॅपवरून व्हायरल गेल्यानं काका सध्या आनंदाच्या कळसाला पोहोचले आहेत. काकांच्या बऱ्याच फेसबुक पोस्टींवरून त्यांच्या आयुष्याचा धांडोळा घेता आला.

लहानपणापासूनच काकांचं आयुष्य काहीसं खडतर आणि काहीसं सुखासीन आहे. काका बालवयापासूनच चिकन खात होते; आणि काका आता स्वतः बटर चिकन बनवू शकतात. लॉकडाऊनच्या काळात काकांनी घरात भांडीही घासली; आणि काकांच्या मित्रमंडळात त्याचा व्हिडिओ करून टाकणारे काका पहिलेच आहेत. पोरांपासून थोरांपर्यंत काकांचं मित्रमंडळ असलं तरीही त्यांचा मुलगाच त्यांचा बेष्टेष्ट फ्रेंड असल्याचं काका मानतात. आपल्या मुलानं '५० सेंट्स'चं रँप लावलं की काका त्याचा आवाज मोठा करायला सांगून, स्वतः त्यावर नाचतात.

काकांच्या मित्रमंडळापैकी कुणालाही '५० सेंट्स' हे रॅपरचं नाव असल्याचं माहीत नव्हतं. काका देशाविदेशांत खूपदा फिरलेले असल्यामुळे त्यांना '५० सेंट्स' हे फक्त पैशांचं वर्णन नसल्याचं माहीत आहे. काका अतिशय सुखी असल्यामुळे काका फक्त पैशांकडेच बघत नाहीत, तर आनंदाकडेही बघतात आणि '५० सेंट्स'च्या रॅपवर नाचून काका ते व्यक्त करतात.

शिवाय काकांना कधीही पार्टी करायची खडी परवानगी असते. काका पार्टीत दारू प्यायले तरीही ते मर्यादेतच राहतात. काकांच्या खूप मैत्रिणी आहेत आणि त्या सगळ्याच काकांबद्दल सद्‌भावना बाळगून असतात. काकांच्या कित्येक मैत्रिणी त्यांच्याकडूनच बटर चिकन करायला शिकल्या आहेत.

मांजर

काकांच्या पोस्ट्स बघून काकांबद्दल कित्येक लोकांना ईर्ष्या वाटते. काकांचं पुस्तक व्हायरल गेल्यावर काकांना त्यांच्या शेजारच्या कॉलेजकुमारानं ही भावना बोलून दाखवली. खालच्या मजल्यावर लिफ्टची वाट बघताना सदर तरुण काकांना म्हणाला, "काका, तुमच्यामुळे मला जेलस वाटतं. तुम्ही किती मस्तं जगता!" यावर काका त्याला एवढंच म्हणाले, "आयुष्य अफाट सुंदर आहे. त्याचा उपभोग घेऊ शकलो नाही तर आपणच करंटे असतो. पण उपभोग घ्यायला शिकलास तर आयुष्यासारखं सुंदर दुसरं काही नाही."

हे ऐकून शेजारी झोपलेल्या मांजरानं कूस बदलली आणि ती पुन्हा झोपली.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

शेजारी सर्व काका,काकू च राहत आहेत.ज्येष्ठ नागरिक साठी च असलेल्या इमारतीत राहता काय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा पण अनुभव आहे ५० वर्षाचे वय लपवणारे किंवा स्वतः काही तरी वेगळे अन्न ग्रहण करतो म्हणून
आपण
२० वर्षाच्या वयाचे आहोत असा भास निर्माण झाल्या मुळे ३० वर्षाच्या व्यक्ती ल पण अंकल बोलतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काका लक्की आहेत. ते काय काय करत असतात?
त्यात त्यांचं पुस्तक पण व्हायरल झालय ... व्हॉटसॲपवर.
खरं म्हणजे मी पण एक लिहिलय... पण ते वाचायला एखादी मांजर पण येत नाही..
ही फोटोत झोपलेली मांजर तर पुस्तकं वाचत असेल असं वाटत नाही. पण ती एक क्युरीयस केस आहेसं वाटतय.
तिच्या एकंदरीत वागणुकीतून दोन अर्थ निघू शकतात.
एक म्हणजे तिला काकांचं बोलण महाबोर वाटत असावं .
किंवा दूसरं म्हणजे काका जे सांगताहेत ते तिला आधीच कळलेल असावं, त्यामुळे, "उम्म त्यात काय एव्हढ? मला सगळं माहितीय. परत परत तेच काय ऐकायचं?"
असं वाटून तिने कुस बदलली असावी का?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

हाहाहा मस्त प्रतिसाद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५० सेंटचे 'कॅन्डी शॉप' गाणे महाअश्लील आहे पण काय मस्त गायले आहे, ज्याचे नाव ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0