शेजारच्या काकूंनी 'असा' साजरा केला दसरा!

कोथरूड, अश्विन शुद्ध दशमी

विजयादशमीनिमित्त काकांच्या ऑफिसमध्ये पूजा ठेवली होती. काकू नटूनथटून ऑफिसला गेल्या. ऑफिसलाही सजवलं. मग साग्रसंगीत पूजा पार पडली. पूजेसाठी काकूंचे झाडून सगळे नातेवाईक आले. जेवणाचा बेतही मोठा फर्मास होता. पाव भाजी, पुलाव, दहीवडा, कोथिंबीरवडी, गुलाबजाम इ. मागवलं होतं. घरीच मसालेभात आणि जिलबी करायच्या हौसेला यंदा सांधेदुखीमुळे काकूंनी सुट्टी दिली. जेवताना काकूंच्या चुलत सुना नुसत्या आपापल्या पोरांच्या मागे ताट घेऊन धावत होत्या, कुणी डायपर्स, रुमाल घेऊन पळत होत्या. त्यांचे नवरे मात्र गप्पा मारत दे दणादण पावभाजी हाणत होते. भलतंच मनोरंजक चित्र! काकूंच्या या नातेवाईकांपैकी बहुतांश सगळी पोरं युरोप-अमेरिकेतून शिकून, काम करून आलेली. काकूंना त्यांचा कोण अभिमान. प्रत्येकाची ओळख करून देताना काकू त्या व्यक्तीचं नाव आणि देश न चुकता सांगत. त्यांचा इतका गोतावळा आणि बहुतांश परदेशी शिकलेला, काम केलेला आहे, हे पाहून 'हे विश्वचि माझे घर' या उक्तीवर माझा ठाम विश्वास बसला. इतकंच नाही तर काकू स्वतः मायक्रोबायलॉजीत पीएच.डी आहेत, हे ऐकून अंमळ हरखायला झालं. खानपान-गप्पागोष्टी झाल्यावर काकू काकांच्या केबिनमध्ये गेल्या. आणि त्यांनी तिथून अटलांटामध्ये डॉक्टर असलेल्या आपल्या लेकाला व्हिडीओकॉल केला. लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये शिकणाऱ्या लेकीलाही व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओकॉलवर मुलाने दसऱ्याची पूजा यथासांग केली आहे की नाही ते पाहिलं आणि काकूंच्या गोट्या कपाळात गेल्या. "अरे काय रे अश्विन हे, तुला आजचा दिवस तरी साधं पितांबर नेसून पूजा करता येत नाही? फॅमिली ग्रुपवर टाकलेल्या फोटोत पण पितांबर नाही, जानवं नाही. शास्त्राचं काही म्हणून नीट पाळत नाही तुम्ही पोरं."

लॅपटॉपवर पूजा

मग मोबाईल कॅमेरा सर्व बाजूंनी वळून वगैरे प्रकार करत काकूंनी, 'शस्त्रपूजा दाखव' अशी तंबी लेकाला दिली. लेकानं ते सारं दाखवलं. पुस्तकं, लॅपटॉप आदीची पूजा केल्याचं पाहूनही त्यांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले, तरी शक्य तेवढ्या सौजन्याने त्या म्हणाल्या, "अरे राजा, स्टेथस्कोप, तुझं पीपीई किट कुठे आहे? ही तुझी कामाची शस्त्र ना! आज त्यांची पूजा करायची असते रे बाबा! काही नाही तर किमान घरातला एखादा मास्क आणि थर्मामीटर तरी ठेवायचंस पाटावर. गाडीला तरी हार घातलायस का?"

नंतर लेकीकडे मोर्चा वळवत त्यांनी तिलाही शास्त्राच्या चार गोष्टी सांगितल्या आणि दोघांनाही सगळं साग्रसंगीत करून लगेच फॅमिली गृपवर फोटो टाकण्याची प्रेमळ धमकी देऊन मगच काकूंनी सोनं लुटलं.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

प्रतिक्रिया

आयडी चुकला काय?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीच चुकला असाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नबा , आयडी स्वापिंग असेल हो ....
हल्लीच्या मुलामुलीचं काही सांगता येतं का ?
आपल्या काळी स्वतःची अभिव्यक्ती किती संवेदनशील पद्धतीने जपली जाई , आठवतंय ना ?
कालाय तास्माई नमः.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त ताशेरे आहेत. मायक्रोबायोलॉजीत पी एच डी. बाब्बौ!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0