हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी...

एकदा एका जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन केले होते. जाहिरात एका घरगुती वापरणाऱ्या वस्तुची करायची होती त्यासाठी जो चांगल्या जाहिरातीची संकल्पना मांडेल त्याला बक्षिस देऊन तीची चित्रीकरणासाठी निवड होणार होती. ठरल्याप्रमाणे पुण्या मुंबईतील जाहिरात कंपन्यांनी झुंबड केली स्पर्धेत. कारण सर्वाधिक इंटेलिजंट कंटेट पुण्या मुंबईतूनच तयार होतो असा त्यांचा फुकाचा अतिआत्मविश्वास आहे. मग इतर भागातील जाहिरात कंपनीच्या प्रतिनिधींना तुच्छतेने वागवणे वगैरे बाष्कळ प्रकार तिथे झाले. शंंभरहून अधिक संकल्पनांची एन्ट्री झाली. सगळ्यांनी आपापल्या बुद्धीमत्तेचा पिट्टा पाडून एकेक संकल्पना मांडली होती. जेव्हा परिक्षकांकडे सगळ्या कल्पना गेल्या तेव्हा प्रत्येक संकल्पनेवर चर्चा, छाननी, वाद झाले. मग किमान समान विषय अधिकृतरीत्या ठरवले गेले.

त्यापैकी एक होता भारतीय कुटुंबातील एकजूट दाखवून जाहिरातीत घरगुती वापराच्या वस्तूचे प्रमोशन करणे. दुसरा म्हणजे नेहमीचाच महिलांचे सबलीकरण आणि ती घरगुती वस्तू वापरून मिळणारे तिला तिचे हक्काचे स्वातंत्र्य. तिसरा विषय घरगुती वस्तू वापरल्याने देशातील सर्व गोरगरिबांना होणारा फायदा दाखवणे. असे विषय ठरले आणि तिचे उपयोगात आणण्यासाठीच्या संकल्पनांची चिरफाड केली गेली. एका संकल्पनेत एका कुटुंबातील गृहिणीचा सगळा वेळ दिवसभर कामात निघून जातो म्हणून घरगुती वस्तू वापरल्याने तिचा निम्मा वेळ वाचेल आणि मुलांच्या जडणघडणीत जास्त लक्ष देता येईल असे मांडले होते. त्यावर एका परिक्षक महिलेचा लागलीच आक्षेप आला. त्या स्वतः स्त्रीमुक्तीच्या समर्थक होत्या. तशा त्या ते दर्शवण्यासाठी स्लीव्हलेस कॉटनचा कुर्ता आणि ब्रँडेड जीन्स परिधान करूनच सार्वजनिक जीवनात वावरत असत. सोबत चेहऱ्याला साजेशा बॉबकट व कुर्त्याला मँचिंग अशी साधी ओढणी असा पेहराव नेहमीचाच. आक्षेपाचे मूळ कारण जाहिराती मध्ये महिला गृहिणी दाखवून स्त्रीला कुटुंबात जखडून ठेवण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहात असे होते. त्यांचा तात्विक संताप झाला. तसही त्यांची दिवसाची सुरूवातच अशा तात्त्विक संतापाने होते त्यामुळे त्या बऱ्यापैकी रुळल्या होत्या अशा प्रसंगांना तोंड देताना. काय काय असतात प्रतिपक्षाचे आक्षेप, आरोप आणि युक्तिवाद वगैरेंची त्यांना पुरेपूर जाणीव होती. त्यांच्या मते आजवर सगळ्या माध्यामातून महिला ही शोषित असतात हे भासवले गेले. तिला तिचे हक्क, अधिकार वगैरेंसाठी तमाम लोकांची आणि समजाची पुरुषसत्ताक संस्कृतीच जबाबदार आहे. अशा अनेक बुरसटलेल्या परंपरा, रुढी, प्रथा वगैरेंवर त्यांना फार चीड येत असे. त्यांचा आक्षेप आल्यानंतर परिक्षक मंडळींमध्ये तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक होते . त्यांनी पण बाईंना दुजोरा दिला.

एक परिक्षक मात्र या जाहिरात संकल्पनेला समर्थन देत होते. त्यांच्या मते भारतात बऱ्याचशा कुटुंबातील महिला ह्याच रिमोटकंट्रोल असतात खरेदीच्या बाबतीत. घर चालवण्यासाठी काय नको काय पाहिजे हे ठरवण्यासाठी महिलांचा हातखंडा असतो. अशा महिलांचा चलाखपणे जाहिरातीत वापर करून कंपन्यांना भरघोस फायदा झाल्याचे अनेक स्टँटिस्टिकल डेटा प्रस्तुत करून प्रेझेंटेशन दाखवले. ते एका मातब्बर जाहिरात कंपनीत कंटेट क्रीएटर म्हणून खूप वर्षे काम करत होते. यावर स्त्रीमुक्ती वादी बाईंनी लागलीच त्यांच्या मतावर त्वेषाने आक्षेप घेतला. 'महिलांचा चलाखपणे जाहिरातीत वापर करून' म्हणजे काय? महिला वस्तू नाहीत. वी आर ह्यूमन टू. वगैरे तावातावाने बडबडल्या. यावर लगेच तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक प्रतिक्रिया वगैरे देऊ लागले. अशाच चर्चा, वादविवाद आणि आक्षेप झाल्यानंतर एक नवीन संकल्पना समोर आली. ज्या वस्तूसाठी जाहिरात करायची आहे तिला आधुनिक आणि जुना नेहमीचाच ग्राहकवर्ग भूलला पाहिजे. त्यासाठी एका महाशयांनी मुद्दा मांडला. 'नऊवारी साडी नेसलेली स्लीवलेस घालणारी बाई' आपण मॉडेल म्हणून जाहिरातीत दाखवू. म्हणजे ऑफबीट फँशन स्टाईल विथ क्लासिक टच वगैरे मसाला होईल. तशी ऑड ड्रेसकोड वाटेल अशीच संकल्पना होती आणि ती मांडणारे टेक्स्टाईल आणि फँशन ब्रँडिंग एक्सपर्ट होते. आतापर्यंत शांत बसून ऐकूण घेणारे व सहभागी असणारे एक तथाकथित संस्कृती रक्षक म्हणवून घेणारे थोडेसे उचकले. अशी नऊवारी साडी नेसून स्लीवलेस वगैरे मॉडेल नको म्हणून बोलू लागले. समाजात चांगला संदेश वगैरे जाणार नाही असा तर्कट देऊ लागले. मुख्य आक्षेप नऊवारी साडी व स्लीवलेस बद्दल होता. त्यांचे मत नऊवारी साडी एका जुन्या लिजंडरी पिढीचे प्रतिक आहे. त्याच्याशी छेडछाड करू नये. स्लीवलेस घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रीयांना समाजात फारच वेगळ्या पद्धतीने पाहिले जाते वगैरे वगैरे अजब तर्कट मांडले गेले.

एकदोघांकडून समर्थन मिळतेय आणि आपल्या मताला अनुकूलता दिसल्यावर त्यांच्यातील अस्सल संस्कृती रक्षक जागा झाला आणि स्त्रीदाक्षिण्य, स्त्रीयांच्या तोकड्या कपड्यामुळे होणारे पतन वगैरे रटाळ विषय पटलावर येऊ लागले. यावर स्त्रीमुक्तीचा अंगिकार करणाऱ्या बाईंना हुरूप आला. त्यांनी लागलीच प्रतिप्रश्न केला. स्त्रीयांनी काय पद्धतीचा पहेराव करावा आपण सांगणारे आणि ठरवणारे कोण? आजची स्त्री पुढारलेली आहे तिला प्रोजेक्ट करण्यासाठी अशी फँशनमध्ये मोडतोड केली तर बिघडले कुठे? पुरुषसत्ताक समाजातील स्त्रीला सहन करावे लागलेले छळ वगैरेंचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडल्यानंतर तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक लागलीच हिरिरीने मुद्दे मांडू लागले. परत वाद, प्रतिवाद, चर्चा वगैरे अखंडपणे सुरू झाल्या. येनकेनप्रकारेण सहिष्णुता असहिष्णुता वगैरे सोपस्कर आलेच सरतेशेवटी. असे सगळे वायफळ वगैरे बोलाचाली चालू असताना एकदम संस्कृती रक्षक वाले काका ओरडून म्हणाले, असे असेल तर 'हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी' मॉडेल म्हणून दाखवा. मग बघू कोण काय करेल. कोण सहिष्णू असहिष्णू वगैरे ठरेल. त्यांच्या बोलण्यात एक बेरकी सूर होता. आता मात्र चर्चेचा सूर टिपेला पोचला होता. हिजाब, बिकीनी वगैरे विषय आल्यावर तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक नाके मुरडायला लागले. उगाचंच द्वेषपूर्ण पद्धतीने मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील वगैरे आक्षेप घेतले गेले. यावर स्त्रीमुक्तीचा गजर करणाऱ्या बाई मात्र मूग गिळून गप्प बसल्या होत्या. त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक्रमात मुस्लिम स्त्रीया वर्ज्य होत्या बहुतेक. आता संस्कृती रक्षक मंडळींना फारच चेव आला. पुरोगाम्यांचे आतापर्यंत मांडलेले मुद्दे घेऊन ही मंडळी त्यांना डिवचू लागली. मग नेहमीप्रमाणे तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक मोघम सोयीस्करपणे बोलू लागले. रटाळ वादविवाद काही काळ चालूच होते. एकेका संकल्पनांची चिरफाड वगैरे करत लोकांचा उत्साह कमी होत गेला.

संकल्पनांची छाननी झाली होती मात्र दोनच मुद्दे ऐरणीवर होते. नऊवारी साडी स्लीवलेस घालणारी बाई की हिजाब आणि बिकीनी परिधान करणारी मॉडेल यावर सगळं घोडं अडलं. संभाव्य धोके लक्षात घेता आणि सणासुदीचे दिवसांत उगाचंच सोशल मेडियावर निगेटिव्ह ट्रोलिंग वगैरे नको म्हणून जाहिरात क्षेत्रातील आणि विपणन विभागाचे प्रमुख तज्ञांचा सल्ला घ्यावा असा ठराव एकमताने पास झाला. शेवटी तज्ञांच्या सल्ल्याने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा संकल्पना रद्दबातल ठरवल्या आणि पुन्हा एकदा त्याच जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन नव्या नियमावली नुसार करण्याचे ठरले.

- भूषण वर्धेकर, पुणे.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

उत्पादन विकणारी कंपनी कशाला आपल्याला टार्गेट करून घेऊन पायावर आणि रेवन्यूवर धोंडा पाडून घेईल?

स्पर्धेचं निमित्त करून उगाचच भांडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ली निमित्त कशाचेही चालते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

“स्त्री मुक्तीवाल्या बायका आणि पुरोगामी लोक दांभिक आणि/किंवा मूर्ख असतात.” एवढेच ह्मणायचे असेल, तर त्यासाठी इतका लेखनप्रपंच कशाला?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

तोंडी लावायला म्हणून संस्कृतीरक्षकांचा दांभिकपणा दिलाय कि, तिकडे बघा, तिकडे बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्लीचे स्त्रीमुक्ती वाले आणि हल्लीचे पुरोगामी वगैरे लोकांनी दुकाने थाटली आहेत. अशी मंडळी रोज सिद्ध करतात की आम्ही ढोंगी आहोत.
आजवर त्यांनी एक नँरेटिव्ह सेट केले होते ते समाजमाध्यमांमुळे फोल ठरले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

आजवर त्यांनी एक नँरेटिव्ह सेट केले होते ते समाजमाध्यमांमुळे फोल ठरले.
समाजमाध्यमास दोष कशाला?

जेव्हा उदात्त आणि मोकळे विचारांचा खून पाडणाऱ्या घटना आपल्याच घराच्या उंबऱ्याशी येतात तेव्हा यांचेच मन आणि शरीर आक्रोश करते आतल्याआत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक पात्र रचना आहे. अजुन मासलेवाईक नमुने / स्टिरीओटाइप्स आणता आले असते तर अजुन मजा आली असती.
सुतावरुन स्वर्ग गाठण्यात परीक्षक मंडळी यशस्वी झाली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल अशी स्टिरीओटाइप्स मसालेदार मंडळी बऱ्याचशा ठिकाणी दिसतात. असे नमुने घेऊन वेगवेगळे वेचे लिहिण्याचा मानस आहे.
जो ढोंगीपणा करतो त्या बडवलाच पाहिजे. कारण व्यवस्थेत ढोंग वाढले की जे अस्सल असतं ते बाहेर फेकले जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

सेम एनर्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण बिंदी घातली नाही म्हणून रडारड करणारी स्नोफ्लेक क्राऊड आहे आपल्याकडे. ते हिजाब वाल्या बिकनीतले प्रॉडकट् का घेतील ?

मुळात स्लीवलेस आणि नऊवारी इमॅजिन करता येते. गुगल वर सापडली सुद्धा. आणि दिसतेसुद्धा छान. पण हिजाब आणि बिकिनी चांगले दिसणारे का ? नऊवारी आणि स्लीवलेस मध्ये काही अंशी तरी ऐस्थेटिक व्हिजन आहे. हिजाब आणि बिकिनी वैगेरे भन्नाट कल्पना फेकणे असले काम रिऍक्शनरी संस्कृतिरक्षकच करू शकतात.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याकडच्या बऱ्याच लोकांना बिकिनी मध्ये पण एस्थेटिक व्हीजन दिसते. त्यातही काही टवाळांना जे झाकलेले असते तेच पाहण्यात रस असतो.
कोणी काय परिधान करावे आणि कोणी कसे ते कँरी करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न!
पण असे समजा की बिकिनी आणि हिजाब असे कॉम्बिनेशन परिधान करून एखाद्या मॉडेल ने रँम्पवॉक केले किंवा जाहिरातीत काम केले तर काय गहजब होईल ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

पण असे समजा की बिकिनी आणि हिजाब असे कॉम्बिनेशन परिधान करून एखाद्या मॉडेल ने रँम्पवॉक केले किंवा जाहिरातीत काम केले तर काय गहजब होईल ना?

काहीही विशेष होणार नाही. रादर, एखादा पुरुष मॉडेल जर कंबरेवरती कडक इस्त्रीचा पांढरा फॉर्मल शर्ट, त्यावर नेकटाय, नि त्यावर सुटातले जॅकेट, नि कमरेखाली फक्त अंडरवेअर (किंवा फार फार तर शॉर्ट्स) घालून रँपवॉक करू लागला, तर जे काही होईल, तेच. लोक हसतील त्याला फार फार तर. याहून अधिक काही होण्याचे कारण दिसत नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदाहरणार्थ बरेच प्रसंग आहेत. आत्तातरी खालील प्रसंग आठवतात.

काही वर्षापूर्वी सेक्सी दुर्गा वगैरे सिनेमावर काही हिंदूत्ववादी टोळक्याने आक्षेप घेतला होता. त्याचे वार्तांकन करताना कोण्या एका अँकरने सेक्सी फातिमा वगैरे संदर्भात ट्वीट केले होते. यावर हल्लीच्या भाषेत शांतीदुतांनी निषेध वगैरे केले होते. बातमी १
बातमी २

एक दशकभरापूर्वी केरळातील एका कॉलेजच्या प्रोफेसर वर हल्ला झाला होता. संदर्भासाठी

अजून एक

मागे एकदा पैगंबर यांचे व्यंगचित्र काढले म्हणून भारतात ठिकठिकाणी मोर्चे, निषेध वगैरे निघाले होते.
असे बरेच प्रसंग असतात. जे मेनस्ट्रीम मेडिया पासून लांब असतात. आणि तथाकथित पुरोगामी म्हणवून घेणारे पण मूग गिळून गप्पा असतात अशावेळी.

एकूण काय तर हल्लीच्या पुरोगाम्यांनी क्रेडिटिबिलिटी पुर्णपणे घालवली आहे. त्यामुळे जे खरेखुरे वंचित, शोषित असतात त्यांना वाली कोणीही राहत नाही.
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

पुरोगाम्यांवर टीका करणारे स्वतः बऱ्याचदा अधोगामी असतात. दुसऱ्याची कम्युनिटीत पुरोगामी वारे वाहावे असा उदात्त हेतू क्वचितच असतो. उलट आपल्याकडे जैसे थे राहावे असा हेतू बऱ्याचदा दिसतो.

नरहर कुरुंदकर कुठेतरी म्हणतात की-
मैदानात कधीही न उतरलेली माणसं कुस्ती करून हरलेल्या मल्लाला वाकुल्या दाखवतात, त्यातला प्रकार.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्लीचे पुरोगामी डबलढोलकी आणि टिमकी वाजवण्यात अव्वल आहेत. सेक्युलर, पुरोगामी, निधर्मी, परिवर्तनवादी वगैरे लोक कंपू करून प्रस्थापित झाले होते. गेल्या काही वर्षांत अशा प्रस्थापितांना विस्थापित होण्याची वेळ आहे. भल्याभल्यांची दुकानदारी उद्धवस्त झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

हो ना - शक्य तितक्यांना ठार केले, बऱ्याच जणांना तुरुंगात टाकले. काहींना हग्या मार दिला. उरलेल्यांना रोज धमक्या देत आहो. मग दुकाने चालवतीलच कसे हरामखोर?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

पुणे-मुंबई चे लोक, जाहिरात बनवणारे, हल्लीचे पुरोगामी (म्हणजे काय ते अल्ला जाणे), संस्कृती संरक्षक, स्त्रीमुक्तीवादी, (कमेंट्स मध्ये म्हणाल्या प्रमाणे हिजाब वाले) इत्यादी अनेक (ढोंगी) मंडळींवर राग दिसतोय तुमचा. तुम्हाला आवडणार्‍या (प्रामाणिक) लोकांमधे कोण उरतात, तेही सांगून टाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ली सोयीनुसार भूमिका घेणारे आणि निवडीनुसार विरोध करणाऱ्या लोकांची संख्या वाढलीय. मरणाऱ्या माणसाचा धर्म कोणता आहे ते पाहून आसवे गाळणारे पण वाढलेत. हर चॉईस हर व्हॉईस म्हणायचे पूर्वग्रहदूषित विचाराने महिलांचे सबलीकरणासाठी नौटंकी करणाऱ्या लोकांची पण संख्या वाढलीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो!

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

अस्मादिकास नव्व्याण्णवबादकर बिरूदावली बहाल केल्याबद्दल धन्यवाद! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

मला वाटलं दोन पूज्य काढल्यावर राहतो तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शास्त्र असतं ते!
Wink Wink Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

० १ ० अशी लिहिली जात असती तर. . .
फुडे* उभा पूज्य
फाटी** उभा पूज्य
मध्ये मी एकला
चालवून घ्या हो

(( *-पुढे, **-मागे ))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डावीकडील पूज्ये कितीही असली तर व्यवहारी जगात किंमत शून्य.
उजवीकडील पूज्यांच्या किंमतीला व्यवहारी जगात मानाचे पान आहे हो.

तसही उजव्या बाजूला भाव वधारला जातो. डावीकडचे बिचारे रकाने भरण्यासाठीच उरतात बिच्चारे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

.

तसही उजव्या बाजूला भाव वधारला जातो. डावीकडचे बिचारे रकाने भरण्यासाठीच उरतात

हा हा हा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

सोमिचा गदारोळ, परस्परविरोधी नॅरेटिव्ह्ज् आणि एकूणच फुरोगामींचा ढोंगीपणाचा बुरखा (की हिजाब!)...
मस्त वाटलं, स्वयंभू!

अजून येऊ द्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

जसा वेळ मिळेल तसा लिखाण करण्याचा मानस आहे. तसंही आजूबाजूला मनोरंजनासाठी बऱ्याचशा घटना आजकाल घडत आहेत. घडवल्या जात आहेत असंही म्ह हवं तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ2

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

पहील्यांदा मला लाईट व विनोदी धागा वाटलेला पण तुम्ही लै शिरेस होउन ऱ्हायले. ढोंगी वगैरे तुम्हाला आतल्या गोटाची खबर दिसते. तसेही स्त्रीमुक्तीवादी विचार घेउन कोणीतरी त्यांच्यातल्याच, हिजाबवाल्या महीलाच उभ्या राहील्या पाहीजेत असे बाहेरुन पाठींबा देउन काही होणार नाहीये त्यामुळे इतर कोणी त्यात लक्ष घालत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शांत गदाधारी भीम, शांत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.