एमू पालनाचा फसलेला प्रयोग

o1 आजकाल ‘स्टार्टअप’ची हवा आहे. प्रत्येक स्टार्टअपवाल्याला वाटत असते की आपली आयडियाच भन्नाट आहे; आपले उत्पादन नक्कीच हिट होईल;
पैशाचा धो धो पाऊस पडेल; ग्राहकांची गर्दी होईल; आपण बघता बघता अंबानी टाइप आलिशान बंगल्यात राहयाला जाऊ; ऐषारामात राहू. इ.इ. परंतु हवेत तरंगायला लावणारे हे शेख महंमदी विचार काही काळातच आपल्याला जमिनीवर उतरवतील व बघता बघता आपली गुंतवणूक व गुंतवणुकीनंतरच्या स्वप्नांना चक्काचूर करतील याची कल्पनासुद्धा आपल्याला करता येणार नाही. अशाच एका गुंतवणुकीचा आपण मागोवा घेणार आहोत. व त्यातून काही शिकण्यासारखे असल्यास शिकणार आहोत.
काही वर्षापूर्वी भारताच्या ग्रामीण भागाला ऑस्ट्रेलियाच्या एमू या महाकाय, अगडबंब पक्ष्याने अक्षरशः वेड लावले होते. कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेल्या या कल्पनेला पैसेवाल्या शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतले. कोंबडी पाळतो त्याच प्रमाणे एमू पाळायचे; त्यात काय अवघड आहे, अशीच समजूत या व्यवसायात पैसे गुंतवलेल्यांची होती. मुळात यात नवीन काही नव्हते. अशाच प्रकारे एमूपालनाच्या फंदात पडलेल्या अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील कृषी उद्योजकांनी हात पोळून घेतले होते. परंतु पुढच्याला ठेच मागचा शहाणा या म्हणीतील तथ्यांशाकडे काना डोळा करत आपणच फक्त शहाणे इतर सर्व मूर्ख अशी समजूत करून घेतल्यामुळे आपले उद्योजक नव्या उत्साहाने एमूच्या या बेभरवश्याच्या उद्योगावर पैसे गुंतवले व अक्षरशः काही महिन्यात कफल्लकही झाले. 02

एमू हा मूळचा ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय पक्षी म्हणून मिरवणारा पक्षी. पक्षी-जगतातील शहामृगानंतरचा नंबर दोनचा महाकाय पक्षी. ऑस्ट्रेलियातील मूळ आदिवासीपासून आतापर्यंतच्या नागर संस्कृतीला प्रेरणा देणारा. ऑस्ट्रेलियाचे सैनिकी समवस्त्र, पोस्ट तिकीट व तेथील 50 सेंटच्या नाण्यावर विराजमान झालेल्या या पक्षीच्या संदर्भात हजारो लोककथा व आख्यायिका आहेत व पिढ्यान पिढ्या त्यांचे पारायण होत असते. एवढेच नव्हे तर एमूच्या विरोधात 1932मध्ये युद्धही पुकारले होते. कारण या पक्ष्यांचा थवा शेतकऱ्यांच्या पिकाचा नाश करतो. परंतु या युद्धातही एमूच विजयी ठरले.

19व्या शतकात या पक्षीला जागतिक प्रसिद्धी मिळाली. जगभरातील प्राणी संग्रहालयात एमू दिसू लागले. बालकांपासून प्रौढ प्रेक्षकापर्यत सर्वांचाच हा कुतूहलाचा विषय होता. काही काळ तर एमूच्या मांसाला डेलिकसीचा दर्जा मिळाला. याच्या मांसाची चव घेणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. अमेरिकेतील उत्साही उद्योजकांना या व्यवसायात प्रचंड नफा दिसू लागला. याच निमित्ताने अमेरिकेतील टेक्सास प्रांतात 1986च्या सुमारास एमूंच्या जोड्यांचा प्रवेश झाला. या सुमारास हजारेक डॉलर्सला मिळणाऱ्या जोडीचा 1993मध्ये 28000 डॉलर्स पर्यंत भाव वधारला. एमूच्या व्यावसायिकांनी स्वतंत्र संघटना उभी केली. सदस्यांची संख्या वाढू लागली. 1988 ते 1994पर्यंतच्या काळात सदस्यांची संख्या 27 पट वाढली. 5500 सदस्य टेक्सासमधले होते.

एमूचा टेक्सासमधला प्रवेश त्याच्या चवदार मांसासाठी झाला. बीफचे रेड मीट आरोग्याला हानिकारक असते हे कळल्यानंतर टेक्सासमधील नवश्रीमंत पर्यायाच्या शोधात होते. 1980च्या सुमारास त्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. त्यात एमूचे मांस उत्कृष्ट ठरले. एमूच्या मांसात कोलेस्टोरॉल कमी, लोह जास्त व चवीलाही उत्कृष्ट हे कळल्यावर हॉटेल व्यावसायिकांची याच्या मांसासाठीची मागणी वाढली. एमूच्या व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी नवश्रीमंत पुढे सरसावले. परंतु हा फुगा कधी फुटेल याचा अंदाज आला नाही. धोका काही सांगून सवरून येत नसतो. कुठून कधी येईल याची कल्पना येत नाही.

यापूर्वीसुद्धा जास्त कमवण्याच्या हव्यासापायी देशोधडीला लागलेल्या व्यावसायिकांची संख्याही कमी नव्हती. हे लोण औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात पसरली. या क्रांतीनंतर रोज नवीन नवीन कल्पनांची भर पडत होती. व अशा भन्नाट कल्पनांच्या मागे गुंतवणूक करण्यास तयार असलेले भरपूर होते. 17 व्या शतकात ट्युलिपच्या शेतीने गुंतवणूकदारांना कफल्लक बनविले. 18व्या व 19व्या शतकात रेल्वे बाँड्सनी धुमाकूळ घातला. 20व्या शतकात स्टॉक मार्केट व काही महिन्यात पैसे दुप्पट करून देऊ या आश्वासनांच्या पाँझी स्कीम्सनी गुंतवणूकदाराना लुबाडले. व 21व्या शतकात बिटकॉइन हे काम करत आहे. या सर्व व्यवहारामागे प्रामाणिक प्रयत्नापेक्षा जास्त कमाईचा हव्यासच कारणीभूत होता. येथेही मेंढरांच्या मानसिकतेचाच प्रत्यय येतो. पुढचा खड्यात पडला की त्याच्या मागोमाग दुसराही तयार!

समाज माध्यमाचा नुकताच प्रवेश झाला होता. त्याचा खुबीने उपयोग करून येमूच्या उद्योगात गुंतवणूक करण्यास आकर्षित करण्यात आले. मौखिक जाहिराती व स्थानिक पेपरमधील जाहिरातवजा बातम्यांनी एमू पालनातून मिळणाऱ्या भरमसाठ उत्पन्नाची हमी दिली. एमू पालनातून मिळणाऱ्या नफ्याच्या अंदाजांचे उदात्तीकरण केल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांच्यातील लोभी वृत्ती जागी झाली. एमू म्हणजे जणू काही कामधेनूच; जिवंत असताना नारळाच्या आकाराचे 10-15 अंडी देणारा, नियमितपणे पिल्लाना जन्म देणारा, भरपूर आयुष्य असलेला, व मेल्यानंतर चवदार मांस देणारा, त्यांच्या पिसातून व कातडीपासून फॅशनेबल वस्तू बनवता येणारा हा पक्षी होता. व त्याच्या अंड्यापासून चार जणाचे पोट सहज भरण्याइतके ऑम्लेट/बर्गर्स बनविता येईल व त्यासाठी ग्राहकांची रीघ लागेल यावर उद्योजकांचा विश्वास होता. एमूच्या अंड्याचा आकार 13 सेंमीx9 सेंमी एवढा मोठा व वजन अर्धा किलोच्या आसपास असल्यामुळे ग्राहकांना त्याची भुरळ पडली नसेल तरच नवल. फक्त त्या अंड्याची किमत कोंबडीच्या अंड्यापेक्षा 50-60 पट असणार याचा अंदाज जाहिरात वाचताना लक्षात आला नाही. जाहिरातीतील भरमसाठ आकडेवारीवर सर्वजण डोळे मिटून विश्वास ठेवत होते. एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे सोळा याप्रमाणे फुगा फुगतच गेला. व धोक्याच्या इशाऱ्याकडे एकजात सर्वानी दुर्लक्ष केले.05

एमूच्या या वैचित्र्यपूर्ण व्यवहाराला त्याकाळच्या प्रशासनानीही थोड्या फार प्रमाणात हातभार लावला. 1992ते 1995च्या कालखंडात कृषी खाते एमू पालनासाठी 4 लाख डॉलर्स कर्ज देत होती. एमू पालनाच्या उत्पन्नावरील करात सवलत जाहीर झाली. टेक्सास प्रांतातील कायद्याप्रमाणे जगभरातील कुठल्याही प्राण्याची आयात करण्यास मुभा होती; मग एमू असो की वाघ-सिंह असो. त्या प्राण्यांचे काय करायचे; पाळायचे की मारून खायचे हे ज्यानी त्यानी ठरवावे. त्यामुळे एमूच्या आयातीला कुठलेही निर्बँध नव्हते. याचा पुरेपूर फायदा मधल्या दलालानी घेतला.

खरे पाहता येमूचा पाळीव पक्षी म्हणून काय काय करावे याबाबत एमूपालनातील उद्योजक पूर्णपणे अनभिज्ञ होते. एमूंना चरण्यासाठी, हालचालीसाठी गायी-गुरांच्या एवढी मोठी नसली तरी मोठी मोकळी जमीन लागते, हेही त्याना माहित नव्हते. त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयींची कल्पना नव्हती. त्यांच्या भटकण्याच्या वेळा, समागमाच्या सवयी, काल, वेळ इत्यादी तपशील व अमेरिकेतील हवामानाला त्या मानवतील की नाही, याचा प्राथमिक अभ्यासही कदाचित त्यांनी केला नसेल. एमूच्या जोड्या विकत घेतलेले शहरी उद्योजक ग्रामीण भागात स्थलांतरित झालेले. त्यांना कोंबडी पाळल्यासारखे एमू पाळता येईल असे वाटत होते. त्यातले काही जण एमूच्या अंड्यांना किचनमध्ये बल्बच्या उष्णतेवर उबवण्याचे प्रयत्न करत होते!

मुळात एमू हा अत्यंत निरुपद्रवी प्राणी. टेक्सासच्या राकट शेतकऱ्यांची हाताळणी निमूटपणे सहन करणारा. मात्र त्या पक्ष्यांचे काही वैशिष्ट्यही होते. वरकरणी शांत दिसणारी एमूंची जोडी समागमऋतूत रौद्ररूप धारण करते. त्या काळात मादी एमू जोर जोराने किंचाळत मोठ्या आवाजात ओरडत असते व नर एमू हुंकाराने प्रतिसाद देत असतो. इतर प्राणी-पक्षीमध्ये न दिसणारा स्त्रीसत्ताक पद्धतीतील स्त्रीश्रेष्ठत्व एमू वंशात आढळतो. येथे नर एमू आपल्याला आवडेल त्या मादीचा शोध घेऊन समागम करत नाही; तर मादी आपल्याला आवडेल त्या नराशी समागम करते. यासाठी कित्येक वेळा माद्यामध्ये भांडणंही होतात. नर एमूला समागमासाठी निवडीचे स्वातंत्र्य नाही. समागमनांतर मादी दर एक दोन दिवसाच्या अंतरावर 10 -15 अंडी घालून नर एमूच्या ताब्यात देते व चरण्यासाठी चक्क निघून जाते. नर एमू अंडी उबवण्यापासून पिल्लं मोठी होईपर्यंत त्यांच्या पालन पोषणाची एक पालकत्वाची जबाबदारी पुढच्या समागमाच्या ऋतुपर्यंत घेतो व नंतर कुठली मादी एमू आपल्याला निवडते याची प्रतीक्षा करत वेळ घालवतो. अनेक वेळा स्वतः 8-10 दिवस उपाशी राहून पिल्लांना तो भरवू शकतो.

एमूच्या या सर्व वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे ज्यांना एमू पालनातून बक्कळ कमाई करायची होती त्यांच्या पदरी निराशा आली. महत्वाते म्हणजे या महाकाय पक्ष्यांना आवरायचे कसे, हेच त्यांना कळेनासे झाले. पूर्ण वाढलेल्या एमू पक्ष्याची उंची सामान्य माणसापेक्षा जास्त – सहा ते साडे सहा फूट – असते व वजनही 50-55 किलोच्या आसपास. जरी त्यांना उडता येत नसले तरी ताशी 50 किमी वेगाने ते पळू शकतात. त्यांच्या अंड्याच्या व पिल्लांच्या आसपास गेल्यास जोराने लाथाही मारू शकतात व आलेल्यांना रक्त बंबाळ करू शकतात.

एमूंना वाढविणे हे सुद्धा काही सोपे नव्हते. उद्योजकांनी लाखोंनी पैसे ओतले होते. व त्यांना योग्य परतावा हवा होता. परंतु देखभालीचा खर्च वाढतच होता. कोंबड्यांसारखे बंदिस्त अशा 1-2 गुंठे जागेत त्याना ठेवणे अशक्य होते. एमूसाठीची जागा एकरात मोजावी लागत होती. त्यांच्या खाण्यापिण्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च येत होता. एवढेच नव्हे तर हा सर्व व्यवहार आतबट्ट्यातला ठरत होता. कित्येक ठिकाणी फसवा फसवी झाली. एमूंची आयात करून देतो म्हणणारे मधले दलाल पैसे घेऊन बेपत्ता झाले. पोलीसांकडे तक्रार नोंदवूनही काही उपयोग झाला नाही. एवढे सर्व करूनही एमूच्या अंड्यांना व मांसाला मागणीही नव्हती. ग्राहकांनी याकडे चक्क पाठ फिरवली. एमूच्या मांसात कोलेस्टोरॉल प्रमाण कमी असूनही स्वस्त असलेल्या बीफलाच जास्त उठाव होता. उद्योजकांना काय करावे हाच प्रश्न पडला. सहकारी तत्वावर ठिकठिकाणी विक्री केंद्रं उभारण्यात आले. परंतु मोठ्या प्रमाणातील विक्रीचे स्वप्न स्वप्नच राहिले. वास्तव फारच वेगळे होते. ग्राहकांना रोजच्या खाण्यात एमूचे मांस न परवडण्यासारखे होते.

मागणी कमी होत गेली व पुरवठा वाढतच गेला. खरे पाहता एमूची एक जोडी 5-15 अंडी घालत होती व अंडी घालण्याचा हा काळ सुमारे 16 वर्षे होता. वर्षाला 10-12 अंडे पुनरुत्पादनासाठी वेगळे ठेवत गेल्यास त्यातून पुढील 5 वर्षात 133 जोड्या जन्माला येऊ शकतात. व दहा वर्षात ही संख्या 36000 पर्यंत जाऊ शकते. परंतु जसजशी एमूंची संख्या वाढायला लगली तसतशी अमेरिकनांची रेड मीटवरील वासनाही उडाली.

1998नंतर एमूची किंमत शून्याच्या जवळ पास आली. ही बला आपल्याला नको म्हणत शेतकरी कुंपण उघडून एमूंना बाहेर हाकलून देऊ लागले. एमू पळून गेल्यास ज्याना हवे ते त्यांना पाळू शकतात, हा हिशोब त्यामागे होता. 2-4 डालर्सलासुद्धा एमूना विकत घेण्यास ग्राहक नव्हते. भरकटत गेलेला यमूचा थवा हा रहदारी पोलीसांची डोकेदुखी झाली. रात्री - अपरात्री गाड्यांची पर्वा न करता एमू हमरस्ता ओलांडत होते. पोलीसांनी पकडले तरी त्यांना ठेवायचे कुठे वा त्यांचे काय करायचे हेच पोलीसांना कळेनासे झाले. कारण या महाकाय पक्ष्यांसाठी कोंडवाडेच त्यांच्याकडे नव्हते. एमूचे आयुष्य थोडे थोडके नव्हे, तर 30 वर्षे असते. काही शेतकरी त्यांना उपाशी ठेऊन मारू लागले. काहींनी बेसबॉलच्या बॅटने मारून त्यांचा जीव घेतला. टेक्सास प्रांतात प्राणी – पक्षी म्हणजे त्यांच्या दृष्टीने स्वतःच्या मालकीची मालमत्ता होती. त्याचे काय करायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य टेक्सासवासियांना होते. त्यात सरकारची लुडबुड चालत नव्हती. एमूचा हा कटु अनुभव पदरी बाळगून पुढची पिढी शहाणी झाली. 2013 नंतर हा एमू पालनाचा खेळ कायमचा संपला.04

परंतु अमेरिकेची भ्रष्ट नक्कल करण्यात धन्यता मानणाऱ्या भारतीय उद्योजकांनी अमेरिकेत पूर्णपणे फसलेल्या या उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याचा चंग बांधला. 2013मध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश व काही प्रमाणात महाराष्ट्रातही एमू पालनाचे वेड लागले. या वेड्यांच्या हव्यासात ऑस्ट्रेलियातून एमू पक्ष्यांना आयात करणाऱ्यांनी अमाप पैसे कमविले. कृषी उद्योजक त्यांच्या भूलथापांना बळी पडले. एमूंच्या विक्रीसाठी काही बोगस कंपन्या निघाल्या. जाहिरातीच्या जोरावर लोभी शेतकऱ्यांना आता अडीच लाख रुपयाची ठेव भरून एमूची जोडी घेऊन जा व वर्षानंतर जोडी परत आणून दिल्यास ठेव परत व वर्षभरातील त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचा पूर्ण हक्क अशी लालूच दाखवून एमू पालनाच्या धंद्यात त्यांना ओढण्यात आले. वर्षभरात ही एमूची जोडी किती अंडे देईल, त्यातून किती कमाई होईल, किती पिल्लं होतील, ती पिल्लं वाढल्यानंतर किती उत्पन्न मिळेल, एमू मेली तर त्यातून काय काय मिळेल, किती फायदा होईल याचे आकडे शेतकऱ्यांच्या अंगावर फेकून या कंपन्या गबर झाल्या. एकेक अंड्याची किंमत हजार रुपये ठेवले तरी नवीन उदयास आलेले धाबे, रिसॉर्ट्स व पंचतारांकित हॉटेल्स सहज विकत घेतील या आश्वसनावर विसंबून शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून एमूच्या जोड्या घेऊन आले. वर्षभर कसेबसे खस्ता खात एमूची जोडी जिवंत ठेवण्यात काही शेतकरी यशस्वी झाले. व हे शेतकरी वर्षानंतर एमूची जोडी घेऊन पैसे परत मागायला जाईपर्यंत कंपनी गाशा गुंडाळून गायब. बँक मात्र जप्तीची नोटीस घेऊन दारात हजर. वर्षभरात हा भ्रमाचा भोपळा फुटला. हाती काही लागले नाही. बँक तगादा लावून हप्ते वसूल करू लागली. स्वतःची शेतजमीन विकून कर्ज फेडण्याची पाळी शेतकऱ्यावर आली. बँकेतील अधिकारी, बोगस कंपन्या व दलाल या सर्वानी मिळून संगनमताने शेतकऱ्यांना नागविले. मोठ्या परताव्याच्या लोभापायी शेतकरी देशोधडीला लागले. एमू मात्र कुठल्यातरी जंगलातील हिंस्र पशूंचे शिकार झाले.

अशी आहे ही एमू पक्ष्याची (रड)कथा. यातून काय शिकता येईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

संदर्भः इकॉनॉमिस्ट
1
2

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अत्यंत रोचक, नेहमीप्रमाणे.

या लेखात एक गोष्ट पूर्वीच्या माहितीपेक्षा अगदी वेगळी दिसली. एमूच्या चवीचं आणि मांसाचं जे (चांगलं) वर्णन मार्केटिंग दरम्यान केलं गेलं ते प्रत्यक्षात अत्यंत विपरीत होतं असे उल्लेख काही ठिकाणी वाचले आहेत.

म्हणजे:

-प्रत्यक्षात हे मांस चविष्ट किंवा लुसलुशीत वगैरे नसून सामान्य चवीचं, वातड इत्यादि असतं

-फाईव्ह स्टार वगैरे हॉटेलांत यांना (मांस, अंडी) खास डेलिकसी म्हणून विशेष मागणी वगैरे अजिबात नसते. भारतात तर शेवटी शेवटी अनेक रेस्टॉरंटना फुकट मांस पुरवून कॉम्प्लिमेंटरी ऑफर्स लोकांना चव आवडेल अशा आशेवर दिल्या जात होत्या.

- मूळ देशात हा पक्षी खाण्यासाठी म्हणून अजिबात म्हणून चविष्ट / लोकप्रिय मानला जात नाही.

या लेखात मात्र चव आणि गुण खरेच अस्तित्वात असल्याचा उल्लेख दिसला. फक्त किंमत अपेक्षेइतकी न मिळणं इतकीच समस्या होती तर.

रोचक विषयावर लिहिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बराय लेख।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाप रे!!!
______
लेख उत्तमच आहे. अतिशय आवडला.
_______
पण मग प्रश्न पडतो तो हा की 'इनोव्हेटिव्ह आयडीया' कधी तडीस न्यायची व कुठे थांबायचं? सारासार विचार वगैरे ठीक आहे परंतु फसल्यावर हसं होतं. नाही फसलो तोवर शिकता येत नाही - हे देखील सत्यच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे सगळ्ळ सगळ्ळ मला माहीती होत अगोदरच्
म्हणून मी कडकनाथ काळी कोबंडीपालना चा उद्योग सुरु केला
आज माझ्याकडे सर्व काही आहे गाडी बंगला बँकबॅलन्स आणि हो ब्रेकफास्ट सुद्धा काळ्या कडकनाथ कोंबडीच्या कडक अंड्याच्या आमलेटाचा
ब्रेकफास्ट

dd

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कडकनाथ कोंबडी हि मध्य प्रदेशातल्या झांबुआ जिल्ह्यातील हे मूळ वाण मध्यप्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते.
आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या कडकनाथ जातीच्या कोंबड्या पाळतात.

कडकनथ चे मुल नावं "कालामासी" असे आहे ज्याचा अर्थ काळी मांस असलेली कोंबडी. या कोंबडीच्या मांसाचा रंग लालसर, काळा असतो म्हणून हिचं नावं 'कालामासी' असंही पडलंय. काळं असलं तरी खायला जबरदस्त रुचकर असं हे चिकन आहे

आदिवासी लोक कडकनाथचं रक्त मानवांच्या जुनाट आजारांमध्ये उपचारांमध्ये वापरतात आणि त्याचे मांस कामोत्तेजक म्हणून सेवन करतात.

कडकनाथ कोंबडीचे फायदे
आरोग्यासाठी हितकारक, किडनी, रक्ताचा कर्करोग, हृदयरोग, दमा, त्वचेचे विकार यासाठी हे मांस गुणकारी असल्याचं सांगितलं जातंय. शिवाय शरीरातल्या अॅमिनो अॅसिड योग्य प्रमाणात ठेवण्याचं कामही चांगल्या रीतीनं होतं आणि रक्तातल्या हिमोग्लोबिनचं प्रमाणही चांगलं वाढतं, असा निष्कर्ष पुढं आलाय. शिवाय या कोंबड्यांना विशेष किंवा अतिदेखभालीची गरज नसून कोंबड्यांची प्रतिकारशक्तीही चांगली आहे
आरोग्यदायी 'कडकनाथ'ला जगभरातून मागणी
त्यातल्या नराचं वजन दीड ते दोन किलो भरतं आणि मादीचं वजन साधारण सव्वा किलोपर्यंत भरतं. इतर कोणत्याही मांसामधल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणापेक्षा कडकनाथच्या मांसात ते प्रमाण 32 टक्क्यांनी कमी असतं. त्यामुळंच त्याला जगभरातून मागणी वाढत आहे. शिवाय या कोंबडीच्या मांसात 20 टक्के प्रथिनं जास्त असल्याचेही निष्कर्ष पुढे आले आहेत. अनेक जुनाट आजारांवरही या कोंबडीच्या मांसामुळं चांगला फायदा होतो, असं अनेक रुग्ण सांगतात. अर्थात, या सगळ्या अनुभवसापेक्ष प्रतिक्रिया असल्या तरी, कडकनाथचा बोलबाला चांगलाच वाढतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्टार्टप हा प्रकार एमूपालनाच्या अर्थकारणापेक्षा निराळा असावा; निदान अमेरिकेत आणि तंत्रज्ञान क्षेत्राततरी. स्टार्टपमध्ये लोक सुरुवातीला स्वतःचे थोडे पैसे घालतात; पण बहुतेकदा व्हेंचर कॅपिटलिस्ट नावानं प्रसिद्ध असलेल्या गब्बर लोकांच्या पैशांवर ह्या गोष्टी चालवल्या जातात. तीनांतली एक स्टार्टप तगून राहील आणि पैसे करेल असं समजलं जातं. टेक-स्टार्टप हा प्रकार लोकाच्या पैशानं आपले सुलेमानी किडे प्रत्यक्षात आणून बघण्याचा धंदा, असं गंमतीनं म्हणलं जातं.

बिटकॉईन आणि एकूणच क्रिप्टोकरन्सी ह्या प्रकाराबद्दल मला फार कुतूहल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एखाद्या गोष्टीला खरेदीदार आहेत हे माहीत नसतं. सुरुवातीची कंपनी हे खरेदीदार ( गिऱ्हाईकं) निर्माण करण्यात जाहिरातींवर पैसे खर्च करेल. नंतर येणाऱ्या कंपन्या याच प्रकारची वस्तू त्यांच्याकडे असलेल्या चांगल्या निर्मिती व्यवस्थेमुळे कमी किंमतीत बाजारात आणून फायदा करून घेतील.
स्टार्टप कंपनी अशी बुडू शकते फक्त 'पहिली' हे नाव कमवून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>>>जाहिरातींवर पैसे खर्च करेल.>>>>> जाहीरात करा अथवा करु नका पण ग्राउंड वर्क तर करा की किती लोक अशा प्रकारच्या कमॉडीटीचे ग्राहक होउ शकतात, तशी इच्छा आहे का लोकांची. नानावटी म्हणतात तसे, पक्ष्यांच्या सवयी आदिदेखील अभ्यास हवा.
कदाचित केलाही असेल सर्वे वगैरे. पण मग तसं असतं तर प्रयोग केलाच नसता.
___________
आम्ही कॅलिफोर्निया कंट्री साइट (चिनो-ऑन्टॅरियो) हे पक्षी पाहीले होते. आम्हाला वाटलेले की ते शहामृग आहेत. आज फोटो पाहून, कळलं की ते एमू होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोणावळ्याजवळचा एक ढाबा चिकनच्या नावाखाली ईमु खायला घालतो असा संशय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !