''ओलसर''

शमवू बघती चटक्याचे आघात खोलवर झालेले
डोळ्यांमधल्या दंवात भिजुनी शब्द ओलसर झालेले

लोकतंत्र ? की विडंबना? लोकांसाठी ,लोकांकडुनी
तेच निवडले मंत्री जे बदनाम गावभर झालेले

कुपोषीत्,दुष्काळग्रस्त्,अन्यायग्रस्त गपगार असे
ओरडती नेते ज्यांचे जेवून पोटभर झालेले

हात ठेवला काय तयाने खांद्यावरती प्रेमाने
विस्मरलो त्यांच्याकडुनी अन्याय आजवर झालेले

भडकावे ''कैलास'' लागले विना आग दुनियेमध्ये
सहन जगाचे वार-टोमणे करु कोठवर झालेले?

--डॉ.कैलास गायकवाड

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान (कच्चा माल आहे) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऐसी अक्षरे वर स्वागत. तुमच्या कविता इतरत्रही वाचलेल्या आहेत. ऐसीवरही पाहून आनंद झाला.

मतला विशेष आवडला. शेवटच्या दोन ओळींतून 'नाहीतर काय करावं?' या सुर्वेंच्या कवितेची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ऋषिकेश आणि राजेश.

ऐसीचे सदस्यत्व फार आधिच घेतले आहे....मात्र लिहीणे हल्ली सुरु केले.

आपले पुनश्च आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभारी आहे मित्र हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिमच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरच अप्रतिम...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."