युवराज

वस्तीतला युवराज बाळा बगाडे. उच्चारीनाव ईवराज म्हणजे एक नंबर ईदरकल्याणी कार्टा ! वस्ती त्याला कडू इंद्रावण म्हणते.
मुले ही देवाघरची फुले ह्याला टोटल छेद देणारा छोटा महावीर . वय वर्ष ७ च्या दरम्यान चालू. काळाकुळा गिड्ड्या अंगाचा. थोडं फेंदर नाक. वस्ती ह्याच्या नानाविध, सतत चालू असणार्या उपक्रमांमुळे त्रस्त होऊन, ह्याच्या आई बापाला शिव्या घालत नाही तर ह्याच्या वेळेस त्यांनी नवस केलेल्या देवदेवतांना शिव्या हासडते. युवराजला शिव्या देण्याच्या प्रश्नच येत नाही. वस्ती ते धाडस कटाक्षाने टाळते. हा
खाड खाड a b c d. वन टु थ्री फोर म्हणुन दाखवतो. मनाने हवा तसा क्रम बदलत. कुणी दुरुस्ती सुचवली तर चाटकन आई भैन काढतो. ह्याच्याकडे शिव्यांचा खजिना दांडगा.
नो रिपीटेशन. बालवाडीतल्या बाई त्याला आवडत नाहीत म्हणुन बंड पुकारुन घरी बसलेला बंडखोर पठ्ठ्या . हा अत्यंत खुनशी. दुष्मनी सहसा विसरत नाही. आठ दिवसापूर्वी केलेल्या छेडखानी, बद्दल फिरुन आलेल्या पाव्हण्याला हा तासभर चप्पल हूडकाय लावतो. वर रुपाया मागतो आणि मग हूडकून देतो. हा कुणालाच भीत नाही. लाडाने ह्याच्या ढुंगणाला चिमटे काढणार्या थोरामोठ्यांना दगडी प्रसाद वेळोवेळी पुरवण्यात ह्यानं कसलाच कसुर केलेला नाही. ह्याचा नेम अगदीच जबरा . चुकण्याची शक्यताच नगण्य. ह्याचा नेम हे वस्तीचं मुख्य दुखणं. ह्यानं वस्तीची शाबासकी एकदाच मिळवली. अत्यंत हिरवट अशा दत्तुबप्पाच्या कानातनं रक्त काढून! ह्याचं इंग्रजी शाळेत शिकायचं ट्रेनींग चालू आहे. आईबाप कौतुकानं a b c d म्हणायला सांगतात. चांगलं वळण लावायचा प्रयत्न करतात. हा वस्तीतल्या बारक्या पोरींना घट्ट मिठी मारतो. आणि गुदमरुन टाकतो. पोरी चिडतात ओरडतात . म्हणतात ऎ ईव्या कडू झवण्या, आमच्या आयलाच सांगीन तस्लं करतोय. हा लबाड हसतो. बालवाडीतही हाच उपक्रम करुन तात्काळ प्रसिध्द झाला हा. हा चिक्कार उद्योगांमुळे आई बापाच्या छातीत साँलीड धडकी भरवतो.हल्ली वस्तीतल्या जाणत्या आयाबाया आणि बाप्ये ह्याच्या आईबापांना रात्रीच्या विशेष सुचना देऊ लागलेत. आणि आईबाप ऎकून बेजार बेजार होऊ लागलेत. कानकोंडे होऊ लागलेत. हा धिंता ता ता धिता धिंता ता ता म्हणू लागला कि त्याच्या घरातल्या अक्षय सहीत शेजारच्या दोन्ही घरातले टिव्हीतले कलाकार मुके होतात. परमेश्वराने दिलेल्या नरड्याचा हा जंगी वापर करतो. परमेश्वर नेहमीप्रमाणेच शिव्यांचा धनी होतो. ह्याची एकच गोष्ट चांगली. हा कुणाच्याच कामाला कधी नाही म्हणत नाही. एकाच माणसाने तीनदा दुकानाला पाठवले तरी जातो. फक्त उरलेले सुट्टे पैसे मागायचे नाहीत ही त्याची अव्यक्त अट. दुकानदार ह्याला ताटकळत ठेवणं टाळतात.आधी याला सर्विस देतात. कुणीच आक्षेप घेत नाही यावर. शेठ या शब्दाचा वापर तो शेठला भयंकर लाज आणेल असा करतो. हा, अय शेटं द्या कि आतपाव साकर म्हटला कि गर्दित व्यसत असणारं शेठचं कुटुंब तात्काळ साखर देतं.आणि याची तात्काळ पाठवणी करतं.
सध्या याची इंग्रजी शाळेत जाण्याची पूर्वतयारी बंद आहे. हा आता खूपच भांबावलाय. वस्तीत कुणाचा ओरडा खात नाही. हल्ली कुणावरच नेम धरत नाही. डोरोमँन, छोटा भिम यात त्याला अजिबात रस नाही. अक्षयचं गाणं हा विसरला. ह्याला मुद्दाम रडवायचा चिडवायचाच म्हणुन कुणी ढुंगणाला चिमटा घेतला तरी हा डूख धरत नाही. फक्त त्याच्या शेवंता आज्जीला हा खूप त्रास देतो. बापाचा मोबाईल घेऊन हा आज्जीला म्हणतो लाव ममीला फ़ोन कवा ययचीय गं मामाच्या घरुन ? शेवंतामाय येईल येईल म्हणते. त्याची समजूत घालते.आणि त्याच्या मागे पदराचा बोळा तोँडात कोँबून ढसाढसा रडते. वस्तीतल्या आयाबायांना तिचं कसं सांत्वन कराव हे कळत नाही. स्वतःच्या हाताने आंघोळ करणारा युवराज पाहिला कि भल्या भल्यांच्या पोटात तुटतं. ह्याच्या बापाला, बाळाभाऊला बायकोचा फोटोही घरात लावता येत नाही. नुकतीच युवराजची ममी गवंड्याच्या हाताखाली काम करताना तिसर्या मजल्यावरुन पडून मरण पावलीय . युवराजचा आता फ़ोन वर विश्वास नाही गावाला चला म्हणून आग्रह करतोय. शेवंतामाय आणि बाळाभाऊ मुके मुके होऊन, नुस्ते बघत राहतात हल्ली..

field_vote: 
4.285715
Your rating: None Average: 4.3 (7 votes)

प्रतिक्रिया

ह्या संस्थळावर क्वचितच बघायला आणि वाचायला मिळते अशा विश्वातील आणि शैलीतील हे अल्पाक्षरी लिखाण वाचनीय वाटले. मलातरी ह्या जगाचे काहीहि ज्ञान अथवा माहिती नाही म्हणून अधिक काही लिहीत नाही. अजून वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>ह्या संस्थळावर क्वचितच बघायला आणि वाचायला मिळते अशा विश्वातील आणि शैलीतील हे अल्पाक्षरी लिखाण वाचनीय वाटले

माझ्या अल्प समजुतीप्रमाणे या संस्थळावरच नव्हे तर मराठी आंतरजालाच्या एकंदर वाटचालीमधे या जगाचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. गेल्या पन्नास वर्षांमधे मराठी भाषेतल्या लिखाणाला निराळं वळण देणार्‍या या साहित्याचा मागमूस मला तरी आजवर जाणवलेला नव्हता. प्रस्तुत लेखाच्या कर्त्याच्या निमित्ताने पहिल्यांदा इथे त्याचं दर्शन घडतं आहे. या निमित्ताने या जगाची पुन्हा नव्याने ओळख व्हावी, मुख्य म्हणजे विचारांचं आदानप्रदान व्हावं ही सदिच्छा. श्री. वाघमारे यांचं मनःपूर्वक स्वागत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

असेच म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नव्याने आलेल्या लेखाचं दमदार लिखाण. "युवराज" सारखी अगदी लहान मुलाची चित्रणंही अगदी थोडक्या शब्दांत किती जिवंत असू शकतात असं वाटलं. शेवटच्या परिच्छेदामधलं वर्णन चटका लावणारं आहे.

आणखी अशीच व्यक्तीचित्रं यावीत अशी इच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ताकतवान शब्दरचना. कमी शब्दांमध्ये भरपूर सांगण्याची क्षमता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुक्तसुनीत धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यक्तीचित्र हे अल्पाक्षरी असु शकतं.. किंबहूना बर्‍याचदा ते असंच हवं असं वाटायला लावणारे दमदार लेखन!
ऐसीअक्षरेवर मनःपूर्वक स्वागत!

येत रहा.. लिहित रहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एका अत्यंत अनोख्या शैलीचं लेखन आहे तुमचं! इतकं परिणामकारक की स्वतःच वस्तीची सैर करुन आल्यासारखं वाटताय. शब्दचित्र उत्तम रेखाटलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

बर्‍याच दिवसात इतकं परिणामकारक लिखाण वाचायला मिळालं नव्हतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परिणामकारक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जरा वेगळ्याच आडवळणाची भाषा धक्के देऊन गेली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद ऋषिकेश !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या या व्यक्तिचित्रात आणि तुमच्या इतर लिखाणात प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे हे सर्व तुकडे एकत्रितपणे किंवा संयुक्तपणे एका कादंबरीची कथाबीजे असू शकतात. तुमची शैली पकड घेणारी आहे आणि लिखाण त्यातल्या बीजांशी ़खूप प्रामाणिक आहे. आंतरजालावरच नव्हे तर लिखित स्वरूपात तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगाव्यात अशी आशा हे वाचून निर्माण झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम झक्कास!

- (लेखाचा शेवट वाचून मुका झालेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रुची तुमचं खरं आहे.माझ्या येणार्या कादंबरीतीलच हे काही तुकडे आहेत.ते जसेच्या तसे तिथे येणार नाहीत हे नक्की.इथे लिहिताना काही मर्यादा पाळून बदल करुन ते लिहिलेत.६०० पाने लिहून झालीत. कुठली अडचण आली नाही तर मे च्या सुट्ट्यात कादंबरी पूर्ण होईल.:-)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा! मनःपूर्वक अभिनंदन आहेच
शिवाय उत्सुकता आणि आनंद आहे.. प्रकाशित झाल्यावर ऐसीअक्षरेवर नक्की सांगा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे वा! तुमच्या पुस्तकासाठी मनापासून शुभेच्छा. तुम्ही लिहिलेलं वाचून अंतर्मुख व्हावं लागतं आणि स्वतःच्या मूल्यांशी आणि मूळांशी आपली प्रामाणिकता तपासता येते हे तुमच्या लिखाणाच्या परिणामकारकतेचेच लक्षण आहे. तुमच्या कादंबरीलाही उत्तम प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्कीच मित्रांनो! तोपर्यँत वेगळे विषय आहेतच.जे तुम्हाला आवडतात आणि मला बळ देऊन जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंच छान लिहिलं आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सुंदर कथालेखन.
फक्त एक वाटते की वय वर्ष ७ च्या मानाने त्याचे पराक्रम जरा जास्तच वाटतात. तो ९ किंवा १० वर्षाचा असेल तर ठिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हे असं लाडावलेलं, बालबुद्धीचं सैतानी कार्टं आंजावर पाहील्यासारखं का वाटतय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोड्या शब्दात पण खुपच सुरेख लेखन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नका हो करत जाउ असा काहीतरी शेवट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars