दादर

#ललित #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

हॅलो, तू कुठेयस?

- म्रिन

१.
कुठेयस तू? मोठ्या ब्रिजवर ठरवलं ना आपण?
पोचतोय, ब्रिजच चढतोय.
कुठला?
बोरिवली एंडचा
नवा की जुना?
एस्कलेटर आहे तो
अरे पण दोन ब्रिजना आहे एस्कलेटर आता, तू कुठे आहेस?
अरे यार, थांब पाहातो.
पाहातो काय, चढताना कळत नव्हतं का?
चिल, थांब जरा.
हं.
हा रेल्वेचा ब्रिज आहे, आणि त्याच्यापलिकडेही एक दिसतोय, बोरिवलीच्या दिशेला.
वाटलंच मला. ये त्याच शेवटच्या ब्रिजला.

२.
हॅलो…
कहाँ हो यार तुम, मैं कब से ये टिकट विंडो के यहाँ खडा हूँ.
मैं भी तो विंडो के यहाँ ही हूँ.
कौनसे वाले?
ब्रिज पे जो है.
बडे ब्रिज पे?
हाँ, अरे मैं भी तो वहीं हॅँू.
जहाँ बहुत सारे एटीएम है?
एटीएम? अच्छा तुम उस ब्रिज पे हो, वो तो रेल्वे का ब्रिज नहीं है.
मतलब?
मतलब छोडो, यहाँ आ जाओ जल्दी से.
कैसे आऊँ?
किसी भी प्लेटफार्म पर नीचे उतरो, वहाँ से दुसरे ब्रिज पे आ जाओ.
अच्छा आता हूँ.
अब मैं तीन नंबर पे हूँ, कौन सा ब्रिज ले लू?
जो पहला दिख जाए वो वाला. उपर आ के लेफ्ट में आना, फिर राइट में टिकट विंडोज है नीचे उतर के.
उफ्, कोशिश करता हूँ!

३.
आई, मधल्या डब्याच्या इथे भेटू. मी तुला पिशवी देऊन पुढे माहीमला जाईन, तू जा चर्चगेटला.
बरं.
हॅलो, आई, कुठे आहेस?
आता बँड्रा क्राॅस करतेय गाडी.
ओके, मी थांबलेय चार नंबरवर.
हॅलो, आई कुठे आहेस? गाडी येऊन गेली पण इथली.
अगं, उतरलेय मी.
अगं, पण मधल्या डब्याला म्हटलं होतं ना मी?
मधल्याच आहे.
आई, मी तिथे समोर उभी आहे.
थांब जरा.
अगं, तो मागचा डबा गं, हा मधला नाही का?
आता नाही कळत गं मधला, मागचा, पुढचा. मी आॅफिसला जात होते तेव्हा दोनच होते ना लेडीज.
असू दे, ही घे पिशवी.
हा घे तुला खाऊ, आल्याच्या वड्या.
वा, मस्तच.
चल, मागची गाडी आलीच, इथूनच जा पुढे, मी जाते एक नंबरला.
ओके, बाय.
बाय.

४.
माटुंग्याहून टॅक्सीने ये, तुलसीपाइप रोडने.
बरं.
दादर स्टेशनला उतर. तिथेच ब्रिज आहे एक, त्याने सेंट्रलला ये.
पोचतेच १० मििनटांत.
***
कुठेस?
अगं, तिथे जो ब्रिज होता तो चढून वर आले तर तो सेंट्रलला जातो की नाही तेच कळत नाहीये.
अगं, तो टिळक ब्रिजला कनेक्ट केलाय, आणि सेंट्रलच्या सगळ्या प्लॅटफाॅर्मवर जाता येतं त्यावरनं.
आँ, नाही गं.
अगं, मोठ्ठा ब्रिज आहे ना, छान पांढरा प्रकाश आहे?
नाही गं.
अरे देवा, तू उजवीकडच्या ब्रिजवर चढलीस की काय?
मग?
अगं, डावीकडे आहे ना एक ब्रिज, नवा?
हो का, मला हाच दिसला जवळ.
असू दे. तू थांब तिथेच, मी येते, किती जिने चढशील?

५.
फूल मार्केटच्या ब्रिजने सेंट्रलच्या एक नंबरला यायचं लक्षात आहे ना, मी मधल्या लेडीजजवळ उभी आहे.
हो, किती वेळा सांगशील?
अगं, तू दादरला त्या ब्रिजने नाही आलेलीस फार वेळा, म्हणून सांगतेय.
कळलं, आले. उतरलेय बसमधनं, पाच मिनिटांत येते.
***
हॅलो, अगं, इथे तर एकदम मोठ्ठी जागा, तिकिट विंडो वगैरे आहेत, आणि तीन नंबर दिसतोय. एक नाहीये.
अगं, पुढे गेलीस तू.
अगं पण मागे कुठेच लिहिलं नव्हतं, मध्य रेल्वे किंवा फलाट क्र. एक वगैरे.
ते सोड, मी सांगते ते ऐक. तिथे एक छोटा जिना उतरतो बघ दोन्ही बाजूंना.
हो हो, दिसला.
आता तिथे कुठल्या बाजूला उतरू?
डाव्या.
हुश्श, भेटलो बाई एकदाच्या.
हो ना.
वर लिहिलं का नाहीये काहीच, चोर दरवाजे असल्यासारखं गुप्त ठेवण्याजोगं काय आहे यात?
रेल्वेवाल्यांनाच माहीत!

६.
मी आता स्लो ट्रेन पकडलीय, कुर्ला गेलं की फोन करते.
ओके, तशी मी निघेन.
***
आई, कुर्ला गेलंय.
मिडललाच बसलीयस ना?
हो.
दादरला उतरलीस की लगेच समोर ब्रिज आहे तो चढून वर ये.
ओके.
***
आई, वर आले तर इथे काहीतरी वेगळंच दिसतंय.
म्हणजे काय?
अगं, इथे सगळं उघडं आहे.
अरे, तू त्या ब्रिजवर कशी पोचलीस, काय सांगितलं होतं मी?
अगं, तू सांगितलंस तसंच केलं.
किती नंबरला आली गाडी?
दोन.
ओह शिट, तरीच.
ठीक आहे, आता त्या ब्रिजवरनं थेट पुढे ये, शेवटी उजवीकडे खाली उतर.
आणि?
खाली आलीस की तिथेच लेडीज आहे, हनुमान मंदिर आहे तिथे छोटंसं.
ओके.
ट्रेन पकडलीस की फोन कर, मी त्या ट्रेनमध्ये खारला चढेन.
हो.
बोरिवलीच पकड.
हो आई, तेवढं कळतं मला!

७.
कुठे पोचलीस?
उतरतेच आहे.
ओके, मी चहा सांगते मग इराण्याकडे, मागच्या वेळी भेटलो त्या.
आलेच
***
अगं, पाच मिनिटं झाली, अजून कशी नाही पोचलीस?
इराणी हरवलाय
आँ
हो, दिसत नाहीये इथे. मी पार या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन आले
आपण किती नंबरच्या प्लॅटफाॅर्मवरनं बाहेर पडलात
एक
तरीच. आता मागे ये स्टेशनात परत. हरीभाऊ विश्वनाथकडे पाठ करून उभी राहा आणि मग डाव्या हाताच्या पुलावर चढ. तो अख्खा पार करून पलिकडे ये पार.
मुंबई सोडून कितीही वर्षं झाली तरी एक नंबर म्हणजे पश्चिम हे कसं विसरू शकतेस तू?
अगं, पण मागच्या वेळी जिना नव्हता ना चढले मी
कारण तेव्हा आपण ठाण्याहून आलो होतो फास्टने. आज तुम्ही उगवलात चर्चगेटहून, स्लो ट्रेनने.
लोल
पुढच्या वेळी लक्षात ठेवा म्हणजे झालं.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

१. आख़िर कहना क्या चाहती हो?

२. मुंबईबाहेरच्या वाचकास (अर्थ लागलाच, तर) यात नक्की काय म्हणून रस वाटावा? (मुंबईतल्या वाचकास (अ) याचा अर्थ लागेल, आणि/किंवा (ब) यात रस वाटेल, अशा अर्थाचे काहीही यातून सुचविण्याचा इरादा नाही, याची कृपया नोंद घ्यावी. आगाऊ आभार.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटलं होतं की उसगावातल्या किंवा युरोपातल्या अशा गोष्टी आपण वाचतो, पाहातो पडद्यावर तशाच या. पण तसं नसावंसं दिसतंय. मुंबईबाहेरच्या वाचकाला रस वाटायलाच हवा अशी जबरदस्ती नाहीये. आणि मुंबईकर वाचकालाही तुम्ही म्हणता तसं अर्थ लागावा किंवा रस वाटावा अशीही नाही जबरदस्ती. इथलं सगळं लेखन मला कळायलाच हवं अशी जबरदस्ती मी स्वत:वर करत नाही. अर्थात म्हणून तुम्ही ती करू नये असंही नाही. असो. प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

मी सॉरी आहे.
मुंबई सोडून कित्येक वर्षे झाली, पण जेव्हा वस्तीला होतो तेव्हाही मला कुठला प्लॅटफॉर्म कुठे येतो हे लक्षात राहायचं नाही- मला हवं ते स्टेशन सोडून.

अशा वेळी इतर येरु मात्र जणू आपला जन्मच रेल्वेच्या डब्यातील असल्याप्रमाणे तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून - XYZ स्टेशनचा प्लॅटफॉर्म उजवीकडे येतो हे पण माहिती नाही? वगैरे कमेंट टाकीत.

तेच कुठली बस कुठे जाते हे तपशीलवार ठाऊक असलेले लोक. त्यांचं ज्ञान ऐकून मला फार न्यूनगंड येत असे.

असो, आपण एकटेच नाही हे हा लेख वाचून कळलं.
शेवटी सब रस्ते इंटिकेटर के पास जाते है एवढंच खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुच्छतादर्शक कटाक्ष टाकणारी एखादी व्यक्ती मीही असू शकते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!