तुमचे विचार बदलले आहेत का?

प्रत्येक व्यक्तिच्या विचारांची एक घडण असते. संस्कार(घरातले, शाळेतले, बाहेरचे), दृक-श्राव्य-लिखित माध्यमांतून होणारा माहितीप्रसार, विविध विचारप्रणाली, धर्म आदीच्या शिकवणी, पर्यावरण, लोकपरंपरा, रूढी आणि अर्थातच या सगळ्यांनी मिळून बनलेल्या चाकावर फिरणारे आपले मडके विवेकाच्या थापीने थोपटून आपले विचार बनलेले असतात. ते नेहमीच अगदी सुसंगत किंवा विवेकनिष्ठ असतीलच असे नाही. शिवाय त्या विचारांचा प्रभाव वर्तनात १००% दिसून येत असेलही नाही. पण निदान आपल्या जिव्हाळ्याच्या विषयाततरी आपले निश्चित असे विचार बनलेले असतात, त्या विषयासंबंधीत एखादा मुद्दा समोर आला की आपला मेंदू त्या विचाराची संदर्भचौकट घेऊन निर्णय घेतो किंवा भुमिका घेतो. ह्या सत्योत्तर जगात माहितीची सत्यासत्यता पडताळणे कठीण बनलेले आहे. त्यात माध्यमे माहिती मांडताना सत्यापेक्षा भावना चाळवण्याला अधिक महत्व देतात. हुकुमशहांना हवे तसे माहिती तोडून मोडून अजेंडे चालवणारी ट्रोलधाड आहेच. विचारप्रणाली नाही तर धर्माच्या आहारी जाऊन चटपटीत शैलीत प्रोपगंडा चालवणारे 'विचारवंत' देखिल आहेत. मात्र शास्त्र काट्याची कसोटी लावण्यासाठी जे संशोधन करावे लागते त्यासाठीच्या सोयीदेखील आता आधीपेक्षा सहज उपलब्ध झाल्या आहेत. सामान्य लोक आणि विचारवंत यांच्यातील संवादाच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. थोडक्यात घडीव विचारव्युह मोडून पडण्यासाठी/ त्यात बदल होण्यासाठी लागणारे ट्रिगर्स आता आधीपेक्षा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

तर प्रश्न असे की तुमचे एखाद्या मुद्द्याबद्दलचे विचार असे कुठल्या वैचारिक ट्रिगरने बदलले आहेत का? विशेषतः एखादे पुस्तक, व्हिडिओ, लेख किंवा भाषण यासारख्या माध्यमामुळे. ते सतत बदलत असतात का? घडलेले विचार आणि समोर आलेली नवी माहिती यातली विसंगती दूर करण्यासाठी तुम्ही काय करता? सामान्य लोक ज्यांना ह्या सगळ्या बौद्धिक श्रमांचा कंटाळा असतो किंवा तेवढी सवड नसते अशांकडून विवेकनिष्ठ वर्तनाची अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही का?

field_vote: 
0
No votes yet

माध्यमे हे समाजमन घडवतात हे खरे आहे.
टीव्हीवरील बातम्या , वर्तमानपत्रे हे जनमत तयार करतात.
आपल्याला जे दिसते ते खरे ही विचारसरणी आपण नकळत पाळत असतो.
पण त्यासोबत जे दिसत नाही ते आस्तित्वातच नाही ही विचारसरणीही जोपासली जात असते.
समाजमाध्यमतून व्यक्त केली जाणारे मते ही वाचल्या नंतर त्याची शहानिशा करायची असते याची जाणीवच बऱ्याच जणाना नसते.
कसल्याही अर्धवट बातम्या वाचून मते बनवली जातात.
आज आपण बातम्या पहातो त्यात दिल्या जाणाऱ्या बातम्या पाहिल्या तर महाराष्ट्रामधे राऊत / सिवसेना / उद्धवठाकरे / शिंदे गट या शिवाय दुसरे कोणते जग आस्तित्वात आहे की नाही अशी शंका येते.
चॅनेल्स फक्त त्याना हव्या असलेल्या बातम्याच देतात. वर्तमानपत्रे देखील याला अपवाद नाहीत.
जागतीक बातम्या कोण देते हे समजतच नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यशवंतराव चव्हाण (?) म्हणाले होते
"जो तरुण पंंचविशीत साम्यवादी विचारसरणीचा नसतो त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असे समजावे. आणि जो तरुण तिशीतही साम्यवादी विचारसरणीचा असतो त्याच्यातही काही गडबड असते असे समजावे."
अगदी हेच शब्द नाही. पण असेच काही तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे.
माझे बरेचसे लिबर्टेरियन असणारे विचार वाचनानंतर बदलले. मायकेल सँडल यांच्या पुस्तकांनी, व्हिडिओजने माझे तसे विचार बऱ्यापैकी बदलले. इथल्या ऐसिवरच्या चर्चादेखिल ह्यासाठी फार उपयोगाच्या ठरल्या. नक्की जग कसे आहे हे फार वेगवेगळ्या बाजूने पाहिले, वेगवेगळ्या अनुभवांना भिडत जगले तर कळते, जे एका आयुष्यात सामान्य माणसाला शक्य नसते म्हणून तर वाचावे, ऐकावे वगैरे लागते.. पण ते कसे असायला हवे आहे हे आपण कुठल्या तत्वांना मानतो त्याच्या चौकटींवर बेतलेले असते. सर्व तत्वे सार्वकालिक सत्य, उपयुक्त असू शकत नाहीत आणि तत्वे मान्य असतानासुद्धा स्वतःला त्या विचारसरणीचा पाईक वगैरे म्हणवून न घेणे शक्य असते अन त्या विचारसरणीचे सर्व काळ समर्थन करत राहण्याची गरज नसते हेच पंचविशी गेल्यावर कळते. काही जणांची ती कधीच जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मी ही उक्ती विन्स्टन चर्चिलच्या नावाने ऐकली होती. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवरात्रात अनवाणी चालणाऱ्या लोकांबद्दल अगोदर माझे विचार वेगळे होते.
सुशील कुलकर्णींचा एक व्हिडीओ पाहिला .
त्यात नवरात्रात अनवाणी चालणाऱ्या लोकांबद्दल सुषमा अंधारे यानी तोंड वेडावून नवरात्रात अशा अनवाणी चालणाऱ्या लोकांची कुचेष्टा केलेले दाखवले.
आणि सांगितले की लोकांच्या घरी आई ( देवी) आलेली आहे आणि तीचा सन्मान म्हणून ते अनवाणी चालतात, आई घरात असताना लोक स्वत:च्या देहाचे चोचले पुरवत नाहीत. ही लोकांची भावना आहे. आणि लोकांच्या भावनेची तुम्ही कुचेष्टा कशाला करता.
हा व्हिडीओ पाहिल्यावर माझे मत बदलले

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नवरात्रात अनवाणी चालणाऱ्या लोकांबद्दल'चा अनुभव पटला. त्या भावनेची चेष्टा करण्याने काही मोठा बदल होणार नसतो. मुख्य मुद्दा तत्वांचा असावा, अश्या छोट्या घटनांवरची टिप्पणी केवळ संवेदनशीलपणे केलेली नसेल तर तत्वांच्या प्रसाराला हानीकारकच ठरते.
दाभोलकरांच्या एकूणच वागण्याबोलण्यात हा विवेक असे की अंधश्रद्धेने पछाडलेले लोक जसे की अंगात येणारे वगैरे खरे तर अंधश्रद्धेचे बळीच आहेत. त्यांच्या एका भाषणात त्यांनी अंगात येणाऱ्या स्त्रियांबद्दल एक निरिक्षण मांडले होते की तीचे माहेर सहसा गरिब असते, तिला मुली असतात, ॲनिमिया, कुपोषण, कॅल्शियमची कमी असते, बहुधा धाकटी असते वगैरे. म्हणजे ह्या सर्व न्युनगंड देणाऱ्या परिस्थितीत तिच्या अंगात येणे हा हॅल्युसिनेशनचा प्रकार मेंदू डिफेन्स मॅकॅनिझम म्हणून स्विकारत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

एक वेळ मेंढरं मूर्ख बनणार नाहीत पण माणसं सहज बनतील.
पण ती क्षेत्र वेगळी.

धर्म आणि सृष्टी चा निर्माता ह्या विषयी लोक ठाम आहेत.
कोणी किती ही डोकं फोडून घेतले तरी लोक ते विचार फाट्यावर मारतात.
हे विश्व हे एक आश्चर्य आहे
विज्ञान त्याचे कधीच उत्तर देवू शकतं नाही.
कोणाला काहीच बिलकुल सत्य माहीत नाही.
ह्या वर विश्वास आहे लोकांचा.
म्हणून देव,धर्म , ह्या विषयी लोक कोणाचे काही ऐकत नाहीत.
ह्या व्यतिरिक्त बाकी सर्व विषयात लोक मेंढरं सारखी आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निदान गेल्या ५०० वर्षात ह्या विश्वाच्या बहुतांश समस्या जसे की रोगराया, भुकबळी, निरक्षरता, साध्या मलनिस्सरणाच्या सोयी नसणं, दळणवळणाच्या संधी नसणं विज्ञानानेच सोडवल्या आहेत. कुठल्याही धर्माने निदान विश्वाच्या तुमच्या समजुतीत गेल्या ५०० वर्षात काही तरी भर घातली आहे का?
"हे विश्व हे एक आश्चर्य आहे. विज्ञान त्याचे कधीच उत्तर देवू शकतं नाही."
ठामपणे उत्तर देत नसले तरी ह्या आश्चर्याची उकल करण्याचा प्रयत्न विज्ञानच करत आहे फक्त. वरचेवर आपले विश्वाबद्दलचे आकलन अधिकाधिक विस्तृत होत आहे ते विज्ञानामुळेच. त्याउलट धर्म यात काहीच नविन योगदान देत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कुठल्याही धर्माने निदान विश्वाच्या तुमच्या समजुतीत गेल्या ५०० वर्षात काही तरी भर घातली आहे का?

त्यांच्या वयाला अद्याप ५०० वर्षे झालेली नसावीत, हो... (असा माझा आपला अंदाज.)

जोकिंग अपार्ट,

"हे विश्व हे एक आश्चर्य आहे. विज्ञान त्याचे कधीच उत्तर देवू शकतं नाही."
ठामपणे उत्तर देत नसले तरी ह्या आश्चर्याची उकल करण्याचा प्रयत्न विज्ञानच करत आहे फक्त. वरचेवर आपले विश्वाबद्दलचे आकलन अधिकाधिक विस्तृत होत आहे ते विज्ञानामुळेच. त्याउलट धर्म यात काहीच नविन योगदान देत नाही.

धर्म कोठल्याही प्रश्नाला 'परमेश्वर' एवढे एकच उत्तर देऊन भानगड कायमची मिटवून टाकतो.

Not Patriotism, but Religion is the last refuge of the scoundrel.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञान ,ही मानवी मेंदू ची उत्पत्ती आहे.
उद्या मुटेशन होवून मानवी मेंदू ची क्षमता नष्ट झाली तर साधी सायकल पण चालवणे मुश्कील होईल.
सर्व शक्तिमान शक्ती आज पण माणसासाठी अज्ञात आहे.
म्हणून मी तरी अशा शक्ती चे अस्तित्त्व आज पण मान्य करतो.

Mutations होणे जिन्स मध्ये हे माणसाच्या हातात नाही.
माणूस बुद्धिमान झाला ह्या मध्ये माणसाचे एक टक्का पण योगदान नाही
.सर्व त्या विधात्याची कृपा.
Bingbang अगोदर काय होते.
त्याचे उत्तर
"Something come from nathing"
He hypothesis सांगितले जाते ते आपण गुपचूप मान्य करायचे आणि पुढे प्रश्न विचारायचे नाहीत.
पण something come from nathing चे एक पण उदाहरण कोणी देवू शकत नाही .ना proof करू शकत
तरी ते मान्य करायचं
इतके सर्व का तर .
निर्माता मान्य करायचा नाही म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

दर पाच-सात वर्षांनी माझे राजकीय विचार आणखी तीव्र आणि उदारमतवादी झाले नाहीत, तर मी म्हातारी झाले असं समजेन. उदाहरणार्थ, आता सुमार पुरुषांना जिथे भाव दिला जातो, पण सुमारबुद्धी स्त्रिया नसतात तिथे मी जाणार नाही, असं आता ठरवलं आहे.

खूप मागे जायचं तर मी एकेकाळी भगवी, जातीयवादी होते. आता आजार कमी झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उदाहरणार्थ, आता सुमार पुरुषांना जिथे भाव दिला जातो, पण सुमारबुद्धी स्त्रिया नसतात तिथे मी जाणार नाही, असं आता ठरवलं आहे.

'ऐसी' सोडण्याबिडण्याचा विचार चालला आहे, की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे मीही असते की! आणि मला बऱ्यापैकी भाव मिळतो इथे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. तुम्ही पुरुष आहात, असे मला वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)

२. 'ऐसी'वर तूर्तास कार्यरत असणाऱ्या स्त्रियांपैकी कोणी सुमारबुद्धी असेल, असे (निदान मला तरी) वाटत नाही. (पुनश्च चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीव्र का बरे? तीव्र झाले तर लवचीकपणा जाऊन स्टॅग्नंट होणार नाहीत का विचार?

"खूप मागे जायचं तर मी एकेकाळी भगवी, जातीयवादी होते."
मी जातीयवादी नव्हतो पण माझे विचार हिंदूत्ववादी नक्कीच होते. वयाची १० ते २० वर्षे ते तसे बनत गेले होते. गेल्या १० वर्षात(२० ते ३० ह्या वयात) त्यामध्ये बदल झाला ह्यामध्ये वाचनाचा वाटा मोठा आहे.
आणखी एक म्हणजे आधी व्यक्तिमहात्म्य मला फार वाटायचे, आता सगळ्यांचे पाय मातीचे असतात, प्रत्येक व्यक्ति काळ्यापांढऱ्या छटांचे मिश्रण असते आणि मोठे, दीर्घकालिन बदल हे व्यक्तिमुळे होत नाहीत तर व्यवस्थेतल्या बदलामुळ घडतात हे कळले. त्यामुळे भुतकाळातील कुणा नेत्याचा द्वेश वगैरे करण्याचा मुर्खपणा मी करत नाही. समाज नेता घडवतो, तो नेता त्या काळाचे अपत्य असतो, नेत्याची कृत्ये आज आपल्याला चुकीचे वाटताहेत पण ते हाईंडसाईटमुळे, आणि एखाद्या मोठ्या माणसाचे सगळेच विचार बरोबर असणे गरजेचे नाही, ते नाकारून सुद्धा त्याचे मोठेपण समजून घेता येते हे शहाणपण मला आता आले आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अनुभव, जमविलेली माहिती (माहितीची विश्वासार्हता हा वेगळाच विषय आहे), आणि माहितीचे पृथक्करण करण्याची क्षमता या तिघांत जसंजशी भर पडत गेली तसंतशी मतं बदलत गेली.

कुरुंदकरांनी एका ठिकाणी खूप छान म्हटले आहे. श्रद्धा या नेहमीच नवीन माहितीच्या उजेडात, तर्काच्या कसोटीवर घासाव्यात. ज्या श्रद्धा टिकतील त्या ठेवाव्यात उरलेल्या सोडून द्याव्यात. असो.. त्यामुळे मत बदलणे हे अविरत आहे असे वाटते.

मी जेव्हा युएस मध्ये काही काळ होतो, तेव्हा दर पंधरवड्याने क्लिनींग सर्व्हिसाठी दक्षिण अमेरिकन (मॅक्सिकन बहुतेक) लोक यायचे. ते प्रामाणिक होते. तोडकं-मोडकं इंग्रजी बोलायचे. पण माझा ड्रेसिंग टेबलवरचा गणपती कसाही उचलून कुठेही ठेवायचे. पण त्यांना बोलून काही फायदा नव्हता. तेव्हा मनात आले की, सालं आपल्या श्रद्धा यांच्या गावी पण नाहीत. या अनुभवानंतर माझ्या धार्मिक श्रद्धा गळून पडल्या. पण मला वाटत होते की जगरहाटी चालवणारी कुठलीतरी एक "सुपरनॅचरल शक्ती" असायला हवी. जी प्रचलित धर्मश्रद्धांच्याही पलिकडे असेल. पण जसा उत्क्रांतीवाद समजत गेला तशी "क्रिएटर" वरची आणि "सुपरनॅचरल शक्ती" वरची श्रद्धाही गळून पडली. नुकतेच रिचर्ड डॉकिन्सचे ब्लाईंड वॉचमेकर (१९८५) संपविले. त्यात त्याने सजीवांमधले जीन्स (जनुके) कसे काम करतात यावर थोडक्यात लिहिले आहे. त्याचे सेल्फिश जीन्स हे मुख्य पुस्तक अजून वाचले नाही, पण बघू, वाचेन.

संपूर्ण पुस्तकाचा मला समजलेला गाभा असा की, सजीव सृष्टीच्या निर्मितीमागे कुठलीही "सुपरनॅचरल शक्ती" नाही. सुरुवातीच्या आद्य सजीवसृष्टीची (रेणूंची रचना ते एकपेशीय) प्रोबॅबिलिटी जरी विरळ वाटत असली तरी हे काळाच्या विशाल पटावर (बिलिअन्स इअर्स) आणि ग्रहांच्या संख्येवरून ती घटना अगदीच अशक्य कोटीतलीही नाही. ही सगळी सजीव सृष्टी जीन्स मध्ये बदल घडणार्‍या तांत्रिक रचनेमुळे उत्तोरोत्तर विकसित होत गेली आहे. (क्रिएटर श्रद्धेनुसार वा सुपरनॅचरल शक्तीने जादूची कांडी फिरवून एका रात्रीत तयार झालेली नाही). जीन्स मधले मायक्रो बदल जरी रँडम असले तरी "क्युम्युलेटीव्ह नॅचरल सिलेक्शन" -डार्विनच्या ओरिजीन ऑफ स्पिशिज (१८५९) मध्ये फक्त "नॅचरल सिलेक्शन हा शब्द आहे. क्युम्युलेटीव्ह शब्दात इन्क्रिमेंटल (आधी झालेली छोटीशी ) सुधारणा गृहीत (बेस म्हणून) धरली आहे, (उदा. १००% आंधळेपणा ते १% दृष्टी.. १% दृष्टी हे क्युम्युलेटिव्ह झाले. त्यामुळे नॅचरल सिलेक्शन हे निव्वळ रँडम असे नसते)- तर या "क्युम्युलेटीव्ह नॅचरल सिलेक्शन" मुळे "कॉम्लेक्स अ‍ॅडप्शन" (अवयवयांमधला उत्तरोत्तर विकसित होत जाणारा तांत्रिक किचकटपणा) घडत गेले आणि सजीवांच्या जाती निर्माण होत गेल्या. या सगळ्यात अजून एक मुद्दा कळला की भक्ष आणि भक्षकांमधल्या द्वंद्वाबरोबरच (आर्म्स रेस - मिसाईल विकसित करणारे तंत्रज्ञान विरुद्ध मिसाईल रोखणारे तंत्रज्ञान) मादीचे नर निवडण्याचे निकषही "कॉम्लेक्स अ‍ॅडप्शन" साठी तितकेच महत्त्वाचे आहे. त्यात संघर्ष आहे तो नवीन बदलाची उपयुक्तता (युटीलिटी ) विरुद्ध मादीची उत्तम नराबद्धलची धारणा -म्हणजे धष्टपुष्ट नर जो प्रजातीचा वंशवेल वाढवेल- या दोघात. (उदा. लांब शेपटीवाला नर पक्षी जरी मादीच्या धारणे नुसार धष्टपुष्ट असला तरी उपयुक्ततेच्या दृष्टीने लांब शेपटी, उडण्याच्या वेगाला मारक, इतरांचे भक्ष बनण्याची शक्यता अधिक. या संघर्षात कुठेतरी ती शेपटीची लांबी स्थिरावते). तसेच विरुद्ध लिंगाचे वैशिष्ठ्य जपणारे जीन्स प्रत्येक सजीवात असतात फक्त ते सहसा निष्क्रिय असतात. लांब शिस्न असलेल्या पुरषाच्या मुलीला शिस्न नसेल. (हे उदाहरण पुस्तकातलेच आहे) पण तिला झालेल्या मुलामध्ये बहुतेक तो गुणधर्म येण्याची शक्यता अधिक कारण ती स्त्री (मुलगी) आपल्या वडिलांचे जीन्स वाहून नेत असते. हा मुद्दा समजाला की निसर्गात एलजीबीटी समूह असणं हे अनैसर्गिक नाही हेही समजते. एकदम सोपी सुरुवात करणारे पुस्तक पुढे पुढे तांत्रिक होत जाते म्हणून याचा मराठी अनुवाद झाला नसावा. झाला असला तर कल्पना नाही, पण साधे परीक्षणही कुठे दिसले नाही. असो, मत बदलविणार्‍या पुस्तकांपैकीच हे एक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद खुप आवडला. डोक्याला असा खुराक देणारे, तिरपागडे प्रश्न उपस्थित करणारे वाचत, पाहत, ऐकत राहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

माझी सवय च आहे कोणावर च विश्वास ठेवायचा नाही.
प्रतेक व्यक्ती,संस्था ,सत्ताधारी, विचारवंत ,संशोधक.

स्वतच्या फायद्याचा विचार करतात
ठराविक प्रकार चेच विचार पसरवणे
ठराविक प्रकरचेच संशोधन आणि त्याला support करणारे positive पुरावेच प्रसिद्ध करणे किंवा ग्राह्य मानाने असे उद्योग करतात .
शेवटी सर्व माणसं आहेत मूळ स्वभाव सोडणार नाही.
सिंह हा शिकार करणार च त्याचा तो स्वभाव आहे
स्वार्थ हा माणसाचा मुळ स्वभाव आहे तो कधी बदलत नाही.
अपवाद प्रतेक बाबतीत असतात .
उत्क्रांती च्य गृहितक मध्ये डार्विन काय म्हणतो आणि जगातील मान्यता प्राप्त संस्थेने त्याचे विचार स्वीकारले आहेत म्हणजे ते अंतिम सत्य आहे हे मला तरी पटत नाही
उत्क्रांती ह्या गृहितक विरुद्ध अनेक लोक लिहतात मी त्यांचे पण वाचतो.
आणि काय खरे आणि काय खोटे हे मी माझेच ठरवतो.
माझ्यासाठी तेच सत्य असते.
विश्वाचा कोणी निर्माता नाही.. हे माणूस नाही ठरवू शकतं..माणूस आणि त्याचा मेंदू हे विश्व समोर अतिशय नगण्य गोष्ट आहे...
त्या मुळे असले अती टोकाचे विचार मला बिलकुल पटत नाहीत..
मुंगी पण वारूळ बनवते तसे माणूस नाही बनवू शकणार..पण तिचे विश्व आहे .तिच्या साठी तेच सत्य आहे
माणसं टीव्ही,विमान बनवतात हे तिला माहीत पण नसेल एकाच ग्रहावर राहून. पण.
म्हणजे पृथ्वी वर बाकी गोष्टी अस्तित्वात नाहीत हा हीत नाही
माणसाचे शोध ,विचार ,निष्कर्ष हे माणसाच्या जगा पुरतेच मर्यादित आहेत.
मुंगी किंवा कोणत्या ही सजीव च्या मेंदू का मर्यादा आहे.
त्याच्या पलीकडे त्या सजीवाला काहीच समजणे शक्य नाही.
माणसाला पण हाच नियम आहे .
माणूस काही कोणी वेगळा नाही.
माणसाला वाटते ह्या जगाला निर्माता नाही म्हणजे
ते अंतिम सत्य नाही.
माणसाचा मेंदू ची काही तरी मर्यादा आहे.
किती ही काही ही केले तरी माणूस २ मिनिटात एक किलोमीटर धावू शकणार नाहीत.
त्याची ती कुवत नाही.
तशी माणसाच्या मेंदू ची पण एक ठराविक च कुवत आहे..त्या पलीकडे पण जग आहे,विश्व आहे. त्या विषयी मत मांडणे हे अयोग्य , पना चे लक्षण आहे.
मर्यादा सोडू नका
असे विचारवंत सांगत असतात
Bigbang, तारे,ग्रह,ब्लॅक होल.प्रकाशाचा वेग . Dna ,rna हे सर्व मानवी जगातील सत्य मानवा पुरतेच मर्यादित आहे
त्यांच्यासाठी च फक्त ते सत्य आहे असा भास आहे
Covid विषाणू नी मानव जाती चे अस्तित्त्व च धोक्यात आणले असते अजून त्या मध्ये काही बदल असते तर.
तेव्हा सर्व जग सांगत होते covid विषाणू नवीन आहे.
पण तो पृथ्वी वर च होता माणसाला माहीत नव्हतं

अतिशय सूक्ष्म जीव पण माणसाचे अस्तित्व च नष्ट करू शकण्याची ताकत आहे
थोडे बदल झाले तर.
आणि ते बदल कसे होतील ह्याचा अंदाज.
डार्विन chya गृहितक मध्ये नाही.
पृथ्वी वर जे काही आहे ते माणसाला माहीत नाही अनेक अनुभव मधून ते सिध्द झाले आहे .
आणि बाता माणूस विश्वाच्या मारतो.
खूप मोठा जोक आहे
Covid पासून लस,औषध ह्यांनी माणसाला वाचवले ही पण अंध श्रद्धा च आहे.
निसर्ग नियम नुसार तो व्हायरस कमजोर झाला .
त्याच्या मध्ये बदल झाला .
माणसाने हस्तक्षेप केला नसता तर खूप अगोदर च ही साथ जगातून नष्ट झाली असतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

मामा तुम्ही सगळीकडे तीच कॅसेट का लावता?
आपली धाव दातांपासून दातांपर्यंत आहे हे खरं आहे.
आणि तुमचा आवाका तर नेहमी वैश्विक असतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चूक झाल्ये तुझी, अस्वला!

या टेपमध्ये AI आलेलं नाहीये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते बदलत नाहीत.
जग कसे वाचवावे ह्या वर ज्ञान देणारे स्वतःला वाचवू शकले नाहीत.
हे समोर दिसत आहे..
त्या मुळे कोण काय सांगतो ह्या वर माझी काहीच मत नसतात.
मला जे पटत तेच योग्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे कसे ठाम असतील? नविन माहिती मिळाल्यास ते बदलत नाहीत का? इथल्याच धाग्यांवर कितीतरीवेळा परस्परविरोधी विचार मांडले आहेत तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पुस्तकं, चित्रपटापेक्षा लोकांशी बोलून किंवा त्यांचे विचार ऐकून माझी मतं झपाट्याने बदलली आहेत.
माझ्या वर्तुळाच्या बाहेरचं जग बघितलेल्या, अनुभवलेल्या लोकांचे विचार समजून घेतले की माझ्या विचाराचं वर्तुळ आपोआप थोडं विस्तारत जातं.
I get more inclusive in my real life behaviors.

पुस्तकं वाचून सैद्धांतिकदृष्ट्या माझे विचार बदलतात - पण ते बरेचदा तेवढ्यापुरत राहतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माझ्या वर्तुळाच्या बाहेरचं जग बघितलेल्या, अनुभवलेल्या लोकांचे विचार समजून घेतले की माझ्या विचाराचं वर्तुळ आपोआप थोडं विस्तारत जातं.
I get more inclusive in my real life behaviors."

खरंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सामान्य लोक ज्यांना ह्या सगळ्या बौद्धिक श्रमांचा कंटाळा असतो किंवा तेवढी सवड नसते अशांकडून विवेकनिष्ठ वर्तनाची अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही का?

या बद्दल जरा साशंक आहे. सामान्य लोकांना यात कमी लेखले जात आहे असे वाटते. सर्वसामान्य लोक व्यवहारवादाशी एकनिष्ठ असतात. विवेकनिष्ठ वर्तन म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे ?

माझी मते बनण्यास, तयार होण्यास खूप वेळ लागतो. दृक, श्राव्य, वाचन इत्यादी माध्यमातून काही माहितीचे कण माझ्यापर्यंत पोहोचतात. त्यातील काहीबद्दल माझी मते तयार होतात. आणि एकदा अशापद्धतीने तयार झालेली मते/विचार सहसा बदलत नाहीत. इतरांचे ऐकून मी प्रयत्नपूर्वक ती बदललीच, तर काही काळाने मला असे लक्षात येते की माझे मूळचे मतच अधिक योग्य होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

"सर्वसामान्य लोक व्यवहारवादाशी एकनिष्ठ असतात" हे मार्मिक निरीक्षण आहे.

पण तुमची मत बनवण्याची प्रक्रिया असते तशी सर्वांचीच नसते. काही जणांची मते अत्यंत प्रभावी वाटणाऱ्या भावनिक किंवा तार्किक मीडियाने तयार होतात. किंवा सरळसरळ पूर्वग्रहांमुळे मते आधीच तयार असतात. जे उत्साही असतात ते मुद्द्यावर सम्यकपणेदृक श्राव्य मीडिया मिळवणे आणि वाचन चालू ठेवतात. सम्यकपणा महत्वाचा ! म्हणजे, मत बनवल्यावर आता कन्झ्युम करताय तो मीडिया फक्त तुमची असलेली मतं रिइन्फोर्स करणाराच असेल तर हे कन्झम्पशन सम्यक नाही. आणि माझ्या निरीक्षणानुसार सम्यक कन्झम्पशन खूप कमी लोकांना जमते.

पुढे, व्यवहारवादी जनता थेट मिसइन्फॉर्मेशनला बळी पडून अविवेकी वागते हे आपण पाहतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सामान्य लोकांना यात कमी लेखले जात आहे असे वाटते."
तसे वाटत असल्यास माझे लिहिताना चुकले. असे म्हणायचे होते की, सामान्य माणूस तुम्ही म्हणता तसा व्यवहारवादी असतो. जगणे आणि जगतानाचे अनुभव हाच त्याच्या विचारांचा आधार असतो. महागाई वाढली आहे हे सिपिआय वगैरे ईडिकेटर्स पाहून त्याला कळत नाही तर महिन्याचे किराणा बिल हजाराने जास्त आले ह्या अनुभवाने त्याला कळते. मात्र ह्या अनुभवाच्या जोडीला प्रचंड माहितीचा भडिमार चारी दिशांनी होत असताना(उदा. टिव्हिवरील बातम्या, व्हाट्सॅप युनिव्हर्सिटीतील ज्ञान) त्याची चिकित्सा करून किंवा त्या गोष्टीबद्दलचे आकलन वाढवण्यासाठी लागणारे बौद्धिक श्रम करणे त्याला शक्य होतेच असे नाही. त्यापेक्षा सगळे माणताहेत त्या सत्याच्या तुकड्याला कवटाळुन बसणे त्याला अधिक सोयीचे वाटते असे नाही का? शिवाय ज्या राजकिय संस्कृतीचा सर्वत्र बोलबाला आहे तिथे सोपेकरण, अँटी - इंटेलेक्चुअलिझमला प्रतिष्ठा आहे त्यांमुळे अशी कळपाचा भाग व्हायला उत्सुक जनता वाढणे राजकारण्यांना हवेच आहे.

"विवेकनिष्ठ वर्तन म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे ?"
सदा सर्वकाळ विकनिष्ठ राहणे कुणालाच शक्य नसते. पण वर्तन आणि उपलब्ध माहितीच्या आधारे बनलेले विचार यात जास्तीत जास्त सुसंगती असणे हे अपेक्षित आहे. पण माझे म्हणणे असे की सामान्य माणसाकडून, ज्याला ती पारख करण्याची सवड, इच्छा नसेल, तशी अपेक्षा करता येत नाही.

"इतरांचे ऐकून मी प्रयत्नपूर्वक ती बदललीच, तर काही काळाने मला असे लक्षात येते की माझे मूळचे मतच अधिक योग्य होते. "

असेही होऊच शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

साहित्य,न्यूज,समाज माध्यमातील व्हिडिओ, ह्या मुळे लोकांची मत बदलतात.
नैसर्गिक गुण आहे माणूस मेंदू कमी वापरतो आणि भावना जास्त.
प्रेयसी साठी आत्महत्या कारणे हा काही तरी प्रकार असतो .इथे फक्त भावना असतात.
दुसरे स्वार्थ असेल तर च माणूस स्वतःचा विचार तात्पुरता बदलतो.
समाजहित,मानव हीत, देश हीत,किंवा कोणतेही विषय ज्यांचा संबंध.स्वतः काही योगदान देण्यासाठी नसतो ..त्या मध्येच अक्कलेचे तारे तोडले जातं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वार्थ हा माणसाचा मूलभूत गुण आहे.
ज्या मध्ये स्वार्थ आहे अशा कल्पना माणसाला आवडतात.

जात,धर्म जर फायदा करून देत असतील तर तसे गट निर्माण करणारे विचार ऐकून लोक त्या कंपूत जावून मिसळतात.
जिथे स्वार्थ नाही स्वतःचा फायदा नाही अशी भाषण,लिखाण, वाचून माणसाचे विचार बिलकुल बदलत नाहीत..चांगले विचार मांडणारी लोक भारतात होवून गेली ..त्यांचा वापर पण लोकांनी स्वार्थ साठी च केला.
आंबेडकर न पासून शिवाजी महाराज पर्यंत सर्वांचा वापर गट बनवून फक्त स्वार्थ साधण्यासाठी लोकांनी केला आणि आज पण करत आहेत.
आस्तिक पासून नास्तिक पर्यंत सर्व विचार स्वार्थ नुसार स्वीकारतात .
आणि स्वार्थ संपला की सोडून देतात.

माणूस कोणत्याच विचार वर ठाम नसतो .
फक्त स्वतःच्या स्वार्थ वर ठाम असतो.
साधे उदाहरण.
गर्दी च्या वेळी प्लॅटफॉर्म वर असणाऱ्या लोकांना वाटत ट्रेन च्या दरवाजात लोक विनाकारण गर्दी करतं आहेत त्यांनी आत मध्ये जावून दरवाजा मोकळा ठेवला पाहिजे.
पण हीच platform वरची लोक ट्रेन मध्ये चढतात तेव्हा त्यांचे विचार एका सेकंद मध्ये बदलतात.
ट्रेन मध्ये इतकी गर्दी आहे तरी ही प्लॅटफॉर्म वरची लोक का गाडीत चढत आहेत त्यांना बिलकुल गाडीत प्रवेश करण्यास जागा नाही दिली पाहिजे.
एक सेकंदात माणूस स्वार्थ नुसार विचार बदलतो.
माणसं व्यतिरिक्त बाकी सर्व प्राणी त्यांच्या विचारांवर,स्वभाव वर ठाम असतात ते बदलत नाहीत.
वाघ च्या समोर कोणी गेला की तो हल्ला करणार च ..तो त्याचा स्वभाव ,विचार बदलत नाही.
पण माणूस लय लबाड.
राजकीय नेत्यांची तत्व आयुष्यात हजार वेळा तरी बदलतात.
सर्वांना माहीत असलेले दुसरे उदाहरण
स्वतच्या मतावर,विचारावर,तत्व वर ठाम असणारी लोक पण आहेत,स्वतःची चूक कबूल करून स्वतःचे विचार बदलणारी लोक पण आहेत.
पण ती इथे ऐसी अक्षरे वर किंवा बाकी वेब पेज वर नक्कीच नाहीत.
अशी लोक अतिशय दुर्मिळ आहेत पण त्या लोकांमुळेच जगात काही तरी चांगले घडते.
त्यांच्या मुळेच अजून जग चालू आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काका पदवी/टोपणनाव कॉलेजात मिळाले.
यांचे कारण म्हणजे माझे विचार बदलले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0