दहीवडा आणि पॅराबोला

"काय रे, खात का नाहीयेस? दहीवडा चांगला नाहीये का आज?"

"नाही रे. चांगला आहे."

"मग काय झालं? तुला माहीतीये ना, एखादा मानव दहीवडा खात नसेल तर दोन शक्यता आहेत. एकतर तो हळूहळू मानवाचा आदिमानव बनतोय, किंवा त्याला प्रेमरोग झालाय."

"गप भेंजो. गोलमालमधले डायलाॅग बास कर आता."

"ओके ओके. पण झालं काय?"

"अरे आज निकिताला भेटायला जायचा विचार करत होतो; पण कोणतरी म्हणालं की ती आत्ताच पॅराबोलाला घेऊन स्पामधे गेलीय."

"पॅराबोला?"

"अरे निकिताच्या डाॅगीचं नाव आहे पॅराबोला. त्याला घेऊन डाॅग स्पामधे गेलीय. अख्खी सकाळ तिथेच असेल म्हणे."

"ओहके. मग तूपण जा तिथे. तिथे गप्पा मारा."

"अरे मला आत घेणार नाहीत रे."

"का? म्हणजे असा डायलॉग होणार आहे का --

निकिता, निकिता दार उघड.
थांब माझ्या पॅराबोलाला न्हाऊमाखू घालते.
निकिता, निकिता दार उघड.
थांब माझ्या पॅराबोलाला तीट लावते."

"गप भेंजो. डोक्याला ताप देऊ नकोस. अरे बरोबर कुत्रा नेला तरच डाॅग स्पामधे जाता येणार ना? आणि आमच्याकडे कुत्रा नाहीये."

"आयडीया! तू बंटीला फोन कर आणि त्याच्या डाॅगीला घेऊन जा. त्याला सांग की डाॅग स्पाचा स्टाफ तुझ्या ओळखीचा आहे आणि तुला - म्हणजे तू बरोबर नेलेल्या कुत्र्याला - वीस टक्के डिस्काउंट आहे. पण आत्ता लगेच नेलं तरंच.'

"अरे पण बंटीच जाईल ना मग डाॅगीला घेऊन!"

"त्याला सांग की हा डिस्काउंट तू एकटा कुत्र्याला घेऊन गेलास तरंच आहे. बंटी लगेच हो म्हणेल. त्याची बायको माहेरी गेलीय. त्याच्या डाॅगीची सोय झाली तर बंटीही मित्रांना भेटून येईल."

"नाॅट अ बॅड आयडिया! पण निकिताला काय सांगू? तिला माहीतीये माझ्याकडे डाॅगी नाहीये ते."

"तिला पपी आईज करून सांग की तुला डाॅगीज खूप आवडतात पण आईबाबा डाॅगी घ्यायला देत नाहीत म्हणून तू मित्रांच्या डाॅगीजना चालायला किंवा स्पाला घेऊन जातोस. वाटल्यास असंही सांग की तुला लग्नानंतर एक डाॅगी पाळायचा आहे. अगेन, पपी आईज आर ए मस्ट!"

"ही झकास आयडीया आहे भेंजो."

"मग? वाटलं काय? मला आयडीया सुचत नाहीत?"

"तसं नाही रे. पण असे माझ्यासारखे बरेच जण असतील आणि बंटीसारखेही बरेच जण असतील. समजा डाॅगी स्पाचा खर्च हजार रूपये असेल तर मालकाकडून आठशे आणि माझ्यासारख्या स्पा टूरिस्टकडून आठशे रूपये घ्यायचे. म्हणजे आपलं ग्राॅस मार्जिन सहाशे रुपये. असे तीनचार जण मिळाले की वीकेंडचा खर्च सुटला."

"ते नंतर बघ. आधी बंटीला फोन कर. नाहीतर तू पोचेपर्यंत निकिता आणि पॅराबोला निघून जातील; आणि तुला तिथे बंटीच्या डाॅगीचं न्हाऊमाखू बघत बसावं लागेल!"

#मह्या_आणि_मी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

‘पॅराबोला’ हे नाव कुत्र्याकरिता वाईट नाही. (‘दहीवडा’ हेसुद्धा चांगले आहे.)

"तसं नाही रे. पण असे माझ्यासारखे बरेच जण असतील आणि बंटीसारखेही बरेच जण असतील. समजा डॉगी स्पाचा खर्च हजार रूपये असेल तर मालकाकडून आठशे आणि माझ्यासारख्या स्पा टूरिस्टकडून आठशे रूपये घ्यायचे. म्हणजे आपलं ग्रॉस मार्जिन सहाशे रुपये. असे तीनचार जण मिळाले की वीकेंडचा खर्च सुटला."

या मह्याला यातसुद्धा बिझनेस सुचल्याशिवाय राहात नाही, हं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"का? म्हणजे असा डायलॉग होणार आहे का --
निकिता, निकिता दार उघड.
थांब माझ्या पॅराबोलाला न्हाऊमाखू घालते.
निकिता, निकिता दार उघड.
थांब माझ्या पॅराबोलाला तीट लावते."

त्या वरिजनल चिऊताई-ष्टोरीमधला यापुढला संवाद “थांब माझ्या बाळाला दूध पाजते” असा कायसासा आहे ना? (चिमणी हा सस्तन पक्षी नसला, तरीही?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या गोष्टीतल्या चिऊताईने देशी गाईच्या (ए २) दुधाचा रतीब लावला नसेल कशावरून?
किंवा लॅक्टोजेन, फॅरेक्स इत्यादी फॉर्म्युला नसेल कशावरून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोड्या दिवसांनी मह्या आयडिया सांगायचेसुद्धा पैसे घेईल असं वाटतं.
एक उबर:स्टार्टअप उघडला पाहिजे मह्याने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्यासारख्या स्पा टूरिस्टकडून आठशे रूपये घ्यायचे

हा भाग कळला नाही हो. जरा इस्कटून सांगता का?

बाकी मी मह्याचा फ्यान आहेच हं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मी सांगणार नाही.
आता इथे लहानपणी वाचायचो फुलबाग मासीक तसे वाटत आहे.
(बाकी एक राहिलं. दही वडा हा उडीद वडा अधिक दह्याचा असतो आणि कुत्र्यांना कडक बटर देतात ते अधिक दह्याचाही असतो. आता ती रेसिपी ललितात गुंडाळून एक दिवस येईलच म्हणा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल जुन्या सहकाऱ्यांबरोबर जेवत होते. ते तिघं अमेरिकी, मी एकटीच विदेशी.

तर रियुनियनचा विषय निघाला. शाळेतल्या जुन्या सहाध्यायांना आता भेटायचं. (आमचेच सहाध्यायी असे कट्टर विनोदद्वेष्टे का निघतात, कोण जाणे! ते असो.) तर ती परतभेट असते तेव्हा मोठा काही समारंभ-छाप गोष्टी केल्या जातात म्हणे. खाणं-पिणं, डीजे, भेटण्यासाठी जागा वगैरे. मग ते करणाऱ्या लोकांच्या डोक्याला ताप.

तर मी विचारलं की याचा व्यवसाय नाही का करत लोक? पैसे द्यायचे आणि ते लोक बजेटनुसार कार्यक्रम आयोजित करून देणार?

माजी आजेबॉस म्हणे, ही कल्पना चांगली आहे. डेव्ह (आमचा आणखी एक माजी सहकर्मचारी) सतत नवनव्या बिझनेस आयडिया शोधायच्या मागे असतो. त्याला सांगतो मी हे.

डेव्ह आजेबॉसला तोंडावरच म्हणे, अत्यंत टुकार कल्पना आहे. आता हे तो म्हणाला तेव्हा ही कल्पना माझी होती, आणि ही कल्पना नसून उंटावरून शेळ्या हाकणं होतं, हे डेव्हला माहीत होतं का काय, हे मी विचारलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जे आयोजक होते आमच्या परतभेटीचे ते टीकेपार होते. दोन वेळा कार्यक्रम झाला तीन वर्षांत आणि खूपच मजा आली. आपला कोणता अजेंडा न पुढे करता करमणूक केली तर जमतंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की कशाबद्दल बोलताय?

सकाळीसकाळी पिसाळलेले राजेश१८८जी कडकडून चावले काय?

नेव्हर माइंड. लागला संदर्भ. (राजेश१८८जींनी आता अन-पिसाळून कडकडून अन-चावायला हरकत नसावी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॅराबोला कळला ... दहीवडा काही कळला नाही.
असो ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||