chat gpt-3 .

गेल्या आठवड्यात chat gpt-3 चा बराच बोलबाला होतो आहे.
हा ए.आय निबंध लिहितो, कोडिंग करतो, कविता लिहितो, साध्या बातम्यासुद्धा नीट देतो वगैरे वगैरे पासून तो चड्डी घालायला मदत करतो, न जाळता कुकरमधे भात लावतो, खाता येईल असा उपमा बनवतो - इथपर्यंत वाट्टेल त्या अफवा पसरताहेत.

तेव्हा नक्की काय चालू आहे? chat gpt-3 ची उत्क्रांती खरंच धोकादायक वेगाने होते आहे का?
त्यामुळे कुठले जॉब धोक्यात येतील (३-५ वर्षांत)
कुठले जॉब खंप्लीट निकामी ठरतील?
पुढल्या काळात मग काय कौशल्य आत्मसात करावी?

अशा प्रश्नांची उत्तरं मला तरी माहिती नाहीत पण हवी आहेत.

अक्षरनामामधे हे वाचलं - https://www.aksharnama.com/client/article_detail/6474
मराठीत हा एक चांगला सारांश आहे.

(मनातले प्रश्न... वर चाललेली चर्चा इथे हलवल्याबद्दल संपादकांचे आभार)

field_vote: 
0
No votes yet

माहितीच्या महासागर मधील माहिती खरी असण्याची शक्यता खूप कमी टक्के आहे.
हे लोकांस अनुभव मधून माहीत पडले आहे.

हा फक्त माहितीचा विस्फोट आहे.
पण त्या स्फोटात सत्य शोधणे कठीण आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणेच आता AI निर्मित लिखाण ओळखण्यासाठी चॅट. नेच नवीन खेळणं बनवलं आहे
https://www.cnbc.com/amp/2023/01/31/openai-launches-classifier-for-text-...

हे म्हणजे तलवार आणि ढाल एकाच कंपनीकडून विकत घ्यायची - आणि एकमेकांशी लढाई करायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपेक्षेप्रमाणेच मायक्रोसॉफ्टने त्यांच्या बिंग शोधयंत्राशी चॅ.ला सलग्न केले आहे.

आता गूगलच्या बार्डची वाट बघू -
२००६/७ - सर्च युद्ध तेव्हा गूगल सह्ज जिंकून गेलं
नंतर २०१०-११ त फोनयुद्ध
आता ए.आय युद्ध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ॲमेझननं चॅट जीपीटी वापरल्याचं कुठेशीक वाचनात आलं. त्यांच्या चॅटबॉटसाठी.

माजी आजे-मॅनेजरच्या स्टार्टपमध्ये ते लोक सिनेमा-मालिका बनवण्याआधी त्यांची स्क्रिप्टं वाचतात - AI वापरून. त्यासाठी ते त्यांचं प्रॉडक्ट वापरण्याची चाचणी करत आहेत. Buy word-embeddings from ChatGPT / Open AI - असं थोडक्यात म्हणता येईल. असा वापर अनेकांना करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

योग्य ठिकाणी हे आधुनिक तंत्र वापरले तर आज पर्यंत कधीच अस्तित्वात नसणारे कल्याणकारी राज्य जगात निर्माण होईल.
१)सर्व कोर्टाचे न्यायाधीश म्हणून ह्या तंत्राचाच वापर करणे.
वशिला,दबाव , समाजातील स्थान, सर्व गौण ठरेल .
आणि कायद्याने जे नियमात बसते तोच न्याय होईल.
तपास यंत्रणांना योग्य तेच पुरावे धायवे लागतील.
बनवेगिरी चालणार नाही..
कायद्याचे राज्य येईल.
मानवी न्यायाधीश,आणि तपास यंत्रणा ह्या दबावात असतात.
तिथे माणसं च असल्या मुळे माणसाचे सर्व गुण /दुर्गुण त्यांच्यात असतात.
२)महसूल विभाग, आयटी विभाग.
सर्व क्षेत्रात निर्णय घेण्याचा अधिकार ह्याच आधुनिक यंत्रणेला च हवा.
आणि जगात एकच नियंत्रक हवा.
जगाचा स्वर्ग होईल .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=0CGaxRZsw_o

Andrew Yang and Stephen Marche discussion. A little long but interesting.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने