Skip to main content

X/0 = ∞ ?

अगाधा भागाया
-शून्य माझ्यातले
घेता- भेटी आले
अनंतत्व

अनंत जोखण्या
- हाती मोजपट्टी
नव्हती- हिंपुटी
नाही झालो

धून अनंताची
झंकारली गात्री
अनंताचा यात्री
तेव्हा झालो

जयदीप चिपलकट्टी Thu, 25/07/2024 - 07:05

कविता फार छान जमली आहे.
----