Skip to main content

गोष्ट सांगणारी बाई....

गोष्ट सांगणारी बाई....

तिला येतं नव्हती
अक्षरं,
शब्द,
भाषा
आणि वाक्यसुद्धा पुस्तकातली
तरी तिला माहित होती भाषा
आणि हजारो गोष्टी...
रोज एकेक गोष्ट ती मला सांगे
मी रोज तिला विचारी
तुला कशी येते गं गोष्ट?
ती हसे फक्त सुरकुतलेलं....
मी म्हणलं तिला मला शिकवं की
गोष्ट सांगायला,
तर म्हणे; मी अडाणी मला कसं जमायचं?
पण गोष्ट तर सांगतेस की तू
पोथ्यापुराणाच्या पलीकडली....
ज्याचा शिकवणारा बोध नसतो
तरी अंगी बाणावी अशी.....
कुठून झिरपल्या तुझ्यात
एवढ्या अगणित गोष्टी?????
ती शांत झाली.....
ऐकू येत होती.....
वार्‍याची गूंघूऽऽऽ
नदीची चळचळ
झाडपाल्यांची सळसळ
पक्षांची गुणगुण
माणसांची कुजबूज...
मुखर झाली एकाएक....
तीनं लक्ष वेधलं त्याकडे माझ्यासहित
स्वतःचं.....
मग अक्षरांवर रेघ ओढावी
तसं बोलली.....
अंगाशी असलं ना बाईपण
मग माय गोष्टीसुद्धा येतात त्याचीबरोबर......

-श्रेya.....
(13/10/2024)

मारवा Sun, 13/10/2024 - 20:50

ओळीगणीक उंचावत गेलेली उत्कंठा बाईपण वाचल्यावर धाडकन जमिनीवर आदळली.

तिरशिंगराव Sat, 19/10/2024 - 07:22

हजार गोष्टी येणारी असं वाचल्यावर वाटलं, कदाचित, अरेबियन नाईटस मधली गोष्टी सांगणारी असेल!