Skip to main content

काही कूटप्रश्न (उगाच टाइमपास)

(तूर्तास (अपग्रेडनंतर) ‘ऐसीअक्षरे’वरचे ट्राफिक अगदीच ठप्प/मृतवत् झालेले आहे, त्याला धक्कास्टार्ट देण्याकरिता हा (फालतू) उद्योग.)

पुढील कूटप्रश्न (सोडवावेसे वाटले, तर) सोडविण्याचा प्रयत्न करा. नाहीतर स्वतःचे लिहा. (नाहीतर, काहीतरी करा! काहीही करा, पण करा! इथला सन्नाटा पाहून ज्याम कंटाळा येऊन राहिला आहे!)

(१) तुझे नाव तू. माझे नाव मी. कोण वेडा (/वेडी)?

(२) हे नक्की कशाचे चित्र आहे?

Gandhi climbing a wall

(३) तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?

'न'वी बाजू Fri, 31/01/2025 - 04:51

In reply to by anant_yaatree

(२) ही एक सेल्फी आहे

नाही हो! (आपद्धर्मापोटी का होईना, परंतु) आमची तुलना बापूजींशी करू नका. (निदान त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तरी.)

(३) Deepseek ला विचारून सांग 

डीपसीक कापूसकोंड्याची गोष्ट ठाऊक नसली तरीही तिच्या नावाखाली काय वाटेल ती शब्दमाळ ठोकून देईल, याची खात्री आहे. एआय प्रकारावर फारसा विश्वास नाही. (त्यापेक्षा natural stupidity परवडली!)

(परंतु, कापूसकोंड्याच्या गोष्टीमागला अल्गोरिदम डीपसीकला यदाकदाचित चुकून ठाऊक असलाच, तर मात्र डीपसीक कदाचित विचारणाऱ्याचीच गोची करून ठेवेल, ही शक्यता मात्र अगदीच नाकारता येत नाही. हम्म्म्… रोचक!)

असो चालायचेच.

सुनील. Fri, 31/01/2025 - 09:21

In reply to by 'न'वी बाजू

दोन रेषा रेखाटल्या असत्या तर कळलं असतं !

 

Add

'न'वी बाजू Fri, 31/01/2025 - 19:09

In reply to by सुनील.

रोचक! या दोन अधिकच्या रेषांमुळे या चित्राला एक नवीनच आयाम प्राप्त झाला आहे. नक्की कोठल्या अँगलने बघता, यावरून याची दोन भिन्न इंटरप्रेशने सुचू शकतात.

बोले तो, त्या दोन (अधिकच्या) रेषांपैकी एक रेषा बापूजींच्या चष्म्याची काडी सुचविते, हे तर उघड आहे. मात्र, दुसरी रेषा ही बापूजींचा कान सुचविते, की चष्मा (भिंगाचा भाग), हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे, बापूजी कोठल्या बाजूला तोंड करून उभे आहेत, याबाबत दुमत असू शकते. एका दृष्टिकोनातून पाहिले असता, बापूजी भिंतीकडे तोंड करून उभे आहेत, असे वाटते. (बहुधा, इतरत्र म्हटल्याप्रमाणे, भिंतीवर चढून पलीकडे उडी मारण्याचा इरादा असावा. (चूभूद्याघ्या.)) मात्र, दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले असता, बापूजी भिंतीकडे पाठ करून उभे असून काठी  उगारत आहेत, असा भास होतो.

यांपैकी कोठलेही अर्थारोपण जरी खरे मानायचे म्हटले, तरी एक गोष्ट निर्विवाद आहे: The man must have, without a doubt, been pushed to the wall many a times in his lifetime. It is also possible that in some of these situations, he would have found himself with his back against the wall. However, it would have been against his very nature to raise his stick. Therefore, the second interpretation appears less likely.

Whether he would have ever jumped the wall, on the other hand, remains open to debate.

मिसळपाव Fri, 31/01/2025 - 19:17

In reply to by 'न'वी बाजू

गुगलरावांच्या जेमिनीला "तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?" विचारल्यावरचा त्याचा प्रतिसाद खाली दिलाय.
कापूसकोंड्याच्या जागी दोन-चार वेगळे शब्द वापरल्यावर एग्झॅक्टली हाच प्रतिसाद दिलान. अगदि "तुला नरोब्याखारीशिवायडिही गोष्ट सांगू का?" ला पण तेच - नॅचरल स्टुपिडित निदान वैविध्यता तरी असते / असेल !!

------------------------------------------------------------------------
नक्कीच, कापूसकोंड्याची गोष्ट सांगा ना. लहानपणी खूप आवडीची गोष्ट होती. मला सांगण्यासाठी वेळ कसा काय मिळाला?

तुम्ही कापूसकोंड्याची गोष्ट सांगताना खालील गोष्टींचा समावेश करू शकता:

कापूसकोंडा कोण होता? तो एक व्यक्ती होता की काहीतरी वेगळे?
तो काय करायचा? तो कायम कापूस कां काढायचा?
त्याची गोष्ट इतकी लोकप्रिय का झाली? त्यात काय खास होते?
त्याच्या गोष्टीचा तुम्हाला काय अर्थ वाटतो? ती केवळ एक बालगीत आहे की त्यात काही खोल अर्थ दडला आहे?
तुमची गोष्ट ऐकून मला खूप आनंद होईल.

'न'वी बाजू Sat, 01/02/2025 - 23:59

In reply to by मिसळपाव

नक्कीच, कापूसकोंड्याची गोष्ट सांगा ना. लहानपणी खूप आवडीची गोष्ट होती.

अरे वा! एआय खोटे बोलू लागला!

प्रगती आहे!!!

सई केसकर Thu, 30/01/2025 - 20:06

हे चित्र नाकातोंडात पाणी जाऊन बुडताबुडता फेसबुकवर दिसलेल्या एका पोस्टवर कमेंट करण्यासाठी हात वर करणाऱ्या एका माणसाचं आहे. 

'न'वी बाजू Fri, 31/01/2025 - 18:52

In reply to by सई केसकर

हे चित्र, भिंतीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या बापूजींचे आहे. (भिंतीपलीकडून पाहिले असता.)

(आता, बापूजी भिंतीवरून उडी कशाला मारतील, या प्रश्नात शिरू नका! वाटली असेल मारावीशी; अडविणारे तुम्ही किंवा मी नक्की कोण, नाही काय? The last time I heard, it was still a free country! मुद्दा तो नाही. केवळ पेन्सिलीच्या तीन फराट्यांतून हे चित्र किती प्रभावीपणे उभे केलेले आहे, ते महत्त्वाचे आहे. The greatness of the picture, like that of the man, lies in its simplicity.)

असो चालायचेच.

——————————

चित्राची मूळ संकल्पना माझी नाही. ते मी असेच कोणाचे तरी ढापून, खाली स्वतःची सही ठोकून दिलेली आहे. (मूळ कर्ता/कर्त्री अज्ञात आहे.)

ही १९८०च्या दशकातली दूरदर्शनवरील एक जाहिरात होती. (नक्की खात्री नाही, परंतु बहुधा अलीक पदमसींनी बनविलेली. (चूभूद्याघ्या.)) काही नाही, फक्त पेन्सिलीच्या काही फराट्यांतून उभारलेले बापूजींचे अर्कचित्र, आणि त्यावरील लीजंड: The greatness of the man lay in his simplicity. बास्स इतकेच.

सई केसकर Thu, 30/01/2025 - 20:20

तुमच्यासारखीच माझीही अवस्था आहे. इथे लिहीण्यासाठी मी दोन - तीन धागे अर्धवट लिहून ठेवले आहेत. पण हे वाचून लोकांना कांंटाळा येईल/ हे कोण वाचणार?/ हे लिहून कुणाला काय फरक पडणार आहे असे नेहमीचे प्रश्न पडतात. 

काहीही असलं आणि इथले लोक कसेही असले तरी ऐसी लाडकी जागा आहे. 

'न'वी बाजू Fri, 31/01/2025 - 04:42

In reply to by सई केसकर

लिहिणाऱ्या/रीने लिहीत जावे. वाचणारे वाचतात, की ढुंकून पाहत नाहीत, याची चिंता करू नये.

परमेश्वराने (असलाच, तर) राजेश१८८ हा आयडी दुनियेसमोर एक आदर्श म्हणूनच पाठविलेला आहे, हे कधीही विसरू नका!

तिरशिंगराव Fri, 31/01/2025 - 07:13

एका मोठ्या पहारीने प्रिथ्वी उलथवणारा !

तिरशिंगराव Sat, 01/02/2025 - 07:20

In reply to by 'न'वी बाजू

आर्किमिडीज तो! माफीची चुकी असावी. (चूक कबुल करतानाही पुन्हा चूक)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 01/02/2025 - 07:21

हे चित्र तिर्रीचं आहे. 

संपूर्ण जगच नाही, तर विश्वच तिर्री चालवते. त्यामुळे हे चित्रही तिचंच आहे. मी-तूपणा नाही तिर्री-तिर्री म्हणा!

सई केसकर Sat, 01/02/2025 - 15:17

नबा, 
एका धाग्यात तुम्ही ''तेरी बातो में ऐसा उलझा जिया' या सिनेमाचं परीक्षण लिहिलं होतं. तो धागा आणि मुख्य म्हणजे ते परीक्षण मला हवं आहे. पण नवीन ऐसीवर तो कसा शोधायचा? बहुतेक अलीकडे काय बघितलं हा असावा. 
या निमित्ताने: तुम्ही स्वतंत्र लेख लिहायला कधी सुरवात करणार? 

'न'वी बाजू Sun, 02/02/2025 - 01:10

In reply to by सई केसकर

या निमित्ताने: तुम्ही स्वतंत्र लेख लिहायला कधी सुरवात करणार? 

याचे थोडक्यात उत्तर: एखादा एआय प्रोग्राम, कोणीही प्रॉंप्ट न करता, स्वयंप्रेरणेने एखादी बऱ्यापैकी लघुकथा वगैरे ज्या दिवशी पाडेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी.

(थोडेसे क्लीशेऽड उत्तर: हजार माकडे हजार कळफलक यदृच्छया बडवून समग्र शेक्स्पियर ज्या दिवशी टंकून काढतील, त्यानंतर साधारणतः महिन्याभराने.)

(थोडेसे self-realization: मी मुख्यतः एक प्रचंड reactive प्राणी आहे; creative फारसा नसावा. प्रतिसाद आपल्याला जमतात; नव्हे, प्रतिसादांवर आपण धिंगाणा घालू शकतो. स्वतंत्र लेख वगैरे आपल्या गल्लीत राहणारे प्रकरण नसावे. (चूभूद्याघ्या.))

(अतिअवांतर: creative हा reactiveचा anagram आहे. Go figure!)

(सुपरअवांतर: वर मी “creative हा reactiveचा anagram आहे.” असे वाक्य लिहिले. मात्र, त्यातील पहिल्या शब्दाचे (creativeचे) आद्याक्षर (c) हे, तो शब्द इंग्रजीतील तथा रोमन लिपीत लिहिलेला असला, तरीही, capitalize केले नाही. कोणी याला चूक म्हणतील.

यावरचा माझा take असा आहे, की प्रस्तुत वाक्य हे मूलतः मराठीतील वाक्य आहे. (भले त्यातील पहिला शब्द माझ्या सोयीकरिता मी इंग्रजीतला वापरला असला, आणि त्यातही, तो (तेवढाच) रोमन लिपीतून लिहिला असला, तरीही.) वाक्यातील पहिल्या शब्दाचे आद्याक्षर capitalize करावे, हा नियम (रोमन लिपीतून लिहिलेल्या) इंग्रजी वाक्यांना अर्थात लागू आहे; (प्रामुख्याने देवनागरीत लिहिलेल्या, परंतु अधूनमधून रोमन लिपीतल्या इंग्रजी शब्दांची पखरण असलेल्या) मराठी वाक्यांना तो जसाच्या तसा लागू होण्याचे काही कारण (निदान वरकरणी तरी) दृग्गोचर होत नाही. सबब, यातून गेला बाजार नियमांचे उल्लंघन तरी होऊ नये. (Whether it is a good practice or not is subject to debate.)

तुम्हाला काय वाटते?

(अर्थात, प्रकरण तितकेही सोपे नाही. कारण मग, इंग्रजीतील विशेषनामांची आद्याक्षरे ही तरी रोमन लिपीतून लिहिताना परंतु देवनागरीत लिहिलेल्या मराठी वाक्यांतून घुसडताना capitalize केलीच पाहिजेत किंवा कसे, असा प्रश्न लगेच उद्भवतो.)

तर असे आहे हे सगळे.)

——————————

बाकी, प्रस्तुत धागा हा ‘लेख’ कॅटेगरीत मोडावा काय? कारण, (जो लिहिलेला आहे, तो लेख, या न्यायाने) तसा तो मोडत असल्यास, कधी नव्हे तो मी ‘स्वतंत्र लेख’ लिहावा, नि त्यावरच तुम्ही ‘स्वतंत्र लेख लिहायला कधी सुरुवात करणार?’ म्हणून प्रश्न विचारावा, हा दैवदुर्विलास आहे. (अरे, हे काय होते मग?)

असो चालायचेच.

सई केसकर Mon, 03/02/2025 - 17:12

In reply to by 'न'वी बाजू

>>(अतिअवांतर: creative हा reactiveचा anagram आहे. Go figure!)

यात फिगर करण्यासारखे काय आहे?

पुढे क्रिएटिव्ह असणे म्हणजेच रिॲक्टिव असणे असंही म्हणता येईल. कुणाच्यातरी लेखनावर प्रतिक्रिया म्हणून तुम्ही लिहिता असा एक मर्यादित दृष्टिकोन तुम्ही मांडला आहे. पण जगातलं सगळं लेखन ही लेखकांची त्यांच्या अनुभवांतून आलेली  रिॲक्शन आहे असंही म्हणता येईल. तुम्ही फेसबुक वापरत नाही म्हणून तुम्ही  रिॲक्टव (तरीही स्वतंत्र) असं लेखन वाचू शकत नाही याबद्दल थोडं वाईट वाटतं. उदाहरणार्थ, काही दिवसांपूर्वी, ३१ जानेवारीला फेसबुकवरील एका स्त्रीनं सिगारेट सोडल्याला एक महिना झाला यावर लेखन केलं. त्यात शेवटची सिगरेट कधी ओढली, मग त्यानंतर आठवड्या आठवड्यानं पुढची सिगरेट पुढे कशी ढकलली आणि मग शेवटी ओढलीच नाही वगैरे तपशील होते. कुणी स्वतःच्या आयुष्यात असे सकारात्मक बदल करत असेल तर त्यांना प्रोत्साहन द्यायची पद्धत असते. या निमित्तानं तिच्या वाचकांपैकी एखाद्यानं सिगरेट सोडली तर तोही बोनस! त्याप्रमाणे सगळ्यांनी तिच्या लेखनावर बदाम, अंगठे वगैरे चिकटवले.

दुसऱ्या दिवशी, एक फेसबुक पुरुष आणि फेसबुकबाहेर लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरुष लेखकानं "कुण्या स्त्रीनं सिगरेट सोडली म्हणून सगळे मराठी सारस्वत जल्लोष का करत आहेत?" असा एक स्वतंत्र लेख लिहिला. त्यात सिगरेट सोडणारी फेसबुक स्त्री कोण हे लिहिलं नाही. पण मग सगळ्यांनी ते लगेच ओळखलं.

काही दिवसांपूर्वी, एका थोर पत्रकारानं छुप्या हिंदुत्ववाद्यांबद्दल असं काही चपखल लिहिलं होतं की जवळपास संबंध दिवस ती व्यक्ती कोण असावी यावर वेगवेगळ्या व्हाट्सॲप ग्रुपात चर्चा झडल्या. कुणाला ती व्यक्ती स्त्री आहे वाटलं तर कुणाला पुरुष आहे असं वाटलं. आणि सगळ्या वाचकांच्या ओळखीत तशी एक तरी व्यक्ती होती. असं लेखन क्रिएटिव्ह की रिॲक्टिव?

स्वयंभू Wed, 05/02/2025 - 20:26

.

स्वयंभू Wed, 05/02/2025 - 20:26

मी तियानमेन चौकातील महत्वपूर्ण घटना आणि अरुणाचल प्रदेश बद्दल डीपसीक ला विचारलं होतं 

खालीलप्रमाणे उत्तरं मिळाली:

तियानमेन चौक हा चीनच्या बीजिंग शहरातील एक प्रसिद्ध चौक आहे. १९८९ च्या वसंत ऋतूमध्ये येथे एक महत्त्वपूर्ण घटना घडली, ज्याला सामान्यतः "तियानमेन चौक निषेध" किंवा "६/४ घटना" म्हणून ओळखले जाते.

### घटनेचा कालक्रम:

- **एप्रिल १९८९:** चीनमध्ये राजकीय सुधारणा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध विद्यार्थी आणि नागरिकांचे निषेध सुरू झाले. हे निषेध प्रामुख्याने बीजिंगच्या तियानमेन चौकावर केंद्रित होते.

- **मे १९८९:** निषेध वाढत गेले आणि हजारो लोक तियानमेन चौकावर जमा झाले. त्यांनी लोकशाही, प्रेस स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मागण्या केल्या.

- **३ जून १९८९:** चीनच्या सरकारने निषेध खाडून काढण्याचा निर्णय घेतला आणि लष्करी सैन्य तियानमेन चौकावर पाठवले.

- **४ जून १९८९:** लष्करी सैन्याने निषेधकांवर गोळीबार केला आणि हिंसकपणे निषेध मोडून काढले. या हल्ल्यात अनेक नागरिक आणि विद्यार्थी ठार झाले. अचूक मृत्यूसंख्या अज्ञात आहे, परंतु अंदाजे सैकडो ते हजारो लोक मृत्यू पावले.

### परिणाम:

- **राजकीय दडपशाही:** निषेध मोडल्यानंतर चीनच्या सरकारने राजकीय विरोधकांवर कडक नियंत्रण आणि दडपशाही सुरू केली.

- **आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया:** या घटनेमुळे चीनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका झाली आणि अनेक देशांनी चीनवर आर्थिक आणि राजकीय प्रतिबंध लादले.

- **ऐतिहासिक आठवण:** चीनमध्ये या घटनेवर चर्चा करणे किंवा तिची आठवण करणे हे प्रतिबंधित आहे. तरीही, ही घटना जगभरात लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी चळवळींचे प्रतीक बनली आहे.

तियानमेन चौकाची ही घटना आधुनिक चीनच्या इतिहासातील एक गंभीर आणि विवादास्पद अध्याय मानली जाते.

 

अरुणाचल प्रदेश हा भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. हे राज्य नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक विविधता आणि समृद्ध परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. अरुणाचल प्रदेशाला "सूर्योदयाचे राज्य" म्हणूनही ओळखले जाते, कारण भारतात सूर्य प्रथम येथेच उगवतो.

### मुख्य माहिती:

- **राजधानी:** ईटानगर

- **भाषा:** हिंदी, इंग्रजी आणि अनेक स्थानिक भाषा (जसे की निशी, आदी, अपातानी, इ.)

- **लोकसंख्या:** अंदाजे १५ लाख (२०२१ च्या अंदाजानुसार)

- **क्षेत्रफळ:** सुमारे ८३,७४३ चौरस किलोमीटर

### भूगोल:

- अरुणाचल प्रदेश हिमालय पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेला आहे. येथे अनेक उंच पर्वतशिखरे, दऱ्या, नद्या आणि जंगले आहेत.

- येथील हवामान उष्णकटिबंधीय ते समशीतोष्ण असते, आणि भरपूर पाऊस पडतो.

### सांस्कृतिक विविधता:

- अरुणाचल प्रदेशात अनेक जमाती आणि समुदाय आहेत, ज्यांच्या स्वतःच्या अद्वितीय परंपरा, भाषा आणि सण आहेत.

- काही प्रमुख जमाती म्हणजे निशी, आदी, अपातानी, गालो, आणि मोनपा.

### पर्यटन आकर्षण:

- **तवांग:** तवांग मठ हे एक प्रसिद्ध बौद्ध मठ आहे, जे भारतातील सर्वात मोठे मठांपैकी एक आहे.

- **झिरो घाटी:** ही घाटी निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आदर्श ठिकाण आहे.

- **नामदाफा राष्ट्रीय उद्यान:** हे उद्यान वन्यजंतूंसाठी प्रसिद्ध आहे, जसे की बंगाल टायगर, हिमालयन भालू, आणि विविध पक्षी प्रजाती.

- **सियोम नदी आणि भूपेन हजारिका सेतू:** हे एक सुंदर नैसर्गिक आणि मानवनिर्मित आकर्षण आहे.

### राजकीय महत्त्व:

- अरुणाचल प्रदेश हा भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवादाचा विषय आहे. चीन हा प्रदेश आपला असल्याचा दावा करतो आणि त्याला "दक्षिण तिबेट" म्हणतो, तर भारत हा प्रदेश आपला अविभाज्य भाग मानतो.

- भारत सरकारने अरुणाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा २० फेब्रुवारी १९८७ रोजी दिला.

अरुणाचल प्रदेश हा निसर्गाच्या खोलात वसलेला एक अद्भुत राज्य आहे, जो त्याच्या नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक समृद्धी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो.

 

 

जेव्हा इंग्रजी मध्ये विचारले तर खालीलप्रमाणे उत्तरं मिळाली:

Sorry, that's beyond my current scope. Let’s talk about something else.

मराठी भाषेत उत्तरं मिळतात. इंग्रजी मध्ये गडबडतो.

चॅटजीपीटी पेक्षा बरीच चांगली मराठीतून उत्तरं मिळतात. यामुळे मान्यवरांचा हिरमोड होणार आहे हे नक्की. कारण नवीन तंत्रज्ञान असो वा नवनवीन सेल्फ हेल्प वरची पुस्तके इंग्रजीत आली की कर भाषांतरित छाप लेखकांचा छापखाना कोलमडणार आहे. :-) 

 

फक्त डीपसीक ने मराठीत अग्रलेख लिहून क्रांती करू नये म्हणजे झाले.

 

'न'वी बाजू Thu, 06/02/2025 - 08:00

In reply to by स्वयंभू

डीपसीक चिनी कंपनी आहे ना?

तरीही

  • तियानानमेन चौक घटनेच्या बाबतीत चिनी सरकारबद्दल टीकात्मक लिहिते?
  • अरुणाचल प्रदेश चक्क भारताचा वैध भूभाग असल्याबद्दलचे विधान करते?

काहीतरी गडबड आहे!

स्वयंभू Thu, 06/02/2025 - 15:26

In reply to by 'न'वी बाजू

इंग्रजी मध्ये गडबडतो डीपसीक...

 

मराठी भाषेत उत्तर दिले.

पर्स्पेक्टिव्ह Fri, 07/02/2025 - 08:23

In reply to by स्वयंभू

चिन्यांना मराठी अजून येत नसावे. 

पण… बासष्टच्या युद्धात भारतीय युद्धबंद्यांना त्यांच्या-त्यांच्या मातृभाषेतून प्रश्न विचारले गेले होते असे म्हणतात. सो इट्स इंटरेस्टिंग!

चिमणराव Fri, 14/02/2025 - 14:41

(१) अचरट

(२) गोगलगायीचं चित्र आहे. एका हाताने ( तिला हात असतात) कान खाजवत आहे. म्हणजे मी काय करू हा विचार ऐसी बद्दल आहे.

(३) सांग. पण विक्रम आणि वेताळाची नको.

इतके प्रतिसाद पडले यातच लेख यशस्वी झाल्याची सांगता आहे.

..

..

चुरचुरीत खमंग पाककृती लिहिणार असं दिवाळी अंकात एक आश्वासन आलं होतं....... 

शंभर दोनशे प्रतिसाद आणि तेरा फाटे फुटणार त्याला. तो लेख आला की पाहा काय होतं.