सिद्धोबा
मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो.
थोडं आत वळल्यावर -
भर दुपारी अचानक
एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो.
मूळ खोड नसणाऱ्या
पारंब्यांच्या वडाखाली
मोरांचा एक थवा
केकारवत फिरतो इकडेतिकडे.
तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी
एक नितळ झरा आहे, थंडगार!
वेळू आणि आमराई
वगैरेही-
निळंशार आकाश, स्वच्छ मन,
निवलेले डोळे, अक्षय शांती-
तोच सिद्धोबा!
पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.
कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो -
तिथे रहदारी असते फक्त.
.
प्रतिक्रिया
आवडली
आवडली रचना. शेवटचा भाग अगदी कळसाकडे नेतोय.
सिद्धोबा आवडल्या गेला आहे.
सिद्धोबा मस्ताड आवडल्या गेला आहे एकदम!!!!!! आत वळण्याची प्रोसेस खासच दाखवलीये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मस्तच!
मस्तच!
फार छान
फार छान.
खूप आवडला सिद्धोबा!
ते सहज पण दुर्मिळ दर्शन उत्तम व्यक्त झाले आहे.
नुस्तं वाचून देखिल एवढं छान वाटलं...
'रहदारी'चा उल्लेख मात्र उगीच ढोबळ वाटून गेला.
कविता
कविता आवडली.
>>पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.
<<
या ओळींमधला शेवटचा शब्द टाळता आला असता. माझ्यामते तरीही सूचकता अधोरेखित झाली असती आणि कदाचित अधिक धारदार बनती.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
सहमत
असेच म्हणतो. अर्थात आमच्यासारख्या औरंजेबांना 'स्वतःच्या आतमध्ये वळणे' ही सांकेतिकता हा शब्द नसता तर कळाली असती याची ग्यारंटी नाही. त्यामुळे हाये ह्येच ब्येस हाये.
कविता एकूणात आवडली. नाना, जरा आत वळा आणि अधिक लिहीत चला.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
दोघांचेही मुद्दे समजले
निवड केली खरी.
कवितेची आवर्जून दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.
सन्जोप राव, आज्ञापालनाचा कसोशीने प्रयत्न करीन.
अरे क्या बात है !मस्त मस्त
अरे क्या बात है !मस्त मस्त एकदम मस्त...
खूप दिवसांनी सुंदर रचना वाचायला मिळाली !
वाचकांचे अनेक आभार
प्रतिसाददात्यांची मते स्वागतार्ह आहेत.
नाना महाराज की जय!
चला ह्या कवितेचा वापर करुन नानामहाराज ब्रँड बनवता येईल. नाहीतरी सध्या बर्याच बुवाबाबांचे शेयर्स कोसळले आहेत हा नवा एनएफओ भारी दिसतोय!!
लय ब्येस.. अतिशय
लय ब्येस.. अतिशय आवडली
बर्याच दिवसांनी कवितेला पाच चांदण्या द्यायचा योग आल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कविता आवडली
कविता आवडली
कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच
खरे आहे. फ-क्त रहदारी!
अफाट कविता.