Skip to main content

हत्तीखाना

(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)

'न'वी बाजू Tue, 20/01/2026 - 04:29

In reply to by शांततावादी हत्ती

‘विचारसौष्ठत्व’ नव्हे; ‘विचारसौष्ठव’. आणि, ‘वृद्धींगत’ नव्हे, ‘वृद्धिंगत’.

बाकी चालू द्या.

सई केसकर Wed, 21/01/2026 - 08:53

https://www.ndtv.com/science/scientists-finally-explain-why-elephant-po…

हत्तींना कॉफीच्या बिया खायला घालून त्या त्यांच्या शेणातून परत मिळवल्या जातात.
ती कॉफी जगातली सर्वात दुर्मिळ कॉफी आहे (अर्थातच!). आणि हत्तीच्या पोटातील गट मायक्रोबमुळे कॉफीतील पेक्टिन पचवलं जातं. त्यामुळे कॉफीचा कडवटपणा कमी होतो.

आता समजा हत्तीनं एखादा सिनिकल माणूस खाऊन शिटला, तर त्याचा कडवटपणा कमी होईल काय?

'न'वी बाजू Wed, 21/01/2026 - 12:27

In reply to by सई केसकर

हत्तींना कॉफीच्या बिया खायला घालून त्या त्यांच्या शेणातून परत मिळवल्या जातात.
ती कॉफी जगातली सर्वात दुर्मिळ कॉफी आहे

ऊदमांजराबद्दल ऐकले होते. हत्तीबद्दल नवीन ऐकतोय.

आता समजा हत्तीनं एखादा सिनिकल माणूस खाऊन शिटला, तर त्याचा कडवटपणा कमी होईल काय?

(घसा खाकरून) ऐकतोय, हं!

परंतु, हे होणे नाही.

१. एक तर, हत्ती शाकाहारी असतो. (अर्थात, आपल्या ‘ऐसी’वरच्या हत्तीबद्दल ठाऊक नाही, म्हणा.)

२. एवढे करूनसुद्धा जरी एखाद्या हत्तीने मला खाल्लेच, तरीही, त्याला मी पचणार नाही.

सबब, काळजी नसावी.

शांततावादी हत्ती Wed, 21/01/2026 - 15:58

In reply to by 'न'वी बाजू

हो इंडोनेशियात बालीमध्ये लुवाक कॉफी म्हणून मिळते. ती अशाप्रकारे बनलेली असते. हत्ती परिवाराने बालीला भेट दिली होती तेव्हा ते माहिती व्हायच्या आधी ती कॉफी प्यायली होती तेव्हाचा फोटो देत आहे. ती कॉफी कशी बनते ते समजल्यावर सगळ्यांना कसेतरी व्हायला लागले आणि परत ती कॉफी कधीही पिणार नाही असा निश्चय सगळ्यांनी केला.

Coffee

शांततावादी हत्ती Wed, 21/01/2026 - 15:16

In reply to by सई केसकर

आता समजा हत्तीनं एखादा सिनिकल माणूस खाऊन शिटला, तर त्याचा कडवटपणा कमी होईल काय?

आम्ही माणसांना खात नाही तर पायदळी तुडवितो. आम्ही शाकाहारी आहोत. 

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 02:25

In reply to by सई केसकर

आता समजा हत्तीनं एखादा सिनिकल माणूस खाऊन शिटला

‘हगला’ म्हणा की सरळसरळ! लाजता काय?

(शिवाय, ‘हत्ती हगला’ला कशी एक alliterative ring आहे, एक अनुप्रासात्मक लय आहे… तेवढेच हत्तीला tribute!)

तर त्याचा कडवटपणा कमी होईल काय?

(हत्तीचे बाकी काहीही असो, परंतु) कमी व्हायला मुळात हत्तीमध्ये कडवटपणा असल्याचे आजतागायत कधी जाणवले तरी नाही, बुवा.

(तुमचे निरीक्षण याहून वेगळे असल्यास अर्थात कल्पना नाही.)

असो चालायचेच.

सई केसकर Sat, 24/01/2026 - 06:52

In reply to by 'न'वी बाजू

मला हगला हा शब्द लाजिरवाणा नक्कीच वाटत नाही. किमान आत्ता तरी नाही कारण मी एक १० वर्षाच्या मुलग्याची आई आहे. त्यामुळे आमच्या घरात याबद्दल सतत विनोद चालू असतात. किंवा विराट किंवा अजून कुणीतरी तसाच झेरॉक्स दाढीवाला आऊट झाला की आमच्या घरात "आई! विराट हागला" असं सांगायची पद्धत आहे.

पण मेघना पेठेंनी त्यांच्या एका कथेत शिटला हा प्रयोग केला आहे. बहुतेक कबुतराबद्दल. तेव्हापासून मला तो शब्द मराठीत वापरायला आकर्षक वाटतो. पण अर्थात असं केल्याने त्या वस्तूचं सौंदर्य वाढत नाही हे मला माहिती आहे.

आणि हत्तीचा कडवटपणा नाही. माणसाचा. तुम्ही मला इथे पकडणार असं वाटलं होतंच. पण उशिरा ट्यूब पेटली थोडी.

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 11:28

In reply to by सई केसकर

किमान आत्ता तरी नाही कारण मी एक १० वर्षाच्या मुलग्याची आई आहे. त्यामुळे आमच्या घरात याबद्दल सतत विनोद चालू असतात. किंवा विराट किंवा अजून कुणीतरी तसाच झेरॉक्स दाढीवाला आऊट झाला की आमच्या घरात "आई! विराट हागला" असं सांगायची पद्धत आहे.

खरेच, मुले ही मानवजातीस केवढा मोठा आधार आहेत!

पण मेघना पेठेंनी त्यांच्या एका कथेत शिटला हा प्रयोग केला आहे.

मेघना पेठेंना मराठी असण्याची लाज वाटते काय? (आणि त्यातसुद्धा, असला धेडगुजरी शब्दप्रयोग केवळ euphemism म्हणून वापरायचा. म्हणजे, आमचे दिवंगत तीर्थरूप म्हणायचे, त्याप्रमाणे, आपली मुले (वर्गातल्या ‘इतर’ पोरांचे ऐकून) ‘साल्या, भडव्या’ म्हणायला शिकतील, म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेत पाठविणार नाहीत. त्याऐवजी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन मुले fucking bastard म्हणायला शिकलेले मात्र यांना चालते! पण लक्षात कोण घेतो?)

असो चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 11:43

In reply to by 'न'वी बाजू

आमच्या घरात याबद्दल सतत विनोद चालू असतात.

“आई! विराट हागला” हा विनोद नव्हे. ते एक गंभीर विधान आहे. त्याचा उचित आदर झाला पाहिजे.

सई केसकर Sat, 24/01/2026 - 12:46

In reply to by 'न'वी बाजू

"मला सांगून काय उपयोग? त्याच्या आईला सांग. ती येईल धुवायला" हा विनोद आहे जो जास्त आचरटपणा नको म्हणून नाही लिहिला.

शांततावादी हत्ती Fri, 23/01/2026 - 13:39

In reply to by सई केसकर

आजची हत्तीबातमी हा नवा उपक्रम सुरू केल्याबद्दल आभारी आहे. 

आता तुम्ही वाहतूकमुरांबा हत्ती असं नाव धारण करू शकता. 

चांगली सूचना आहे. यापुढील नाव 'वाहतूकमुरांबा हत्ती'.

सई केसकर Sat, 24/01/2026 - 06:45

च्यायला! रोज हत्ती असा न्यूज सर्च केला की एकतरी ताजी बातमी असते. मोदीजी देखील इतक्या नवनवीन कारणाने बातम्यांमध्ये नसतात.
https://www.dailymaverick.co.za/article/2026-01-23-elephant-hunting-in-…
तर बोत्सवानामध्ये इतके हत्ती आहेत की त्यांची शिकार करण्यावर निर्बंध नाहीत. पण हे तत्त्व माणसाला का लावत नाहीत? वाघांनी आणि हत्तींनी दावोसमध्ये भेटावं आणि माणसांची शिकार करायला सुरुवात करावी.
मी ऑस्ट्रेलियात होते तेव्हा तिथे खूप कांगारू झाले होते. म्हणून टीव्हीवर कांगारूचं मास कसं आधीच लीन आणि चांगलं अशा जाहिराती असायच्या. एखाद्या हरणाचं मास असावं तशी चव असायची. पण आपल्या देशाची ओळख अशी ग्रील करून खायची म्हणजे काय!!

असो..तर आजची हत्ती बातमी वाचा. जमल्यास आपल्या परिवाराला घेऊन बोत्सवानामध्ये जाऊन काळे झेंडे दाखवून या.

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 11:07

In reply to by सई केसकर

तर बोत्सवानामध्ये इतके हत्ती आहेत की त्यांची शिकार करण्यावर निर्बंध नाहीत.

आमच्या देशातल्या हत्तींनी देशाची पूर्ण वाट लावण्याचा (आणि त्यातून जे काही उरेल, ते विकून खाण्याचा) चंग बांधलेला आहे.

आमच्याकडे असे निर्बंध उठविल्यास ते चांगले होईल. (केवळ दुसरी घटनादुरुस्ती पुरेशी नाही.)

'न'वी बाजू Sat, 24/01/2026 - 11:13

In reply to by सई केसकर

पण आपल्या देशाची ओळख अशी ग्रील करून खायची म्हणजे काय!!

ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. उदाहरणादाखल, कंबोडिया हा देश आपला हिंदू सांस्कृतिक वारसा अभिमानाने मिरवितो. इतका, की तेथील सर्वाधिक लोकप्रिय बियरचा ब्राण्ड ‘हनुमान’ हा आहे.

नाहीतर आमचा (भूतपूर्व) देश! आम्हीदेखील मारे हिंदुत्वाचा, हिंदू वारश्याचा अभिमान बाळगण्याचा दावा करतो. आमच्याकडे कधी कोणी ‘हनुमान’ नावाची बियर काढली असती, तर काय झाले असते?

असो चालायचेच.

शांततावादी हत्ती Sat, 24/01/2026 - 11:42

In reply to by सई केसकर

याविषयी बोत्सवानामध्ये वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी काहीतरी करावे ही आग्रहाची विनंती.

सई केसकर Sun, 25/01/2026 - 06:14

https://pudhari.news/goa/onkar-elephant-tilari-herd-leadership-mk94

>>या काळात तो नेतृत्वाची धुरा आपल्याकडे घ्यायला शिकला आहे. कळपात राहन त्याने गणेश हत्ती आणि आईकडून नेतृत्व कौशल्य शिकले असावे.

ही बातमी एका ओंकार नावाच्या हत्तीची आहे. बरेच दिवस एकटा फिरला आणि आता कळपात गेला. आणि मुख्य म्हणजे नेतृत्व कौशल्य तो आईकडून शिकतो आहे. याचा मला फार आनंद झाला.
पूर्वी कुठेतरी वाचलं होतं की हत्ती मुळातच स्त्रीसत्ताक असतात. छोट्या पिल्लांची काळजी आया, आज्या, मावश्या घेतात.

गोगोल Sun, 25/01/2026 - 07:14

आऊट ऑफ द लूप .. कोणी तसदी घेऊन सांगेल का?
(ज्यांच्या नावात हत्ती नाही अस कोणीतरी)

जाता जाता: हत्ती हा आमचा प्रिय प्राणी

सई केसकर Sun, 25/01/2026 - 07:50

In reply to by गोगोल

पूर्वी खरडफळा नावाचं एक प्रकरण होतं ऐसीवर. तिथे सगळे येऊन काहीही रँडम गप्पा मारायचे. त्यात हे हत्तीही असत. आता नव्या द्रुपाल प्रणालीत खरडफळा करता आला नाही. म्हणून तसा एक धागा काढला आणि हत्तींची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांच्यासाठी हा वेगळा धागा काढला. पण सध्या मी आणि इतर काही लोक इथेच पडीक असतो. तुम्हाला हत्ती आवडत असतील तर तुमचेही स्वागत आहे.

सई केसकर Mon, 26/01/2026 - 08:01

https://www.deccanherald.com/india/kerala/kerala-temple-gets-life-size-…

सोनाक्षी सिन्हा आणि पेटा यांनी मिळून एका मंदिराला एक मेकॅनिकल हत्ती दिला आहे. जेणेकरून त्या मंदिराने खरा हत्ती पाळू नये.
पण मुळात ही प्रथाच बंद करावी. रोबोट हत्ती कशाला तयार करायचे? नाहीतर एक दिवस त्या रोबोट हत्तीच्या मदरबॉर्डमध्ये काहीतरी लोच्या व्हायचा आणि तो खऱ्या हत्तीपेक्षा जास्त धुमाकुळ घालायचा.
आठवा: तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट.

शांततावादी हत्ती Mon, 26/01/2026 - 10:06

In reply to by सई केसकर

नाहीतर एक दिवस त्या रोबोट हत्तीच्या मदरबॉर्डमध्ये काहीतरी लोच्या व्हायचा आणि तो खऱ्या हत्तीपेक्षा जास्त धुमाकुळ घालायचा.

इथे मनुष्यरूपातील हत्तीच इतका धुमाकूळ घालत असेल तर मदरबोर्डमध्ये लोच्या झाल्यावर मेकॅनिकल हत्ती किती धुमाकूळ घालू शकेल याची कल्पना करता येते.

 

शांततावादी हत्ती Mon, 26/01/2026 - 10:10

मारूती म्हटले की सगळ्यांना पहिल्यांदा मारूती गाडी डोळ्यासमोर येते आणि मग आलाच तर हनुमान. त्याच धर्तीवर एक गोष्ट नक्की सांगतो की ऐसीकरांना हत्ती हा शब्द ऐकला की पहिल्यांदा आमचा हत्ती परिवार आठवेल आणि मग हत्ती हा प्राणी.

प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.

शांततावादी हत्ती Fri, 30/01/2026 - 11:33

चित्रकार अमृता शेरगिल (१९१३), 

बुद्धिबळपटू बोरिस स्पास्की (१९३७)

विनम्र अभिवादन

सई केसकर Fri, 30/01/2026 - 14:21

https://www.google.com/amp/s/assamtribune.com/amp/assam/humanelephant-c…

काय आयरनी आहे!
एक दिवस एआयदेखील माणसाला असेच मोडून टाकणार आहे.
कदाचित हे हत्ती नास्तिक असतील.
किंवा त्यांच्या कुण्या पूर्वजाचे डोके उडवले म्हणूनही असेल.

ता. क. खरंतर गणपती आणि हत्तीची तुलना करताना गणपती हतॉइड आहे. त्यामुळे इथे हत्ती माणसाच्या रूपात समजावा का? म्हणजे पुढे मागे माणूसच वैतागून एआय उध्वस्त करेल का? तीही शक्यता नाकारता येत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/02/2026 - 05:14

In reply to by सई केसकर

हे कुठून सापडतं तुम्हाला? मी मुद्दाम बघितलं की ही हिंदूची साईट नाही, आणि हत्तीचं नाव अरिकोंबनही नाही.

सध्या अरुंधती रॉयची 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' वाचत आहे. त्यातही दोन हत्ती आहेत. तेही अरिकोंबन नाहीत.

शांततावादी हत्ती Sat, 31/01/2026 - 18:43

आज माझ्या माहितीतील कोणाही मोठ्या व्यक्तीची जयंती/पुण्यतिथी नसल्याने आज कोणालाही विनम्र अभिवादन नाही.

शांततावादी हत्ती Sun, 01/02/2026 - 08:15

कवी राजा बढे (१९१२), अभिनेता ए. के. हंगल (१९१७),नाटककार मो. ग. रांगणेकर (१९९५)

 

विनम्र अभिवादन

शांततावादी हत्ती Tue, 03/02/2026 - 08:30

काल रात्री भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील झाले. त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. डोनाल्ड ट्रम्प हे नाव उच्चारले तरी नकळतपणे डोळ्यासमोर एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.

डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना हत्तीशी करणे ही एक रूपकात्मक आणि विचारप्रवर्तक कल्पना आहे. हत्ती हा आकाराने भव्य, शक्तिशाली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा प्राणी आहे. जिथे हत्ती जातो तिथे त्याची उपस्थिती नजरेत भरते—अगदी तसंच ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आहे. ते जिथे बोलतात किंवा वावरतात, तिथे माध्यमांचं आणि लोकांचं लक्ष आपोआप केंद्रीत होतं.

हत्तीची स्मरणशक्ती प्रचंड असते, असं म्हणतात. ट्रम्प देखील त्यांच्या जुन्या विधानांचा, राजकीय संघर्षांचा आणि प्रतिस्पर्ध्यांचा उल्लेख वारंवार करतात. ते गोष्टी विसरत नाहीत, तर त्यांचा उपयोग योग्य वेळी करतात. हत्ती जसा सरळ मार्गाने चालतो आणि अडथळे आले तरी थांबत नाही, तसंच ट्रम्पही टीका, वाद किंवा विरोध यांना फारसं महत्त्व न देता आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात.

हत्ती कधी कधी अनपेक्षितपणे धुमाकूळ घालू शकतो—त्याचप्रमाणे ट्रम्प यांची वक्तव्ये अनेकदा वादग्रस्त, धक्कादायक आणि गोंधळ निर्माण करणारी ठरतात. मात्र हत्तीला सांभाळणारा महावत जसा दिशा देतो, तशीच लोकशाही, संस्था आणि कायदे ट्रम्पसारख्या नेत्यांना मर्यादा घालतात.

एकूणच, हत्तीप्रमाणेच ट्रम्प हे सामर्थ्यवान, लक्षवेधी, कधी शांत तर कधी वादळ निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पाहता येतात.

शांततावादी हत्ती Wed, 04/02/2026 - 19:59

१६७० : कोंडाणा किल्ला जिंकला; तानाजी मालुसरे धारातीर्थी

विनम्र अभिवादन 

सई केसकर Thu, 05/02/2026 - 16:06

https://edition.cnn.com/2026/02/04/us/baby-elephant-smithsonians-nation…

तुमच्या डीसीमध्ये (जिथे खुद्द ऐसीचे चालक मालक राहतात) २५ वर्षांनी आशियाई हत्तींना बाळ झालं आहे!
या निमित्ताने डीसीच्या आसपास राहणाऱ्या ऐसीकरांनी बाळंतविडा घेऊन जाणे नक्कीच अपेक्षित आहे. मुख्य म्हणजे हे हत्तीदेखील आशियातून उत्तर अमेरिकेत गेले आहेत. आपल्या घरापासून दूर आहेत त्यामुळे त्यांना सहकार्य करावे. धुरी कशी द्यायची, घुटी कशी करायची, दुपटी कशी स्वच्छ उन्हात वाळत घालायची हे ट्रेनिंग नवमातेला देणे अपेक्षित आहे. कारण ती अवघी १२ वर्षांची आणि तिचा थोराड नवरा ४४ वर्षांचा.

'न'वी बाजू Thu, 05/02/2026 - 16:29

In reply to by सई केसकर

कारण ती अवघी १२ वर्षांची आणि तिचा थोराड नवरा ४४ वर्षांचा.

संगीत शारदा, हत्ती आवृत्ती?

बाकी,

२५ वर्षांनी आशियाई हत्तींना बाळ झालं आहे!

आणि,

ती अवघी १२ वर्षांची

हिशेब समजला नाही. तिने उणे १३ वर्षांची असल्यापासून प्रयत्न सुरु केले होते काय?

सई केसकर Fri, 06/02/2026 - 05:31

In reply to by 'न'वी बाजू

संगीत शारदा मध्ये काय पाऊणशे वर्षांचा व्हर्जिन असतो का नवरा? त्याचप्रमाणे या ४४ वर्षांच्या नवपित्याने आधी दोन ठिकाणी प्रयत्न केले होते. पण ती अपत्य जगली नाहीत.
मी एवढ्या हौसेने बातम्या आणते. कुणी पूर्ण वाचतही नाही. :(

शांततावादी हत्ती Fri, 06/02/2026 - 08:20

In reply to by सई केसकर

त्याचप्रमाणे या ४४ वर्षांच्या नवपित्याने आधी दोन ठिकाणी प्रयत्न केले होते. पण ती अपत्य जगली नाहीत.

अरेरे

शांततावादी हत्ती Wed, 11/02/2026 - 13:32

एकेकाळी आमच्याविषयी अतीव आत्मीयता असलेल्या अबापटांच्या अंतकरणात आता आमच्याविषयी अकारण आत्यंतिक आकस आहे असा आमचा अदमास आहे.

शांततावादी हत्ती Tue, 17/02/2026 - 14:19

In reply to by शांततावादी हत्ती

एकेकाळी आमच्याविषयी अतीव आत्मीयता असलेल्या अबापटांच्या अंतकरणात आता आमच्याविषयी अकारण आत्यंतिक आकस आहे असा आमचा अदमास आहे. असे असतानाही आमच्या अंत:करणात अबापटांविषयी अपार आदरच आहे आणि असेल असे आमच्याकडून आश्वासन आहे.

गोगोल Thu, 12/02/2026 - 03:19

खरंतर एका संस्थळावरील धुणी दुसरी कडे धुवू नयेत. परंतु मिसळपाव वरील श्री जयंत नारळीकरांबद्दल अत्यंत अपमानास्पद लेख वाचनात आला आणि बरेच दिवस प्रयत्न करूनही मनातून तो विचार जाईना. मिसळपाववर सदस्यत्व तर घेता येत नाहीये आणि असे दिसत आहे की २०२४ पासून तो प्रॉब्लेम काही फिक्स नाही केलेला गेला आणि नजीकच्या भविष्यातही तो फिक्स केला जाणार नाही. त्यामुळे इथे लिहून व्यक्त होत आहे. जर आक्षेपार्यह वाटलं तर उडवून लावलं तरी चालेल. पण जर कुणी तिकडे हे कॉपी पेस्ट केला तर सदैव ऋणी राहीन

-------

ओरिजिनल लेख: https://misalpav.com/node/53497

सोर्स: https://misalpav.com/node/53497

हे जे तुम्ही लिहिलं आहे ते अत्यंत चुकीचे आहे. मी खरतर असल्या भानगडीत पडत नाही परंतु नारळीकरांबद्दल असलेला नितांत आदर असल्यामुळे मी हे लिहायचे ठरवले. हा लेख वाचून हे सिद्ध होते की तुम्ही तृतीय पंथी आहात. का ते समजावून सांगतो.

प्रथम पंथीय लोक स्वतः चे ओरिजिनल सिद्धांत किंवा मते मांडतात. ते करत असताना ज्याला आपण शुद्ध मराठी मध्ये "पुटींग युअर नेक ऑन द लाईन" करतात कारण की त्यांचे स्वतःचे रेप्युटेशन धोक्यात असते कारण की फालतू माणस त्यांना जज करू शकतात. पण स्वत: वरचा आत्मविश्वास आणि अंगातली धमक असल्यामुळे ते ही रिस्क घ्यायला तयार होतात. नारळीकर यांच्या सारखी माणसे त्यात मोडतात

द्वितीय पंथी लोक प्रथम पंथीय लोकांच्या थियरीज वाचून त्यांना त्याची जी काही समाज असते त्याप्रमाणे मते बनवतात आणि त्यांची स्तुती किंवा निंदा नालस्ती करतात. जसे की तुमच्या त्या पार्टीतील लोक.

तृतीय पंथी लोकांना ना प्रथम पंथीय लोकांच्या थियरीज कळतात ना त्यांना खऱ्या विषयात काहीही स्वारस्य असते. ते द्वितीय पंथी लोकांच्या मतांवरून प्रथम पंथीय लोकांच्या बद्दल आपली मते बनवतात ("त्या दिवशी त्या पार्टीत मला नारळीकरांची जी ’टवाळी’ बघायला मिळाली त्यानंतर नारळीकरांची माझ्या मनातली प्रतिमा खाड्‍कन उतरली.").

आता प्रा. गोविंद स्वरूप सारखे लोक त्या टवाळीपासुन अलिप्त का होते ते समजावून सांगतो. कारण की त्यांना "सायंटिफिक मेथड" काय असते ते पूर्णपणे कळालेलं असत. ते कस ते सांगायच्या अगोदर मी माझे क्रेडेनश्यल सांगतो. आणि ते सांगायच्या आधी हे ही सांगतो की या असल्या क्रेडेनश्यलनसी काहीही फरक पडत नसतो किंवा पडू नये. पण तुम्हाला जिथे तिथे आय आय टी किंवा बर्कले यांची नावे फेकायची सवय आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक पडतो (सोर्स: https://www.misalpav.com/node/53013 "ज्यांना बर्कलेचे विद्वान ही काय चीज असते हे माहित नाही त्यांना सध्या पर्प्लेक्सीटीच्या अरविंद श्रीनिवासनचे उदाहरण अत्यंत उत्तम आहे."). तर मी आय आय टी गेलो नसलो तरी अमेरिकेतल्या अत्यंत ख्यातनाम विद्यापीठातून पी एच डी केलेली आहे. जरी माझं कार्य अरविंद श्रीनिवासन सारख मोठं नसलं (अजून तरी, प्रयत्न सुरु आहेत ;)), तरी मला निदान रिसर्च कसा होतो याची थोडी बहुत कल्पना आहे.

जेव्हा पी एच डी प्रदान केली जाते तेव्हा याची शाश्वती नसते की भविष्यात नवीन माहिती मिळून प्रबंधात लिहिलेला रिसर्च खोटा ठरू शकत नाही. तर तो रिसर्च त्यावेळी उपलबध्द असलेल्या माहिती प्रमाणे किती युनिक आणि सुसंगत आहे हे तपासले जाते. त्याशिवाय प्रबंधाचा आउटपुट फक्त एक खरा किंवा खोटा रिसर्च एव्हढाच नसून तो लॉजिकली प्रूव्ह करण्यासाठी अनेक टूल्स निर्माण केली जातात (जसे की नवे अल्गोरिथम्स किंवा मॅथेमॅटिकल ऑब्जेक्टस etc). तो रिसर्च जरी भविष्यात खोटा ठरला तरी ती टूल्स पुन्हा पुन्हा वापरता येतात. किंबहुना त्या टूल्स मध्येच नवीन मिळालेली माहिती घालून नवीन निष्कर्ष काढता येतात (बेजियन थिंकिंग).

हॉईल-नारळीकर स्टेडी स्टेट थेअरी १९६४ मध्ये मांडली गेली. त्यांनतर साधारण पणे १-२ वर्षांनी कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड चा शोध लागला. आणि नंतर स्टीफन हॉकिंग सारख्या नामवंताने टी थेअरी डिस्प्रूव्ह केली. परंतु तोपर्यन्त खुद्द रिचर्ड फाइनमन आणि आईन्स्टाईन सारखे नामवंत शास्त्रज्ञ देखील या थियरीच्या सुसंगती बद्दल शंका घेत नव्हते (सोर्स: https://en.wikipedia.org/wiki/Hoyle%E2%80%93Narlikar_theory_of_gravity).

सायन्स मध्ये बरेचदा अशा थियरीज येतात आणि जातात. आपण शाळेत जे सूर्य मालिके सारखे बोहर चे ऍटोमिक मॉडेल शिकतो ते सर्व साफ चुकिचे आहे. तीच गोष्ट क्वांटम मेकॅनिक्स ला लागू होते. असे असून सुद्धा का शिकवले जातात? त्याची बरीच कारणे आहेत.

स्टेडी स्टेट थेअरी जरी चुकीची असली तरी ती वापरून हॉईल यांनी स्टार्स मध्ये हेवी एलेमेंट्स कसे तयार होतात हे सिद्ध केले आणि ते मॅथ्स अजूनही वापरले जाते. स्टेडी स्टेट थेअरी ची कंपेटिशन म्हणून आता सर्वत्र मान्य पावलेली बिग बँग थेअरी मध्ये दिखील वैश्विक एक्स्पान्शन रेट जो महत्वाचा समजला जातो त्यात आत्ता आताशा नवीन इंकान्सीस्टन्सीज निर्माण झाल्या आहेत. कुणी सांगावं की उद्या असा लक्षात आल की एक्स्पान्शन कदाचित फक्त ऑबजर्वेबल युनिव्हर्स मध्येच आहे आणि बिग बँग थेअरी निकालात लागून पुन्हा स्टेडी स्टेट थेअरी "इन वोग" यावी?

त्यामुळे "त्या टवाळीचे कारण नंतर लक्षात आले - त्या सुमारास नारळीकरांच्या steady state theory चे जागतिक पातळीवर थडगे बांधले गेले होते (अथवा सुरुवात झाली होती)" म्हणणे म्हणजे "त्या सुमारास रोहित शर्मा ने सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड्स तोडल्यामुळे त्याच्या रेकॉर्डस् चे जागतिक पातळीवर थडगे बांधले गेले होते" म्हणण्यासारखे आहे.

>> खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले
हे सिद्ध करते की तो माणूस किती महान होता की तो ज्या संस्थेचा प्रमुख आहे तिथे सुद्धा त्यांनी कुठल्याही संशोधकावर त्यांच्या थेअरी वर काम करायला भाग नाही पाडले.

या सर्व गोष्टींमुळे आणि ते मांडण्याच्या पद्धती मुळे तुमच्या कडे पी एच डी पात्रता आणि कुवत दोन्ही नसल्याचे साफ दिसून येत आहे. "भटकरांनी पाळलेले एक मांजरानी" जरी तुम्हाला तो चान्स दिला तरी सायन्स च्या भल्यासाठी तुम्ही तो सोडलात हे योग्यच केलेत. नाहीतर तुम्ही तिथे सुद्धा इगो मध्ये आणून डिग्री किंवा कॉलेज असल्या फालतू गोष्टींनाच ज्यास्त महत्व दिले असते. त्या बद्दल धन्यवाद कारण तुम्हाला पी एच डी करण्याचे खरे कारण कळलेच नाहीये. तुमचे "रखडवलेले प्रमोशन" का रखडवल गेले ते ही कळून येतेच आहे.

तुमच्या भाग्यानी तुम्हाला प्रा. श्रीराम अभ्यंकरांशी भेटायचा मौका मिळाला परंतु त्यांनी तुम्हाला जी विचार करायची पद्दत शिकवली ती तुम्हाला नीट आत्मसात नाही करता आली हे सखेद नमूद करू इच्छितो (सोर्स: https://misalpav.com/node/53491). तुमची जी नारळीकरांबद्दल जळजळ आहे, ती कदाचित ते स्वतः त्यांच्या प्युअर गणितातील प्रभुत्वाने असल्याचा मला दाट संशय आहे कारण की तो मनुष्य स्वतः सिनियर रँग्लर होता (सोर्स: https://en.wikipedia.org/wiki/Jayant_Narlikar, सोर्स: https://misalpav.com/node/53491 "तेव्हा शुद्ध गणितात चमकणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांबद्दल माझ्या मनात एक असूया निर्माण झाली होती.").

मला स्वतःला या सर्व गोष्टींमध्ये पडायच पण नव्हतं. गणित आणि astrophysics हे काही माझे विषय पण नाहीत. त्यामुळे इथे मांडले गेलेले विचार कदाचित पूर्णपणे चुकिचे देखील असतील. त्याचा दोष सर्वस्वी माझा आणि माझ्या इंटरप्रिटेशन चा आहे.

मी नारळीकरांना कधी भेटलो पण नाहीये. पण या सर्व गोष्टींची चीड यायचे कारण म्हणजे नारळीकरांची अनेक साय फाय पुस्तके पुन्हा पुन्हा वाचून मी मोठा झालो आणि मला विज्ञानाची गोडी लागली. ज्याला तुम्ही "विज्ञानप्रचाराच्या नावाखाली स्वत:ला प्रसिध्दीच्या झोतात ठेवुन परीकथा पाडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ वेगळे आणि विचारशक्ती फुलवुन भयगंड घालवणारे प्रा. अभ्यंकर निराळे" म्हणून निकालात लावता. विशेषतः त्यांची "गंगाधर पंतांचे पानिपत" ही कथा तर ऑल टाइम फेव्हरेट आहे आणि तिची शेकडो वेळा पारायणे करून मित्रांशी मोबियस स्ट्रीप वॉर घातलेला वाद अजूनही आठवतो.

आकाशावर थुंकल्याने फक्त आपणच खराब होतो. जाता जाता एक अन सॉलिसीटेड एडवाईज: तुमच्या मनात एकूणच खूप विखार भरलेला आहे आणि तुम्ही खूप फ्रस्ट्रेटेटेड आहात आणि त्यामुळे आयुष्यात प्रत्येक गोष्टींकडे काळ्या किंवा पांढऱ्या भिंगातून बघायची सवय लागलेली दिसते. कधीतरी पन्नास एक करड्या रंगाची भिंगे वापरून बघा, कदाचित "फ्रस्ट्रेशन" कमी होइल ;)

'न'वी बाजू Thu, 12/02/2026 - 07:00

In reply to by गोगोल

म्हणजे, असे पाहा. नारळीकर आता हयात नाहीत. त्यामुळे, त्यांच्याबद्दल आता कोणीही काहीही (वाईट, किंवा चांगलेसुद्धा) जरी बरळले, तरी त्यामुळे त्यांना व्यक्तिशः आता काहीही फरक पडू नये, नव्हे काय?

बरे, असाही विचार करून पाहा. समजा, (म्हणजे, मराठीत ज्याला आपण ‘फॉर द सेक ऑफ द आर्ग्युमेंट’ म्हणतो, तद्वत) नारळीकर आज हयात जरी असते, तरीसुद्धा, कोठल्यातरी मराठी संकेतस्थळावर (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, अगदी ‘ऐसीअक्षरे’वरसुद्धा!) कोणीतरी त्यांच्याबद्दल काही बरेवाईट बरळले (किंवा अगदी त्यांची स्तुतीसुद्धा जरी केली, तरीही), म्हणून स्वतः नारळीकर (सगळे कामधंदे सोडून) इथे आपला बचाव मांडीत बसण्याच्या (किंवा, स्तुतीच्या बाबतीत, लगेच इथे येऊन आभारप्रदर्शन करण्याच्या) भानगडीत पडले असते काय?

मग, खुद्द नारळीकरांना जेथे काही पडलेली नाही/नव्हती (किंवा — नारळीकरांना स्वतःचे असे काही स्टेचर होते/आहे, हे गृहीत धरून — काही पडलेली असण्याचे काही कारण नसावे), तेथे, त्यांचे अनाहूत मरणोत्तर वकीलपत्र घेण्यात नक्की काय हशील आहे?

(हं, भक्तांच्या भावना दुखावतात. (येथे ‘भक्त’ हा शब्द कोठल्याही नकारात्मक अर्थाने वापरण्याचा इरादा नाही.) ते अगदी साहजिक आहे — ती स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया आहे. परंतु… त्याची खरोखरच काही गरज आहे काय?)

बाकी, (ॲनालॉजी अगदी अचूक नाही, हे आगाऊ मान्य करून) ताजमहालाची वासलात ‘तेजोमहालय’ म्हणून लावणारे विद्वान असतात. ताजमहालाच्या अंगभूत गुणधर्मांत त्याने काही फरक पडतो काय? मग, ताजमहालासमोर सेल्फ्या काढण्यासाठी (खिशातले पैसे — रुपये/डॉलर/युरो — खर्च करून) रांगा लावणाऱ्या टूरिष्टांच्या अंगाला त्याने भोके का पडावीत? (तशीही, पडतात काय?) (हं, अगदीच ‘एक धक्का और दो’ वगैरे जोवर होत नाही, तोपर्यंत… परंतु, ते जाऊ द्या. तसेही, नारळीकरांच्या बाबतीत तितकीही परिस्थिती ओढवली आहे, असे वाटत नाही. आणि, अगदी ओढवली, तरीसुद्धा, अगोदर म्हटल्याप्रमाणे, खुद्द नारळीकरांना त्याने आजमितीस काहीही फरक पडत नाही, आणि बहुधा त्यांच्या हयातीतही पडला नसता. त्यामुळे, (मराठीत म्हणतात, त्याप्रमाणे) व्हाय बॉदर?)

बाकी, मत आणि ढुंगण प्रत्येकालाच असते. तद्वत, नारळीकरांवर ताशेरे ओढणाऱ्या त्या लेखकाने त्याचे जाहीर प्रदर्शन केले. (कोणास ठाऊक, कदाचित रक्तवर्ण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असेलही, वा नसेलही.) परंतु, त्याने आपल्याचे (जाहीर!) प्रदर्शन केले, म्हणून लगेच तुम्हीसुद्धा लगेच आपले काढून दाखवण्याची काही गरज आहेच काय? (भले ते पूर्णपणे तुमच्या अधिकारांत असले — आणि सुस्थानीही जरी असले — तरीही?)

सोडून द्या ना, राव!


(टीप: वरील सर्व विवेचनात, खुद्द नारळीकरांबद्दल अथवा त्यांच्या कार्याबद्दल कोठलेही (चांगले अथवा वाईट) मत मांडलेले नाही; मांडण्याचा हेतूही नाही. नारळीकरांच्या कार्यक्षेत्रासंबंधी मला शून्य गती असल्याकारणाने, ते स्वातंत्र्य मी घेणे उचित ठरणार नाही. (आणि, तसाही, येथे तो मुद्दाही नाही.) बाकी, नारळीकरांविषयी मला (मराठीत म्हणतात, त्याप्रमाणे, ‘बाय डीफॉल्ट’) आदर आहे, परंतु, दुर्दैवाने, तो आदर (१) पारंपरिक आहे, तथा (२) अज्ञानातून उद्भवलेला आहे, हे खेदपूर्वक मान्य करणे येथे प्राप्त ठरते. असो चालायचेच.)

गोगोल Thu, 12/02/2026 - 07:39

In reply to by 'न'वी बाजू

हम्म खरंय तुम्ही म्हणता ते ..

>> बरेच दिवस प्रयत्न करूनही मनातून तो विचार जाईना

प्रयत्न खरंच केला होता पण गोष्ट मनात कुठेतरी रुतून बसली. पण अजून तुमच्या इतकी स्थितप्रद्न्यता नाही आली :(

>> तेथे, त्यांचे अनाहूत मरणोत्तर वकीलपत्र घेण्यात नक्की काय हशील आहे?

मुद्दा तो नाही. नारळीकरांना मी डिफेन्ड करायची गरज नाही. पण इतर लोक ते वाचून आपली मन कलुषित करून घेतात. आल्रेडी तिथे सपोर्टिव्ह प्रतिक्रिया आल्या आहेत.

काळ मेल्याचे दुःख नाही पण म्हातारी सोकावतेय त्याचे काय? ;)

बाकी आम्ही कुणाचेच भक्त नाही. आणि आता इंग्लिश मधील अनेक साय फाय दिग्गज लेखकांची पुस्तकी वाचल्यावर त्यांच्या लिखाणातील त्रुटी देखील जाणवतात. पण एके काळी त्यांचे लिखाण वाचून भारावून गेल्याचे आठवत आहे.

'न'वी बाजू Thu, 12/02/2026 - 07:52

In reply to by गोगोल

बाकी, एका मराठी संकेतस्थळावर कोणीतरी नारळीकरांना शिव्या घालणे, आणि, दुसऱ्या मराठी संकेतस्थळावरून कोणीतरी त्याचा प्रतिवाद करणे (आणि — मराठीत म्हणतात, त्याप्रमाणे — सो ऑन अँड सो फोर्थ) यातून एक गोष्ट अवश्य साध्य होते. ती म्हणजे, दोन्हीं संकेतस्थळांचा टीआरपी वाढतो. (आणि, भले नारळीकरांना जरी नसली, तरीही, मराठी संकेतस्थळांना टीआरपीची गरज सदैव असतेच.)

त्यामुळे, (एका किंवा दोन्हीं) संकेतस्थळा(/ळां)चा टीआरपी वाढवणे हा(च) जर उद्देश असेल, तर अवश्य चालू द्या. फक्त, (जमले तर) प्लीज ट्राय नॉट टू ब्रिंग नारळीकर इंटू इट, इतकीच (मराठीतून) कळकळीची विनंती. (अंधभक्ताची समजा, हवे तर. (भले नसलो, तरीही.))

बाकी चालू द्या.

गोगोल Thu, 12/02/2026 - 08:02

In reply to by 'न'वी बाजू

>> त्यामुळे, (एका किंवा दोन्हीं) संकेतस्थळा(/ळां)चा टीआरपी वाढवणे हा(च) जर उद्देश असेल, तर अवश्य चालू द्या. फक्त, (जमले तर) प्लीज ट्राय नॉट टू ब्रिंग नारळीकर इंटू इट, इतकीच (मराठीतून) कळकळीची विनंती.

अय्या तुम्हाला कस कळलं कि मी ऐसी च्या टीआरपी वाढवणे पे रोल वर आहे?
बरोब्बर तोच उद्देश आहे. बरोबर कळलं तुम्हाला.

अशा उद्दिष्टाचा आरोप आपल्यावर केलेला नाही, करण्याचा इरादाही नाही. फक्त, असा काही इरादा असला तर (आणि तरच) प्रतिवादाचा प्रयत्न मेक्स सेन्स, अन्यथा नाही, एवढेच (आडून) सुचविण्याचा हा प्रयत्न आहे, इतकेच.

बाकी,

अय्या तुम्हाला कस कळलं कि मी ऐसी च्या टीआरपी वाढवणे पे रोल वर आहे?

ऐसीच्याच कशावरून? 'त्या दुसर्‍या संकेतस्थळा'च्या ('अ‍ॅलो-वेबसाइट') कशावरून नव्हे? असाही प्रश्न येथे उगारता येईलच. (तसा तो उगारण्याचाही इरादा अर्थातच नाही.)

असो.

गोगोल Thu, 12/02/2026 - 23:07

In reply to by 'न'वी बाजू

तुमचा मोठा मुद्दा पोहोचला आणि तो पूर्णपणे मान्य आहे. या सगळ्यातून माझं ब्लड प्रेशर वाढण्यापलीकडे काहीही होणार नाही आणि अशा प्रकारची माणसं आपलं मन ही बदलणार नाहीत.

युज्वली अशा गोष्टी झाल्या की माझा हमखास रामबाण उपाय म्हणजे स्विमिन्ग पूल मध्ये ५०-६० राउंड्स मारायच्या, वजनं उचलायची असा असतो. या वेळेला तो ट्राय करूनही काही फरक नाही पडला. ही माझीच कमतरता म्हणायची. वर म्हणल्याप्रमाणे तुमच्या इतकी स्थितप्रद्न्यता अजून नाही आली. काम चालू आहे.

अशा वेळेला काळ ते व्हेंटिंग आउट केल्यावर शांत झोप लागली. मळभ निघून गेले आणि आभाळ स्वच्छ झालं.

इन जनरल, मला व्हिक्टिम हूड मेन्टॅलिटी ची भयंकर चीड आहे. स्वतः वर पण राग येतो जेव्हा जेव्हा मी स्वतः ला असं करताना पकडतो. दबंग च्या चालीवर "मै खुद्द को नही बक्षता तो तू क्या चीझ है". माझ्या स्वतः च्या लाईफ मध्ये पण जी काही फक अप्स झाली त्याला मी स्वतः च जबाबदार आहे असं मानतो. जे झालं ते झालं, यातनं मी काय शिकलो आणि पुढं मी अस माझ्याबाबतीत कसं नाही होऊन देणार त्याचे फक्त मनाशी धडे घेतो. पण अजून ते पूर्णपणे जमत नाही.

एक प्रकारे टफ लव्ह चा भाग म्हणा कारण की सदर मनुष्य अगदीच मूर्ख असावा असे तर वाटत नाही. पण हे ही माहिती आहे की या सगळ्या तून हाती काहीच नाही लागणार.

मेल्यांचा जित्या खोड्या काढल्याशिवाय राहत नाही (अजून तरी ;))

सई केसकर Fri, 13/02/2026 - 06:10

In reply to by गोगोल

तुम्हाला इतकं तळमळीने वाटतं म्हणून सांगावं असं वाटलं. नारळीकर माझे मावस मामा. त्यांची बायको मंगला आणि मी फारच क्लोज होतो. आईनंतर मला कुणी त्याच प्रेमाने वागवलं असेल तर ते मंगलामामीने.

फार जवळून बघितल्यावर सगळ्यांचंच काही ना काही आपल्याला आवडत नाही. तसंही झालं. पण मंगला आणि जयंत नारळीकर माझ्या आयुष्यात नसते तर माझी मानसिक बैठक (आहे त्यापेक्षा अधिक) बिघडली असती.
लहानपणी मी आयुकामध्ये मामीकडून गणित शिकायला जायचे. तिच्यामुळे मला त्या काळात गणित जसं समजलं तसं आधी कधीच समजलं नव्हतं.
जयंतमामाने आयुकामधलं वातावरण बऱ्यापैकी पारदर्शक आणि स्वच्छ ठेवलं. त्यामुळे तिथे अनेक तरुण लोक येऊ लागले. शिवाय आयुकाने अनेक नवीन शास्त्रज्ञ निर्माण केले.
भारतात आढळणारी या क्षेत्रातील कंपूबाजी आणि चढाओढ यांपासून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना बरंच दूर ठेवलं होतं.

त्यामुळे असं काही लिहून आलं की मला काहीच वाटत नाही कारण मी त्यांना केवळ त्यांच्या विषयातले तज्ञ म्हणून बघितलेलं नाही. अशा गोष्टी सोडून द्यायच्या.
शंकर अभ्यंकरांनी चालू केलेल्या भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये सध्या माझा मुलगा जातो. तो पाचवीत आहे. पण तो ज्या उत्साहाने त्या वर्गाला जातो ते बघून ती संस्था चालू करणाऱ्या माणसाची चिकित्सा करावी वाटतच नाही. उद्या माझा मुलगाही एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमधला एक छोटा खिळा होईल. पण त्यामुळे आज त्याला गणितातून जो आनंद मिळतो आहे तो निघून जाणार नाही.

मी पीएचडी करत असताना सेकंड जनरेशन बॉयोफुएलवर काम चालू होतं. ते तंत्रद्न्यान पुढे चालवणं अवघड आहे हे काम करतानाच लक्षात आलं होतं. म्हणून काही माझी पीएचडी वाया जात नाही. विज्ञान असंच पुढे जातं. अलीकडे कुण्या चिनी गटाने इन्स्टाइन आणि हायझेनबर्गची पार्टिकल आणि वेव्ह थियरी प्रत्यक्ष करून बघितली कारण आता तंत्रद्न्यान तितकं पुढे गेलं आहे. त्यात यांपैकी कुणाचंतरी म्हणणं सिद्ध झालं. पण म्हणून त्यातला एक जिंकला आणि एक हरला असं आपण म्हणू का?

गोगोल Fri, 13/02/2026 - 09:42

In reply to by सई केसकर

>> तुम्हाला इतकं तळमळीने वाटतं म्हणून सांगावं असं वाटलं. नारळीकर माझे मावस मामा.
>> त्यांची बायको मंगला आणि मी फारच क्लोज होतो. आईनंतर मला कुणी त्याच प्रेमाने
>> वागवलं असेल तर ते मंगलामामीने. फार जवळून बघितल्यावर सगळ्यांचंच काही ना काही
>> आपल्याला आवडत नाही. तसंही झालं. पण मंगला आणि जयंत नारळीकर माझ्या
>> आयुष्यात नसते तर माझी मानसिक बैठक (आहे त्यापेक्षा अधिक) बिघडली असती.
>> लहानपणी मी आयुकामध्ये मामीकडून गणित शिकायला जायचे. तिच्यामुळे मला त्या
>> काळात गणित जसं समजलं तसं आधी कधीच समजलं नव्हतं.

बाब्बो! विषयच संपला ना राव मग!
तुमचा हेवा वाटतो. तुमचं आयुष्य काय समृद्ध आहे. अगदी "उन्हाळ्याच्या सुट्टी" पासून आम्ही तुमचे पंखे.
एकतर दर वर्षागणिक प्रगल्भ होत जाणारी तुमची लेखणी आणि त्यात असले भारी अनुभवांचे ठेवे.
कशा कशा चा हेवा करावा??

आता ते हयात नाही म्हणून. नाहीतर त्यांना हा निरोप नक्की पाठवला असता कि:
एक मुलगा असा होता ज्याच्या मराठी शिक्षणामुळे इंग्लिश चा गंध नव्हता. त्यामुळे जगाचे दरवाजे पूर्णपणे बंद होते.
आजूबाजूचे कॉन्व्हेंट आणि ईंग्लिश मिडीयम चे लोक कसली कसली पुस्तक वाचून ज्ञान पदरी पाडून घेत होते.
अशावेळी त्यांच्या पुस्तकांनी ("यक्षांची देणगी", "प्रेषित", "वामन परत न आला") हे ज्ञान मराठीतून गोष्टी रूपात
आक्सेसिबल केले. महत्वाचे म्हणजे कुतूहल जागे केले. त्यावेळी घरी पैसे नसायचेच. अशावेळी पै पै साठवून, गुल्लक वगैरे
फोडून ही पुस्तके विकत घेतली. घरी एक डबडं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता जो त्याच्या मर्जीने चालायचा. आणि चालायचा
तेव्हा मुंग्याच दाखवायचा. अशावेळेला जेवताना "एंटरटेनमेंट" म्हणून त्यांच्या (आणि बोली भाषेतील पु ल ध्येसापांडे) यांच्याच
पुस्तांकांचे आलटून पालटून पारायणे करत होतो. आज त्याच जागे केलेल्या कुतुहलामुळे जगात कुठेतरी तरी पोहोचू शकलो.

>> शंकर अभ्यंकरांनी चालू केलेल्या भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये सध्या माझा मुलगा जातो.
>> तो पाचवीत आहे. पण तो ज्या उत्साहाने त्या वर्गाला जातो ते बघून ती संस्था चालू
>> करणाऱ्या माणसाची चिकित्सा करावी वाटतच नाही.

वाह! लक्की आहे तुमचा मुलगा. ऑलिम्पियाड साठी आतापासूनच शुभेच्छा

>> म्हणून काही माझी पीएचडी वाया जात नाही. विज्ञान असंच पुढे जातं.

अगदी अगदी! माझी पूर्ण पी एच डी तशी व्यर्थच.
पण एकाच गोष्ट छान शिकलो ती म्हणजे "शिकायचं कसं"?
जगातली कुठलीही गोष्ट वेळ पडली तर शिकू शकेन असा आत्मविश्वास दिला.

>> त्यात यांपैकी कुणाचंतरी म्हणणं सिद्ध झालं. पण म्हणून त्यातला
>> एक जिंकला आणि एक हरला असं आपण म्हणू का?

हे आणि असच म्हणायचं होत!

सई केसकर Fri, 13/02/2026 - 11:17

In reply to by गोगोल

>>एक मुलगा असा होता ज्याच्या मराठी शिक्षणामुळे इंग्लिश चा गंध नव्हता. त्यामुळे जगाचे दरवाजे पूर्णपणे बंद होते.
आजूबाजूचे कॉन्व्हेंट आणि ईंग्लिश मिडीयम चे लोक कसली कसली पुस्तक वाचून ज्ञान पदरी पाडून घेत होते.
अशावेळी त्यांच्या पुस्तकांनी ("यक्षांची देणगी", "प्रेषित", "वामन परत न आला") हे ज्ञान मराठीतून गोष्टी रूपात
आक्सेसिबल केले. महत्वाचे म्हणजे कुतूहल जागे केले.

हा निरोप मी त्यांच्याकडे अनेकदा पोहोचवला आहे. :)
ते घरी बोलतानाही पूर्णपणे मराठी नाहीतर इंग्रजी असं बोलायचे.

माझं लेखन तुम्हाला आवडतं हे ऐकून आनंद झाला. आभार!
उन्हाळ्याची सुट्टी वाचत होतात म्हणजे नक्कीच कुणीतरी जुने जाणते असणार! :)

शांततावादी हत्ती Thu, 12/02/2026 - 11:30

In reply to by गोगोल

परंतु मिसळपाव वरील श्री जयंत नारळीकरांबद्दल अत्यंत अपमानास्पद लेख वाचनात आला आणि बरेच दिवस प्रयत्न करूनही मनातून तो विचार जाईना. 

अशा लोकांना दिसेल तिथे पायदळी तुडवायचा पर्याय म्हणूनच नेहमी खुला ठेवावा.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/02/2026 - 07:44

मी एनसीआरएमध्ये पोस्टडॉक करत होते, तेव्हा गोविंद स्वरूप सेवानिवृत्त झाले होते; पण आठवड्यातून एक-दोनदा ते तिथे यायचे. तेव्हा आमची कधी भेट व्हायची. गोष्टीवेल्हाळ आणि गोड माणूस. 

(मिपावर ज्याला पुणे-टीआयएफआर म्हणत आहेत, त्या संस्थेचं नाव एनसीआरए - National Centre for Radio Astrophysics - असं आहे.)

गोविंद स्वरूप हे प्रामुख्यानं इंजिनियर होते. जीएमआरटी ही मोठी दुर्बीण बांधणाऱ्या लोकांतले ते प्रमुख. म्हणजे ते फक्त उत्तम इंजिनियरच नव्हते, तर चांगले मॅनेजर, ॲडमिनिस्ट्रेटरही असणार. एवढा मोठा प्रकल्प, तोही अनेक देशांतल्या लोकांच्या सहयोगानं पूर्ण करायचा तर फक्त उत्तम इंजिनियर असून भागत नाही.

नारळीकरांनी जो स्थिरस्थिती सिद्धांत मांडला तो आता फार कुणी मानत नाही; हे खरंच आहे. मिसळपाववरच्या लेखात सुचवल्यानुसार १९९०च्या दशकात नाही, तर कित्येक दशकं आधीच तो सिद्धांत मागे पडायला सुरुवात झाली होती. नारळीकरांनी तो मुळात मांडलेला नाहीच; त्यांनी त्यात भर घातली. बरं मग? सिद्धांत निराळा आणि वैज्ञानिक निराळा. 

मी एमेस्सीच्या पहिल्या वर्षाला असताना मुंबई विद्यापीठात नारळीकर विश्वरचनाशास्त्र शिकवायला आलेले होते; उदार मनानं त्यांची लेक्चरं ऐकण्याची परवानगी त्यांनी मला दिली होती. शिक्षक म्हणून मला ते फार आवडले नाहीत - कारण मला त्यातलं फार कळलं नाही. पण खूप तळमळीनं शिकवत होते, एवढं मात्र समजलं. नारळीकर हाही गोड माणूस.

गोविंद स्वरूप आणि नारळीकर यांचे अभ्यासाचे आणि कामाचे विषय पूर्णतया निराळे होते. मी खगोलशास्त्रापासून लांब जाण्याला आता १५ वर्षं होत आली. गोविंद स्वरूप आणि नारळीकर दोघेही आता हयात नाहीत. मी तोवर भारताबाहेर आणि खगोलशास्त्रापासूनही लांब असल्यामुळे माझ्या मनात ते दोघेही जिवंत आहेत. 


'न'बा, तुम्हाला (आणि मलाही) नारळीकरांच्या विषयाबद्दल आणि संशोधनाबद्दल भले फार समजत नसेल. त्यांनी खगोलशास्त्राबद्दल अललित आणि ललितलेखन केल्यामुळे अनेक लोकांपर्यंत ते पोहोचले; त्यातून खगोलशास्त्राबद्दल काही लोकांना आवड निर्माण झाली. हे समजण्यासाठी, आणि याबद्दल आदर बाळगण्यासाठी टेन्सर-मेकॅनिक्स समजण्याची काही गरज नाही.

शांततावादी हत्ती Thu, 12/02/2026 - 11:27

द्विशतक झळकाविण्याचा मान माझाच. मी कितीही शतके झळकावली तरी मी आहे एक हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

गोगोल Thu, 12/02/2026 - 23:11

In reply to by शांततावादी हत्ती

तू आपला एकदम फेवरीट आहेस.

एकदा मी खूप खूप श्रीमंत झालो, की मस्त पैकी एक प्राण्यांचे नंदनवन उघडणार. ज्यात हत्ती, वाघ, सिंह, गोरिल्ला पासून सर्व प्राणी असणार (फक्त होमो सेपियन्स नॉट अलाऊड)

तू तिकडे येऊन जे काही तुडवायचे ते तुडव .. फुल्ल लिबर्टी

शांततावादी हत्ती Mon, 16/02/2026 - 09:42

In reply to by गोगोल

आभारी आहे गोगोल.

फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा. हा अकाऊंट कोणी एक हत्ती वापरत नाही तर बरेच वापरतात त्यामुळे तू फेवरीट आहेस ऐवजी तुम्ही फेवरीट आहात असे अनेकवचनी म्हणा.
आणि आम्हाला हत्या म्हणू नका. कोणाची तरी हत्या झाल्यासारखे वाटते.त्यापेक्षा हत्ती असेच म्हणा.

सई केसकर Fri, 13/02/2026 - 12:14

https://www.popsci.com/environment/elephant-whiskers-smart/

जिथे मानवाच्या नाकातले केस काढून टाकायच्या नवनवीन कल्पना रीळकरांना सुचताहेत, तिथे हत्तीच्या नाकातल्या केसांवर एवढं संशोधन व्हावं हा मानवावर अन्याय आहे. मी जेव्हा सोशल मीडियावर होते तेव्हा एका रीळमध्ये एक बाई आईस्क्रीमच्या काडीवर गरम वॅक्स लावून ते एका पुरुषाच्या नाकात घालत होती. आणि मग खसकन काढून सर्वांना दाखवत होती. तो व्हिडीओ बघितला तेव्हा
१. आता पुरुषही कळ सोसून सुंदर दिसायचा प्रयत्न करतात याबद्दल समाधान वाटलं होतं.
२. हे मी का बघितलं याबद्दल अतीव संताप वाटला होता (कदाचित अशा काही रीळ बघितल्यानेच मी शेवटी सोमि सोडून दिला असावा).

'न'वी बाजू Fri, 13/02/2026 - 17:26

In reply to by सई केसकर

मी जेव्हा सोशल मीडियावर होते तेव्हा एका रीळमध्ये एक बाई आईस्क्रीमच्या काडीवर गरम वॅक्स लावून ते एका पुरुषाच्या नाकात घालत होती. आणि मग खसकन काढून सर्वांना दाखवत होती.

Thanks for letting me know. I desperately needed to know that.

You made my day!

(बाकी, तुम्ही सोमी (एकदाची) सोडलीत हे तुमचे नसून आमचे नशीब आहे. बोले तो, अजूनही तुम्ही ‘माझे सोमीवरचे दिवस’-छाप memoirs लिहू शकताच — तसे करण्यापासून तुम्हाला कोणीच अडविलेले नाही. परंतु, (नाही म्हटले, तरी) त्याला आता मर्यादा राहतील — गेला बाजार नवनवीन मटीरियल तरी मिळणार नाही. (हुश्श!))

सई केसकर Fri, 13/02/2026 - 17:53

In reply to by 'न'वी बाजू

बाकी तुमच्या उत्तरांत अचानक एम डॅश कसे काय येऊ लागले आहेत? मला वाटायचं की तुम्ही ब्रॅकेट पर्सन आहात.
माझ्याकडे सौंदर्यवर्धनाचे खूप किस्से आहेत. उदाहरणार्थ हल्ली बाजारात नेल आर्ट नावाचं काहीतरी आलं आहे. यात आपल्या नैसर्गिक नखांवर खोटी नखं लावतात. आणि ती भरपूर लांब असतात.
पूर्वी मधल्या सुट्टीत वर्गातलं एखादं मूल फळ्यावर नख घासून सगळ्यांना इरिटेट करायचं. तसंच आता अशी कुणी ललना दवाखान्यात किंवा इतर कुठे बसून तावातावाने WhatsApp करत असेल तेव्हा वाटतं. एकदम शहारे येतात अंगावर. आणि दुर्दैव असं की अशा बायकांना नेहमी कुणीतरी मेसेज पाठवत असतं.
अजून पण आहेत. पण एक एक करून सांगते. एकदम लोड नको.

'न'वी बाजू Mon, 16/02/2026 - 22:00

In reply to by सई केसकर

बाकी तुमच्या उत्तरांत अचानक एम डॅश कसे काय येऊ लागले आहेत?

आता यावरून, मी चॅटजीपीटी वापरून लिहू लागलो आहे (नपक्षी, मी एआय आहे) अशा कन्क्लूजनाप्रत पोहोचला नाहीत, म्हणजे मिळविली!

मला वाटायचं की तुम्ही ब्रॅकेट पर्सन आहात.

नाही, असेच काही नाही. वेगवेगळे प्रयोग करून पाहात असतो (नि आपलीच ष्टाइल सुधारून पाहात असतो), झाले.

बाकी, त्या एमडॅशमागे अंमळ इतिहास आहे. बोले तो, पूर्वी मी वापोवर पडीक असायचो. (म्हणजे, इथे कसा, वेगवेगळ्या पोष्टींवर अरबटचरबट कमेंटा पोष्टीत हिंडतो, तसा तिथल्या बातम्यांखाली पोष्टीत हिंडायचो. (वाचकांच्या कमेंट्स.) नंतर पुढे बेझॉसमामाने ट्रंपला आपली आई विकली, त्या भानगडीत एका रात्रीत लाखोंच्या संख्येने वर्गणीदारांनी वर्गणी रद्द करून वापोवरून वॉकआउट मारला, त्या लाखोंमध्ये मीही एक होतो. (तशी वापोच्या अधोगतीला सुरुवात त्याअगोदरच झाली होती म्हणा, परंतु ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती.) परंतु, ते एक असो.) तर त्या काळात (आणि त्यापूर्वीसुद्धा) मी (चारचौघांसारखा) हायफन वापरायचो. (म्हणजे, ब्रॅकेटा वापरीत नसे, तेव्हा.) तेव्हा दुसर्‍या एका कमेंटराने त्यावरून माझी शाळा घेतली होती, की एकदा एमडॅश नावाचा काही प्रकार असतो, तो कशाशी खातात, ते शिकून घे, म्हणून. (हो, अधूनमधून लोकसुद्धा माझी शाळा घेऊ शकतात! (आणि, अमेरिकेतसुद्धा पुणेरी खाक्याचे नग सापडतात!)) तेव्हापासून मग इमानेइतबारे एमडॅश वापरू लागलो.

दुसरे म्हणजे, आयफोनवरून टंकीत असतो, तेव्हा एमडॅश टंकणे सोपे आहे. विंडोजवरून (तुलनेने) महाकर्मकठीण!

असो चालायचेच.

सई केसकर Tue, 17/02/2026 - 07:33

In reply to by 'न'वी बाजू

Chat gpt तुमच्यापेक्षा खूप सेन्सिटिव्ह आहे. तो रोबोट असला तरीही. त्यामुळे तुम्ही जे काही लिहिता त्यावर आधी तो तुम्हाला सुधारायचा प्रयत्न करेल. हे मला कसं समजलं?
एकदा मी आणि नवरा आमच्या नेहमीच्या रेस्तराँमध्ये जेवायला गेलो होतो. कदाचित मागचा व्हॅलेंटाइन असावा कारण फुलंबिलं ठेवली होती टेबलवर. तर अशा वातावरणात एक नवीन मॅनेजर आमची ऑर्डर घ्यायला आला. तो हिंदी सिनेमातल्या एका चरित्र अभिनेत्यासारखा दिसत होता. पण मला त्या अभिनेत्याचं नाव किंवा त्याचा एकही सिनेमा आठवत नव्हता. असं झालं की खूप त्रास होऊ लागतो. आणि तसंही १० वर्षं संसार केल्यावर गुलुगुलु काय बोलणार एकमेकांशी?
तर नवरा एक एक नावं फेकू लागला माझ्या तोंडावर. आधी मला तो महाभारतातला कर्ण वाटला. पण नवऱ्याने तो रिजेक्ट केला.
मग मी विचार केला की चॅटजीपीटीला विचारावं वर्णन करून. याला नवऱ्याचा खूपच आक्षेप होता कारण त्याला ते कोडं स्वतः सोडवायचं होतं.
मग मी चॅट जीपीटीला
शॉर्ट, डार्क कॉम्प्लेक्शन, वेल बिल्ट आणि स्टॉकी अशी विशेषणे दिली. त्यावरून तो काहीही भलते सलते ऑप्शन देऊ लागला.
तोपर्यंत नवरा "हा का? तो का?" असं विचारून इरिटेट करतच होता.
मग मी त्यात अतिशय नाईलाजाने
"Looks a bit like an ape"
अशी भर घातली.

त्यावरून आधी मला २ परिच्छेदाचे लेक्चर मिळाले. की असं माणसाचे वर्णन करणं म्हणजे बॉडी शेमिंग आहे. आणि असं तू करू नयेस वगैरे. आणि पुढे या नवीन माहितीवर पुन्हा सहा सात नावं आली. पण तो मॅनेजर त्यांच्यापैकी कुणासारखाच दिसत नव्हता.

तोपर्यंत आमचा लग्नाचा चॅटजीपीटी गुलाममधला व्हिलन का? असं विचारू लागला. पण मी गुलाम सिनेमाच बघितला नव्हता. मग मला बऱ्याच वेळाने (पोटात दोन घोट दारू गेल्यावर) त्यानं एका प्रियदर्शनच्या सिनेमात बोबड्या माणसाचं काम केलं होतं हे आठवलं. त्यावरून जवळपास बसलेल्या सगळ्या माणसांना ऐकू जाईल अशा आवाजात नवरा "शरद सक्सेना" असं म्हणाला.
आणि त्यानं गुलाम मधला व्हिलन ही ओळख माहिती नाही आणि बोबडा ही आठवण आहे याबद्दल माझी पुन्हा लायकी काढली.
नंतर गुलाम सिनेमा बघायला बसवलं. पण बोअर आहे तो.
एकूण काय चॅटजीपिटीने, "मदत बिदत कुछ नाही लेक्चर दिया २ परिच्छेद" असं करून आपण किती निरुपयोगी आहोत हे सिद्ध केलं.

शांततावादी हत्ती Sat, 14/02/2026 - 00:01

समस्त हत्ती परिवाराकडून सगळ्यांना व्हॅलेन्टाईन दिवसाच्या शुभेच्छा. या निमित्ताने आज पायदळी तुडवायला विश्रांती दिली आहे. जर कोणा ऐसीकराने त्या दिवसावर एखादा लेख लिहिला तर स्थगिती आणखी एक दिवस वाढणार.

सई केसकर Sun, 15/02/2026 - 06:47

In reply to by शांततावादी हत्ती

https://indianexpress.com/article/india/panic-in-jharkhands-hazaribagh-…

तुम्ही जरी पायदळी तुडवण्यापासून ब्रेक घेतला असलात तरी तुमचे बांधव बहुधा व्हॅलेंटाइन दिवस मानत नाहीत! हत्तींच्या कळपाने ७ लोक मारले या अतिशय तरल प्रेमाच्या दिवशी.

बाकी हत्ती परिवारातील कपल कुठे गेली होती डेटला? की ऊसाचं शेत is the ideal place?

शांततावादी हत्ती Mon, 16/02/2026 - 09:39

In reply to by सई केसकर

भयानक. अशा प्रकारांना हत्ती परिवाराचा पाठिंबा नाही. आम्ही पायदळी तुडवत असलो तरी ते पायदळी तुडविणे रूपकात्मक असते- असे नसते.

आमच्यातील काही व्हॅलेंटाईन दिवसाला उसाच्या शेतात, काही मक्याच्या शेतात गेले होते.

'न'वी बाजू Mon, 16/02/2026 - 05:47

सिग्मंड फ्रॉइडने जर रोल्स-रॉइस विकत घेतली असती, तर त्या गाडीस ‘फ्रॉइड रॉइस’ म्हणून संबोधता आले असते काय?

सई केसकर Mon, 16/02/2026 - 09:06

In reply to by 'न'वी बाजू

आणि Carl Jung ने जर चायनीजची टपरी टाकली तर तो तिथे युंगफुंग सूप विकेल.

शांततावादी हत्ती Mon, 16/02/2026 - 09:34

In reply to by सई केसकर

अमेरीकन लोक मला सॅटीश म्हणायचे तसे ते अरितुडवन हत्तीला काय म्हणतील? अ‍ॅरीटुडवॅन हॅटी?

शांततावादी हत्ती Tue, 17/02/2026 - 09:25

थोरले माधवराव पेशवे (१७४५), 

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके (१९४४), 

भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद सहा (१९५६) 

विनम्र अभिवादन

सई केसकर Sat, 21/02/2026 - 07:24

https://www.hindustantimes.com/cricket/ricky-ponting-addresses-elephant…

Btw, t20 fixed असण्याचे चान्सेस किती? ज्या प्रकारे पाक इतकी चांगली बॉलिंग करूनही हरले त्यावरून अशी एक कॉन्सपिरसी थियरी डोक्यात आली. बाकी, ऑस्ट्रेलियात क्रिकेट बघणारे व्हााईट ट्रॅश असतात असं तिथल्या उच्चभ्रू लोकांचं मत असतं. पण तिथले उच्चभ्रू तरी काय? एकूण कचऱ्याचे distillation केले तर त्यातला वरचा थर. मी wooloongabba स्टेडियमच्या मागच्या बाजूला राहायचे. तरीही मी एकदाही एकही खेळ बघायला गेले नाही. म्हणजे मी उच्चभ्रू आहे असे नाही. पण तेव्हा मी बऱ्यापैकी गरीबही होते.
पण जी गर्दी स्टेडियमच्या दिशेने जायची त्यात मठ्ठ रेसिस्ट जोक मारणारे, रस्त्यातून अनवाणी चालणारे (ही एक काय पद्धत आहे ते अजूनही कळलं नाही) लोक असायचे.
पण आता मला कम्पल्सरी क्रिकेट बघावं लागत असल्याने मीही त्यात थोडा रस घेऊ लागले आहे. आणि पाकिस्तानचा कॅप्टन क्यूट आहे असं निरीक्षण मी त्या दिवशी केलं.

शांततावादी हत्ती Mon, 23/02/2026 - 18:37

मेक्सिको आणि इराणमध्ये परिस्थिती ठीक नाही असे बातम्यांमध्ये बघितले. तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनो काळजी घेऊन राहा ही विनंती.

शांततावादी हत्ती Tue, 24/02/2026 - 14:02

सत्यमंगलमच्या जंगलात एका हत्तीने एका व्यक्तीला पायदळी तुडविले त्यामुळे त्या व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला आहे. हत्ती परिवाराचा अशा हिंसक कारवायांना कधीच पाठिंबा नसतो. आमचे पायदळी तुडविणे रूपकात्मक असते.

https://timesofindia.indiatimes.com/city/coimbatore/farmer-trampled-to-…

शांततावादी हत्ती Wed, 25/02/2026 - 09:31

हत्ती परिवार एखाद्या विमानात प्रवासी म्हणून असेल तर विमानाला टेक ऑफ घेण्यासाठी धावपट्टीवर नेहमीपेक्षा जास्त अंतर धावावे लागते.