"एकच प्याला" या नाटकाची पदे - जाहीर विनंति

२८ ०१ २०१३

संचालक,
राम गणेश गडकरी डॉट कॉम

मी आपल्या "राम गणेश गडकरी डॉट कॉम" या साईटला भेट दिली. आपला उपक्रम स्तुत्य आहेच पण त्यात एक मोठ्ठी त्रुटी राहून गेलेली आहे. ती आपण कृपया तातडीने ती दुरुस्त करावी ही विनंति.

गडकर्‍यांच्या "एकच प्याला" या नाटकाची पदे (आणि प्रस्तावना) त्यांचे जीवश्च कंठ्श्च मित्र आणि साहित्यिक कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी लिहीलेली आहेत. आपण तयार केलेल्या "एकच प्याला" या नाटकाच्या इंटरनेट आवृत्तीत आपण पदे अंतर्भूत केलेली आहेत, पण ती कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांची असल्याचा कुठेही उल्लेख मला सापडला नाही. यामुळे केवळ कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांचे केवळ श्रेय नाकारले जात नसून लोकांमध्ये ही पदे गडकर्‍यानी रचली अशी चुकीची समजूत पसरण्याची शक्यता खूप आहे, हे आपण लक्षात घ्याल अशी आशा करतो.

आपण ही चूक लवकरात लवकरात दुरूस्त कराल अशी आशा करतो.

कळावे,
आपला
राजीव उपाध्ये
प्रति: rajeev-upadhye.blogspot.com
सर्व इंटरनेट फोरम्स

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

केवळ एकच प्याला नव्हे तर, गडकरींच्या सर्व नाटकांतील सर्व पदे ही वि सि गुर्जर यांनीच लिहिली, अशी माझी माहिती आहे (चु भु द्या घ्या)

अर्थात, त्यांना श्रेय मिळायला हवे, याच्याशी सहमतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गडक-यांच्या नाटकांचे प्रयोग गंधर्व नाटक मंडळी करत असे आणि त्यांच्या प्रत्येक नाटकाचा १ला प्रयोग बडोद्याच्या संस्थानिकांपुढे व्हायचा. "एकच प्याला" लिहील्या नंतर गडकरी आजारी पडले आणि केवळ १ल्या प्रयोगासाठी काही पदे गुर्जरांनी लिहायला सांगितले. दूर्दैवाने त्या आजारपणातून गडकरी उठले नाहीत आणि मग गुर्जरांनी लिहिलेली पदे "एकच प्याला" नाटकाची अधिकृत पदे ठरली. हे सर्व गुर्जरांनी एकच प्यालाच्या प्रस्तावनेमध्ये लिहीले आहे.

गडक-यांच्या सर्वच नाटकांची पदे गुर्जरांनी लिहीली ही माहिती मला चुकीची वाटते. पण काही पदे बांधायला त्यांनी मदत केली असावी (उदा. भावबंधन मधले "कठीण कठीण किती, पुरुष हृदय बाई" हे पद गुर्जरांचे आहे असे कुणितरी सांगितल्याचे/वाचल्याचे आठवते (पण मी खातरजमा केलेली नाही).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कै वि सी गुर्जरांचे श्रेय

"राम गणेश गडकरी डॉट कॉम" या साईटचे संचालक माधव शिरवळकर यांच्याकडून माझ्या पत्राची तातडीने दखल घेतली गेली आणि त्यांच्याकडून खालील इमेल आले आहे. कै. वि सी गुर्जरांचा पणतू म्हणुन मी आता समाधानी आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मा. राजीव उपाध्ये यांसी,

आपण निदर्शनास आणलेली त्रुटी आता दूर केली आहे. खालील दुव्यावर आवश्यक ती सुधारणा आपल्याला पाहता येईल.
http://ramganeshgadkari.com/egadlari/index.php?option=com_content&view=s...
आपणासारख्यांच्या जागरूकतेतूनच वेब माध्यमाची विश्वासार्हता स्थिरावण्यासाठी मदत मिळत असते.

आपले मनापासून आभार.

- माधव शिरवळकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0