दास डोंगरीचा..
anant_yaatree
दास डोंगरीचा जनां
सांगून कधीचा गेला,
"दिसामाजी काही तरी
जन हो लिहीत चला,"
जन हो वाचत चला
प्रसंगी, नि अखंडित"
उपदेश मनोमनी
पटे, गेलो मी वाचत
काही बाही वाचलेले
अवचित सुचलेले
लिहिण्याच्या आळसाने
सालो-साल साचलेले
असा सगळा मामला
म्हटले लिहीन चला
सुदैवाने सो मि तेव्हा
आयुष्यात उगवला
कायप्पाच्या विद्यापीठी
एकनिष्ठ मी स्नातक
छद्मविज्ञानाचा भोक्ता
ध्येय माझे: फेकाफेक
फॉरवर्ड चा वक्र बाण
माझ्या भात्यामध्ये आला
मग स्वतः लिहिण्याच्या
बेत ढगांमध्ये गेला
दिसामाजी शेकड्याने
आता फॉरवर्ड करतो
इतरांचे फॉरवर्ड
अखंडित मी वाचतो😊
(सवांतर चौकशी)
समर्थांच्या ‘मूर्खांच्या लक्षणां’ची नवी, सुधारित आवृत्ती आली की नाही अजून बाजारात?