Skip to main content

हत्तीखाना

(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 02/04/2026 - 17:43

In reply to by 'न'वी बाजू

ते सगळं सोडा. तुम्ही ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने हनुमानावर लेख कधी लिहिणार हे सांगा.

anant_yaatree Thu, 02/04/2026 - 17:03

मर्त्य (व्यक्तींच्या) संदर्भात वापरतात (चू भू द्या घ्या).
हनुमान सप्त चिरंजीवांपैकी एक असल्याने "हनुमान जन्मोत्सव" योग्य ठरेल.
माझा एक कायप्पावरील परिचित मला न चुकता दर वर्षी " ह. ज. मुबारक" असा संदेश हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पाठवितो.

'न'वी बाजू Thu, 02/04/2026 - 17:13

In reply to by anant_yaatree

हनुमान सप्त चिरंजीवांपैकी एक असल्याने "हनुमान जन्मोत्सव" योग्य ठरेल.

शिवाय, आमच्यातला एक जण देवपदास पोहोचला, या कारणास्तव आम्हांस त्याचा (यथार्थ) अभिमान आहेच.

(फक्त, तो जर श्रीरामाची चाटूगिरी न करता आपल्या जातीच्या अभिमानास जागला असता, तर अधिक बरे झाले असते, असे राहूनराहून वाटते.

परंतु, चालायचेच.)

माझा एक कायप्पावरील परिचित मला न चुकता दर वर्षी " ह. ज. मुबारक" असा संदेश हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पाठवितो.

_/\_

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 02/04/2026 - 17:41

या प्रतिसादाबरोबर तिसरे शतक झळकावले गेले. मी कितीही शतके झळकावली तरी मी आहे एक हत्ती - प्रचंड मोठा, महाकाय, कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

कुटुंबवत्सल हत्ती Fri, 03/04/2026 - 17:05

छ. शिवाजी महाराज (१६८०),

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (१९१४)

विनम्र अभिवादन

कुटुंबवत्सल हत्ती Sun, 12/04/2026 - 14:04

आशा भोसले यांचे दु:खद निधन झाले आहे. समस्त हत्ती परिवाराकडून आशाजींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. आम्ही सगळे लतादिदी आणि आशाताईंच्या गाण्यांचे चाहते आहोत.

कुटुंबवत्सल हत्ती Mon, 13/04/2026 - 18:31

१७९६ : अमेरिकेत पहिला हत्ती आला. तो भारतातून पाठवला होता.

विनम्र अभिवादन


 

कुटुंबवत्सल हत्ती Mon, 20/04/2026 - 19:39

सायकल दिन

सगळ्यांना, विशेषतः सायकलप्रेमी ऐसीकरांना सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने ऐसीवरील सायकल प्रेमींनी त्यांच्या सायकलीवर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठव करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. 
 

 

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 21/04/2026 - 18:11

२००९ : हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.

अरेरे. हत्तीच्या नावाने असलेल्या या गावात अशी हिंसक घटना घडली हे वाईट झाले. हत्ती परिवार तिथे असता तर एकेकाला पायदळी तुडवून चिरडून टाकले असते.

'न'वी बाजू Sun, 03/05/2026 - 22:39

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

पण… पण… पण… गुदगुल्याप्रवीण तर अस्वल असते ना?

कोठे क्रॉसब्रीडिंग झाले काय? की, पिसाळलेले अस्वल चावले?

(कॉलिंग @अस्वल…)

कुटुंबवत्सल हत्ती Wed, 06/05/2026 - 09:34

वेगवेगळ्या मोठ्या लोकांचे नाव उच्चारले तरी माझ्या डोळ्यासमोर नकळतपणे हत्तीची प्रतिमा उभी राहते तसे इतरांच्या बाबतीत का होत नसावे याचा विचार करत आहे.

कुटुंबवत्सल हत्ती Sun, 10/05/2026 - 10:35

कितीही काहीही झाले तरी मी आहे एक हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 12/05/2026 - 17:04

जागतिक परिचारिका दिन

जागतिक परिचारिका दिनाच्या सगळ्यांना, विशेषत: ऐसीवरील परिचारिकांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने ऐसीवरील परिचारिकांनी त्यांच्या पेशाविषयी आणि ते काम करताना येणाऱ्या आव्हानांविषयी एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. 

परिचारिका हे नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते. परिचारिका म्हणजे केवळ औषधे देणारी व्यक्ती नसते, तर ती रुग्णासाठी आधार, धीर आणि करुणेचे प्रतीक असते. परिचारिका आणि हत्तीमध्ये तर अनेक साम्यस्थळे दिसून येतात. हत्ती हा प्रचंड शक्तिशाली असला तरी त्याचा स्वभाव शांत, संयमी आणि काळजी घेणारा असतो. तो आपल्या कळपातील लहान सदस्यांचे संरक्षण करतो, त्यांना संकटातून बाहेर काढतो आणि त्यांची काळजी घेतो. परिचारिकाही अगदी तसेच करते. ती रुग्णांच्या वेदना समजून घेते, त्यांना मानसिक आधार देते आणि कठीण प्रसंगी धीराने उभी राहते. हत्तीची स्मरणशक्ती विलक्षण असते. त्याचप्रमाणे एक चांगली परिचारिका प्रत्येक रुग्णाची गरज, औषधे आणि उपचार यांची बारकाईने आठवण ठेवते. हत्ती जसा संकटात घाबरत नाही, तशीच परिचारिकाही आपत्कालीन परिस्थितीत शांतपणे काम करते. त्यामुळे करुणा, संयम, सामर्थ्य आणि जबाबदारी या गुणांमुळे परिचारिका आणि हत्ती यांच्यात सुंदर साम्य दिसून येते.

कुटुंबवत्सल हत्ती Wed, 13/05/2026 - 14:34

मी कितीही नावे बदलली तरी मी आहे एक हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 14/05/2026 - 17:45

स्वातंत्र्यदिन : इस्राएल

स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्राएलच्या लोकांना, विशेषत: तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी इस्राएल देशाचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. त्या देशात हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का आणि त्या देशात हत्ती किती याचा त्या लेखात अंतर्भाव करावा ही आग्रहाची विनंती. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात अजिबात शंका नाही.

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 14/05/2026 - 19:34

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

इस्राएलमध्ये वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी भारतभेटीवर येताना भारतातील मधुमेहाच्या रुग्णांसाठी तिकडून औषध घेऊन यावे ही पण आग्रहाची विनंती. अनेकांकडून ७० रूपये घेऊन ते गेले आहेत.

कुटुंबवत्सल हत्ती Fri, 15/05/2026 - 15:25

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

इस्राएल हे देशाचे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते. इस्रायलची तुलना हत्तीशी करायची झाली, तर ती मुख्यतः त्याच्या सामर्थ्य, स्मरणशक्ती आणि जगण्याच्या जिद्दीमुळे करता येईल. हत्ती आकाराने मोठा असतोच असे नाही, पण त्याची उपस्थिती प्रभावी असते. त्याचप्रमाणे इस्रायल भौगोलिकदृष्ट्या लहान देश असला, तरी जागतिक राजकारण, संरक्षणतंत्रज्ञान, कृषी, जलव्यवस्थापन आणि नवोन्मेष या क्षेत्रांत त्याचा प्रभाव मोठा आहे.

हत्ती संकटसमयी शांत दिसतो, पण गरज पडली तर अत्यंत ठामपणे स्वतःचे रक्षण करतो. इस्रायलचाही इतिहास संघर्ष, असुरक्षितता आणि अस्तित्वाच्या लढ्यांनी भरलेला आहे. सततच्या आव्हानांमध्येही त्याने तंत्रज्ञान, सैन्यशक्ती आणि राष्ट्रीय एकजूट यांच्या आधारे आपली ओळख टिकवली.

हत्तीची स्मरणशक्ती प्रसिद्ध आहे. इस्रायलच्या राष्ट्रीय मनातही इतिहास, वेदना, विस्थापन आणि पुनर्निर्माण यांची खोल स्मृती आहे. म्हणूनच इस्रायल हा हत्तीप्रमाणे—लहान जागेत उभा असलेला पण दूरवर प्रभाव टाकणारा, स्मरणशील, सजग आणि कठीण प्रसंगी अदम्य ठरणारा देश वाटतो.

कुटुंबवत्सल हत्ती Fri, 15/05/2026 - 18:47

जागतिक सदसद्‌विवेकी आक्षेप (Conscientious Objection) दिन
 

सगळ्यांना, विशेषत:  सदसद्‌विवेकी आक्षेप (Conscientious Objection) क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांना जागतिक सदसद्‌विवेकी आक्षेप (Conscientious Objection) दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने त्या क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांनी जागतिक सदसद्‌विवेकी आक्षेप (Conscientious Objection) क्षेत्राची ओळख करून देणारा एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. ऐसीचे विचारसौष्ठव वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात अजिबात शंका नाही. तसेच त्या क्षेत्राशी  हत्तीचा संबंध कसा याचा अंतर्भावही त्या लेखात करावा ही आग्रहाची विनंती.  
 

'न'वी बाजू Fri, 15/05/2026 - 18:53

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

...तुम्ही जर समजा उद्या ठरवलेत, की हे सगळे पायदळी तुडविणे, चेंदामेंदा करणे वगैरे तुमच्या स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीस पटत नाही. आणि, कळपातील बाकीचे हत्ती पायदळी तुडविणे, चेंदामेंदा करणे वगैरे उद्योगांस समूहाने बाहेर पडलेले असता जर का तुम्ही हे कारण देऊन घरी बसून राहिलात, तर तुम्ही सदसद्विवेकी आक्षेपी हत्ती ठरू शकता.

'न'वी बाजू Wed, 08/07/2026 - 22:49

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

नाही म्हणजे, 'योगदान' म्हटले असतेत, तर ते एक वेळ समजू शकले असते, कदाचित मान्यही करता आले असते.

परंतु, 'त्याग'??????

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣


(हं, पो टाकण्याला 'त्याग' म्हणून संबोधीत असलात, तर गोष्ट वेगळी. (तसाही, एका प्रकारे 'त्याग'च आहे तो, त्यामुळे, एका अर्थाने तुमचा दावा अगदीच चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही, म्हणा...))

'न'वी बाजू Thu, 09/07/2026 - 01:56

In reply to by 'न'वी बाजू

तसेही, 'संन्यास' आणि 'संडास' या दोन्हीं शब्दांची व्युत्पत्ती सारखीच — 'कशाचा तरी त्याग' या संकल्पनेतून उद्भवणारी (फक्त स्केलचा फरक, इतकेच.) — असल्याच्या संदर्भातील चर्चा येथे 'ऐसी'वरच पूर्वी झालेली आहे. (दुवा.)

(फक्त, व्युत्पत्तीचा स्रोत दर्शविणारा त्या चर्चेतील दुवा आता बदललेला आहे; तो असा पाहिजे, इतकेच.)

असो चालायचेच.

कुटुंबवत्सल हत्ती Sun, 19/07/2026 - 11:21

मी एक स्वर्गयंत्री हत्ती - पाताळयंत्री हत्तीच्या विरूध्द.

मी एक सुलट्या काळजाचा हत्ती - उलट्या काळजाच्या हत्तीच्या विरूध्द.

मी एक बाहेरच्या गाठीचा हत्ती- आतल्या गाठीच्या हत्तीच्या विरूध्द.

'न'वी बाजू Sun, 19/07/2026 - 16:55

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

पाताळयंत्री हत्तीच्या विरुद्ध बोले तो आकाशयंत्री हत्ती नको काय?

(स्वर्गयंत्री हत्ती बोले तो नरकयंत्री हत्तीच्या विरुद्ध होईल.)

कुटुंबवत्सल हत्ती Sun, 19/07/2026 - 18:55

In reply to by 'न'वी बाजू

तीन लोक- पृथ्वी, पृथ्वीच्या खाली पाताळ आणि पृथ्वीच्या वर स्वर्ग. म्हणून पाताळच्या विरूध्द स्वर्ग.

'न'वी बाजू Mon, 03/08/2026 - 21:04

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

या खेपेस 'आकाशयंत्री हत्ती' हे नाव घेतलेले आहे, याची दखल घेतलेली आहे.

आभार.

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 23/07/2026 - 14:14

लोकमान्य टिळकांना १७० व्या जयंतीनिमित्त समस्त हत्ती परीवाराकडून विनम्र अभिवादन.

tilak

कुटुंबवत्सल हत्ती Sat, 25/07/2026 - 16:09

स्वर्गयंत्री हत्ती हे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.

कुटुंबवत्सल हत्ती Sun, 02/08/2026 - 19:15

१९३० : मुंबईत सरदार वल्लभभाई पटेल, पं. मदनमोहन मालवीय, जयरामदास दौलतराम यांना ब्रिटिशांनी अटक केली. 
 

स्वातंत्र्यलढ्यात हजारोंनी स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रज पोलिसांनी अटक केली होती. मग मुद्दामून या दोघांनाच अटक केल्याचा उल्लेख दिनवैशिष्ट्यांमध्ये का केला आहे? त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेल्या त्यागाचे अवमूल्यन करायचा कोणताही हेतू हत्ती परिवारातील कोणाचाही नाही. या दोघांनाच अटक केल्याचा मुद्दामून उल्लेख केला गेला आणि इतरांच्या अटकेचा असा उल्लेख केला गेला नाही तर इतरांच्या त्यागाचे अवमूल्यन मात्र होईल अशी साधार भीती हत्ती परिवाराला वाटते.

 

कुटुंबवत्सल हत्ती Mon, 03/08/2026 - 20:27

आचार्य बाळकृष्ण हे नाव उच्चारल्यावर डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहत नसल्याने त्या लेखावर माझा प्रतिसाद नाही.

कुटुंबवत्सल हत्ती Mon, 03/08/2026 - 20:32

जर एखाद्या लेखामुळे डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते की नाही या एकाच कारणाने मी कोणत्याही लेखावर प्रतिसाद देत असतो. डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहिली नाही तर तो लेख माझ्यासाठी प्रतिसाद द्यायला वर्ज्य.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 04/08/2026 - 19:12

मी एक आकाशयंत्री हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 06/08/2026 - 10:01

हत्ती परिवाराने ऐसीसाठी जितका त्याग केला आहे तितका त्याग इतर कोणीही केलेला नसल्याने यापुढे काही दिवस नवे नाव- त्यागमूर्ती हत्ती.

कुटुंबवत्सल हत्ती Wed, 12/08/2026 - 10:01

hatti

 

हत्ती या प्राण्यावर आणि ऐसीवरील हत्ती परिवारावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना जागतिक हत्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा जागतिक हत्ती दिन सगळ्यांना सुख समाधानाचा आणि समृध्दीचा जाऊ दे ही सदिच्छा.   

anant_yaatree Wed, 12/08/2026 - 18:25

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

संघर्षावर परिणामकारक व कायमस्वरुपी उपाय हत्तींना / माणसांना लवकरात लवकर सापडो ही शुभेच्छा.

सई केसकर Wed, 12/08/2026 - 18:42

हत्तींना भरपूर हिरवा चारा आणि शुद्ध पाणी मिळत राहो. किमान त्यासाठीतरी ऐसीवर चालू असलेले एआय लेखनाचे प्रयोग कमी व्हावेत.

कुटुंबवत्सल हत्ती Sun, 16/08/2026 - 10:19

गणितज्ञ जेकब बर्नूली (१७०५),
गायक नुसरत फतेह अली खान (१९९७), 
कवी नारायण सुर्वे (२०१०), 
माजी पंतप्रधान आणि कवी अटल बिहारी वाजपेयी (२०१८)
 

विनम्र अभिवादन

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 20/08/2026 - 19:35

 माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४)

विनम्र अभिवादन. राजीव गांधी हे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.

राजीव गांधी यांची तुलना हत्तीशी करायची झाल्यास ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि राजकीय कारकिर्दीतील काही वैशिष्ट्यांच्या आधारे रूपकात्मक पद्धतीने करता येईल.

हत्ती हा आकाराने प्रचंड आणि शक्तिशाली प्राणी आहे; मात्र सामान्यतः तो आक्रमकतेपेक्षा शांतपणा आणि संयमासाठी ओळखला जातो. राजीव गांधींच्या व्यक्तिमत्त्वातही काहीसा असा स्वभाव दिसून येतो. राजकारणात प्रवेश करण्याची त्यांची मूळ इच्छा नव्हती. वैमानिक म्हणून वेगळे आयुष्य जगणारे राजीव गांधी परिस्थितीमुळे राजकारणात आले आणि १९८४ मध्ये अचानक भारताच्या पंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. जणू एखाद्या शांत हत्तीला अचानक मोठ्या कळपाचे नेतृत्व करावे लागावे, तशी त्यांची परिस्थिती होती.

हत्तीची आणखी एक खासियत म्हणजे त्याची ताकद. परंतु केवळ ताकद असणे आणि तिचा प्रभावी वापर करता येणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजीव गांधींकडे लोकसभेत अभूतपूर्व बहुमत होते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड राजकीय शक्ती होती. सुरुवातीला आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकरण आणि दूरसंचार यांना प्रोत्साहन देत त्यांनी भारताला नव्या युगाकडे नेण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे, प्रचंड शरीर असलेल्या हत्तीला अचानक दिशा बदलणे अवघड असते. त्याचप्रमाणे विशाल आणि गुंतागुंतीच्या भारतीय प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेत बदल घडवणे राजीव गांधींसाठीही सोपे नव्हते. शाहबानो प्रकरण, श्रीलंकेतील हस्तक्षेप आणि बोफोर्स वादामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला.

त्यामुळे राजीव गांधी आणि हत्ती यांची तुलना मुख्यतः शांत स्वभाव, प्रचंड शक्ती, मोठी जबाबदारी आणि त्या शक्तीला योग्य दिशा देण्यातील आव्हाने या चार वैशिष्ट्यांच्या आधारे करता येईल.

कुटुंबवत्सल हत्ती Fri, 21/08/2026 - 14:49

गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), 
गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), 
अभिनेते शरद तळवलकर (२००१), 
सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), 
साक्षेपी संपादक व प्रकाशक श्री.पु. भागवत (२००७)

 

विनम्र अभिवादन. 

मात्र यापैकी कोणाचेही नाव उच्चारले तरी नकळतपणे मनात एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहत नाही. विशेषत: शरद तळवलकरांचे नाव घेतले तर अजिबात नाही.

कुटुंबवत्सल हत्ती Sat, 22/08/2026 - 17:40

कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक उभारणारे एकनाथ रानडे (१९८२), 
अभिनेते सूर्यकांत मांढरे (१९९९)

विनम्र अभिवादन. 

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 25/08/2026 - 14:59

१९६१ : पं. नेहरू आणि संत फत्तेसिंग यांच्यातल्या वाटाघाटी फिसकटल्या.

अशा एन्ट्री दिनवैशिष्ट्यांमध्ये देऊन नक्की काय साध्य होते? कशावर वाटाघाटी होत्या याचा उल्लेख नाही, कोण संत फत्तेसिंग याचा उल्लेख नाही मग ही एन्ट्री वाचून काहीच ज्ञानवर्धन होणार नाही.

कुटुंबवत्सल हत्ती Wed, 26/08/2026 - 15:01

आज कोणत्याही देशाचा स्वातंत्र्यदिन, राष्ट्रीयदिन किंवा प्रजासत्ताकदिन नसल्याने आज कोणत्याही देशातील लोकांना त्या दिनाच्या शुभेच्छा नाहीत. असा कोणताही दिन नसल्याने कोणत्याही देशातील लोकांना, विशेषतः तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना त्या देशाचा इतिहास, भूगोल आणि त्या देशातील लोकांचे राहणीमान यावर लेख लिहायची विनंती नाही, कोणत्याही देशातील लोकांना त्यांच्या देशात हत्ती किती आणि हत्तींसाठी अभयारण्ये किती यांचा त्या लेखात अंतर्भाव करायची विनंती नाही. मुळात लेख लिहायचीच विनंती केली नसेल तर मग तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल याची शक्यताच नाही.

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 27/08/2026 - 09:20

आज सकाळी एका बोक्याने कबुतर पकडलेले बघितले. म्हणून काही दिवस माझे नाव कबुतरबोका हत्ती.

'न'वी बाजू Fri, 28/08/2026 - 07:46

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

अनेक वर्षांपूर्वी माझ्या शेजार्‍याच्या बॅकयार्डात एक भुंकणारा चतुष्पाद राहात असे. (तसा अतिशय प्रेमळ होता. गेऽला बिचारा.) त्याला त्याच्या हद्दीत (मनुष्य वगळल्यास) दुसरा कोठलाही प्राणी (अगदी दुसरा कुत्रासुद्धा) आलेला खपत नसे. (आणि, त्यात पुन्हा, त्याची माझ्याबद्दलची समजूत ही काहीशी तो आणि मी लहानपणी एक तर चतु:शृंगीच्या जत्रेत नपक्षी आमच्या ग्विनेट कौंटी फेअरमध्ये हरवलेले जुळे भाऊ होतो, नि हिंदी पिच्चरमध्ये जेणेकरून असे (लहानपणी जत्रेत हरवलेले जुळे) भाऊ हे मोठे झाल्यावर त्यातला एक चोर तर दुसरा पोलीस, किंवा (धार्मिक ऐक्य वगैरे दाखवायचे असल्यास) एक हिंदू तर दुसरा मुसलमान, किंवा यांचे कोठलेतरी पर्म्युटेशन अथवा काँबिनेशन दाखवतात, तद्वत, मोठेपणी तो कुत्रा झाला नि मी माणूस झालो, अशा धर्तीवरची होती. त्यामुळे, मधले कुंपण ओलांडून तो माझ्या बॅकयार्डात येऊ जरी शकत नसला, तरीसुद्धा, माझ्या बॅकयार्डाबद्दलही त्याची भावना ही तितकीच टेरिटोरियल होती. एकदा माझ्या बॅकयार्डात ससा की कासव कोणीतरी आले असता — ही दोन्ही श्वापदे आमच्याकडे क्वचित डोकावून जात — बॅकयार्ड माझे, परंतु त्यावरील हे अतिक्रमण त्याला सहन न होऊन त्याने भुंकून भुंकून घर डोक्यावर घेतले होतेन्. तर ते एक असो.)

तर सांगायची गोष्ट, आमच्या घरामागे एक मोठे तळे असल्याकारणाने, (स्थलांतराच्या) सीझनात अनेकदा बदकांचे नाहीतर कॅनडा गीज़चे थवे येऊन जातात. नि येतात तसे लोकांच्या बॅकयार्डांतून, झालेच तर आख्ख्या सबडिव्हिजनभर (मराठीत: सोसायटीभर) आपल्याच तीर्थरूपांची मालमत्ता असल्यासारखे भटकतात. झालेच तर, सगळीकडे हिरवेगार हगून ठेवतात. तर तेही एक असो.

तर एकदा अशाच एका बदकांच्या जोडप्याला आमच्या या जुळ्या भावाच्या बॅकयार्डात उतरण्याची दुर्बुद्धी झाली. तसा हा सामान्यतः डोक्याने अतिशय शांत; परंतु, तेव्हा मात्र याचे टाळके सटकले, नि त्या जोडप्यापैकी एकावर झडप घालून याने त्याला फाडले. (फाडून खाल्ले नाही. नुसते फाडले.) आता, बदकांना अक्कल नसते, किंवा कसे, ते मला ठाऊक नाही, परंतु, हे सगळे होत असताना, त्या जोडप्यातले दुसरे जे बदक होते, त्याने तेथून उडून जाण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करता, हा कसा आपल्याबरोबरच्या दुसर्‍या बदकाला फाडतोय, ते शांतपणे बघऽत बसले. झाले. पहिल्याला यथेच्छ फाडून झाल्यावर याने दुसर्‍यालासुद्धा तस्सेच फाडले. दोघांना फाडून झाल्यावर मात्र याला पश्चात्ताप झाला असावा. कारण, त्यानंतर तो आपल्या आजूबाजूला पडलेल्या पिसार्‍याकडे पाहात, अत्यंत केविलवाण्या नजरेने, 'काय काय करावे लागते बिचार्‍या कुत्र्याला दिवसातून'-छापाचे अतिशय दु:खी भाव डोळ्यांत आणून हिंडत होता. चालायचेच.

(एकदा आमच्या या जुळ्या भावाने — आमच्या भेटी या सामान्यतः आमच्यामधील कुंपणापाशी होत — मला यत्किंचितही कल्पना नसताना नि माझी तशी यत्किंचितही अपेक्षा नसताना (माझी अपेक्षा हा फार फार तर माझे थोबाड चाटेल, अशी होती!), अचानकपणे पार माझ्या घशापर्यंत जीभ घालून अत्यंत उत्कट असा मौथ-टू-मौथ किस दिला होतान्. त्या चित्तथरारक अनुभवापैकी, 'कुत्र्याची लाळ खारट असते' एवढे एकच माझ्या आजतागायत लक्षात आहे; नव्हे, माझ्या स्मृतिपटलावर कायमचे कोरले गेलेले आहे. इतके, की, आजमितीससुद्धा मी ते शपथेवार सांगू शकतो. असो.)

(जुळ्या भावावरून आठवले. एकदा मी याच्याबद्दल माझ्या (तेव्हा लहान) मुलाला, "He thinks that I am his twin brother. In fact, he expects you to call him 'Uncle'." म्हणून सांगितले होते. माझ्या मुलाने तेव्हा मला दिलेली चमत्कारिक नजर माझ्या मनात आजही घर करून आहे. असो चालायचेच.)

सई केसकर Fri, 28/08/2026 - 10:59

In reply to by 'न'वी बाजू

>>> 'कुत्र्याची लाळ खारट असते' एवढे एकच माझ्या आजतागायत लक्षात आहे;

हा हा. शेवटी आयुष्यातले अनुभव पारिजातकाच्या फुलांसारखे असतात. जरी तासाभरात कोमेजून गेली तरी त्यांचा दरवळ मनाच्या कोंदणात भरून राहतो.

आम्ही एकदा घरात मांजर पाळण्याचा असफल प्रयत्न केला होता (सध्याची ऑफिसात आहेत). तर आम्ही राहतो पाचव्या मजल्यावर आणि आजूबाजूच्या प्रत्येक बाल्कनीत कबुतरं असायची. आणि मांजरं अतिशय निर्भीड आणि एजाइल असल्यानं, आमची मांजर सहज एका बाल्कनीतून दुसऱ्या बाल्कनीत जायची. कधीकधी ती अशी उतरत उतरत खाली पार्किंगपर्यंत जाऊन माझी वाट बघत बसायची. तर तिला शिकारीचा फार नाद होता. एकदा आमच्या बाल्कनीत कबुतर मारलं. पण खाल्लं नाही. मारून ठेवलं. मग आमच्यासारख्या काहीश्या मंद शहरी लोकांना मेलेलं कबुतर कसं डिस्पोज ऑफ करायचं याचा काहीच अंदाज नव्हता. म्हणून आम्ही ते सुपलीत भरून कचऱ्यात टाकलं. त्यातही ते ओल्या कचऱ्यात टाकायचं कारण ते बायोडिग्रेडेबल आहे अशी चर्चा करून आम्ही भाजीपाला इत्यादी असलेल्या कचरापेटीत एक संबंध मेलेलं कबुतर टाकलं. आणि कचरेवालीने आपल्याकडे बघू नये याची पूर्ण काळजी घेऊन आधीच कचरा बाहेर ठेवून घरात बसलो. पण भाजीपाल्यात मेलेलं कबुतर बघून तिला काय वाटलं असेल हा प्रश्न आजही अनेकदा माझ्या डोक्यात येतो.
नंतर आमच्या मांजरीने तुमच्या त्या चतुष्पादाप्रमाणे तिच्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. एकदम अटकेपार झेंडा लावायचा निग्रह वगैरे केला. त्यामुळे आम्हाला रोज सकाळी साधारण ७ वाजता बिल्डिंगच्या इंटरकॉमवर फोन येऊ लागले. एरव्ही या इंटरकॉमवर एखादे (किंवा ३-४) पुस्तकं रचलेली असतात. आणि तो वाजल्यावर आम्ही, कसला आवाज येतो आहे? असं एकमेकांना विचारतो.

तुमच्या मांजरीने आमच्या बाल्कनीत कबुतर मारले आहे. ते साफ करायला या.

मग कधी पहिला मजला. कधी तिसरा. कधी पाचवाच पण शेजारची बाल्कनी. असं एक एक घर रोज बघता येऊ लागलं. त्यानिमित्ताने अनेक ओळखी झाल्या. म्हणजे मला लोकांशी आपणहून जाऊन बोलायला आवडत नाही. म्हणून मी सोसायटीत खडूस/शिष्ट वगैरे म्हणून प्रसिद्ध आहे. याउलट माझा नवरा कुणाला भेटला की फारच आपुलकीने बोलतो. त्यामुळे सुपलीत मेलेलं कबुतर घेऊन, कोणत्या कंपनीत काम करता? हिंजवडीला कसे जाता? तुमच्या जाईच्या वेलाची एक फांदी नेऊ का? वगैरे प्रश्न विचारून नवऱ्यानं खूप ओळखी करून घेतल्या. पण काही दिवस असे गेल्यावर तो मला म्हणाला, आता मला रोज सकाळी रक्त बघून दिवसाची सुरुवात करायचा कंटाळा आला आहे. तुझं मांजर प्रेम मी समजू शकतो. लेकिन अब मेरे से ये नही हो पायेगा. मग काही दिवस मी एकटी गेले कबुतरं उचलायला. पण मग आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊन त्या मांजरीला तळमजल्यावरच्या एका घरात देऊन टाकलं.
पण आमच्या इथली किमान ५० कबुतरं कार्पोरेशनच्या कचऱ्यात गेली असतील. कदाचित नंतर ती यायची थांबली म्हणून कचरेवालीला दुःख झालं असेल.

'न'वी बाजू Sat, 29/08/2026 - 01:13

In reply to by सई केसकर

हा हा. शेवटी आयुष्यातले अनुभव पारिजातकाच्या फुलांसारखे असतात. जरी तासाभरात कोमेजून गेली तरी त्यांचा दरवळ मनाच्या कोंदणात भरून राहतो.

वाहवा, क्या बात है!

(वपु काय हो?)

(की, दवणे?)

(सुभान आला. माश्या आल्या. इ.इ.)

असो.

anant_yaatree Fri, 28/08/2026 - 12:12

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

अभिनंदन!

क्रौंचवध पाहून "मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः..." वगैरे सुचलेल्या वाल्मीकीचीच आठवण आली

'न'वी बाजू Sat, 29/08/2026 - 06:45

In reply to by anant_yaatree

…बंगाली भाषेत ‘बोका’ या शब्दाला एक सामान्य वापरातला अश्लील प्रत्यय लागून एक विशेषणवजा (अप)शब्द निर्माण होतो. ते विशेषण लावून जर नाव घेतले असते, तर बहार येती.

गंमत म्हणजे, बंगालीत 'बोका' या शब्दाचा अर्थ साधारणतः 'येडा' किंवा फार फार तर 'मूर्ख' असा काहीसा होतो. त्यामुळे, असे नाव घेतले असता त्यातून फारसा अनर्थकारक असा अर्थ निघू नये. विशेषेकरून, आंतरप्रजातीय संबंध तर त्यातून सूचित होऊ नयेतच नयेत. फार फार तर 'यज्ञात झोपणारा’ इतकाच अर्थ होईलसे वाटते. (ते तर काय, आपला हत्ती आहेच; त्यामुळे, चपखल बसून जाईल.)

परंतु, कसे आहे ना, की सामान्य मराठी माणसाचे सामान्य अज्ञान हे थक्क करणारे असते. (अहो, साधे ‘सौ.’ म्हणजे ‘सौजन्य’ हे समजत नाही यांना. भलताच अर्थ घेतात. अर्थात, त-वरून ताकभात-तपेले न ओळखता थेट तिरडी नाहीतर तेराव्यावर उतरणारी जमात ही; त्यामुळे, चालायचेच.) तेव्हा, या नावाचा नक्कीच चुकीचा अर्थ लावला जाईल. त्यामुळे, आणखी मजा येईल.

असो.

'न'वी बाजू Mon, 31/08/2026 - 20:08

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

आज सकाळी रस्त्याने चालत असताना, रस्त्याच्या काठी (बहुधा गाडीने उडविल्यामुळे) मरून पडलेले हरिणाचे पिल्लू दिसले.

मरून पडलेले हरिणाचे पिल्लू

त्याच्या स्मरणार्थ, हत्तीने आपले पुढील नाव 'मरूनपडलेलेहरिणाचेपिल्लू हत्ती' असे घ्यावे, अशी नम्र विनंती.

आगाऊ आभार!

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 27/08/2026 - 17:28

मी एक कबुतरबोका हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

कुटुंबवत्सल हत्ती Sat, 29/08/2026 - 08:59

मी एक कबुतरबोका हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

कुटुंबवत्सल हत्ती Mon, 31/08/2026 - 12:48

स्वातंत्र्यदिन : किरगिझिस्तान, मलाया, त्रिनिदाद व टोबॅगो 

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने किरगिझिस्तान, मलाया, त्रिनिदाद व टोबॅगोच्या लोकांना, विशेषत: तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने त्या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशांचा स्वातंत्र्यसंग्राम, इतिहास, भूगोल, हवामान आणि तिथल्या लोकांचे राहणीमान यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. 

चला तर मग.. लिहिताय ना लेख?

'न'वी बाजू Mon, 31/08/2026 - 16:50

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

मलाया नावाचा कोठलाच देश आजमितीस अस्तित्वात नाही. देश अस्तित्वात नाही, म्हटल्यावर, आजमितीस तेथे ऐसीकर वास्तव्यास असणे शक्य नसावे. देशही अस्तित्वात नाही. झालेच तर ऐसीकरही वास्तव्यास नाहीत, म्हटल्यावर, शुभेच्छांचा तथा लेख लिहिण्याचा प्रश्न उद्भवू नये. परिणामी, तशी विनंतीही असू नये. अशा विनंतीस मान देवून लेख येण्याची तथा त्यातून ऐसीचे विचारसौष्ठव वृद्धिंगत होण्याची शक्यता नाही.

(तशीही कधी होती, म्हणा!)

कुटुंबवत्सल हत्ती Mon, 31/08/2026 - 18:04

In reply to by 'न'वी बाजू

दिनवैशिष्ट्यांमध्ये मलायाच दिले आहे. म्हणजे त्या नावाचा देश अस्तित्वात आहे.

मनीषा Mon, 31/08/2026 - 19:04

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

Malaya is the historical name for the territory on the Malay Peninsula that is now part of modern-day Malaysia.
https://en.wikipedia.org/wiki/Peninsular_Malaysia

"मलाया" असा वेगळा देश काही सापडला नाही.

'न'वी बाजू Mon, 31/08/2026 - 19:33

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

...मात्र, आज अस्तित्वात नाही.

'मलाया' उर्फ 'फेडरेशन ऑफ मलाया' या देशाची स्थापना (ब्रिटिश आधिपत्याखाली) १ फेब्रुवारी १९४८ या दिवशी झाली. नंतर या देशाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य हे ३१ ऑगस्ट १९५७ रोजी मिळाले (ज्याचा उल्लेख आजच्या 'दिनवैशिष्ट्या'त आहे). त्यानंतर १५ सप्टेंबर १९६३पर्यंत हा देश अस्तित्वात होता. १६ सप्टेंबर १९६३ रोजी सबाह (उत्तर बोर्नियो), सारावाक आणि सिंगापूर या प्रदेशांबरोबर या देशाच्या प्रदेशाचे विलीनीकरण होऊन 'मलेशिया' नावाचा एक नवा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. (पुढे ९ ऑगस्ट १९६५ रोजी (राजकीय आणि आर्थिक कारणांमुळे सिंगापूरचे उर्वरित मलेशियाबरोबर न पटल्यामुळे) सिंगापूर हा उर्वरित मलेशियापासून विलग होऊन स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला.)

(सर्व माहिती विकीपीडियावरून.)

कुटुंबवत्सल हत्ती Mon, 31/08/2026 - 21:32

ज्या देशांमध्ये हत्ती भरपूर असतात आणि ज्या देशांमध्ये हत्तींना मानाचे स्थान असते ते देश मला आवडतात.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 01/09/2026 - 10:34

वर्धापनदिन : भारत गायन समाज (१९११) 


वर्धापनदिनानिमित्त भारत गायन समाजाशी संबंधित सगळ्यांना, विशेषत: त्या संस्थेशी संबंधित ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने त्या संस्थेशी संबंधित ऐसीकरांनी त्या संस्थेच्या वाटचालीविषयी आणि त्या संस्थेने समाजमनावर उमटवलेल्या ठशाविषयी एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. जर भारत गायन समाजाशी संबंधित ऐसीकरांनी आपल्या रियाजाचा एखादा कार्यक्रम ठेवला तर ते अती उत्तम होईल. किमानपक्षी भारत गायन समाजाशी संबंधित ऐसीकरांनी आपली गाणी आंतरजालावर अपलोड करून त्याची लिंक द्यावी ही आग्रहाची विनंती. त्यातील एखादे गाणे हत्तीसंबंधी अथवा हत्तीला समर्पित असले तर सोन्याहूनही पिवळे.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 01/09/2026 - 14:36

१९६२ : कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाची स्थापना. 

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सगळ्यांना, विशेषत: त्यातील ऐसीकरांना वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाशी संबंधित असलेल्या ऐसीकरांनी विद्यापीठाच्या वाटचालीवर आणि त्या विद्यापीठाने त्यांच्या आयुष्यावर आणि विचार करायच्या पध्दतीवर कसा प्रभाव पाडला याविषयी एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात शंका नाही. 

मग लिहिताय ना लेख?

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 01/09/2026 - 19:12

एआय हे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि हत्ती यांची तुलना अनेक रंजक पद्धतींनी करता येते. हत्ती केवळ त्याच्या प्रचंड शारीरिक ताकदीमुळे महत्त्वाचा नसतो; त्याची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, संवेदनशीलता आणि विविध प्रकारची कामे करण्याची क्षमता यांमुळेही तो विशेष ठरतो. AI चे वैशिष्ट्यही काहीसे असेच आहे.

हत्ती अवजड वस्तू उचलू शकतो, अडथळे दूर करू शकतो आणि माणसाला अत्यंत कष्टदायक ठरणारी कामे सहज करू शकतो. त्याचप्रमाणे AI प्रचंड प्रमाणातील माहिती काही क्षणांत तपासू शकते, पुनरावृत्तीची कामे वेगाने करू शकते आणि गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधण्यात माणसाला मदत करू शकते. माणसाला ज्या कामासाठी अनेक तास लागतील, ते AI कधी कधी काही सेकंदांत पूर्ण करू शकते.

हत्तीची स्मरणशक्ती प्रसिद्ध आहे. AI देखील मोठ्या प्रमाणातील माहितीचा वापर करून त्यातील नमुने, संबंध आणि प्रवाह ओळखू शकते. त्यामुळे अंदाज बांधणे, सूचना देणे किंवा निर्णय प्रक्रियेला मदत करणे शक्य होते.

परंतु हत्तीची प्रचंड ताकद योग्य दिशेने वापरली गेली पाहिजे. प्रशिक्षित हत्ती अत्यंत उपयुक्त ठरतो; परंतु अनियंत्रित ताकद नुकसानही करू शकते. AI बाबतही हेच लागू होते. तिची क्षमता जितकी मोठी आहे, तितकीच तिच्या जबाबदार आणि नैतिक वापराची गरजही मोठी आहे.

म्हणूनच AI आणि हत्ती या दोघांची खरी ताकद केवळ शक्तीत नाही, तर त्या शक्तीचा सुज्ञपणे उपयोग करण्यात आहे.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 01/09/2026 - 19:15

सगळ्यांना हत्तीसारखी ताकद आणि एआय सारखी बुध्दीमत्ता मिळू दे ही सदिच्छा.

कुटुंबवत्सल हत्ती Wed, 02/09/2026 - 13:56

लेखक श्री. म. माटे (१८८६), 
सिनेअभिनेत्री साधना (१९४१),
ज्ञानपीठविजेते पहिले मराठी लेखक वि. स. खांडेकर (१९७६), 
संगीतकार श्रीनिवास खळे (२०११)

विनम्र अभिवादन.

कुटुंबवत्सल हत्ती Wed, 02/09/2026 - 23:20

मी एक कबुतरबोका हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

कुटुंबवत्सल हत्ती Fri, 04/09/2026 - 13:07

In reply to by मारवा

नाही. त्यांना हत्तीपणा निभावता येत नसल्याने ते हत्ती परिवाराचे सदस्य नाहीत.

कुटुंबवत्सल हत्ती Fri, 04/09/2026 - 13:10

स्वातंत्र्य चळवळीतले धुरीण व राजकारणी दादाभाई नौरोजी (१८२५), 
अभिनेता ऋषी कपूर (१९५२)

विनम्र अभिवादन.

कुटुंबवत्सल हत्ती Sat, 05/09/2026 - 09:46

काल एक स्वप्न पडले. त्यात हत्ती परिवारातील चौघे चुक्कूचुक्कू असे म्हणत आनंदात नाचत होते. म्हणून यापुढील काही दिवस माझे नाव- चुक्कूचुक्कूनर्तक हत्ती.

hatti

anant_yaatree Sat, 05/09/2026 - 15:55

(१) प्रत्येक नाव बदलाचे वेळी हत्तीवरून साखर वाटावी
(२) वर्षभरात १२ पेक्षा जास्त वेळा नाव बदलल्यास हत्तीच्या पायदळी.....

'न'वी बाजू Sat, 05/09/2026 - 16:00

In reply to by anant_yaatree

…खालचा हत्ती हा आपोआपच हत्तीच्या पायदळी तुडविल्यासारखीच परिस्थिती निर्माण होणार नाही काय?

'न'वी बाजू Sat, 05/09/2026 - 17:31

In reply to by सई केसकर

वरच्या हत्तीच्या वजनाने खालचा हत्ती चिरडला जाणार नाही काय?

(एका हत्तीवर दुसरा आख्खा हत्ती (पूर्ण वजन टाकून) अशी परिस्थिती सामान्यतः बहुधा अगदी हत्तींमधील खाजगी क्षणांतसुद्धा कधी येत नसावी, असा अंदाज. अर्थात, मी स्वतः हत्ती नसल्याकारणाने मला फर्स्टहँड माहिती नाही, सबब, चूभूद्याघ्या. (याबद्दल कदाचित हत्तीच काय ते खात्रीलायक रीत्या सांगू शकेल.))

सई केसकर Mon, 07/09/2026 - 09:31

In reply to by 'न'वी बाजू

आमच्या कोल्हापुरात एक गोष्ट सांगतात (सांगतात म्हणण्यापेक्षा सांगून बोअर करतात. कारण ही गोष्ट मी किमान ५० वेळा ऐकली असेल).
एक पैलवान असतो. त्याला बॉडी करायची असते. बाकी व्यायाम चालू असताना त्याच्या गोठयातल्या एका म्हशीला एक रेडकू होतं. मग तो रोज ते रेडकू खांद्यावर टाकून शेताच्या दहा फेऱ्या मारू लागतो. हळूहळू सगळे त्याच्याबद्दल विसरून जातात. मग एक दिवस सकाळी कुणालातरी तो हट्टाकट्टा पैलवान रेडा खांद्यावर घेऊन पाळताना दिसतो.
तात्पर्य: रोज थोडी प्रगती केली की काहीच असाध्य नाही. तद्वत, डबलडेकर हत्ती करण्यासाठी असाच एक टीनएजर हत्ती छोट्या पिल्लाला पाठीवर ठेवून चालत राहिला असेल.

'न'वी बाजू Mon, 07/09/2026 - 17:59

In reply to by सई केसकर

…पॉइंट आहे!

(सांगतात म्हणण्यापेक्षा सांगून बोअर करतात. कारण ही गोष्ट मी किमान ५० वेळा ऐकली असेल)

हम्म्म्म्… (नाही म्हणजे, ही ठराविक गोष्ट मी कधी ऐकलेली नाही, परंतु…) गोष्ट सांगूनसांगून बोअर करणे, झालेच तर एखादी गोष्ट किमान ५० वेळा ऐकलेली असणे, वगैरे बाबींशी relate करू शकतो. (आमचे दिवंगत तीर्थरूपही — अगोदर किमान ५० वेळा ज़िक्र केल्याप्रमाणे — मूळचे कोल्हापूरचेच होते.)

(फार कशाला, मी स्वतः आयुष्यात कधीही कोल्हापुरात गेलेलो नसलो, तरीही, आमच्यातही हे सद्गुण उतरलेले आहेत, हे नाकारता येणार नाही. (बोले तो, आमच्या दिवंगत मातुःश्रींनी त्यांच्या उभ्या आयुष्यात बाकी काय वाट्टेल ती पापे केलेली असू (किंवा नसू) शकतीलही, परंतु, (आमच्याकडे पाहून) nobody in their right mind could possibly accuse her of marital infidelity. (शक्यच नाही!)) चालायचेच.)

सई केसकर Mon, 07/09/2026 - 20:39

In reply to by 'न'वी बाजू

>>(आमच्याकडे पाहून) nobody in their right mind could possibly accuse her of marital infidelity.

इथे तुमच्या मातोश्रींच्या काही गुणांकडे किंवा त्यांच्या अभावांकडे निर्देश दिसतो. But the truth is (and most of my good girl friends hold the same view) that what is the effing point? पुन्हा पकडापकडीचा खेळ खेळून शेवटी आहे त्यासारखंच काहीतरी मिळणार आहे. किंवा even worse! So why bother? हल्ली तर आम्ही आमच्या क्रमवारीच्या यादीत पहिला नंबर झोपायला (म्हणजे एकट्याने निद्रादेवीची आराधना करणे) देतो. कारण दिवसभरातील सर्वात आकर्षक गोष्ट घरी जाऊन झोपणे हीच असते.
So I would say your दिवंगत मातोश्री was a smart woman. आणि तुम्हाला नक्कीच त्याचं ते चांगलं dna मिळालं आहे. परवा माझ्या नवऱ्याने कुठुनतरी माहिती आणली की मुलांची बुद्धिमत्ता आईवर असते. And I was like "thank Darwin for that!"
---
यावरून आणखीन एक विनोद आठवला. कुणी सांगितला ते आठवत नाही.
आजच्या पिढीतली एक मुलगी तिच्या आजीला सांगत असते की ती आणि तिचा नवरा monogamous पण polyamourous आहेत. मग आजी विचारते "म्हणजे काय गं?" तर ती सांगते की आम्ही लग्न एकाशीच करतो पण प्रेम कितीहीवेळा कुणाशीही करू शकतो.
मग आजी म्हणते, "अच्छा, आमच्या काळी आम्ही याला लफडं म्हणायचो"

'न'वी बाजू Mon, 07/09/2026 - 21:08

In reply to by सई केसकर

नाही, मुद्दा असा काहीच नव्हता; केवळ एक (अवांतर) निरीक्षण नोंदविले, इतकेच. Not that it matters; त्यातून काहीही सिद्ध (किंवा असिद्ध) करण्याचा उद्देश नव्हता.

बाकी, (तुमच्या विनोदाच्या संदर्भात) The more things change, the more they stay the same इतकेच (पुन्हा, अवांतर) निरीक्षण नोंदवून गप्प बसतो.

कुटुंबवत्सल हत्ती Sat, 05/09/2026 - 22:14

In reply to by सई केसकर

डबलडेकर हत्ती हे नाव आवडले. आता यापुढचे नाव डबलडेकर हत्ती हे घेणार.

कुटुंबवत्सल हत्ती Sat, 05/09/2026 - 19:48

या प्रतिसादाबरोबर चौथे शतक ठोकले आहे. मी कितीही शतके ठोकली तरी मी आहे एक चुक्कूचुक्कूनर्तक हत्ती. प्रचंड मोठा. महाकाय. कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 08/09/2026 - 20:20

जागतिक साक्षरता दिन 

सगळ्यांना, विशेषत: साक्षर ऐसीकरांना जागतिक साक्षरता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने ऐसीवरील साक्षर सदस्यांनी साक्षरतेचे ऐसीवर किती फायदे झाले याविषयी एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात अजिबात शंका नाही.

'न'वी बाजू Tue, 08/09/2026 - 20:58

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

निरक्षरांचे ‘ऐसीअक्षरे’ (की ‘ऐसेअंगठे’?) कसे असते, याची कल्पना करून पाहातोय. जमत नाहीये.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 08/09/2026 - 20:25

स्वातंत्र्यदिन : मॅसडोनिया (१९९१)
 

मॅसडोनियाच्या लोकांना, विशेषत: तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने मॅसडोनियात वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांनी त्या देशाचा इतिहास, भूगोल, तिथल्या लोकांचे राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी, त्या देशाची संस्कृती आणि त्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. मॅसडोनियात हत्ती किती, हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का आणि हत्तींना कशी वागणूक मिळते याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा ही आग्रहाची विनंती. ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने तो लेख हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात अजिबात शंका नाही.

कुटुंबवत्सल हत्ती Thu, 10/09/2026 - 19:40

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
 

सगळ्यांना, विशेषत: आत्महत्या प्रतिबंधाच्या क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांना जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने आत्महत्या प्रतिबंधाच्या क्षेत्रात कामाला असलेल्या ऐसीकरांनी आत्महत्या रोखायला ते कोणते उपाययोजना करतात आणि लोकांचे जीव कसे वाचवतात याविषयी एखादा लेख लिहिला  तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात अजिबात शंका नाही.

अभ्या.. Sat, 12/09/2026 - 16:53

नांदणी-कोल्हापूरकर मठवाल्यांनी माधुरी हत्तीणीला परत आणले बरं का वनतार्‍यातून.
कोल्हापूरकरांनी महाग झालेली साखर वाटली म्हणे ट्रेलरमधून.
अभिनंदन समस्त हत्तीवर्गांचे आणि अनंत कोटी नायकाचे

कुटुंबवत्सल हत्ती Sat, 12/09/2026 - 18:17

In reply to by अभ्या..

या निमित्ताने माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोणी कोणी आणि कसे कसे प्रयत्न केले, त्यात कोणत्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली यावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठव वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.

'न'वी बाजू Wed, 16/09/2026 - 08:04

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

मुक्काम पोष्ट डबलडे.

  • डबलडे देवाचे, की डबलडे चोराचे?
  • डबलडे दाभाडे, की डबलडे ढमढेरे?

(अशीच एक करपटढे-सीरीज़सुद्धा सुरू करता येईल.)

कुटुंबवत्सल हत्ती Fri, 18/09/2026 - 20:36

गणितज्ञ लेनर्ड ऑयलर (१७८३)
सिनेदिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी (१९९९), 
साहित्यिक शिवाजी सावंत (२००२) 

विनम्र अभिवादन.
 

कुटुंबवत्सल हत्ती Sat, 19/09/2026 - 16:58

हत्तीखान्याची पाच हजारहून जास्त वाचने झाली आहेत. ऐसीवरील सगळ्या हत्तींच्या चाहत्यांचे मनापासून आभार.

'न'वी बाजू Sat, 19/09/2026 - 19:32

…डबलड्याच्या एस.टी. स्टँडवरून पहाटे पाच वाजता निघणारी एस.टी., पहाटे बरोबर पाच वाजता निघाली.

(क्रमशः. इतरांनी अवश्य पूर्ण करावी. पूर्ण करण्यासाठी, पाच वाजून एका मिनिटाने तिला खड्ड्यात घातली, तरीही चालेल.)

सई केसकर Sun, 20/09/2026 - 07:59

आम्ही सुचवलेलं नाव हत्ती कुटुंबाने धारण केलं त्याबद्दल त्यांचे आभार. हत्तीची आत्या होण्याचा मान आम्हाला मिळाला.

…डबलड्याच्या एस.टी. स्टँडवरून पहाटे पाच वाजता निघणारी एस.टी., पहाटे बरोबर पाच वाजता निघाली.
घाटातून बस चालली असता अचानक झाडीतून एक हत्तींचा कळप रस्ता ओलांडू लागला..

'न'वी बाजू Sun, 20/09/2026 - 11:05

In reply to by सई केसकर

एस.टी. ड्रायव्हरला अर्थात याची सवय होती. ते डबलडे राष्ट्रीय हत्ती अभयारण्यामधले नेहमीचे हत्ती होते; ओळखीचेच होते. किंबहुना, पाच वाजता डबलड्याच्या एस.टी. स्टँडवरून सुटणारी एस.टी. घाटातून जाण्याच्या त्या ठराविक वेळेस घाट ओलांडण्याचा त्यांचा परिपाठच होता. पूर्वीच्या काळी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आगगाड्या घाटात ब्रेकतपासणीच्या निमित्ताने मंकीहिल नावाच्या ठिकाणी थांबत. पैकी, सकाळच्या गाड्यांकरिता ती (ब्रेकतपासणीबरोबरच) ब्रेकफास्टचीही वेळ असे. ती वेळ नेमकी साधून घाटातली माकडे सहकुटुंब सहपरिवार पोराबाळांसह येऊन रुळांच्या आजूबाजूस रांगा लावत, जेणेकरून गाडीतल्या प्रवाश्यांनी त्यांना आपल्या ब्रेकफास्टमधून काही खाऊ घालावे. डबलडे राष्ट्रीय हत्ती अभयारण्यातील हत्तींचे असेच होते. पाच वाजता डबलड्याहून सुटणारी एस.टी. घाटातून जाण्याच्या वेळेस नेमके ते घाट ओलांडीत. एस.टी.तील प्रवासी त्यांना आपल्याजवळची केळी, ऊस, मक्याची कणसे, बटाटेवडे, खरवस, मटारउसळ नि आणखी कायकाय खाऊ घालीत. किंबहुना, एखाद्या प्रवाश्याजवळ हत्तींना देण्याजोगे काहीच नसेल, तर अशा नतद्रष्ट प्रवाश्यांच्या सोयीकरिता आजूबाजूच्या गावांतील गावकरी सकाळीसकाळी घाटात केळी, ऊस, मक्याची कणसे, बटाटेवडे, खरवस, मटारउसळ नि आणखी कशाकशाचे स्टॉल मांडून त्यात्या गोष्टी विकावयास बसत. (काही डांबीस प्रवासी, स्टॉलवरून जिनसा विकत घेऊन त्या हत्तींना खाऊ घालण्याऐवजी स्वतःच गट्टमस्वाहा करीत; परंतु, गावकऱ्यांना काय त्याचे? त्यांना त्यांचा माल खपल्याशी मतलब!) एकंदरीत, आजूबाजूच्या गावांची इकोसिस्टीम येणेकरून सुखेनैव चालू होती; तिला गालबोट (किंवा, (देवदत्तच्या स्मृतीस अभिवादन करून) गालजहाज, किंवा अगदी गालएस.टी.सुद्धा) लागण्यासारखे आजतागायत पंचक्रोशीत काहीही घडलेले नव्हते.

(क्रमशः.)


(कथेच्या या भागाच्या प्रायोजकाची (छोटी) जाहिरात:
 

गालबोट (किंवा गालजहाज, किंवा गालएस.टी.) लागण्यावरील जालीम तथा रामबाण इलाज: हत्तीछाप आल्याच्या वड्या. एकदा खा आणि खात्री करून घ्या. डबलड्याच्या घाटातील अथवा करपटढ्याच्या बंदरावरील कोठल्याही स्टॉलवर शंभर रुपयांच्या इतर खरेदीबरोबर दहा वड्या फुकट मिळतात. मळमळ थांबल्यास (तथा जगल्यावाचल्यास) पैसे (आल्याच्या वड्यांचे. इतर खरेदीचे नव्हेत.) परत! आमची इतरत्र कोठेही शाखा नाही.

प्रायोजकाची जाहिरात समाप्त.)

सई केसकर Sun, 20/09/2026 - 15:28

In reply to by 'न'वी बाजू

सॉरी. एसटीतून प्रवास करताना खायला ऊस घेऊन जाणे हा प्रकार मी एकदाच बघितला आहे. त्यासाठी खिडकीची जागा पकडतात. आणि उसाची साल दाताने सोलत सोलत ती खिडकीतून, सीतेने पुष्पक विमानातून टाकले,तसे दागिने टाकल्यासारखी टाकतात. नंतर चावून झालेला चोथही तसाच टाकतात. कुणी आपल्या श्रुतिकक्षेच्या आत सफरचंद (न कापता) खात असेल तर जसा आवाज येतो त्यापेक्षा वाईट आवाज ऊस खाताना येतो.
...
तर खास डबलडे गावातून निघणाऱ्या एसटी स्टँडचा ऊस घेऊन जाण्याला मज्जाव होता. कारण गाडीत ऊस असला की हत्तींचा कळप गाडीला घेरून, उचलून, ती कलंडवून सगळे ऊस खाली पडेपर्यंत खुळखुळा हलवावा तसा हलवत रहायचा.
मात्र आजच्या गाडीत कसून तपासणी झाली असूनसुद्धा एका मोदक नावाच्या छोट्या मुलाने त्याच्या पिशवीत ऊसाचे ६ तुकडे करून ठेवले होते. त्याला त्याच्या आजीने बजावले होते की घाट संपेपर्यंत ऊस खायचा नाही. पण मोदक पडला हावरट. त्याच्या डोक्यातून ऊस जाईना. आणि ज्या गाडीत ऊस contraband आहे त्या गाडीत आणि घाटातच खाण्यात जी मजा आहे ती गाडी मोठ्या हायवेवर असताना नाही. त्यामुळे त्याने घाट सुरू व्हायच्या आधीच ऊसाचा एक तुकडा काढून कमीत कमी आवाज करत तो खायला सुरुवात केली होती. सीतेला रामाने जसं शोधून काढलं तसं हत्तींनी आपल्याला काढू नये म्हणून तो सालं आणि चोथा त्याच्या खिशात कोंबत होता.

कुटुंबवत्सल हत्ती Sun, 20/09/2026 - 20:48

In reply to by सई केसकर

यापुढील भाग

पण हत्तींचं नाक म्हणजे साधंसुधं नाक नव्हतं; घाटातल्या वाऱ्यावरूनही त्यांना उसाचा वास लागायचा. गाडीने पहिलं तीव्र वळण घेतलं आणि मोदकाने दुसरा घास घेतला, इतक्यात जंगलाच्या बाजूने एक जोरदार चीत्कार ऐकू आला. कंडक्टरने क्षणभर ड्रायव्हरकडे पाहिलं आणि ड्रायव्हरने आरशातून प्रवाशांकडे—कारण दोघांनाही त्या आवाजाचा अर्थ चांगलाच माहीत होता. मोदकाने घाईघाईने उरलेला ऊस पिशवीत ढकलला, पण त्याच्या गालातला मोठा घास आणि खिशातून बाहेर डोकावणारी उसाची साल त्याच्या गुन्ह्याची साक्ष देत होती. पुढच्या वळणावर रस्त्याच्या अगदी मधोमध तीन हत्ती उभे दिसले आणि मोदकाच्या आजीने त्याच्याकडे अशी नजर टाकली की त्या क्षणी त्याला हत्तींपेक्षा तिचीच जास्त भीती वाटली.

सई केसकर Wed, 23/09/2026 - 14:14

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

हत्तींनी बसला घेरले. एक पुढे एक मागे आणि एक दरीच्या बाजूला असे ते उभे राहिले आणि हळूहळू दरीकडे असलेल्या हत्तीने खिडकीतून सोंड घालून प्रत्येक सिटाची तपासणी करायला सुरुवात केली. मोदक आजीशी भांडून नेमका खिडकीत बसला होता. आजीने वातावरण बघून पटकन खिडकीतली जागा घेतली आणि मोदकाला आईल दिला (आईलला मराठीत काय म्हणतात?). पण हत्तीने बरोबर ओळखलं. यावेळी सगळी बस उलटी करण्यापेक्षा आपण या पिल्लाला उचलावे असा ऊर्जाबचाव निर्णय घेऊन हत्तीने एस्टीच्या खिडकीचे गज उपसले. आणि सोंड आत घालून मोदकाला उचलले. तो त्याला बाहेर ओढू लागला. आजी भोकाड पसरून मदत मागू लागली. दोन तीन लोक पुढे आले पण सोंडेने मोदकाच्या कमरेला विळखा घातल्याने काहीच करता येईना. क्षणार्धात हत्तीने मोदकाला बाहेर काढले आणि डोंगराच्या बाजूने चालू लागला. काम फत्ते झाल्याच्या आनंदात इतर हत्तीही जंगलात गेले. मागून काही लोक जंगलात धावत गेले पण हत्तीसमोर नेमके काय करावे याचा त्यांना काहीच अनुभव नव्हता. शेवटी ते कंटाळून परत आले. मोदकाच्या आजीची येणाऱ्या बसमधून परत जायची व्यवस्था केली आणि तिला घरी पाठवून दिले. ती रडत रडत त्याच्या आई बाबांना काय झालं ते सांगू लागली. मग सुनेने तिच्या भटकण्याची हौस, सगळीकडे मोदकाला काखोटीला बांधून नेणे, घरात काहीही न करता सतत पोथी वाचत बसणे वगैरे सगळ्याचा त्राग्याने पाढा वाचला. मग ती ओक्साबोक्शी रडायला लागली. मोदकाची मोठी बहिणही खूप रडू लागली. शेवटी त्याचा बाबा म्हणाला की तो काही मित्रांना घेऊन जंगलाचा कोपरा न कोपरा शोधून काढेल. आणि लगेच तिच्या मुलाला घरी घेऊन येईल. तोपर्यंत पोलिसातही तक्रार गेली होती.
पण इथे हत्तीना लक्षात आले की उसाच्या नावाखाली त्यांच्या गळ्यात फुकटच एक माणसाचे पिल्लू पडले आहे. याला जंगलात टाकून द्यावे तर त्याला वजन नाही, नखं नाहीत, धारदार दात नाहीत, दोनच पाय. याचं करायचं काय?
मग त्याच्या आकारमानाचा विचार करता, आणि माणसांच्या एकूणच बेरकीपणाचा अनुभव असल्याने, त्यांनी त्याला एका लांडग्यांच्या कळपाकडे सुपूर्द केले. कारण हत्तींनी आधीच जंगल बुक वाचले होते. आणि पुन्हा हत्तींच्या नावाने तसेच एक पुस्तक येऊन प्रसिद्ध होण्याची शक्यता कमी हे बुद्धीमान हत्तींच्या लगेच लक्षात आले. म्हणून यापुढील गोष्टीसाठी रुडयार्ड किपलिंग यांचे जंगल बुक वाचावे. मोदकाचे पुढे मोगली असे बारसे झाले कारण लांडग्यांनीदेखील जंगल बुक वाचले होते.

कुटुंबवत्सल हत्ती Wed, 23/09/2026 - 16:32

In reply to by सई केसकर

लांडग्यांच्या कळपाने मोदकाला प्रथम हुंगून, मग दोन फेऱ्या मारून आणि शेवटी त्याच्या पिशवीत उरलेल्या उसाची खातरजमा करून आपल्या कळपात तात्पुरता प्रवेश दिला.
मोदकाला मात्र आपण अपहरण होऊन जंगलात आलो आहोत यापेक्षा आजीने घरी गेल्यावर आईला सगळा प्रकार सांगितला असेल, याचीच जास्त काळजी वाटत होती.
एका लांडगिणीने त्याच्यासमोर कच्च्या मांसाचा तुकडा आणून ठेवला तेव्हा त्याने नाक मुरडून, “याच्याबरोबर निदान चटणी तरी नाही का?” असे विचारल्यावर संपूर्ण कळपाने त्याच्याकडे संशयाने पाहिले.
सुदैवाने जवळच पडलेली दोन करवंदे आणि पिशवीतला उसाचा एक शिल्लक तुकडा मिळाल्यामुळे त्या रात्री त्याच्या जेवणाचा प्रश्न कसाबसा मिटला.
पण दुसऱ्या दिवशी पहाटे लांडग्यांनी त्याला चार पायांवर धावण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली, आणि तेव्हा मोदकाला प्रथमच जाणवले की जंगल बुक वाचणे आणि प्रत्यक्ष जंगल बुकमध्ये जाऊन पडणे या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 22/09/2026 - 11:45

स्वातंत्र्यदिन : बल्गेरिया (१९०८), माली (१९६०)
 

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने बल्गेरिया आणि मालीच्या लोकांना, विशेषत: तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. तिकडे स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला याविषयीही लिहावे ही विनंती. या निमित्ताने त्या देशांचा स्वातंत्र्यलढा, इतिहास, भूगोल, हवामान, समुद्रकिनारे, पर्वतरांगा, वाळवंटे, महत्त्वाची शहरे, उद्योगधंदे, वन्य प्राणी, वनस्पती, तिथल्या लोकांचा आहार, शिक्षणसंस्था, त्या देशांनी जगावर कोणत्या प्रकारे आपला ठसा उमटवला आहे या सगळ्यांचा परामर्श करणारा एखादा लेख लिहावा अशी तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना विनंती. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती, हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का आणि त्या देशात हत्तींना कशी वर्तणूक मिळते याचाही अंतर्भाव त्या लेखात जरूर करावा ही आग्रहाची विनंती. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. 

कुटुंबवत्सल हत्ती Wed, 23/09/2026 - 18:22

सिलिगुडी मध्ये नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या हत्तीच्या पिल्लाला वाचवून परत काठावर आणले आणि त्याच्या आईकडे दिले हा व्हिडिओ बघितला. त्या मासेमारांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्या गजमाऊलीने त्यांचे किती वेळा आभार मानले असतील. ते पिल्लू चार दिवसांचे होते.

त्या मासेमारांना समस्त हत्ती परिवाराकडून धन्यवाद

कुटुंबवत्सल हत्ती Fri, 25/09/2026 - 15:55

१९६२ : अल्जिरिया प्रजासत्ताक झाले.
 

प्रजासत्ताकदिनानिमित्ताने अल्जिरियाच्या लोकांना, विशेषत: तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. तिकडे प्रजासत्ताकदिन कसा साजरा केला याविषयी लिहावे ही विनंती. या निमित्ताने त्या देशांचा स्वातंत्र्यलढा, इतिहास, भूगोल, हवामान, ऋतु, समुद्रकिनारे, पर्वतरांगा, वाळवंटे, महत्त्वाची शहरे, उद्योगधंदे, वन्य प्राणी, वनस्पती, तिथल्या लोकांचा आहार, शिक्षणसंस्था, त्या देशांनी जगावर कोणत्या प्रकारे आपला ठसा उमटवला आहे या सगळ्यांचा परामर्श करणारा एखादा लेख लिहावा अशी तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना विनंती. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती, हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का आणि त्या देशात हत्तींना कशी वर्तणूक मिळते याचाही अंतर्भाव त्या लेखात जरूर करावा ही आग्रहाची विनंती. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. 

 

कुटुंबवत्सल हत्ती Mon, 28/09/2026 - 11:45

राष्ट्रदिन – चेक प्रजासत्ताक


राष्ट्रदिनानिमित्ताने चेक प्रजासत्ताकाच्या लोकांना, विशेषत: तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना हार्दिक शुभेच्छा. तिकडे राष्ट्रदिन कसा साजरा केला याविषयी लिहावे ही विनंती. या निमित्ताने त्या देशांचा स्वातंत्र्यलढा, इतिहास, भूगोल, हवामान, ऋतु, समुद्रकिनारे, पर्वतरांगा, वाळवंटे, महत्त्वाची शहरे, उद्योगधंदे, वन्य प्राणी, वनस्पती, तिथल्या लोकांचा आहार, शिक्षणसंस्था, त्या देशांनी जगावर कोणत्या प्रकारे आपला ठसा उमटवला आहे या सगळ्यांचा परामर्श करणारा एखादा लेख लिहावा अशी तिथे वास्तव्याला असलेल्या ऐसीकरांना विनंती. तसेच त्या देशांमध्ये हत्ती किती, हत्तींसाठी अभयारण्ये आहेत का आणि त्या देशात हत्तींना कशी वर्तणूक मिळते याचाही अंतर्भाव त्या लेखात जरूर करावा ही आग्रहाची विनंती. तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. 

'न'वी बाजू Mon, 28/09/2026 - 21:16

In reply to by कुटुंबवत्सल हत्ती

या निमित्ताने त्या देशांचा स्वातंत्र्यलढा,

चेक प्रजासत्ताकाचा (चेकियाचा) 'स्वातंत्र्यलढा' असू शकतो का? 

चेकोस्लोवाकियाचा असू शकतो. चेक प्रजासत्ताकाचा (चेकियाचा) किंवा स्लोवाकियाचा माझ्या कल्पनेप्रमाणे असू शकत नाही. (चूभूद्याघ्या.)

(माझ्या माहितीप्रमाणे, (सोविएत वर्चस्वातून मुक्त झालेल्या) चेकोस्लोवाकियाचे पुढे विघटन (फाळणी) होऊन त्यातून चेक प्रजासत्ताक (उर्फ चेकिया) आणि स्लोवाकिया हे दोन देश अत्यंत सौहार्दपूर्ण रीत्या, कोठल्याही प्रकारची मारामारी न होता, परस्परसामंजस्याने विलग झाले. (म्हणूनच याला velvet divorce की कायसेसे म्हणतात.) सबब, चेक प्रजासत्ताकाचा (उर्फ चेकियाचा) (किंवा स्लोवाकियाचासुद्धा) वेगळा असा स्वातंत्र्यलढा असू शकत नाही.)

(फार कशाला, वर चेकियाच्या ज्या 'राष्ट्रदिना'चा उल्लेख आहे, त्या 'राष्ट्रदिना'चासुद्धा, चेकियाच्या किंवा अगदी चेकोस्लोवाकियाच्यासुद्धा स्वातंत्र्याशी यत्किंचितही संबंध नसून, अनेक शतकांपूर्वी चेकियाचा जो रक्षकसंत (पेट्रन सेंट, किंवा त्याला मराठीत 'बापसंत' म्हणू या का?), त्याचा जो खून झाला, त्या खुनाच्या तारखेशी आहे, असे कायसेसे विकीपीडियावरून समजते. (चूभूद्याघ्या.))

(अगदी सैलसर समांतर उदाहरण द्यायचे झाल्यास, ३० जानेवारी १९४८ला भारताचा 'राष्ट्रदिन' म्हणून जर घोषित केले, तर कसे होईल, तशातली गत. अर्थात, या उदाहरणाचे सामांतर्य सैलसर आहे, कारण, (१) महात्मा गांधी हे प्राचीन नसून बर्‍यापैकी अर्वाचीन होते, (२) महात्मा गांधींचा भारताच्या स्वातंत्र्याशी किंवा गेला बाजार भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी थेट संबंध होता, तथा (३) महात्मा गांधी हे भारताचे 'राष्ट्रपिता' म्हणून जरी घोषित केलेले असले, तरी, भारताचे 'रक्षकसंत' वगैरे नव्हेत. (किंबहुना, महात्मा गांधींच्या हयातीत (नि त्यांच्या ऐकण्याच्या अंतरात) जर त्यांचा कोणी भारताचे 'रक्षकसंत' वगैरे म्हणून उल्लेख केला असता, तर ते (अ) बाटून ख्रिस्ती झाले असते, (ब) त्यांनी (नथुरामाची वाट न पाहता) जीव दिला असता, आणि (क) स्वतःचे थडगे स्वतः खणून, त्यात स्वतःच्या पावलांनी प्रवेश करून, मुक्तिदिनापर्यंत किंवा जगाच्या अंतापर्यंत (whichever comes first) त्यात गरागरा फिरत बसले असते. पण लक्षात कोण घेतो?))

असो चालायचेच.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 29/09/2026 - 15:44

In reply to by 'न'वी बाजू

अशाप्रकारच्याच वैचारीक उहापोहांमधून ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत होत असते.
चेक प्रजासत्ताकाला स्वातंत्र्यदिन नसेल तर त्यांना स्वातंत्र्यदिन नाही एवढे एक वाक्य त्या लेखात लिहिता येईल. चिलीमध्ये हत्ती नाहीत असे नव्हते का त्या लेखात लिहिले होते- तसेच.

कुटुंबवत्सल हत्ती Tue, 29/09/2026 - 15:56

आंतरराष्ट्रीय कॉफी दिन 

 

सगळ्या कॉफीप्रेमींना, विशेषत: त्यामधील ऐसीकरांना आंतरराष्ट्रीय कॉफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा आंतरराष्ट्रीय कॉफी दिन सुखसमाधानाचा आणि समृध्दीचा जाऊ दे ही सदिच्छा. या निमित्ताने ऐसीवरील कॉफीप्रेमींनी कॉफी या विषयावर एखादा लेख लिहिला तर ते खूप चांगले होईल. कॉफीचे वेगवेगळे प्रकार, त्यांचे गुणधर्म, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफींच्या चवीत काय फरक असतात, कॉफी जगात लोकप्रिय कशामुळे झाली, कॉफीचे मळे कुठे आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये कॉफीचे किती उत्पादन होते. कॉफीच्या बियांपासून कॉफीची भुकटी बनवायची प्रक्रीया, कॉफीत असलेली वेगवेगळी द्रव्ये, विशेषत: झोप उडविणारी द्रव्ये, कॉफी उद्योगात कोणत्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांची धोरणे काय आहेत, जगात आणि भारतात कॉफीचे मार्केट किती मोठे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीच्या किंमती किती वगैरे गोष्टींचा उहापोह त्या लेखात असावा ही अपेक्षा. तसेच हत्तींना कॉफी आवडते का- आवडत असल्यास त्याचे कारण काय आणि आवडत नसल्यासही त्याचे कारण काय याचाही त्या लेखात अंतर्भाव करावा ही आग्रहाची विनंती.
 

तो लेख ऐसीचे विचारसौष्ठत्व वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही.

सई केसकर Tue, 29/09/2026 - 16:19

https://www.npr.org/sections/thesalt/2014/08/20/340154271/no-1-most-exp…

या निमित्ताने तुमचे पुढील नाव शेणकॉफीहत्ती असावे असे सुचवते. याबद्दल राग मानायचे काहीच कारण नाही कारण ही जगातील सर्वात महाग कॉफी आहे. त्यामुळे मिसेस अंबानींच्या पाचूचा कान असलेल्या सोन्याच्या कपात तिला स्थान असावे.

'न'वी बाजू Tue, 29/09/2026 - 17:19

In reply to by सई केसकर

…हत्तीच्या कोमल(?) पचनसंस्थेचून टनावारी कॉफीफळे सारणे हा हत्तीवर अत्याचार नव्हे काय? त्यातून हत्तीच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होण्याची शक्यता विचारात घेतली आहे काय?

इथे आमच्या इकडल्या क्यालिफोर्नियातली ॲनिमल वेल्फेअरवाली मंडळी साध्या पाते द फ्वा ग्राच्या नावाने शंख करतात. तो प्रकार जर आक्षेपार्ह आहे, तर मग हा प्रकार तर त्याचा बाप आहे!

लक्षात घ्या. ‘कोपी लुवाक’मध्ये ऊदमांजर वापरतात. तेही खरे तर (वरील न्यायाने) आक्षेपार्हच; परंतु, निदान ऊदमांजर हे एवढेस्से असते, त्याची पचनसंस्था ती केवढीशी असणार, नि त्यातून एका वेळेस कॉफीफळे ती कितीशी जाणार? याउलट, हत्ती एवढा भला मोठा, त्याची पचनसंस्थाही भली मोठी, ती भरभरून जर कॉफीफळे त्यात कोंबली, नि (वादाच्या सोयीकरिता) समजा त्यातील एक टक्का कॅफीन जरी तिने शोषून घेऊन ते जर हत्तीच्या रक्तप्रवाहात भिनले, तर हत्तीला कसला कॅफीन हाय येईल, याचा कोणी विचार केला आहे काय? (तेदेखील रिकाम्या पोटी…)

नाही म्हणजे, लोकांचा होतो नफा, हत्तीस मात्र काळ…


जाता जाता:

हा प्रकार सुरू करणाऱ्या मनुष्याचे आडनाव Dinkin असे आहे, ही बाब लक्षात घेता, एक मनोहर कल्पना सुचते. या माणसाने (‘तसल्या’) कॉफीचे (म्हणजे, (‘तसल्या’) पेय कॉफीचे. केवळ (‘तसली’) कॉफीपूड विकणारे नव्हे.) दुकान काढावे, त्यात (‘तसल्या’) कॉफीसोबत डोनट विकावेत, नि दुकानाला नाव द्यावे: Dinkin Donuts.

सई केसकर Tue, 29/09/2026 - 17:57

In reply to by 'न'वी बाजू

ते हत्तीला १००% कॉफी खायला देत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की हत्ती कॉफीची फळे आपणहून जेवढी खातील तेवढीच आम्ही त्यांना देतो. बाकी हिरवा चारा वगैरे. पण मुळात फर्मेंट करून कॉफी चांगली होते हे माहिती आहे. मग हत्तीच्या पोटाचा फर्मेंटर का करायचा? हत्तीच्या पोटात काय enzymes तयार होतात ते शोधून काढणे कठीण नाही. त्यांची कल्चर बनवणे कठीण नाही. मग हत्तीच्या शेणातून उत्खनन का करावे? आणि कुणी ते सोन्याच्या भावात का घ्यावे? म्हणजे घेणारे घेतात. पण जिथे तंत्रज्ञान उपलब्ध आणि जगाला संपवणारे नाही तिथे हत्ती वापरायचा. आणि स्वतःच्या मेंदूने जे लिहिता येईल, वाचता येईल, आणि जे आपल्या आवाक्याबाहेर असेल त्यासाठी त्या क्षेत्रातल्या माणसांशी बोलून बघता येईल अशा गोष्टींसाठी मात्र...

'न'वी बाजू Tue, 29/09/2026 - 19:44

In reply to by सई केसकर

ते हत्तीला १००% कॉफी खायला देत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की हत्ती कॉफीची फळे आपणहून जेवढी खातील तेवढीच आम्ही त्यांना देतो. बाकी हिरवा चारा वगैरे.

त्यांच्या (म्हणजे तसल्या "उद्योजकां"च्या नि भांडवलदारांच्या) "म्हणण्या"वर जर तुमचा इतक्या सहजासहजी विश्वास बसत असेल, तर मग माझ्याकडे तुम्हाला विकण्यासाठी कित्येक पूल पडलेले आहेत. बोला, लकडी घेताय, की बालगंधर्व? की म्हात्रे चालेल? स्वस्तात देतो! (तिन्हीं घेतलेत, तर दांडेकर फुकटात देईन.)

साधी गोष्ट:

हत्ती कॉफीची फळे आपणहून जेवढी खातील तेवढीच आम्ही त्यांना देतो.

मुळात हत्ती कॉफीचे फळ आपण होऊन एक तरी कशाला खाईल? (तुम्ही खाल काय?) उगाच काहीतरी आपले!

हत्तीच्या पोटात काय enzymes तयार होतात ते शोधून काढणे कठीण नाही. त्यांची कल्चर बनवणे कठीण नाही. मग हत्तीच्या शेणातून उत्खनन का करावे? आणि कुणी ते सोन्याच्या भावात का घ्यावे?

"There's a sucker born every minute" असे P.T. Barnum की कोणीसा म्हणून गेलेला आहेच ना? "दुनिया झुकती है..." चालायचेच.

पण जिथे तंत्रज्ञान उपलब्ध आणि जगाला संपवणारे नाही तिथे हत्ती वापरायचा. आणि स्वतःच्या मेंदूने जे लिहिता येईल, वाचता येईल, आणि जे आपल्या आवाक्याबाहेर असेल त्यासाठी त्या क्षेत्रातल्या माणसांशी बोलून बघता येईल अशा गोष्टींसाठी मात्र...

हम्म्म्म्म्... मुद्दा चांगला आहे! (पण लक्षात कोण घेतो?)

चिंतातुर जंतू Wed, 30/09/2026 - 07:55

In reply to by 'न'वी बाजू

मुळात हत्ती कॉफीचे फळ आपण होऊन एक तरी कशाला खाईल? (तुम्ही खाल काय?) उगाच काहीतरी आपले!

कॉफीच्या फळांची बदनामी थांबवा! ती चवीला चांगली लागतात.

'न'वी बाजू Wed, 30/09/2026 - 14:41

In reply to by चिंतातुर जंतू

आता तुम्हीच म्हणताय, म्हटल्यावर, लागत असतीलही चांगली! आपल्याला काही अनुभव नाही ब्वॉ. एटले, mea culpa.

(विदाबिंदूची नोंद करून घेण्यात आलेली आहे.)


(मांजरमारे कुतूहल: कशी लागतात?)