Skip to main content

ज़िंदगी एक सफ़र है

1 minute

"आयडे, परवा आपण दोघी रस्ता क्रॉस करताना ते गाणं म्हणत होतीस ना " ज़िंदगी एक सफ़र है सुहाना".. त्याची दुसरी ओळ सारखी सारखी विसरतेय मी. ए सांग ना मला. "

"आणि बाबाला विचारलं तर इतक्या भसाड्या आवाजात म्हणून दाखवेल की मी हसेन आणि तो चिडून माझा गालगुच्चा घेईल, मग मी चिडेन अन् तो हसेल. नकोच ते"

" ए आई सांग ना ती ओळ"

" आणि आई, ही दिवाळीची पणती दुपारीच का लावून ठेवलीय? गणपतीत कोणी दिवाळी करतं का?"

" ए आयडे, काही बोलतच का नायैस तू? .तू आपली सारखी त्या पणती मागच्या फोटोकडेच बघतीयेस."

"एवढं कायै त्यात...?"

" अगं ...हा फोटो.. तर..
मा..
..झा?"

Node read time
1 minute

'न'वी बाजू Thu, 01/10/2026 - 21:56

नायिकेच्या मृत्यूचे कारण मोटारीखाली सापडून, की बुडून?

anant_yaatree Fri, 02/10/2026 - 13:47

In reply to by 'न'वी बाजू

आपणांस ही कथा (चूभूद्याघ्या) कळली (चूभूद्याघ्या) हे कळले.

नायिकेच्या मृत्यूच्या कारणाबाबत आपण जी मूलभूत शंका उपस्थित केली आहे तिचे निराकरण करण्यासाठी (अंनिसने कोलदांडा न घातल्यास) सदर मृतात्म्यास (ई मृ शां दे) planchette वर लौकरच बोलावण्याचा विचार आहे.