Skip to main content

स्मार्ट साधने



स्मार्ट साधने
======

राजीव उपाध्ये


मंडळी

मी ए०आय० प्रमाणेच वेअरेबल म्हणजे परिधानक्षम तंत्रज्ञानाचा खंदा समर्थक आहे. तंत्रज्ञानाच्या मर्यादांचे भान ठेवल्यास त्याचा योग्य उपयोग करून फायदा करून घेता येतो अशी माझी ठाम श्रद्धा आणि अनुभव आहेत.

त्यामुळे या क्षेत्रात नवीन काय होत आहे यावर मी सतत लक्ष ठेऊन असतो. सध्या उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये ॲपलच्या स्मार्ट घड्याळांमुळे अनेकांना योग्य वेळी सूचना मिळाल्याने जीव वाचल्याच्या बातम्या अधूनमधून वाचायला मिळतात. पण ॲपलच्या उत्पादनांच्या किमती सर्वसामान्याना परवडणार्‍या नसतात. पण आता चिनी लोकांच्या कृपेमुळे त्याच दर्जाची उत्पादने स्वस्तात उपलब्ध होत आहेत.

अनेक वर्षांपूर्वी जेव्हा रक्तदाब आणि रक्तशर्करा मोजणारी उपकरणे बाजारात आली तेव्हा वैद्यकीय व्यावसायिक नाके मुरडून या साधनांद्वारे केलेली निरीक्षणे झुरळासारखी झटकून टाकत असत. पण या उपकरणांनी चिवटपणे सामान्य माणसाच्या आयुष्यात आरोग्य-निरीक्षणात जम बसवला, हा इतिहास सर्वश्रुत आहे.

सध्या अत्यंत लहान वयात अपमृत्युच्या बातम्या खुप ऐकायला मिळतात आणि भयानक अस्वस्थ करतात. ताण हे त्याचे प्रमुख कारण. मुख्य म्हणजे ऐन विशी-तिशीतले डॉक्टर हृदयविकाराला बळी पडतात तेव्हा खुद्द वैद्यकीय क्षेत्र कुठेतरी गंडलेले आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. गंडलेले आहे हा काहीसा अपमानकारक शब्द मुद्दामूनच वापरला कारण जे स्वत:ला वाचवू शकत नाहीत ते इतरांना काय मदत करणार?

शरीरावरचा आणि मनावरचा ताण हा अनेकांना अजुनही हसण्यावारी न्यायची गोष्ट वाटते. ताणाचे उदात्तीकरण करणारे तत्त्वज्ञान - मनाचा खंबीरपणा शरीराचा खंबीरपणा वाढवतो इ० - केव्हा तुटेपर्यंत ताणते हे नुकसान होईपर्यंत कळत पण नाही.

ताण मोजायची पारंपरिक पद्धत म्हणजे रक्तदाब! पण त्यासाठी घरात मोजण्यासाठी उपलब्ध असलेली मापन यंत्रे तितकीशी सुटसुटीत नाहीत. एखादे निरीक्षण सामान्य आहे की नाही हे बहुसंख्य लोकांना ठरवता येत नाही. त्यामुळे रक्तदाब नियमित मोजला जाईलच असे नाही.

शरीरावरचा किंवा मनावरच ताण जेव्हा वाढतो तेव्हा शरीराची स्वास्थ्यरक्षक यंत्रणा मोडकळीस येते. मग झोप नाहीशी होते, रक्तशर्करा वाढते, ॲलर्जीचा सामना करावा लागतो. साध्या कारणाने संसर्ग वाढतात किंवा आजारपणे येतात.

शरीराच्या स्वास्थ्यरक्षक यंत्रणेची कार्यक्षमता आज रक्तदाबापेक्षा ताणाचा संवेदनशील निर्देशक म्हणून काम करते. याचे मोजमाप आज उपलब्ध असलेल्या अने स्मार्ट साधनांद्वारे करता येते. सर्वात महत्त्वाचे हे तंत्रज्ञान इतके वेगाने प्रगत होत आहे की या साधनांची एक वर्षापूर्वीची अचूकता आणि आजची अचूकता यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

सर्वात महत्त्वाचे एक वर्षापूर्वी ही साधने ठराविक मोजमापे ठराविक अंतराने मोजत होती. साहजिक त्याचा अचूकतेवर परिणाम होत होता. उदा० द्यायचे झाले तर मी दीडवर्षापुर्वी घेतलेल्या दोन अंगठ्यापैकी ’बोट’ मध्ये हृगलचे (हृदयगतीची लवचिकता - एच०आर०व्ही/हार्ट रेट व्हेरिॲबिलीटी) मापन एक तासाने केले जात असे. तसेच एस०डी०एन०एन० आणि आर०एम०एस०एस०डी० या दोन घटकांपैकी कोणता घटक बोट्च्या अंगठीत मोजला जातो हे पण कळायला मार्ग नव्हता.

पण गॅबिटमध्ये[*] आर०एम०एस०एस०डी० चे मापन दर अर्ध्यातासाने केले जाते आणि ते पोलर एच १० च्या (याला एफ़्डीएची मान्यता नसली तरी खेळाडूंच्या जगात गोल्ड स्टॅण्डर्ड मानले जाते. माझा वैयक्तीक अनुभव खुप चांगला आहे) मोजमापाशी तुलना केली असता पुरेसे अचूक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गॅबिटवरील ताणाचे मोजमाप बोटपेक्षा पण बरेच अचूक असल्याचे लक्षात आले.

पण गॅबिटची किंमत सुमारे १४५०० इतकी आहे!

पण नुकताच मी ॲमेझॉन्वर गस्त घालत असताना मला थिरा बेलनेसचा कंपनीचा मनगटावर बांधायचा रिस्ट बॅण्ड दिसला. या रिस्ट बॅण्डच्या फिचर्सची यादी बघून मी वेडा झालो आणि मी लगेच तो ऑर्डरपण केला. हा वापरायला अजुन २४ तास पण उलटले नाहीत पण मला एकावर एक सुखद धक्के बसत आहेत.

याच्या वैशिष्ट्याची यादी

- झोप आणि व्यायामाचे मोजमाप (यात मला फारसा रस नाही) 
- तापमान 
- ऑक्सिजन 
- हृदयाचे ठोके 
- हृगल (एच०आर०व्ही) दर १० मिनिटानी, अचूकता आश्चर्यकारक, माझ्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय)
- रक्तदाबाचे मोजमाप (ओमरॉन बरोबर कॅलिब्रेशन केल्यावर अचूकता आश्चर्यकारक वाढली) 
- रक्तशर्करेचे मोजमाप (ग्लुकोमिटर बरोबर कॅलिब्रेशन चालू आहे.) शुगर स्पाईकची नोंद कळल्यामुळे वेडा झालो.  
- इसीजी (हे वैशिष्ट्य बर्‍यापैकी बाल्यावस्थेत आहे)
- युरीक ॲसिड (कॅलिब्रेशन करायचे आहे)
- कोलेस्टेरॉलचे महत्वाचे घटक (हाय/लो डेन्सिटी, ट्रायग्लिसराईड इ० पण कॅलिब्रेशन करायचे आहे) 
- संपूर्ण शरीराचे मेद, प्रथिने, जल इ० विश्लेषण (याची पण तपासणी करायची आहे)


३ दिवसांच्या वापरानंतर अल्गोरिदम स्थिर होतो असे कंपनीचे म्हणणे आहे. किंमत सात हजार रुपये. मुख्य म्हणजे व्हुपप्रमाणे कोणतेही वार्षिक शुल्क नाही.


ज्यांचे शरीरशास्त्राशी/जीवशास्त्राशी वाकडे नाही, त्यांनी हे उत्पादन जरूर वापरून बघावे. गोर्‍या/निमगोर्‍या आणि पातळ/मध्यम जाडीची कातडी असणार्‍या लोकांना याचा तुलनेने जास्त फायदा होईल, असे वाटते (हे माझे वैयक्तीक मत आहे).

अमेझॉन लिंक-

https://www.amazon.in/stores/TheeraWellness/page/63B06B58-CDF0-49F9-BC8…


 

 

पाषाणभेद Wed, 28/10/2026 - 11:52

हे कसे वापरायचे? आणि रक्त कसे मोजतो? काय तंत्र आहे त्याचे?
सर्व तपासण्यांचे अहवाल काही भ्रमणध्वनीमधील प्रणालीमध्ये उतरावे लागतात का?
अंशांकन कसे करावे? त्यासाठी दुसर्‍या यंत्राची मदत घ्यावी लागते काय? मग दुसरे यंत्र विकत घ्यावे लागते काय?

तर्कतीर्थ Wed, 28/10/2026 - 15:15

श्री० पाषाणभेद,


प्र० हे कसे वापरायचे?

रिस्ट बॅण्ड म्हणजे मनगटावर बांधायचा पट्टा आहे. हे घड्याळ नाही.


प्र० आणि रक्त कसे मोजतो?

ग्लुकोमिटरमध्ये सुई बोटाला टोचून रक्त बाहेर काढले जाते तसे नसते. इथे तांबडा किंवा हिरवा प्रकाश मनगटाच्या कातडीत सोडला जातो. त्याचे परावर्तन मोजुन सर्व मोजमापे केली जातात.


प्राणवायु, रक्तदाब, हृदयगती, हृदयगतीची लवचिकता (एच आर व्ही) ची मोजमापे अचूक आहेत, असे ४८ तासांनंतर लक्षात आले आहे. जे लोक रात्री झोपेत घोरतात त्यांना स्लिप ॲपनिया कितीवेळा होतो, ते पण मोजता येते.


रक्तशर्करेचा अल्गो ज्या वेगाने रक्तशर्करेचे चढ-उतार होतात त्यावेगाने प्रतिसाद देत नाही. याचे मुख्य कारण ही निरीक्षणे दर ५ मिनिटानी नोंदवली जातात. त्यामुळे लॅग निर्माण होतो. स्टॉकचा प्राईस-चार्ट आणि मुव्हींग ॲव्हरेज यात जसे अंतर पडते तसेच इथे ही आहे. त्यामुळे या निरीक्षणांचा उपयोग सतत मॉनिटरींग असले तरी ट्रेण्ड बघण्यासाठीच करावा! ट्रेण्ड कळणे देखिल अनेकदा मधुमेह व्यवस्थापनात अतिशय महत्त्वाचे असते. लोक ग्लुकोमिटर आणि रिस्ट बॅण्ड मधील निरीक्षणांच्या फरकाने घाबरतात आणि या साधनांना दोष देतात.

कोणतेही आपत्कालीन निर्णय घेण्यासाठी ग्लुकोमिटरच वापरावा.

प्र० अंशांकन कसे करावे? त्यासाठी दुसर्‍या यंत्राची मदत घ्यावी लागते काय? मग दुसरे यंत्र विकत घ्यावे लागते काय?

अंशांकन (कॅलिब्रेशन) साठी निश्चित भरवशाचा काहीतरी आधार लागतो. माझ्याकडे १७६० यंत्रे आहेत. त्यामुळे आपल्या डॉ०कडे जाउन रक्तदाबासाठी कॅलिब्रेशन करावे. रक्तशर्करेसाठी पण लॅबमध्ये चाचणी केल्याची वेळ उपलब्ध असल्यास कॅलिब्रेशनसाठी वापरावी.

ॲप उतरवून घेणे आवश्यक पण ते सोपे अणि फुकट आहे, कोणतीही वार्षिक वर्गणी नाही.


माझे वैयक्तीक मत -

अत्यंत अनियंत्रित मधुमेही, तसे टाइप-१ मधुमेहीना हे किती उपयोगी पडेल मला शंका आहे. पण मधुमेह्पूर्व अवस्थेत व्यवथापनासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उत्तम आहे. मुख्य म्हणजे ॲपवर साखर कमी दाखवत असेल तर हायपोग्लायसेमिया असेलच असे नाही! अधुनमधुन ग्लुकोमिटरच वापरून अल्गोचे वर्तन तपासणे आवश्यक आहे.


एक दुरुस्ती

वर हृगलच्या नोंदी १० मि० केल्या जातात असे अनवधानाने म्हटले आहे. प्रत्यक्षात त्या दर ५ मि०नी केल्या जातात. त्यामुळे यात अचूकता कमालीची आहे.
 

अभ्या.. Fri, 30/10/2026 - 16:25

@ राजीवजी,
ते थीराचे कस्टमर रिव्युस फारच वाईट दाखवताहेत हो,
स्पेक्स तर इंटरेस्टींग वाटताहेत पण तुम्हाला आहे म्हणताहात अनुभव तर बघावे म्हणतो घेऊन...

तर्कतीर्थ Fri, 30/10/2026 - 18:30

In reply to by अभ्या..

श्री० अभ्या

माझा रिस्ट बॅण्ड उत्तम चालू आहे.

सामान्य लोकांचा कॅलिब्रेशनमुळे गोंधळ उडू शकतो. तसेच कातडीच्या रंगाचे योग्य सेटींग निवडले नाहीतर अल्गो चुकू शकतो. रक्तशर्करेसाठी अब्सोल्युट रीडींग्साठी ग्लुकोमिटरच वापरावा. पण ट्रेण्डसाठी सीजीएम सेन्सरना हा उत्तम आणि स्वस्त पर्याय आहे.

अभ्या.. Fri, 30/10/2026 - 18:41

In reply to by तर्कतीर्थ

ओके,
धन्यवाद.
कुणी मला ह्याच लेखात हे सुचवेल का?
मला भारतात सुट्टीला महिनाभर यायचे आहे. नंतर पुन्हा वर्षभर युरोपात. तेंव्हा चलनाच्या फरकामुळे आणि वैद्यकीय सेवांच्या फरकांमुळे मी माझ्या आणि कुटुंबियांच्या (पत्नी आणि ३ वर्शाचा मुलगा) वैद्यकीय चाचण्या भारतात कराव्या म्हणतो. तर कुठल्या कराव्यात? कुठे कराव्यात आणि कशा कराव्यात हे सांगितले तरी उत्तम.
@मा. श्री. नबाशेठ प्लीज रहम करना हं थोडा ;)

'न'वी बाजू Sat, 31/10/2026 - 01:26

In reply to by अभ्या..

@मा. श्री. नबाशेठ प्लीज रहम करना हं थोडा ;)

ठीक आहे, आता तुम्हीच म्हणता आहात, तर, करतोच थोडा रहम.

(थोडा कशाला, पुष्कळ करतो. तुमच्यासाठी काहीपण.)

परंतु, अगदीच प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर, मुळात रहम न करण्यासाठी स्कोप होता, हेच लक्षात आले नाही माझ्या. (नक्की कुठे स्कोप होता, हे तर अजूनही लक्षात आलेले नाही.)

So, what exactly have I missed? ;-)

मारवा Sat, 31/10/2026 - 02:29

In reply to by अभ्या..

तुम्हाला preventive care अशा स्वरूपाच्या चाचण्या करायच्या आहेत असे गृहित धरतो.
मी अगदी 15 दिवसापूर्वी केल्या. Thyrocare ची सर्व्हिस चांगली आहे. मी extensive body हा पॅकेज घेतला होता ज्यात 14 व्हिटॅमिन सहित 127 की काय बऱ्याच टेस्ट आहेत त्या पॅकेज मध्ये. साधारण 3000 काहीतरी किंमत होती. होम कलेक्शन करतात आणि एक साधारण दोन दिवसात सर्व रिपोर्ट्स मिळतात.
बरेच पॅकेज असतात तुम्ही निवडू शकतात तुमच्या गरजेप्रमाणे मला हा बरा वाटला. Online booking करू शकता.
तुम्हाला इतर काही issues नसतील असे गृहित धरून बोलतोय.
आणि त्या पॅकेज मध्ये नाही पण fasting insulin ही फार.महत्वाची test आहे ही जरूर करा.
आपल्याकडे प्रॉब्लेम झाल्या नंतरच सर्व टेस्ट करण्याची सवय आहे.
https://m.youtube.com/watch?v=5qXvTIzVhc0&pp=ygUUS2FyYW4gc2FyaW4gZGlhYm…

सुधीर Fri, 30/10/2026 - 21:25

थोडक्यात थीरा बँड हा गुगल फिटबिट एअरच्या जवळपास निम्म्या किमतीत मिळत आहे. भविष्यात ज्या कंपनीकडे जास्त वापरकर्त्यांचा आणि आरोग्यविषयक डेटा असेल, तिची अनुमानक्षमता आणि अचूकता अधिक चांगली असण्याची शक्यता आहे. भारतात जिओ सध्या गुगल फिटबिटच्या एआय कोचचे सदस्यत्व मोफत देत आहे. मी इथे व्हूप, गुगल फिटबिट आणि अ‍ॅपल यांची तुलना पाहिली. गुगल फिटबिटची सुद्धा सदस्यत्व नसलं तरी वापरता येतेय. व्यावसायिक खेळाडूंसाठी व्हूप ठिक आहे. बाकी बहुतेक लोकांसाठी गुगल फिटबिट ठिक वाटते.

Rajesh188 Sat, 31/10/2026 - 09:40

रक्त दाब चे आकडे सतत बदलत असतात, sugar चे आकडे बदलते असतात. ह्या बदलत्ता आकड्या न अर्थ त्या क्षेत्र मधील व्यक्ती च योग्य लावू शकतो. सामान्य लोक जें गुगल वर माहिती वाचून स्वतः ला सर्व न्यानी समजत असतात ते चुकीच अर्थ लावून स्वतः टेंशन मध्ये येतात आणि नसलेल्या आजार चे बळी होतात

चिमणराव Sat, 31/10/2026 - 19:33

जेंव्हा एखाद्या रोगावर औषध ( म्हणजे पूर्ण बरा करण्याचा उपाय) नसते तेव्हा केवळ तपासण्या ( म्हणजे अवांछित गोष्ट किती आहे)करून पैसे कमावतात.

तर्कतीर्थ Sun, 01/11/2026 - 17:21

In reply to by चिमणराव

वैद्यकीय निदानात ’एलिमिनेशन’ ही पद्धत सरधोपट, कमी जोखमीची असते. त्यासाठी (दुर्दैवाने) खंडीभर चाचण्या आवश्यक ठरतात.

आत्ताच ही बातमी वाचली. -
https://www.msn.com/en-in/news/other/final-year-iit-dhanbad-student-all…

सर्व प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधल्या विज्ञार्थ्यांवरच्या ताणाचा अभ्यास करण्यासाठी स्मार्ट साधनांचा उत्तम उपयोग करता येउ शकतो. ताणाखालील विज्ञार्थ्यांना वेळीच वेगळे करून त्यांच्या समस्या समजाऊन घेता येतील आणि अशा दूर्दैवी आत्महत्या टाळता येतील.

त्रिशंकू Sun, 01/11/2026 - 04:11

From what I have read from well known cardiologists/endocrinologists and reputed websites like Cleveland Clinic, Mayo Clinic etc., don't stop at HDL, LDL, triglycerides. See if you can get these tests done especially if you are at risk for heart disease, (pre)-diabetes, high cholesterol etc.

1. APO-B
2. LP(a)
3. CCTA with Clearly Analysis (CT Angio)
4. High sensitivity CRP
5. Homocysteine
6. Fasting insulin
7. Omega 3 index
8. Free Testosterone
9. Ferritine
10. GGT