परडीचा महिमा

मंगळवारी वस्तीत परडी उजवायचा कार्यक्रम झाला. योगायोगाने तिथे हजर होतोच तर तासभर गाणी आयकुच म्हटलं. आता फार होत नाहीत हे कार्यक्रम वस्तीत. पण ८ ते ९ वर्षामागं जबरदस्त रेलचेल असायची या कार्यक्रमांची. धोँड्याचा महिना म्हणजे तर क्या बात है ! याच टायपात मोडणारा. महिना भर नुस्ता धिंगाणा ! डलीडुली आणि पुरणपोळी सारख्याच मापात. कितीकही मोजा गड्या हो . आराधी मंडळी फुल टाईम बिझी ! ह्यांची अपाँईँटमेँट मिळणं , मिळवणं. म्हणजे जबरदस्त दिव्य ! नवरा बायकोच्या भांडणात ह्यांची अपाँईँटमेँट म्हणजे कळीचा मुद्दा ! तु काच गेली नाहीस ? किँवा तू काच गेला नाहीस ? या टाईपचा कालवा धोँड्याच्या महिन्यात वस्तीत नवा नसतो. तीन वर्षातून एकदा येणारा धोँड्याचा महिना म्हणजे परडी उजवण्यासाठी लाभलेला गुरुपुष्यामृत योगच म्हणावा जणू ! त्या टायमाला खूप घरी चढा ओढीने परड्या उजवल्या जायच्या. नव्या लग्न झालेल्या जोड्या मात्र धोँड्याच्या महिन्यात जाम खुष. म्हातारा म्हातारी आराधी गाण्याला चटावून तिथेच व्यस्तं आणि तरण्या जोडीला फुल्ल प्रायवसी. वस्तीतल्या कित्येक पोरांच्या जन्मतारखी आठ दहा दिवसांच्या अंतरानी एकाच महिन्यातल्या. धोँड्याच्या महिन्याची कमालच ही . धोँड्याचा महिना सरला कि चार तरी नवतरण्या बायांची पाळी चुकणारच .या महिन्यात परड्यांचा धुमाकूळ अतीच. शाळेत मास्तरांनी शिकवलेलं "एक दो, एक दो, माळ परडी फेक दो" असा आम्ही केलेला कालवा आणि डोक्यात खाल्लेले खौंडे , आवाज बसवी बुक्क्या आजही आठवतात. परडी उजवणे हा अत्यंत जबरी मनोरंजनात्मक , धार्मिक प्रकार कुठलाही अघोरीपणा नसलेला. दोन तीन पिढ्या कुणीतरी परडी चालवलेली असते. मधेच कुणीतरी , कुठल्यातरी, कारणावरुन ती चालवत नाही. आता परडी चालवणे म्हणजे काय ? तर मंगळवारी, शुक्रवारी ( परडीधारकांच्या उच्चारी सुक्कीरवारी) जोगवा मागायचा, नवरात्रात उपास तापास करायचे. गावाकडची येडाई, जानाई, जोखाई, शितळाई टाईप देवीच्या जत्रेला (ती जेव्हा असेल तेव्हा) , किँवा चैत्रात तरी एकदा जाऊन यायचंच. आणि घरात नेमानं तिला हळदी कुंकू वहायचं. एवढं केलं कि परडी तुमच्यावर हँप्पी ! तिच्या कडून तुम्हाला नो प्रोब्लेम. अगदी ग्रीन सिग्नलच सायबा !
हे सगळं मधेच बंद केलं कि भयंकर जबरी लोचे होतात ही रुजलेली , व्यवस्थेनं ताकदीने रुजवलेली भयप्रद धारणा ! नवरा दारुडा होतो. पोरं घैराती होतात. सुन बदमाश होते.आणि शेजारी पाजारी करणी धरणी करणारे , तुमचं बरं न बघवणारे नंबर वन कडूडक दुष्मण लोक ठरतात ! असा परडीचा महिमा. मग धोँड्याच्या महिन्याची वाट न बघता कधीही परडी उजवावी लागते. ज्यांच्या घरी , त्यांच्या पुर्या खानदाणात कधीच कुणी परडी चालवलेली नसते त्या घराला सुद्धा त्यांच्या घरगूती अडचणी वाचून आराधी लोकं एम.एल.
एम. मार्केटिँग च्या कडक , फुल्ली ट्रेन बंद्यासारखं ताकदीने पटवून देतातच कि चार किँवा पाच पिढ्या मागं तुमच्या घरात अमकी तमकीच्या हातावर परडी होतीच ! हे सत्य पटवण्याकरिता तात्काळ अंगात आणून देवीची साक्ष काढली जाते. दुजोरा घेतला जातो. आणि तात्काळ परडी उजवण्याची डेट फिक्स होते. आराधी मेळा जमतो. पुरणपोळीनं डुलतो. डलीडुली बरोबर झुलतो. गांजानं खुलतो. झांजा, तुणतूणं, ढोलकी तासाभराच्या सरावात खंगाळली जाते. पाच सवाष्णीँना पान सुपारी दिली जाते. पुरणपोळीचा, डलीडुलीचा, आमटी भाताचा निवद ठेवला जातो. कपाळभर पुरुन उरेल एवढं कुंकू एकमेकींना लावलं जातं. आणि अंबाबाईच्या नावाची चिक्कार आळवणी करत , कानकिट्टी कौतुक करंत गाणी गायली जातात. ही गाणी स्वरचित आणि ऎकायला मस्त असतात. गाण्या बरोबर आराध्यांच्या गमतीजमती , म्हातारपणातील मोहब्बतीच्या टिंगल टवाळी गप्पा, चार लोकात लाज येणार नाही, असं खुलणं फुलणं . एकूण वातावरण जबराट सर्द ! भोवताली वस्तीचा गराडा आणि परडी उजवल्याची सांगता.
आता वस्तीतले आराधी मोबाईलधारक झालेत. १० वी १२ वी ची पोरं जाम टिंगल करतात. आईबापांचीही आणि आराध्यांचीही ! परडी उजवण्याच्या कारणाला पोरांचं वर्तन अधिक बळकटी देतं आणि घेतलेल्या निर्णयावर आईबाप आनंदी होत पुढील पाहूणचाराला सरसावतात. मंगळवारी रात्री साडे दहालाच बैठक बसली. छबिण्याला निघाली अंबा गवळण कडक सादर झालं. आयगं काळुबाई तुझ्या कानामदी झुबा ठेक्यात झालं. रंग चढला. बैठक खुलली. ढोलकी कडक आवाज करु लागली. तुणतुणं गुंगवू लागलं. झांजा आनंदी आदळ आपट करु लागल्या. १२ वीचा सिध्दार्थ वैतागला. मला पिडू लागला. चुळबूळ करु लागला. दादा तुमी बसल्यामुळं तर घरचे लैच खुष झालेत. कशाला बसलावं ? म्हैन्यावर परीक्षा आलीय माझी आणि हे आयझवे पहाटं पर्यँत नक्की कालवा करणार ! कवा होतंय कि ह्यांचं ? कोँड्याळ्यातून थोडा बाजूला , हे सगळं कधी उरकणार आणि निँवात कधी झोपाय भेटणार ह्या प्रश्नाने चिडून, चिँताक्रांत, दातओठ खात वटारल्या डोळ्याने वस्तीतला अत्यंत हिरवट, नास्तिक ईसम दत्तू बप्पा आराध्यांकडे बघत होता. आराध्यांनी नव्या चिजेला हात घातला. गार ..बाय.. गार..आन् गार डोंगराची हवा न् बाय मला सोसंना गारवा. आन् गार डोंगराची हवा न् बाय मला सोसंना गारवा . गाणं टिपेला चढलं. बाय मला सोसंना गारवा वर आराधी मंडळी वेगळीच लय साधू लागले. लैच खुलू खुलू , बाय मला सोसंना गारवा घोळवू लागले आणि अडाणी वेळ घालवू लागले. गाण्यातली पेटंट गाजिव ओळ , बाय मला सोसंना गारवा म्हटल्या बरोब्बर , वैतागलेला दत्तू बप्पा ओरडला , आगं शेटाची घोंगडी पांघर कि मग गारवा सोसंना तर ? तुह्या आयची येडी गांड तुह्या. मायघाले ! आराधी गाणं गचक्यात थांबलं. आणि आराधी बायका दत्तू बप्पाच्या, प्रतिक्रियेला ख्या ख्या ख्या हसायला लागल्या. आराधी बाप्ये ओशाळे होऊन हसायले. दत्तू बप्पाला कोणीच काय इच्यारणा झालं.मी म्हटलं आराधी मेळा कडवट नेमातनं बाहेर पडला ! आता हे सालं निव्वळ मनोरंजन उरणारं. आनंदी होऊन घरी आलो. गाणी मनात घोळवत ! बाय मला सोसंना गारवा !

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

वेगळ आहे
नेहमीप्रमाणेच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

हा हा हा मस्त एकदम!!! "फर्मास" ह्यो सबुद इशेश लागु पडाव्या ह्या लेखासाटी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच खास .... हे फार आवडलंय..

सर्वात महत्वाचं म्हणजे प्रचारकी किंवा अजेंडा घेऊन काही लिखाण केलं जातंय ही पुसटशीही शंका पूर्ण मिटवणारं हे लेखन आहे. जियो..

शेवटची ओळ तर फस्क्लास... भेटलं पाहिजे राव तुम्हाला. काश ऐसी अक्षरेचे कट्टे होत असते...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद !:-)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखादे आराधी गाणे पूर्ण आठवत असेल तर ऐकायला / वाचायला फार आवडेल.
आणि हे 'डलीडुली' काय आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमुक आपण चिकण मटणच्या तुकड्यांना पीस म्हणतो.तसे ग्रामीण लोक वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे वापरतात. जसे कि बोट्या , फळं , डलीडुली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या गाण्याचा आठवणी त्याच्या ठेक्यासकट जाग्या झाल्या. सूर टीपेला पोहोचले की अशी काही लय साधली जाते की विचारू नका.
आपोआप आपण ते गाणे गुणगुणु लागतो, आपल्याच नकळत... "गार..आन् गार डोंगराची हवा न् बाय मला सोसंना गारवा..."
झक्कास! Smile

-(डोंगरावरची गार हवा चाखलेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. आता हे सालं निव्वळ मनोरंजन उरणारं. नाहीतरी आता सगळ्याच गोष्टी मनोरंजनात चालल्या.;)

गाणे लक्षात आहे थोडेफार.पूर्ण गाणे लक्षात आहे का? यूथ फेस्टिव्हलची आठवण झाली.


मुख्य स्वर -
लिंबू नारळ घिऊन हाती
आंबाबाईच्या पुजेला जाती
कोरस-
लिंबू नारळ घिऊन हाती
आंबाबाईच्या पुजेला जाती
मुख्य स्वर -
बाई, या देवीचा,
अन अंबाबाईचा
कोरस-
या या देवीचा, गं अंबाबाईचा
मुख्य स्वर -
मळवट भरावा
न बाई मला सोसंना गारंवा
कोरस-
गाऽरं डोंगराची हवा न बाई हिला सोसंना गारंवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवरात्रात माझ्या समोरच्या गणपती/नवरात्र मंडळानी, दिवसरात्र हे गाण वाजवुन ( १२० db ) नी ह्या गाण्याबद्दल तिडीक च निर्माण केली आहे माझ्या मनात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ सतिश - काही विशेष वाटला नाही तुमचा हा लेख / कथा. तेच तेच होतय आणि तुमची comment नाही. अजुन एक सुचना ( पटली तर ) - बोलताना शिव्यांचा वापर लोक करत असतील पण लेखात लिहिताना त्या टाळल्या तरी चालतील असे मला वाटते. शिव्या लिहुन तुमच्या लेखात काही value addition होत असेल असे वाटत नाही. शिव्या न लिहुन काही miss होइल असे ही वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हाय धिस कोलावेरी अगेन्स्ट शिवी? शिव्यांनी व्हॅल्यू अ‍ॅडिशन होत नसेल तर नुकसान तरी काय होतंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुराधा धन्यवाद ! सिद्धार्थचं १२ वीचं वर्ष आहे. त्याचा विलक्षण ताण ती शिवी टाळून व्यक्त होतं नाही. शिवी आणि ओवी एकाच मापात मोजणार्या (अपवाद गंभीर भांडणाचा ) परिसरात तो ही वाढलाय. दत्तुबप्पाची शिवी ही गाण्यातील बोलावर बेतलेली वैशिष्टयपूर्ण आहे. त्यामुळे इथे त्याच्या अपरिहार्यपणे आल्यात. तुमच्या सूचनेचा मी आदर करतो. जेव्हा मला लिहिताना एखादा अपशब्द मी घुसडतोय असं वाटेल तेव्हा नक्कीच मी ते टाळेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही जे बघता ते जसे च्या तसे उतरवता हे चांगले आहे. पण त्यासोबत तुमची काहीतरी comment असणे ( सतीश म्हणुन ) मला वाटते गरजेचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हैच्चमारी! ये लगा सिक्सर! Smile
लय ब्येस!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झक्कास!

पुढच्या वेळेस दत्तू बाप्पा ओरडण्याआधीच रेकॉर्डींग करून ठेवा. दत्तू बाप्पाचं रेकॉर्डींगही चालेलच. तुम्ही किती सेन्सॉर करता ते ही समजेल! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिखाण आवडले. आता तुमचे आजवरचे सगळे लिखाण काळजीपूर्वक वाचले पाहिजे असे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपूर्वक आभार ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0