पुरोगामी! (एक किस्सा)

"आई-बाबा फारच मागं लागले आहेत. रोज रोज मागे लागून नवीन नवीन स्थळं दाखवतात.
साला लग्न मला करायचंय, पण घाई ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही.
आपण आपल्या मर्जीनंच पोरगी पाहणार.
साला रोज रोज तिथून इतक्या लांबून भारतातून फोन करतात आणि विषय काय, तर "काय ठरवलंस? कधी पाहायची? "
छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही, तोच लक्ष लॅपटॉपच्या
स्क्रीन कडे गेलं. फुकटात ढीगभर साय मिळाल्यावर एखाद्या बोक्याला होईल,
तशा आनंदाने येक आवंढा गिळून, मोठ्ठे डोळे करून बसलो चॅटिंगला.
" सुधीर वैतागून सांगत होता.

पण चेहऱ्यावरचे भाव आता जरा छान झाले. तो म्हणाला...
" ती हां तीच स्पृहा. वर्ग सखी., राष्ट्रीय पातळीवर ऍथलीट म्हणून मान्यता पावलेली.
वर्गात मुलींशी बोलायला कधीच फारसं जमलं नाही.
पण तिचं मोकळं ढाकळं वागणं, सहज मिक्स-अप होणं जाम आवडायचं.
तिचे बऱ्याचदा वर्तमान पत्रातून बक्षिसं घेतानाचे वगैरे फोटो येत. तेही छान वाटायचे.
शिवाय कुणाशीही बोलताना ती लागलीच बोलतं व्हायची, बोलतं करायची.
एखादा जोक आवडला तर पटकन टाळीही द्यायची. (म्हणून मी जोक मारायचे अनेक अयशस्वी प्रयत्न पण केले. )
शिवाय ऍथलीट असल्यानं बांधा आकर्षक होता.

आता नाही म्हटलं तरी, तिच्या स्वभावानुसार मिळता जुळता जॉब मिळाला होता. एच आर चा, अगदी नुकतीच ऑफर आली होती.
आणि खेळणंही अजून चालूच होतं.
चॅटिंगलाही मला तिचा हाच स्वभाव आवडायचा. वेब कॅम तर सगळेच वापरतात, पण ही अगदी मॉडर्न स्टाइल मध्ये घरी
ज्या ड्रेस वर असायची, त्यावरच चॅटींग करायची. उगीच "काकू"बाई सारखं नाही.
सदैव आपली ती बर्म्युडा येक असायची अंगावर आणि स्लीव लेस पांढरा शुभ्र टी-शर्ट.
आणि अंग काठी निव्वळ शिड शिडित, ऍथलीटची, स्वभावात मोकळेपणा. तजेलदार सावळा रंग.
मी तर भारतीय "शारापोवा"च म्हणेन तिला, तिच्या टवटवीत पणावरून.
बरेच दिवस अशा ऑन लाइन गप्पा चालायच्या.
अगदी "गांगुली म्हातारा झालाय की द्रवीड " इथ पासून ते अगदी कॉलेज मधल्या दिवसांबद्दल.
किंचित खेचाखेची चालायची आणि थोडाफार चावटपणा आणि चावटगप्पा सुद्धा.
वाटलं "अहा.. काय सही आहे ही जोडीदार म्हणून. किती मोकळी आहे. हिच्या सोबत राहणं म्हंजे दिवस भर गप्पा, मन मोकळेपणा
आणि शिवाय कुठलीही फालतू बंधनं नाहीत. " ही मिळाली तर काय होईल, मी स्वप्नातच इमले बांधून पाहिले,
त्या "काकू" स्टाइल वाल्या नवऱ्या सोबत फिरतानाही हातात हात घालायला घाबरतात रस्त्यावर. ही असेल तर
गळ्यात गळे घालून हिंडेन. पण आता कुणास ठाऊक आई-बाबा कुठलं लचांड पाहणारेत माझ्यासाठी. "

एवढ्यात आईचा फोन आला. तिकडून आवाज :- "अरे ऐकतोस का, मुलगी मिळाली रे त्या शादी डॉट कॉम वर तुला हवी तशी.
फोटोत सुंदर दिसतेय, कालच बोलले तिच्याशी. तुझ्याच कॉलेजची दिसतीय. नॅशनल ऍथलीट, फोटो आणि माहिती मेल केलिये तुला.
आता तू असं कर की.. "
आई एवढं बोलेपर्यंत मोबाईल झाला डिस्चार्ज, फोन झाला कट.
पण पण....
"नॅशनल ऍथलीट, माझ्याच कॉलेजची... म्हणजे.. स्पृहा तर नै? "
डोक्यात शंका आली आणि लगेच जाऊन मेल पाहिला.
तो... तोच फोटो. स्पृहाच ती.

म्हणजे आता हिच्या सोबत जन्मभर राहायला मिळणार तर.
आणि तिनं मग सांगितलं का नाही चॅट वर आपल्याला की आपलंच नाव तिला""स्थळ" म्हणून आलंय,
गंमत करायची, फिरकी घ्यायची म्हणून असं केलं तिनं?

"
पण.. पण.. एक मिनिट.. हे काय होतंय?
मी तिला होकार कसा देईन?
हे हे सगळं ठरायच्या किती तरी आधी पासून ही अशी बाह्या आणि तंगड्या उघड्या सोडून बसते वेब कॅम समोर.
म्हणजे, ही शहाणी, ज्याच्याशी फारशी कॉलेजातील धड पूर्ण ओळखही नाही त्याच्या समोर एवढी मोकळी राहते.
मग प्रत्यक्ष तिला भेटणाऱ्या लोकांसमोर कशी असेल?
छे.. हे असलं मला मुळीच आवडणार नाही माझ्या बायकोनं केलेलं.
अस कुणाशीही एकदम सलगीनं वागलेलं.
बायको आहे, तर बायको सारखं वागावं उगीच डोक्यावर बसू नये.
मी देईन ना मोकळीक, पण एका मर्यादेतच. अस दुसऱ्या पुरुषांशी इतकं कस बोलवतं हिला...
छ्या...
असल्या कॅरेक्टरची बायको नकोच आपल्याला.
त्या पेक्षा नकारच कळवतो तिला.
"

सुधीर "नकार" कळवायला फोन कडे जाऊ लागला.
त्याचे (स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्याचे)हे " सु विचार " ऐकून मी तसाही थोडासा चकित झालो होतो.
(माझं आश्चर्य आवरून ) त्याला मी म्हटलं "स्थळ चांगलं आहे किंवा नाही ह्याबद्दल मी काहीच म्हणणार नाही. ते तुलाच माहितिए. पण एवढं नक्की, की तू नकार दिलास तरीही तुझ्यापेक्षा कैक पट चांगली स्थळं तिला मिळतील. "
तू आता फक्त ह्या विषयाबद्दल मौन धारण केलंस तरी हे लग्न होणार नाही. एखाद -दोन दिवसात होकार येईलच इतर
ठिकाणांहून तिला, मग चालेल का तुला? "

सुटकेचा नि: श्वास टाकत सुधीर खाली बसला. " हुस्श्श.बरंय की मग! मला लग्न नाहीच करायचं असल्या कॅरेक्टर वालिशी"
असं काहीसं पुटपुटला आणि पुन्हा हावरट नजरेनं चॅटींग ची विंडो मोठी करून "मोकळ्या" विचारांच्या
गप्पा मारू लागला,
इतरांच्या होणाऱ्या बायकांशी!!
त्यांच्या मोकळेपणा बद्दल तो फारच आग्रही होता.!!!

.
<< इतरत्र पूर्वप्रकाशित >>

field_vote: 
4.444445
Your rating: None Average: 4.4 (9 votes)

प्रतिक्रिया

आयला भारी किस्सा बे मनोबा!! क्षुद्र अन पर्व्हर्ट मनोवृत्तीचे बेष्ट दर्शन घडवलंयस!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लै ब्येस! श्रेणी देण्याची सोय धाग्यांनाही हवी होती, "मार्मिक" श्रेणी दिली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किस्सा आवडला.
खरंच ऋषिकेश म्हणतायत तशी मार्मिक श्रेणी दिली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस्सा आवडला.
'सनई चौघडे' हा चित्रपट आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स.
"ज्यूलीचे चौघडे"(http://www.aisiakshare.com/node/1013) ह्या नावानं माझाच एक जुना धागा आहे ह्यासंदर्भात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

किस्सा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारीच किस्सा

दुटप्पी मनोवृत्तीचे यर्थाथ दर्शन घडवलेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हेच म्हणतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मस्त किस्सा !
नेमके बोट ठेवलेय ऑर्थोडॉक्सपणावर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक गडी मुंबईला आपल्या घरी जात असतो. ट्रेनमध्ये त्याच्या शेजारी छान दिसणारी तरुणी बसते. दोघे एकमेकांना आवडतात. तेवढ्यातल्या तेवढ्यात लाइन मारतात. बोगद्यात अंधार होतो तेव्हा चुम्माचाटी* करतात. त्यांची ट्रिप छान होते. घरी पोचल्यापोचल्या त्याची आई सांगते की मुलगी दाखवायला येणार आहेत तेव्हा तयारी कर लवकर. आणि अर्थातच हीच मुलगी येते. सगळं काही अनुकूल असतं, पण दोघेही काहीही कारण न देता नकार देतात.

*श्रेयअव्हेर तात्या अभ्यंकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत प्रतिसादाचा मूळ धाग्याशी कसलाही संबंध नाही. बोगद्याच्या किश्शावरून दुसरं एक आठवलं ते लिहिलं आहे.

गाडीच्या डब्यात चार लोक असतात : एक मुलगी, एक ड्यांबीस मुलगा, एक ह्यांडसम दिसणारा आगाऊ पोरगा आणि एक मस्तवाल पैलवान. गाडी पारसिकच्या बोगद्यातून जाताना गाडीतले लाईट जातात. गाडी बोगद्यात असताना दोन आवाज येतात. १. चुंबन घेतल्याचा २. जोरात थप्पड मारल्याचा. बोगद्यातून गाडी बाहेर आल्यावर ह्यांडसम पोरगा गाल चोळत असतो. पैलवान सर्वांकडे रागाने पहात असतो आणि मुलगी पूर्णपणे गोंधळलेली असते. ड्यांबीस पोराला सोडून कुणालाच काही झालेलं माहिती नसतं.
झालेलं असतं हे की ड्यांबिस पोराने जोरात आपल्या तळहाताचं चुंबन घेतलेलं असतं आणि मग एक जोरात त्या आगाऊ हँडसम पोराच्या कानाखाली मारलेली असते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अगदी 'फर्स्ट हँड' किस् सा वाटतो आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण पैलवानाला राग यायला काय झालं?
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ते पैलवानसाहेब मोरल पोलिस असतात. बोगद्यामुळे त्यांचा चानस गेला ना हात साफ करायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जी सांगत आहेत तशीच एक सेम कथा 'सु.शिं.'नी लिहिलेली आहे. फक्त रेल्वेच्या जागी हिल स्टेशन आहे.

रेल्वेत काळ्या काचवाल्या डब्यात हे घडले काय याचा उल्लेख अपेक्षीत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

तुला बर नसत्या चौकश्या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वाचन चौफेर असावे म्हणून आपले विचारले झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

वाचन चौफेर असावे म्हणून आपले विचारले झाले

या प्रकारच्या वाचनात तुला जरा जास्तच ईट्रेंस्ट आहे असे निरीक्षण आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

लिखाणात देखील आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

लिखाणात देखील आहे.

ते ओघाने आलेच. त्यात काय संशय नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

किस्सा फारच मार्मिक!
बरेच पुरुष फारच इन्सिक्युअर असतात आणि त्याला पझेसिव्हनेस असं गोंडस नाव दिलं जातं बर्‍याचदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व वाचकांचे आभार.
@राजेश/मुसु :- मुसुंच्या प्रतिसादातील किस्सा एक विनोद म्हणून ढ्कलपत्रातून वाचल आहे. पात्रे मनमोहन, सोनिया, मुशर्रफ अशी होती.
.
@ननि:- खरच की. इन्सिक्युरिटी नि पझेसिव्हनेस नाण्याच्या दोन बाजू आहेत; नोटिस नव्हतं केलं. पझेसिव्हनेस काही अंशी स्वत:ला राजा नि दुसर्‍याला प्रजा समजण्यात आहे असे मानित होतो. विचार करतान मात्र दुसरी बाजू जाणवली.
.
पुन्हा एकदा ज्यांना आवड्लय, ज्यांनी वाचलय आणि ज्यांनी मार्मिक म्हणून कौतुक केलय त्या सर्वांस धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्त....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लैच भारी बुवा...
छान, खूप आवडला लेख... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

किस्सा आवडला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्ट आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी किस्सा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडल्या गेला आहे.
असे अनेक नमुने पाहिले आहेत.
अजून येऊ द्या..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाचा खुसखुशितपणा आणी पुरुषी दुट्ट्पीपणाचा, 'मना'तील Wink घालमेल याचा मेळ छान जमलाये.

शिड शिडित,टवटवीत,भारतीय "शारापोवा" सोबत 'चहापोहा' चा किस्सा घात्ला अस्ता तर तो पण एक नंबर रंगवता आला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरोगाम्यांना शिव्याच द्यायच्या असतील तर किमान
>>त्याचे (स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्याचे)हे " सु विचार " <
या वाक्या व्यतिरिक्त, त्यातही कंसात वरतून घुसडलेल्या शब्दांव्यतिरिक्त, तुमच्या कथानायकात पूर्वी कुठे पुरोगामीपणा दिसला ते तरी दाखवा? ते दाखवलेत, तर तुमच्या लिहिण्याला थोडा अर्थ येईल.

उगंच फॅशन आहे म्हणून पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आदी शब्दांची अशी टर उडवली की लोक पुरोगामी बनायला, किंवा तसे वागायला घाबरतात, अशी ही प्रतिगामी गम्मत आजकाल सगळीकडे दिसते आहे.

तुमचा किस्सा/ललित - मानवी स्वभावाचे वर्णन म्हणून चांगला आहे, पण त्याचा 'पुरोगामी' अस्ल्याशी काडीचा संबंध नाही, तेव्हा याप्रकारे बादरायण संबंध जोडून एक (माझ्यामते) चांगली प्रवृत्ती (पुरोगामित्व) डागाळण्याचा उद्योग केल्याबद्दल निषेध.

(वरील प्रतिसाद गंभीरपणे लिहिलेला आहे, गमतीत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पण त्याचा 'पुरोगामी' अस्ल्याशी काडीचा संबंध नाही

ठीक. त्याऐवजी आपण त्यांना 'लिबरल' म्हणू या काय?

- (लिबरल) 'न'वी बाजू.

(टीप: प्रस्तुत प्रतिसादही तितक्याच गंभीरपणे लिहिलेला आहे. अर्थात, गमतीत घेतल्यास मला घेणेदेणे नाही. लिहिण्याचे काम करून आपण मोकळे! काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी देईन ना मोकळीक, पण एका मर्यादेतच. अस दुसऱ्या पुरुषांशी इतकं कस बोलवतं हिला...

मी देईन मोकळीक ? देईन ? Who the are you give it ? - हा प्रश्न चाटून गेला.

पण तिला जर आक्षेप नसेल तर अशा प्रकारचे लग्न काँट्रॅक्ट करायला मनोबांचा आक्षेप असेल का ? अशा प्रकारचे म्हंजे - लग्ना पूर्वी त्याने तिला व तिने त्याला डिस्क्लोज करायचे की लग्नानंतर कशाप्रकारचे वर्तन अपेक्षित आहे त्याचे. (दोघांना ही फ्रीडम ऑफ काँट्रॅक्ट आहे.) व हे झाल्यावर जर ती म्हणाली की - मला ह्याच्याशी लग्न मंजूर आहे व मी लग्नानंतर माझे वर्तन त्याला हवे तसे बदलीन व बदल्यात मला काहीही नको - तर ??? (तसे ती म्हणेलच असे नाही पण ...)

बाकी लेखन मस्तच. एकदम आवडले. व तुमचा अ‍ॅकच्युअल मुद्दा दुटप्पीपणाचा आहे हे देखील माहीतिए.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्री-नप कोर्टिंग मध्ये (इन्फॉर्मली) हेच करणे अपेक्षित असते असे वाटते. बरीच जोडपी हे करत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धागा वर आलाच आहे तर वाचकांचे पुन्हा आभार मानतो.
आडकित्ता ह्यांचे थेट व रोखठोक प्रतिक्रियेबद्दल विशेष आभार.
@गब्बर :-
कुणी आपल्या मर्जीनं काही करत असेल तर इतरेजन आक्षेप कसला घेणार?
म्हणजे एखाद्या काँट्रेक्ट मध्ये मर्जीनं काही बंधनं माम्न्य करत असेल तर आपण कोण बोलणार?
(जॉब करताना आपणही कैक बंधनं पाळतोच की.)
.
.
@आडकित्ता :-
त्याचे (स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्याचे)हे " सु विचार "
लिहून पाच सात वर्षं झालित. आता विचार करताना ही ओळ नसती तरी चाललं असतं असं वाटतं.
शीर्षक मात्र वेगळं ठेवावसं वाटत नाही. आहे तेच ठीक वाटतं.
.
.
@सिफर :-
शिड शिडित,टवटवीत,भारतीय "शारापोवा" सोबत 'चहापोहा' चा किस्सा घात्ला अस्ता तर तो पण एक नंबर रंगवता आला असता.

हो . नक्कीच. चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.
पण संवाद वगैरे लिहायला आत्ता काही सुचत नाहिये.
इतर संस्थळांवर चाफा, धुंद रवी जसे ओघवते संवाद लिहितात, तसं जमलं तर बरं होइल.
त्यावेळी नक्कीच तसा काहीतरी प्रयत्न करता येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वर वर पाहता चांगला किस्सा आहे. पुरुषी दुटप्पीपणा किंवा असुरक्षितेची भावना वगैरे वगैरे.. रंगवला पण छान आहे. पण हे सगळे फक्त पुरुषांना लागू होत असं नाही. म्हणजे मला म्हणायचं की किती मुली लग्न ठरवताना एखादा मुलगा धोपटमार्गी नसेल म्हणून नकार देतात. किंवा लग्न झाल्यानंतर नवऱ्याने काही वेगळा उद्योगधंदा काढायचा किंवा नोकरी सोडून वेगळंच काही करायचं ठरवलं तर त्याला सपोर्ट करतील? वर बोलताना "मी यांच्या घरी पडले म्हणून....नाहीतर.. मला खूप काय काय करायचं होत... जमल असतं ग मला" .किंवा "कसं आमच्या नवऱ्याला काही जमत नाही.. पण xxxx भावजी पहिल्यापासून धडाडीचे" टाईप इतर बायकांशी बोलतील.

मुद्दा असा की.. "शिवाजी जन्मावा पण दुसर्याच्या घरात" ही वृत्ती जेन्डर स्पेसिफिक नाही.

शिवाय वरचा किस्सा पटतो क्लिक होतो याची कारण वेगळी आहेत.. समाजाचा/ कुटुंब व्यवस्थेच प्रतिबिंब लग्न ठरवण्याच्या/होण्याच्या प्रोसेस मध्ये फार भसक्क्न समोर येत असा मला वाटत. सगळी बौद्धिक/वैचारिक/पुरोगामी/स्त्रीवादी इत्यादी बुरखे गळून माणसामाणसातला व्यवहार सामोरा येतो. हा किस्सा त्याच टोचणारया व्यवहाराची ग्लीम्प्स!!..

अर्थात कथेतल्या मुलाचं मी समर्थन करते असं अजिबात नाही!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय मार्मिक प्रतिसाद!!! दुसरी बाजू दाखवणारे सॅनिटी चेक म्हणून असे प्रतिसाद खूप उपयोगी असतात. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्या म्हणण्यात तथ्य असू शकतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक स्त्री दुसर्‍या स्त्रीचा विनयभंग करू शकते काय? सुप्रीम कोर्टाचा सवाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निदान ललित किंवा मौजमजेच्या धाग्यावर गंभिरपणे दुसरी बाजु दाखवणे मजेची मजा घालवणे आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या धाग्यावर ठिक पण असा सर्वसाधारण निकष असु नये असे वाटते. नैतर ते लाथ मारली नी "गंमत केली हो" असे म्हणण्याचीच शक्यता अधिक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा प्रतिसाद चालेल का बघा..

gtalk चा पिंग आला तशी ती तंद्रीतून खाडकन जागी झाली. "यु देअर??" चॅट विंडो लकाकू लागली. आधी पटापट शॉपिंग साईटच्या विंडो मिनीमाईज केल्या. मग ५ मीन तशीच बसून राहिली. खर तर त्याला आज ऑनलाईन यायला अंमळ उशीरच झाला होता. म्हणजे त्याचं काही तसं ठरलं नव्हत. पण साधारण तो ऑनलाईन असायच्या वेळा तिला ठाऊक होत्या. तिने रिप्लाय टाकला "brb १०m". इकडे तिकडे जरा टंगळमंगळ केल. मग पटापट तिने कपडे बदलून एक स्लीवलेस टोप आणि शोर्ट घातली. आणि केसांना 'लास्ट नाईट लूक' दिला. हा तिच्या रूममेटचा आवडता लूक. तिच्याकडूनच शिकली ही. केस कसेबसे उंच बांधून पेन्सिल किंवा पेनने पिनअप केले.. थोडे इकडचे तिकडचे सोडून मेस्सी लूक तयार केला. हातात एक गरम कॉफी घेतली.. की डन!!..

इतक सगळ झाल्यावर तिने एक मेसेज टाकला "हुम्म".. अर्ध्या सेकंदात त्याच्या रिप्लाय आला.."busy?? need to talk"...

तिला माहित होत काय बोलणार आहे तो. तिच्या मैत्रिणीचा मित्र. पण काही महिन्यात ते बरच जवळ आले होते.१०-१५ वेळा भेटले असतील. पण चॅट मात्र बऱ्याचवेळा केला. किंबहुना अगदी रोजच. तो पण तिच्या गावाकडचा. म्हणजे अगदी गावातला नाही. पण ही पंढरपूरची तो सोलापूरचा. ही Bsc अग्री. तो मात्र CA. ही एका ठिकाणी अशीच नोकरीला... तो बिग ४ मध्ये चांगल्या कंपनीत नोकरीला. बाहेर वगैरे पण जाऊन आलाय. दिसायलाही बराय! तो हल्ली खूप आवडायला पण लागलाय. शिवाय घरच दणकट आहे. पुण्यात नुकतंच घर घेतलंय. अजून काय पाहिजे. त्याने विचारलं तर हो म्हणून टाकायचं. हिंट पण दिल्या आहेतच की आपण. त्यालाही मी आवडायला लागले आहे कळतंय मला. जात वगैरे पण इश्शू नाहीये. दादाला सांगून वडिलांना पटवता येईल. तसंही मला आपल्या पायावर उभा असणाराच नवरा पाहिजे. हिंमत लागते असं करायला.

तिने रिप्लाय केला.."अरे बिझी होते..ऑफिस मध्ये खूप काम आहे रे.. पण बोल.."

मग त्यांचा चॅट सुरु झाला..आधी त्याने अनेक लिंक्स पाठवल्या.. सगळ्या शेतीविषयक. मी Bsc अग्री असले म्हणून काय झालं?? हे असलं काही मला माहित नसत. मग तो बोलायला लागला, हे बियाण काय ते बियाण काय.. नवीन मशीन कुठली कुठली काम करायला.. जमीन पण आहे त्याची तिकड.. हे अन बरच काही.. आणि शेवटी सांगितलं की त्याने नोकरी सोडली.....आणि त्याच्या गावी जाऊन तो त्याच्या शेतात असलं काय काय करणार.. आणि हे पण सांगितलं की त्याला माझी साथ हवीये . दोघ मिळून शेती करू म्हणतोय. तुझ्या शिक्षणाचा उपयोग होईल म्हणतोय..मला काय येणारे? मला माहित आहे शेतीत काय पैसा असतोय होय?? वर घराच कर्ज पण असणार ?? मी जाऊ हुय असल्या फडतुश्या गावी राहायला?? असल्या आडरानात काय असणारे ?? तिथल्या गाडीमान्साशी बोलत बसू होय?? म्हणजे तो परत फोरेनला जाणार नाही की. मग काय उपयोग आहे..

मग तिच्या लपटापच इंटरनेट कनेक्शन एकदम गेलं, आणि ती तिच्या वडिलांनी सुचवलेल्या स्थळाशी फोनवर मेसेज चॅट करू लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

gtalk नाही याहू चॅट आणि सुरुवात ASL, मग अरेच्चा हीतर तिच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हाण तेच्यायला!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बघा इतरांनाही ह्यातच जास्त मजा येतेय. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्री-पुरुष संबंधाच्या बाबतीत अतिक्रूर-अन्यायी-अनुदार-दांभिक-भिडस्त ते साधारण-कायदापालक-लिबरल-उदात्त अशा प्रकारचे लोक असतात. नेहमीच अशा प्रकारच्या लोकांची थोडी ना थोडी वेगवेगळ्या प्रमाणात टक्केवारी समाजात असणारच. पैकी इथला नायक दांभिक आहे. दांभिक असणे अत्यंत सोयीचे असते. त्याने आर्थिक, सामाजिक फायदा होतो. प्रतिमा, किर्तीही नीट राहते. पण प्रत्यक्ष कोणी मी दांभिक आहे म्हणून सांगत नाही. म्हणून हे लोक ललितातच जास्त असतात. वास्तविक जीवनात आपण कोणाला दांभिक म्हणणे जोखमीचे असते. उलट दुसराच आपले चार दांभिक वर्तने दाखवू शकतो.
उदात्त तत्त्वांना चिटकून राहणे फार महाग असते म्हणून लोक दांभिकतेचा सोपा मार्ग निवडतात. मी दांभिक नाही असे क्लिअर सर्टीफिकेट माझ्याकडे नसल्याने कथानायकाबद्दल फार कटू भूमिका मला घेता येणार नाही. लोक असेच दांभिक असतात. त्यांची अशी वर्तने त्यांच्याशी इतरत्र कसे वागावे याचा आधार ठरू नयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोचक प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

स्त्री-पुरुष संबंधाच्या बाबतीत अतिक्रूर-अन्यायी-अनुदार-दांभिक-भिडस्त ते साधारण-कायदापालक-लिबरल-उदात्त अशा प्रकारचे लोक असतात.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दांभिक असणे अत्यंत सोयीचे असते. त्याने आर्थिक, सामाजिक फायदा होतो. प्रतिमा, किर्तीही नीट राहते. पण प्रत्यक्ष कोणी मी दांभिक आहे म्हणून सांगत नाही.

वाह.

It is impossible to run life without hypocrisy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप मस्त किस्सा.. अशी मुलं खरंच आहेत Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गॉड, सेव द क्विन (फ्रॉम मी)!!!

जेम्स बाँड जो नेहमीच ललनांचे वस्तुकरण करताना दिसतो त्याने असे मत व्यक्त करावे हे वाचून आश्चर्य वाटले! Wink

हलकेच घेणे, विनोद करायचा मोह आवरला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तो आमचा व्यवसायाचा भाग म्हणुन येतो हो.. पण आम्हीसुद्धा, (सुद्धा काय? आम्हीच) स्त्रियांच्या बाबतीत अंमळ हळवेच आहोत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गॉड, सेव द क्विन (फ्रॉम मी)!!!