एक अनुभव

वस्तीतल्या मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमाला जायचा योग
आला.शिकल्या सवरल्याला पोफेसर माणुस
बैठकीला पाह्यजे मजी पाह्यजे.आब
राखला जातो पावण्या रावळ्यात .असं बरंच कायबाय
फोनवर सांगुन माझ्या उपस्थितीचं महत्त्व मला पटवुन
देण्यात वधुपिता, दत्तूबप्पा यशस्वी ठरला.संध्याकाळी
घरी पोहचलो.पाहूणे येऊन बसलेले.दोन खोल्याचं घर
बाहेरच्या खोलीत पाहूणे बसलेले. बायका, घरच्याही अन्
पाहूण्यांच्याही आतल्या खोलीत. घरधनी गायब. कुठं
दिसना म्हणुन पोरीला विचारलं तर तिच्या चेहर्यावर प्रचंड ताण !
आत्ता येतो म्हणुन गेलेत तास झालं अजुन यायनात. घरचे
जाम काळजीत. जवळच्या दोन्ही तिन्ही आड्ड्यावर पोरं
बघुन आली होती. काळजी वाढली होती.
मी उमेदवाराशी गप्पा मारायला लागलो. गडी डी एड
झालेला. नोकरीच्या शोधातला.ह्याच्या बापाच्या छातीत दुखलं
आणि तेव्हापासुन ह्याचा बाप मागं लागला लग्न कर, लग्न कर
म्हणुन . हे त्याचं बँकग्राउंड ! मुलगी एस वाय बी ए. गप्पा चालु
होत्या वातावरण थोडं खेळकर झालं होतं. पण तरी दत्तु
बप्पाच्या अनुपस्थितीचा ताण, बैठकीत मधे मधे डोकावुन
जायचाच. एवढ्यात दारातनं खणखणीत आरोळी आली.
आम्रपाली पाणी आन. तांब्याभर पाणी घेऊन
पोरगी गेली. दत्तु बप्पाचा दारातल्या तुळशीवर
पिचकार्या टाकायचा कार्यक्रम चालु . पोरीला आजुन
पाणी आन म्हटला. पोरगी वैतागली.
सकाळी थोडा वेळच पाणी आल्तं म्हणली.पाहुणे आत
गप्पात दंग. त्याच्यांत नवा उत्साह आला. उमेदवार सावरुन
बसला.घरधनी आत येण्याची वाट बघु लागला. तेवड्यात
आमच्या कानावर, लेकीला केलेले दत्तु बप्पाचे दोन तीन खडे
सवाल पडले. काय म्हणलीस ? पाणी थोडा वेळंच आल्तं ?
मग भरलय का नाही? पाहुण्याला काय पाजायचं ? कुणाचं
बिंद ? दत्तुबप्पाला वाटलं फक्त लेकंच ऎकतीय. पण आक्का बाईनं दगा दिला होता.
पुर्या बैठकीनं ते सम्दं ऎकल.दत्तुबप्पा घरात
आले.दुसर्यांदा च्हाची फरमाईश झाली. पाहुणे गुळमाट
चहा कडवट तोंड करुन पिले आन् चिंगाट पळाले. दत्तु
बप्पा म्हटला ह्यांची वाट बगुन लै कटाळलो गड्या . टैम बी झाल्ता. गेलो आन्
उलिशी घेउन आलो. उद्या पोराला फ़ोन करुन ईचार
कसा काय बातबेत ? पास हाय का पोरगी ?

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सांगण्याची शैलीही आवडली. तुमच्या लेखणीतून अधिक मोठं काहीतरी वाचण्याची इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सर ! नक्कीच मोठं लवकरच आकाराला येईल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दत्तुबाप्पाचं एक व्यक्तिचित्रं का लिहीत नाहीत? हा एकदम मजेशीर प्राणी दिसतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त..

वाघमारे साहेब.. झकास लिहीताहात.. राम नगरकरांच्या तोडीचं.

पण हे पळी पळीभर तीर्थ पाजणं बंद करुन एक मोठा लोटा द्या भरुन.. घटाघट प्यायला.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बास बास! नगरकर मध्येच डोकावून गेल्याचं मलाही वाटलं
बाकी कथा, पात्रे, परिस्थिती वेगळी.. अनोळखी.. छान लिहिलंय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ.. राम नगरकरांसारखं, राम नगरकरांच्या धाटणीचं किंवा त्यांचं अनुकरण वाटेल असं हे लिखाण नव्हे..

राम नगरकरांच्या "तोडीचं".. असे शब्द मुद्दामहून वापरले आहेत. ओरिजनॅलिटीच्या बाबतीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.. पण मला तर शैलीतही तसे वाटले, खास करून काही एरवी न आढळणारे शब्द तसेच त्याच अर्थाने वापरणे, कोणत्याही तपशीलाला बाजूला न सारता त्याबरोबर येणार्‍या पद्धतींचे, प्रसंगांचे तसेच खुमासदार वर्णन. या लेखात असे नाहि एरवीही. आज त्यांचे नाव प्रतिसादात वाचले म्हणून सहमती नोंदवली इतकेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बढिया !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्ट सांगण्याची हातोटी खुपच छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनापासून आभार ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0