भलंरी दादा भलगडी दादा...

आज एक बहूत जुणं गाणं ऎकलं. आणि शेतकर्याची गावाकडची आणि पोतराजाची झोपडपट्टीतली गाणी आठवली..
देवावानी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं ,
झाकली मूठ ही मिरगानं फेकली
निधळाची धार ती सर्गानं शिपली,
बाळरुप कोवळं शिवारात हासलं
धरतीच्या माऊलीनं दिनरात सोसलं..
कुबेराचं धन माझ्या..
भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा...भलं
चित्रपट: शिकलेली बायको
संगीतकार: ह्रदयनाथ मंगेशकर
गीतकार: रविकिरण मंडळातला कुणीतरी पठ्ठा.
नेमका कोण आठवेना..
क्लासवन अधिकार्याने मोहात पडून शेती करावी अशी शेताची जबरदस्त किमया मांडणारं खोटं जानपद गीत !
यानंतर सहज दादा कोँडकेँची ही गाणी आठवली.. १२ वी ला असताना गावाकडे शेतात काम करताना भावाच्या तोँडून ऎकलेलं गाणं आठवलं आणि गाण्याला हसलेली काळी सावळी अडाणी वैनी आठवुन हसायला आलं.
मँक्शी घाल गं टँक्शीत बसून जाऊ या पिच्चरला
एय मँक्शी घाल गं टँक्शीत बसून जाऊ या पिच्चरला
आन् रामलखन हा पिच्चर लागलाय म्हावीर थेटरला
आगं मँक्शी घाल गं...
आता शेतात भाऊ गाणं म्हणत नाही. खणखणीत आवाजात चायना मोबाईल गाणं म्हणतो. शिला, शिला कि जवानी तेरे इश्क मैं ढाँय ढाँय ढाँय ढाँय.... दणक्यात आणि आय गं काळूबाई तुझ्या कानामदी झुबा..हे बी दणक्यात ! शेताचा, शेतातल्या गाण्याचा आनंद कधीचाच लांब पळाला..
पुतणे शेतापासून लांब पळाले. शहरातल्या होस्टेलकडे वळाले. आता नवी गाणी तयार होत नाहीत. गावातली शेती सुध्दा आता जुन्या गाण्यासारखीच जानपद शेती उरलीय. सालं हुरडा पार्टीलाच आठवते. नायतं झाडाला कुणी टांगून घेतल्याचं कळलं कि किँवा कोण एँड्रील पिला कि, नायतं एका पावसाने उत्साही होऊन गावाकडून पेराय पैसे मागणारा फ़ोन आला कि !
भिमथडी जत्रेत उभे केलेले शेतकरी आणि पोतराज तर निव्वळ आई भैन काढाय लावतात. कुणाची काढावी हे मात्र नीट कळूच न देण्याची इथली व्यवस्था जोरकस दांडगी !
आपण मात्र मस्त मल्टीप्लेक्सच्या गारव्यात ऎकतो आणि शेतीवरचं बोगस 'प्यार' स्वतःजवळच जाहिर करतो.
"राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय, डिपाडी डिपांग इडिबांग डिपांग डिपाडी डिपांग " हय ! राणी माझ्या...

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

सतीश वाघमारे यांनी हा लेख स्वतः लिहिला असल्यास तो अर्धवट माहितीच्या आधारे लिहिला आहे.
"भलरी दादा भलरी, भलगडी दादा भलरी" या गीताचे गीतकार जनकवि पी.सावळाराम आहेत. (कोणी रविकिरण कवि नव्हेत.)
हे खोटं जानपद गीत नाही कारण पी.सावळाराम ऊर्फ सावळाराम रावजी पाटील हे स्वतः शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्मलेले होते.

त्यांचे चरित्र येथे सापडले. : http://www.mysangli.com/index.php?option=com_content&view=article&id=447...

कृपया त्यांनी हा 'भलरी दादाचा' उल्लेख ताबडतोब गाळून टाकावा.

मुळात चांगले गीत आणि लोकप्रिय गीत यांच्यात फरक आहे. शाहीर साबळे - अमर शेखांची गीते (किंवा मग एकनाथांची भारुडेही) चांगली लोकगीते म्हणता येतील.
आनंद-मिलिंद शिंदे यांची निदान सुरुवातीची अनेक गीते लोकप्रिय झाली तरी ती चांगली लोकगीते म्हणता येत नाहीत.
दादा कोंडक्यांची सुरुवातीची गीते चांगली होती, मध्ये-मध्ये एखादे चांगले गीत ते देत असत (अंजनीच्या सुता, चल रं शिरपा,माळ्याच्या मळ्यामंदी, चंदनाच्या पाटावर, माझं माझं म्हणित होतं वगैरे)पण 'एक मोका देहे,कसंकसं होतंय मला...' अशी गीते लोकप्रिय झाली तरी ती चांगली होतीच असे म्हणता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख मीच लिहिलाय.भलरी गीताचे गीतकार खरंच माहित नव्हते. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! पण हे जानपद गीत खोट आहे हे कसं नाकारता येईल ? पूर्ण ऎकल्यानंतर ? गहू हरभरा जवारी शाळू एकाच मोसमात पिकतात का ? मोटेवर रंगदार लावण्या रंगतात का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रब्बी हंगामात शाळू, हरबरा आणि गहू (डिसेंबर-जानेवारीत) एकाच वेळी पिकत असतो असे माझ्या पहाण्यात आहे. (निदान आमच्या सोलापुर-सांगली-कोल्हापुरकडे तरी पिकतो बुवा)
मोटेवर रंगणार्‍या लावण्या म्हणजे "चल रं शिरपा, देवाची किरपा झालीया आवंदा छान" त्यामुळे गायलेलं मोटेवरचं गाणं. पण ते असोच.

कदाचित पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्या शेतकरी संस्कृतीत खूपच तफावत असल्याने पी. सावळाराम यांना तुम्ही 'बेनिफिट ऑफ डाऊट' द्याल अशी आशा वाटते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा ...:-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>क्लासवन अधिकार्याने मोहात पडून शेती करावी अशी शेताची जबरदस्त किमया मांडणारं खोटं जानपद गीत !<<

>>गीतकार: रविकिरण मंडळातला कुणीतरी पठ्ठा.<<

हे गीत बेगडी असेलनसेल, आणि ते कुणी लिहिलं हा तपशीलही अलाहिदा, पण हे वाचून एक शंका पडली. एकेकाळी ब्राह्मणदेखील शेती करत असावेत. आणि असे सगळेच ब्राह्मण काही कुळांना शेतावर राबवणारे देशमुख-कुलकर्णी नसावेत. त्यामुळे आमचीच शेतीची गाणी खरी आणि त्यांची काय ती खोटी असं म्हणण्यात काहीसा दर्प जाणवतो. एकंदरीत आपली समृद्धी (मग ती सांस्कृतिक असो की आर्थिक की सामाजिक की राजकीय) दाखवण्यासाठी दुसऱ्या कुणाच्यातरी गरीबीकडे बोट दाखवणं हे अंमळ बालिश (तुमचाच शब्द) होत नाही का? असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

महाराष्ट्रात शेतकरी ब्राह्मणांची वसती कुठे बहुसंख्येने आहे की नाही, माहिती नाही. पण बिहार वगैरे भागात भूमिहार ब्राह्मण ही अस्सल शेतकरी ब्राह्मण जमात आहे.

बाकी दर्पाबद्दल सहमत. हे म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टने गर्भार राहिलेच पाहिजे असे म्हणण्यापैकी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गाण्याचे शब्द, इतर माहिती आणि ऐकण्यासाठीचे गाणे इथे उपलब्ध आहे.
(अवान्तर : संगीतकार - वसंत प्रभू, मंगेशकर नव्हेत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाण्यातला बेगडीपणा म्हणजे कुबेराचं धन घावणारी शेकतर्याची परिस्थिती तेव्हा तरी होती काय ? आज ऊस पिकवणार्याँसाठी शेट्टीँना आंदोलन करावं लागतं.
बामणाघरी लिवनं
कुणब्या घरी दाणं
आणि म्हारा घरी गाणं..
ही परंपरा १९ व्या शतकापासून थोडी थोडी पुसली गेली. पूर्ण गाणं ऎकलं तर गंमतच वाटते.
मोटेवर रंगली रंगदार लावणी. जुमानीत गोफणी करतात राखणी... मोटेवरच्या लावण्या पूर्ण शाहिरी वाड्.मयात मला तरी आढळल्या नाहीत. ब्राह्मण समाजाने शेताची देखरेख केली त्यालाच पिव्वर शेती केली असं म्हणणं धाडसाचं ठरेल. नाहीतर कुळकायदा इथे आलाच नसता. इथे महाराष्ट्रापुरताच विचार करावा ही विनंती. उदाहरणा दाखल ग..ल.ठोकळांचा मिठ भाकर आणि सुगी हे काव्य संग्रह पुरेसे बोलके ठरावेत या बाबत. पहा पहा तो बालक बसला कागद टरकावित किँवा आला आला टपाल वाला हाती घेऊनी गुलाबी पत्राला. या रविकिरण मंडळ कवितेसारखेच भलरी दादा भलगडी दादा वाटतेय. बाईच्या बाळंतपणाची कळ पुरुष जितक्या ताकदीने लिहिल , ती ताकद तो अनुभव खरा मानायचा कि बाळंतपण सोसलेल्या बाईनेचं लिहिलेली अनुभूती खरी मानायची ? गायनाँलोजीस्ट चा मुद्दा थेरोटिकली आणि प्रँक्टीकली वेगळा ठरतोच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाईच्या बाळंतपणाची कळ पुरुष जितक्या ताकदीने लिहिल , ती ताकद तो अनुभव खरा मानायचा कि बाळंतपण सोसलेल्या बाईनेचं लिहिलेली अनुभूती खरी मानायची ?

अनुभवाची व्यक्तिसापेक्षता व सहअनुभूती यात फरक हा असणारच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पुतणे शेतापासून लांब पळाले. शहरातल्या होस्टेलकडे वळाले. आता नवी गाणी तयार होत नाहीत.

एके काळी भारत हा शेतीप्रधान देश होता. ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून असायचे. अजूनही ६० टक्के लोक शेतीव्यवसायातच असले तरीही त्यांची देशाच्या उत्पन्नात असलेल्या टक्केवारीच्या योगदानात सातत्याने घट झालेली आहे. सध्या बहुधा त्या योगदानाचं प्रमाण २०-२५ टक्क्याच्या आसपास असावं. त्यामुळे एकेकाळी सिनेमांत शेतकऱ्याच्या जीवनाभोवती फिरणाऱ्या कथा दिसायच्या त्या आता दिसत नाहीत, हे काहीसं स्वाभाविक आहे.

गाण्यातला बेगडीपणा म्हणजे कुबेराचं धन घावणारी शेकतर्याची परिस्थिती तेव्हा तरी होती काय ?

मला खात्री आहे की त्यावेळचा शेतकरी खरं तर आजच्या शेतकऱ्याहून अधिकच गरीब होता. दुष्काळ आला की गावातली, शेतावर पोट असणारी माणसं टपाटपा मरायची. शहरातली त्यामानाने सुरक्षित असायची. दुसरं कुठचंच धन माहीत नसल्यामुळे धान्याला मोती मानायची. किंवा असंही असेल की शेतकरी तसं मानतात हा रोमॅंटिसिझम त्यावेळी होता. शिक्षक म्हणजे देव वगैरे रोमॅंटिसिझमही तसाच. सत्तरीच्या दशकात शिक्षकांनी आंदोलन केलं त्याचं वर्णन पुलंनी केलेलं आहे. 'गुरुवर्य म्हणून पूजा करू नका, एज्युकेशन डिपार्टमेंटमधले मजूर म्हणा आणि फ्याक्टरी ऍक्ट लावा' अशी मागणी करणाऱ्या खपाटीला पोट गेलेल्या शिक्षकाच्या मागणीतून हेच दिसून येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाचे एकंदरीने विचार काय आहेत ते कळून येत आहे. त्यांची विचारशक्तीही शाबूत आणि मजबूत आहे असेही जाणवते. कोणत्याही जातीचा आंधळा द्वेष करू नये अशा समन्वयाच्या भूमिकेवर ते आलेले असवेत असा अंदाज बांधता येतो. पण पुढेही त्यानी याच विचारांवर ठाम राहून आपल्या बांधवांनाही आपली भूमिका समजावून सांगावी. ही भूमिका अधिक नीटपणे उमजून येण्यासाठी त्यांनी दुसरी बाजूही विचारात घ्यावी.

दुसरी बाजू: (डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट म्हणा हवं तर ;))

"ब्राह्मण समाजाने शेताची देखरेख केली त्यालाच पिव्वर शेती केली असं म्हणणं धाडसाचं ठरेल. नाहीतर कुळकायदा इथे आलाच नसता. इथे महाराष्ट्रापुरताच विचार करावा ही विनंती. "

-आजही महाराष्ट्रात एकेका घरात दीड-दोनशे एकर जमिनी आहेत.(काही राजकारण्यांच्या तर पंधरा-वीस हजार एकर जमिनी आहेत. पण ते सोडा.) या पूर्ण जमिनी कोणी जमिनदार स्वतः कष्टाने पिकवतात का? अहो, इतकेच कशाला? गावागावात 'मनरेगा' आल्यावर शेतात काम करायला शेतमजूर गडी-बायामाणसे मिळणे बंद झाले आहे अशी ओरड कित्येक लहान दोन-चार एकरधारक शेतकरी करतात. त्या शेतकर्‍यांच्या जमिनीही आजवर फक्त ते स्वतः कसत होते असे म्हणता येईल काय? (आता शेतमजूर मिळेनासे झाल्यावर/ महाग झाल्यावर त्यांना एकमेकांकडे श्रमाचे बार्टर करावे लागते ही वस्तुस्थिती आहे.) महाराष्ट्रातला कूळकायदा हा मुळातच अन्यायकारक होता असे कोणी म्हणू शकेल. त्याचवेळी त्याला सुप्रिम कोर्टात कोणी च्यॅलेंज कसे केले नाही? याचे आश्चर्य आहे. (आणि कोणी तसे केले असेल तर जाणकारांनी माझे अज्ञान दूर करावे.)'कसेल त्याची जमिन' हा न्याय लावायचा तर भारतात ८०% शेतजमीन शेतमजूरांना वाटावी लागेल. असा कायदा इतर राज्यात करण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. तिथे विनोबांचे 'फसलेले' भूदान झाले. कायद्याने जमिनी काढून घेण्याचा प्रकार फक्त महाराष्ट्रातच झाला.फक्त इथेच एका अल्पसंख्य समाजाला गांधीहत्येचा बट्टा लावून,सरसकट कलंकित करून, छळ करून कूळकायद्याने देशोधडीला लावले गेले.(पुन्हा एकदा 'आशिस नंदी'सदृष प्रकार - गांधींचे परमभक्त शंकरराव देव,विनोबा भावे, साने गुरुजी, अप्पासाहेब पटवर्धन हे सर्व याच जातीतून आले होते हे इतर सर्वजण सोयिस्करपणे विसरले. आणि गांधीजींच्या अहिंसक विचारांची जळितात होळी केली गेली.)

ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारांच्या काल्पनिक कथा आज रंगवल्या जातात. पण खरे अत्याचार करणारे कोणा एका विशिष्ट जातीशी संबंधित होते/आहेत काय? जात-पात न मानणारा मुस्लिम धर्म तर उदाहरणादाखल आहेच पण हिंदू धर्मातून फुटून निघालेले आणि जातपात न मानणारे धर्मही पुन्हा जात संकल्पनेप्रत पोचले होते/आहेत हे माहित नाही काय? जातीची उतरंड फक्त ब्राह्मणांनाच मान्य होती आणि इतर जातींना नव्हती काय? डॉ. आंबेडकरांनी सकल दलितांचा उद्धार करण्याचे स्वप्न पाहिले पण त्यातही ढोर-महार-चांभार अशी फूट त्याकाळी नव्हती आणि आजही नाही काय? हे सर्व लोक रोटीबेटी व्यवहार करतात काय?
माझ्या बघण्यात खेड्यातली/ गावातली सर्वसामान्य 'बामणं' वेशीआतल्या इतर शेतकरी समाजापेक्षा काही वेगळ्या थाटामाटाच्या जीवनशैलीत रहात होती असे नाही. अर्थात वेशीबाहेर रहाणार्‍या लोकांचे जीवन अत्यंत हालाखीचे होते हे मान्यच आहे. परंतु म्हणून त्याकाळातल्या वेशीबाहेरच्या जातींनी वेशीआतल्या फक्त बामणांनाच लक्ष्य करावे हे गौडबंगाल कळत नाही.

आणि आता शहरीकरण तर सर्वच जातींचे झालेले आहे. नवश्रीमंती सर्व जातीत आलेली आहे. आज नवबौद्ध(पूर्वीची बहुतांशी महार ही जात) मोठ्या प्रमाणावर उच्चमध्यमवर्गपर्यंत पोचले आहेत. त्याचप्रमाणे गरीबी म्हणाल तर सर्वच जातींमध्ये आहे.आज दोनवेळेला जेवणाची ददात असलेली ब्राह्मण कुटुंबे मला माहित आहेत.

दलितांची दु:खे बेगडी आहेत असे मुळीच नही. पण त्यांना ती खरीखुरी दु:खे नष्ट करण्याच्या असंख्य संधी आता उपलब्ध आहेत. 'एकमेका साह्य करू' या मार्गाने त्यांनी वाटचाल केली तर त्त्यांना पुढे येण्यात कोणीच रोखू शकत नाही. इतकेच नव्हे तर तथाकथित मनुवादी अन्यायकारक हिंदू धर्मात राहण्याचीही कोणतीच सक्ती त्यांच्यावर नाही.
दे आर फ्री टू फुलफिल देअर विशेस!
असे असता, विद्रोहाच्या नावाखाली सद्यकालात एका काल्पनिक शत्रूवर तूटून पडण्याची 'डॉन किहोटे'वृत्ती ते कधी सोडणार?

की हा आंधळा 'विद्रोहच' त्यांच्या विकासातला मोठा आडथळा ठरत आहे आणि धूर्त राजकारणी त्यांना आपल्या दावणीला बांधून मागे ढकलत आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या अश्या मनोवृत्तीच्या लेखकांमुळे आता मीच "ऐसी अक्षरे" वर येणे बंद करावे असे मला वाटायला लागले आहे.
हे असल्या वि़कृत मनोवृत्तीचे काही वाचले की पुढचा सगळा दिवस वाईट जातो.

हे लेखक काही बदलणार नाही, संपादक मंडळ काही करणार नाही. त्यामुळे आपणच येणे बंद करावे हे शहाणपणाचे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शहानपणा ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गांधींच्या "गावाकडे चला" या स्वप्नरंजनाची आठवण झाली. त्यांनी गावाकडचं रंगवलेल्या स्वप्नमय चित्राची चिविंनी त्यांच्या कोणत्यातरी चिमणराव-लेखांंमधे फार टर उडवली आहे, त्याची आठवण झाली. आंबेडकरांनी मात्र त्यांच्या अनुयायांना "शहराकडे चला" असा संदेश दिला. काही दशकांनंतर आंबेडकरांची दृष्टी योग्य होती असं दिसतंय.

एकप्रकारे तुमची पुतणेमंडळी वेगळी गाणी म्हणत आहेत तेच योग्य असंही वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.