"माझे विमान - "

ताई, कर ना लौकर घाई
विमान चालू करून देई -
चावी दे तू विमानाला
फिरवून आणिन मी तुजला !

खेळणी पसरली सगळीकडे
विमान सरकत नाही पुढे ,
भूभू, हत्ती, उंट नि घोडा -
विमान आले रस्ता सोडा !

विमान निघाले, हळूच ये ना
तायडे, खेळणी मोडतील ना...
विमान माझे छान किती
वाटत नाही आता भिती !

घेतला वेग विमानाने जरी
मधेच थांबले विमान तरी -
खुर्र्र... खुर्र... खट..गम्मत झाली
बघ ना ताई, चावी संपली !
.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

घेतला वेग विमानाने जरी
मधेच थांबले विमान तरी -
खुर्र्र... खुर्र... खट..गम्मत झाली
बघ ना ताई, चावी संपली !

विमान असे मिड-फ्लाइट बंदबिंद पडू लागले तर भयंकर आहे.

हा काही जुना-दळभद्री-मराठी-चित्रपट-छाप कोणाचे-बरे-होत-नाही-किंवा-बरे-चाललेले-असले-तरी-मध्येच-कोणीतरी-मरते-(टिपिकली-एखाद्या-लहान-मुलीचा-तरणाताठा-बाप-किंवा-लहान-मुलीची-तरणीताठी-असलीनसली-तरी-प्रेमळ-आई)-नि-आभाळ-कोसळते प्रकारचा ट्विस्ट वगैरे आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे तर अनेक इङ्ग्रजी कविता/गीते ज्या लहान मुलान्ना शिकविल्या जातात, त्यात अपघात आहेत.

१. Jack and Jill - जॅक पडतो, मुकुट (की टाळू ?) मोडतो. जिल् गडगडत येते.
२. London bridge was falling down -
यात तर काहीही सामग्री वापरा, तो पूल पडणार, वाकणार, चोरी होणार, असेच बिम्बवले आहे. त्याही पलिकडे जाऊन राखण करायला माणूस ठेवला, तर तो झोपेल आणि तो झोपू नये यासाठी उपाय काय, तर त्याला तंबाखूचा पाईप ओढायला द्या !
३. Humpty Dumpty - हे दोघे पडल्यावर तर राजाचे सम्पूर्ण सैन्य आणि घोडे एकत्र सान्धू शकले नाहीत.
४. Ring around roses (तेच ते 'रिङ्गा-रिङ्गा रोझी') - हे तर कहर आहे. प्लेगचे लक्षण म्हणून गुलाबी (रोझी) रङ्गाचा चट्टा उठतो. खोकणे/शिङ्का ही इतर लक्षणे. ['पोझी' ही वनस्पती जवळ बाळगणे हे प्लेगला दूर ठेवण्याचे एक साधन.] ते 'हश्शा-हुश्शा' शिङ्कून सगळे शेवटी खाली पडतात.

शेवटी या गाण्यान्तून अपघाताच्या गोष्टींऐवजी, धडपडण्याला हसायचे हेच लहान मुलाञ्च्या लक्षात राहते !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या (इङ्ग्रजी) कविता दळभद्री होत्या, हे आपल्याही कविता/सिनेमे दळभद्री असण्याचे / बनवण्याचे समर्थन होऊ नये, इतकेच म्हणावेसे वाटते.

शेवटी या गाण्यान्तून अपघाताच्या गोष्टींऐवजी, धडपडण्याला हसायचे हेच लहान मुलाञ्च्या लक्षात राहते !

मुलान्ना काहीच कळत नसते, सबब ती हसणारच. (कविता बनवणार्‍या नि त्या मुलान्कडून वदवून घेणार्‍या) प्रौढान्ना आपल्या विकृत दळभद्री फ्याण्टशा या त्या निष्पाप, अजाणत्या बालकान्कडून वदवून घेताना काही जबाबदारीची जाणीव नको काय?

राहता राहिले त्या इङ्ग्रजी कवितान्विषयी: 'रिङ्ग-अराउण्ड-द-रोझेस'विषयी सहमत आहे, आणि याच कारणासाठी मला ती कविता व्यक्तिशः आवडत नाही. 'हम्प्टी डम्प्टी' हा माझ्या कल्पनेप्रमाणे निव्वळ एक उखाणा/हुमाणा/पहेली/तुम्ही जे काही म्हणत असाल ते आहे, आणि त्याचे उत्तर 'अण्डे' असे आहे. सबब, त्यात माझ्या समजुतीप्रमाणे दळभद्री अथवा अभद्र असे काहीही नाही. बाकी, 'ज्याक अन् जिल' नि 'लण्डन ब्रिज'च्या गर्भितार्थान्बद्दल मला कल्पना नसल्याकारणाने, पास. (परन्तु तरीही, या कवितान्वर दळभद्रीपणाचा आरोप करता येईल, असे वाटत नाही. 'ज्याक अन् जिल'च्या बाबतीत इङ्ग्रजी कवितान्मधील समान धागा असलेल्या क्रौर्याचा, दुष्टपणाचा आरोप करता येईलही कदाचित, परन्तु दळभद्रीपणाचा खचितच नव्हे. उलटपक्षी, 'हश-अ-बाय बेबी'/'रॉक-अ-बाय बेबी'मध्ये तो दळभद्रीपणा जाणवतो का कदाचित? कल्पना नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला या किंवा 'विदेश' याञ्च्या कविताम्बद्दल कसलाच आरोप करायचा नाही. या कवितान्त अपघात/पडझडी आहेत आणि मुलान्ना ते न कळल्याने ते हसतात, खिदळतात हे एक निरीक्षण नोन्दवणे इतपतच माझ्या प्रतिसादाचा हेतू होता. या कविता 'नर्सरी र्‍हाइम्स्' म्हणून कश्या माणसाळल्या हे कुतुहल, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहान-मुलीची-तरणीताठी-असलीनसली-तरी-प्रेमळ-आई

हे 'लहान-मुलाची-तरणीताठी-असलीनसली-तरी-प्रेमळ-आई' असे वाचावे.

म्हणजेच, पूर्ण कंस हा '(टिपिकली-एखाद्या-लहान-मुलीचा-तरणाताठा-बाप-किंवा-लहान-मुलाची-तरणीताठी-असलीनसली-तरी-प्रेमळ-आई)' असा वाचावा.

आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान कविता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही