Skip to main content

कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन

“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.”
― Chris Hedges

तुमचा भुतांवर विश्वास आहे का? तुमचा भानामतीवर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या चालीवर तुमचा ग्लोबल वॉर्मिंगवर विश्वास आहे का असा प्रश्न लोक एकमेकांना विचारताना पाहिले की विज्ञान ही एक श्रद्धा-अंधश्रद्धा ठेवण्याची गोष्ट आहे की काय असे वाटू लागते. तथाकथित सुशिक्षित लोक आणि भूत-भानामती वगैरेंवर चर्चा करणारे लोक यात साम्य वाटायला लागते. थोडे खोलात शिरून पाहिले तर असे दिसते की या गोष्टींवर वाद घालणारे दोन्ही बाजूकडचे लोक स्वतःला वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समजत असले तरी ते केवळ दुसर्‍यांनी दिलेल्या माहितीचे आणि बर्‍याच वेळा, दुसर्‍याच कोणीतरी त्या महितीकडे वेगवेगळ्या कोनांतून पाहून मांडलेल्या, गृहीतकांचे वापरकर्ते आहेत. त्यांना वैज्ञानिक दृष्टी नाही असे मला म्हणायचे नाही. पृथ्वी गोल आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते वगैरे अतिकीचकट नसलेल्या गोष्टी हे लोक तर्कशुद्ध गणिते व प्रयोगांनी सहज सिद्ध करू शकतात. दुर्दैवाने आजचे विज्ञान या साध्या-सरळ गृहीतकांच्या अनेक प्रकाशवर्षे पुढे गेले आहे. आज कोणत्याही क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक इतक्या खोलवरच्या आणि कीचकट गोष्टींवर संशोधन करत आहेत की सामान्य माणसाला स्वतः प्रयोग करून, गणित करून त्या गोष्टी पडताळून पाहणे शक्य नाही. किंबहुना एका क्षेत्रात काम करणार्‍या बुद्धिमान शास्त्रज्ञाला दुसर्‍या क्षेत्रातल्या संशोधनाबद्द्ल माहिती असेल असे तर नाहीच; शिवाय स्वतःच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व उपकरणे तयार करणे वा विकत घेणे ही एकट्या-दुकट्याच्या आवाक्यातली गोष्ट असेल असेही नाही. म्हणजेच आजच्या संशोधनाला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि मनुष्यबळाची आवश्यकता असते. ही मोठ्या प्रमाणावरची गुंतवणूक आणि मनुष्यबळ एक तर सरकार पुरवू शकते किंवा मोठमोठ्या खाजगी कंपन्या.

सरकार हे लोकांचे प्रतिनिधीत्व करते त्यामुळे लोकांच्या भावी गरजा किंवा प्रश्न ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी कोणत्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता सरकार संशोधनाला मदत करू शकते. कंपन्यांचे मात्र तसे नाही. कंपन्या किंवा कॉर्पोरेशन्स एका विशिष्ट हेतूने जन्म घेतात आणि तो हेतू म्हणजे पैसा कमावणे. कायद्याच्या दृष्टीने कॉर्पोरेशन म्हणजे पैसा कमावण्यासाठी जन्माला आलेली एक विशिष्ट व्यक्ती असते आणि पैसा कमावण्यासाठीच प्रयत्न करणे हे कायद्याने तिच्यावर बंधन असते.
सरकारने सर्व लोकांच्या हितसंबंधांचे रक्षण करायचे आणि कंपन्यांनी आपल्या भागधारकांसाठी संपत्ती निर्माण करायची असे दोन वेगवेगळे मार्ग या संस्थांच्या वाटचालीसाठी असले आणि या दोन्ही संस्था लोकांपासूनच बनलेल्या असल्या तरी बर्‍याच वेळा त्यांचे मार्ग एकमेकांना आडवे जातात आणि दोन्ही संस्थांमधल्या माणसांचे ध्येय पैसे कमावणेच असल्यास त्या चव्हाट्यावर बर्‍याचदा विज्ञानाचा खून पडतो.

अमर्याद वाढीवर आधारित असलेली अर्थव्यवस्था आणि तिने निर्माण केलेली इंडस्ट्रीयल सिव्हिलायझेशन जसजशी जगभर पसरत गेली तसतसे हे मार्ग अनेकवेळा एकमेकांना आडवे गेलेले दिसतात. जागतिक तंबाखू उद्योग हे याचे एक अत्यंत ठळक असे उदाहरण आहे. विशेषतः कॅपिटॅलिझम(R) आणि डेमॉक्रसीTM यांची गंगोत्री असलेल्या अमेरिकेत विडीउत्पादक कंपन्यांनी शोधलेले आणि वापरलेले (कु)प्रचाराचे तंत्र क्रांतिकारक ठरले. श्री. एडवर्ड बर्नेज या सिग्मंड फ्रॉईडच्या भाच्याने त्याच्या मानसशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून पाश्चात्य जगात सिगारेट्सचा खप प्रचंड वाढवला. प्रत्येक बाबतीत पुरुषांची बरोबरी म्हणजेच मुक्ती असे समजणार्‍या स्त्रियांची मानसिकता अचूकपणे हेरून जाहिरातींतून धूम्रपानाला त्याने स्त्रियांच्या मुक्तीशी जोडून टाकले आणि पाहता पाहता स्त्रियांचे एक मोठे मार्केट या कंपन्यांना खुले झाले. पुढे फुप्फुसांच्या, गळ्याच्या वगैरे कर्करोगामागे आणि श्वसनसंस्थेच्या अनेक विकारांमागे धूम्रपान हे कारण असावे असा विदा समोर येऊ लागला तेव्हाही या कंपन्यांनी आपली प्रचारयंत्रणा वापरून आणि काही शास्त्रज्ञांना पैसे देऊन लोकांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला. 'धूम्रपान करणार्‍यांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग जास्त दिसतो म्हणजे धूम्रपानाने फुप्फुसाचा कर्करोग होतो असे नाही' असा 'Correlation is not causation' मुद्दा या कंपन्यांनी मांडला. अजूनही धूम्रपानामुळे नक्की कशा प्रकारे कर्करोग होतो यावर संशोधन पूर्ण झालेले नाही. सुदैवाने धूम्रपानाने अनेक विकार होतात हे बर्‍याच लोकांना आणि सरकारांनाही पटले आणि पूर्ण बंदी नाही तरी या कंपन्यांच्या दबावाला बळी न पडता थोडी उपाय योजना करता येणे शक्य झाले.

एडी बर्नेजच्या प्रचारतंत्राचा निर्विवाद विजय म्हणून ज्याकडे बोट दाखवले जाते ते म्हणजे फ्लोराईडेशन. फ्लोराईड हे कारखान्यांतल्या रासायनिक प्रक्रियांमधून निर्माण होणारे एक घातक प्रदूषक रसायन आहे. या रसायनाने हाडे ठिसूळ होतात आणि हे रसायन जमिनीत सोडल्याने सगळी गुरे, झाडे व नदीतले मासे मेले म्हणून अमेरिकेतल्या मोहॉक इंडियन्सनी अ‍ॅल्युमिनिअम कंपनीवर केलेला खटला जिंकलाही होता. असे असूनही त्याने दात शुभ्र होतात असे समजून टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असण्याचा आग्रह धरणारे जगभरातले ग्राहक आणि इतकेच नाही तर स्वतःच्या पिण्याच्या पाण्यात हे फ्लोराईड मिसळण्यास आक्षेप न घेणारे अमेरिकन ग्राहक हा या प्रचारतंत्राचा चमत्कारच म्हटला पाहिजे. पिण्याच्या पाण्यातून वा टूथपेस्ट मधून हे फ्लोराईड शरीरात साठत जाते आणि त्याचे दुष्परिणाम म्हातारपणी जाणवू लागतात. हे सगळं कशासाठी तर दात शुभ्र दिसण्यासाठी ज्याची गरजही कंपन्यांच्या प्रचारानेच निर्माण केलेली! या प्रचारातून कंपन्यांचा मात्र भरमसाठ फायदा झाला. प्रदूषण नियंत्रणाचा खर्चही वाचला, शिवाय ते सरकारला विकून बक्कळ पैसाही कमावता आला.

स्वतःच्या फायद्यासाठी अपायकारक पदार्थांबद्दल चुकीची माहिती संशोधनाच्या नावाखाली खपवणे इतक्यावरच या कंपन्यांचा उपद्रव सीमित नाही. स्वतःच्या व्यवसायास हानीकारक ठरू शकेल अशा संशोधनाविरुद्ध संशय निर्माण करून लोकांचा बुद्धिभेद करणे हा सगळ्यात जास्त गंभीर गुन्हा या कंपन्या करतात. नाओमी ओरेस्केस आणि एरिक कॉनवे यांच्या मर्चंट्स ऑफ डाऊट या पुस्तकात त्यांनी या कंपन्यांसाठी संशयाचे सौदागर म्हणून काम करणार्‍या शास्त्रज्ञांचा समाचार घेतला आहे. स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी हवामानात बदल होतच नाहीत असे म्हणणे, नंतर बदल होत आहेत असे मान्य केले तरी मानवाच्या प्रदूषणाचा त्यात हात नाही असे म्हणून आपला धंदा आहे तसाच वाढत राहील याची काळजी घ्यायचा प्रयत्न करणे, योग्य वेळ असूनही सौर व इतर ऊर्जास्रोतांचा विकास न होऊ देता खनिज तेलाच्या व्यवसायासाठीच सवलती चालू राहतील हे पाहणे, प्रत्यक्षात पर्यावरणाचा न भूतो न भविष्यति असा नाश होत असला तरी स्वतःची ग्रीन इमेज दाखवणे इत्यादी उद्योग सर्रास चालू असतात.

त्याचवेळी निसर्गाची भीती माणसाला दाखवत त्या भीतीपोटी पैसे आणि सत्ता मिळवणे हाही या कंपन्यांचा व त्यांच्या सरकारात असलेल्या साथीदारांचा आवडता उद्योग आहे. आजवर कोणताही नवीन आजार सापडला तर त्याचे मूळ आधी कोणत्यातरी विषाणूत असणार अशा दृष्टीनेच संशोधनाला सुरुवात केली जाते. स्कर्व्ही, बेरीबेरी, SMON आणि कॅन्सर अशा अनेक रोगांच्या बाबतीत विषाणूंचाच शोध घेत राहिल्याने महत्त्वाचा वेळ आणि अनेक जीव गेले. स्कर्व्ही, बेरीबेरी वगैरे रोगांचे कारण कुपोषण आणि जीवनसत्त्वांचा अभाव आहे हे सिद्ध झाले असले तरी कॅन्सर होण्याचे कारण अद्याप कळलेले नाही. कर्कजनक द्रव्यांचा त्यात मोठा वाटा आहे आणि ही कर्कजनकद्रव्ये कारखान्यांच्या व वाहनांच्या प्रदूषणातून निर्माण होतात हे सगळ्यांना माहित असले तरी कोणीही त्यावर चकार शब्द काढत नाही.
वेगवेगळ्या समूहांमध्ये विभागल्या गेलेल्या समाजाच्या कॉर्पोरेटिजमचे हे युग आहे आणि स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या धुमश्चक्रीत उडणार्‍या धुरळ्यात सत्याचा आणि विज्ञानाचा विपर्यास अनेकदा होत राहील. त्यांच्या प्रचाराच्या गदारोळात स्वतःच्या अस्तित्वाचा मुळापासून विचार करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानातला फरक ओळखणे, खर्‍या अर्थाने परिपूर्ण आयुष्यासाठी स्वत:ला कशाची गरज आहे हे शोधणे आणि ते कळल्यावर तसे वागण्याचे धैर्य मिळवणे हाच आजचा खरा जीवनोपयोगी विज्ञानवादी दृष्टीकोन; तो सगळ्यांना लाभो ही सदिच्छा!

ऋषिकेश Wed, 20/03/2013 - 14:20

चांगला लेख.. तपशिलवार प्रतिसाद नंतर देतो.
एक प्रश्न विचारायचा आहे:

स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी हवामानात बदल होतच नाहीत असे म्हणणे, नंतर बदल होत आहेत असे मान्य केले तरी मानवाच्या प्रदूषणाचा त्यात हात नाही असे म्हणून आपला धंदा आहे तसाच वाढत राहील याची काळजी घ्यायचा प्रयत्न करणे

यात धंद्यासाठी असे सत्याचा तथाकथित विपर्यास करणारे निष्कर्ष काढले जात आहेत हे गृहितक कशाच्या आधारावर आहे ते वाचायला आवडेल

नगरीनिरंजन Wed, 20/03/2013 - 19:51

In reply to by ऋषिकेश

हवामान बदलाबाबत संशय व्यक्त करणार्‍या समूहांना पैसे पुरवणार्‍यांमध्ये या कंपन्या (आणि अमेरिकन उजवे) आहेत. ही बातमी पाहा. इथे सगळा संशयखोरांचा इतिहास ओरेस्केस बाईंनी मांडला आहे. "फ्री मार्केट्स" आणि "फ्रीडम" वाचवण्यासाठी या लोकांची सगळी धडपड आहे असे दिसते.

ऋषिकेश Thu, 21/03/2013 - 15:38

In reply to by नगरीनिरंजन

आभार.. इथे एखाद्या गोष्टीचा स्वतःच्या फायद्यासाठी तथ्य म्हणून मारा करण्यासाठी पैसे दिले जाताहेत (जे किती गैर? हा वेगळा विषय झाला - किंबहुना हा मुद्दा मांडण्यासाठीच वरील वाक्य आहे याची कल्पना आहे)पण मुळात त्यात (माणसाच्या हस्तक्षेपामुळे क्लायमेट चेन्ज होत नाहिये यात) तथ्य नाही व तथ्याचा विपर्यास आहे का? असा प्रश्न आहे?

मुळ विधानात हे उदाहरण दिल्याने त्या तपशिलाची शहानिशा करतो आहे; कारण माझे यात बराच काळ तळ्यात मळ्यात चालु होते. हल्ली कुठे क्लायमेट चेन्ज होत असेलही, पण त्यासाठी माणूस जबाबदार आहे ("मीच - माणूसच- सर्वशक्तीमान आहे" हा) अहंगंड कुरवाळण्यासाठी, विनाकारण दु:खी होणे मी सोडून देत होतो. तेवढ्यात हा लेख आला ;)

बाकी, जे म्हणायचे आहे त्याबद्दल सहमत आहेच.

नगरीनिरंजन Thu, 21/03/2013 - 16:11

In reply to by ऋषिकेश

IPCC ची सर्व माहिती व विदा त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोणीही त्याची शाहनिशा करू शकतो. वैज्ञानिकांनी सांगितलेल्या निष्कर्षाबद्दल असा संशय निर्माण करणे हेच या लोकांचे काम आहे आणि त्यात ते प्रमाणाबाहेर यशस्वी होतात हेच यावरून दिसते.

बातमीत लिहिलेय की ही Counter-Movement आहे. म्हणजे काही संशोधन करण्यासाठी हे पैसे दिलेले नाहीत तर IPCC ने जे काही निष्कर्ष काढलेत आणि पुढेही काढेल त्याच्या विरुद्ध 'बोलण्याचे' हे पैसे आहेत.
पण याचा अर्थ असा होत नाही की IPCC ने या लोकांविरुद्ध Movement काढलीय आणि यांना त्रास होईल असे निष्कर्ष मुद्दाम काढले जात आहेत.
माणसाच्या उद्योगांमुळे हवेतील CO2 वाढत नसेल तर गेली आठ लाख वर्षे १८० ते २८० PPM च्या दरम्यान असलेले त्याचे प्रमाण एका शतकात ४०० पर्यंत का गेले याचे वेगळे काहीतरी कारण शोधले पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरचे कोणतेही नैसर्गिक बदल इतके वेगात होत नाहीत आणि झाले तर त्याला काहीतरी ट्रिगर असायला हवा. मानवनिर्मित प्रदूषण तो ट्रिगर नाही असे सिद्ध करण्यासाठी अन्य ट्रिगर काय आहे हे शोधणे आवश्यक नाही काय?

मन Thu, 21/03/2013 - 17:18

In reply to by नगरीनिरंजन

जरा अवांतर होइल पण......
तुम्हाला ती थिअरी माहिती आहे का हो? सगळे रस्ते, गाड्या पांढर्‍या रंगात रंगवले की कै टेन्शनच नै.
आख्खं ग्लोबल वॉर्मिंग कसं एकदम गायबच होउन जाणारे.
कुठं गेला बरं तो दुवा; हां...सापडला.....
http://swaminomics.org/?p=284

ऋषिकेश Thu, 21/03/2013 - 19:02

In reply to by नगरीनिरंजन

मानवनिर्मित प्रदूषण तो ट्रिगर नाही असे सिद्ध करण्यासाठी अन्य ट्रिगर काय आहे हे शोधणे आवश्यक नाही काय?

सहमत आहे. हे आवश्यक आहे आणि त्या दिशेने प्रयत्नही चालु आहेत. त्यात बाह्य घटकांचाही (जसे सौर बदल) वगैरेंचाही अभ्यास चालु आहे.
आधीच ३०% जमीन त्यातही मोजक्या भागात माणूस राहणार, अश्या माणसामध्ये अख्ख्या पृथीवरील प्रमाण इतक्या पटीत वाढवायची क्षमता आहे असे वाटत नाही. दर आईस एज मध्ये ते २८० क्रॉस करते (किमान गेले चार) ३.५ लाख अवर्षांपूर्वी ३०० लाही टच केले होते. (ग्राफ सोडल्यास बाकी दुव्यातील लेख तुमच्या विधानांना पुष्टिकारकच आहे याचीही कल्पना आहे ;) )

एका शतकात चारशे होण्यामागे माणूस असुही शकेल मात्र तसे सिद्ध होईपकल्पनेती एक "शक्यता" आहे इतके. तेव्हा त्याच्या विरुद्ध अगदी पैसे घेऊनही कोणी बोलत असेल तर ते किती गैर आहे हे केस बाय केस ठरवावे लागेल (मुळ वाक्य सरसकट वाटले)

विकी आन्सर्स वरील हे लेखन दोन्ही बाजु देते

अवांतरः ३५० ppm ही एकेकाळी मॅक्झिमम सस्टेनेबल लिमिट समजली जात असे असे अनेकदा वाचनात येते आता ४०० ला पोहचूनही सस्टेन करत आहोतच. ;)

अतिअवांतर: दुसरे असे की या CO2 वाढण्याने पृठ्वी ग्रहाचे काय नुकसान होणार आहे? (मानव जातीचे नुकसान = पृथ्वीचे नुकसान नव्हे). या बदलत्या वातावरणातही जे जीव टिकू शकतील ते टिकतील. काही इव्हॉल्व्ह होतील, काही संपतील, माणसासारखे तथाकथित हुश्शार दुसरीकडे रहायलाही जाऊ शकतात. पण त्यासाठी "लो फुटप्रिन्ट्स" वाली प्रोडक्ट्स विकणार्‍यांचेही तितक्याच अनएथिकल गिमिक्सना का बळी पडावे?

नगरीनिरंजन Fri, 22/03/2013 - 08:42

In reply to by ऋषिकेश

एका शतकात चारशे होण्यामागे माणूस असुही शकेल मात्र तसे सिद्ध होईपकल्पनेती एक "शक्यता" आहे इतके

कोणते पुरावे मिळाले म्हणजे हे सिद्ध होईल? हवामानबदलावर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांच्या अधिकृत गटाने जर असा निष्कर्ष मांडला आहे तरी ते सिद्ध झालेच नाहीय असे म्हणण्याचा अर्थ काय होतो हे माझ्या आकलनापलीकडे आहे; पण आजचे विज्ञान म्हणजे विश्वास-अविश्वास ठेवण्यासारखी गोष्ट झाली आहे यालाच पुष्टि मिळते.
गमतीची गोष्ट म्हणजे हिग्ज-बोसॉन कणांमुळे पदार्थाला वस्तुमान मिळते ही 'वस्तुस्थिती' आपण सहज स्वीकारतो. 'म्हणजे काय?' हे ही न विचारता. त्यावर किंचितही वादविवाद होत नाहीत याचे कारण काय आहे? प्रत्येकाने ती गणिती समीकरणे पडताळून पाहिलीत की काय? त्याचे कारण फक्त इतकेच आहे की हिग्ज-बोसॉन कणांमूळे वस्तुमान मिळो न मिळो कोणाच्याही नफ्याचे आकारमान त्याने कमी-जास्त होणार नाहीय.
अवांतराबद्दलः हवामानातले बदल 'हा सूर्य हा जयद्रथ' इतक्या वेगाने होत नाहीत आणि माणसाच्या फ्यूचर डिस्कांउंटिंगमुळे पाहा काहीही होत नाहीय असं म्हणणं फार सोपं असतं. आजूबाजूला दुष्काळ, पाण्यावरून मारामार्‍या चालू असल्या तरी हे पुढे आणखी गंभीर होऊ शकतं हे आशावादासाठी आशावाद ठेवण्याच्या सवयीमुळे लोकांना समजूनच घ्यायचं नसतं.
अतिअवांतराबद्दलः ग्लोबल वार्मिंग म्हणजे जगाचा अंत असे चित्र IPCC ने रंगवलेले नाही. पण कोट्यवधि लोकांना स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे आणि ते लोक कोणत्या वर्गातले असतील हे सांगायला शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही.
जे जगतील ते जगतील, बाकीचे मरतील असा दृष्टीकोन पहिल्यापासूनच ठेवला असता तर ही वेळच आली नसती. :)
"पण त्यासाठी "लो फुटप्रिन्ट्स" वाली प्रोडक्ट्स विकणार्‍यांचेही तितक्याच अनएथिकल गिमिक्सना का बळी पडावे?" हा प्रश्न खरं तर कोणतीही प्रॉडक्ट्स विकणार्‍याम्च्या एथिकल वा अनएथिकल गिमिक्सना बळी का पडावे? असा हवा.
सतत माणसाने 'ग्राहक'च का असावे? किती गोष्टी खरेच गरज म्हणून आणि किती गोष्टी पद्धत म्हणून किंवा समाजाचा दबाव म्हणून आपण घेतो?

ऋषिकेश Fri, 22/03/2013 - 10:31

In reply to by नगरीनिरंजन

पण आजचे विज्ञान म्हणजे विश्वास-अविश्वास ठेवण्यासारखी गोष्ट झाली आहे यालाच पुष्टि मिळते.

याच्याशी "आजचे" हा शब्द सोडल्यास सहमत आहेच. विज्ञान हे नेहमीच विश्वास-अविश्वास ठेवण्यासारखी गोष्ट होते. तुम्ही कितीही सिद्ध करा कोणत्याही व्यक्तीने कशा कशावर विश्वास ठेवावा यावर अजून तरी कोणी कंट्रोल आणू शकलेले नाही. (आणि तेच तर अनेक प्रश्नांचे मूळ आहे :) )

इथे या मुद्द्याबद्दल असहमती नाहिच. फक्त तपशीलातील उदाहरणाबद्दल आहे.

हवामानबदलावर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांच्या अधिकृत गटाने जर असा निष्कर्ष मांडला आहे तरी ते सिद्ध झालेच नाहीय असे म्हणण्याचा अर्थ काय होतो हे माझ्या आकलनापलीकडे आहे;

शास्त्रज्ञांच्या एका गटाला "अधिकृत" ठरवले आहे म्हणून त्यांचेच मत अचूक असेल याची खात्री नाही आणि दुसर्‍या गटाने केवळ खाजगी कंपन्यांकडून पैसे घेतले आहेत म्हणून त्यांचे म्हणणे चुकीचे असेलच असेही नाही. बाकी जेव्हा IPCC "सिद्ध" करेल की माणसाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे हे co2 चे प्रमाण वाढत नाहिये तोपर्यंत ती एक शक्यता म्हणूनच बघावी लागेल सिद्धता म्हणून नाही.

बिग बँग ही कितीही मान्यताप्राप्त थियरी असली तरी श्री. जयंत नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञांचा त्या थियरीवर पूर्ण 'विश्वास' नाही. त्यांच्या लेखी ती एक चांगली "शक्यता" आहे. त्यांनीही एक दुसरी शक्यता मांडली आहे. विज्ञानात प्रत्येक थियरीवर प्रश्न विचारले जाणे योग्यच वाटते, अगदी ते पैसे घेऊन केले असेल तरीही.

नगरीनिरंजन Fri, 22/03/2013 - 12:34

In reply to by ऋषिकेश

दुर्दैवाने बिगबँग थियरी किंवा क्वांटम फीजिक्स सारखा हा निव्वळ गणिती विषय नाहीय. मांडलेले हायपोथिसिस खरे असेल तर काय होईल याचा विचार आणि त्या अनुषंगाने कृती आत्ताच करणे आवश्यक आहे.

विज्ञानात प्रत्येक थियरीवर प्रश्न विचारले जाणे योग्यच वाटते, अगदी ते पैसे घेऊन केले असेल तरीही.

जोपर्यंत प्रश्न विचारले जात आहेत तोवर काहीही कृती करू नये असे यातून ध्वनित होत आहे. परंतु असा आग्रह सगळीकडेच धरला जात नाही उलट विचारलेला प्रश्न खरा ठरला तरी कृती थांबवलीही जात नाही. वरती सिगारेट्सचे उदाहरण दिलेलेच आहे. साध्या पॅरॅसिटॅमॉलने स्वाईन फ्लू बरा होतो असे ब्रिटीश डॉक्टर म्हणत असताना टॅमी फ्लूच्या गोळ्या सरकारला आयात करायला लावले जाते. एड्सवर दिल्या जाणार्‍या AZT औषधावर काही शास्त्रज्ञांचा आक्षेप पेंडिंग असतानाही ते औषध सर्रास वापरले जाते. दरवेळी केलेली कृती वा कृती करणे टाळणे हे आधीच बलवान असलेल्या एखाद्या इंडस्ट्रीला फायदेशीर असते. काय हा योगायोग!

ऋषिकेश Fri, 22/03/2013 - 12:48

In reply to by नगरीनिरंजन

जोपर्यंत प्रश्न विचारले जात आहेत तोवर काहीही कृती करू नये असे यातून ध्वनित होत आहे.

करू नये असे नव्हे मात्र करावीच असेही नाही.
ज्यांना स्वतःचे समाधान होईपर्यंत कोणतीही एक ठाम बाजु घ्यायची नाहिये किंवा प्रसंगी अगदी विरोधी बाजु घ्यायचीये, त्यांच्यावर 'ते व्यावसायिक कंडिशनिंगचे बळी आहेत' असा आरोप त्यांच्या बुद्धीवर अविश्वास/प्रसंगी अपमान प्रकट करतो असे वाटते.

नगरीनिरंजन Fri, 22/03/2013 - 13:27

In reply to by ऋषिकेश

ज्यांना IPCC ने मांडलेले पटते त्यांच्यावरही नेमका हाच आरोप केला जातो. या शास्त्रज्ञांवरही स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी आणि रिसर्चच्या पैशाचा ओघ वाहता राहावा म्हणून खोटे निष्कर्ष पसरवण्याचा आरोप होतोच आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांनाही त्या प्रचाराचे बळी ठरवले जातेच.
यात कोणाच्याही बुद्धीवर अविश्वास प्रकट होतो असे मला वाटत नाही. माहितीअभावी सगळेच कधी ना कधी प्रचाराला बळी पडतात.अदितींनी म्हटल्याप्रमाणे सामाजिक कंडिशनिंगला बहुतेक सगळे बळी पडतात पण नवीन दृष्टीकोन मिळाल्यावर किंवा नवीन माहिती मिळाल्यावर माणसाची मते बदलण्याची प्रज्ञा प्रत्येकाकडेच असते, म्हणून तर आपला दृष्टीकोन सांगण्याचा, माहिती शेअर करण्याचा आटापिटा.

बॅटमॅन Wed, 20/03/2013 - 14:25

लेख आवडला. ही बाजू नीट समोर यायला हवी. ती समोर आणल्याबद्दल आणि "संशयश्रेष्ठी" चा दुवा दिल्याबद्दल बहुत धन्यवाद! तपशीलवार सांगण्यासारखे कधी नंतर जवळ असले, तर नक्की परतेन. तूर्त हीच पोच :)

मन Wed, 20/03/2013 - 14:33

शेवटी क्रमशः नसलं तरी अजून लिहाल अशी अपेक्षा.
.
खालील दुवे पहावेतः-
http://www.mimarathi.net/node/9485
http://www.mimarathi.net/user/363/mytrack
'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका
'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - २: रोश आणि अॅडम्स
'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ३: रोशची कार्यपद्धती
'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ४: मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश
'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ५: फासे पडले नि फासही
'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ६: काही टिपणे

रमताराम Tue, 16/04/2013 - 22:31

In reply to by मन

आम्ही इथे काही लिहायला उगवलो तर आमच्या लेखनाचा दुवा आधीच हजर. (ती लेखमाला अद्याप अपूर्ण आहे ती ही अशाच काही तपशीलांच्या, माहितीच्या अभावी.) मंडळ आपले आभारी आहे मनोबा.

ॲमी Wed, 20/03/2013 - 16:16

छान लेख.
भूत, भानामती, देव, देऊळ, संस्कार, संस्कृती, होळी, दुष्काळ, पाणी वाया न घालवणे... या सर्व बाबतीत वैयक्तिक पातळीवर सहभाग नाकारता येतो.
तसं 'कॉर्पोरेटिझम आणि संशोधन' च्या बाबतीत काय काय करता येणं शक्य आहे?
'विज्ञान आणि तंत्रज्ञानातला फरक ओळखणे' हे कसे करणार? उदा तंबाखूचे दुष्परीणाम मान्य म्हणुन सिगरेट नाही पिणार हे ठीक आहे. पण टुथपेस्ट बद्दल मला या लेखातून कळलं. आता काय टुथपेस्ट वापरायची सोडुन देउ? आणि त्याऐवजी जे काही वापरेन, कालांतराने कळलं की तेच टुथपेस्टपेक्षा वाईट आहे, तर काय करणार?
'खर्या अर्थाने परिपूर्ण आयुष्यासाठी स्वत:ला कशाची गरज आहे हे शोधणे आणि ते कळल्यावर तसे वागण्याचे धैर्य मिळवणे' हे कितपत शक्य आहे??

बॅटमॅन Wed, 20/03/2013 - 16:18

In reply to by ॲमी

'खर्या अर्थाने परिपूर्ण आयुष्यासाठी स्वत:ला कशाची गरज आहे हे शोधणे आणि ते कळल्यावर तसे वागण्याचे धैर्य मिळवणे' हे कितपत शक्य आहे??

सध्याच्या किंवा कुठल्याही काळात एका मर्यादेपर्यंतच शक्य आहे. कुठल्या गोष्टी आचरणात आणण्यासाठी धैर्य गोळा करावे लागते हे काळानुसार ठरते.

राजेश घासकडवी Wed, 20/03/2013 - 16:38

नुकतीच मी 'ऱ्हेटॉऱ्हिक (स्टडी ऑफ आर्ग्युमेंटेशन)' या विषयीचा एक ऑडियो कोर्स ऐकून पूर्ण केला. त्यात त्याने वैज्ञानिक सत्य आणि सामाजिक सत्य (हे शब्द वापरलेले नाहीत) यात फरक केलेला आहे. वैज्ञानिक सत्याची चर्चा तांत्रिक विश्वात होते, तर सामाजिक सत्यांची चर्चा सर्वसामान्य माणसाच्या विश्वात (पब्लिक स्फिअर) होते. या दोनमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. सत्य म्हणजे काय, आणि ते सिद्ध कसं होतं यात विशेषतः. या लेखात सामाजिक सत्यं कशी प्रस्थापित होतात, आणि त्यात चुकीची माहितीही जनमानसात कशी पसरू शकते किंवा फायद्यासाठी पसरवली जाते याचा छान आढावा घेतलेला आहे.

एक वेगळं उदाहरण देतो. यात अज्ञान पसरवण्यासाठी कोणी पैशासाठी प्रयत्न केलेला नाही, तरी ते अजून टिकून आहे. 'आपण मेंदूचा फक्त दहा टक्के भाग वापरतो' हे अगदी जुन्या काळपासून जनमानसात 'प्रस्थापित' झालेलं 'सत्य' आहे. ते अर्थातच खरं नाही. मेंदूच्या सुमारे १० टक्के भाग न्यूरॉन्सनी वापरलेला असतो, बाकीचा भाग न्यूरॉन्सच्या संरक्षक आवरणाचा असतो. पण त्यावरून 'मेंदूची दहा टक्के क्षमता वापरतो' असा सर्रास अर्थ काढला जातो आणि तो इतक्या वर्षांनंतर टिकूनही राहिलेला आहे.

माझा अंदाज असा आहे की या दोन सत्यांमधली दरी हळूहळू कमी होत चाललेली आहे. आता कोणीही सोम्यागोम्या विकीपीडियावर शोधून वैज्ञानिक सत्याच्या जवळ जाणारी माहिती मिळवू शकतो. त्यामुळे चुकीचं ज्ञान पसरवण्याचा प्रयत्न करणाराला अधिक काळजीपूर्वक करावं लागतं.

सहज Wed, 20/03/2013 - 17:04

स्वतःच्या अस्तित्वाचा मुळापासून विचार करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानातला फरक ओळखणे, खर्‍या अर्थाने परिपूर्ण आयुष्यासाठी स्वत:ला कशाची गरज आहे हे शोधणे आणि ते कळल्यावर तसे वागण्याचे धैर्य मिळवणे हाच आजचा खरा जीवनोपयोगी विज्ञानवादी दृष्टीकोन; तो सगळ्यांना लाभो ही सदिच्छा!

आमेन!

इन्फ्लेशनच्या राक्षसाला न घाबरता वाघावरुन पुन्हा आयुष्यात खाली उतरुन पायी कसे चालावे हा लेख शोधत आहे. मिळाला की सांगावे. तोवर धैर्य गोळा केल्या जात आहे.

मी Wed, 20/03/2013 - 17:37

रोचक विषय, व्यवस्थेतील पळवाटांचा वापर करुन त्याच व्यवस्थेचे शोषण करणं हे सत्तेचं व्यवच्छेदक लक्षण आहे, त्याला अपवादात्मक स्थिती फारशी आढळत नाही व असल्यास ती फार तग धरत असेल असं वाटत नाही.

"जीवनोपयोगी विज्ञानवादी दृष्टीकोन" म्हणजे जगण्याचं एक तत्वज्ञान ह्याअर्थी तुम्ही ते इथ मांडलं आहे, हा तुमचा विज्ञानवादी दृष्टीकोन नक्की काय हे जरा अधिक विस्तृतपणे मांडण्याची गरज आहे, कारण रुढ विज्ञानवादी दृष्टीकोन योग्य/अयोग्य असं काहीच सांगत नाही तो फक्त समीकरणं मांडतो, त्यावरुन योग्य/अयोग्य ठरवणारं तत्वज्ञान नक्की कोणतं हे स्पष्टपणे काही कळत नाही.

तंबाखूच्या संदर्भात २००५चा Thank You for Smoking जरूर पहावा.

Chris Hedges च्या विधानावरुन "Who is John Galt?" आठवण झाली.

नगरीनिरंजन Wed, 20/03/2013 - 20:21

In reply to by मी

रुढ विज्ञानवादी दृष्टीकोन योग्य/अयोग्य असं काहीच सांगत नाही

हे बरोबर असले तरी रूढ विज्ञानवादी दृष्टीकोन केव्हाच गढूळला आहे हेच सांगायचा प्रयत्न आहे. रूढ विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवला तर माणूस मरतो की जगतो याच्याशी विज्ञानाला काही देणे घेणे नसले पाहिजे, फक्त तो कसा आणि का मेला हे कळले म्हणजे झाले. विज्ञान म्हणजे विशेष आणि विशुद्ध ज्ञान. पण जेव्हा हे ज्ञान वापरून काही गोष्टी केल्या जातात तेव्हा त्याच्यामागे काही योग्य/अयोग्य असे समजून गृहीतके केली जातात. उदा. माणूस रॅशनल आहे आणि रॅशनल माणसाचा युटिलिटी मॅक्सिमायझेशन एवढा एकच हेतू असतो हे गृहीतक. स्रोत मर्यादित आहेत (means are scarce) असं एका बाजूला म्हणून सतत वाढती अर्थव्यवस्था शक्य आहे असे गृहीतक. (only)(paying)Human Life is sacred हे गृहीतक (खरं म्हणजे त्याच्या आडून Profits are sacred हे गृहीतक). जास्त वस्तू आपले आयुष्य चांगलं करतात हे गृहीतक.
अशा अनेक चुकीच्या गृहीतकांवर आधारित आजची संपूर्ण व्यवस्था चालू आहे. या गृहीतकांना आव्हान देणे हा विज्ञानवाद मला अभिप्रेत आहे.
ही गृहीतके शिक्षणाच्या कोंडवाड्यात आपल्या मनावर ठसवली गेली आहेत आणि त्यामुळे कशासाठी करायचं हे न कळता निव्वळ भयगंडाने आपण रॅट रेसमध्ये ओढले जातो.

मन Wed, 20/03/2013 - 18:01

आधुनिकीकरण म्हणजे जुनी हरेक गोष्ट गुंडाळून ठेवणं का?
"चांगलं असेल ते टिकेलच" हे गृहितक आहे की निष्कर्ष हे कुणीतरी सांगायला हवं.
शिवाय ह्यातून "ते टिकलय म्हणजे चांगलच असणार" असा एक टोन येतो.
प्रॉब्लेम :-
हे होण्यात कॉर्पोरेटायझेशनचाही सहभाग आहे. कॉर्पोरेटायझेशन ही प्रक्रिया प्रभावी आहे.

ऋता Wed, 20/03/2013 - 20:18

अतिशय महत्त्वाचा विषय लेखाच्या आधारे चर्चेस आणल्याबद्द्ल धन्यवाद.

'द कॉर्पोरेशन' हीच फिल्म (बहुतेक) काही वर्षांपूर्वी पाहिली होती.एका व्यक्तीप्रमाणे कॉर्पोरेशनचे विविध पैलू त्यात सादर केले होते. पाहिल्या नंतर आपल्याला अनेक कंपन्या जी मोठीमोठी आश्वासनं देतात ती किती बनावट आणि भंपक असतात हे जरा आणखीन स्पष्ट झालं.

"या दोन्ही संस्था लोकांपासूनच बनलेल्या असल्या तरी बर्‍याच वेळा त्यांचे मार्ग एकमेकांना आडवे जातात आणि दोन्ही संस्थांमधल्या माणसांचे ध्येय पैसे कमावणेच असल्यास त्या चव्हाट्यावर बर्‍याचदा विज्ञानाचा खून पडतो."
संशोधनासाठी पैशाची गरज असते त्यामुळे नेमका सुवर्णमध्य कसा साधायचा हा एक मोठा प्रश्नच आहे.

अनेक लहानसहान गोष्टींची(कित्येक वेळा निरूपयोगी/हानीकारक वस्तूंची) जवळजवळ व्यसनंच कंपन्या माणसांना लावत असतात. त्यामुळे त्यातून बाहेर येणं महाकठीण काम आहे...अधिक गुंतत जाण्याचाच संभव आहे. व्यसन न जडण्यासाठी काही कोणी औषध शोधलं आहे का?

"वेगवेगळ्या समूहांमध्ये विभागल्या गेलेल्या समाजाच्या कॉर्पोरेटिजमचे हे युग आहे आणि स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या धुमश्चक्रीत उडणार्‍या धुरळ्यात सत्याचा आणि विज्ञानाचा विपर्यास अनेकदा होत राहील."
याच्याशी सहमत.

"फ्लोराईडेशन" वरून 'डॉक्टर स्ट्रेंजलव ऑर हाउ आय लर्न्ड टू स्टॉप वरीइंग अँड लव द बॉम्ब" या चित्रपटातल्या ""फ्लोराईडेशन" हा कम्युनिस्टांचा डाव आहे" असा ठाम समज असलेला ब्रि.जेन.जॅक डी. रिप्परची आठवण झाली.

राजन बापट Wed, 20/03/2013 - 21:28

उत्तम धागा. किमान दोन तीनदा वाचला. वर कुणी म्हण्टल्याप्रमाणे, यावर एकरेषीय प्रतिसाद देता येणं कठीण आहे, सविस्तर प्रतिसाद द्यावा लागेल. पण (पुन्हा एकदा, आणखी कुणीतरी म्हण्टल्याप्रमाणे ) हा विषय इथे मांडल्याबद्दल आभारी आहे.

माझी अशी आशा आहे की या धाग्याला एका चांगल्या चर्चेचं स्वरूप प्राप्त व्हावं.

एक प्रश्न :

>>स्रोत मर्यादित आहेत (means are scarce) असं एका बाजूला म्हणून सतत वाढती अर्थव्यवस्था शक्य आहे असे गृहीतक.

मला हे गृहितक नीटसं समजलं नाही. Limited Resource आणि Ever-sustaining Growth यांना नक्की कसं एकमेकांशी निगडीत केलं गेलेलं आहे ?

(बाकी जसजसं सुचत जाईल तसतसं लिहीन म्हणतो. इतरांनाही आवाहन करतो.)

नगरीनिरंजन Thu, 21/03/2013 - 07:53

In reply to by राजन बापट

Limited Resource आणि Ever-sustaining Growth यांना नक्की कसं एकमेकांशी निगडीत केलं गेलेलं आहे ?

एका माणसाचा विचार करताना "माणसाच्या गरजा अनंत आहेत आणि त्याचे स्रोत मर्यादित" हे गृहीतक वापरलं जातं; सबसिस्टन्स इकॉनॉमीतला माणूस 'गरीब' असतो हे सिद्ध करण्यासाठी हे गृहीतक उपयोगी पडते. पण जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो तेव्हा चमत्कारिकपणे स्रोतांचा उल्लेखच गायब होतो. अर्थव्यवस्थेची वाढ मग फक्त भांडवल, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान यावरच अवलंबून आहे असे गृहीत धरले जाते आणि भांडवल व मनुष्यबळ वाढीवर मर्यादा आल्या तरी तंत्रज्ञानाची अमर्याद वाढ होणारच.
शिवाय एका माणसाचा विचार करता, तो अगदीच मठ्ठ असतो, स्वतःच्या गरजा भागवण्याचे त्याचे कौशल्य खूपच मर्यादित असते (जरी तो त्याच नैसर्गिक परिस्थितीत उत्क्रांत झालेला असला तरी त्याचे आयुष्य Nasty, Short and Brutish असते). इंडस्ट्रियल इकॉनॉमीत मात्र माणसाची अक्कल एकदम वाढते. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधणारे तंत्रज्ञान योग्य वेळी सापडेल अशी दैवी हमी त्याला मिळते, शिवाय पदार्थांची सबस्टिट्यूटॅबिलिटी प्रचंड वाढते (म्हणजे ऑईलच्या जागी गॅस, गॅसच्या जागी सौरऊर्जा वगैरे बदल काहीही परिणाम न होता होतातच, वर खार्‍यापाण्याचे गोडे पाणी करणे इत्यादीसाठी लागणारी जास्तीची ऊर्जाही सहज मिळते).
या सगळ्यामुळे अर्थव्यवस्था सतत वाढत राहायला काहीच प्रत्यवाय येत नाही, फक्त लोकांनी काम आणि कंझम्प्शन चालू ठेवलं पाहिजे.

मन Sun, 24/03/2013 - 14:13

In reply to by राजन बापट

मजजवळील पुस्तकातील पूरक माहिती डकवतोय. पहिले दोन परिच्छेदही पुरेसे ठरावेत.

To know what economics is, we must first know what an economy is. Perhaps most of us
think of an economy as a system for the production and distribution of the goods and services we
use in everyday life. That is true as far as it goes, but it does not go far enough. The Garden of
Eden was a system for the production and distribution of goods and services, but it was not an
economy, because everything was available in unlimited abundance. Without scarcity, there is no
need to economize-and therefore no economics. A distinguished British economist named Lionel
Robbins gave the classic definition of economics:
Economics is the study of the use of scarce resources which have alternative uses.
Some optimists have said that we now live in "an era of abundance" and some pessimists
have said that we are entering "an era of scarcity." Both are wrong. The wide range of goods and
services available to us vastly exceeds what past generations and past centuries had to offer. But
every era has always been an era of scarcity.
What does "scarce" mean? It means that what everybody wants adds up to more than there is.
This may seem like a simple thing, but its implications are often grossly misunderstood, even by
highly educated people. For example, a feature article in the New York Times laid out the
economic woes and worries of middle-class Americans-one of the most affluent groups of
human beings ever to inhabit this planet. Although the story included a picture' of a middle-class
American family in their own swimming pool, the main headline read: "The American Middle,
Just Getting By." Other headings in the article included:
Wishes Deferred and Plans Unmet Goals That Remain Just Out of Sight Dogged Saving and
Some Luxuries In short, middle-class Americans' desires exceed what they can comfortably
afford, even though what they already have would be considered unbelievable prosperity by
people in many other countries around the world-or even by earlier generations of Americans.
Yet both they and the reporter regard them as "just getting by" and a Harvard sociologist spoke
of "how budget constrained these people really are." However, it is not something as man-made
as a budget that constrains them: Reality constrains them. There has never been enough to satisfy
everyone completely. That is the real constraint.
.
--Basic Economics- Thomas-Sowell

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/03/2013 - 08:30

सुटे मुद्दे पटले तरी लेखाचा एकंदर सूर थोडा निराशावादी वाटला, तो फारसा पटला नाही.

किरणोत्साराचा शोध लावणारी मेरी क्यूरी त्याच किरणोत्साराचे दुष्परिणाम माहित नसल्यामुळे कर्करोगाला बळी पडली. तिच्या लॅब-बुकची पानं म्हणे अजूनही किरणोत्सारामुळे चमकतात. काही दशकांपूर्वी किती आकाराची चप्पल वापरावी हे ठरवायला क्ष-किरण वापरले जात होते. लोकांना हे प्रकरण फॅन्सी वाटल्यामुळे हे उपकरण हातोहात खपलं; पण पुढे कर्करोग होतो हे लक्षात आल्यावर हे उपकरण बाजारातून मागे घेतलं गेलं. पेट्रोलमधलं शिसं काढणं आता सक्तीचं झालेलं आहे. पातळ प्लास्टीक, वारेमाप प्रमाणात वापरल्या जाणार्‍या प्लास्टीकच्या पाण्याच्या बाटल्या याविरोधात अधूनमधून अनेक माध्यमांमधून नाराजी प्रकट होताना दिसते. (स्थानिक सरकारांनी बंदी घालून, विविध माध्यमांमधून जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न होऊनही "केवढे कष्ट होतात भाजीसाठी पिशवी न्यायला" असं करवादणार्‍या सामान्य लोकांना त्यात निर्दोष मानणं पटत नाही.)
यूकेमधे (निदान काही वर्षांपूर्वी) Five a day असा अभियान सतत सुरूच होता. Five a day म्हणजे दिवसातून निदान पाच वेगवेगळ्या रंगांची फळं, भाज्यांचे एक-एक पोर्शन खायचे. (एक पोर्शन = आपल्या मुठीत जेवढं मावतं तेवढं). हे ही कर्करोगाचा विरोध म्हणून. सेंद्रीय खतं वापरून काढलेली पिकं विकत घेण्याचं प्रमाण प्रगत देशांमधे वाढतं आहे.

विज्ञानाची समाजातली वाटचाल एकमार्गी नसते. शेअर बाजाराचा आलेख हा जसा महिना-दोन महिने पाहिला तर तेजी सुरू आहे का मंदी हे समजतं, पण तो त्या कालावधीत तेजी असेल तर रोज चढतोच असं नाही, कधी उतरतोही. विज्ञानाचंही तेच आहे. क्ष-किरणांचा वापर कशासाठी हा अजूनही वादाचा विषय आहे. अमेरिकन विमानतळांवर होणार्‍या क्ष-किरण तपासणीला कर्करोगाच्या दृष्टीने विरोध करणारे लोकही अस्तित्त्वात आहेत. त्याचे दुष्परिणाम दिसले तर या यंत्रांचा वापरही बंदच होईल.

मोठ्या प्रमाणात लोकांना खायला घालायचं, रोजगार निर्मिती करायची, बालमृत्यु रोखायचे तर मोठ्या प्रमाणात भांडवल ओतण्याची आवश्यकता होती, आहे. संशोधन ही स्वस्तात होणारी गोष्ट नाही. त्यासाठी भांडवल ओतणं हे फक्त श्रीमंत उद्योगच करू शकतात. सध्यातरी त्याला अन्य पर्याय दिसत नाही.

आजवर कोणताही नवीन आजार सापडला तर त्याचे मूळ आधी कोणत्यातरी विषाणूत असणार अशा दृष्टीनेच संशोधनाला सुरुवात केली जाते. स्कर्व्ही, बेरीबेरी, SMON आणि कॅन्सर अशा अनेक रोगांच्या बाबतीत विषाणूंचाच शोध घेत राहिल्याने महत्त्वाचा वेळ आणि अनेक जीव गेले. ....

याचा लेखाशी असणारा संबंध समजला नाही. ठराविक कारणांमुळे रोग होतात हे समल्यानंतर त्याच दिशेने इतर रोगांसंदर्भात संशोधन पुढे जाणं अतिशय नैसर्गिक आहे.

एकंदरीत मोठमोठ्या कंपन्या असणं फार थोर आहे असं वाटत नाही; पण मोठ्या कंपन्या असण्यामुळे सगळं वाईटच होतं हे पटण्यासारखं नाही. मायक्रोसॉफ्ट (आणि विशेषतः विण्डोज) बद्दल मला अजिबात प्रेम नाही. पण एवढी माया जमवून बिल गेट्स आता चॅरीट्यांना पैसे देतो आहे. मायक्रोसॉफ्ट/विण्डोजची एकछत्री सत्ता नष्ट होऊन तिथे अ‍ॅपल, गूगलही मोठे होत आहेत.

मन Thu, 21/03/2013 - 09:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सेंद्रीय खतं वापरून काढलेली पिकं विकत घेण्याचं प्रमाण प्रगत देशांमधे वाढतं आहे.

हो, हे नक्कीच खरय. प्रत्यक्ष विकत घ्यायचं प्रमाण नक्की किती वाढलय ह्याची कल्पना नाही.पण "सेंद्रिय पद्धतेनं पिकवलेलं अन्न वापरावं " ह्या मताचा प्रसार होताना दिसतो.
गंमत अशी की पारंपरिक पद्धतीत आपण सेंद्रिय पद्धतीच प्रामुख्यानं वापरत होतो की. ते सोडून रासायनिक खतांचा वापर करुन उत्पादन धो धो वाढवलं. तेही पुरेना म्हणून genetically modified अन्नोत्पादन सुरु झालं. आता पुन्हा मूळ रुपात जाण्याच्या चर्चा सुरु आहेत. आता अन्न कमी पडणार नाही का? नक्की समजत नाहिये. गंम्त म्हणजे प्रगत देश सेंद्रियच्या गप्पा करताहेत तर भारत वगैरे GM food वापरायच्या चर्चा करताहेत. आदळणार्‍या माहितीने , तर्कवितर्काने कानठळ्या बसताहेत.
.
सेंद्रिय पीके ही सुद्धा एक धमाल कल्पना आहे. भारतात काही ठिकाणी सेंद्रिय धान्यांचे नि भाजीपाल्यांचे स्टॉल्स पाहिले होते. स्वतः शेतकरी येउन ते विकत असल्याचे सांगितले गेले. त्यांना "हे कुठल्या ग्रेडचं, पातळीवरचं सेंद्रिय अन्न आहे" हे विचारताच ग्रेड, पातळी, सेंद्रियची टाक्केवारी वगैरे त्यांना काहीच ठाउक नव्हतं. "आम्ही रासायनिक खते यंदा वापरली नाहित" इतकच ते सांगू लागले.
.
वस्तुस्थिती :- सेंद्रिय खते तुम्ही यंदा वापरलीत हो; पण मागील दशकानुदशके त्याच जमिनीत रासायनिक खते वापरली गेली होती ना? निदान मागच्या पाच सात वर्षांत तरी तुम्हीच वापरली होतीत ना? त्याचा ट्रेस त्या अन्नात राहतोच की.त्यामुळेच, मागील तीन वर्षापासून सेंद्रिय पद्धतीनं शेती केलेल्या जमिनीतील उत्पादन, ह्याच वर्षी सेंद्रिय वापरलेले उत्पादन ह्यात दर्जात्मक फरक केला जातो हेच बहुसंख्यांना इथे ठाउक नाहिये.(शेतकीच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ह्याचा नुकताच सविस्तर समावेश करण्यात आलाय हे त्यातल्या त्यात सुदैव.) गधे-घोडे बरा टक्के.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/03/2013 - 20:51

In reply to by मन

प्रत्यक्ष विकत घ्यायचं प्रमाण नक्की किती वाढलय ह्याची कल्पना नाही.पण "सेंद्रिय पद्धतेनं पिकवलेलं अन्न वापरावं " ह्या मताचा प्रसार होताना दिसतो.

माझं निरीक्षणही तसं वरवरचं आहे. यू.एस.मधे Whole foods नावाचं साखळी दुकान आहे. या दुकानात सेंद्रीय शेतीमालच मिळतो. हा माल थोडा महाग असतो, भाज्या-फळं चवीला फार वेगळी लागतात, दिसतात असं नाही; पण प्रत्येक गोष्टीची तपासणी करणं शक्य नसतं. त्यामुळे कुठे ना कुठे विश्वास टाकावा लागतो, त्यानुसार या दुकानातला शेतीमाल सेंद्रीयच असतो हे बहुसंख्य लोक मानतात. मी पण. या दुकानाचा टर्नओव्हर गेल्या १७ वर्षांत वाढलेला दिसतो आहे. यात त्यांनी अन्य सेंद्रीय माल विकणार्‍या दुकानांचा हिस्सा खाल्ला असेल, अन्य काही उत्पादनं विकलेली असतील हे सर्व मान्य आहे.

कुठल्या तरी बातम्यांमधे ऐकल्याप्रमाणे पाश्चात्य देशांमधे सेंद्रीय पिकं म्हणून विकण्यासाठी त्या जमिनीत गेली पाच वर्ष रासायनिक खतं वापरली न जाणं महत्त्वाचं असतं. ही पाच वर्ष सेंद्रीय पद्धतीनेच पिकं काढली तरीही रसायनं वापरून पिकं काढलेली आहेत असं समजलं जातं.

GM ही काहीतरी भयंकर गोष्ट आहे असं मानलं जातं. GM ची परंपरा शेतीएवढी जुनी असेल. आपल्याला हवं ते पीक अधिक प्रमाणात पिकवणं तेव्हापासूनच सुरू झालेलं आहे. एकाच प्रकारच्या अन्नाच्या विविध जातीत असणारे विविध प्रकारचे गुणधर्म हवे असण्यामुळे क्रॉस-ब्रीडींग वगैरे सुरू झालं. कुत्र्यांमधलं क्रॉस ब्रीडींग आपल्या अधिक परिचयाचं असतं. हापूस आंब्याची कोय रूजवून हापूसचं झाड येत नाही.
हा सरसकट GM चा बचाव नव्हे. पण सर्वच GM पिकं वाईट असतात असं नाही. (मात्र या क्षेत्रातल्या कंपन्या धुतल्या तांदळासारख्या आहेत असा दावा अजिबातच नाही.)

नगरीनिरंजन Thu, 21/03/2013 - 10:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दुष्परिणाम दिसले तरी ते उत्पादन सहजासहजी मागे घेतले जात नाही. अर्थात त्याची किती मोठी इंडस्ट्री आहे आणि लॉबी किती मोठी आहे त्यावर हा विरोध ठरतो. शिवाय दुष्परिणाम ऑन द फिल्ड दिसतात याचा अर्थ संशोधनाचे पुरेसे परीक्षण झालेले नसतानाही ते विकायची परवानगी मिळते हेही पुरेसे धोकादायक नाही काय? जेनेटिक इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात अशा नंतर कळलेल्या चुका फार महागात पडू शकतात.

मोठ्या प्रमाणात लोकांना खायला घालायचं, रोजगार निर्मिती करायची, बालमृत्यु रोखायचे तर मोठ्या प्रमाणात भांडवल ओतण्याची आवश्यकता होती, आहे.

जगात सगळ्यांना खाऊ घालून उरेल इतके अन्न निर्माण होते. निव्वळ कॉस्मेटिक्सच्या उद्योगात जेवढी उलाढाल होते त्या पैशात जगातल्या सगळ्या मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न सुटेल. किंबहुना जगात कधीच दुर्भिक्ष्य नव्हते पण काही लोकांनी बहुसंख्य स्रोत नियंत्रित केल्याने बहुसंख्यांना त्या स्रोतांपासून वंचित रहावे लागते. जगातल्या वरच्या १% लोकांनी आपली १०% संपत्ती दान केली तर जगातले बहुतेक सगळे प्रश्न सुटतील. पण भांडवल ओतले जाते ते फक्त दामदुपटीने वसूल करण्यासाठी. संशोधनही जे विकले जाईल तेच घेतले जाते बाकीचे टाकून दिले जाते. गरीब लोकांना या कंपन्यांचे संशोधन नको आहे आणि ते विकत घ्यायची ऐपतही नाही आहे. लोकांना फक्त रिसोर्सेसचा अ‍ॅक्सेस दिला तर ते स्वत:ची काळजी स्वतः घ्यायला समर्थ आहेत.

ठराविक कारणांमुळे रोग होतात हे समल्यानंतर त्याच दिशेने इतर रोगांसंदर्भात संशोधन पुढे जाणं अतिशय नैसर्गिक आहे.

ठराविक कारणाने रोग होतात म्हणून पुढेही त्याच कारणाने होतील असे समजणे हे Representative Biasचे उदाहारण झाले. तीस वर्षांमध्ये चाळीस अब्ज डॉलर्स खर्च करूनही एड्सचा एकही रोगी वाचत नाही, आजवरच्या सगळ्या विषाणूंची मिळाली तशी लसही मिळत नाही (म्हणजे काय कोण जाणे? अँटीबॉडीज तर आधीच असतात म्हणे) तरीही एड्सचे HIV हे एकमेव कारण आहे याशिवाय दुसरे काही म्हणायला कोणीही तयार नाही. पीटर ड्यूसबर्गसारख्या त्याच क्षेत्रातल्या शास्त्रज्ञाला वाळीत टाकले गेले आहे. उलट SMON वगैरे रोगांच्या बाबतीत जे घडलं त्यावरून शिकून सगळ्या शक्यता गृहीत धरून त्याप्रमाणे संशोधन केले गेले पाहिजे अशी कोणाचीही अपेक्षा असेल.

पण मोठ्या कंपन्या असण्यामुळे सगळं वाईटच होतं हे पटण्यासारखं नाही

सगळं वाईटच होतं असं माझंही म्हणणं नाही पण स्वतःचे अस्तित्व टिकवायला आणि वाढवायला यातल्या सगळ्या नाही तरी बर्‍याच कंपन्या कोणत्याही थराला जाऊ शकतात हे ही मान्य केलेलं बरं.

मन Wed, 17/08/2016 - 16:48

In reply to by नगरीनिरंजन

कारण साधारणतः प्रत्येक गोष्ट पैशाच्या विनिमयात मोजली जाते. वरच्या दोन पाच टक्क्याकडून अधिकाधिक पैसे काढण्यासाठी अधिकाधिक सेवा पुरवायचा प्रयत्न होतो. हा म्हणे अर्थव्यवस्था खेळती ठेवायचा राजमार्ग आहे.
"त्यांना धिकाधिक खुश करा. त्यांना सेवा पुरवा. त्यांना काय हवय नकोय ते पहा; म्हणजे मग ते मोठ्या मनाने पैसा देतील " ही राजरोस मान्य झालेली थिअरी आहे. "ही चूक आहे" असे कुणी म्हणतही असेल; पण मग त्याला पर्याय काय हे ही समजत नाही. विचित्र त्रांगडं आहे.
.
.
गब्बरच्या बघण्यात आली नसावी ही चर्चा.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/03/2013 - 21:19

In reply to by नगरीनिरंजन

दुष्परिणाम ऑन द फिल्ड दिसतात याचा अर्थ संशोधनाचे पुरेसे परीक्षण झालेले नसतानाही ते विकायची परवानगी मिळते हेही पुरेसे धोकादायक नाही काय?

विशेषतः औषधांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक काळजीलायक वाटते.

तुलनेने कमी हानीकारक किंवा स्लो पॉयझन ठरणार्‍या गोष्टींच्या बाबतीत परिणाम समजण्यासाठीही जिथे काही दशकं जावी लागतात तिथे हा पर्याय कोणीही मान्य करेल असं वाटत नाही. प्लास्टीकच्या पातळ पिशव्या किंवा पाण्याच्या वापरून फेकून देण्याच्या बाटल्या हे पुन्हा एक उदाहरण. या गोष्टींचा किती उपद्रव होईल याची कल्पना येण्यासाठीही मुळात ही गोष्ट किती लोकप्रिय होईल आणि लोक किती बेशिस्त वर्तन करतील हे काही काळ बघावं लागेल. (आयफोन ५ अधिक लोकप्रिय का गॅलेक्सी ४ हे आधीच सांगता येणार नाही.)

निव्वळ कॉस्मेटिक्सच्या उद्योगात जेवढी उलाढाल होते त्या पैशात जगातल्या सगळ्या मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न सुटेल. किंबहुना जगात कधीच दुर्भिक्ष्य नव्हते पण काही लोकांनी बहुसंख्य स्रोत नियंत्रित केल्याने बहुसंख्यांना त्या स्रोतांपासून वंचित रहावे लागते. जगातल्या वरच्या १% लोकांनी आपली १०% संपत्ती दान केली तर जगातले बहुतेक सगळे प्रश्न सुटतील.

सौंदर्यप्रसाधनं वापरणं वाईट हे सांगण्याचं स्थान कोणाकडे आणि कसं येतं? स्वस्तात मिळणारं बेसन वापरून आंघोळ केलेली चांगली पण महागाची तेलं घातलेला साबण वाईट हे कसं ठरवणार? बेसन वापरणार्‍यावर राख नाहीतर वाळू वापरणाराही टीका करू शकतो. पण ही टीका करण्याचं स्थान कसं काय मिळतं?
१% लोकांनी १०% संपत्ती दान केल्याचं गणित एकवेळ मान्य केलं* तरीही हे लोक दान करतच नाहीत का? बिल गेट्स आणि पॉल अ‍ॅलन काय करत आहेत? दुसर्‍या बाजूने, त्यांनी त्यांची संपत्ती दान करावीच असं म्हणण्याचा हक्क आपल्याला कसा मिळतो? "दिवसातून दोनदा खाण्याऐवजी चार वेळा खा म्हणजे वजन कमी होण्यासाठी मदत होईल" असे सल्ले पैसे मोजून विकत घेणार्‍या वर्गाला असं म्हणण्याचा नैतिक हक्कतरी आहे का?

संशोधनही जे विकले जाईल तेच घेतले जाते बाकीचे टाकून दिले जाते.

अमर्यादित हव्यास आणि मर्यादित स्रोत हे निकष संशोधनालाही लागू पडत नाहीत का?
संशोधनाच्या बाबतीत (मग ते HIV-AIDS बद्दल असेल किंवा कृष्णविवर असतं का नाही या बाबतीत), पूर्ण अभ्यास असल्याशिवाय हेत्वारोप करणं किंवा ते नाकारणं मला जमणार नाही. कोणाला कोण पैसा पुरवतं आणि त्यांचं काय लॉबीइंग असतं या माहितीमधून विज्ञानाबद्दल काहीही समजत नाही.

स्वतःचे अस्तित्व टिकवायला आणि वाढवायला यातल्या सगळ्या नाही तरी बर्‍याच कंपन्या कोणत्याही थराला जाऊ शकतात हे ही मान्य केलेलं बरं.

स्वतःचं अस्तित्त्व टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कोणते मनुष्यप्राणी आणि सजीव वाट्टेल त्या थराला जात नाहीत?

*माहित नसलेलं गणित मान्य किंवा अमान्य करणं कठीण आहे.

रुची Thu, 21/03/2013 - 22:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वरील फिल्म पाहिल्यास त्यातील मोन्सान्टोचे उदाहरण या दाव्याविषयी फार चपखल आहे. शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ असे बुद्धीजीवी लोक निव्वळ नफेखोरीसाठी कार्पोरेट्सकडून वापरले गेले की काय होऊ शकतं याची कल्पना करण्यासाठी मी स्वतः शास्त्रज्ञच असायला हवं असं काही जरूरी वाटत नाही. ज्याला आपण तर्कशुद्ध विचार करणं म्ह्णतो त्याच्या आधारे आणि वकीली भाषेत ज्याला 'सर्कम्स्टान्शियल एव्हिडन्स' म्ह्णतो त्याच्या आधारे हे सिद्ध होऊ शकतं शिवाय या कंपन्यांसाठी काम न करणार्या त्या क्षेत्रातल्या इतर संशोधकांची मतंही विचारात घेता येतात.
आत्ताच मोन्सान्टोची वेबसाईट पाहिली ....'मोन्सन्टो ए सस्टेनेबन अग्रीकल्चर' :O ...अरे माझ्या देवा !

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 25/03/2013 - 05:58

In reply to by रुची

आत्ताच मोन्सान्टोची वेबसाईट पाहिली ....'मोन्सन्टो ए सस्टेनेबन अग्रीकल्चर' Shock ...अरे माझ्या देवा !

एवढ्यापुरता मी ही देवाचा धावा करायला तयार आहे. ;-)

HIV-AIDS वर अजून अक्सीर उपचार सापडलेले नाहीत कारण कंपन्यांचा त्यात फायदा आहे हे पटत नाही. त्याचं मार्केटींग होणार नाही किंवा फार परिणामकारक नसणारी औषधं गळ्यात मारली जातील हा सर्व अर्थशास्त्रीय राडा मान्य आहे. पण अक्सीर उपचार न मिळण्यामागे कंपन्यांचं राजकारण आहे हा कार्यकारणभाव समजत नाही.

नगरीनिरंजन Mon, 25/03/2013 - 08:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

८०च्या दशकात रॉबर्ट गॅलोने HIVचा शोध लावला, तेव्हाच ल्युक मोन्तानिएच्या फ्रेंच टीमने तोच व्हायरस शोधला. अर्थात मोन्तानिएने त्याचा संबंध एड्सशी जोडला नव्हता, तो संबंध जोडला गॅलोने. नंतर अमेरिकन आणि फ्रेंचांमध्ये सेटलमेंट होऊन गॅलोला त्याचे अधिकृत श्रेय देण्यात आले. गॅलोने एड्सचे कारण असलेला व्हायरस शोधला असे जाहीर केले गेले तेव्हा त्या थिअरीचा पीअर रिव्ह्यूसुद्धा झालेला नव्हता असे त्याच्यावर आरोप आहेत. विषाणू सापडला म्हणजे आता लवकरच लस येईल असेच सगळ्यांना वाटले पण काही वर्षांनी त्यावर उपाय सापडला तर नाहीच उलट पीटर ड्यूसबर्गसारख्या मोलेक्यूलर बायोलॉजी आणि रिट्रोव्हायरसच्या संशोधनातल्या ब्लू आईड बॉयने त्या थिअरीवर गंभीर आक्षेप घेतले. त्यांच्या मते अँटीबॉडीज तयार झालेल्या असताना विषाणू निष्प्रभ होतो आणि अशा अवस्थेत काही काळ सुप्तावस्थेत राहून नंतर कार्यरत होणे विषाणूंच्या वागण्याशी विसंगत आहे. त्यांच्या आक्षेपांना अर्थातच वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या आणि जगभर एड्स निवारणासाठी प्रचंड प्रमाणावर पैसा खर्च करणे चालू झाले.
आज एचाअयव्हीचा संसर्ग तपासण्यासाठी अनेक टेस्ट्स उपलब्ध आहेत (वेगवेगळ्या कंपन्यांच्या), एड्सची औषधे स्वस्त व्हायचं नाव घेत नाहीयेत. एड्समुळे होऊ शकणार्‍या रोगांची संख्या तीसच्या वर गेलीय आणि वाढतेच आहे. जर एचआयव्ही संसर्ग असलेल्या व्यक्तीला टीबी झाला तर तो एड्सने मरतो आणि जर एचआयव्ही निगेटीव्ह व्यक्तीला टीबी झाला तर तो टीबीने मरतो असे हे साधे गणित आहे असा ड्यूसबर्ग यांचा आरोप आहे.
ड्यूसबर्ग यांच्या मते कुपोषण, ड्रग्ज किंवा इतर रासायनिक पदार्थांच्या अतिरिक्त मार्‍यामुळे एड्स होतो. किमान हे घटक को-फॅक्टर म्हणून काम करतात. एका व्हिडिओमध्ये खुद्द मोन्तानिएने याला दुजोरा दिलेला दिसतो.
घासकडवींच्या ताज्या लेखात म्हटल्याप्रमाणे केवळ २०-२५ वर्षांतच एचआयव्हीची ही थिअरी सगळ्यांनी स्वीकारावी असे बजावले गेले. ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांना मृत्युचे दलाल म्हटले गेले आणि अब्जावधी डॉलर्स यावर खर्च केले गेले (इतर सगळ्या रोगांवर खर्च करण्यात येणार्‍या एकूण रकमेपेक्षा एड्सवर जास्त खर्च केला जातो).
८०च्या दशकात लवकरच एड्सचे थैमान येणार आहे, रोज हजारोंनी लोक मरतील वगैरे घंटावाद लवकरच पोकळ ठरला. नव्वदच्या दशकात एका दिवाळी अंकात (बहुधा मटा) अवचटांच्या एका लेखात भारतात रोज वीसहजार लोक एड्सने मरतील असे लिहिलेले वाचल्याचे आठवते. उलट भारतात २००७ मध्ये एड्स्ग्रस्तांची अंदाजित संख्या घटवावी लागली. आफ्रिकेत १.४ कोटी लोक एचायव्ही बाधित आहेत. लवकरच तिथे मोठ्या प्रमाणावर माणसे मरतील असा प्रचार खोटा ठरला आहे. असे असले तरी एड्सनिवारणावर सरकारी खर्च जगभर चालू आहे. एड्सवर खर्च केली जाणारी बहुतेक रक्कम औषध कंपन्यांच्या खिशात जाते. त्यामुळे एड्सवर साधा-सोपा उपायच नाही हे त्यांच्या पथ्यावर पडते, मग त्या कंपन्या कशाला आणखी संशोधन करायला पैसा खर्च करत बसतील?

नगरीनिरंजन Fri, 22/03/2013 - 07:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वतःचं अस्तित्त्व टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कोणते मनुष्यप्राणी आणि सजीव वाट्टेल त्या थराला जात नाहीत?

ही तुलना अस्थानी आहे कारण कंपन्या सजीव नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा पोट भरल्यावर कोणताही प्राणी दुसर्‍या सजीवाला अन्नातला वाटा घेऊ देतो. जंगली माणसांमध्येसुद्धा अन्न समान वाटण्याचे काटेकोर नियम असतात आणि कोणी किती काम केलं यावर ते ठरत नाहीत. कंपन्यांच्या घडणीतच 'कितीही असले तरी पुढच्यावर्षी यापेक्षा जास्त' असे ठरवलेले असल्याने पुरेसे हा शब्दच त्यांना माहित नसतो. कोणताही सजीव जीवाला धोका उत्पन्न झाल्यावरच कोणत्याही थराला जातो, कंपन्या नेहमीच त्या अविर्भावात असतात.

दुसर्‍या बाजूने, त्यांनी त्यांची संपत्ती दान करावीच असं म्हणण्याचा हक्क आपल्याला कसा मिळतो? "दिवसातून दोनदा खाण्याऐवजी चार वेळा खा म्हणजे वजन कमी होण्यासाठी मदत होईल" असे सल्ले पैसे मोजून विकत घेणार्‍या वर्गाला असं म्हणण्याचा नैतिक हक्कतरी आहे का?

त्यांनी दान केले तर प्रश्न सुटतील असे म्हणण्यामागे त्यांनी दान केलेच पाहिजे असे सूचित करण्याचा हेतू नसून, ट्रिकल डाऊन इफेक्टने जे प्रश्न सुटतील असे सांगितले जाते ते उपलब्ध संपत्तीपुढे किती किरकोळ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न होता.

सोकाजीरावत्रिलोकेकर Thu, 21/03/2013 - 10:18

जगात सगळ्यांना खाऊ घालून उरेल इतके अन्न निर्माण होते. निव्वळ कॉस्मेटिक्सच्या उद्योगात जेवढी उलाढाल होते त्या पैशात जगातल्या सगळ्या मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न सुटेल. किंबहुना जगात कधीच दुर्भिक्ष्य नव्हते पण काही लोकांनी बहुसंख्य स्रोत नियंत्रित केल्याने बहुसंख्यांना त्या स्रोतांपासून वंचित रहावे लागते. जगातल्या वरच्या १% लोकांनी आपली १०% संपत्ती दान केली तर जगातले बहुतेक सगळे प्रश्न सुटतील. पण भांडवल ओतले जाते ते फक्त दामदुपटीने वसूल करण्यासाठी. संशोधनही जे विकले जाईल तेच घेतले जाते बाकीचे टाकून दिले जाते. गरीब लोकांना या कंपन्यांचे संशोधन नको आहे आणि ते विकत घ्यायची ऐपतही नाही आहे. लोकांना फक्त रिसोर्सेसचा अ‍ॅक्सेस दिला तर ते स्वत:ची काळजी स्वतः घ्यायला समर्थ आहेत.

पूर्ण ताकदीने सहमती!

- (लेखाशी पूर्णपणे सहमत असलेला) सोकाजी

नितिन थत्ते Thu, 21/03/2013 - 12:04

>>जगात कधीच दुर्भिक्ष्य नव्हते पण काही लोकांनी बहुसंख्य स्रोत नियंत्रित केल्याने बहुसंख्यांना त्या स्रोतांपासून वंचित रहावे लागते.

कार्ल मार्क्स?

असाच विचार करून जुन्या काळातल्या अनेक देशांतल्या सरकारांनी भांडवलाचा स्रोत कुठे वळावा हे ठरवण्याचा प्रयत्न केला. तो तद्दन चुकीचा होता असे आम्हाला सांगण्यात आले आहे.

नगरीनिरंजन Thu, 21/03/2013 - 13:24

In reply to by नितिन थत्ते

:) खरं आहे.
क्रॉनी सोशलिझम आणि क्रॉनी कॅपिटॅलिझम यात फरक करणे अशक्य आहे. व्यवस्था कोणतीही असली तरी काही लोकांसाठी सोशलिझम आणि इतरांसाठी कॅपिटॅलिझम असेच असते बहुतेक.
कॉर्पोरेटिझममध्ये सर्कारी सहभाग नसतो असे थोडीच आहे?

मन Thu, 21/03/2013 - 13:25

In reply to by नगरीनिरंजन

एका संकटातून सुटताय ह्याचाच अर्थ दुसर्‍या संकटात जाताय असा होतो.तुम्ही कधीच संकटमुक्त नसता.कुनीच तुमचा तारणहार वगैरे काही नसतो.
भुताच्या तावडीतून सुटून हैवानाच्या तावडीत सापडणे हेच मानवजातीच्या नशिबी.
http://www.aisiakshare.com/node/1109
http://www.aisiakshare.com/node/1110

रुची Thu, 21/03/2013 - 23:47

लेख आवडला आणि दिलेल्या चित्रपटाच्या दुव्याबद्दल धन्यवाद, कालच पाहिला.
प्रथम लेखाबद्द्लः तुम्ही लिहिलेले मुद्दे आ़णि त्यावरून मांडत असलेला मुद्दा विचार करण्यासारखा आहेच पण ह विषय केवळ वैज्ञानिक संशोधनाइतकाच मर्यादित नाहीय, त्यामुळे तुम्ही लिहिलेला लेख थोडा संक्षिप्त आणि त्यामुळे अपुरा वाटला. या विषयाच्या लेखमालेतला पहिला लेख म्हणून स्वागतार्ह आहेच पण तुम्ही इतर मुद्द्यांबद्दल अधिक विस्तृतपणे लिहून त्याबद्दल चर्चा घडवून आणावी अशी विनंती आहे.
तुमच्या Limited Resource आणि Ever-sustaining Growth बद्दलच्या प्रतिसादात तुम्ही जे लिहिलं आहेत त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की मर्यादित स्त्रोत असताना अमर्याद वाढीची संकल्पना, त्यावर उभारलेले कार्पोरेट जग आणि त्यावर चालणार्या अर्थव्यवस्था ह्या काहीश्या पिरॅमिड स्कीमसारख्या आहेत. काही वर्षे 'तथाकथित सस्टेनेबल' तंत्रज्ञानावर आधारित व्यापाराशी जवळून संबंध आल्याने कार्पोरेटिझमच्या पायावर उभारलेल्या व्यवस्थेत 'सस्टेनेबल'हा शब्ददेखिल किती 'विकला' जातो आणि त्यावर आधारित अर्थव्यवस्था पुढील अमर्याद वाढीसाठी कशी पोषक आहे वगैरे गप्पा ऐकून हसावे की रडावे हेच कळत नाही. प्रस्थापित अर्थव्यवस्था चुकीच्या गृहितकांवर उभ्या आहेत, या वास्तवाचे भान येणे याला निराशावाद म्हणणे चुकीचे होईल कारण ह्या व्यवस्था कोसळल्या तर त्यामुळे होणारे दुषःपरिणाम भयावह असले तरी तात्कालिक असतील आणि मनुष्यजातीच्या (बाकीच्या जीवसृष्टीच्या भल्यासाठी वगैरे भानगडी तर सध्या सोडूनच द्याव्यात) दुरोगामी भल्यासाठी गरजेच्याच असतील. अधिकाधिक कर्जाचे आमिष, अधिकाधिक वाढवल्या गेलेल्या गरजांचे मोहजाल, त्यातून होणारा अधिकाधिक वापर (कंजम्पशन) ही जर अमर्याद वाढ असेल तर ही अशी वाढ 'कॅन्सर' म्ह्णून संबोधावी असे वाटायला लागले आहे. पण अर्थातच अतिशय प्रभावशाली गटांचे हितसंबंध, ही पिरॅमिड स्कीम चालू रहाण्यातच असल्याने ठेवीदारांच्या पैशावर दिवाळखोर बँका वाचवण्याचे सायप्रससारखे प्रकार चालू रहातीलच...सध्यातरी.

फिल्मबद्दलः
मायकल मूरच्या माहितीपटांना माहितीपट न म्हणता चित्रपट म्हणणे अधिक चांगले वाटते. त्याच्या चित्रपटांत अनबायस्ड, संतुलित वगैरे शब्दांना जागा नसते. सोईची सत्ये वापरून, इतरांचे बोलणे हवे तसे संपादित आणि संकलित करून, सर्वांना समजेल अशा प्रकारे बनवलेल्या काहीश्या प्रोपोगांडा करणार्या असतात पण मला त्याचा फार त्रास होत नाही कारण त्यातून प्रस्थापित लोकप्रिय माध्यमांनी सोईस्करपणे दूर ठेवलेले मुद्दे सर्वसामान्यांपुढे ठेवायचे काम तरी होते. त्याच्या आत्तापर्यंत बनलेल्या फिल्म्समधे ही फिल्म जास्त उजवी वाटली. त्यात तो कार्पोरेट्सच्या पैशातून ही फिल्म बनविण्याच्या भूमिकेबद्द्ल बोलतो त्याने खूप हसू आले. असे माहितीपट नेहेमी आशावादाने संपवायचा प्रघात आहे, त्यादृष्टीने वंदना शिवांनी दिलेले गांधींच्या दांडीयात्राचे उदाहरण चपखल होते. वंदना शिवांचे नाव अशा मंचांवर हल्ली नेहेमी दिसते. त्यांचा निग्रह आणि तत्वनिष्ठा पाहून आपल्या वागण्यातल्या नैतिक विसंगती, आपण स्विकारलेले सोपे रस्ते, आपला आतून कुरतडणारा कॉन्शान्स अधिकच जाणवायला लागतात म्हणून मग मायकल मूरप्रमाणे मीदेखिल व्यवस्थेत राहूनच त्यांचे डाव माझ्या परीने उलटवण्यासाठी काय करता येईल अशी साधी व्यावहारिक भूमिका घेते. असो.
योगायोगाने परवाच या विषयाशी निगडीत असलेली Food Inc. ही फिल्म पाहिली. एकाच विषयाकडे अधिक दृष्टीकोनातून पहाण्यासाठी या फिल्म्स उपयुक्त वाटतात. असो.

नगरीनिरंजन Fri, 22/03/2013 - 07:42

In reply to by रुची

धन्यवाद. लेख अपुरा आहे याची जाणीव आहे.
कंपन्यांचा मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर परिणाम हा खूप मोठा विषय आहे.

रंग Fri, 22/03/2013 - 07:05

लेखातील एकूण मांडणी पटण्यासारखी आहे.
मुळात, बाजारात आपल्या उत्पादानाची मोनोपॉली निर्माण करणे किंवा स्पर्धा निकामी करणे यासाठी खरी-खोटी/फसवी संशोधनं मार्केटींग म्हणून वापरली जातात.
त्यामुळं जेन्युईन शास्त्रीय शोध आणि शास्त्रीय अंधश्रद्धा यातल्या सीमारेषा खूप धुसर आहेत.
पण स्वतःच्या फायद्यासाठी खोटी/फसवी माहिती निर्माण करुन दिशाभूल करण्यात फक्त कार्पोरेट्स आहेत असं नाही.
सो-कॉल्ड पर्यावरणवादी यात खूप पुढे आहेत.
मध्यंतरी सुनिता नारायणनच्या संस्थेने कोक-पेप्सीचे नमूने घेऊन त्यात किटकनाशकं असतात हे सिद्ध(!) केलं होतं.
हा दावाही अशाच धुसर सीमारेषेवर होता असं म्हणावं लागेल.
ग्रीन-पीस या संस्थेचं बरचंस कामही अशाच धुसर सीमारेषेवर होत असतं असं वाटतं.

अशा प्रकारचे दबावगट आणि कार्पोरेट्स कधी एकमेकाविरोधात उभे आहेत तर कधी एकत्र...
या मार्केटींगच्या युद्धात कधी कधी ग्राहकांचा फायदा होतो तर कधी कधी ते विकासासाठी मारक ठरतात.

नगरीनिरंजन Fri, 22/03/2013 - 07:48

In reply to by रंग

ग्रीन-पीस आणि अशा मोठमोठ्या तथाकथित पर्यावरणवादी संस्था यासुद्धा स्वहितरक्षक कंपन्याच आहेत. कॅनडामध्ये सुरु असलेल्या शेल ऑईल प्रकल्पांमध्ये पर्यावरणाची हानी होते की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त ग्रीन-पीसलाच राहिल असा करार खाणकंपन्या आणि ग्रीनपीसने केला आहे. दुसरा कोणीही माणूस त्यांच्या विरुद्ध आता कायदेशीर आंदोलन करू शकत नाही.

नगरीनिरंजन Tue, 02/04/2013 - 07:34

भारतासंबंधी दोन बातम्या:
एक चांगली बातमी म्हणजे नोवार्टिसची केस.
आधीच उपलब्ध असलेल्या औषधात थोडेफार बदल करून त्याचे पुन्हा पेटंट घ्यायचा प्रयत्न करू नये असा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. नोवार्टिसची भयंकर जळजळ झालेली दिसत आहे; पण कॅन्सरग्रस्त रुग्णांना मात्र कमी किमतीत जेनेरिक औषध मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इथून पुढे भारतात 'संशोधन' केले जाणार नाही आणि त्यामुळे भारतात वैद्यकीय प्रगतीला आळा बसेल असा इशारा नोवार्टिसने दिला आहे.
दुसरी बातमी म्हणजे हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग ऊर्फ फ्रॅकिंगच्या भारतातल्या आगमनाचे सूतोवाच. अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेऊन, खडकात लपलेला गॅस भरपूर पाणी आणि रसायनांचे मिश्रण फवारून मोकळा करायला ओएनजीसी व रिलायन्स या कंपन्यांना परवानगी दिली जाईल असे दिसते. अर्थातच फ्रॅकिंग 'सुरक्षित' आहे हे अमेरिकन गॅस कंपन्यांनी सिद्ध केलेलेच आहे; शिवाय या साठी लागणारे भरमसाठ पाणी, यातून मिळणारा फायदा पाहता, भारतात सहज उपलब्ध असेल हेही उघडच आहे.
अर्थव्यवस्थेवर ताण पाडणारी तेलाची आयात पाहता पुढच्या दहा-वीस वर्षांची तरी यातून सोय झाली तर बरे असा विचार या मागे असणार.

मी Tue, 02/04/2013 - 10:02

In reply to by नगरीनिरंजन

दुसरी बातमी म्हणजे हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग ऊर्फ फ्रॅकिंगच्या भारतातल्या आगमनाचे सूतोवाच.

दुसरी बातमी चांगली असल्याबद्दल साशंक आहे. फ्रॅकिंगबद्दल अमेरिकेत(जगात?) चांगले (जन)मत नाही, अर्थात 'ते' कसे चांगले आहे हे पटवून देण्याचे प्रयत्न होतीलच.

नगरीनिरंजन Tue, 02/04/2013 - 11:09

In reply to by मी

दुसरी बातमी चांगली आहे असे मी म्हटलेले नाही.
इंटरनेटवर फ्रॅकिंगमुळे भूजलात प्रदूषण झाल्याचे आणि नळातून मिथेनमिश्रित पाणी आल्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. ओबामांच्या मते नैसर्गिक वायूचे १०० वर्षे पुरतील इतके साठे अमेरिकेत आहेत. प्रत्यक्षात सगळे साठे वापरणे शक्य नसते. फ्रॅकिंगमुळे अर्थव्यवस्था परत जोमाने वाढणार या कल्पनेने अमेरिकेत सगळीकडे जोरदार फ्रॅकिंग सुरु झाले आणि गॅसचे उत्पादन भरमसाठ वाढून किंमती पडल्या. परंतु, एक विहीर खूप लवकर संपुष्टात येत असल्याने व नवीन विहीरींसाठी बरीच गुंतवणूक असल्याने आता कंपन्यांना पुरवठा वाढवण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत असे दिसते. या कंपन्यांनी मोठमोठी कर्जे घेऊन ठेवली आहेत आणि आता ती फेडण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. चेजास्पीक कंपनीतला घोटाळा हा याचेच प्रतिबिंब आहे.
फ्रॅकिंग आणि टारसॅन्ड ऑईलचा पर्यावरणावरचा परिणाम खूपच जास्त आहे असे म्हटले जाते. कॅनडातील अ‍ॅथाबास्का नदीच्या खोर्‍यातील बोरियल जंगलात सुरु असलेल्या प्रकल्पांमुळे आजवर अनाघ्रात राहिलेल्या या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर विध्वंस होत आहे असे म्हणतात.
भारतात आधीच भूजल पातळीने धोक्याची पातळी गाठलेली आहे. फ्रॅकिंगसाठी लागणारे कोट्यवधी लिटर पाणी कसे पुरवले जाणार आहे ते सरकार जाणे; आणि एवढं करून मिळणारा गॅस २०-२५ वर्षांपेक्षा जास्त काळ पुरेल असे नाही.
त्या ऐवजी हरित ऊर्जेवर आधारित स्थानिक वसाहतींच्या विकासावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/04/2013 - 22:05

वरच्या चर्चेत कॉस्मेटीक्सचा उल्लेख आलेला आहे. कॉस्मेटीक उद्योगातलं एक मोठं नाव, लिओनार्ड लॉडर, यांनी साधारण १ कोटी डॉलर्स किंमतीच्या ७८ कलावस्तू न्यूयॉर्कच्या मेट्रापोलिटन संग्रहालयाला भेट दिल्याची बातमी कालच वाचनात आली. यात रंगीत चित्रं, स्केचेस आणि शिल्पांचा समावेश आहे. पिकासोचं नाव बहुतेकांना माहित असेलच, त्याची ३३ चित्रं आहेत.
हा दुवा.

मी Wed, 10/04/2013 - 22:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजा उदार झाला? रोनाल्ड लाऊडर ह्यांच्या ह्या (चालीबद्दल) एक (कॉन्स्पिरसी??) थेअरी.

Nile Wed, 10/04/2013 - 23:08

In reply to by मी

पण १ बिलियनचे डोनेशन देऊन १० मिलियन वाचवण्यापेक्षा, १ बिलीयनला विकून त्यावर त्यावर ३७%(?) टॅक्स देऊनही जास्त पैसे वाचत नाहित का? (शिवाय हे उरलेले ६३% कॅपिटल इन्वेसमेंट मध्ये गुंतवले की पुढे गेलेले ३७% पुन्हा मिळवायला फार वेळ लागायचा नाही. :-) )

त्यामुळे वरील थेअरीतील तांत्रिक बाबतीत अजून संदेह आहे.

रुची Wed, 10/04/2013 - 22:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ही माहिती इथे लिहिण्यामागे 'पूर्वीच्या काळी राजशाही असताना कलांना राजाश्रय होता' या चालीवर 'कलांना वाव मिळायचा असेल, त्यांचा प्रसार व्हायचा असेल तर त्यासाठी धनिकांची पर्यायाने कार्पोरिटझ॑मची आवश्यकता आहे' असा काही मुद्दा अपेक्षित आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/04/2013 - 23:27

In reply to by रुची

समजा, बिल गेट्सची संपत्ती एकाच माणसाकडे येण्याऐवजी मायक्रोसॉफ्टमधल्या सर्व बुद्धीजीवी (किंवा बुद्धीजीवी+श्रमजीवी) लोकांमधे वाटली गेली तर कोणाकडेच आफ्रिकेत किंवा टी.बी., मलेरिया आणि एच.आय.व्ही. यांच्यावर खर्च करायला फारसे पैसे राहिले नसते. अधिकच्या पैशांमधे कोणी अजून एखादी आणि/किंवा महागडी गाडी घेतली असती, कोणी घर, कोणी हवाईत सुट्टी; असं अर्थतज्ञ जगदीश भगवती यांच्याकडचा विदा सांगतो. माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांकडे आहेत त्याच्या दुप्पट पैसे जरी झाले (आणि महागाई आहे त्यापेक्षा फार वाढली नाही) तरी गोया, पिकासो किंवा हुसेनसारख्या लोकांना मध्यमवर्गीयांकडून आत्ता मिळतो (किंवा मिळाला असता) तेवढा पैसा मिळाला नसता.

एखाद्या किंवा काही व्यक्तींकडे खर्च करण्याच्या क्षमतेपेक्षा प्रचंड जास्त पैसा आल्याशिवाय तो कला, साहित्य, क्रीडा, संशोधन यासारख्या ठिकाणी आपण होऊन खर्च होणार नाही. उलट परिस्थिती असेल, कोणीच अतिधनाढ्य नसेल तर सक्ती करून, कर लादून अशा गोष्टींसाठी पैसा उभा करावा लागेल. (आणि मग त्या पैशांवर हक्क सांगायला बॉलिवूड आणि तिथले 'कांती शाह'सुद्धा येणार. भारतात क्रीडाक्षेत्रात क्रिकेट आणि कदाचित सायना नेहवाल वगैरे तारे वगळता अजूनही खडखडाट असावा. सायना नेहवालची परिस्थिती तरी बरी असावी, कारण अधूनमधून तृप्ती मुरगुंडे इत्यादी इतर बॅडमिंटनपटू "आम्हाला पुरेसे स्पॉन्सर मिळत नाहीत" अशी तक्रार करतात. अलिकडेच बुद्धीबळ-ग्रँडमास्टर्सचीही तक्रार वाचनात आली होती.)

लोकांना दोन वेळचं खायला मिळत नाही याचं हे समर्थन नाही. (या गोष्टीचं समर्थन होऊच शकत नाही.) पण बहुदा व्यापार्‍यांनाही अशी परिस्थिती आवडत नसावी. कारण लोकांची क्रयशक्ती जेवढी जास्त तेवढा त्यांचा फायदा जास्त.

Nile Wed, 10/04/2013 - 23:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समजा, बिल गेट्सची संपत्ती एकाच माणसाकडे येण्याऐवजी मायक्रोसॉफ्टमधल्या सर्व बुद्धीजीवी (किंवा बुद्धीजीवी+श्रमजीवी) लोकांमधे वाटली गेली तर कोणाकडेच आफ्रिकेत किंवा टी.बी., मलेरिया आणि एच.आय.व्ही. यांच्यावर खर्च करायला फारसे पैसे राहिले नसते. अधिकच्या पैशांमधे कोणी अजून एखादी आणि/किंवा महागडी गाडी घेतली असती, कोणी घर, कोणी हवाईत सुट्टी; असं अर्थतज्ञ जगदीश भगवती यांच्याकडचा विदा सांगतो. माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांकडे आहेत त्याच्या दुप्पट पैसे जरी झाले (आणि महागाई आहे त्यापेक्षा फार वाढली नाही) तरी गोया, पिकासो किंवा हुसेनसारख्या लोकांना मध्यमवर्गीयांकडून आत्ता मिळतो (किंवा मिळाला असता) तेवढा पैसा मिळाला नसता.

असा परस्पर संबंध बादरायण आहे असे मला वाटते. किती कलाकारांना 'कलेक्टिव्ह पॉप्युलेशनने पैसे दिले' आहेत हे पाहता येईल: सिने कलाकारा, म्युझिक बँड्स वगैरे अतिश्रीमंत होतात ते लाखो करोडो लोकांच्या किरकोळ पैशांनी.ओबामाची दोन्ही इलेक्शन्स पाहिलीत तर 'सामान्यांनी' दिलेले एकूण डोनेशनही किती 'पावरफूल' असते हे दिसेल. चर्च किंवा इतर धार्मिक संस्थांनी गोळा केलेली गंगाजळी पाहिलीत तर अशी उदाहरणं दिसतील. वगैरे.

गरीब एखादा रुपया भिकार्‍याला का देतो आणि अब्जाधीज करोड रुपये का देतो याची कारणं अशी वेगवेगळी असावीत असं वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 11/04/2013 - 00:38

In reply to by Nile

ओबामा आणि चर्च यांचा सरळसरळ सामान्यांच्या आयुष्यांशी संबंध येतो. गोया, पिकासो, शीलं किंवा हुसेनबद्दल असं म्हणता येईलच असं नाही. चित्रपट प्रत्येकाला पहाता येतो, आणि अनेकांना घरी त्याची प्रत ठेवता येते. चित्रपटाची प्रत आणि चित्राची प्रत यांच्यात प्रचंड फरक असतो.

सध्या घरात सिमोन सिंगचं विश्वरचनाशास्त्राबद्दल लिहीलेलं पुस्तक पडलेलं आहे. त्यात अगदी सुरूवातीलाच हे दिसलं:

Physics is not a religion. If it were, we'd have a much easier time raising money. -- Leon Lederman (भारतात अधूनमधून क्रिकेटचा उल्लेख धर्म आहे असा का होतो ते ही या वाक्यामुळे चटकन समजलं.)

Nile Thu, 11/04/2013 - 01:03

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुख्य मुद्दा श्रीमंत लोक असल्याने "एकंदरीत" दानधर्म होतो आहे असा होता ना?

गोया, पिकासो, शीलं किंवा हुसेनबद्दल असं म्हणता येईलच असं नाही.

चित्रांची प्रतही प्रत्येक घरी ठेवता येईल की? तसे का नाही हा वेगळा मुद्दा आहे (वेगळे बिझनेस मॉडेल?) (शिवाय अनेक गाजलेल्या आताच्या कलाकारांना त्यांच्या काळी राजाश्रय (पक्षी श्रीमंतांचे 'दान') मिळत होतेच असे नाही).

Physics is not a religion. If it were, we'd have a much easier time raising money.

पुन्हा, वेगळा मुद्दा. याची अनेक कारणं आहेत, आणि ती स्पष्टही आहेत. भौतिकशास्त्रावरचा अविश्वास (अज्ञान) वि. धर्मावर विश्वास. कशासाठी पैसे उभारत आहेत यानुसार होणारे कंट्रिब्युशन, राजकारणाने प्रेरित विरोध वगैरे. यावरून श्रीमंत आहेत म्हणून फिजिक्स तगलं आहे असा अर्थ कसा आला ते कळत नाही?

रुची Thu, 11/04/2013 - 02:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे दोन मुद्दयांत थोडी गल्लत होते आहे असं वाटतंय, एक म्हणजे हा धागा कार्पोरेटायझेनचे तोटे दाखवत असल्याने तो पर्यायाने समाजवादाचा पुरस्कार करतो आहे असा निष्कर्ष काढणे. मुद्दा उद्योगधंद्यांच्या अस्तित्वाचा नसून उद्योगजगताच्या केंद्रीकरणाचा आहे. वरील चित्रफीत पाहिली तर त्यात अशा प्रकारच्या 'कार्पोरेट' संकल्पना नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी निर्माण झालेल्या कायद्यांचा दुरुपयोग करत कशा पसरल्या आणि मोठ्या झाल्या याचा उहापोह केला आहे. असे झाल्याने आपल्या मुद्दलावरचा मोबदला उपभोगण्यास आणि आपल्या मुद्द्लाचा हवा तसा वापर करण्यास भांडवलदार मोकळे झाले पण त्यातून निर्माण होणार्या सामाजिक, पर्यावरणादी इतर प्रश्नांची किंमत मात्र सरकारला, पर्यायाने सर्वसामान्य करदात्यांना मोजावी लागतेय असे काहीसे चुकलेले गणित मांडलेले आहे जे बँक-बेलाउट्सच्या उदाहरणाने पुरेसे स्पष्ट झाले आहे. आता हेच का॑र्पोरेट कल्चर अन्न आणि पाणी या मुलभूत गरजांच्या क्षेत्रात घुसल्याने त्याचे भयावह परिणाम सर्वसामान्यांना मुख्यतः 'अविकसित देशांतील सर्वसामान्यांना' कसे भोगावे लागतील याचेही गणित मांडलेले आहे. ह्याला फक्त 'धोक्याची घंटा' म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे डोळ्यांवर कातडे ओढण्यासारखे आहे. बोलिवियात पाण्यावरून झालेला रक्तरंजित लढा आणि आता मोन्सान्टोच्या विरोधात जागोजागी चाललेले लढे हे या कार्पोरेट फसवणूकीविरुद्ध चाललेले आहेत.
दुसरा मुद्दा आहे तो कला-शास्त्र इत्यादी क्षेत्रे विकसित होण्यासाठी, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भांडवलाची आणि पर्यायाने भांडवलशाहीची गरज असण्याचा. रोचक गोष्ट अशी आहे ही भांडवलशाहीत जे विकले जाऊ शकते त्यासाठीच भांडवल उपलब्ध होऊ शकते. भारतात आर्थिक उदारीकरण झाल्यानंतर साहित्य, नृत्य, नाटक, सिनेमा आणि इतर कलाक्षेत्रातल्या गुणवत्तेत किती भर पडली याचा विदा मिळणे ही गोष्ट सापेक्ष असल्याने अशक्य आहे पण आपले डोळे उघडे ठेऊन पाहिले तर आपल्यापुरते काही निष्कर्ष काढता येतील. उत्तम स्थापत्य असलेल्या मुझियम्सच्या संख्येतली वाढ, अनेक शतकांपूर्वी बनविल्या गेलेल्या कलाकृतींचे संवर्धन इत्यादी गोष्टींना कलेचा प्रसार म्हणायचे असेल तर ठीक आहे पण चाकोरीबाहेर जाणार्या उत्तमोत्तम कलाकरांची वाढ भांडवलशाहीत होते या मुद्द्यास माझा तीव्र आक्षेप आहे. जे लोकप्रिय आहे ते सर्वच टाकावू नसतं पण जे लोकप्रिय नसतानाही महत्वाचं आहे ते तयार होण्यासाठी, त्याचं पोषण होण्यासाठी भांडवलशाहीचा काडीमात्र उपयोग होत नाही हा मुद्दा आहे.
योगायोगाने ज्या पिकासोच्या बिलियन डॉलर्स किंमत असलेल्या चित्रांची इथे चर्चा चालली आहे तो पिकासो स्वतः कमुनिस्ट होता असं ऐकल्याचं आठवतंय. एका भांडवलदारने त्याच्या चित्रांची मालकी मिळवणे आणि नंतर स्माजसेवेच्या भावनेने त्याचे 'दान' करणे याबद्दल पिकासोचे काय मत झाले असते याचा विचार करून मौज वाटते. टॉलस्टॉयने त्याच्या शेवटच्या दिवसांत त्याची सारी पुस्तके प्रतधिकारमुक्त करून सर्वसामान्यांना त्याची पुस्तके अर्पण केली होती पण त्याच्या मर्जीविरुद्ध मृत्यूनंतर ती तरतूद बदलण्यात आली होती. याबद्दलचा 'द लास्ट स्टेशन' नावाचा चित्रपट अलिकडेच पाहिला, रोचक आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 11/04/2013 - 03:30

In reply to by रुची

या मोठमोठ्या कंपन्यांमुळे काहीच नुकसान होत नाही असा दावा नाही. पण या कंपन्यांमुळे फक्त नुकसानच होतं हे कसं काय ते मला समजत नाही. वरच्या प्रतिसादांमधे (आपल्या मालकीच्या नसणार्‍या) सौंदर्यप्रसाधनावर खर्च होणार्‍या पैशांनी गरीबांना खायला घालता येईल असा एक मुद्दा आहे; त्याउलट सौंदर्यप्रसाधन व्यवसायातल्या बड्या व्यक्तीने (आपल्या मालकीच्या असणारे) पैसे काही अन्य कारणासाठी समाजाला दान केले अशी बातमी दिसते तेव्हा सगळं चित्र सरसकट काळ्या रंगात रंगवलेलं समजत नाही.

----

पिकासो कम्युनिस्ट होता का नव्हता याचाही कितपत फरक पडावा?

विकेण्डला 'पोर्टेट ऑफ वॉली' नावाचा माहितीपट पाहिला. संपूर्ण चित्रपट त्या चित्राच्या मालकी हक्काभोवती फिरत रहातो. माहितीपटात दाखवलेली गोष्टही तशी करूणच आहे. जिचं पोर्ट्रेट आहे ती वॉली आणि ज्याने ते चितारलेलं आहे तो शीलं, यांची (या दोघांची गोष्टदेखील तशी करूणच म्हटली पाहिजे) त्या चित्रपटात अगदी शेवटापर्यंत दखल घेतलेली नाहीच. एकदा चित्र, कलाकृती विकल्यानंतर ते कोणाच्या हाती, कसं, कुठे असावं याबद्दल बोलण्याचा त्या कलाकाराला कितपत अधिकार असावा?

Nile, मूळ चित्र आपल्याकडे असण्याला जेवढे 'कूल पॉईंट्स' असतात त्याच्या दशांशानेही प्रत असण्याला नसतात. एक प्रकारे हे सोन्याच्या किंमतीसारखं आहे. सोनं खाता येत नाही, सोन्यापासून सेमिकंडक्टर्स बनवता येत नाहीत, पण तरीही सगळ्यांना सोनं मौल्यवान वाटतं.

Nile Thu, 11/04/2013 - 03:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ चित्र आपल्याकडे असण्याला जेवढे 'कूल पॉईंट्स' असतात त्याच्या दशांशानेही प्रत असण्याला नसतात. एक प्रकारे हे सोन्याच्या किंमतीसारखं आहे. सोनं खाता येत नाही, सोन्यापासून सेमिकंडक्टर्स बनवता येत नाहीत, पण तरीही सगळ्यांना सोनं मौल्यवान वाटतं.

म्हणूनच हे श्रीमंत लोक "अशा" कलांना पैसे देतात (आश्रय नव्हे, अपवाद वगळून).

नगरीनिरंजन Thu, 11/04/2013 - 10:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण या कंपन्यांमुळे फक्त नुकसानच होतं हे कसं काय ते मला समजत नाही

या कंपन्यांमुळे फक्त नुकसानच होतं असं कोणाचंच म्हणणं नाहीय; पण फक्त फायदेच होतात असेही नाही.
जेव्हा या कंपन्या वाढत वाढत अजस्त्र होतात तेव्हा त्यांचा प्रभाव सरकार आणि विज्ञान दोन्हीवरही पडतो असे म्हणायचे आहे. उद्योग कितीही वाढला तरी समाजाचे त्यावर नियंत्रण हवे; त्याउलट नको.

त्याउलट सौंदर्यप्रसाधन व्यवसायातल्या बड्या व्यक्तीने (आपल्या मालकीच्या असणारे) पैसे

ते पैसे आपल्या मालकीचे करण्यासाठी काय काय उद्द्योग केले जातात तेच तर सांगण्याचा लेखाचा हेतू होता. ज्या प्रमाणे या दानात चांगुलपणा पाहिला जातो त्याच प्रमाणे फ्री मार्केटचे गोडवे गाणारे लोक, मार्केट नियमानुसार कोसळायची वेळ आली की, सरकारपुढे हात पसरतात किंवा आपला फायदा होण्यासाठी मार्केटची दिशाभूल करतात यात वाईटपणा दिसावा ही अपेक्षा अवाजवी नाही.

बाकी लाउडरसाहेबांचा कलांना उत्तेजन व आश्रय द्यायचाच हेतू असेल असे मानून चालतो. त्यासाठी बिलियन डॉलर्स कला विद्यापीठांनाही देता आले असते आणि उत्तेजन व आश्रय या संदर्भात ते जास्त सुसंगत झाले असते पण असो.

श्रावण मोडक Wed, 10/04/2013 - 22:49

काही प्रतिसाद वाचल्यानंतर एका जुन्या ऐकीव 'माहिती'ची आठवण झाली. रजनिशांच्या नावचं एक पुस्तक आहे, ज्याचं मराठी शीर्षक आहे - संभोगातून समाधीकडं (किंवा संभोगातून समाधीकडे). असं ऐकलं होतं की, त्या पुस्तकाचं मूळ नाव 'संभोगसे समाधीतक' असं आहे.
वर्तुळ-कोन सिद्धांत सिद्ध होऊ शकेल, असं वाटतं. ;-)