उद्दाम पोलीस अधिकार्‍याला सर्वपक्षीय आमदारांनी धोपटले

दैनिक सामना मध्ये ही बातमी वाचनात आलीः उद्दाम पोलीस अधिकार्‍याला सर्वपक्षीय आमदारांनी धोपटले.
http://www.saamana.com/2013/March/20/Link/Mumbai1.htm

आझाद मैदानावर झालेल्या पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध करणाऱ्या मनसे व शिवसेना यांसह भाजपा, बहुजन विकास आघाडी व काही अपक्ष आमदारांनी एका उद्दाम पोलीस अधिकाऱ्याला जबरदस्त धडा शिकवून यूपी-बिहारमधील स्थलांतरित महाराष्ट्रात येऊ नये यासाठी प्रयत्न करताना महाराष्ट्राचाच बिहार करण्याचे पुढचे पाऊल टाकले आहे. यापूर्वी झालेल्या पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध करणारे हे पक्ष आता दुटप्पी भूमिका घेतात की काय अशी शंका मनात येते.

सुदैवाने त्या पोलीसानेही शहाणपणा दाखवून आता पोलीसगिरी न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
http://indiatoday.intoday.in/story/sachin-suryawanshi-assault-by-mlas-mu...

या आमदारांची खणखणीत बाजू घेणाऱ्या दैनिक सामनाचे हार्दिक आभार. काँग्रेस-राष्ट्रवादीला विकलेल्या इतर मराठी दैनिकांनी नेहमीप्रमाणेच पोटपुजेपणा दाखवून या घटनेचा निषेध केला आहे त्यांचा मी धिक्कार करतो.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

Sad

अवघड आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या सगळ्याच्या मागे आणखीनच काही काळंबेरं असावं असं वाटतं.

ज्या रीतीने या बातमीविषयी आणि त्याच्याशी संबंधित विषयाबद्दल या धाग्यामधे मांडणी केली गेलेली आहे ती मनोरंजक वाटली.

पोलीस अधिकार्‍याला "उद्दाम" ठरवले गेलेले आहे. त्याला "जबरदस्त धडा" शिकवला गेल्याचं म्हण्टलं गेलेलं आहे. हल्ल्याची "खणखणीत बाजू घेणाऱ्या" दैनिकाचे "हार्दिक आभार" मानले गेलेले आहेत.

असो. मांडणीचा हा प्रकार उपहासात्मक तरी आहे किंवा सरळसरळ पक्षीय भूमिका घेणारा तरी आहे. उपहास असेल तर चांगला जमला आहे. मात्र, त्यातच मारहाण करणार्‍या पक्षांना "दुटप्पी" म्हण्टलं गेलेलं आहे आणि त्यांनी "महाराष्ट्रातच बिहारला आणल्यासारखी कृती केली" असा निर्देश आहे. तस्मात् उपहासाला सबगोलंकारी वक्तव्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे.

जर का हा उपहास नसेल तर मी झालेल्या मारहाणीच्या प्रकाराचा - आणि तोही कायदे बनवले जातात त्या विधानभवनात, कायदे बनवणार्‍या लोकप्रतिनिधींकडून आपली ड्यूटी बजावणार्‍या पोलीसावर झालेल्या हिंसेचा - निषेध करतो. आणि त्यांची तळी उचलून धरणार्‍या या धाग्याचाही - अर्थातच जर का हा उपहास नसेल तरच.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

येथे उपहासच अपेक्षित होता. गडबडीत लिहिल्याने गडबड झाली. असो.

धन्यवाद.

पोस्ट्मधलं व्यंग चांगलं जमलंय.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

या धाग्यात अजून मालमसाला आवडला असता.

या मारहाणीचे नेते, आमदार क्षितिज ठाकूर आता वर दबंग बनू बघत आहेत हे आणखीनच काळजी करण्यासारखं वाटतंय.

सामान्य लोकांची भूमिका काय आहे हे ही बघायला आवडेल. सामान्य लोक पोलिस आणि राजकारणी आपल्यातले नाहीतच अशी समजूत करून असतात. तेल नसलेल्या भागातल्या दोन देशांमधे आपसांत फक्त घोडे-तलवारींनी युद्ध सुरू झालं तर अमेरीकेला त्या जितपत रस असेल तितपत रस या बातमीबद्दल सामान्य लोकांना असावा असा माझा तर्क आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमदार क्षितिज ठाकूर आता वर दबंग बनू बघत आहेत हे आणखीनच काळजी करण्यासारखं वाटतंय.

आक्षेप कशाला आहे? 'दबंग' होण्याला की क्षितिज ठाकूर असण्याला? Wink
(माझं 'दबंग'ला काहीही समर्थन नाही.) Smile

क्षितिज ठाकूर असण्याबद्दल फार काही करता येणार नाही. पण निदान आपल्या कृत्याचा आपल्याला पश्चात्ताप होतो आहे असं विधान दुसर्‍या दिवशी केलं असतं तरी कमी चिडचिड झाली असती.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>आपल्या कृत्याचा आपल्याला पश्चात्ताप होतो आहे असं विधान दुसर्‍या दिवशी केलं असतं तरी कमी चिडचिड झाली असती.

म्हणजे ७ डिसेंबर १९९२ ला अडवाणी म्हणाले तसं का?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>> आमदार क्षितिज ठाकूर आता वर दबंग बनू बघत आहेत <<<

हे म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव ना ?

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सामान्य लोकांची भूमिका काय आहे हे ही बघायला आवडेल.

ह्या धाग्याच्या निमित्ताने का होईना, मा. विदुषी अदिती ह्यांनी सामान्यांची दखल घेतलेली बघून बरे वाटले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

या प्रकरणातील अनेक गमतीजमती आता उघडकीस येत आहेत. सदर पोलीस उपनिरीक्षकाला विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी विधानभवनात बोलावले होते असे कळते. क्षितीज ठाकूर हे विधानसभेचे सदस्य असल्याने त्यांच्या तक्रारींबाबत डावखरे यांनी काही निर्णय घेणे अपेक्षित नाही. या निरीक्षकाने पकडले तेव्हा ठाकूर यांची गाडी १०१ किमी प्रतितास या वेगाने हाकली जात होती असा त्या निरीक्षकाचा दावा आहे. आणखी गंमत म्हणजे सदर निरीक्षक आबांच्या सांगली जिल्ह्यातील आहे. बहुदा एनसीपीचे कोणीही आमदार यात सहभागी नसल्याने शरद पवार यांनीही कायद्याचे राज्य दाखवून द्या असा दम राज्यसरकारला दिला आहे.

सदर पकडापकडीच्या वेळचा संवाद यूट्यूबवर उपलब्ध आहे असे दिसते. त्यावरुन पोलीसाची चूक नाही असा माझा समज होत आहे. सभागृहाबाहेर केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांच्या ड्रायवरला होण्यामध्ये आमदारांचा हक्कभंग होऊ शकतो हा मुद्दा रोचक आहे.

सदर पकडापकडीच्या वेळचा संवाद यूट्यूबवर उपलब्ध आहे असे दिसते. त्यावरुन पोलीसाची चूक नाही असा माझा समज होत आहे.
अर्थात. सौजन्याची भाषा वापरली जावी अशी अपेक्षा नसतेच, नाही का?
बाकी मनसेच्या आमदारांनीही निवडणुकीच्या आधी आपले खरे रुप दाखवून द्यायला सुरवात केली आहे, ही चांगली गोष्ट आहे. उगीच उद्या मनसेचे राज्य वगैरे आले तर लोकांचा भ्रमनिरास व्हायला नको. दहावीच्या परीक्षेत मनसेच्या एका पुढार्‍याच्या मुलाने दमदाटी करुन आपल्या जागी दुसर्‍याला पेपर लिहायला बसवले होते. हा प्रकार उघडकीला आणणार्‍या अधिकार्‍याला मनसेच्या त्या पुढार्‍याचे दमदाटी करणारे फोन आले, अशी बातमी आहे. मनसेच्या स्थापनेच्या वेळी कुणीतरी 'शिवसेनेतले गुंड परवडले, पण मनसेमधले नको' असे म्हटले होते. राज ठाकरेंचा करिष्मा विरुद्ध मनसेच्या सरड्यांचे खरे रंग यात कोण जिंकते हे बघणे मनोरंजक ठरेल.या सगळ्या धुमश्चक्रीत महागाई, दुष्काळ, लाचलुचपत, प्रदूषण हे सगळे बाजूलाच राहाते, हे तसे दुय्यमच आहे.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आयबीएन लोकमत वर चर्चा करताना आ गिरिष बापट यांनी दुसरी बाजू पण मांडली. काही पोलिस अधिकारी जनतेशी व लोकप्रतिनिधींशी उद्दाम पणे वागतात. अधिकाराचा वापर करताना कशी जिरली? असा भाव त्यांच्या वागण्यात असतो. अर्थात ही देखील बाजू खरी आहेच. आणि हे सर्व क्षेत्रात असते. पोलिस, तलाठी, पुढारी असे म्हटले कि पैसे खाणारच, भ्रष्टाचार करणारच ही प्रतिमा सरासरी तून आलेली आहे. असो माणुस म्हटले की या प्रवृत्ती आल्याच.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/