Skip to main content

लॅपटॉप कुठला घ्यावा ?

मला व माझ्या मित्राला एक 30-35 हजार पर्यँत बजेट असणारा लॅपटॉप घ्यायचा आहे. तर याबाबतची माहिती मिळविण्यासाठी ही चर्चा! ( यात किँमत , कुठे मिळेल , सुविधा , आपले अनुभव अपेक्षित)

तर्कतीर्थ Fri, 19/04/2013 - 11:32

माझ्याकडे एका जर्मन संशोधकाने लिहीलेल्या पुस्तकात लोकांच्या खरेदीच्या मानसिकतेवर केलेल्या संशोधनाचा उल्लेख आहे. त्यात जो निष्कर्ष काढला आहे तो मला आत्तापर्यंत फायदेशीर ठरला आहे. त्यानुसार अगोदर ब्रॅण्ड ठरवावा आणी मग आपल्या बजेटमध्ये बसणारे मॉडेल ठरवावे.

याचा तत्त्वाचा अवलंब करून मी डेलकडून डेस्क-टॊप घेतला, तो पण नेट वरून. आणि माझे समाधान शब्दातीत आअहे.

मैत्र Fri, 19/04/2013 - 13:14

या किंमतीत काही असंख्य मॉडेल्स उपलब्ध नसावीत. किती वापर आणि काय स्वरुपाचा वापर - जसं जास्त एमएस ऑफिस का जास्त गेम्स / गाणी वगैरे याप्रमाणे मॉडेल्स वेगवेगळी मिळतात त्यानुसार ठरवावे..
स्वस्तातला हवा असेल तर तोशिबा घ्या. चांगला हवा असेल तर बजेट ५-१० हजाराने वाढवून डेल किंवा लेनोव्होचे जे मॉडेल योग्य वाटेल वरच्या तत्त्वानुसार ते घ्या..

मी Fri, 19/04/2013 - 14:56

'साधारण' - इमेज एडिटिंग, गाणी ऐकणे, चित्रपट पहाणे वगैरेसाठी बजेट लॅप्टॉप ठीकच आहे, सगळ्याच कंपन्या(अ‍ॅपल सोडून) बजेट लॅप्टॉप विकतात, सॅमसंग त्यातल्या त्यात "बर्‍यापैकी कमी पैशात जरा बर्‍या दर्जात बर्‍याच सोयी" प्रकार देतं, ते तुमच्या मागणीसाठी ठिक आहे असं वाटतं.

फ्लिपकार्ट/अ‍ॅमेझॉन च्या वेबसाईट्वर बजेटप्रमाणे फिल्टर करुन सध्या उपलब्ध लॅप्टॉप पहा, शॉर्टलिस्ट करुन त्यांचा साधारण तुलनात्मक अभ्यास करा (किंमत, सोयी, कॉन्फिग्युरेशन, समस्या वगैरे), त्यानंतर पुण्यात डेटा केअर कॉर्पोरेशन किंवा तत्सम दुकानात प्रत्यक्ष लॅप्टॉप हताळून पहा, किंमत तपासून पहा, घासाघीस करण्याचा प्रयत्न करा, जिथे तुम्हाला आवडेल असे उत्तम डील मिळेल त्याठिकाणी ऑर्डर करा.

प्रत्यक्ष वेबसाईट्सवरील(फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन) युजर रिव्ह्यु बर्‍याचदा उपयोगी पडतो असा अनुभव आहे, त्याचा उपयोग करावा.

१ - तुम्ही पुण्यात आहात हे गृहीतक.
२ - ही डेटा केअर कॉर्पोरेशनची झैरात नाही.

बॅटमॅन Fri, 19/04/2013 - 15:06

In reply to by मी

+१.

पुण्यात कुठेही जा, टिळक रोडवरच्या हौस ऑफ लॅप्टॉप्स मध्ये चुकूनही जौ नका. उगा महागडे दर कारण नस्ताना. मला डेलची ब्याट्री पाहिजे व्हती म्हून गेल्तो. ४ ठिकानी चवकशी करावी म्हून यांच्या दुकाणात गेळो. ५४०० किम्मत सांगिटला. मग डेलच्या शोरूममधी गेलो, तिकडे मात्र ४२०० त मिळाली. डेल शोरूमपेक्षा म्हागात देनारे पाहूण कळायचं बंद झालं. पुण्णा त्या दुकाणाची पायरी म्हून चढायला न्हाई मी कंदीबी.

मी Fri, 19/04/2013 - 15:42

In reply to by बॅटमॅन

साले ह्ये सगले डँबिस हायेत, फाटल्या वर्साला म्हाका डेलचा चार्जर हवा हुता म्हून डीसीसीत गेल्तो, तर तो बोल्ला १४०० पावल्या पन लॅप्टॉप घेउनशान या, मंग लॅप्टॉप घेऊन गेल्लो तो दुसराचा इडियट व्हता तो म्हाका म्हनला पहिल्यान कित्याक सांगित्लेन चार्जरचे, हांव म्हनलो १२०० तर त्येने माला १२००त चार्जर दिल्हा.

मस्त कलंदर Fri, 19/04/2013 - 22:34

लिनोवोचा आयडियापॅड झेड -८०
http://www.lenovo.com/products/us/laptop/ideapad/z-series/z580/

मी साधारण दसर्‍याच्या आसपास घेतला, ४०हजारांना मिळाला. पूर्ण पैसावसूल. लिंकवर दिलेल्या माहितीखेरिज इंटर्नल डॉल्बी साऊंड सिस्टिम आहे. आवाज, एकंदर परफॉर्मन्स मस्त आहे..

अतिशहाणा Sat, 20/04/2013 - 00:31

मी डेलचे काही लॅपटॉप वापरले आहेत. चांगले वाटले. बजेटमध्ये चांगला मिळून जाईल.

मस्त कलंदर Sat, 20/04/2013 - 22:53

In reply to by धनंजय वैद्य

मी मुंबईच्या आर-सिटी मॉलच्या क्रोमामधून लॅपटॉप घेतला.
स्पेसिफिकेशन लिंकवर आहेतच, फक्त माझा i5 (दुसरी पिढी)प्रोसेसर आणि ५००जीबी हार्डडिस्क इतकाच काय तो फरक आहे. उत्तम काम करतो, इंटर्नल स्पीकर्स चांगले आहेत, त्यात डॉल्बीपॉवर सिस्टिममुळे दुधात साखर पडलीय. स्मार्ट फॅन-आवाज येत नाही अणि सिस्टीम गरमही होत नाही.. वन-की सिस्टिम रिस्टोर सुविधा तर सगळ्याच लिनोवो मध्ये असते.

फायनल किंमत- ३९,९९०. त्यासोबत क्रोमाकडून मिळालेल्या गिफ्ट पॅकमध्ये एक युएसबी स्पीकर्स चा सेट, माऊस+माऊसपॅड, आणि लॅपटॉप साफ करण्याचं पूर्ण किट मिळालं की जो त्यांच्यामते दीडेक हजाराचा ऐवज होता.