१० मे ला रिलीज होणार्‍या कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...

गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू असतं. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग... हल्ली गोखल्यांची पाठ सारखी दुखते. समारंभात त्यांना अचानक पाठदुखीचा ऍटॅक येतो पण ते सावरतात.
समारंभ संपताना आईला मुलाचा फोन येतो. मुलगा परदेशात. बहुधा पश्चिमेला. लंडन. मुलाला ऒर्कुट फ़ेस्बुक समाजसेवा करायची सवय अस्ते. मुलाचं नाव श्याम.श्यामच्या आजोबांचंच नाव त्याला ठेवलेलं. श्यामचे आजोबा कोकणात माध्यमिक शाळेत उपमुख्याध्यापक होऊन निवृत्त. तिकडे त्यांची आंब्याची काही कलमं. तेही कोकणस्थ असल्याने ए लॉअ पील सोस्टे नोनॉ अस्तातच.
मुलगा यांच्या जातीचा फ़ेस्बुक ग्रुप चालवत असतो.हे तो आईला सांगतानाएक फोनवरचा संवाद...
“ जात म्हणू नये. जात शब्द फ़ार जातीय वाटतो श्याम.. समाज म्हणावं.” श्यामची आई.
“पण जातीय म्हणजे काय?”
“ जातीय म्हणजे अश्लील”
“ ओके मॉम, यापुढे समाज म्हणेन ”
असा हा आईचं ऐकणारा श्याम दर महिन्याला काही ज्वलंत विषयांवर प्रत्यक्ष मीटिंगा घेत असतो.“आपण्न्क्कीकुठूनआलो?” या विषयावरच्या मीटिंगला श्याम अर्थातच एका (ए लॉअ पील सोस्टे नोनॉ) मुलीच्या प्रेमात पडतो. “आपणएव्ढेहुशार्कसे?” या विषयावरच्या पुढच्या मीटिंगला तो तिला प्रपोज करतो आणि “ हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात?” या ज्वलंत विषयावरच्या मीटिंगमध्ये ती त्याला होकार देते. आता होकार मिळाल्यावर एकूणच श्यामचे समाजाच्या मीटिंगमधले लक्ष उडते. लग्नच वगैरे ठरवल्याने आता या समाजसेवेची आपली गरज संपली हे त्याच्या लक्षात येते. मग तो तिच्याबरोबर माय्देशी परततो.

दरम्यानच्या काळात मुंबईत काही मिशावाले राजकारण राजकारण खेळत असतात. काही प्युअर पोलिटिकल गेम असतात तर काही भेसळीचे पोलिटिकल गेम असतात.तर काय होतं, मध्येच बच्कन दोन रहस्यमय खून होतात .. या खुनांचं खापर की काय ते श्यामवर फुटतं आणि श्यामला अटक होते. ती अर्थातच मिशावाल्या मंडळींची राजकीय खेळी असते. गोखले विविध वकील मंडळी, पोलीस खात्यातली मंडळींकडे संसदीय पद्धतीने प्रयत्न करून पाहतात... अर्ज विनन्त्या करतात पण काहीच होत नाही. अचानक एका पोलीसस्टेशनमध्ये त्यांची पाठ परत दुखायला लागते आणि ते चक्कर येऊन पडतात. मग जोरात झांजा वाजत वाजत...

मध्यंतर

त्यांचा पाठीचा विकार बळावलेला असतो. आणि गोखल्यांना इस्पितळात दाखल व्हायला लागते. तपासणीत असे कळते की गोखल्यांना पाठीचा कणा आहे पण जो आहे तो खूपच मृदू आहे, तकलादू आहे... त्यामुळे तो कणा ताठ राहत नाही. दु:खी गोखल्यांचे त्राण इतके गेलेले असते की मला ऑप्रेशन नको असे ते ओरडत असतात. त्याच वेळी त्यांची पत्नी एक अफलातून उपाय करते.गोखले इस्पितळात असतानाच त्यांची पत्नी टेप रेकॉर्डरवर ती मदरलॅन्डची प्रेयर वाजवते. "नमस्ते सदा.." ची ती लहानपणी ऐकलेली म्हटलेली ट्यून ऐकून गोखले गहिवरतात, आनंदाने नाचू लागतात, पाठीचे दुखणे कुठल्या कुठे पळून जातं. नर्सेस, वॉर्डबॉय, हाउसमन, कन्सल्टंट सारं हॉस्पिटल आनंदी होते, मग काय कदम ताल करत ते आनंदाने ऑप्रेशन थिएटरकडे जातात. . मग गोखल्यांचे त्याच दिवशी ऑप्रेशन होते आणि त्यांच्या पाठीत लाकडी रॉड बसवतात. मग त्यांचा कणा एकदम ताठ होउन जातो. भुलीच्या गुंगीतही त्यांना ती लहानपणची शिस्त आठवते... काय ती शिस्त अन काय ती बौद्धिकं...
मग गोखल्यांना ऑप्रेशनच्या रात्री स्वप्न पडतं, त्यात त्यांचे बाबा आठवतात...शाखेवरती रोज लाठीकाठीचे खेळ शिकलेले आठवतात. मल्लखांब तलवारबाजी, कबड्डी, दोरीवरचा मल्लखांब असले मराठी मर्दानी खेळ दिसायला लागतात. “ताठ कणा हाच बाणा “ हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांना आठवतं...

मग ते अचानक उजव्या हाताने छाती पिटत "माज आहे मला माज आहे मला" असे ओरडत उठतात. इस्पितळाचा ड्रेस काढून पांढरा शर्ट आणि खाकी अर्धी विजार चढवतात . डॉक्टर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण तरी गोखले मात्र “ मेलो तरी बेहत्तर पण लढाई माझी आहे” असं सांगतात. मग मागे झान्जा वाजायला लागतात."कोकणस्थ " अशी आरती सुरू होते. मदरलॆंडची प्रेयर घुमायला लागते.. हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात. मागे सारी मराठी असल्याचा माज असलेली जनता एकही मराठी शब्द न बोलता "एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " अशा घोषणा देत ताठ कण्याने धावू लागते.

मग वाटेत येणारे सारे "अनएड्युकेटेड लॉब्रेकर्स पीसहेटर्स सोशली अन्स्टेबल नॉनसेन्स" गुंड दंडाचा प्रसाद खातात , ताठ कण्याच्या लाथा खातात , , गोखले ताठ कण्याने जोरात भाषण करायला लागतात “ आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत”... आता हे बौद्धिक घेणार या भीतीने सारे वाईट्ट लोक थरथर कापू लागतात, रडायला लागतात, बनावट साक्षीदार पळून जातात, खर्यात साक्षी दिल्या जातात, मिशावाले गुंड सरळ येतात. मग श्यामला जामीन मिळतो . मग डी एस पी आणि जज साहेब “हाच खरा शूर “ असं म्हणत गोखल्यांचं अभिनन्दन करतात.. मग परत भाषण, “ मी कोकणस्थ आहे पण मी जातीय नाही, मी संघात जायचो पण मी पोलिटिकल नाही, मी रस्त्यात मारामारी करतो पण मी गुंड नाही... “ वगैरे वगैरे ... असे हा आहे पण तो नाही असे भाषण सोळा मिनिटे चालल्यावर “कोकणस्थ” असा जोरात आवाज काढून आरती संपते. सिनेमाही संपतो.

मग नावं येताना ----
श्याम घरी येतो आणि त्याचं लग्न होतं आणि तो पुन्हा जालीय समाजसेवेत बुडून जातो ... त्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार गोखल्यांना मिळतो...पुरस्कार स्वीकारायला ते अर्थातच खाकी विजार आणि पांढर्या शर्टात जातात.

field_vote: 
4.166665
Your rating: None Average: 4.2 (6 votes)

प्रतिक्रिया

अगागागा.... ते हाफ चड्डीचे पोस्टर पाहून शंका आलीच होती. पण इतका चित्रपट इतका विचित्र असेल असे वाटले नव्हते. निवडणुकीच्या वेळी रिलीज करायचा राव..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण इतका चित्रपट इतका विचित्र असेल असे वाटले नव्हते....>>>>>>>>
हम्म्म... आम्हालाही माहित नव्हते हे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही मला काही शंका आहे "कोकणस्थ" ह फक्त एका विशिष्ठ समाजाला लावले जाणारे विशेषण आहे की अन्य समाजालाही? आणि नसल्यास ते अन्य समाजाला का लावत नाहीत?
हा सिनेमा एकंदर कोकणात स्थायीक झालेल्या/कोकणावरुन आलेल्या लोकांचा आहे की एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादीत आहे?

बाकी सिनेमा अफाटच दिसतोय विशेषतः "हो मला माज आहे, माज आहे" प्रसंग Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही मला काही शंका आहे "कोकणस्थ" ह फक्त एका विशिष्ठ समाजाला लावले जाणारे विशेषण आहे की अन्य समाजालाही?

नक्की खात्री नाही, परंतु बहुधा मराठा समाजातही असे विशेषण लागू होऊ शकते, असे काहीसे ऐकलेले आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाफ प्यांट आणि संघाच्या उल्लेखामुळे हा चित्रपट विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित आहे. (श्याम, जात म्हणू नकोस समाज म्हण... किंवा राष्ट्रीय म्हण!) असे वाटते....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'विरुद्ध' ची मराठी आवृत्ती आहे म्हणा की. आधी 'शिवाजीराजे', मग 'काकस्पर्श' आता 'कोकणस्थ'. मांजरेकरांची प्रगती आहे.
अवांतरः बॉम्बे टॉकीज' हा एक भिकार प्रयोग आहे असे म्हणायलाही या गोखल्यांसारखे धाडस एकवटावे लागेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

पण चित्रपट इतका विचित्र असेल असे वाटले नव्हते....>> +१

अवांतरः बॉम्बे टॉकीज' हा एक भिकार प्रयोग आहे असे म्हणायलाही...>> मी वाचलेल्या समिक्षेनुसार कश्यपची सोडुन बाकी तिन्ही लघुपट चांगले आहेत. नवीन लेख/समिक्षा येउद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

है शाबास!
"बोलु लागलेले शिवाजीराजे ते बोलु लागलेले कोकणस्थ: एक प्रवास" असाही लेख येऊदे ही विनंती Smile

बाकी थेट्रात पाहिलात की काय? तसे असेल तर मांजरेकरांचे चित्रपट दमड्या मोजून पाहिल्याचे डेरिंग केल्याबद्दल काय म्हणावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जालींदर प्रॉडक्शन् प्रेसेन्ट्स नंतरच्या श्रेयनामावली मधे भारत श्री मनोजकुमार यांना श्रेय दिल्या गेल्या आहे का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारत श्री मनोजकुमार हे कोंकणस्थ असण्याबद्दल कल्पना नव्हती. कळोन आश्चर्य जाहले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादात 'माहितीपूर्ण' असे नेमके कोणास नि नेमके काय सापडले असावे बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिस्क्लेमर : १० मे ला सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमा न पाहता प्रोमो पाहून आणि दिग्दर्शकाला इंग्रजीत मराठी सिनेमाबद्दल सांगताना पाहून ही कथा लिहिली आहे. अर्थात लेखक आणि दिग्दर्शकांकडून असा भडक सिनेमा असेल अशीच अपेक्षा आहे. ही कथा वाचून कोणाच्या भावना दुखावल्यास त्यास आम्हीच जबाबदार आहोत हे मान्य करतो... Wink

आपापला सिनेमा बघून ष्टोरी आपापली आवडून अथवा नावडून घ्यावी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा.

लेखक आणि दिग्दर्शकांकडून असा भडक सिनेमा असेल अशीच अपेक्षा आहे.

माझी अपेक्षा यापेक्षा खालची आहे.
तुम्ही लिहीलेल्या कथेवर एक 'हेराफेरी' टाईप विनोदी सिनेमा काढता येईल. कथेत "आमच्या भित्रेपणामुळे आम्हाला ससे समजू नका; आम्ही उंदीर आहोत, पुस्तकं खाणारे!" असं संवाद टाकायला जागा आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगागागा! मास्तर.... दंडवत घ्यावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>> दु:खी गोखल्यांचे त्राण इतके गेलेले असते की मला ऑप्रेशन नको असे ते ओरडत असतात. त्याच वेळी त्यांची पत्नी एक अफलातून उपाय करते.गोखले इस्पितळात असतानाच त्यांची पत्नी टेप रेकॉर्डरवर ती मदरलॅन्डची प्रेयर वाजवते. "नमस्ते सदा.." ची ती लहानपणी ऐकलेली म्हटलेली ट्यून ऐकून गोखले गहिवरतात, आनंदाने नाचू लागतात, पाठीचे दुखणे कुठल्या कुठे पळून जातं. नर्सेस, वॉर्डबॉय, हाउसमन, कन्सल्टंट सारं हॉस्पिटल आनंदी होते, मग काय कदम ताल करत ते आनंदाने ऑप्रेशन थिएटरकडे जातात. . <<<<

यावरून हे आठवले : Smile

http://www.youtube.com/watch?v=2JtoYmOZFQE

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

“आपण्न्क्कीकुठूनआलो?”“आपणएव्ढेहुशार्कसे?” आणि “ हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात?” या ज्वलंत विषयांना हात घालणारी चर्चा या सिनेमात दाखवली आहे हे मराठी प्रेक्षकाचं भाग्यच म्हणायचं. 'भाग्य आमुच थोर म्हणुनि सिनेमे पाहतो मराठी' असं काहीतरी सुरेश भटांनी म्हटलेलं आहेच.

हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात.

हाती धारण केलेला दंड हा प्रतिकात्मक आहे हे उघडच आहे. पौरुषाचा ताठा पाठीच्या कण्याला आधार म्हणून द्यायचा आणि तोच हातात शस्त्र म्हणून बाळगायचा या दोन्हीचं जक्स्टापोझिशन होणं अप्रतिमच. मराठी सिनेमाने एक नवीन उंची गाठली आहे हे चिंतातुर जंतूही मान्य करतील.

मात्र कोकणी माणसाचं शक्तिस्थान असलेली लाल माती कपाळावर गंधासारखी लावली जाते, शत्रूच्या हेलिकॉप्टरांवर सुपारीची झाडं ताणून झटक्यात सोडून देऊन सुपाऱ्यांचा मारा करून पाडली जातात, आणि अगस्तिने आचमनाने समुद्र प्यायला आणि लघवी करून पुन्हा भरला हा प्रसंग वापरला जातो (कसा ते प्रत्यक्ष सिनेमातच पहा) या सगळ्याचे उल्लेख तुम्ही केले नाहीत त्यामुळे हे परीक्षण अपुरं राहिलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हांगाश्शी!!! आत्ता कळ्ळं दादांना शिवांबुने धरण भरण्याची युक्ती कुठून मिळाली ते Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL
लेख आणि हा प्रतिसाद दोन्हीलाही _/\_; पण लेखात अनुस्वार जरा कमी पडले असे वाटले. ("मांज आहे मलां मांज")
सिनेमात दांडकं समुद्रात फेकून कोकणविस्तार करण्याचाही प्रसंग आहे का हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाती धारण केलेला दंड हा प्रतिकात्मक आहे हे उघडच आहे. पौरुषाचा ताठा पाठीच्या कण्याला आधार म्हणून द्यायचा आणि तोच हातात शस्त्र म्हणून बाळगायचा या दोन्हीचं जक्स्टापोझिशन होणं अप्रतिमच.

अगागागागागागागा!

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाती धारण केलेला दंड हा प्रतिकात्मक आहे हे उघडच आहे. पौरुषाचा ताठा पाठीच्या कण्याला आधार म्हणून द्यायचा आणि तोच हातात शस्त्र म्हणून बाळगायचा या दोन्हीचं जक्स्टापोझिशन होणं अप्रतिमच. >>>>>>>>>>>>>>

छान अचूक विश्लेषण ,, धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हे बौद्धिक घेणार या भीतीने सारे वाईट्ट लोक थरथर कापू लागतात, रडायला लागतात, ROFL

त्याचं लग्न होतं आणि तो पुन्हा जालीय समाजसेवेत बुडून जातो ROFL

स्टोरी बदलेली आढळल्यास तुमच्यावर मनोरंजनीय फसवणुकीचा खटला दाखल करण्यात येईल याची

कृपया नोंद घ्यावी . Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महेश मांजरेकर आणि कोकणस्थ कोणालाही घाबरत नाहित ,एकाचा चांगली आणि दुसऱ्याची वाईट गोष्ट आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महेश मांजरेकर आणि कोकणस्थ कोणालाही घाबरत नाहित ,एकाचा चांगली आणि दुसऱ्याची वाईट गोष्ट आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0