जयंती

पुरोगामी ढोँगाची चुंबळ डोक्यावर घेऊन समाज सेवेचा क्याबरे करणार्या आरबाट समाजसेवकाची झलक दोन दिवसापूर्वी रात्री पाहिली. डाँ. आंबेडकर जयंतीत पूर्वी वाड्या वस्त्यावर जेवनावळी असायच्या. आरकेस्ट्रा साताठ वर्षापासून जोर धरु लागला. गायनपार्टीचा माहौल (उच्चारी गायंम पार्टी) हा अजून जुना ! प्रल्हाद शिँदे मयत आहेत हे चारदा सांगूनही जुनी खोडं जयंतीच्या आधी, परलाद शिँदे आनत आस्लाव तर वर्गणी देताव असं म्हणुन मंडळ अध्यक्षाला बुचकळ्यात टाकतात. अध्यक्ष खोटा बोलतो. आनतो म्हणतो. म्हातारं पैरणीतून नोट नोट निरखून देतं. जयंतीच्या आधीच जयंतीचा आनंद घेतं. हा चार घराआडचा प्रसंग नेहमीचाच. आता आनंद शिँदे गादी चालवताहेत. दोन दिवसापूर्वी गाणी ऎकायला गेलो. स्टेजवर बाबासाहेबांच्या विनम्र अभिवादनाच्या छोट्या अक्षराला झाकीत मामा भोसले आदर्श समाजसेवक (राष्ट्रवादी काँग्रेस. पवार साहेबांच्या बोळक्या तोँडाच्या फोटोसहीत) आपले सहर्ष स्वागत करीत आहे या मोठ्या अक्षराचा फ्लेक्स माहौल छोटा करीत होता. अंगावर येणारे बरेच फ्लेक्स टाळीत मी पुढे गेलो. मामाचा राईट हँड आला. मला आणि मित्राला मामाजवळ घेऊन गेला. मामाने गळा भेट घेतली . प्रेमपूर्वक दारु पुसली. नकारावर हसला. त्याच्या लेखीची आठ मतं फिक्स झाली. मी गाण्याला सज्ज झालो. आवरुन बसलो. सावरून बसलो आनंदजी मामाचं चरित्र वाचू लागले. २० वर्षापासून असलेली मामाची जुनी ओळख पुसू लागले. जन समुदायास मामा नवा कळू लागला. मला वैताग वैताग वाटू लागला. मामाचा मटका , खतरा रंडीबाजी , पोलीसानी काढलेली वरात आठवू लागली. मन फार नाही दहा वर्षच मागे गेलं.
राजा राणीच्या जोडीला
पाच मजली माडीला
माझ्या बाबांचं योगदान
लाल दिव्याच्या गाडीला..
या गाण्याने आणि आनंदजीच्या आवाजाने माहौल मधे परत आलो. आणि गाण्यात चालू झालेली शायरी ऎकू लागलो. गाणे गाताना पाचशे हजारची नोट आली की त्याच्या बरोबर मामाचं कौतुक ! एक भीम का बच्चा है, जो बिल्कूल सच्चा है ! मामा जिसको कहते है वो लाख दुवा मैं रेहते है ! च्यायला हे गाणं आधी ऎकलंय यात आसलं काय नाही. हे काय चालू आहे म्हटलं. पुढच्या गाण्यात पण हीच नाटकं मामाच्याच कौतुकी चिजांची पेरणी ! मग मी उठलो. आणि भीमच्या सच्च्या बच्याचं कौतूक ऎकून लैच शरमलो. सहकारी दोस्ताची आयमाय काढली. रिटनमधे त्यानेपण माझी काढली. तो म्हटला मला तरी कुठं माहित होतं. आनंद शिँदे ब्र्यांड आम्बेसिडर झालेत मामाचे. मग सच्च्या बच्च्याचे कौतूक ऎकून आम्ही कच्चे बच्चे बाहेर आलो .

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

छोटेखानी प्रकटन आवडलं

अवांतरः यावरून आठवलं
आजच (१५ मे) लोककवी आणि आंबेडकरी विचारांचे प्रसिद्ध जनशाहिर वामनदादा कर्डक यांची पुण्यतिथी आहे. (अर्थात याचा ऐसीवरच्या दिनवैशिष्ट्यातही उल्लेख आहे)
"सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं हाय रं..
तुमचा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय रं" हे त्यांचंच एक संघर्षगीत. त्यांचे तीन कवितासंग्रह आणि आत्मचरित्रही (जीवनाचं गाणं - १९९६) प्रसिद्ध आहे
गेल्यावर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात 'वामनदादा कर्डक' अध्यासन स्थापण्यात आलं.
त्या जनशाहिराला मुजरा!

श्री वाघमारे यांना विनंती की वामनदादांवरही काहि लिहावं ही विनंती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रल्हाद शिंदे एवढी मोठी कल्ट फिगर होण्याचं कारण काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"पवार साहेबांच्या बोळक्या तोँडाच्या फोटोसहीत"

हे रोख्ठोक अजून आवडल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोगोल धन्यवाद ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0