"डबल मॅस्टेक्ट्मी"

आज वाचतावाचता हा लेख वाचनात आला. बातमीचा/लेखाचा सारांश असा :

अँजेलिना जोली या अभिनेत्रीने, गेल्या दोन महिन्यांत आपले दोन्ही स्तन काढून टा़कण्याची शस्त्रक्रिया करवून घेतली आहे. बहुतांशी, स्तनांचा कर्करोग झाल्यानंतर ही शस्त्रक्रिया करवून घेतली जाते. आपल्या लेखामधे जोलीने याबद्दल सांगताना असं म्हण्टलं आहे की तिचा हा निर्णय कॅन्सर नसतानाच घेतलेला आहे. जोलीची आई छप्पन्न वर्षांची असताना स्तनांच्या कॅन्सरमुळे गेली. त्याआधी सुमारे दहा वर्षे तिचा झगडा चाललेला होता. जोलीने अलिकडे करवून घेतलेल्या जनुकीय चाचण्यांनुसार, तिला हा कर्करोग होण्याची ८७ टक्के शक्यता होती. एक आई म्हणून हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं जोलीने नोंदवलेलं आहे.

सिनेतारकांच्या अनेकानेक गोष्टी रोज प्रसिद्ध होतच असतात. म्हण्टलं तर ही बातमी त्यापैकी एक असं म्हणता येईल. सहाशे-साडेसहाशे कोटींच्या लोकसंख्येमधे, स्तनांचा कॅन्सर होणार्‍या व्यक्तीही कितीतरी असतीलच. तर मग जोलीच्या या बातमीमागे उल्लेखनीय/विशेष असं काय ?

- आपल्या लेखामधे जोली प्रस्तुत शस्त्रक्रियेबद्दल, त्यामागच्या कारणीमीमांसेबद्दल लिहिते. मोठमोठे सिनेस्टार्स वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक/जीवशास्त्रीय/राजकीय बाबींबद्दल लोकांमधे असलेली माहिती, त्या रोगाबद्दलचं भान वाढवावं म्हणून प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येत असतात. ही बाब निश्चितच स्पृहणीय आहे. परंतु कित्येकदा त्यांचं या संदर्भातलं काम त्या त्या प्रसंगापुरतं - आणि पर्यायाने काहीसं वरवरचं असल्याचं मानणारा एक मतप्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर जोलीचं आपल्या वैयक्तिक संदर्भातल्या निर्णयाचं सांगोपांग वर्णन, त्याबद्दलची माहिती देणं विशेष वाटतं.

- दुसरा मुद्दा लैंगिकतेचा आहे. कर्करोगाने ग्रासल्याची चाहूल लागल्यानंतर स्तन/गर्भाशय काढून टाकणं निराळं आणि तो नसताना हे पाऊल उचलणं यात फरक आहे. जोलीच्या शब्दांत " On a personal note, I do not feel any less of a woman. I feel empowered that I made a strong choice that in no way diminishes my femininity."

असो. सिनेतारकांना, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला मिळणार्‍या प्रसिद्धीच्या संदर्भातल्या माहितीच्या महापुरामधे खरे तर ही बातमी एकतर बुडून तरी जाऊ शकते किंवा "आणखी एक पब्लिसिटी स्टंट" असंही म्हणता येईल. जोली ही अतिश्रीमंत व्यक्तींपैकी एक असल्याने तिला या अत्याधुनिक जनुकीय चाचण्या परवडत असतील हेही अर्थातच खरे आहे.

पण मला उपरोल्लेखित कारणांमुळे ही बातमी नवं भान देणारी वाटली आणि म्हणून इथल्या वाचकांपर्यंत पोचवावीशी वाटली. मला आशा आहे इथल्या काही सदस्यांनाही ती वाटावी.

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

लेखासोबतचे रेखाटन(देखील) मला विचारांत पाडून गेले. एक क्षणभर तरी, तिथं नसलेल्या रेषा मला 'दिसल्याच'. हा माझ्यातला स्त्रीदेहाविषयीचा पूर्वग्रह किती प्रभावी आहे हे जाणवलं, आणि विचारांत पडलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्तनांचा कर्करोग पुरषांना देखील होऊ शकतो. ही शस्त्रक्रिया त्यांच्यावरही करता येत असेल का? असल्यास कशी वगैरे.

अँजेलिनाचा हा निर्णय धाडसी आणि अतिशय कौतुकास्पद आहे. स्त्री म्हणून हा निर्णय अवघड आहेच. ती स्वतः म्हणते - द डिसीजन वॉज नॉट ईझी.

८७% शक्यता आहे म्हणून अशा "प्रिव्हेन्टीव्ह प्रोसीजर्स" कराव्यात की भीतीच्या दडपणाखाली आयुष्य जगावे? याचा तडा तिने स्वतःपुरता लावला आहे असे दिसते. आता ८७% वरुन ती शक्यता ५% वर आली आहे. आईची भूमिका समर्थपणे निभावणे, जीवन दडपणमुक्त जगणे तिला अधिक महत्त्वाचे वाटल्याचे स्पष्ट दिसते.

बहुतेक बायका ४० वयानंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी चाचणी करतात. कालच बातमी वाचली की पहीली त्रिमिती मॅमोग्रफी टेस्ट आता उपलब्ध आहे. पण त्यातही अनेकांचे मत हे होते की या त्रिमीतीय चाचणीत "किरणोत्सर्ग" जास्त आहे.

सांगायचा मुद्दा हाच की अँजेलिना ला सरासरी चाचण्यांपेक्षा अधिक किंबहुना वरचेवर चाचण्या कराव्या लागल्या असत्या अन किरणोत्सर्गाला सामोरे जाण्याचा धोका वाढला असता असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. परंतु त्याचे दरडोई प्रमाण फारच कमी असते. सरासरी १००० पुरुषांपैकी एकास स्तनाचा आयुष्यात कधीतरी कर्करोग होतो. बीआरसीए-२ जनुकात फरक असला, तर त्या पुरुषांस कर्करोग होण्याचे ५-१०% इतके असते. म्हणजे १/१००० पेक्षा खूप अधिक. तरी हा जनुकीय फरक असलेल्या पुरुषांपैकीसुद्धा ९०-९५% पुरुषांना स्तनाचा कर्करोग होत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करून पुरुषाचे स्तन काढून टाकण्याचा निर्णय फायद्या-तोट्याच्या हिशोबांत तोट्याकडे जातो.

पुरुषास स्तनाचा कर्करोग झाल्यास उपचार म्हणून स्तनच्छेद करतात. परंतु पुरुषाचे स्तन आकाराने लहान असल्यामुळे त्या मानाने छोटी गाठही आजूबाजूच्या स्नायूंमध्ये शिरते, तिथून फुटून दूरदूरवर लागण होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद धनंजय. माहीतीपूर्ण प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक बातमी आणि त्याबद्दलचे प्रकटन.

स्त्रीदेहाच्या शोषणाबद्दल आणि त्याबद्दलच्या स्टिरिओटाइप्सबद्दल तावातावाने आणि भरपूर चर्चा होतात. पण या असल्या स्टिरिओटाइप्समध्ये आधुनिक पुरुषांचीही कुचंबणाच होत असते. पुरुषदेहाबद्दल आणि पुरुषांनी करायच्या गोष्टींबद्दलच्या समाज म्हणून असलेल्या आपल्या अपेक्षा व्यक्तीला गुदमरवणार्‍या असतात.

देहबोली काहीशी अ-पुरुषी असलेल्या मुलाबद्दल 'तो जरा 'तसा' आहे' अशी कुत्सित प्रतिक्रिया सररास ऐकायला मिळते. 'नवर्‍यात आपल्याला 'पोसायची धमक' असलीच पाहिजे, त्याने आपल्याला अधिकाधिक भौतिक सुखे दिलीच पाहिजेत, ही त्याची नवरा म्हणून जबाबदारीच आहे', असा सूर आधुनिक म्हणवणार्‍या मुली लावतात. 'बॉम्बे टॉकीज'सारख्या तथाकथित धाडसी सिनेमातली नायिका आपल्या बायसेक्शुअल नवर्‍यावर 'कमी मुझमें नही थी, कमी तो तुममें थी' असा सरळ आरोप करून मोकळी होते आणि आपल्यासोबतच्या आधुनिक म्हणवणार्‍या कुणाच मित्रमैत्रिणीला ते खटकत नाही...

या बातमीमुळे हे सगळे बोलावेसे वाटले. बातमी आणि लेख दिल्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अतिशय ब्यालन्स्ड प्रतिक्रियेबद्दल बहुत धन्यवाद!!

देहबोली काहीशी अ-पुरुषी असलेल्या मुलाबद्दल 'तो जरा 'तसा' आहे' अशी कुत्सित प्रतिक्रिया सररास ऐकायला मिळते. 'नवर्‍यात आपल्याला 'पोसायची धमक' असलीच पाहिजे, त्याने आपल्याला अधिकाधिक भौतिक सुखे दिलीच पाहिजेत, ही त्याची नवरा म्हणून जबाबदारीच आहे', असा सूर आधुनिक म्हणवणार्‍या मुली लावतात. '

कैकदा पाहिलेय हे. या गृहीत धरण्याबद्दल कुणी फारसे कधी बोलत नाही आणि बोलणारा स्त्रीद्वेष्टा ठरवला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खुपच मुद्द्याचं बोललात आपण मेघना...ह्या खुप साध्या गोष्टी आहेत पण त्याकडे आपण/समाज तितक्या सखोल पद्धतीने बघत नाही..तुमचे कौतुक ह्या प्रतिसादाबद्दल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>'बॉम्बे टॉकीज'सारख्या तथाकथित धाडसी सिनेमातली नायिका आपल्या बायसेक्शुअल नवर्‍यावर 'कमी मुझमें नही थी, कमी तो तुममें थी' असा सरळ आरोप करून मोकळी होते आणि आपल्यासोबतच्या आधुनिक म्हणवणार्‍या कुणाच मित्रमैत्रिणीला ते खटकत नाही...<

माझ्या अंदाजानुसार नवरा क्लॉजेटेड गे असावा आणि आपल्या भावनांचा निचरा खाजगीमध्ये खुद्द आपल्याशीसुद्धा करायला घाबरत असावा. त्याच्या बायकोच्या हे लक्षात आल्यावर इतकी वर्षं तो आपल्याशी असा (कोरडा) का वागत होता याची तिला संगती लागते. खरं सांगायचं तर तिची ह्या विवाहात झालेली कुचंबणा पाहता कुणाचीही सहानुभूती तिला मिळणं साहजिक आहे, पण नवर्‍याचीही कुचंबणा चांगलीच झालेली आहे हे इथे लक्षात घ्यायला हवं. मात्र दोघांत महत्त्वाचा फरक हा, की ती स्वतःशी आणि इतरांशी खोटं वागत नाही आहे, तर तो तसा आयुष्यभर वागलेला आहे.

बाकी, मॅस्टेक्टॉमी कितपत गरजेची आहे ह्यावर मतभेद असावेत. उदा : इथून पेस्ट केलेला मजकूर -

In the past, mastectomy (the removal of the breast) was the standard treatment for nearly all breast cancers. Now, many patients with early-stage cancers can choose breast-conserving treatment, or lumpectomy followed by radiation, with or without chemotherapy./blockquote>

(मी ह्या विषयात पंडित नाही, तर गूगल करून सर्वात वरचा दुवा पाहिलेला, म्हणजे गूगलपंडित आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाकी सगळं ठीक. फक्त 'कमी' या शब्दाचा वापर खटकला. भिन्नलिंगी कल नसणं म्हणजे काहीतरी कमतरता असणं असं त्यातून ध्वनित होतं म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>भिन्नलिंगी कल नसणं म्हणजे काहीतरी कमतरता असणं असं त्यातून ध्वनित होतं म्हणून.<

मला वाटतं ते तितकं ढोबळ नाही, कारण तिला तिच्या मित्राचं समलिंगी असणं खटकत नाही. नवर्‍यानं मात्र समलिंगी असूनही तिच्याशी रत होण्याचं नाटक केलं, आणि ते त्याला झेपलं नाही अशा अर्थानं तो कमी पडला असं ते असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ठीक. बेनिफीट ऑफ डाउट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला वाटतं शब्द 'मॅस्टेक्ट्मी" असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

योग्य तो बदल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुख्य बातमीव्यतिरिक्त इतर काही रोचक माहिती -
जोलीला कर्करोगाचा असलेला वाढीव धोका ज्या BRCA-१ आणि -२ जनुकांच्या चाचणीद्वारे स्पष्ट झाला त्या चाचण्या आज अमेरिकेत महाग आहेत, कारण त्या जनुकांचं पेटंट मिरियाड जेनेटिक्स ह्या कंपनीकडे आहे. इतर कुणीही ह्या जनुकांची चाचणी मिरियाडपेक्षा स्वस्तात करू शकत नाही. ह्या पद्धतीनं जनुकं पेटंट करण्याचा मुद्दा हा अशा चाचण्या गरीब देशांत किती पोहोचू शकतील आणि एकंदरीतच जनुकाधारित वैद्यकशास्त्रातल्या नैतिक-अनैतिकतेबद्दल रोचक वाटला. ह्याबद्दल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात लढा चालू आहे असंही दिसतंय.
(गूगलपंडिताचा स्रोत : http://www.genomeweb.com//node/1229836 आणि http://arstechnica.com/tech-policy/2013/04/will-the-supreme-court-end-hu...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विषयावर थोडं इतरही वाचता येईल. रोचक तर निश्चित आहे. माझ्यासारख्या शाश्वत शंकेखोरासाठी निखळ रोचक नसून, ही भानगड आहे.
(वर चिंतू, रोचना यांनी दिलेले दुवेही रोचक आहेत. येथे देत असलेला दुसरा दुवा थोडा अधिक पुढे जाणारा आहे.)
दुवा १
दुवा २
परवा हा लेख वाचल्यावर शंका आली होती. कारण या शस्त्रक्रियेनंतर अँजेलिना सपाट छातीची झाली आहे असे दिसत नव्हते. त्यामुळं, निर्णयात खरोखर समाजासाठीचे धाडस आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता. वैयक्तिक धाडस मान्य होते. या दोन्हीमध्ये चुका असू शकतील म्हणून काही बोललो नाही. काल 'हिंदू' वाचला आणि त्यातील गोष्टी अधिक स्पष्ट करणाऱ्या वाटल्या. त्या तुलनेत येथे या विषयांवर वाहिन्यांवर वगैरे झालेल्या चर्चेचे तपशील समजले. त्यात क्वचितच या पर्यायांचा विचार झाल्याचे समजले. मग शंका बळकट होत गेली. आज आता हे दुसऱ्या दुव्यातील लेखन वाचले. मजा वाटली.
तिचा निर्णय धाडसी* आहे, असे म्हणता येते. पण हे असे इतर संदर्भ पाहिले तर त्या धाडसाचं मूल्य धाडकन खाली येतं हेही खरं. एकूण दिसतं तितकं सारं काही सरळ नसावं.
*निदान वैयक्तिकस्तरावर तरी नक्कीच धाडसी. कारण बाह्यदृष्ट्या, छातीचा उभार हा स्त्री देहाचा एक भाग मानला तर, या शस्त्रक्रियेनंतरही तो दिसणार आहे, असे काहीसे मला वाटते आहे),

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या शरीराचा स्त्रीत्वनिदर्शक भाग हा खरोखर स्वतःच्या शरीराचा स्वाभाविक भाग असणे याच्याशीच स्त्रीच्या अंतःस्थ भावना निगडीत असणार. तो भाग सिलिकॉन आणि अन्य फिलर्सनी भरला आणि उभार आणला तरी बाह्य दर्शनच मेंटेन होऊ शकते. तो अ‍ॅस्थेटिक्सचा भाग म्हणून योग्यच आहे. निर्णयाचा दृश्य साईड इफेक्ट टाळण्याचा तो प्रयत्न आहे, कारण तो उपाय शक्य आहे. याचा तिच्या मानसिक हानीशी किंवा तिच्या तथाकथित धाडसाशी (??) (पक्षी स्वतःचे "ओरिजिनल स्तन" काढणे) संबंध नाही. मुळात हे धाडस आहे की सततच्या चिंतेवर केलेली मात आहे हे ठरवावे लागेल. ८७% कॅन्सर रिस्क असताना आणि त्यावरचा उपाय परवडत असताना तो करणे याला धाडस म्हणण्याऐवजी विचारी निर्णय म्हणता येईल.

पण मुख्य मुद्दा असा की स्तन काढून ती जागा व्हिजिबली सपाट दिसेल असा ऑप्शन घेतला तरच ते धाडस किंवा सिग्निफिकंट निर्णय असं नव्हे. मनातून स्तन गमावल्याचा जो काही इफेक्ट व्हायचा तो झालाच असणार.

पिळदार दंड आणि दाढी मिशी हे उदा. पुरुषत्वाचे निदर्शक मानले तर.. आणि एखाद्या उपचाराने पुरुषाचे आधी अस्तित्वात असलेले हे दोन गुणविशेष नष्ट होणार असतील तर.. उपचारानंतर हुबेहूब दिसणारी खोटी दाढी चिकटवून आणि पिळदार आकाराचे प्लॅस्टिक साचे शर्टाच्या बाह्यांमधे बसवून पुरुषाला "ते" मूळचे अंतस्थ फीलिंग मिळणार नाही. त्यामुळे उपचार घेण्याच्या त्याच्या निर्णयातले धाडस, चातुर्य, शहाणपणा,जे काही असेल ते कमी होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हो.. धाडस हा शब्द तिच्या शस्त्रक्रियेच्या निर्णयाबाबत नसून हे सर्व पब्लिकली डिस्कस करण्याविषयी आहे असं असेल तर मग ते योग्य म्हणता येईल.

तरी त्यातही एक उपशंका येतेच की ही बातमी काहीही केलं तरी पब्लिकसमोर येणारच.. आणि जितकी लपवाल तितकी ती आणखी वेड्यावाकड्या तर्कवितर्कांसह येणार.. जर्नालिस्ट मिळेल त्या अँगलने फोटो काढून त्यावर टिप्पण्या आणि अंदाज करणार.. सूत्रांचे हवाले देणार. त्यापेक्षा आपणच जातीने हा निर्णय योग्य वेळेत आणि योग्य शब्दात लोकांसमोर मांडावा असा विचारही केलेला असू शकतो. या एका मुलाखतीपोटी पूर्ण सर्जरीचा खर्चही निघून आला असू शकतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक गोष्टी गृहित धरून (मीच) केलेल्या लेखनाचा परिणाम. असो.
अँजेलिनाने संभाव्य ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सरवर उपाय केला आहे, हे खरे आहे; पण या लेखविषयाची (या म्हणजे, 'न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये आलेल्या) व्याप्ती तेवढी मर्यादित नाही. एरवी 'उपाय केला' इथेच हा विषय संपतो. पण हा लेख लिहून उपायाची ढोलकी वाजवावी लागते आहे याचा अर्थ या उपायाचे वेगळे महत्त्व आहे. त्या महत्त्वाचा संदर्भ थेट स्त्रीशरीराशी निगडीत आहे, आणि त्या दृष्टीने धाडसाची दोन कारणे मला दिसली. एक वैयक्तिक. दुसरे सार्वजनिक. सार्वजनिकासंदर्भात 'दृष्य परिणाम' हा भाग कळीचा निर्णायक आहे हे स्पष्ट आहे. सार्वजनिकासंदर्भात वैयक्तिक स्तरावर 'उपाय केला' हे जाहीर केलेले नसेल तर त्या उपायाचा दृष्य परिणाम काहीही वेगळा रहात नसल्याने त्या उपायाचेही वेगळे महत्त्व रहात नाही. शिल्लक राहिलेला भाग वैयक्तिक कारणाचा. म्हणजेच, तुम्ही म्हणता त्या अंतस्थ भावनांचा. त्यासंदर्भात तिचे धाडस मी आधीच मान्य केले आहे.
वैयक्तिक स्तरावरचे धाडस मान्य केल्यानंतर ढोलकी वाजवण्याचा मुद्दा शिल्लक राहतो. मी ढोलकी असे म्हणतो आहे, कारण त्या लेखात ढोलकी वाजवणेच घडलेले आहे. 'मला ब्रेस्ट कॅन्सरचा किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा धोका होता. त्यावर मी मॅस्टेक्टमीचा उपचार केला', अशी बातमी नाही ती. तिथं आहे तो पवित्रा. हाच उपचार कसा महत्त्वाचा हे अंडरप्ले करत सांगण्याचा प्रयत्न आहे. हा उपचार करण्याची 'निवड' मी कशी ज्ञानपूर्णतेने केली हे सांगण्याचा, तेही अंडरप्ले करत, प्रयत्न तिथं केला आहे. लेखात किमान तीन वाक्ये अशी सूचक आहेत की तिथं अँजेलिना आपल्या निर्णयाचा प्रभावच स्त्रियांवर बिंबवण्याचा प्रयत्न करते आहे, आणि ते करताना धूर्तपणे 'निवड' हा मुद्दा पुढे आणते आहे. निवडीचा मुद्दा पुढे आणायचा असेल तर त्यासाठीची संदर्भचौकट तिने पूर्ण दिली पाहिजे, त्यात प्रस्तुत जीनबाबतची कोर्टातली केस, त्याचा पेटंटशी असलेला संबंध या बाबी खुल्या केल्या पाहिजेत. ते न करता ती ढोलकी वाजवते आहे, त्यामुळे त्याविषयीचा मुद्दा वाद्यच राहतो.
हा लेख लेख असल्याने एरवी बातमी फुटली असती वगैरे मुद्दे येथे या चर्चेसंदर्भात अवांतर ठरतात. तशीही, ही बातमी फुटली का नाही याचे कोडेच आहे.
तिने केलेला उपाय हा निखळ वैयक्तिक उपाय असेल तर त्याचे ढोल वाजवण्याचे कारण नाही. ढोल वाजवायचे असतील तर नीटच वाजवावेत, अर्धवट माहिती प्रसृत करून आणि आवाहने करून नाही. 'न्यूयॉर्क टाईम्स'ने हा मजकूर जाहीरात म्हणून प्रसिद्ध केला असता तर हा मुद्दाही आला नसता. हा मजकूर लेख म्हणून प्रसिद्ध केल्याने हा मुद्दा आला आहे. अर्थात, ग्राहक म्हणून ते(ही) नाकारण्याचा हक्क मला असतोच, या स्तरावर गेलो तर तो मुद्दादेखील शिल्लक रहात नाही असा युक्तिवाद येथे करता येतो हे मला मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता प्रतिक्रियांना प्रतिउत्तर देण्यामधे सुद्धा चालढकल किंवा उशीर अजिबात करायचा नाही असं तुमचं म्हणणं आहे का हो?

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या भावी निर्णयाबद्दलची बातमी रोचक आहे.
ई पी डब्ल्यू मध्ये आज हा लेख वाचला.

The breast, unlike the uterus (which too has been the produced via multiple discourses) has increasingly been fetishised as a potent, and complex, sign of a woman’s beauty. This has led to its being subject to intensive commercial onslaughts, from the corset industry, silicon implants, to nipple piercings. It looms large in both ideas of motherhood and in pornographic representation. Predictably, such excessive attention to particular body parts, and its place in producing ideal womanhood (reproductive and sexy) has led to a certain kind of feminist unease with women’s bodies.

Often when some feminists speak of throwing away their uteruses or breasts, they are rejecting the tyranny, and consequences, of such an overdetermined gaze on particular female organs. Yet frighteningly, the market savvy medical industry feeds off precisely such views, and produces new regimes of health care that will deliver, rather cold bloodedly, precisely such results at prohibitive costs. Not only that, it also produces an apparently apolitical “scientific” rationale for its marketing strategy.

कॉलिफॉर्नियात माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिंणीला स्तन कॅन्सर झाल्यावर शस्त्रक्रियेने स्तन काढून टाकण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला, आणि "पुढे काय?" म्हणून प्लास्टिक सर्जन ला ती भेटली. स्तनाच्या रीकन्स्ट्रक्शन साठी पोटाचा भाग घेऊन पोटही आत घालून देतो, २ फॉर द प्राइस ऑफ १, तू सर्वत्र पुन्हा नव्यासारखी दिसशील असं त्याने तिला सुचवलं. या साठी त्याच्याकडे ठरलेले पॅकेज होते. तिने शेवटी शस्त्रक्रियाच नकारली, पण मेडिकल संदर्भात आर्थिक फायद्या-तोट्याची, आणि स्त्री च्या सेल्फ-एस्टीम ची भाषा इतकी सहज मिसळून गेलेली पाहून ती सुन्न झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> ई पी डब्ल्यू मध्ये आज हा लेख वाचला.

मीही वाचला, पण तो इतका विस्कळीत आणि धूसर आहे की हाती काही लागलं नाही. लेखिकेला (जी. अरुणिमा) मेडिकल एस्टॅब्लिशमेंट, मीडिया इत्यादिंबद्दल काही तक्रारी आहेत इतपत कळलं, पण त्या नेमक्या कोणत्या हे नाही. मधली काही वाक्यं अशी आहेत:

Most reports [in the media] mention hitherto unheard of genes (except presumably in medical circles) and within a mere forty eight hours or so the BRCA gene has achieved a resounding degree of notoriety. The combination of math and science in this fashion, needless to say, is a noxious cocktail. And as marketing strategy, not entirely unfamiliar.

Indeed, the steady shift to technological interventions, and medical procedures involving multiple levels of assessments (“tests”) has been undergirded by what can be termed as the ‘genetic turn’ in popular scientific discourse. As someone untrained in any kind of science, medical or otherwise, it would not be my place to mount a critique of developments in the field.

आता लेखिकेला सायन्स कळत नाही यात बाकी कुणाचा काय दोष? जर जेनेटिक्स किंवा मेडिसिनमध्ये तिला गती नसेल तर या विषयांवर लिहिण्याआधी त्यांची माहिती करून घ्यावी, किंवा मग लिहूच नये. 'मला हा विषय कळत नाही, पण तुमचं हे जे काही चाललंय ते मला पसंत नाही हं' असा सूर लावण्यात काही तथ्य नाही.

आणि 'combination of math and science' यात नक्की काय वाईट आहे? शिवाय 'in this fashion' म्हणजे नक्की कशा प्रकारची फॅशन? ब्रेस्ट कॅन्सरचा अभ्यास करायचा तर जीवशास्त्र आणि संख्याशास्त्र यांतलं एक काहीतरी वापरावं, पण दोन्ही एकत्र नकोत असं म्हणायचं आहे का? आणि ह्या combination चा marketing strategy म्हणून वापर केला जातो, म्हणजे नक्की कसा?

लेखाचं नाव 'Refashioning the Breast' असं असलं तरी मध्येच लेखिका hysterectomy या वेगळ्याच विषयात शिरते, आणि तिथेही तिला या विषयाची फारशी तांत्रिक माहिती दिसत नाही. असं एक वाक्य मध्ये येतं:

Purely impressionistically speaking (and this is an area in which detailed, and reliable statistics would be very welcome) hysterectomies have been increasing at an alarming pace in this country [India].

आता hysterectomies ची संख्या वाढते आहे की नाही, आणि असेल तर ही गोष्ट चांगली की alarming, या प्रांतात purely impressionistic मतं फेकण्याला काही किंमत नाही. आणि नंतर reliable statistics कशाला हवं? जर असा डेटा कुणी दिला तर 'बाबारे, तू math आणि science चं noxious combination करतो आहेस' असा आरोप लेखिका करू शकणार नाही का?

लेखात discourse हा शब्द सहा वेळा येतो, आणि त्याच्या वापरामागे काही शिस्त दिसत नाही. एकूण 'मला नक्की काय म्हणायचं हे ठाऊक नाही, पण काही trendy cliches मध्ये मध्ये विखरून टाकले तर बहुतेक ते लोकांच्या लक्षात येणार नाही' असा विचार लेखामागे असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

म्हणूनच मी त्यातला मुख्य मुद्दा, आणि गवि यांच्या प्रतिसादाशी संबंध साधत असलेला परिच्छेद इथे दिला! Smile

सीरियसली, लेख खरंच विस्कळित आहे, पण इतका टाकाऊ ही नाही. कदाचित थोडक्यात बरेच काही सुचवायच्या घाईत बरेच काही गृहित धरले आहे. उगीच ट्रेंडी क्लीशे वापरून ट्रेंडी विषयावर लिहीले आहे हे पटत नाही. "वैद्यकीय संशोधनाचा मार्केटिंग द्वारे, एका विशिष्ट पद्धतीने प्रसार होतो, नफ्यासाठी, भय वाढवण्यासाठी, चाचण्यांचे प्रमाण वाषवण्यासाठी त्याचा विकृत वापर होतो. सामान्य माणूस म्हणून फक्त "ग्राहक" म्हणून हे ज्ञान अर्धवट आपल्यापर्यंत पोहोचतं. आपल्या तब्बेतीबद्दल जाणीवपूर्वक निर्णय घेता येत नाहीत. स्त्रियांच्या शरिरांतील ठराविक अवयवांच्या सांस्कृतिक घडणीमुळे, प्रतिमेमुळे हे प्रश्न स्त्रियांना आग्रहाने लागू आहेत, मग ते स्तन असो वा गर्भाशय" असा काही लेखाचा मूळ मुद्दा आहे.

हिस्टरेक्टमींचे प्रमाण वाढीवर आहे हे अनेक वर्तमान पत्रांच्या बातम्यांतून नेहमी ऐकू येते - त्याचा सिस्टेमॅटिक अभ्यास व्हावा असे म्हणणे, आणि त्याच वेळेस या सिस्टेम बद्दल, आणि त्याच्या सरसकटीकरणाबद्दल, मार्केटिंग मध्ये statistics च्या ठराविक वापराबद्दल* काही महत्त्वाचे प्रश्न उद्भवतात, त्यांबद्दल सतर्क राहिले पाहिजे, हे सांगण्यात काय वावगे आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चाविषय, प्रस्तावाची मांडणी आणि त्यावरची चर्चा सगळंच आवडलं. सर्वसाधारण माध्यमांमध्ये जेव्हा एवढी गंभीर पण रंजक चर्चा होईल तो सुदिन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'Pink Lotus Breast Center' ची जाहिरात आहे का ही?

थोर चर्चेत एक उथळ वाटणारा प्रतिसाद.पण आपल्याकडे अशी (प्रिव्हेंटीव्ह)शस्त्रक्रिया करून घेणे (आणि ती झाल्याच्या खुणा यशस्वीपणे लपवणे)किती स्त्रियांच्या आवाक्यात आहे? जोलीला काय? या शस्त्रक्रियेची जाहिरात करायला त्या सेंटरने ब्रँड अँबॅसेडर म्हणून पैसेही देऊ केले असतील. ("My own regimen will be posted in due course on the Web site of the Pink Lotus Breast Center ")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>पण आपल्याकडे अशी (प्रिव्हेंटीव्ह)शस्त्रक्रिया करून घेणे (आणि ती झाल्याच्या खुणा यशस्वीपणे लपवणे)किती स्त्रियांच्या आवाक्यात आहे? <<<

"आपल्याकडे" म्हणजे कुणाकडे ? मी धाग्यामधे साडेसहाशे कोटींच्या जगामधे अनेकांना हा कॅन्सर होत असल्याचे - आणि त्या दृष्टीने जोलीची केस विशेष नसल्याचे नमूद केले आहे याचा येथे पुनरुच्चार करतो. आता जगातल्या बहुसंख्य लोकांना तुम्ही उल्लेखलेल्या गोष्टी परवडणार नाहीत हेही यातून सूचित केलेले आहेच. पण धागा दारिद्र्यरेषेबद्दलचा वगैरे आहे असे मला वाटत नाही. असो.

>>> जोलीला काय? या शस्त्रक्रियेची जाहिरात करायला त्या सेंटरने ब्रँड अँबॅसेडर म्हणून पैसेही देऊ केले असतील. ("My own regimen will be posted in due course on the Web site of the Pink Lotus Breast Center ") <<<

हेही शक्य आहेच. मी तर म्हणतो ८७ टक्के शक्यता असणे हेही थोतांड असणे शक्य आहेच. पण तसे तर काहीही शक्य आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0