सुलभतेने संस्कृत शिकण्यासाठी (संदर्भ श्री. कोल्हटकर यांच्या गूगल-स्तवनावरील सारिका यांची प्रतिक्रिया)

श्री. अरविंद कोल्हटकरांच्या 'गूगल-स्तवना'च्या पोस्टवर सारिका यांनी दिलेली प्रतिक्रिया वाचून हे आठवलं.
http://www.learnsanskrit.org/

याशिवाय मुंबई-ठाणे-अंबरनाथ-पुणे-पिंपरी-चिंचवड-सातारा-सांगली-कोल्हापूर-नाशिक-औरंगाबाद-परभणी-लातूर-बार्शी-उस्मानाबाद-संगमनेर-रत्नागिरी-खेड-चिपळूण-गोवा (काही निवडक ठिकाणे) या शहरांत दशदिनात्मक-संस्कृत-संभाषण-शिबिरे भरवण्यात येतात. प्राथमिक स्तरावर सुलभ संस्कृत संभाषण व लेखन-वाचन-व्याकरण शिकण्यासाठी हे संभाषणवर्ग हा एक उत्तम पर्याय आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी मला व्य.नि. पाठवण्यास हरक़त नाही. उचित व्यक्तींशी सम्पर्क करून दिला जाईल.

शुभेच्छा!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही साईट नक्की पाहीन. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्कृत संभाषणाची शिबिरे संपूर्ण दिवसाची असतात की फक्त संघ्याकाळी वगैरे.. इच्छा असूनही इतके दिवस सुट्टी घेणे जमणार नाही असे वाटते किंवा खरंतर, इतकी सुट्टी घेऊन संस्कृत शिकण्याची ओढ नाही असेही म्हणता येईल बहुदा, मात्र सहज जमले तर संस्कृत संभाषण करायला/शिकायला नक्की आवडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या माहितीप्रमाणे साधारण या वर्गांत शिकवणारी मंडळीसुद्धा नोकरी-धंदा सांभाळून हे करत असतात. त्यामुळे मला वाटतं, प्रशिक्षणार्थींच्या सोयीनुसार वेळेचे नियोजन होणे शक्य असावे. बहुधा संध्याकाळी हे वर्ग भरत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

संस्कृत संभाषण शिकवण्याचा एक कार्यक्रम(सीरीज) डी डी भारती या वाहिनीवर २-३ वर्षां पूर्वी पाहिल्याचं आठतय. या वहिनीवर बरेच कार्यक्रम रिपीट होत असतात, त्यात हा कार्यक्रम अजूनही दाखवत असल्यास कुणाला उपयोगी येऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0