कला आणि कृत्रिम परिस्थिती

कलाकाराच्या सभोवती घडणार्‍या घटनांचे, परिस्थितीचे प्रतिबिंब त्याच्या कलाकृतीत पडत असते. परंतू काहि कलाकार आपल्या कलाकृतीची निर्मिती काहिशा वेगळ्या पद्धतीनेही करतात. आपल्या कल्पनेतील कलाकृतीला आवश्यक अश्या वातावरणाची, परिस्थितीची, घटनांची निर्मिती सहज आपोआप होण्यासारखी नसेल तर तशी परिस्थिती, वातावरण वगैरे ते स्वतःच निर्माण करतात.

असे वातावरण तयार करून त्यात आपली कला सादर करणे आता विविध कलाप्रकारांमध्ये स्थिरावत चालले आहे. चित्रकाराने खास मॉडेल्स बसवून चित्रे काढणे, एखादी संरचना करून त्याचे चित्र रेखाटणे, अभिनेत्याने एखाद्या भुमिकेसाठी स्वतःच्या चेहर्‍याला रंग लाऊन बदल करणे किंवा त्या-त्या प्रसंगाला आवश्यक ते 'नेपथ्य' रचून त्याच्या आधारे/सोबत भुमिका वठवणे त्या मानाने बरेच रुळलेले.

छायाचित्रणातही विविध मॉडेल्सचा वापर सर्रास होताना दिसतो. मात्र आपल्याला हवी तशी छायाचित्रे मिळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येतात. या बातमीत बघा. इथे या छायाचित्रकाराला दु:खी किंवा विव्हळ किंवा रडत्या मुलांची छायाचित्रे काढायची होती. त्यासाठी त्याने त्या मुलांना लॉलीपॉप दिले व लगेच हातातून काढून घेतले. मोठ्यांसाठी जरी ते फक्त 'लॉलिपॉप' असले तरी त्या मुलांसाठी हे दु:ख/अपमान असह्य होऊन ती टाहो फोडत. मग या छायाचित्रकाराला हवी तशी पोज मिळाल्यावर त्यांची चित्रे काढली जात.

तुम्हाला काय वाटते? समोरच्या व्यक्तींना मॉडेल मानलं की त्यांच्यासोबत इतर कोणत्याही 'ऑबजेक्ट' प्रमाणे त्या मॉडेलचा विचार न करता कलाकाराच्या मर्जीप्रमाणे वर्तणूक योग्य वाटते का? वरील उदाहरणात मुलांना असे रडवून फोटो घेणे योग्य वाटते का? लहान मुलांचा मॉडेल म्हणून वापर करताना अधिक मानवीय दृष्टिकोन बाळगला पाहिजे का? अधिक व्यापक विचार करायचा तर विविध कलांचा पुरक वापर करणे वेगळे आणि अश्या 'कृत्रिम' व 'सिमीत' अवकाशात आपल्या कलेचा अविष्कार करण्याने कलाकाराच्या अभिव्यक्तीला मर्यादा घालून घेणे तुम्हाला योग्य/पोषक वाटते का?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फोटो काढून होताच लॉलीपॉप परत दिले असण्याची शक्यता आहे.

या विषयाय बाकी काही मत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रस्तुत छायाचित्रं काढताना छायाचित्रकारानं नक्की काय केलं ते माहीत नाही, पण कुणाच्या तरी वेदनेची छायाचित्रं अशी गुळगुळीत चकचकीत करून ती दाखवणं म्हणजे वेदनेचं पॉर्न करणं आहे असं वाटतं. त्या निमित्तानं केव्हिन कार्टर आणि इथिओपिआतल्या दुष्काळातल्या त्याच्या ह्या छायाचित्राची आठवण झाली. तेव्हा मूल गिधाडानं खाल्लं असतं की नसतं, छायाचित्रकारानं तिथून निघून जाणं योग्य की अयोग्य ह्यावरून वाद झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वेदनेच्या पॉर्नबद्दल सहमत. बाकी या फटूच्या फटूग्राफरने आत्महत्या केली असं वाचलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याच घटनेनंतर खंतावून या छायाचित्रकाराचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं जातं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण कुणाच्या तरी वेदनेची छायाचित्रं अशी गुळगुळीत चकचकीत करून ती दाखवणं म्हणजे वेदनेचं पॉर्न करणं आहे असं वाटतं.

त्या फोटोंमधली भगभगीत प्रकाशयोजना पाहिली तर रेखीव पण बटबटीत पॉर्नशी जास्तच साम्य जाणवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून आठवलं, बॅगबँग क्लब हा सिनेमा या छायाचित्रकाराच्या आणि त्याच्या इतर मित्रांच्या अनुभवावर आधारित आहे. त्यात या 'योग्य', 'अयोग्य' बद्दल अधिक भाष्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही छायाचित्रे एकप्रकारे शोषणच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे, पण छायाचित्राने उद्दात हेतू साध्य झाल्यास शोषणाबद्दलची तक्रार सोम्य होण्याची शक्यता आहे.

खालील छायाचित्रामुळे(फान थी किम फुक) अमेरीकेचा(जगाचा?) व्हिएतनाम युद्धाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलला होता असे मानले जाते.

संपादकः सर्व ब्राऊझर्सवर हे चित्र दिसण्यासाठी width="" height="" या टॅग मध्ये योग्य संख्या द्यावी किंवा काढून टाकावेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर छायाचित्रावरून आपले वाङ्मयवृत्तच्या ऑगस्ट २०११ च्या अंकाची आठवण झाली.
अत्यंत वाचनीय अंक आहे. इथे वाचता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला हे चित्र तरी शोषणाचं उदाहरण वाटत नाही. युद्धाचं विदारक चित्रण करणं ही वृत्तपत्र-छायाचित्रणाची जबाबदारी आहे. ते काम इथे प्रभावीपणे झालेलं आहे. त्या छायाचित्रकाराने किंवा त्याच्या संस्थेनेच हे युद्ध सुरू केलं असतं तर गोष्ट वेगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला मुळ लेखातील कृत्रिम छायाचित्रे 'शोषण' असल्याचे वाटते, मी दिलेले उदाहरण ही बहूदा वास्तवाचीच नोंद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>याच घटनेनंतर खंतावून या छायाचित्रकाराचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं जातं<<

नक्की कारण सांगता येत नाही. इथे म्हटल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतला वंशवादी हिंसाचार, मित्राचा मृत्यू असे अनेक घटक त्यामागे असू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वरील उदाहरणात मुलांना असे रडवून फोटो घेणे योग्य वाटते का? लहान मुलांचा मॉडेल म्हणून वापर करताना अधिक मानवीय दृष्टिकोन बाळगला पाहिजे का?

मुलांना रडवून फोटो घेणे अयोग्य वाटते. लहान मुलांची दु:खे आणि अपमान आपल्याला लहान वाटली तरी त्यांच्याकरता तीव्र आणि जीवनव्यापीच असतात असा कयास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलांना रडवून फोटो घेणे अयोग्य वाटते.

+१.

तूर्तास इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलांचे रडणे हे माफक प्रमाणात असेल तर त्यांच्या आरोग्यासाठी हितकारकच असते. त्यामुळे असे थोड्या काळासाठी त्यांना रडवणे यात काही नुकसान होते, असे वाटत नाही. "फोटो काढून होताच लॉलीपॉप परत देऊन मुलांचे बदललेले भाव सुद्धा जर टिपून तीही छायाचित्रे बरोबरच दिली असती, तर आणखी चांगला प्रयोग झाला असता.
हसण्याच्या अगदी उलट प्रकारचे श्वसन रडण्यात घडून येत असते.( खालील प्रमाणे प्रयोग स्वतः करून बघा)
हसण्यातील श्वसनः
हिसक्या हिसक्याने, कमी कालावधीचे रेचक (श्वास बाहेत टाकणे), आणि दीर्घ पूरक. (कपालभाति प्राणायामाशी साम्य)
रडण्यातील श्वसनः
हिसक्या हिसक्याने, कमी कालावधीचे पूरक(हुंदके, मुसमुसणे), आणि दीर्घ रेचक (मुळमुळणे).
या दोन्ही प्रकारात फुफ्फुसे आणि उदरपटल यांना उत्तम व्यायाम होतो.

या दोन टोकाच्या भावनांशी निगडित श्वसन-प्रकारांच्या मधे अन्य सर्व भावनांशी निगडित श्वसन त्या त्या वेळी आपोआप घडून येत असते.

नाटक, सिनेमा इ. बघताना विविध रस वा भावनांशी एकरूप होण्यातून अनेक प्रकारचे श्वसन घडून येत असते. उदा.भिती, उत्कंठा, इ. चे वेळी श्वास रोखला जाऊन कुंभक होतो, तर त्यातून सुटका होताच जोरात श्वास बाहेर टाकला जातो.
या सर्वातून एक प्रकारचे समाधान व आनंद यांचा लाभ होतो.

आपल्या प्रत्येक मनोवस्थेप्रमाणे श्वसन घडीघडी बदलत असते. त्याकडे लक्ष देणे, हा एक साधनेचा प्रकार. कदाचित यालाच उद्देशून समर्थांनी "सदा स्वरूपानुसंधान, हे मुख्य साधूचे लक्षण, जनी असोन आपण, जनावेगळा" असे म्हटले असावे.

श्वसनावर ताबा मिळवता आला, की भावनांवरही ताबा करता येतो, हे सर्वविदित आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"फोटो काढून होताच लॉलीपॉप परत देऊन मुलांचे बदललेले भाव सुद्धा जर टिपून तीही छायाचित्रे बरोबरच दिली असती, तर आणखी चांगला प्रयोग झाला असता.

उंदरामांजराचा खेळ. अजून काय?

मुलांचे रडणे हे माफक प्रमाणात असेल तर त्यांच्या आरोग्यासाठी हितकारकच असते. त्यामुळे असे थोड्या काळासाठी त्यांना रडवणे यात काही नुकसान होते, असे वाटत नाही.

एका सुंदर जर्मन सुभाषिताची या निमित्ताने आठवण झाली. पहा विचार करून.

किंवा, याच न्यायाने विचार करावयाचा झाला तर, एखाद्या महाभागाने स्वहस्त आणि आपला कपोल एवढ्या साहित्यानिशी न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाचे प्रात्यक्षिक करावयाचे ठरवले, तर त्यातून परिणामी आपल्या मुखसन्निध परिसराचे रुधिराभिसरण सुधारते, अत एव ते आपल्या आरोग्यास हितावहच आहे, असाही दावा प्रस्तुत महाभाग करू शकतो. परंतु म्हणून तो दावा आपणांस स्वीकारार्ह ठरेल काय?

शिवाय, अशा काही प्रात्यक्षिकात पूर्ण माहितीनिशी स्वतःस अंतर्भूत करण्याचा अथवा अशा प्रात्यक्षिकातून स्वतःस वगळण्याचा, 'इन्फॉर्म्ड कन्सेंट'चा अधिकार आपणांस प्राप्त असतोच, आणि तो आपण बजावू शकताच. प्रस्तुत लहान मुलांस तशी काही तरतूद उपलब्ध असल्याचे जाणवले नाही.

सारांश, मूळ प्रयोग छळवादी-विकृत (स्याडिष्टिक) आहेच; त्यावरील मखलाशी ही त्याहून तिडीकजनक वाटली. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्द्याशी सहमत.. म्हणजे, माफक प्रमाणात मुलांनी रडणे हे त्यांच्या आरोग्यासाठी, श्वसनासाठी वगैरे उपकारक आहे असं मान्य केलं तरी तितपत माफक (किंवा खरं तर माफकपेक्षा बरेच जास्त) ती पोरे स्वतःचीस्वतः, आपापतः रडतच असतात.

तेव्हा मोठ्यांनी हे बालहितकारक, आरोग्यवर्धक, देशोद्धारक कर्म करण्यासाठी सरसावण्याची, आणि मग लहान पोरांची ती श्वसनसुधारक क्रिया सुरु झाल्यावर जाताजाता फोटोचे कामही उरकण्याची आवश्यकता नाही.

धन्यवाद..:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यासाठी त्याने त्या मुलांना लॉलीपॉप दिले >> 'त्याने' नाही 'तिने' Smile

फोटो आवडले नाहीत. वेदना, दुःख वगैरेपेक्षा ती मुलं तंत्रम फेकणारी जास्त वाटतायत.
लॉलीपॉप काढुन घेणं फार आक्षेपार्ह वाटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेदना, दुःख वगैरेपेक्षा ती मुलं तंत्रम फेकणारी जास्त वाटतायत.

आपणांस एखाद्या गोष्टीची जबरदस्त आशा लावून ती गोष्ट आयत्या वेळी जर कोणी दुष्टपणे हिरावून घेतली अथवा नाकारली, तर आपणही फेकाल; काळजी नसावी.

(मी तर फेकेनच फेकेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे या छायाचित्रकाराला दु:खी किंवा विव्हळ किंवा रडत्या मुलांची छायाचित्रे काढायची होती. त्यासाठी त्याने त्या मुलांना लॉलीपॉप दिले व लगेच हातातून काढून घेतले. मोठ्यांसाठी जरी ते फक्त 'लॉलिपॉप' असले तरी त्या मुलांसाठी हे दु:ख/अपमान असह्य होऊन ती टाहो फोडत. मग या छायाचित्रकाराला हवी तशी पोज मिळाल्यावर त्यांची चित्रे काढली जात.

तुम्हाला काय वाटते?

फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्याच दूरच्या नात्यातल्या एका थोर महाभागिनीने एकदा सौदी किंवा तत्सम देशातून भारतात परत येताना, 'तेथे स्वस्तात मिळते म्हणून' सोने आणले होते, आणि त्यावर भारतात कष्टमकर्तव्ये पडू नयेत, म्हणून मुंबई विमानतळावर कष्टमवाल्यांच्या लायनीत आपला नंबर लागल्यावर, स्वतःच्या कडेवरील स्वतःच्याच पोराच्या ढुंगणास मोठ्या शिताफीने नि अत्यंत बेमालूमपणे जोरदार चिमटा काढून त्यास रडविले होते, आणि पोराने पसरलेल्या भोकाडामुळे अधिक स्त्रीदाक्षिण्यापोटी द्रवून जाऊन कष्टमवाल्यांनी तिची तपासणी न करता तीस तसेच सोडून दिले होते, आणि अशा तर्‍हेने आपले कष्टमकर्तव्य तिने टाळले होते. पुढे त्यानंतर ती कथा तिने 'आपल्या हुशारीची चुणूक' म्हणून समस्त विस्तृत परिवारातील जो कोणी सापडेल त्यास ऐकविली होती, ती ऐकून त्या वेळेस जे काही वाटले होते, तेच वाटते.

(अवांतरः मुंबईच्या मुली बाकी 'स्मार्ट', हं!)

वरील उदाहरणात मुलांना असे रडवून फोटो घेणे योग्य वाटते का?

तसेही योग्य वाटत नाहीच, विकृत / स्याडिष्टिकच वाटते, पण...

लहान मुलांचा मॉडेल म्हणून वापर करताना अधिक मानवीय दृष्टिकोन बाळगला पाहिजे का?

...विशेषतः आजच्या 'नो अ‍ॅनिमल्स वेअर हार्म्ड इन द मेकिंग ऑफ धिस मूव्ही'च्या जमान्यात ते अधिकच दुर्दैवी वाटते. (हो. अर्थातच बाळगला पाहिजे.)

अधिक व्यापक विचार करायचा तर विविध कलांचा पुरक वापर करणे वेगळे आणि अश्या 'कृत्रिम' व 'सिमीत' अवकाशात आपल्या कलेचा अविष्कार करण्याने कलाकाराच्या अभिव्यक्तीला मर्यादा घालून घेणे तुम्हाला योग्य/पोषक वाटते का?

प्रतिप्रश्न:

एका जमान्यात, जिवंत फुलपाखरावर वितळलेल्या काचेचा रस ओतून त्या काचरसात त्या फुलपाखरास अडकवून त्याची पेपरवेटे बनविणे, हीदेखील 'कलाकृती' समजली जात असल्याबद्दल, आणि अशी पेपरवेटे ही खपत असल्याबद्दल, नव्हे 'कलेक्टर्स आयटम' बनत असल्याबद्दलही वाचलेले आहे.

या प्रकारातून निर्माण होणारे तयार उत्पादन हे कदाचित निसर्गतःच सौंदर्यपूर्ण नि कलात्मक होत असेलही, परंतु अशा बाबतीत त्या कलाकाराने स्वतःच्या अभिव्यक्तीस मर्यादा घालून घेणे (अथवा, त्याने स्वखुशीने ती तशी घालून घेतली नसता, कायद्याच्या जबरदस्तीने त्यावर ती लादली जाणे) हे आपणांस योग्य/पोषक वाटते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुलपाखरांच्या ठशावरुन, वरील काही दुर्दैवी फोटोंवरुन आठवले- सुरवातीच्या काळात,शवागारात काम करतेवेळी अ‍ॅलेक्स ग्रे या चित्रकाराने काही प्रयोग केले होते पैकी एक होता "मृत स्त्रीच्या कानात तप्त शीशाचा रस ओतून एक "लॅबिरिंथ" बनविणे. पण या घटनेचा या संवेदनशील कलाकारावर इतका खोल परीणाम झाला की एका रात्री त्याला भास झाला की तीच मृत स्त्री त्याच्या कानात (इनर इयर) जाब विचारत आहे. अ‍ॅलेक्सकरता तो अतोनात डिस्टर्बींग भास होता.
या कलाकाराबद्दल अधिक वाचाल तर - मृत्यूविषयक अनुभव, एल एस डी, ट्रान्स आदि गोष्टींचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर आढळतो.
पण सांगायचा मुद्दा हाच की कलाकार जास्त संवेदनशील/क्षम असतात अन त्यांनी उगाच नसत्या भानगडीत पडू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा "ग्रे" चित्रकार होता की अनॉटॉमीवाला ग्रे? की चित्रकारच पुढे अनॉटॉमीवाला झाला?

जर तो अनॉटॉमीवाला नसेल तर मृत महिलेच्या कानात शिशाचा रस ओतून लॅबरिंथ कशापायी बनवले? की ते एक चित्र होते? की हा चित्रकार असण्यासोबत शिल्पकारही होता? अशा वेळी ही मोल्डेड वस्तू झाली. कलाकृती नव्हे.

इत्यादि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....ही मोल्डेड वस्तू झाली. कलाकृती नव्हे....
अहो, हल्ली काहीतरी 'हटके' का काय म्हणतात, तसं काहीतरी करणं, म्हणजेच खरी कला, असं मानलं जातंय, मग ते मुलांना रडवून फोटो काढणं असो, मृताच्या कानात शिसं टाकून कास्टिंग असो, वा संपूर्ण कचरा भरलेला ट्रक आर्ट ग्यालरीत आणून उभा करणं असो....
असं काहीतरी केल्याशिवाय ते थोर्थोर समिक्षक वगैरे त्या करणार्‍यांना कलावंत वगैरे मानतच नाहीत ना, काय करणार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, हल्ली काहीतरी 'हटके' का काय म्हणतात, तसं काहीतरी करणं, म्हणजेच खरी कला, असं मानलं जातंय,

अनेकदा असंच वाटतं खरं.. पण मग फक्त हे हल्ली होतंय का हे असंच चालु आहे? काहितरी वेगळं घडल्याशिवाय प्रगती, बदल कसा होणार? वगैरे प्रश्नही डोकावतात.

वरील उद्धृत मतामद्दल याबद्दलही येथील जाणकारांची, वाचकांची मते वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो, हल्ली काहीतरी 'हटके' का काय म्हणतात, तसं काहीतरी करणं, म्हणजेच खरी कला

तो ग्रे आणि त्याचे शिसे-कान फेम लॅबरिंथ हे हल्लीचे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय फार पूर्वीचे नक्कीच नाही. Born: November 29, 1953 -ग्रे प्रायोगिक चित्रकार असून त्याची चित्रे सायकेडेलिक आर्ट या प्रकारात मोडतात. (http://en.wikipedia.org/wiki/Alex_Grey)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॅबरिंथ म्हंजे ते चक्रव्युहासारखे / "माऊला खाऊ पर्यंत पोचवायचा रस्ता शोधा पाहु" छाप चित्र ना?
मग ते कानात शिसे ओतून कसे बरे तयार करायचे?.. नै ही कलाकार मंडळी म्हंजे ना... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तपशील आलाच आहे तर.. तू गंमतीने म्हणत आहेस आणि प्रत्यक्षात या "ग्रे"ला कानातील आतल्या ज्या भागाला लॅबरिंथ म्हणतात त्याच्याच आकाराचे शिश्याचे मॉडेल त्याला बनवायचे होते असं समजू. तरीही मानवी टिश्यूंमधे द्रवरुप शिसे (वितळणबिंदू ३२७ अंश सेंटिग्रेड) ओतले की त्याच्या उष्णतेने मूळ अवयवाचा आकार कितपत शिल्लक राहील आणि कितपत हुबेहूब प्रतिकृती मिळेल याविषयी शंकाच आहे. एकवेळ कमी तपमानाला वितळणारे मेण (६०-७० डिग्री सेंटिग्रेड असावे) ओतले तर काही शिल्लक राहण्याची आशा.

प्रकार एकूण अघोरीच पण त्यातही लॉजिक कमी वाटले..कलाकृती तर नाहीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं त्याला मेंदूचे लॅबिरींथ करावयाचे असावे. नाहीतर तप्त रस कानतून जाऊन कान फाटेलच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आँ? मेंदूचे लॅबिरिन्थ केले तर मेंदू तरी शिल्लक कसा राहील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे मृत बाईचे = शवाचे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेंदूचे कसले लॅबिरिंथ?

हे पहा:
http://en.wikipedia.org/wiki/Inner_ear

कानाच्या आत असलेल्या विशिष्ट रचनेचा भाग लॅबिरिंथ आकाराचा असल्याने त्याला लॅबिरिंथ म्हणतात.

कानात शिसे ओतायचे म्हणजे त्याचाच आकार बनवायचा असणार. मेंदूच्या आकाराला लॅबिरिंथ म्हणता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रोत - http://votf.org/page/labyrinth-prayer-and-meditation/17173

The labyrinth at Chartres Cathedral, France, an 11-circuit design, is the most widely known to Catholics. The oldest (3,000 years or more), simplest, and most widely used labyrinth pattern in the world is the Cretan or 7-circuit labyrinth. With its 7 interconnecting paths, this pattern closely resembles the human brain and is commonly used for contemplative and healing purposes.

मी अनाहूतपणे या दिशेने विचार केला कारण मला http://en.wikipedia.org/wiki/Labyrinth अशा प्रकारचे लॅबिरींथ फक्त माहीत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा, थोडा प्रकाश पडला. लॅबिरिन्थ म्हणायचे किंवा नाही हे तूर्त बाजूला ठेवू. पण मेंदूच्या आत शिसे इ. ओतून काहीतरी बनवायचे असे मानले तरी ते वितळून आतले कसे काय शिल्लक राहील असा प्रश्न अजूनही आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मूळ लेखातील छायाचित्रे इतकी सुंदर आहेत की ती कशी काढली हा मुद्दा गौण आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरीब व शोषित लोक हा माझा कच्चा माल आहे असे म्हणणार्‍या एका इंग्रजी लेखकाची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कसेसेच वाटले. परंतु "नावडली तरी सहन करण्याच्या लायक" अशी कार्यपद्धत वाटली.

(मला चित्रे नावडायचे आणखी एक कारण असे की चित्रांतील केशभूषा, रंगभूषा वगैरे "ग्लॅमरस" केल्यासारखी वाटली, ते लहान मुलांबाबत पटले नाही.)

बहुधा नंतर लॉलिपॉप परत दिले होते. त्याचे एक तरी चित्र संकेतस्थळावर आहे : http://www.mymodernmet.com/profiles/blogs/baby-dont-cry-jill-greenberg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डस्टीन हॉपमन आणि रोबर्ट दिनेरो च्या "Wag the dog" सिनेमाची आठवण झाली. त्यात इलेक्शन दरम्यान, उमेदवाराच्या सेक्स स्कॅन्डल पासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते खोट्या युद्धाची निर्मिती करतात. मग बातम्यात, त्या युद्धाची माहिती दाखवताना, बॉम्बस्फोटांनी उध्वस्त झालेल्या जागेत, एक लहान मुलगी रडतानाचे चित्र(कम्पुटर जनरेटेड) दाखवतात. कुणीतरी तिच्या हातात एक मांजर द्या असेही सुचवतो. मग मांजराचा रंग कोणता हवा यावर चर्चा होते. (हे असं काम्पुटर जनरेटेड, स्टुडीओ निर्मित युद्ध अमेरिकन जाणकार जनतेला कसं फसवू शकतं हा विचार सिनेमाच्या निर्मात्यांनी केलेला दिसत नव्हता हे उघडंच आहे.). तर मुद्दा असा कि लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण करायला लहान मुलांचा आणि प्राण्यांचा सर्रास वापर केला जातो. पण लहान मुलांना मुद्दामहून एखाद्या फोटोसाठी रडवणे मलाही पटत नाही. आणि वरील चित्रात(व्हिएतनाम युद्ध) ती लहान मुले युद्धात पळताहेत, त्यांच्यासाठी त्या फोटोग्राफरने फोटो काढण्याव्यतिरिक्त काही केले असेल का किंवा फोटो काढून झाल्यवर त्या मरणासन्न मुलाला गिधाडापासून वाचवले असेल का अशी चुटपूट लागून राहते. असहाय, परावलंबी मुलांच्या वेदना दाखवून त्याला आर्ट म्हणणे कितपत योग्य आहे?

नोट: लॉलीपॉप देऊन काढून घेणे म्हणजे तुम्हाला फरारी गाडी फुकटात देऊन महिन्याभराने काढून घेणे(तेहि सगळ्या मित्रमंडळी-नातलगांसमोर 'माझी गाडी' म्हणून भाव खाऊन झाल्यावर!:D)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0