सौदी अरेबियातला नास्तिक

सौदी अरेबियासारख्या धर्मकर्कश देशात नास्तिक असण्याची परिणती कैद, छळ किंवा मृत्युदंडसुद्धा होऊ शकते. आणि तरीही ह्या देशात नास्तिक आहेत. अशा एका विशीतल्या नास्तिकाचा परिचय yourmiddleeast.com ह्या संकेतस्थळानं प्रकाशित केला आहे. परदेशातून पुस्तकं स्मगल करणं, इतर नास्तिकांबरोबर गुपचूप गाठीभेटी ठरवणं, शुक्रवारच्या नमाजाला न गेल्याचं लपवून ठेवणं अशा पद्धतीचं आयुष्य जगणं नास्तिकांना भाग पडतं. त्याचं तपशीलवार आणि सुन्न करणारं वर्णन ह्या मुलाखतीत आहे.
मुलाखतीचा दुवा

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

पाश्चात्य मिडीया काहि अपवादात्मक प्रसंग चवी चवीने रंगवून सांगते तसे असावे असे आधी वाटले होते. Smile
मात्र ज्या अशा अपेक्षेने लेख उघडला, तितका टोकाचा (किंवा वेदनेचे पॉर्न करणारा) वाटला नाही. बरीच नेटकी माहिती देणारा लेख/मुलाखत आहे.

भारतातही हमीद दलवाईसारख्यांची परिस्थिती पाहिली की सौदी सारख्या देशांत अश्या मुठभर लोकांना किती मन मारून जगावे लागत असेल याची कल्पना करणे अशक्य वाटते. या मुलाखतीतून थोडीतरी कल्पना येते.

लेखाच्या दुव्याबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही महिन्यांपूर्वी तेरेसा मकबेन या पूर्व-पास्टरचं बोलणं ऐकलं होतं. तिच्या शब्दांत, ती कॅथलिक कुटुंबात जन्माला आली, कॅथलिक शाळा-कॉलेज, कॅथलिक मित्रमंडळ-परिवार, जणू कॅथलिक फुग्यातच रहात असे. कॅथलिक लोकांना मदत करण्यासाठी, आधार देण्यासाठी ती चर्चमधे पास्टर बनली. हळूहळू हे काहीतरी चुकतंय, बायबल, अन्य धार्मिक साहित्यातून प्रश्नांची पुरेशी उत्तरं मिळत नाहीत असं लक्षात आलं. मग हळूच अज्ञेयवादी, नास्तिक प्रकारची पुस्तकं वाचायला लागली. हे सगळं चोरून; अमेरिकेत नास्तिक असण्यासाठी कायदा आडकाठी करत नाही. पण एकतर आधी तिला स्वतःशीच हे मान्य करायचं नव्हतं आणि त्यापुढे नवरा-मुलगा काय म्हणतील याचीही चिंता. पण वाचनातून लक्षात आलं की आपण नास्तिकच आहोत. इंटरनेटवर शोधाशोध केली तर पूर्वाश्रमीचे चर्चचे क्लेरिक्स/पंडे आणि आता नास्तिक झाले आहेत असे काही लोक तिला सापडले. मग त्यांच्याशी चर्चा, गप्पा, अनुभव सांगणं हे सुरू झालं.

वॉशिंग्टन डीसीत नास्तिकांचा मोठा मेळावा झाला तिथे ती गेली. तोपर्यंत चर्चमधून अनिश्चित काळासाठी, बिनपगारी रजा घेतली होती. त्या अधिवेशनात ती तिथे असण्याचा बराच गाजावाजा झाला. तिने चर्चला राजीनामा पाठवला. चर्चने जसं काही ही यांच्याशी संबंधितच नव्हती अशी भूमिका घेतली. तिच्या चर्चमधल्या दोन स्त्रियांनी हिच्याशी बोलून हिचं मत बदलण्याचा असफल प्रयत्न केला. पण त्यानंतर आधीचे सगळे सामाजिक संबंध तुटले. तिचा नवरा धार्मिक आहे, पण हिचं नास्तिक असणं त्याने मान्य केलं आहे. तिचा मुलगा सुट्टी घेऊन जेव्हा घरी आला तेव्हा हिने हळूच त्याला स्वतःच्या मतपरिवर्तनाबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "मी कधीची वाट पहात होतो तू मला हे सांगशील याची. तू धार्मिक असणं कठीण आहे असं मला आधीपासून वाटत होतं. माझाही धर्मावर विश्वास नाही."

देवाधर्मावर विश्वास नसल्याचं जाहीर केल्यावर तिला तिच्या परिवाराकडून बरे अनुभव आले नाहीत. सौदीसारख्या धार्मिक देशांत नास्तिक लोकांना किती गुप्तता राखावी लागत असेल याची कल्पना तिच्या त्या अनुभवांवरून येऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सौदी अरेबियाबद्दल बोलावे तितके कमीच आहे. इतके दांभिक गवर्मेण्ट दुसरे कुठे नसेल. नास्तिकांना इतका त्रास देणारे गवर्मेण्ट स्वतः इस्लामच्या वारशाची नासधूस (बाकी धर्मांचे कुफ्र तर सोडूनच द्या) करते तेव्हा त्यांचा धर्म कुठे मरत नाही वाटते. आणि मुस्लिम जगातूनही त्यांना विशेष विरोध कुठे होत नाही. हे पाहिल्यावर मग ठिकठिकाणी दंगे करणार्‍यांचा दांभिकपणा अजूनच उघडा पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नास्तिकांना इतका त्रास देणारे गवर्मेण्ट स्वतः इस्लामच्या वारशाची नासधूस (बाकी धर्मांचे कुफ्र तर सोडूनच द्या) करते तेव्हा त्यांचा धर्म कुठे मरत नाही वाटते.

बाकीचे तूर्तास सोडून देऊ, परंतु अधोरेखित भाग कळला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आऽऽ 'ण'बा लिँकवर क्लिकवा की..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूर्तीपूजा साफ अमान्य असेल, एवढंच नाही तर मूर्तीपूजेला खरोखरच विरोध असेल तर अशी तोड्फोड धर्मबाह्य ठरू नये. वहाबी पंथ तेवढा कट्टर आहे असं त्यांच्या इतिहासातून दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या सगळ्या गोष्टींना 'वारसा' वगैरे ठरवून त्या कारणास्तव त्यांचे जतन हे त्यांचे प्रतीकीकरण आहे, जे इस्लामास नामंजूर नाही काय?

बाकीचे सोडून द्या, परंतु निदान आंतरिक विसंगती तरी या वागण्यात निदान मला तरी कोठे दिसली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वहाब्यांची आंतरिक विसंगती नाही, तर पथेटिकपणा दाखवण्याचा मुख्य हेतू होता. अन्य लोकांच्या वागण्यातील विसंगती अशी की मशिदी पाडल्याबद्दल कंठशोष करणारे इकडे मात्र काही केले तरी मूग गिळून असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाबरी मशीद हा हिंदुस्थानचा, अत एव हिंदुस्थानी नागरिकांचा ऐतिहासिक वारसा आहे होता. हिंदुस्थानास / हिंदुस्थानी नागरिकांस वारशाचे वावडे नसावे. सबब, तो कंठशोष सुसंगतच आहे.

उलटपक्षी, सौदी नागरिकांनी त्यांच्या देशात त्यांच्या वारशाची / अ-वारशाची काय वाटेल तशी विल्हेवाट लावावी; किंबहुना, त्यांच्या देशात त्यांनी काय वाटेल ती काशी मक्का घालावी. अन्य लोकांस त्याचे सोयरसुतक असण्याची गरज ती काय? मग त्या परिस्थितीत अन्य लोकांनी आवाज नेमका कशाकरिता उठवावा?

सबब, अन्य लोकांचे वागणेही सुसंगतच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त हिंदुस्थानापुरता इश्श्यू नाही. जगभरात मुस्लिम लोक पसरलेले आहेत, त्यांतले सगळेच काही वाहाबी नाहीत. असे असूनही त्यांमध्ये यांना विरोध करणार्‍यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...त्यांना त्यात विरोध करण्यायोग्य असे काही वाटत नसावे म्हणून?

(१) मस्जिद-अल-नबी पाडणारे हे मुसलमान आहेत, बाह्य आक्रमक नव्हेत. इस्लामविरोधी अथवा इस्लामशत्रू तर नव्हेतच नव्हेत. पक्षी, हा पूर्णपणे अंतर्गत मामला आहे.
(२) मस्जिद-अल-नबी पाडणे हे धर्मविसंगत नाही.

मस्जिद-अल-नबी पाडणारे हे त्या मशिदीचे स्वघोषित रक्षक आहेत, ही यातील विसंगती होऊ शकेलही कदाचित, परंतु मुळात ती मशीद पाडणे हे जर धर्मबाह्य नसेल आणि त्या मशिदीचे (धर्म)प्रतीकीकरण हे धर्मनिषिद्ध अत एव त्याबद्दल धार्मिक भावना दुखावण्यायोग्य नसेल, तर मग या किंचित विसंगतीतही त्यांना आवाज उठवण्यासारखे, विरोध करण्यासारखे असे काही जाणवत नसणे शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात कट्टर वाहाबी इस्लामचे आचरण करणारे लोक खूप कमी आहेत. जगभरचे मुसलमानांच्या हिशेबी मशीद पाडणे ही चांगली गोष्ट नक्कीच नाही असे काही फोरम्सवरून मत झालेले आहे. तरी याला विरोध होत नाही. मुळात मशीद पाडणे हे धर्मसुसंगत आहे असे मानणारे खूप कमी लोक आहेत/असावेत. बहुसंख्य मुसलमानांच्या श्रद्धांना पायदळी तुडवणार्‍यांना मुसलमानांकडून म्हणावा तितका व्होकल विरोध होत नाही ही विसंगती नव्हे काय? या श्रद्धांवर सौदीवाल्यांचे शिक्कामोर्तब झालेच पाहिजे हे गरजेचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जगभरचे मुसलमानांच्या हिशेबी मशीद पाडणे ही चांगली गोष्ट नक्कीच नाही

कोणी पाडणे ही चांगली गोष्ट नाही? नि कोणत्या परिस्थितीत पाडणे ही चांगली गोष्ट नाही?

बहुसंख्य मुसलमानांच्या श्रद्धांना पायदळी तुडवणार्‍यांना मुसलमानांकडून म्हणावा तितका व्होकल विरोध होत नाही ही विसंगती नव्हे काय?

त्या बहुसंख्य मुसलमानांची श्रद्धा नेमकी कशावर आहे? इस्लामवर, की त्या मशिदींवर? मशिदींवरची श्रद्धा ही बिगरइस्लामी आहे, सरळसरळ कुफ्र, बुतपरस्ती नि कायकाय अरबीफारसी शब्द त्यास लागू होत असतील ते सगळे शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथेही तोच मुद्दा, मुसलमानांची श्रद्धा डिफाईन करण्याचा अधिकार सौदीवाल्या वहाब्यांना आहे का? कुराणासकट सगळे हदीस एकसारखेच बोलतात असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुराणासकट सगळे हदीस एकसारखेच बोलतात असे नाही.

इस्लामच्या सर्वच ग्रंथ/टिप्पण्या/विचारधारांत शतप्रतिशत एकवाक्यता नसणे हे सहज शक्य आहे.

मात्र, यांपैकी कोणतीही गोष्ट ही मशिदीवरील श्रद्धेस / मशीदपूजेस मान्यता देऊ शकेल, याबाबत जबरदस्त साशंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच. मुद्दा इतकाच आहे, की मशीद नष्ट केली जाऊ नये, यासाठी किमान एका हदीसात आधार मिळू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुराण, हदीस इ. गोष्टींशी व्यक्तिशः परिचित नसल्याकारणाने खात्रीलायकरीत्या प्रतिपादू शकत नाही, परंतु याबद्दल प्रचंड साशंक आहे, इतकेच म्हणू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...हा पाहणार्‍याच्या नजरेत आहे, असे अत्यंत विनम्रपणे सुचवू इच्छितो.

सबब, मला जरी समजा माझ्या नजरेत सौदी नागरिकांच्या या वागण्यात पथेटिकपणा दिसला, तरी सौदी नागरिकांस तो तसाच प्रतीत व्हावा, असा अट्टाहास मी का बरे धरावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी ठीक, पण मग मस्जिद-अल-नबी सुद्धा उध्वस्त करणार होते ते धर्मविसंगत होते असे मला वाटते. असो. बाकी हे लोक काय करतील याला सुमार नाही हेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एखादी मस्जिद ही केवळ प्रेषिताने (पत्याशांदे) बांधली, म्हणून तिचे कोणत्याही परिस्थितीत जतन करणे हे तिचे प्रतीकीकरण, अत एव धर्मविसंगत आहे. सबब, गरज पडल्यास तिचे उद्ध्वस्तीकरण हे धर्मसुसंगतच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म...ते बाकी खरंय. पण याविरुद्ध कोणी आवाज उठवताना दिसत नाही फारसे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कशाविरुद्ध? आणि कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे नॉन-वाहाबी लोक एरवी शष्प अपमान सहन करू शकत नाहीत, ते याविरुद्ध काही बोलताना दिसत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिंदू? ख्रिस्ती?? मुसलमान??? सेक्युलर???? तथाकथित सूडोसेक्युलर?????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाहाबेतर मुसलमान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...असे पहा, की समजा माझे घर आहे. मोडकळीस आले आहे म्हणा, किंवा मी त्यात राहात नसल्याने मला फारसे उपयोगाचे नाही म्हणा, किंवा ते पाडून त्या जागी अनेकमजली इमारत बांधता येईल म्हणा. या किंवा अशा अन्य कोणत्याही कारणास्तव (किंवा कारणाविनासुद्धा) मी ते पाडणे ही एक गोष्ट.

मात्र, अशा कोणत्या कारणासाठी (किंवा कारणाविनासुद्धा) इतर कोणी जर माझ्या इच्छेविरुद्ध ते पाडले, तर मी ते खपवून घ्यावे काय? अशा परिस्थितीत मी (इतर काही मार्ग शक्य नसता) कंठशोष करणार नाही काय?

बाबरी मशीद हा तमाम हिंदुस्थानचा ऐतिहासिक वारसा असला, तरी हिंदुस्थानी मुसलमानांचा त्या वारशावरील अग्रहक्क विसरून चालणार नाही. सबब, हिंदुस्थानी मुसलमानांनी एकमतासहित आणि स्वखुशीने ती मशीद पाडल्यास गोष्ट वेगळी; इतरांनी ती जबरदस्तीने पाडल्यास त्यांना किमान कंठशोष करण्याचा अधिकारही नसावा काय?

(मस्जिद-अल-नबीबद्दलही काहीसे असेच म्हणता येईल. म्हणजे, मानोत अथवा न मानोत, परंतु मस्जिद-अल-नबी हा जगातील तमाम मुसलमानांचा ऐतिहासिक वारसा असेलही, परंतु सौदी अरेबियातील मुसलमानांचा त्यावर अग्रहक्क आहे. तेव्हा, सौदी अरेबियातील मुसलमानांनी स्वखुशीने ती पाडावयाचे ठरवले, आणि - केकावरील आयसिंगासारखे अथवा सुवर्णावरील सुहाग्यासारखे (तुम्हाला आवडेल तो पर्याय निवडा.) - ते धर्मसुसंगतही असले, तर मग इतरांस - पक्षी इतर मुसलमानांससुद्धा - त्याबद्दल कंठशोष करण्यासारखे तर सोडाच, परंतु त्यात दु:ख करण्यासारखेही काही उरत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(मस्जिद-अल-नबीबद्दलही काहीसे असेच म्हणता येईल. म्हणजे, मानोत अथवा न मानोत, परंतु मस्जिद-अल-नबी हा जगातील तमाम मुसलमानांचा ऐतिहासिक वारसा असेलही, परंतु सौदी अरेबियातील मुसलमानांचा त्यावर अग्रहक्क आहे. तेव्हा, सौदी अरेबियातील मुसलमानांनी स्वखुशीने ती पाडावयाचे ठरवले, आणि - केकावरील आयसिंगासारखे अथवा सुवर्णावरील सुहाग्यासारखे (तुम्हाला आवडेल तो पर्याय निवडा.) - ते धर्मसुसंगतही असले, तर मग इतरांस - पक्षी इतर मुसलमानांससुद्धा - त्याबद्दल कंठशोष करण्यासारखे तर सोडाच, परंतु त्यात दु:ख करण्यासारखेही काही उरत नाही.)

त्या मशिदीवर सौदी मुसलमानांचा अग्रहक्क आहे किंवा कसे, याबद्दल साशंक आहे. तेही असोच. पण जे लोक खाजगीत कधीकधी याला शिव्या घालताना दिसतात ते उघडपणे मात्र काही बोलत नाहीत. ही विसंगती आहे असे म्हणायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या मशिदीवर सौदी मुसलमानांचा अग्रहक्क आहे किंवा कसे, याबद्दल साशंक आहे.

Possession is eleven points of the law??? (अवांतर: या वाक्प्रचाराबद्दल थोडेसे विवेचन येथे.)

पण जे लोक खाजगीत कधीकधी याला शिव्या घालताना दिसतात ते उघडपणे मात्र काही बोलत नाहीत.

कदाचित कारण उघडपणे बोलण्यासाठी त्यांच्याजवळ मुळात केस नसावी म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओक्के. पण उघडपणे बोलण्यासाठी केस आहेच ना. इस्लामिक वारशाची नासधूस न बघवणारे आणि खाजगीत त्याला शिव्या घालणारे अनेक मुसलमान आहेत, तेव्हा केस तर आहेच. अर्थात काही मौलवींनी समजा त्याला धर्मबाह्य ठरवले, तर त्यामुळे त्यांची लेजिटिमसी कितपत कमी होईल ते माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इस्लामिक वारशाची नासधूस न बघवणारे आणि खाजगीत त्याला शिव्या घालणारे अनेक मुसलमान आहेत.

माझ्या मर्यादित आकलनशक्तीनुसार, मुळात त्या 'वारशा'च्या 'वारसे'पणाला (आणि पर्यायाने त्या न बघवण्याला) धर्मात फारसा बेसिस नसावा. (किंबहुना, गेले तर ते धर्माविरुद्धच जावे.)

सबब, केस असण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ठीक वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझे आर्ग्युमेंट? की 'माझी मर्यादित आकलनशक्ती'?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान गये. आप का अर्ग्युमेंट और आकलनशक्ती, दोनोंको ROFL

संदर्भ: मान गये, आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोंको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वहाबी लोकांना सुन्नी मुसलमान सन्मानाने बघत नाहीत. त्यांना सुन्नी मशिदीत प्रवेश दिला जात नाही (जर जाहीररीत्या तो वहाबी आहे असे सगळ्यांना कळलेले असेल तर कारण अल्पसंख्य असल्याने वहाबी लपुनछपून वावरतात.) वहाबी लोकांना तब्लीगी किंवा २४ असे कोडवर्डमध्ये संबोधले जाते. बेटीव्यवहार टाळला जातो. वहाबी लोकांची नमाज पढण्याची पद्धत , धार्मिक उपदेश करणारी पुस्तके, इतकेच काय कुराणाची प्रत देखील सूक्ष्म फरक असणारी असते. ते दर्ग्यावर जात नाहीत. सुफी संतांना मानणे चुकीचे समजतात.बॅटमॅनने लिहिल्याप्रमाणे लोकमानसातली पवित्र अशी स्थाने सौदीअरेबिया ने जमीनदोस्त केली त्याबद्दल स्पष्ट राग निदान भारतातल्या सुन्नी मुसलमानांमध्ये मी पाहीला आहे. (कुठल्याही हज करून आलेल्या सुन्नी मुसलमानाबरोबर या विषयावर बोलून बघा) तो राग इथल्या वहाबी लोकांवर निघतो. सौदीच्या पैश्यांवर हे लोक माजले आहेत असे मानतात. ते थोडेफार खरे आहे. एकूण सुन्नी मुस्लमानापेक्षा वहाबी अधिक कट्टर असतात. थोडक्यात वहाबी लोकांना चालवून घेतात पण मान्यता मुळीच नाहीय अशी गम्मत आहे. ही वैयक्तिक निरीक्षणे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फर्स्ट हँड फीडबॅकबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सौदीमधे राजेशाही आहे. अन्य लोकशाही देशात जी सार्वजनिक मालमत्ता असते ती राजघराण्याची खासगी दौलत आहे का कसे? तेलाच्या बाबतीत तरी असंच आहे. असं असेल तर राजघराण्यातल्या लोकांनी स्वतःच्या मालमत्तेची नासधूस केली तर त्याबद्दल वाईट वाटणं एकवेळ ठीक; पण निषेध इत्यादींना कितपत अर्थ आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...आहे हे लक्षात आले नव्हते, परंतु संदर्भ असाच काही असावा, असा अंदाज होता. खात्री करून घेतली.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक कुठे चालतीये????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी उघडली तर चालली. तुमच्या इथे चालत नाहीये का? नसेल तर गूगलवर mcmecca असे सर्च मारून बघा, पहिलीच लिंक म्हणजे ती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीय मुलाखत. पुढेमागे नास्तिक झालोच तर भारतात जन्माला घातल्याबद्दल अल्लाहचे आभार मानीन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी स्वतः रोज मला मुस्लिम कुटुंबात जन्माला न घातल्याबद्द्ल अल्लाह चे आभार मानत असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दांभिकपणा हा सर्व धर्मां मध्ये समान असावा यात दुमत नसावे. वाईट याचे वाटते की मुस्लिम धर्मा मध्ये याचे प्रमाण तरूण आणि शिकल्या सवरल्या लोकांत ही ज्यास्त दिसून येते. मला मुस्लिम धर्माचे काहीही वावडे नाही. माझे भरपूर मित्र मुसलमान आहेत आणि तांत्रिक बाबतीत खूप चांगल काम करतात, पण खाली घड्लेली काही उदाहरणे:

१. मी: अरे हे चिकन टेस्ट करून बघ, मस्त आहे.
मित्रः नाही करू शकत, हलाल नाही.
...
काही वेळानी, स्टार बक्स च्या ला लाईनीत गोर्या टंच मुली कडे बघत
मी: मस्त आहे ना.
मित्रः हो ना, अशा कुणा बरोबर डेटींग करायला पाहीजे.
मी: समजा केलीस डेटींग, आणि ती म्हंटली चल आत्ताच्या आत्ता सेक्स करूयात किंवा मी ब्लो जॉब देते तर?
मित्रः मला काहीच प्रॉब्लेम नाही
मी: मला वाटलेल इस्लाम मध्ये प्री मॅरीटीयल सेक्स ला बंदी आहे
मित्रः खांदे ऊडवून हसतो.

२. मित्र मला सांगतोय त्याने यु ट्युब वर बघितलेला एक कोरियन विडियो ज्यात माशाला अर्धा तळतात आणि तरीही तो जिवंत राहतो आणि मग तो तसा मासा ताटात सर्व करतात. मग ते मिटक्या मारत खातात.
मित्र मला सांगतो "यार ये तो सरासर ज्यादती है"
मी मनातल्या मनात "साल्या तुला हलाल मांस कस करतात ते माहीत नाही का?"

३. माझे दोन तीन मित्र वेगवेगळ्या वेळेला हिंदू किंवा क्रिश्चन मुलींच्या प्रेमात पडले. मला त्यात काहीही ऑब्जेक्षन नाही. पण मी त्या सगळ्यांना त्या त्या वेळी प्रश्न विचारला की समजा उद्या गाडी पुढे गेली तर आणि तुझ्या घरच्यांनी परवानगी दिली तर लग्न करताना तिला धर्म बदलवायला लावणार का?
प्रत्येक वेळी त्यांनी माझ्याकडे "ऑब्वियस्ली" अशा नजरेने पाहून हो म्हंटलय. एकाशी तर मी वाद पण घातला होता की ती का धर्म बदलणार, तु का नाही. त्यावर त्यांचे उत्तर की हे असच होत असत.

हे सगळे लोक कमी शिकलेले नसून उच्च दर्जाचे शिक्षण घेतलेले लोक आहेत. हे सगळ अनुभवून आणि प्ररमप्रिय झाकीर साहेबांची भाषणे ऐकून मला या धर्माबद्दल शून्य आदर आहे. जो धर्म स्वतः च्या धर्मा व्यतिरिक्त च्या लोकांचा आदर करू शकत नाही तो
धर्म माझ्या आदराला देखील पात्र नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> जो धर्म स्वतः च्या धर्मा व्यतिरिक्त च्या लोकांचा आदर करू शकत नाही तो धर्म माझ्या आदराला देखील पात्र नाही.
सहमत. पण मुळात धर्माची आपल्या आयुष्यात गरजच काय? हा मला पडलेला प्रश्न आहे. जाउ दे, इथे विषयांतर नको. नंतर कधीतरी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच मी म्हंटलय की "धर्मा व्यतिरिक्त च्या लोकांचा", यात अन्य धर्मीय तसेच नास्तिक हे सुध्धा सामील होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा प्रकारचा दांभिकपणा मराठी, मध्यमवर्गीय, निदान पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, उच्चवर्णीय, (तेव्हा) मध्यमवयीन (आता उतारवयाकडे झुकलेल्या) संघस्वयंसेवकांच्या वर्तनातही पाहिल्यामुळे फारसं आश्चर्य वाटलं नाही. संघस्वयंसेवक असल्यामुळे या लोकांना पुन्हा स्वतःकडे समाजसुधारणेचा मक्ता असल्याचं वाटतं आणि ही सुधारणा लोकांच्या घरात, त्यांच्या मुलांवर लादण्याचाही हे लोक प्रयत्न करतात ही आणखी भर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिंदू धर्माला काही हजार वर्षांची निरनिराळ्या परस्परविरोधी विचारधारा एकत्र नांदण्याची, वादविवादांची, विरोधांची आणि त्यांतून होत जाणार्‍या समाजसुधारणांची परंपरा आहे. मुस्लिम धर्माला ती नाही. हा काही बचावाचा मुद्दा असू शकत नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. पण 'असे का' असा उद्विग्न प्रश्न विचारताना आणि काही लेबले लावताना या परंपरेतल्या फरकाचे भान असावे, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या बाबतीत ख्रिश्चन धर्माचे मुस्लिम धर्माशी बरेच साम्य आहे. पण तिकडे रेनेसाँ झाला तसा इकडे काही झाला नाही. अन सध्या होईल अशी घंटा शक्यता नाही. गेल्या दोनेकशे वर्षांत तर कट्टरपंथी लोक अजूनच वाढीला लागलेत. एकच एक अरबछाप आयडेंटिटी लादण्याच्या प्रयत्नात लोकल ब्रँड हद्दपार केले गेले.

अवांतरः भारतातला इस्लाम तसा बर्‍यापैकी इंडियनाइझ झाला होता याचे एक साधे उदाहरण सांगतो. काही मुसलमान संत कवींची मराठी कविता आज उपलब्ध आहे उदा. शेख महंमद. पण ती मुसलमानाने लिहिलेली असली तरी हिंदूछापच कविता आहे. मुसलमानांनी मुसलमान धर्मासंबंधित लिहिलेल्या १७-१८व्या शतकातील मराठी कवितांचे एक अतिशय रोचक संकलन भारत इतिहास संशोधन मंडळाच्या संकीर्ण साहित्य खंड क्र. १ किंवा ८ मध्ये आहे. महंमद, फातिमा, यजीद, हसन-हुसेन इ. लोकांबद्दल अगदी पोवाडेछाप कविता, उदा. "हसन-हुसेन दोघे बंधू | सूर्यचंद्र तसे जाण " किंवा "आधी नमन नबीसाहेबाला | मग त्या फातिमेला |" इ.इ. उपमा तर सरळ हिंदू परंपरेतून उचलल्या आहेत. मिरजेजवळ भिलवडी येथील राहणारे इतिहास संशोधक पै. मियाँ शिकंदरलाल अत्तार यांनी या कविता मिळवून छापल्या आहेत. ते १९४३ साली वारले.

पण आज कुणाला हे सांगूनही खरे वाटणार नाही. इब्न वराक सारखे बरेच लोक पुढे आले तर काही आशा आहे. इस्लामवर टीका वट्ट सहन न करणे हे आजच्या काळात खपण्याजोगे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आजच्या काय, कुठल्याच काळात नि कुठच्याही धर्मात (संप्रदायात/विचारधारेत) हे खपण्याजोगं असू नये. पण ती आदर्श परिस्थिती झाली.
प्रत्यक्षात सध्या याच्या बरोब्बर उलट गोष्टी होताना दिसतात. 'ते कसं करतात? मग आपण तरी माघार का घ्यायची?' असले आचरट युक्तिवाद होतात. 'मारुतीच्या हाती शॅम्पेन'चं नाव बदललं गेलं, या गोष्टीचा किती उच्चशिक्षित हिंदू तरुणांनी निषेध केला होता? माझ्या ओळखीत तरी एकानंही नाही. हुसेनबद्दल तर बोलायलाच नको. इथे एक नवाच धागा सुरू होईल नि शिवाय तो मुद्दा सोडून कैच्याकै भरकटेल ते निराळंच.
असो. असोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असोच. मुळात विरोधाची तीव्रता आणि वारंवारिता यांची तुलना केली तरी एकुणात ते कळेलच. आता जराही विरोध नको म्हणताना दोन्ही एकाच तागडीत तोलले जाऊ शकतात. त्याहीबद्दल विशेष म्हणणे नाही, पण मुळात हे आचरट युक्तिवाद केले जातात ते कडवेपणा विथ इम्प्युनिटी दिसतो म्हणून. तिकडे लेक्ष वेधणे म्हणजे अन्य गोष्टींची भलामण करणे नव्हे हे अशावेळेस नजरेआड का केले जाते हे कळत नाही.असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचा आवाका पाहून अवाक व्हायला होतं. ही माहिती माझ्यासाठी एकदम नवीन आहे. धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅट्याचा आवाका. करता काय?! सहमत. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भारतातला इस्लाम तसा बर्‍यापैकी इंडियनाइझ झाला होता

भारतात इस्लामचे हिंदूकरण आणि हिंदूंचे इस्लामीकरण सतत चालुच असते असे माझे मत आहे. कित्येक वर्षांनंतर मध्य्ममार्ग मिळेल म्हणजे दोघेही सारख्याच तीव्रतेचा दांभिकपणा/धार्मिक आंधळेपणा करण्यास मोकळे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दांभिकपणा हा सर्व धर्मां मध्ये समान आहे याबाबत दुमत नाही. अलकबीर ही एक मोठी हलाल मांस उत्पादक कंपनी एका जैन उद्योजकाच्या मालकीची असल्याचे वाचलेले स्मरते. शुद्ध विवेक आणि आत्मसंयम हा प्रत्येक धर्माने उपदेशिलेला असला तरी प्रत्यक्षात तो पाळणारे दुर्मिळ असतात. श्रेयस्कर आणि सोयीस्कर यात सोयीस्कर याकडेच बहुतेकदा कल असतो. तुम्ही दिलेले पहिले उदाहरण खरोखर दांभिकपणाचे आहे यात शंका नाही. पण मला वाटतं संस्कार किती आधीपासून मुलांवर केले जातात यावरून देखील ते किती खोलवर रुजलेत हे ठरत असावं. जसं बाहेर खातांना मुस्लिम घरात आई-वडील हलाल-हराम खाणे हे लहानपणापासूनच काटेकोरपणे बघुन घ्यायला शिकवतात. तसे मुलगा वयात आल्यावर वेश्यागमन (जिनाकारी) किंवा विवाहपूर्व अथवा विवाहबाह्य संबध हे धर्मबाह्य आहेत असा संस्कार घरात येता जाता होत नाही. लैंगिक गोष्टीबद्दल बोलण्याचा मोकळेपणा बहूसंख्य घरात नसल्यामुळे हे घडत असावे. जिनाकारी हराम आहे हे पुढे कधीतरी मशिदीत इमामच्या प्रवचनात किंवा इस्तेमामध्ये (धार्मिक कार्यशाळा) मौलवी लोकांकडून कळते. पण त्याचा मनावर तितका खोल संस्कार होत असेल असे वाटत नाही.

हलाल (मुस्लिम लोकांची पद्धत )आणि कोशेर (ज्यू लोकांची पद्धत ) मांस याबद्दल बरेच लोक आक्षेप घेतात त्यावर उपाय म्हणून हल्ली प्राण्यांना विद्युत झटका देऊन स्तब्ध / निपचित (stunning) केले जाते आणि मग हलाल केले जाते असा तोडगा काढण्यात आला आहे. न्युझीलंडमध्ये तर असे करण्याची सक्ती आहे. प्राण्यांना कमीत कमी त्रास होणारी ही पद्धत लवकरच सर्व जगात रूढ होऊ शकते. मला विचाराल तर एकदा जीव घ्यायचा ठरवल्यावर हलाल , कोशेर , गिलोटीन, stunning जीव घ्यायची कुठलीही पद्धत क्रूरच.

आंतरधर्मीय लग्नाचं म्हणाल तर आपल्या जोडीदाराला आपल्या समाजात पटकन स्वीकारले जावे अश्या आशेने धर्म बदलण्याचा आग्रह होतो. त्यात त्या मुलीने तिचा निर्णय घ्यावा आणि तसे स्वातंत्र्य तिला मिळावे इतकेच मी म्हणेन. (अकबर - जोधाबाई ह्या ऐतिहासिक उदाहरणाप्रमाणे ) जर तसे नसेल तर असे लग्न न होण्याची मोकळीक आहेच. जर त्याचे तिच्यावर अथवा तिचे त्याच्यावर खरे खरे प्रेम असेल तर धर्म दुय्यम ठरण्याची शक्यताच जास्त. बर्याच वेळेस मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी लग्न करून पुढे हिंदूधर्मात आयुष्य व्यतीत केल्याचेही पाहीले आहे. बहुतांश वेळेस मुलगा कुठल्या धर्माचा आहे त्यावरून मुलीने आंतरधर्मीय विवाहात धर्म बदलल्याचे दिसते. पुरूषसत्ताक पद्धतीचा हा प्रभाव म्हणता येईल.

उच्चशिक्षणामुळे धर्मभोळेपणा कमी होतोच असे नाही. उच्चशिक्षित व्यावसायिक असला म्हणजे त्याने त्याच्या धर्माची सगळीच्या सगळी मुल्ये आणि शिकवण आत्मसात केलेली आहेतच असे गृहीत धरता येत नाही. ती अभ्यासातून घडलेल्या वैचारीक बैठकीतून आत्मसात होतात. शिर्डीच्या मंदिरातल्या रांगेत कधी उभे राहुन पहा. नरेंद्र महाराज , आसारामबापू यांचीही भाषणे ऐकून पहा. मी हे सगळे पाहून ऐकुनहि हिंदू धर्माबद्दल आदर नाही असे म्हणणार नाही. कारण मला वाटते या लोकांपेक्षा तो धर्म मोठा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुसलमानांबद्दल आम्ही कै बोललं की लग्गेच प्रतिसाद उडतात त्यामुळे नकोच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>भारतातला इस्लाम तसा बर्‍यापैकी इंडियनाइझ झाला होता<<

हो आणि म्हणूनच वहाबींना सूफी चालत नाहीत, किंवा पाकिस्तानात अहमदियापंथीय स्वतःला मुसलमान म्हणवून घेऊ शकत नाहीत. आणि हे भारतीय उपखंडापुरतंच मर्यादित नाही, तर सर्वत्र आढळतं. उदाहरणार्थ, अलावी/अन्सारी, किंवा द्रूझपंथियांचा वेळोवेळी झालेला छळ. किंवा इराणी मुसलमान खुशाल मद्यसेवन करतात आणि अरबी लोक रानटी टोळीवाले आहेत असं म्हणतात, तर वहाबींना असला इस्लाम पातळ वाटतो.

म्हणून लोक जेव्हा मुसलमानांविषयी सरसकट विधानं करू लागतात तेव्हा ह्या सर्व पार्श्वभूमीवर ते सर्व मूर्खपणाचं वाटू लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हारुन तुमचा प्रतिसाद आवडला. त्याबाबतीत मला काही म्हणायचे आहे:

१. मला त्या उदाहरणात त्याल सेक्स करावासा वाटतो म्हणून तो वाईट आहे अस म्हणायच नव्हत. ही एक नैसर्गिक उर्मी आहे जी की प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला असतेच. मला अप्रूप कशाच वाटल असेल तर एकदा वर्तनातील विरोधाभास दाखवून दिला तर मी बरेचदा अस बघितल आहे की मुस्लीम मुल विचार श्रुंखला तिथेच थांबतात. म्हणजे डोक्यात कुठेतरी ऑफ स्विच आपोआप अ‍ॅक्टिवेट होतो की याबाबतीत विचार करायचा नाही किंवा स्वतः ला चॅलेंज करायचे नाही. या ईथे त्यांनी जर का हा विरोधाभास फक्त स्वतः शी अ‍ॅकनॉलेज केला तरी देखील बरेचसे प्रश्न सुटतील. आता त्याने एकदम नॉन-हलाल किंवा पोर्क खाणे सुरु करावे असे मी म्हणत नाही आहे. पण फक्त स्वतः शी प्रामाणिक राहील की मी हे करायला तयार आहे तर मग ते ही करायला तयार असू शकतो. बास, ईतकच.

२. सदर मित्र पाकिस्तानातील असून त्यांच्याकडे कुठल्यातरी ईद ला मोठ्ठ्या प्राण्यांना हलाल पद्ध्तीने मारतात. एक कसाई येतो आणि धारधार सुरीने गळ्यावर नसेला छेद करतो. मग रक्त वाहून जाईपर्यंत त्याला उलटा टांगून ठेवतात. ईन फॅक्ट मी अस कुठे तरी वाचल होत की हलाल पद्ध्ती मद्ध्ये स्तब्ध / निपचित (stunning) करायला विरोध आहे कारण की त्यात रक्ताच्या गुठ्ळ्या होऊ शकतात तसेच पुर्ण रक्त वाहून जाईल याची काही ग्यॅरेंटी नसते. "जीव घ्यायची कुठलीही पद्धत क्रूरच" हे जरी खर असल तरी जश्या ईन्फिनिटीज मध्ये काही इन्फिनिट्या ईतरा पेक्षा मोठ्या किंवा छोट्या असतात त्याप्रमाणे काही पद्धती कमी ज्यास्त क्रुर असतात. आणि मारणे व हालाहाल करून मारणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

३. पुरूषसत्ताक पद्धतीचा हा प्रभाव म्हणता येईल
याच्याशी सहमत.

४. नरेंद्र महाराज, आसारामबापू यांचीही भाषणे ऐकून पहा.
आसारामबापू यांची भाषणे पाहीली आहेत. आणि ते वाईट लोक आहेत यात शंका नाही. पण कसय ना की त्यांना ओल्ड फार्ट म्हणून दुर्लक्ष करता येत. आणि मी तरी त्यांच्या कच्छ्पी लागणारी ज्यास्त तरूण लोक पाहीलेली नाहीत. पण झाकीर यांचा ईव्हील पणा कशात असेल तर "मी डॉक्टर आहे, मी लॉजिकलीच बोलतो". अशा प्रकारे तरूण लोकांना आणि त्यांच्या पालकांना इन्फ्लुएंस करणार. प्रश्न विचारायला उभ राहील्यावर उभ्या उभ्या कन्वर्ट करायचा प्रयत्न करणार. उघड उघड प्रोसेलिटायझिंग चे प्रयत्न करणार. हे खूप खूप चुकीचे आहे.

बाकी आदर नाही म्हणायच कारण काय की तरः
१. कुठ्ल्याही मुस्लीम बहुल देशात जाऊन मी एक नस्तिक आहे हे म्हणायची सोय नाही.
२. कुठ्ल्याही मुस्लीम बहुल देशात जाऊन वेगळ्या धर्म प्रसाराची परवानगी नाही. प्रार्थना स्थ्ळ उभारायची परवानगी नाही.
३. मुस्लीम लोक ईतर देशात जाऊन इथेही शरीया कायदा लागू करा अस म्हणतात (भोसडीच्या मग मरायला ईथे आलासच कशाला? तुझ्या देशात परत जा की जिथे ऑल्रेडी तो कायदा आहे). ईथे सो कॉल्ड शांतता प्रेमी मुस्लीम गप्प बसतात. कुणी अस नाही म्हणत की गपे का फजूल फुका मारून राह्यला?
४. स्वतः च्या देशापेक्षा इस्लाम ला श्रेष्ठ मानतात. कालच मी ऑस्ट्रेलियात कुणाला तरी ब्रिटन मधील सैनिकाला मारल ते बरच केल अस म्हणताना पाहील.

बाकी कालच अंजम चौधरी यांच्या तरूण पणातील दारू पितानाचे, पोर्न मॅगझिन वाचतानाचे फोटोज पाहून करमणूक झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी आदर नाही म्हणायच कारण काय की तरः
१. कुठ्ल्याही मुस्लीम बहुल देशात जाऊन मी एक नस्तिक आहे हे म्हणायची सोय नाही.
२. कुठ्ल्याही मुस्लीम बहुल देशात जाऊन वेगळ्या धर्म प्रसाराची परवानगी नाही. प्रार्थना स्थ्ळ उभारायची परवानगी नाही.
३. मुस्लीम लोक ईतर देशात जाऊन इथेही शरीया कायदा लागू करा अस म्हणतात (भोसडीच्या मग मरायला ईथे आलासच कशाला? तुझ्या देशात परत जा की जिथे ऑल्रेडी तो कायदा आहे). ईथे सो कॉल्ड शांतता प्रेमी मुस्लीम गप्प बसतात. कुणी अस नाही म्हणत की गपे का फजूल फुका मारून राह्यला?
४. स्वतः च्या देशापेक्षा इस्लाम ला श्रेष्ठ मानतात. कालच मी ऑस्ट्रेलियात कुणाला तरी ब्रिटन मधील सैनिकाला मारल ते बरच केल अस म्हणताना पाहील.

इथे झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे धर्माच्या अर्थबोधनातील विसंगती दाखवतात, त्यामुळे धर्म नक्की काय हे वरील मुद्द्यांवरून ठरत नाही असे म्हणता येते. अर्थातच धर्माबद्दल अनादर दाखवणे अथवा अन्यथा हे तुमचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहेच, तरीही हे तर्कदृष्ट्या गैर वाटते म्हणून हा प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< ट्रोल मोड ऑन >>
खरंतर प्रॉब्लेम असाय की जगात हिंदू देशच नाही त्यामुळे त्यांच्या देशात काय चाललं असतं हे कळायला मार्ग नाही.(एक नेपाळ होता पण बिचारा तोही माओवाद्यांच्या कच्छपी लागला आणि तेथेही मनुस्मृतीप्रमाणे किंवा शंकराचार्यांप्रमाणे कायदा नव्हताच) अख्ख्या जगात आपला स्वत:चा एकही देश तयार करता न येणार्‍या धर्माने उगाच काय इतर धर्मियांना नावं ठेवावीत? Wink
<< ट्रोल मोड ऑफ >>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लक्ष्मण माने यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होण्याचा प्रकार तसा फार जुना नाही. लोकांमधे चर्चा साधारण अशा अर्थाच्या, "काय ना, एवढा मोठा साहित्यिक आहे पण हे असं वर्तन. मागास जातीजमातींचं नेतृत्त्व असं का कुजलेलं?"

खैरलांजी प्रकरणातल्या दोषींबद्दल "गावातल्या अमका, फलाणा यांच्यावर आरोपपत्र निश्चित केलं", "अमक्या, फलाण्याला शिक्षा झाली."

कोणत्या एखाद्या रशीद अन्सारीने काही गुन्हा केल्याची बातमी आली, "त्यांचा धर्म असलाच आहे रे!"

---

मेघनाने वर हिंदू धर्मात असणार्‍या सुधारणेच्या परंपरेचा उल्लेख केलेला आहेच. ते असं सगळं असूनही हिंदू समाजात सगळे पापभीरू आहेत, कोणी गुन्हेगार नाही असं काही दिसत नाही. मुळात हिंदू समाजही एकसंध असा नाहीच. पण इतरांकडे बोट दाखवण्याची वेळ आली की "ते सगळे १०५" असं आपणच जाहीर करून टाकायचं.

बाकी आम्ही ज्या देशात आणि धर्मात जन्माला आलो त्यात अगदी २१ व्या शतकातही कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवळात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करावं लागतं; पाळी सुरू असेल तर घरी देवपूजा होत नाही, मुलींना देवळात येऊ (किंवा जाऊ) देत नाहीत; कायदे जातीभेदाच्या विरोधात असूनही 'खैरलांजी' होतं; पण आम्ही सुसंस्कृत. कारण आम्हाला इतर लोकांच्या धर्माबद्दल आदर आहे. आम्हाला शेजारच्या अन्य जातीच्या स्वधर्मीयाच्या जातीचा भले तिटकारा असेल, पण आदर आहे की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी आम्ही ज्या देशात आणि धर्मात जन्माला आलो त्यात अगदी २१ व्या शतकातही कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवळात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करावं लागतं; पाळी सुरू असेल तर घरी देवपूजा होत नाही, मुलींना देवळात येऊ (किंवा जाऊ) देत नाहीत; कायदे जातीभेदाच्या विरोधात असूनही 'खैरलांजी' होतं; पण आम्ही सुसंस्कृत. कारण आम्हाला इतर लोकांच्या धर्माबद्दल आदर आहे. आम्हाला शेजारच्या अन्य जातीच्या स्वधर्मीयाच्या जातीचा भले तिटकारा असेल, पण आदर आहे की!

तपशिलात एक चूक आहे. आंदोलन हे गाभार्‍यातील प्रवेशासाठी झालं होतं, देवळातल्या प्रवेशासाठी नव्हे. अर्थात तेही काही भूषणावह आहे अशातला भाग नाहीच. पाळी सुरू असेल तर देवळात येऊ देत नाहीत पेक्षा घरचे लोक जाऊ देत नाहीत असे म्हणायचे असावे. तेही हल्ली कितपत पाळले जाते कुणास ठाऊक. बाकी प्रतिसादाची गल्ली अंमळ चुकलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या - किंवा अशा प्रकारच्या - चर्चांमध्ये मी भाग घ्यायला उत्सुक नसतो कारण तेथे लवकरच ह्या वा त्या बाजूचे प्रवक्ते judgemental होऊ लागतात आणि मग the pot calling the kettle black ही स्थिति निर्माण होते. दुसर्‍या धर्मांवर ज्या ज्या पातकांचे आरोप केले जातात तशा प्रकारची पातके आपापल्याहि धर्मात असतातच त्यामुळे असल्या 'तू तू मी मी' वादाला शेवट नसतो.

धर्म आणि त्यांचे प्रेषित/तत्त्वज्ञ ह्या सर्वांचीच सुट्टी करून केवळ सदसद्विवेकबुद्धीच्या मार्गदर्शनाने राहायला जग शिकले तर खूप प्रश्न हवेत विरून जातील पण हे व्हायची शक्यता येत्या शंभर-दोनशे वर्षात तरी दिसत नाही.

जे तुम्हाला दुसर्‍याने केलेले आवडणार नाही ते तुम्ही दुसर्‍याला करू नका हे आपल्याला आपली सदसद्विवेकबुद्धि सांगते.

माझ्यापुरता मी कोठलाच धर्म मानत नाही. जगात कसे जगावे हे समजण्यासाठी मला कोणाच्याहि मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत नाही. मृत्यूनंतर माझे काय होईल ह्याची चिंता मी करत नाही. आत्तापर्यंत अब्जावधींचे जे झाले ते माझे होईल. मला -आणि अन्यहि कोणाला - ते आजतागायत गावलेले नाही. विश्व कसे आणि का निर्माण झाले ह्याचे साधार उत्तर कोणी शोधले तर ते आवडेल पण अद्यापपावेतो ते कोणास सापडले आहे असे दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे तुम्हाला दुसर्‍याने केलेले आवडणार नाही ते तुम्ही दुसर्‍याला करू नका हे आपल्याला आपली सदसद्विवेकबुद्धि सांगते.

सहमत आणि असेच जवळजवळ सर्व धर्मांत सांगितले आहे असे दिसते. Golden Rule

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अरेरे !! मत न दिलेल्या प्रतिसादानेही लोकांना जुलाब लागले वाटतं .. हॅ हॅ हॅ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<सहमत आणि असेच जवळजवळ सर्व धर्मांत सांगितले आहे असे दिसते.>

सर्व धर्मात असे सांगितले आहे हे जरी असले तरी तेच धर्म ह्या तत्त्वाच्या नरडयाला नख लावणार्‍या शंभर अन्य गोष्टी सांगतात आणि त्या त्या धर्मांचे अनुयायी त्या गोष्टींना अधिक महत्त्व देऊन Golden Rule सोयीस्करपणे विसरतात. ह्या विस्मृतींना त्या त्या धर्मातच आधारहि आहेत.

हिंदु धर्म स्त्री-शूद्रांना असमान वर्तणूक देतो कारण मनूपासून सगळे स्मृतिकार आणि रामायण-महाभारतासारखी 'पवित्र' काव्ये तेच शिकवतांना दिसतात.

ख्रिश्चन देशातील लोक आफ्रिकनांना सक्तीने पळवून आणून गुलाम करत असत कारण 'केनच्या शापा'च्या स्वरूपात त्यांच्या गुलामगिरीला बायबलमध्येच आधार आहे असे गुलामगिरीच्या समर्थकांकडून सांगितले जाई.

ह्या अनिष्ट चाली आज जवळजवळ -आणि कायद्यात तरी - बंद आहेत त्याचे कारण असे ह्या बाबतींतले धर्मांचे सांगणे आपण धुडकावून लावले हेच आहे. जेव्हा ह्या प्रथा चालू होत्या तेव्हा कोणासहि Golden Rule आठवला नाही, यद्यपि तोहि त्या त्या धर्मांमध्ये नावापुरता होताच!

महंमदाच्या Golden Rule विसरण्याबाबत काय बोलावे? चारापर्यंत बायका करण्याची मुभा त्याने आपल्या अनुयायांना दिली किंवा दोन स्त्रियांची साक्ष = एका पुरुषाची साक्ष असा नियम त्याने घातला तेव्हा Golden Rule कोठे होता? त्याने स्वतःला क्षणभर स्त्रीच्या स्थानी कल्पिले असते तर तो असले नियमच न करता.

तेव्हा सर्व धर्महि Golden Rule शिकवतात म्हणून ते धर्म पाळत रहा हे पटणे अवघड आहे.आम्हास केवळ Golden Rule पुरेसा वाटतो, बाकीचा चोथा नको असे आपण का म्हणत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळेअभावी संक्षिप्त प्रतिसाद दिला होता.

सांगायचा मुद्दा असा होता, सर्वच धर्मांत गोल्डन रूल प्रमाणे विचार मांडले गेले होते असे दिसते, तरीही सर्वच धर्मांत त्याच्या विपरीत उदाहरणे इतिहासाच्या प्रत्येक पानावर दिसतात. त्यामुळे कोणता एक धर्म वाईट (आणि आमच्या धर्मात मात्र चांगली शिकवण आहे) अशा समजुतीतील विरोधाभास दाखवायचा होता. शिवाय, सगळ्याच धर्मात चांगले विचार मांडले गेले होते, हे त्याविपरीत सरसकटीकरण करण्यापूर्वी विचारात घ्यावे असे (इन जनरल) सांगायचे होते. (वरती हे मुद्दे चर्चेत आले होते, त्या अनुशंगाने तसा प्रतिसाद दिला)

तेव्हा सर्व धर्महि Golden Rule शिकवतात म्हणून ते धर्म पाळत रहा हे पटणे अवघड आहे.आम्हास केवळ Golden Rule पुरेसा वाटतो, बाकीचा चोथा नको असे आपण का म्हणत नाही?

अंततः हे मत मान्य आहे. नव्हे, हेच माझेही मत आहे, अन ते मी खुलेपणाने अनुसरतोही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सौदी अरेबियात राजरोस आणि उघडपणे राहणारे कित्येक नास्तिक असावेत, आणि त्या सर्वांचीच अवस्था आपण म्हणता तितकीही वाईट नसावी.

सौदी अरेबियात राहणार्‍या आणि सौदी नागरिक असणार्‍या अथवा मुस्लिम घरात जन्माला आलेल्या व्यक्तींची आपण म्हणता तशी अवस्था असेलही. परंतु सौदी अरेबियात कित्येक बिगरमुस्लिम परकीय नागरिकही कामानिमित्ताने राहतात. त्यात कित्येक ख्रिस्ती आहेत, तसेच भारतीय हिंदूदेखील आहेत. पैकी ख्रिस्त्यांचा आणि मुसलमानांचा अब्राहमिक ईश्वर एकच असल्याकारणाने त्यांना वगळू, परंतु 'जगात एकच अल्लाह आहे (आणि मुहम्मद त्याचा प्रेषित आहे)'च्या राज्यात तेथील सरकारच्या वा समाजाच्या लेखी तेथे राहणारे भारतीय हिंदू हे 'आस्तिक' या क्याटेगरीत खासे गणले जात असावेत, असे वाटत नाही*.

मुस्लिम वगळता अन्य धर्मांच्या आचरणावर सौदी अरेबियात सरसकट बंदी असल्याकारणाने या भारतीय हिंदूंवर अर्थातच आपल्या धर्माचे पालन करण्यास बंदी आहे, परंतु याव्यतिरिक्त केवळ नास्तिक आहेत म्हणून या हिंदू 'नास्तिकां'चा काही विशेष छळ, कैद अथवा मृत्युदंड तेथे होत असेल, असे वाटत नाही.


* 'काफ़र' म्हणजे नास्तिकच ना? तत्त्वतः 'अल्लाहवर विश्वास न ठेवणारा' हे ठीकच; परंतु जेथे अल्लाहशिवाय दुसरा ईश्वरच नाही, तेथे अल्लाहवर विश्वास न ठेवणारा हा नास्तिकच झाला की!
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0