चिनी साम्राज्य

२०५० सालातला भारत. नक्षलवादी फक्त दुर्गम भागात असायचे ते आता सर्व भारतभर पसरले होते.बहुतेक भाग त्यांनी काबीज केला होता. बरेच राजकीय नेते मारले गेले होते. उरलेले दिल्ली आणि त्याच्या जवळपासच्या भागात मिलिटरीच्या संरक्षणाखाली रहात होते. बाकीच्या देशांत त्यांचा संपर्क जवळजवळ तुटलाच होता. तरीही बाहेरच्या जगात अजून 'नक्षलीस्तान' ला मान्यता मिळाली नव्हती. शहरातल्या जनतेला अंगमेहनतीची कामे करावी लागत होती. नक्षलींनी जी शहरे काबीज केली, तेथील वस्तीत जाऊन सर्वप्रथम तिथल्या खाजगी गाड्या जाळून टाकल्या. एसयूव्ही सारखी खाजगी वाहने स्वतःच्या वापरासाठी बळजबरीने घेतली. फ्लॅटस मधे रहाणार्‍या सर्व लोकांना बाहेर काढून सोसायटीतल्याच मोकळ्या जागेत झोपड्या बांधून रहायला भाग पाडले. रिकाम्या फ्लॅटस मधे गरीब, आदिवासी आणि मोलमजुरी करणारे राहू लागले. जे सुशिक्षित लोक 'त्यांच्यासाठी' काम करायला तयार झाले त्यांना झोपड्यांत राहू दिले, बाकीच्यांना मारुन टाकण्यात आले. अनेक शहरांचे कॉन्सट्रेशन कँपमधे रुपांतर झाले. जे निरुपयोगी, म्हातारे, अशक्त लोक होते त्यांना खतम करण्यात येऊ लागले.

शहरातला व्यापार्,उदीम हा नक्षलींच्या बंदुकीसमोर काम करु लागला. बँकातले पैसे नवीन शस्त्रे विकत घेण्यासाठी वापरले जाऊ लागले. प्रत्येक शहरांत सर्वोच्च स्थानी देखरेख करण्यासाठी चिनी अधिकार्‍यांची नियुक्ती झाली. धर्म हा शब्द उच्चारायलाही बंदी झाली. बरेच सुशिक्षित भारताबाहेर पळून जाऊ शकले, पण त्यापैकी फारच थोडे युरोप वा अमेरिकेत आश्रय घेऊ शकले. बाकीचे पाकिस्तान, बांगलादेश इथल्या तुरुंगात खितपत पडले.

एरवी सगळ्या जगातल्या घडामोडीत नाक खुपसणार्‍या अमेरिकेने हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणून हात झटकून टाकले. कारण तोपर्यंत अमेरिकाही आर्थिक दृष्ट्या चीनची मांडलिक झाली होती. दिल्लीतल्या उरल्यासुरल्या राजकीय नेत्यांनी सर्व जगाकडे मदत मागायचा प्रयत्न केला होता पण कोणीच मदतीला धावून आले नाही. युनो तोपर्यंत चीन व रशियाची बटीक झालेली होती. बीबीसीने घेतलेली नक्षलप्रमुखाची मुलाखत जगभर दाखवण्यात आली. त्यात त्याने ठामपणे सांगितले की भारतात ब्रिटिशांपासून आदिवासींवर प्रचंड अत्याचार झाले आहेत. तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यावरही ती पिळवणुक वाढतच गेली. आमचा प्रथम उद्देश हा संपूर्ण विनाश हाच आहे. त्यानंतरच आम्ही विकासाबद्दल विचार करु. या देशातल्या सर्व उच्च्वर्णीयांमधे ही पिळवणुकीची शिकवण भिनली आहे. त्यामुळे या सर्वांना ठार मारले तरच हा देश पिळवणुकीच्या 'जीन्स' चा कचाट्यातून सुटेल. त्यांना एकदम ठार मारणे आम्हाला शक्य नाही म्हणून आम्ही त्यांना सक्तीने शिक्षक बनवले आहे. एकदा सर्व आदिवासी, मागास जमातीचे लोक शिकले की त्यांच्याच हस्ते आम्ही या पापींना जिवंत पुरणार आहोत. हिटलरने कैद्यांना जाळून टाकून चूक केली. यांना मोठ्या प्रमाणावर पुरले तर आमच्या पुढच्या पिढ्यांना त्यापासून खनिज तेल मिळेल. या दूरदृष्टीमुळे भविष्यात आमचा नक्षलीस्तान स्वयंपूर्ण होईल.

पण हा त्यांचा स्वप्नविलास फार काळ टिकला नाही, कारण शेवटी चीनने सर्व नक्षल्यांनाही गोळ्या घालून ठार मारले आणि भारत,नेपाळ,पाकिस्तान,बांगलादेश,लंका,ब्रह्मदेश यासहित संयुक्त चिनी साम्राज्य या भरतवर्षावर स्थापन झाले.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

दरदरुन घाम फुटला. कठिण आहे बाबा या देशाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंतरजालावर मराठी संकेतस्थळे चालवणार्‍यांचा व त्यांवर सक्रीय असणार्‍यांचा एक मोठा गट भूमिगत होऊन छुपेपणाने आपले कामकाज करत होता. धर्म, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, मराठी शुद्धलेखन, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर, स्त्रीमुक्ती आणि माध्यमांमधील स्त्रीची प्रतिमा, आंतरजातीय विवाह करावेत की नाही, हिरवा माज अशा चिरतरुण विषयांवर लिहिणे आणि प्रतिसादणे हिरिरीने सुरुच होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

भारी !

>>> आंतरजातीय विवाह करावेत की नाही <<

हे चुकून आंतरजालीय विवाह करावेत की नाही असे वाच्ण्यात आल्या गेले ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

त्यांना एकदम ठार मारणे आम्हाला शक्य नाही म्हणून आम्ही त्यांना सक्तीने शिक्षक बनवले आहे.
या वाक्याने या ललितातील हवाच काढून टाकली आहे. पुढे चीनने नक्षलवाद्यांना मारले व आपले राज्य चालू केले. म्हणजे चार चीनी राज्यकर्ते सोडले तर भारताची हरदासाची कथा मूळ पदावर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुष्यमित्रा ये रे मित्रा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पनाविलास छान आहे. पण सत्याशी काही संबंध नाही. आजकालच्या जगात 'दुसऱ्या देशावर कब्जा करणे' वगैरे गोष्टी जेम्स बॉंडच्या व्हीलन्सच्या 'वर्ल्ड डॉमिनेशन' प्रमाणेच कल्पनाविलासातच रंगवण्यालायकच आहेत. सध्या युद्धं चालतात ती बाजारपेठांची. त्यात चीन पुढे आहे, भारत मागे आहे हे खरं आहे. पण सुमारे दहाएक वर्षात भारत हा सध्याचा चीन होईल अशी आशा करायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबईचं शांघाय बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल. Wink

बंदूकधारी माओवाद्यांचा त्रास आपल्याला. ज्या चीनमधून आपण 'सेझ'ची कल्पना आयात केली तिथे माओवादीच उजवे (म्हणजे सत्ताधारी) आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!