'बिल्डिंगिरिया'पासून सावधान!

दि. २३ जून २०१३, विशेष प्रतिनिधी, दैनिक दाणादाण, मुंबई

प्रत्येक पावसाळ्यात डेंगयू, मलेरिया, कावीळ अशा किरकोळ साथीमुळे हैराण होणार्‍या मुंबई आणि आसपासच्या भागात या पावसाळ्यात मात्र एकापाठोपाठ एक इमारती कोसळण्याची साथ आली असून गेल्या 10-15 वर्षात अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि भेसळयुक्त मालमसाला वापरुन बिल्डरांच्या भाई-गर्दीने अत्यंत घाईगर्दीने बांधलेल्या खास हक्काचे मतदारसंघ म्हणून घडवलेल्या गरीब-बापड्यांसाठीच्या लहानमोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्यापेक्षा सहजतेने लागोपाठ कोसळू लागल्या आहेत. भर पावसात छत्र्या नेमक्या विसरून खास असल्याच आडोशाला जाऊन उभे राहणारे, मोकळ्या इमारतीमध्ये आपले आयते बिर्‍हाड वसवणारे, शनिवार-रविवारी सहकुटुंब पाव्हण्याकडे चक्कर मारणारे, अशा घरांत अडले नारायण बनून भाड्याने राहणारे आणि अॅमवे पासून स्टेफ्री पर्येंत विविध प्रकारचे किरकोळ सामान दारोदार विकणारे सेल्समन अशा लोकांनी तरी या साथीची गंभीर नोंद घ्यावी अशी अपेक्षा आहे.

यातच भाईगिरीचे बिल्डर रुग्ण खुलेआम आढळून आल्याची चर्चा शहरात होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी सोमवारी महापालिकेच्या बिल्डिंगारोग्य बांधकाम विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मा. आयु. छगन पिचड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "गांधीनगर, भिवंडी, घाटकेपार, जरीमरी, कुर्ला, ठाणे, मुंब्रा या भागाची पाहणी बिल्डिंगारोग्य विभागाच्या पथकाने केली. शहरात बिल्डिंगिरियाची साथच नाही, साथ आहे ती फक्त सार्वजनिक संतापाची आहे. ज्या भागात संतापाचे रुग्ण आढळत आहेत त्या भागातील सर्वपक्षीय नगरसेवक खबरदारी घेत आहेत. या संपूर्ण परिसरात धनौषधींचे वाटप, खाजगी दबाव आणि दैवी उपचार सुरू केलेले आहेत." संतापाची उत्पत्ती रोखण्याच्या दृष्टीकोनातून शहराच्या विविध भागात किरकोळ धनौषधींची फवारणी करण्याचे आदेश सार्वजनिक साखरपेरणी अध्यक्ष या पदावर नुकत्याच रुजू झालेल्या डॉ. तु. प. चखाशी यांजकडुन पक्षसंघटनेस देण्यात आले आहेत. फवारणीचे काम देखील आता वेगाने सुरू होईल, असा विश्वास डॉ. पिचड यांनी व्यक्त केला.

लागण झालेल्या बिल्डिंगीत दादा-भाईंच्या आशीर्वादाने पूर्ण पैसे भरून "हक्काचे घर" नावाचे स्वप्न विकत घेऊन वीज-पाण्याविना राहणार्‍यांनी मात्र "राहणार्‍यांची चिंता करायला तो करता करता करविता परमेश्वर अत्यंत कटिबद्ध आहे, ज्याने हे आयुष्य दिले तोच पुढे सांभाळ करील, जातस्य हि धृवो मृत्यू:, सारे काही कमेटीसाठी" असे आध्यात्मिक विचार शिरोधार्य मानून शांत आणि स्थितप्रज्ञ होऊन कुरकुर न करता राहावे आणि अशी तकलादू बिल्डिंग पडलीच तरी त्या ढिगार्‍याखाली शांतपणे गाडले जावे, आपत्तीच्या वेळी अग्निशमन दलाला निमूट सहकार्य करावे, आणि आपल्यावरील गंडांतराचा फारसा गाजावाजा मात्र करू नये असे कळकळीचे आवाहन बिल्डरपुरस्कृत महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे कार्याध्यक्ष आचार्य श्री श्री श्री १००८ जितेंद्रियबापू आवड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय गुंड-बिल्डर-निवडणूकनिधि-समन्वय समितीने केले आहे. मृत आणि अर्धमेल्या व्यक्तींस अल्पशा भरपाईचे बौन्स होणेबल च्येक रिकाम्या सरकारी खजिन्यातून फाडण्यास लोकप्रतिनिधी समर्थ आहेतच याचीही होतकरू आपत्तीग्रस्तांनी नोंद घ्यावी. या निमित्ताने प्रत्येकाने आपापला आपत्कालीन विमा उतरवण्यास सरकारकडून विशेष प्रोत्साहन योजना काढण्याचाही विचार होत आहे. मदतकार्यात बघे होऊन गर्दी करण्यावर तिकिटे लावण्याची आणि करमणूक कर रद्द करण्याची कल्पना सरकारच्या वसूल मंत्र्यांना सुचल्याचे समजते. तरी सर्व वाचकांस हा पावसाळा तेवढा बलवत्तर नशिबाचा जावो आणि पुढल्या पावसाळ्यात तरी याची देहा गटाराचे पाणी भिजवो ही संपादक मंडळातर्फे सदिच्छा.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

गंभीर प्रश्नावरचं खुसखुशीत शैलीत तिरकस लेखन आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आवडेश.
ललीतमधे हवा होता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्राथमिक पहाणीनुसार बिल्डींगिरिया कीटकदंशाने होतो. कीटकांपासून रक्षण करण्यासाठी सार्वजनिक जाळीवाटप उपक्रम आमच्या जितूभाईंनी सुरू केला आहे. जितूभाई ठाण्याचे असले तरी त्यांनाही मुंब्रा, कौसा आणि खारपाड्याच्या इमारती आणि उपरोल्लेखित व्यक्तिविशेषांबद्दल खास आपुलकी आणि जवळीक वाटते. त्यामुळे जाळ्या लावून कीटकांपासून बिल्डिंगांचं रक्षण करण्यासाठी हा कार्यक्रम मुंब्रा, कौसा आणि खारपाड्याच्या लोकांसाठी विनाशुल्क खुला आहे. कृपया संबंधितांनी लाभ घ्यावा. या जाळ्यांची जालीय विश्वात फार दखल न घेतली गेल्यामुळे जितूभाईंनी खास संदेश पाठवून हा प्रतिसाद लिहीण्यास सांगितले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खिक्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!