Skip to main content

मोर नाचला गं बाई ...

मोर नाचला गं बाई
मोर नाचला
पापा घ्याया मोराचा
ढग वाकला

पोपट नाचला गं बाई
पोपट नाचला
वार्‍याला हिरवा हिरवा
रंग लागला

हत्ती नाचला गं बाई
हत्ती नाचला
झाडाखाली फळांचा
ढीग लागला

- ग्लोरी

तिरशिंगराव Sun, 30/06/2013 - 18:49

कविता इतकी छान आहे की विडंबन करण्याचा मोह आवरला.