४ जुलै, स्वातंत्र्य, स्नोडेन आणि अमेरिकन सरकार

एडवर्ड स्नोडेन ह्या अमेरिकेच्या नॅशनल सिक्यूरिटी एजन्सीसाठी (NSA) काम करणाऱ्या तरुणानं अमेरिकन सरकारच्या 'प्रिझ्म' आणि ब्रिटिश सरकारच्या 'टेम्पोरा'सारख्या उपक्रमांची माहिती नुकतीच जगजाहीर केली. नागरिकांवर देखरेख ठेवणाऱ्या ह्या उपक्रमांची माहिती जगभर खळबळ माजवत आहे. निव्वळ अमेरिकन नागरिकांवरच नव्हे, तर इतर देशांतल्या सामान्य नागरिकांवरदेखील ह्या उपक्रमांखाली पाळत ठेवली जात होती. युरोपियन महासंघ आणि भारतातल्या सरकारांवरदेखील पाळत ठेवली जात असावी असा संशय आहे.

ह्या गोष्टी उघड झाल्यानंतरची अमेरिकन सरकारची प्रतिक्रिया बोलकी होती. स्नोडेनवर गुन्हे दाखल करून त्याला ताब्यात घेण्यासाठी अमेरिकन सरकार अर्थात झटत आहे. 'गार्डियन' ह्या वृत्तपत्रानं हे तपशील जाहीर केले. त्यामुळे 'गार्डियन'च्या संकेतस्थळाला भेट देण्यावर अमेरिकन सैनिकांना बंदी घालण्यात आली आहे. अनेक युरोपियन सरकारांनी आपल्यावरच्या पाळतीचा निषेध केला आहे.

अशा पार्श्वभूमीवर आजचा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. सामान्य नागरिकांचा स्वातंत्र्य आणि खाजगीपणाचा हक्क पाळला जावा ह्यासाठी जगभरातल्या अनेक संकेतस्थळांनी आज स्वातंत्र्य आणि खाजगीपणावर आलेल्या निर्बंधांचा निषेध व्यक्त करायचं ठरवलं आहे. वर्डप्रेस, रेडिट, मोझिला अशी अनेक संकेतस्थळं ह्यात सहभागी आहेत. 'ऐसी अक्षरे'सुद्धा ह्यात सहभागी आहे. त्याविषयीचं एक चिन्ह तुम्हाला संकेतस्थळावर दिसेल. सामान्य नागरिकांसाठी 'रिस्टोअर द फोर्थ' हा उपक्रम आज हाती घेण्यात येणार आहे. तुम्ही अमेरिकेत असाल, तर ह्यात सहभागी होऊ शकता. त्याशिवाय 'स्टॉप वॉचिंग अस' ह्या नावानं एक याचिका अमेरिकन कॉंग्रेसकडे दिली जाणार आहे. त्यावर तुम्ही सही करू शकता. तुमच्या ब्लॉगवर किंवा संकेतस्थळावर तुम्हाला आपला सहभाग दाखवायचा असला, तर थंडरक्लॅप किंवा 'इंटरनेट डिफेन्स लीग' ह्या संकेतस्थळांवर त्यासाठी कोड मिळेल.

घडलेल्या प्रकाराविषयी अधिक माहिती -

गार्डियन - “NSA collected U.S. email records in bulk for more than 2 years under Obama

वॉशिन्ग्टन पोस्ट - “Here’s everything we know about how the NSA’s secret programs work

स्लेट - “Obama Has Charged More Under Espionage Act Than All Other Presidents Combined

अट्लांटिक - “2 Senators Say the NSA is Still Feeding us False Information

गार्डियनचा पत्रकार ग्लेन ग्रीनवाल्डचा व्हिडिओ

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

उपयुक्त आणि समयोचित माहिती. उपयोग करून घेतला जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१११११११११११११११११.

असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उपयुक्त माहिती.

कालच्या 'द लास्ट वर्ल्ड' या करण थापरच्या कार्यक्रमात भारताचे कोणीतरी माजी-आयुक्त सांगत होते की "त्यात काय विशेष? हे तर भारतही करतो" (दुवा शोधतो आहे). आणि हे सत्य असल्यास अश्या एखाद्या कायद्याची भारतातही गरज आहे.

किंबहुना आधार कार्डाच्या निमित्ताने बायोमेट्रीक माहिती मिळवून ठेवणे अजूनही घटनात्मकरित्या वैध नाही (आणि म्हणूनच सदर माहिती देणे ऐच्छिक आहे असे सरकार म्हणत असते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही बातमी ऐकलीत का या धाग्यात मी भारतातल्या अशा "वॉच" बद्दलची बातमी नोंदवली होती. आता सापडली तर इथे डकवतो. भारतात हे उलट एक प्रगती ऊर्फ संरक्षण / सरकारी यंत्रणेच्या हाती येणारं एक प्रभावी अस्त्र म्हणून पाहिलं जातंय की काय कोण जाणे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.aisiakshare.com/node/1837#comment-28712

India sets up nationwide snooping programme to tap your emails, phones

http://timesofindia.indiatimes.com/tech/enterprise-it/security/India-set...

यात मोबाईल, ईमेल इत्यादिसोबत ब्राउझिंग हिस्टरी वगैरेचाही समावेश आहे असं लेखावरुन दिसतं. इतरही बर्‍याच देशांमधे अशी यंत्रणा आहे असंही म्हटलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्हे नव्हे, भारत तत्सम प्रकार आपल्याकडील विदेशी वकिलातींच्या विदागारावर (अमेरिकेप्रमाणे) करतो असा दावा आहे.

(त्यावर करण थापरने लगेच आपल्याकडे त्याबाबतीतही तितकी एफिशियन्सी व स्कील दिसत नाहिये असा टोमणा मारलाच Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अमेरिकेच्या नागरिकांची खासगी माहिती गुप्त रहावी म्हणून अमेरिकन नागरीक आंदोलन करतील आणि कदाचित त्यात त्यांना यशही येईल.
पण जगातल्या बाकीच्या देशांच्या नागरिकांची माहिती गुप्त रहावी म्हणून अमेरिकन नागरीक काय करणार आहेत? :tired:

(की अमेरिकेबाहेर नागरी संस्कृतीच नाही?कारण याचिकेत केवळ अमेरिकन नागरिकांच्याच स्वातंत्र्याचा आणि खासगीचा उदउदो आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> पण जगातल्या बाकीच्या देशांच्या नागरिकांची माहिती गुप्त रहावी म्हणून अमेरिकन नागरीक काय करणार आहेत? <<

जगभरातल्या मानवी हक्कांच्या पायमल्लीविरोधात आवाज उठवणारे नागरिक आणि संघटना अमेरिकेत आणि जगात इतरत्र आहेत. विकीलीक्सचा असांज आणि आता स्नोडेन ह्या दोघांनाही ज्या 'गार्डियन' वृत्तपत्राचा आधार वाटला ते ब्रिटिश आहे. 'वॉशिंग्टन पोस्ट' किंवा 'स्लेट' अमेरिकन आहेत. 'इलेक्ट्रॉनिक फ्रंटिअर फाउन्डेशन', 'ह्यूमन राईट्स वॉच' आणि 'अ‍ॅम्नेस्टी'सारख्या संस्था अमेरिकन, ब्रिटिश आणि युरोपियन पैशांच्या आधारावर जगभरातल्या नागरिकांच्या मानवी हक्कांशी संबंधित काम करतात.

>>(की अमेरिकेबाहेर नागरी संस्कृतीच नाही?कारण याचिकेत केवळ अमेरिकन नागरिकांच्याच स्वातंत्र्याचा आणि खासगीचा उदउदो आहे.)
<<

स्नोडेननं ज्या माहितीचा गौप्यस्फोट केला आहे ती मुख्यतः अमेरिकन सरकारच्या धोरणांबद्दल आहे. ४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन आहे. त्यामुळे ह्या उपक्रमाचं केंद्रस्थान अमेरिका राहणार हे उघड आहे. भारतीय किंवा ब्रिटिश सरकारं खरं तर आपापल्या नागरिकांच्या बाजूची असायला हवी, पण ती अमेरिकेची मांडलिक असल्यासारखी वागत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांच्या बाजूनं आवाज उठवणारे परदेशी आणि भारतीय आवाज आहेत. त्यांविषयी माहिती मिळू शकते आणि त्यांना पाठिंबादेखील देता येऊ शकतो.

करता येण्यासारखं पुष्कळ काही आहे आणि ज्यांना काही करण्याची इच्छा आहे ते कृतिशील आहेत. प्रतिसाद त्यामुळे काहीसा नकारात्मक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझे म्हणणे याठिकाणी चर्चिलेल्या याचिकेसंदर्भात आहे. या याचिकेत अमेरिकन सरकारने अमेरिकन जनतेच्या हक्कांची पायमल्ली ताबडतोब थांबवावी अशी मागणी केलेली आहे.(तीन कलमांचा गोषवारा)पण जगातील इतर देशांच्या नागरी खासगीपणाच्या हक्कांबाबत त्यात मौन पाळलेले आहे. बाकी गार्डियन, वॊशिग्टन पोस्ट, असांज, स्नोडेन , ऎम्नेस्टी इन्टरनॆशनल इ. यांचे काम हा विषय येथे माझ्या परिप्रेक्ष्यात नाही.

भारतीय किंवा ब्रिटिश सरकारं...पण ती अमेरिकेची मांडलिक असल्यासारखी वागत आहेत

>>>
+१.

भारतीय नागरिकांच्या बाजूनं आवाज उठवणारे

>>>
+१. मलाही त्यातच गणावे. आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकन स्वतंत्र नागरिकांनी ’जगातल्या सर्वात मोठ्या’ लोकशाहीच्या नागरिकांचेही स्मरण ठेऊन त्यांच्या देशाच्या सरकारने कोणत्याही प्रकारे इंटरनेटवर हेरगिरी करू नये ही मागणी कुठेतरी कोप‍र्‍यात तरी करावी. (म्हण्जे मलाही कुठेतरी सही करता येईल.) इतकेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरकारच्या गोपनीय गोष्टी सर्वांना कळाव्यात (विकीलिक्स) असे वाटणारे आणि त्याबद्दल ज्युलिअस असांजेला पाठिंबा देणारे लोकच सर्वांच्या गोपनीय गोष्टी सरकारला कळू नयेत याचा आग्रह धरतात यातला संबंध रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"सरकारची गोपनीय गोष्ट विकिलिक्सने उघड केली" असा तुमचा सूर आहे.
"सरकारची चोरी आम्ही उघड केली" असा असांज , स्नोडेन वगैरेंचा दावा आहे.
नागरिकांची खाजगी माहिती गुप्त ठेवायची इच्छा आहे, त्यात "मी कायद्यापासून केलेली चोरीही लपवून ठेवावी" असा सूर नाही.
एखाद्याने केलेली चोरी त्याच्यापुरती गोपनीय असेलच. ती उघड करण्याच्या भूमिकेत काय चूक आहे समजले नाही.
(तात्विकदृष्ट्या बरोबर आहे. पण सगळ्या गोष्टी तात्विक लेवलवर चालत नाहित. जग तात्विक नाही, प्र्याक्टिकल आहे.)
.
.
दुसर्‍या बाजूने स्नोडेन वगैरेंची भूमिका "हेरगिरी करुच नका" अशीच असेल तर अवघड आहे.
हेरगिरी ही breach of information(and occasionally breach of other laws) न करता कशी करतात ह्यावर विचार करतोय.
शून्य हेरगिरी करुन सरकार, सुरक्षा यंत्रणा कशी चालवावी हे मला तरी समजलेले नाही.
शिवाय कुणीही कितीही बोंब मारली तरी हेरगिरी(कुठल्याही देशाची) शून्य किंवा शून्यवत झाली असे होणेही शक्य नाही.
.
.

लोकांना हे असे काही घडत असल्याची अजिबातच कल्पना नसल्यासारखे वागताना , बातमी ऐकून अनपेक्षित असल्यासारखे चवताळून/बावचळून जाताना पाहून मौज वाटली. स्नोडेन नक्की नवीन कुठला मुद्दा ठळकपणे सांगितला हे ही समजले नाही.
.
डिस्ल्केमर :- स्नोडेन बद्दल आणि त्याने उपलब्ध केलेले कागदपत्र ह्याबद्दल निव्वळ मथळे नि इनमिन चार कॉलमची बातमी वाचून सदर पिंक टाकलेली आहे. अधिक तपशील ठाउक नाहित.बाकी, आंतररष्ट्रिय घटना, दुर्घटना वगैरेवर चर्चा चालुदेत.
*प्रतिसाद देण्यापूर्वी खालील प्रतिसाद पाहिले नव्हते. न वी बाजू, सर्किट, थत्ते ह्यांचे प्रतिसाद वाचनीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> सरकारच्या गोपनीय गोष्टी सर्वांना कळाव्यात (विकीलिक्स) असे वाटणारे आणि त्याबद्दल ज्युलिअस असांजेला पाठिंबा देणारे लोकच सर्वांच्या गोपनीय गोष्टी सरकारला कळू नयेत याचा आग्रह धरतात यातला संबंध रोचक आहे. <<

सरकार गोपनीयतेच्या बुरख्याआड आपले अवैध धंदे लपवू पाहातं, तेव्हा त्याविरोधात जनमत निर्माण होणं स्वाभाविक वाटतं. उदाहरणार्थ इशरत जहाँ निरपराध होती हे दहशतवादविरोधातल्या लढ्याच्या गोपनीयतेमागे जर सरकार लपवू पाहात असेल, तर नागरिकांना राग येणं साहजिक आहे. सरकार नागरिकांना उत्तरदायी असावं अशी सामान्यजनांची अपेक्षा असते. त्याउलट सर्वसामान्य माणूस आपलं खाजगीपण जपण्याचा प्रयत्न करणार हेदेखील स्वाभाविक आहे. त्यामुळे ह्यात विरोधाभास नक्की कोणता आणि कसा?

>> या याचिकेत अमेरिकन सरकारने अमेरिकन जनतेच्या हक्कांची पायमल्ली ताबडतोब थांबवावी अशी मागणी केलेली आहे.(तीन कलमांचा गोषवारा)पण जगातील इतर देशांच्या नागरी खासगीपणाच्या हक्कांबाबत त्यात मौन पाळलेले आहे. <<

याचिकेच्या परिप्रेक्ष्यात ते आक्षेपार्ह वाटलं नाही. भारतीय नागरिकांच्या खाजगीपणाला अमेरिकन उपक्रमाअंतर्गत बाधा येत असेल, तर सर्वप्रथम भारतीय सरकारनं त्याबद्दल आवाज उठवणं ही आपली गरज आहे असं म्हणता येईल. युरोपिअन महासंघातली काही सरकारं आपल्या नागरिकांच्या वतीनं कदाचित हे करू पाहतील. हे व्हावं ह्यासाठी भारतीय किंवा युरोपिअन नागरिकांनी आपापल्या सरकारांवर ह्यासारख्या (म्हणजे 'स्टॉप वॉचिंग अस'सारख्या) मार्गांनी दबाव आणला पाहिजे. आपल्या हक्कांबाबत आपण ह्यामुळे अधिक जागरूक झालो तर ते चांगलं होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्या अमेरिकेतल्या याचिकेवर सही करण्याचा तसा मला अधिकारच नाही म्हणा.

इथे भारतात तशी याचिका कोणीतरी तयार करेल अशी आशा आहे.

अत्यंत अवांतर आणि थिल्लर ईनोद - ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यांच्यात काय फरक आहे? अमेरिकन नागरीक आणि अमेरिकनपणा यांच्यात जो आहे तोच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सरकार गोपनीयतेच्या बुरख्याआड आपले अवैध धंदे लपवू पाहातं, तेव्हा त्याविरोधात जनमत निर्माण होणं स्वाभाविक वाटतं.

काही अवैध धंदे गोपनीयतेच्या बुरख्याआडच करता येतात. अनेकविध सरकारे एकमेकासोबत कोणते गेम खेळत असतात ते गुप्तपणेच होतात. ते जगभरात सर्वांना कळावेत याची काय गरज आहे? अ देशाचे सरकार ब देशाशी मैत्रीचे देखावे करत असेल आणि मागून विरोधात कारवाया करत असेल तरते ब देशाच्या सरकारला कळले तरी पुरे. ते अ देशाच्या सर्व नागरिकांना कळायची काय गरज आहे? (अर्थात ब देशाचे सरकारही असले गेम होत असल्याचे जाणून असतेच).

विकीलीक्स जे काही जाहीर करते त्यातून संरचनात्मक काही साध्य होत असेल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>विकीलीक्स जे काही जाहीर करते त्यातून संरचनात्मक काही साध्य होत असेल असे वाटत नाही.<<

एक कॉन्स्पिरसी थेअरी - विकीलीक्स जनतेचा आवाज आहे हि भावना झाल्यास राजकारण्यांविरुद्ध असलेल्या वैतागावर हे एक औषधच नाही का? त्यानिमित्ताने अन्यायाला वाचा फुटल्याने थोडे समाधान मिळाल्याची भावना जनतेत येईल, व असंतोषाला इतर फाटे मिळणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात अनेक पदर आहेतः

१ अ. एखाद्या देशाने आपल्या नागरीकांना खाजगी विदा मिळवणं, साठवणं व उपयोग करणं (माझं मत: जर त्या देशात लोकशाही असेल तर लोकांनी या प्रकाराला मान्यता दिल्यास यात गैर काही नाही. भारतात अजून अशी मान्यता सरकारला मिळालेली नाही. (संसदेने मान्य केली नाही) तेव्हा असा विदा चोरून मिळवणे गैर. पण समजा बहुमताला हे मंजूर असल्यास + त्याच्या गोपनीयतेची हमी सरकार देण्यास तयार असल्यास मी आपल्या सरकारला हा हक्क देण्यास तयार आहे.)

१ ब. नागरीकांना आपल्या देशाचा सरकारी विदा मिळवणं, साठवणं व उपयोग करणं (माझं मतः लोकशाही देशात लोकांनी या प्रकाराला मान्यता दिल्यास यात गैर नाही. भारतात माहिती कायद्या अंतर्गत अशी मान्यता जनतेने बहुमताने मिळवली आहे. त्यातही काही विदा उपलब्ध नाही, जो उपलब्ध व्हावा का हे जनतेने बहुमताने ठरवायला हवे. विकीलिक्सने भारताचा गोपनीय व्यवहार उघड केलेला नाही - केवळ अमेरिकन तारा घोषित केल्या आहेत जी बहुतांश अमेरिकन दुतांची पर्सेप्शन्स आहेत, तो सत्य विदा असेलच असे नाही. )

======
२ अ. एखाद्या देशाने अन्य देशांच्या नागरिकांचा विदा चोरून मिळवणं साठवणं व उपयोग करणं: माझ्या मते हे गैर आहे.
२ ब. नागरीकांनी अन्य देशांच्या नागरिकांचा/सरकारचा विदा चोरून मिळवणं साठवणं व उपयोग करणं: माझ्या मते हे गैर आहे. (विकीलिक्समध्येही असे काहिहि झालेले नाही अमेरिकन नागरीकाने अमेरिकन तारांचा विदा मिळावला आहे)

=====
३अ व ब. एखाद्या देशाने/नागरीकांनी अन्य देशांच्या वकिलातीतील विदा चोरून मिळवणे / साठवणे व उपयोग करणे: हा जिनिव्हा कन्व्हेन्शन नुसार गुन्हा आहे. व माझ्याही मते हे गैर आहे.
======
या दोन्ही विचारांत काय बरे विरोधाभास आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

युरोपिअन युनिअन किंवा भारतासारख्या देशांनी सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अमेरिकेकडे तगादा लावला तरच काहीतरी घडेल अशी आशा आहे, अन्यथा ठराविक राजकीय परिप्रेक्ष्य असणार्‍या वृत्तपत्रांच्या आधारे हा मुद्दा कितपत चिघळवता येईल ह्याबद्दल शंका आहे, वॉशिंग्टन पोस्ट आणि गार्डिअन ही दोन्ही डेमोक्रॅटिक धार्जिणी(निदान डाव्या बाजुल कललेली) वृत्तपत्रे आहेत असे बोलले जाते.

नागरी चळवळ जनहित याचिकेपलिकडे 'ऑक्युपाय वॉलस्ट्रीट'च्या धर्तीवर काही करेल का हे बघणे रोचक असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> काही अवैध धंदे गोपनीयतेच्या बुरख्याआडच करता येतात. <<

हे विधान चुकीचं नाहीच. फक्त त्याचा वापर इशरत जहाँच्या एन्काउंटरच्या समर्थनार्थदेखील होऊ शकतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा वर्तनासाठी सरकारांना उत्तरदायी ठरवलं गेलं नाही, तर समाजाला त्याचे तोटे दीर्घकाळ भोगायला लागू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

http://www.loksatta.com/vishesh-news/we-all-are-e-eye-prisoners-131169/

"स्नोडेनने जे केले ते योग्य आहे की अयोग्य? आणि मुळात एनएसए करीत असलेली हेरगिरी योग्य आहे की अयोग्य? नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्यात घुसखोरी करण्याची परवानगी शासन व्यवस्थेला आहे की नाही, असे अनेक प्रश्न स्नोडेनच्या िबगफोडीतून निर्माण झाले आहेत. आपण कोणत्या बाजूला उभे आहोत, यावरून या प्रश्नांची उत्तरे सहज देता येतील. पण ती केवळ सोपी असतील, योग्य असतीलच असे नाही. म्हणजे आपण शासन व्यवस्थेच्या बाजूने उभे राहून असे म्हणू शकतो, की सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणांनी दूरध्वनी संभाषण ऐकले तर बिघडले कुठे? उलट अशा टेहळणीमधून दहशतवाद्यांच्या योजनांचा पत्ता लागू शकतो. आज अमेरिकी अधिकारी सांगतच आहेत, की एनएसएच्या हेरगिरीमुळेच मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याचा पत्ता लागू शकला. तेव्हा अशा हेरगिरीत गर काय आहे? यात गर एकच असते, की याला मर्यादा नसते. यात प्रश्न असा असतो, की अखेर या नजर ठेवणारांवर नजर कोण ठेवणार असते? पण मग केवळ खासगीपणावरील आक्रमणाचा जप करीत हे असे हेरगिरी कार्यक्रमच बंद करायचे का?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> आपण शासन व्यवस्थेच्या बाजूने उभे राहून असे म्हणू शकतो, की सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणांनी दूरध्वनी संभाषण ऐकले तर बिघडले कुठे? उलट अशा टेहळणीमधून दहशतवाद्यांच्या योजनांचा पत्ता लागू शकतो.<<

>> मग केवळ खासगीपणावरील आक्रमणाचा जप करीत हे असे हेरगिरी कार्यक्रमच बंद करायचे का? <<

मला वाटतं इथे काही तांत्रिक मुद्दे अधोरेखित करणं गरजेचं आहे. वर दिलेल्या गार्डियनच्या दुव्यातून -

the agency (NSA) began "collection of bulk internet metadata" involving "communications with at least one communicant outside the United States or for which no communicant was known to be a citizen of the United States".
[...]
Eventually, the NSA gained authority to "analyze communications metadata associated with United States persons and persons believed to be in the United States"

इथे 'बल्क' हा शब्द महत्त्वाचा आहे. विशिष्ट व्यक्ती संशयित आहेत म्हणून, ते संशयित असल्याचं रीतसर समर्थन कोर्टाकडे देऊन वगैरे मग त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचा हा प्रकार नाही. एखादा अमेरिकन नागरिक ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात आहे त्यांपैकी कुणी तरी परदेशात असलं, तर निव्वळ तेवढ्या कारणास्तव नजर ठेवली गेली असावी असं दिसतंय.

दुसरी गोष्ट म्हणजे इथे दूरध्वनी संभाषण ऐकलं गेलं नाही, तर मेटाडेटा गोळा करून त्याचं पृथक्करण केलं गेलं.
मेटाडेटा म्हणजे काय, आणि त्यातून काय काय कळू शकतं ह्याचा अंदाज येण्यासाठी हा रंजक दुवा पाहा -

Using Metadata to Find Paul Revere (अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याचा थोडा इतिहास माहीत असला तर हे अधिक रोचक वाटेल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Metadata Link फारच रोचक आणि मनोरंजक..
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नागरिकांवर देखरेख ठेवणाऱ्या ह्या उपक्रमांची माहिती जगभर खळबळ माजवत आहे.

यास 'काळाचा महिमा' म्हणावे काय? आमच्या वेळी 'कुत्रा माणसाला चावला' यास 'बातमी' म्हणत नसत.

ह्या गोष्टी उघड झाल्यानंतरची अमेरिकन सरकारची प्रतिक्रिया बोलकी होती. स्नोडेनवर गुन्हे दाखल करून त्याला ताब्यात घेण्यासाठी अमेरिकन सरकार अर्थात झटत आहे.

इतरांचे माहीत नाही, परंतु अमेरिकन सरकार तोष पावून स्नोडेनला अमेरिकेचा सर्वोच्च राष्ट्रीय बहुमान बहाल करेल, अशी निदान माझी तरी अपेक्षा नव्हती. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती.

'गार्डियन' ह्या वृत्तपत्रानं हे तपशील जाहीर केले. त्यामुळे 'गार्डियन'च्या संकेतस्थळाला भेट देण्यावर अमेरिकन सैनिकांना बंदी घालण्यात आली आहे.

वरकरणी पाहता, आततायीपणाचे वाटू शकणारे निर्णय अमेरिकन अधिकृत सूत्रांनी घेणे यातही नावीन्यपूर्ण असे काही नसावे. पण ते एक असो.

'संकेतस्थळाला भेट देण्यावर बंदी' म्हणजे नेमके काय? (१) संकेतस्थळ ब्लॉक करणे, की (२) संकेतस्थळाचा अ‍ॅक्सेस व्यवस्थित चालू ठेवून, सैनिकांच्या त्यावरील वावरावर पाळत ठेवून, वावर उघडकीस आलेल्या सैनिकावर कारवाई/शिक्षा/कोर्टमार्शल वगैरे करणे? याबाबत नेमकी कल्पना नाही, परंतु यातील (२)ची शक्यता अतिशय कमी वाटते. सैनिकी तळांवर संकेतस्थळ ब्लॉक करणे (उपलब्ध न करणे) हे शक्य कोटीतील वाटते. समजा एखाद्या सैनिकाने सैनिकी तळाबाहेर जाऊन (उदा. सुट्टीवर असताना घरी जाऊन वगैरे) सैन्याच्या अखत्यारीत अथवा नियंत्रणात न येणार्‍या एखाद्या ठिकाणावरून आंतरजालाचा वापर केला, आणि तेथून हे संकेतस्थळ पाहिलेच, तर अधिकृत सूत्रे त्याबद्दल फारसे काही करू शकत असतील, याबाबत साशंक आहे. अर्थात, संबंधित सैनिकासाठी असे करणे हे जिकिरीचे असावे, रोज शक्य नसावे, आणि म्हणूनच बहुतांश सैनिकांना हे शक्य होऊ नये, हा भाग वेगळा.

बाकी, सैनिकी तळांवरील अ‍ॅक्सेस ब्लॉकबद्दल बोलायचे झाले, तर कोणत्याही कारणासाठी अथवा कारणाविना कोणत्याही संकेतस्थळासाठी अ‍ॅक्सेस ब्लॉक करणे हे कोणत्याही एम्प्लॉयरच्या पूर्णपणे अखत्यारीत असते. सबब, निदान या कारणासाठी तरी कोणाला तक्रार असण्याचे कारण नसावे. शिवाय, सैन्यात जेथे सैनिकांचा साधा दैनंदिन वैयक्तिक पत्रव्यवहारदेखील (आवक आणि जावक) नुसताच उघडून पाहण्यासही नव्हे, तर सेन्सॉरासही पात्र असतो (अमेरिकन सैन्यातच नव्हे, कोणत्याही सैन्यात. भारतीय सैन्यातदेखील हे अधिकृतरीत्या होते, आणि आपले येणारे किंवा जाणारे पत्र हे कोणत्याही दिवशी रँडमली उघडून वाचले जाऊ शकेल, एवढेच नव्हे, तर अधिकार्‍यांस आक्षेपार्ह वाटणारा असा भाग त्यातून काटला जाऊ शकेल, याची पूर्ण कल्पना अधिक अपेक्षा सैनिकांस असते.), तेथे सैनिकांनी कोणती संकेतस्थळे पहावीत आणि कोणती पाहू नयेत, यावर निर्बंध असणे हे अनपेक्षित नसावे.

दुसरी गोष्ट अशी, की स्नोडेनने हे तपशील 'गार्डियन'ला सांगितले, नि 'गार्डियन'वर ते जाहीर झाले, याचा अर्थ तत्त्वतः ते लगेच आणि शंभर टक्के खरे ठरतात, असा नव्हे. (तसे ते आहेत किंवा नाहीत, हा भाग अलाहिदा. मला त्या संदर्भात व्यक्तिशः कोणत्याही बाजूने काहीही कल्पना नाही. पण ते एक असो.) कदाचित ते खरे (अगदी शंभर टक्केसुद्धा) असूही शकतात, किंवा कदाचित ते तसे बनविण्यात (किंवा, अंशतः खरे असल्यास, त्यांस तिखटमीठ लावण्यात अथवा त्याचा विपरीत अर्थ लावून 'स्पिन' देण्यात) स्नोडेनचा किंवा त्याहीपेक्षा 'गार्डियन'चा स्वार्थ अथवा हितसंबंध गुंतलेला असू शकतो. या सर्व शक्यता लक्षात घेता, त्यातून सैनिकांच्या नीतिधैर्यावर (मराठीत: 'मोराल') विपरीत परिणाम होऊ नये किंवा त्यांचा बुद्धिभेद होऊ नये, या दृष्टीने खबरदारी म्हणून त्यांवर असे निर्बंध लादणे हे सैन्याच्या पूर्णपणे अखत्यारीत असावे. (सैनिक असलेल्या व्यक्तीचा सैन्याबाहेर, एक सामान्य नागरिक म्हणून, वाटेल ते संकेतस्थळ बघण्याचा - आणि त्यावरून वाटेल तशी मते बनवून घेण्याचा - अधिकार अबाधित असावा. मात्र, सैन्यात असताना, एक सैनिक म्हणून तो केवळ हुकुमाचा ताबेदार असावा, सैनिकी शिस्तीस बद्ध असावा, ही अपेक्षाही अवाजवी नसावी.)

अर्थात, 'गार्डियन'व्यतिरिक्त अन्य संकेतस्थळांवर याविषयी वाचन करून सैनिकाचा बुद्धिभेद तरीही होऊ शकतोच, हा भाग आहेच, परंतु हा वेगळा मुद्दा झाला.

सांगण्याचा मुद्दा, प्रस्तुत बंदी कितपत प्रभावी आहे, याबद्दल शंका कदाचित उपस्थित करता येईलही; मात्र, सैन्याच्या दृष्टिकोनातून यात काही अवाजवी अथवा गैर आहे, असे जाणवत नाही.

अनेक युरोपियन सरकारांनी आपल्यावरच्या पाळतीचा निषेध केला आहे.

मात्र, त्यांपैकी एकाही युरोपीय सरकाराने स्नोडेनला आश्रय देऊ केलेला नाही, हे रोचक आहे.

फार कशाला, परवा बोलीवियाच्या अध्यक्षांच्या विमानास, केवळ त्यात स्नोडेन आहे या शंकेवरून, दोन युरोपीय सरकारांनी आपापल्या हवाई हद्दींतून उड्डाणास नकार दिला, आणि तिसर्‍या एका युरोपीय देशाने इंधन भरण्यासाठी उतरू दिले, तेव्हा विमानाची कसून तपासणी केली, अशी बातमी आहे.

माझ्या मते हे चित्र अधिक बोलके आहे.

अशा पार्श्वभूमीवर आजचा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे.

समजा ही घटना जूनमध्ये न घडता सप्टेंबरात/ऑक्टोबरात/नोव्हेंबरात/डिसेंबरात घडली असती, तर हेच विधान "अशा पार्श्वभूमीवर आजचा गणेशोत्सव/दिवाळी/थ्यांक्सगिविंग/नाताळ साजरा होत आहे", अशा प्रकारे करता आले असते काय? (आत्याबाईच्या मिशा-छाप प्रश्न आहे, पण तरीही.)

असो. आता एक प्रश्न. एका पूर्णपणे काल्पनिक प्रसंगावर आधारित आहे, तरीही.

समजा, उद्या भारत सरकारने आपल्या नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी, त्यांच्या सार्वजनिक वावरावर, पत्रव्यवहारावर, खाजगी संभाषणांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याची नोंद आपल्या विदागारात ठेवण्यासाठी असाच एखादा मोठा कार्यक्रम आखला नि राबवला. (भारत सरकार आपल्या नागरिकांना कधी महत्त्व देईल - एवढे मोठे महत्त्व तर सोडाच - याबद्दल साशंक आहे, परंतु तरीही असे समजू.) शिवाय, पाकिस्तान, चीन आणि जगातील इतर मित्र- आणि शत्रु- राष्ट्रांच्या सरकारांवर आणि नागरिकांवरही अशाच कार्यक्रमातून पाळत ठेवली. (समजायला काय जाते.)

त्यापुढे समजा, की एका भारतीय नागरिकास याचा सुगावा लागला. आणि त्याने याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी येनकेनप्रकारेण योग्य ठिकाणी प्रवेश मिळवून कार्यक्रमाची बित्तंबातमी काढली. आता त्याला ती माहिती जाहीर करायची आहे. अशी माहिती जाहीर केल्याने या प्रकारास आळा बसेल, असा त्याचा (अंध)विश्वास आहे. इथवर (एक वेळ) समजून घेऊ.

(१) आता समजा, असा गौप्यस्फोट करण्याकरिता त्याने उद्या (उदाहरणादाखल) पाकिस्तानास पलायन केले, तेथे पाकिस्तानी दैनिकांस एकापाठोपाठ एक मुलाखती देऊ लागून तपशील उघड करू लागला, बिया सांडू लागला, झालेच तर भांडीही फोडू लागला, आणि शिवाय पाकिस्तानकडे आश्रयही मागण्याचा त्याने प्रयत्न केला, तर आपली प्रतिक्रिया काय राहील?

(२) पाकिस्तानऐवजी अन्य एखाद्या मित्र-, शत्रु- अथवा तटस्थ- राष्ट्रात जाऊन त्याने तेथे जर हेच उपद्व्याप केले, तर आपल्या दृष्टिकोनातून परिस्थितीत त्यामुळे कितपत क्वालिटेटिव फरक पडेल, असे आपल्याला वाटते?

सामान्य नागरिकांचा स्वातंत्र्य आणि खाजगीपणाचा हक्क पाळला जावा ह्यासाठी जगभरातल्या अनेक संकेतस्थळांनी आज स्वातंत्र्य आणि खाजगीपणावर आलेल्या निर्बंधांचा निषेध व्यक्त करायचं ठरवलं आहे. वर्डप्रेस, रेडिट, मोझिला अशी अनेक संकेतस्थळं ह्यात सहभागी आहेत. 'ऐसी अक्षरे'सुद्धा ह्यात सहभागी आहे. त्याविषयीचं एक चिन्ह तुम्हाला संकेतस्थळावर दिसेल. सामान्य नागरिकांसाठी 'रिस्टोअर द फोर्थ' हा उपक्रम आज हाती घेण्यात येणार आहे. तुम्ही अमेरिकेत असाल, तर ह्यात सहभागी होऊ शकता. त्याशिवाय 'स्टॉप वॉचिंग अस' ह्या नावानं एक याचिका अमेरिकन कॉंग्रेसकडे दिली जाणार आहे. त्यावर तुम्ही सही करू शकता. तुमच्या ब्लॉगवर किंवा संकेतस्थळावर तुम्हाला आपला सहभाग दाखवायचा असला, तर थंडरक्लॅप किंवा 'इंटरनेट डिफेन्स लीग' ह्या संकेतस्थळांवर त्यासाठी कोड मिळेल.

Not failure, but low aim is a crime. "आणि म्हणूनच आम्ही श्री. निकिता ख्रुश्चॉव्ह यांस असे बजावून सांगतो, की..." (हे दुसरे वाक्य पु.लं.कडून साभार. शब्दशः अचूक उतरले नसले, तरीही.)

नाही, ध्येय उच्च आणि उदात्त आहे, याबाबत वादास जागाच नाही. असो.

बाकी, या सर्व पर्यायांव्यतिरिक्त, फेसबुकावर कोठे ना कोठेतरी कशा ना कशालातरी 'लाइक' अथवा 'डिसलाइक' करण्याचा पर्याय योजूनही या बाबतीत आपला आवाज उठवण्याची काही व्यवस्था कदाचित करता यावी, असे सुचवू पाहतो. (स्वतः फेसबुकावर नसल्याकारणाने तसेच स्वतः फेसबुकनिरक्षर असल्याकारणाने, केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर केलेल्या या सुचवणीत काही तांत्रिक अथवा अन्य प्रकारच्या त्रुटी आढळल्यास, चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>विशिष्ट व्यक्ती संशयित आहेत म्हणून, ते संशयित असल्याचं रीतसर समर्थन कोर्टाकडे देऊन वगैरे मग त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचा हा प्रकार नाही.

एखादी व्यक्ती संशयित आहे असे कळल्यावर तिच्यावर पाळत ठेवली जाते की अशी पाळत ठेवल्यावर व्यक्ती संशयित आहे असे कळते?

पहिल्या प्रकाराचे समर्थन म्हणजे व्यक्ती अमुक (इथे जात/जमात/वंश/वर्ण काही असू शकते) आहे म्हणून ती संशयित आहे अशा स्वरूपाचे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आंतरजालावरच्या चर्चांमध्ये अनेकदा असं आढळतं की संदर्भचौकट लक्षात न घेता लोक मतं प्रकट करत राहतात. त्यामुळे थोडी संदर्भचौकट -

एखाद्या व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक संवादावर देखरेख ठेवण्यासाठी अमेरिकेत ज्या कायदेशीर बाबी पाळाव्या लागतात त्याविषयी इथे माहिती मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या मते ह्या पद्धतीची पाळत ठेवणं हे नागरिकांच्या खाजगीपणाचा भंग आहे. पोलिसांना त्यासाठी परवानगी मिळवणं हे सर्च वॉरंट मिळवण्यापेक्षा कठीण आहे. पण इथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की दहशतवाद रोखण्याच्या मिषानं असे कडक नियम ़झिडकारले जातात. शिवाय, वर जो मेटाडेटा गोळा करण्याचा मुद्दा आहे तो खाजगीपणाचा किती भंग करतो हे अनेकांच्या लक्षात येत नाही.

गार्डिअन - How the NSA is still harvesting your online data
अटलांटिक वायर - What Your Email Metadata Told the NSA About You

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हाहाहा स्नोडेन, विकिलिक्स, असांज मोठ्या मोठ्या बाता मारताय लेको माझ्या दोन प्रतिसादांनी तुमची इतकी फाटली की माझे ओरिजिनल लॉगीन बंद करुन टाकले? हाहहाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आले आले 'ऐसीअक्षरे' लॉगिन आले लगेच.. हीहीही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'स्टॉप वॉचिंग अस' ला 'स्टॉप शोईंग युअरसेल्फ' असं उत्तर मनात आलं- वॉचिग आणि शोइंग दोन्ही चालू रहाणार वाटतं. आणि नकळत वॉचिंग चालूच राहिलं-म्हणजे आज एक स्नोडेन होता उद्या नसेल- तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर विषयाशी संबंधीत आणखी एक रोचक लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!