---------------

इथे मी केलेल्या लेखनाखाली लेखक म्हणून मी एका सदस्याला त्याच्याबाबतचे मत सांगितल्याने दिलेले प्रतिसाद कसलीही सूचना न देता उडवण्यात आलेले आहेत.
इथे सर्वांना समान न्याय असेल असे मला लेखन करण्यापूर्वी वाटले होते, म्हणून मी इथे लेखन टाकले होते, ते आता काढून टाकत आहे.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

प्रतिक्रिया

प्रत्येक शब्द असा मनात नष्‍ट करुन नलीफाइड, व्हॉईड केला तर हे लक्षात येऊ शकेल.

मस्तच, . :beer:

अवांतर :- एक स्वानूभव देतो, आयूष्यातील एका निराशकाळी माझ्या मनात शब्दांविषयी असेच विचार निर्माण झाले होते शब्दांची रचना व त्या अनूशंगाने त्यांचे प्रचलीत उच्चार व अर्थ याच्या द्रूश्टीकोणातून ते स्वतःला एक्स्प्रेस करण्याचं एक साधन आहे म्हणून जी भावनीक घनता मनामधे लहानपणापासून साठली/जपली होती त्याच्या फोलपणाची प्रकर्शाने जाणीव होऊ लागली, तसच मला स्वतःला इलेक्ट्रीक किबोर्ड बर्‍यापैकी सूरात वाजवता येतो, त्यातल्या त्यात पियानो वाजवणं जास्त आनंददायी वाटायचं. आता तूम्ही लिहलेल्या शब्दात सांगायच तर ह्या पियानोचे स्वर का आनंद देतात याचा मी फार विचार करायचो (यप, नैराश्यात लोकं अजून बरच काही करतात हे तर काहीच नाही , पण हे असले विचार करतो/करायचो म्हणून यू कॅन कॉल मी साय्को नो इशू) त्यामूळे पियानोचे सूर खरच आनंद का देतात याच विचार करता करता मी त्याबाबत शून्य-कारण(ही एक वेगळी गंमत आहे) यापातळीला पोचतोय की काय अस वाटू लागलं, पण एकूणच यामूळे पियानोबाबत माझ्या संवेदनाच बधीर झाल्यात असा अनूभव आला (म्हणजे वाजवायला जमायचं, इतरांना ऐकायला आवडायच फक्त या कृतीत मलाच मज्या येत न्हवती, निरर्थक वाटायच), व मी त्यातील स्वारस्यच गमावून बसलो पण या सगळ्या कालखंडाला आयूष्यातल्या काही अपयशांची कीनार होती म्हणूनच कदाचीत शब्द असो की पियानोचे सूर ते नलीफाइड होऊ शकतात/वाटू शकतात ही जी जाणीव निर्माण झाली होती त्याप्रमाणे खरच घडाव असं मात्र वाटत नसल्याने व्हॉईड होणं/त्या अवेस्थेत जाणे जाणीवपूर्वक टाळलं गेलं. तसं घडाव अस न वाटण्यामागच कारण निराशेत आपण शांतता वा मौन न्हवे तर चैतन्य, आनंद, सूख या गोश्टीच्या मागे धावतो, निराश मनाला मौन व शांतता या वेळी म्रूत्यूवत भासू लागतात, तर तृप्त समतोल मनाला अल्हाददायी भासू शकतात. पण आपलं हे लिखाणमात्र नैराश्याच्या संदर्भातून आलेलं वाटत नाही म्हणूनच फार सूंदर वाटतयं, थोडस वेगळ्या संदर्भाने नॉस्टेल्जीकही बनवत आहे.

अतिअवांतर : गणितीय संख्यांच नलिफीकेशन अधोरेखीत करणारा गूर्जींचा उपक्रमवरील "संख्यांच मिथक" वगैरे असच काही लिहलेला "उत्क्रांतिवादखण्डन आणि डायनोसोरचे मिथक" वर लिहलेला विडंबनात्मक लेख आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(म्हणजे वाजवायला जमायचं, इतरांना ऐकायला आवडायच फक्त या कृतीत मलाच मज्या येत न्हवती, निरर्थक वाटायच), व मी त्यातील स्वारस्यच गमावून बसलो

सेम हिअर.
एक्सिरियन्सींग स्ट्रक्चर चालू क्षण, कृती, ध्वनिशी फिट्ट बसलं की तो क्षण, कृति किंवा ध्वनि ते ओलांडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्द म्हणजे जगाच्या औपचारिक/स्वेच्छेने ठरवलेल्या घटकांची (कन्व्हेन्शनने किंवा आर्बिट्ररिली ठरवलेल्या घटकांची) औपचारिक चिन्हे (कन्व्हेन्शनने ठरवलेली चिन्हे) आहेत, हे मान्य. तो उपचार/कन्व्हेन्शन अमान्य केले तर सध्याच्या शब्दाचा जगातील घटकांशी संबंध राहात नाही, तेही खरे.

मात्र कुठलेही चिन्ह चालू शकेल. उदाहरणार्थ नि:शव्द स्वप्नातील "घटना" घटते, ती सुद्धा मनातील चिन्हव्यवहारच असतो. हे व्यक्तीच्या अंतर्गत. वेगवेगळ्या व्यक्तींच्या मध्ये आपापसात वेगवेगळी चिन्हे चालतील. लहान मुले सुद्धा नि:शब्द वाकुल्या-वगैरे चिन्हे वापरू शकतात.

विचारांचा ब्रम्हराक्षस पुरता मारायचा असेल तर मौनापेक्षा हाराकिरी, अफूची मोठी मात्रा खाणे, वगैरे उपाय अधिक तडकाफडकी कार्यक्षम होत. फार त्वरा नसेल, तर सबुरीचा साधा मार्ग त्यातल्या त्यात सुखावह आहे. एखाद्या व्यक्तीने शंभर-दीडशे वर्षे शांतपणे वाट बघण्याचे ठरवले, तर बहुधा त्या मुदतीच्या आतच कधीतरी त्या व्यक्तीच्या विचारांचा ब्रम्हराक्षस मरून जाईल.

मला हे पटते की केवळ उपचाराने ठरवलेले जगाचे कित्येक घटक हे जग जाणण्याकरिता निरुपयोगी असू शकतील. त्यांच्यासाठीचे शब्द आणि त्यांच्याबाबतचे संवाद निरुपयोगी असतील. मात्र हा शब्दांचा दोष नव्हे. किंवा शब्द औपचारिक चिन्हे असल्याचा नव्हे. जगाचे तसे कुठले घटक आहेत हा उपचार आधी ठरतो - तो मुळातला दोष - आणि एकदा का तसा कुठला घटक असल्याचे ठरवले, तर त्यासाठी चिन्ह म्हणून शब्द रिवाजाप्रमाणे मिळून जातो.

अंतर्मुख ऊहापोहासाठी मौनाचा फायदा असला, तरी शब्द/सांकेतिकता वगैरे यांच्याबाबतचे वरील तात्त्विक विवेचन अनाठायी आहे. इतकेच काय, मनाने केलेल्या जगाच्या खोट्या घटकांच्याबाबत शब्दांच्या साहाय्याने देखील "मिथ्या" असा निर्णय करता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम शब्दांतून प्रतिमा तयार होते की प्रतिमेतून शब्द? लहान मूल बोलायला लागते किंवा शब्द शिकते तेव्हा त्याच्यासमोर आधी प्रतिमा असते आणि त्या प्रतिमेला शब्द लावला जातो. लहान मुलांना शिकवतानाही आधी चित्र दाखवलं जातं आणि नंतर त्याच्यासोबत येणारा शब्द शिकवला जातो. तेव्हा शब्द फोडून टाकला म्हणून प्रतिमा डोळ्यासमोर येणार नाही हे पटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या प्रतिमांचं अस्तित्त्व हेच शब्दांचं अस्तित्व आहे. मनातून प्रतिमा पुसून टाका, शब्द पुसला जातो.
(वरच लिहीलेलं आहे बघा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारसं कै समजलं नै पण काहीतरी गोल गोल फिरवुन सांगताय असा संशय आला. कोणीतरी माझ्यासारख्या अडाण्याला समजेल अशा भाषेत काय लिहिलंय ते सांगेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

णीट दोणदा वाचा ते मग बरोबर डोक्यात शिरेल.( ह्.घ्यालच)
टार्‍या रडवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

धनंजयशी सहमत,

शब्द हे केवळ माध्यम आहेत, विचार आणि आचार व्यक्त करण्याचे माध्यम.पण कदाचित तुम्हाला विचार-विरहित अवस्था असेच म्हणावयाचे असेल, ते कदाचित तुमच्या संदर्भात ते योग्यही असेल, पण कदाचित शब्द नष्ट करत असताना तुम्हाला हे जाणवेल की त्या शब्दांमागचे विचार हे जाणिवेचे/ज्ञानाचे प्रतिबिंब आहे, ते ज्ञान नष्ट झाले की विचार नष्ट होतिल, पण कदाचित अपूर्ण ज्ञान हे भंडावून सोडणार्‍या असंख्य विचारांचा स्त्रोत आहे.., युजींना अपेक्षित मोक्षाची व्याख्या काय आहे हे मला माहीत नाही, तुम्ही वर दिलेल्या लेखावर हे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युजींबाबत -

थोडक्यात जगाला जाणून घेण्‍यात किंवा जगाबद्दल समजाऊन सांगण्‍यात शब्दांवर त्यांची भिस्त नाही.........................पण युजी हे काही शब्दांचे फटकारे मारुन रजनीशांप्रमाणे सुंदर-सुंदर, लोभस चित्रे उभे करु शकणारे निष्‍णात चित्रकार नाहीत. युजींनी केलेला शब्दांचा वापर हा यांत्रिक आहे,

धनंजयबाबत -

सर्वप्रथम सांगू इच्छितो की मला नेहमीच तुमची भाषाशैली, वाक्यरचना अत्यंत बुकिश, मानवी मेंदूतुन बाहेर न पडता एखाद्या यंत्रातून बाहेर पडल्यासारखी वाटते. अतिशय शुष्क आणि मनोरंजकतेचा अभाव असलेली.

युजी ~ धनंजय?
यशवंत कुलकर्णी आणि धनंजय - दोघांनीही कृपया हलकेच घ्यावे.

अवांतर -
@यशवंत कुलकर्णी - खरे सांगायचे तर 'आपली विचार करण्याची भाषा इंग्रजी आहे आणि आपण मराठीत लिहायला शिकत आहोत' हे धनंजयांनी आपल्या जाल-पदार्पणानंतर लगेच उघड केले होते.
(त्याकाळी तुम्ही जालावर येत नव्हता.) त्यांची मराठी सुगम, सुंदर नसली तरी तिच्या वापरातून मांडलेले विचार हे एक वेगळे भान आणून देत असतात. आपल्याला विनंती आहे की त्यांचे प्रतिसाद टाळू नका. प्रथदर्शनी क्लिष्ट आणि डोक्याला तापदायक वाटणारे त्यांचे प्रतिसाद बहुतेक सर्व वेळेस मूलभूत विचार सुचवणारे असतात. ते पटोत - न पटोत पण विचारात घेण्यासारखे तरी नक्कीच असतात, हा स्वानुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनाना आपल्या सल्ल्याबाबत आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजयांच्या प्रतिसादातील -

एखाद्या व्यक्तीने शंभर-दीडशे वर्षे शांतपणे वाट बघण्याचे ठरवले, तर बहुधा त्या मुदतीच्या आतच कधीतरी त्या व्यक्तीच्या विचारांचा ब्रम्हराक्षस मरून जाईल.

-हे वाक्य अत्यंत विनोदी वाटले. हसता हसता पुरेवाट नसली तरी अगदी कोर्‍या चेहर्‍याने केलेला वैचारीक विनोद. म्हणजे मराठीत सांगायचं तर - 'टंग इन चीक' विनोद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा ठळकपणे मांडण्यासाठी. कारण मला तेच सांगायचे आहे.

@यशवंत कुलकर्णी - खरे सांगायचे तर 'आपली विचार करण्याची भाषा इंग्रजी आहे आणि आपण मराठीत लिहायला शिकत आहोत' हे धनंजयांनी आपल्या जाल-पदार्पणानंतर लगेच उघड केले होते.
(त्याकाळी तुम्ही जालावर येत नव्हता.) त्यांची मराठी सुगम, सुंदर नसली तरी तिच्या वापरातून मांडलेले विचार हे एक वेगळे भान आणून देत असतात. आपल्याला विनंती आहे की त्यांचे प्रतिसाद टाळू नका. प्रथदर्शनी क्लिष्ट आणि डोक्याला तापदायक वाटणारे त्यांचे प्रतिसाद बहुतेक सर्व वेळेस मूलभूत विचार सुचवणारे असतात. ते पटोत - न पटोत पण विचारात घेण्यासारखे तरी नक्कीच असतात, हा स्वानुभव आहे.

याउप्पर धनंजयसाठी - हल्ली तुझी भाषा खरोखर यांत्रीक होत चालली आहे. काही उपाय करच. कारण या तांत्रीक बाबीमुळे तू मांडलेले आशयाने महत्त्वाचे मुद्दे मागे पडतात आणि तसे होऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.

अंतर्पटल म्हणजे नक्की काय ?
त्या पटलावर प्रतिमानिर्मिती होऊ शकत नाही म्हणजे नक्की काय ?
शब्दांतून प्रतिमा निर्माण होत नाही म्हणजे नक्की काय ? उदा. "कृष्ण" किंवा "मूर्ती" यापैकी एखादा शब्द उच्चारला तर त्यातून कसलाही अर्थबोध होत नाही, असे म्हणायचे आहे का ?

एकेका वाक्याची ही गत. त्यामुळे संपूर्ण लेखातून काय झालं असेल याची कल्पना करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हल्ली मी अध्यात्म काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत कोणी या मार्गाने गेलं का नाही याचा अभ्यास मी केलेला नाही पण माझ्यापुरता हा मार्ग मी शोधून काढते आहे. तो मार्ग चित्रभाषा शिकण्याचा. सर्वप्रथम मी सोपी चित्रं, म्हणजे ज्याला चित्र म्हणतात तशी चित्र बघायला सुरूवात केली. सामान्य लोकं ज्याला impressionism म्हणतात ती चित्रं. अशी चित्र पाहून पाहून मला त्या चित्रकारांना काय म्हणायचं होतं हे समजत गेलं. उदा: फ्रान्सिस्को गोया याचं डेड फिश हे चित्र. स्पेन आणि फ्रान्सच्या युद्धानंतर काढलेल्या या चित्रातून गोयाने युद्धातली हिंसा, त्यानंतर उरणारा आक्रोश इत्यादींवर या चित्रातून टिप्पणी केली आहे. पण हे सगळं अगदी उथळ, वरवरचं आहे असं वाटण्यामागचं कारण या लेखावरून समजतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यशवंत कुलकर्णी यांचा एक प्रतिसाद तीनदा पुनरावृत्त झाल्याने मी अधिकचे प्रतिसाद उडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते तीन्ही प्रतिसाद आणि त्याखाली असलेले ऋषिकेश चे प्रतिसाद उडले. याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. कुलकर्णी यांनी आपले लेखन पुन्हा एकदा मूळ धाग्यात आणावे अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.