प्रेम - दोन कविता
सुवर्णमयी
कवयित्री - सुवर्णमयी
या उंच कड्यावर
उभारलेलं घर
कोसळेल
केव्हातरी
कुणी बुलडोझरचा
धक्का देईल तेव्हा
या छोट्या दगडांच्या
चित्राचं काय होईल?
न जुमानता
विखुरलेले
एका ठिकाणी
गोळा केले
नीट रचले
इथं नवं काही
होईलही
नव्या माणसांना
त्या वेळी या
दगडांकडे पाहून
काही कळेल का?
कसे असतील ते दगड
काय करतीत ते त्यांचं?
गृहित धरलेले
सर्व तुटते
दूर जाते
विसंगत दिसणारं
राहतं काही शिल्लक
अनपेक्षितपणे
प्रेमाचं हे
एक वास्तव आहे !
--
ती
धुरकट सावलीच्या सोबतीनं
ज्वालामुखी
बघते
अंधार्या गर्भातून
येणारा ध्वनी
कसा विरतो ते
ऐकते
त्या कल्लोळात
वाजणारी वाद्यं
खोटीच!
बेसूर भासतात ती
दूरवर
कोसळत असतो
टपावर
गच्चीवर
कौलांवर
तिच्या नावाचा
पाऊस
ताल धरून
आवडल्या.
दोन्ही कविता आवडल्या. सध्या इतकंच नोंदवते.