एक कविता, आणि तिचं भाषांतर
जयदीप चिपलकट्टी
मी काही तासांपूर्वीच सदस्य झालो आहे. सर्वांना नमस्कार. ऑगडेन नॅशची एक कविता, आणि त्यानंतर मी केलेलं तिचं भाषांतर:
The one-l lama,
He's a priest.
The two-l llama,
He's a beast.
And I will bet
A silk pajama
There isn't any
Three-l lllama.
❈
एक ट अटल
झाला पंतप्रधान
दोन ट अट्टल
चोरापासून सावधान
पण देईन मी बक्षीस
सोनं एक क्विंटल
जर असेल कुठे जगात
तीन ट अट्ट्टल
❈ ❈
उत्तम!
उत्तम शब्दांची निवड! मजा आली. स्वागत आहे.
मात्र मुळात जशी घट्ट लय आहे, तशी कुठली मराठमोळी लय राखता आले असते, तर अधिक मजा आली असती :
एका टचा अटल
झाला पंतप्रधान
दोघ्या टंचा अट्टल
चोर! ... सावधान!
पण देईन बक्षीस
सोन्याचा क्विंटल
सापडला जर जगात
तिघ्या टंचा अट्ट्टल
कविता
मजेशीर मूळ कविता आणि भाषांतर. भाषांतर कसं असावं याचा एक उत्तम वस्तुपाठ.
ता क. नवीन सभासदाचं स्वागत.
ता ता क : तीन ट वरून आठवलं. "आमच्या काळी" , म्हणजे आम्ही पौगंडावस्थेत होतो तेव्हा - एका नटीबद्दल म्हणायचो : पूजा भट्ट, घट्ट, मठ्ठ.
एक अतिअवांतर प्रतिसाद : प्रस्तुत कवितेमधे जो शब्दांचा - शब्दांचा नव्हे तर अक्षरांचा - खेळ आहे त्यावरून आमचे इथले मित्र धनंजय यांची काही वर्षांपूर्वी वाचलेली कविता आठवते आहे. कोकणच्या माणसांना हा कोकणी सल्ला जरा अधिक आवडेल ;-)
कोल्हापूरचा कोल्हे वाणी
पोलादपूरला सोलें आणीं
"सल्ला सच्चा , सोळा आणे :
सोलापूरला पोलाद नेणें"