ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट: अर्थात आपल्या परसातील पक्ष्यांची मोजणी
येत्या १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या दरम्यान जगभरात 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट' होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही थोर करायचं नाहिये तर या चार दिवसांत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जे जे पक्षी दिसले त्या त्या पक्षांची नोंद करून ती तुम्ही www.ebird.org वर करायची आहे.
कोणताही पक्षी असो, कुठेही दिसला असो. या दिवशी तुम्ही घरी असा, ग्यालरीत असा नाहितर बागेत नाहितर जंगलात, पक्षी हे हमखास दिसणारच (कै नै तरी कावळा/चिमणी आहेतच). तुम्हाला लगेच दुर्मिळ पक्षी दिसेल असे नाही पण असं ठरवून पक्षी बघायचा प्रयत्न केल्यावर तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपण कुठेही असलो तरी सभोवताली किती प्रकारचे जीव/पक्षी असतात.
यासाठी आपल्याला ऐसीअक्षरेवर असं करता येईल:
१. या चार दिवसांत तुम्हाला दिवसाच्या १२-१४ तासांपैकी (तुम्ही जंगलात/झाडेअसणार्या जागी असाल तर रात्रीचे तासही आहेत) कोणतीही १५-२० मिनीटे निरिक्षण करायचे आहे आणि त्या दरम्यान तुम्हाला कोणते पक्षी दिसताहेत याचा अंदाज घ्या.
२. पैकी जे पक्षी माहितीतले आहेत, त्यांचे नाव लिहून ठेवा, साधारण किती संख्येने दिसले ते लिहा व ढोबळ वेळ लिहून घ्या
३. पैकी जे पक्षी कोणते ते माहिती नाही, त्यांचा शक्य असल्यास पक्ष्याचा फोटो काढा. नाहितर त्यांचे वर्णन लिहून घ्या (मुख्यतः आकार, स्वरूप/फ्यामिली, रंग [अंगाचा/चोचीचा, पंखांचा, पोटाचा, पंखाखालचा - जितके नोटीस कराल तितके सोपे], ऐकु आल्यास आवाज, दिसल्यास घरट्याचा आकार वगैरे)
४. मग ऐसीअक्षरेवर पक्षाचा फोटो किंवा वर्णन टाका आपण सगळे मिळून त्या पक्षाचं नाव शोधायचा प्रयत्न करूयात.
५. त्या व्यतिरिक्त जे पक्षी तुम्ही ओळखले आहेत त्यांच्याबद्दलही ऐसीवर लिहा.
चला तर तयार रहा, १४ तारीख दूर नाही!
टिपः
१. १४ फेब्रुवारीला सर्रास दिसणार्या लव्हबर्डस ना या गणनेतून वगळले आहे ;)
२. यात जगभरतून कोणालाही सहभागी होता येईल. भारतात असायची पूर्वअट नाही.
मोल्सवर्थप्रमाणे...
सारंग (p. 847) [ sāraṅga ] m (S) A Rág or mode of music. See राग. 2 In Sanskrit this word signifies numerous animals and things, for some of which it will frequently appear in Prákrit poetry; viz. A deer, a peacock, a serpent, a lion, the bird Chátaka, an elephant, the flamingo, a tree, a garment, Kámadewa or Cupid, a bow, a lotus, a jewel, gold, sandal, a flower, light, a cloud, camphor.
आपण ज्याचा उल्लेख करत आहात तो मासा बहुधा सरंगा असावा, सारंग नव्हे. (चूभूद्याघ्या१.)
-------------------------------------
१ 'कारण शेवटी आम्ही...' इ.इ. - पु.ल.
सारंग शब्दाच्या अर्थाबद्दल
सारंग शब्दाच्या अर्थाबद्दल आमचे ज्ञान तुटपुंजे आहे.
सारंगनयन म्हणजे मासोळीसारख्या आकाराचे लांब निमुळते डोळे असलेला असे ऐकले होते. (खाण्याचा सरंगा मासा वेगळा. त्याच्या आकाराचे डोळे विशेष वर्णन करण्याजोगे असतील असे वाटत नाही. )
आमच्या डॉक्टरांचा सारंग नावाचा कम्पाउंडर होता. त्याच्या नावाचा अर्थ मासा असे (मासे न खाणार्या) डॉक्टरांनी सांगितले होते.
जाता जाता, शारंगपाणी आडनाव असते, त्याचा अर्थ काय्? शारंग म्हणजे धनुष्य का?
हम्म्म...
तसे त्या 'सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन, मधुर तुम्हारे मिलन बिना दिन कटते नहीं रैन' गाण्याच्या अर्थाबद्दलसुद्धा आम्ही अंमळ कन्फ्यूज़्डच आहोत. (नेमक्या कोणाच्या आठवणीत?)
आमच्या डॉक्टरांचा सारंग नावाचा कम्पाउंडर होता.
हात् साला!
'सारंग' नावाच्या कोणाचाच दाखला द्यायचा होता, तर कमलाकर सारंग, झालेच तर लालन सारंग वगैरे ओस पडले होते काय?
("कमलाकर सारंग, लालन सारंग यांच्या आडनावाच्या अर्थाबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. कोणीसे सांहितले, की त्याचा अर्थ 'मासा' असा होतो, म्हणून." पहा, थोड्याशा नेम्सड्रॉपिंगने वाक्य कसे भारदस्त होते की नाही? बरे, यात 'खोटे' म्हणता येण्यासारखे - किमान, 'खोटे' म्हणून सिद्ध करता येण्यासारखे - असेही काही नाही. होते तुम्हाला कुतूहल! नाहीतर, डॉक्टर काय, कंपाउंडर काय? छ्या:!)
शारंग म्हणजे धनुष्य का?
कल्पना नाही. पाहून सांगतो.
अहो नेम ड्रॉप करायला आमचे
अहो नेम ड्रॉप करायला आमचे डॉक्टर कोणी भाषातज्ञ नाहीत. आणि आमचे अज्ञान तर आधीच कबूल केले आहे. पण आजवर, त्यांचा कंपाऊंडर ह्या एकाच व्यक्तीचे नाव, आडनाव नाही, मी सारंग असल्याचे ऐकले आहे. ते वरील अनेक अर्थांपैकी कुठल्या अर्थाने होते कोण जाणे. तसेच 'माझ्या सारंगा...' गाणे.
शारंग नव्हे शार्ङ्ग (अवांतर)
शारंगपाणी नव्हे, शार्ङ्गपाणि असा शब्द आहे. शार्ङ्ग = धनुष्य. (शृंग असाही अर्थ होतो असे कोठेतरी वाचल्याचे आठवते.)
त्यामुळे शार्ङ्गपाणि = धनुर्धारी. अर्थात शार्ङ्गचा शारंग असा अपभ्रंश होणे फारच शक्य आहे.
---
'शार्ङ्गरव' या नांवाचे एक पात्र चंद्रप्रकाश द्विवेदींच्या 'चाणक्य' या मालिकेत होते. त्यामुळे शार्ङ्ग नांवाचा पक्षी असण्याची शक्यता बरीच आहे. त्यावरून सारंग झाले असल्यास कल्पना नाही.
धन्यवाद. हे माहित नव्हते.
धन्यवाद. हे माहित नव्हते. म्हटले न, आमचे ज्ञान तुटपुंजे आहे.
शार्ङ्गरव, हे पक्ष्याचा आवाज किंवा धनुष्याचा टणत्कार अशाही अर्थाचे नाव असू शकेल. माणसाचे नाव म्हणून जरा विचित्र अर्थ वाटेल , पण मालिका / साहित्यकृतीत चालते. (शारंगपाणी आडनाव मात्र 'शार्ङ्ग' वाले नसते. )
मग सारंगनयन = शार्ङ्गनयन म्हणजे कुठल्यातरी पक्ष्यासारखे डोळे असलेला? फार सुंदर वाटत नाही. शिवाजीमहाराजांच्या भेदक डोळ्यांना, ते गरुडासारखे होते असे म्हटले जाते. कदाचित तशा कुठलातरी खास नजरेच्या पक्ष्याचे नाव असावे.
हॉटेल मालवण समुद्र
चिंचवडमधील मालवण समुद्र या हॉटेलाचे (रेष्टॉरंटाचे) पूर्वीचे नाव हॉटेल सारंगा असे होते व त्यावर माशाचे चित्र होते असे आठवते. त्यावरुन व दर्यासारंग वगैरे पदव्या, माझ्या सारंगा - राजा सारंगा वगैरे कोळीगीते वगैरे ऐकून सारंगा हे माशाचेच नाव आहे असा समज झाला होता तो या निमित्ताने दूर झाला. सारंगा म्हणजे (मासा वगळता इतर कोणताही ) प्राणी ही मोल्सवर्थमधील टिप्पणी पाहून तर आश्चर्यच वाटले.
ठाणे - फ्लेमिंगो
ठाण्यातील मंडळी जर खाडीच्या (मुलुंड-ऐरोली / जुनाही चालेल पण मुऐब्रिजवरून बराच चांगला व्ह्यू आहे) ब्रीजवर उभी राहु शकली (वास सहन करत) तर त्यांना फ्लेमिंगोंचे मनसोक्त दर्शन व्हावे. थंडीत ते तिथे मोठ्या संख्येने दिसतात.
दहा-पंधरावर्षांपूर्वी जेव्हा तिथे फक्त मिठागरे होती तेव्हा बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी तर्फे तिथे फ्लेमिंगो ऑबझर्वेशन मेळावेही भरत. (एका मेळाव्याला मला माझा मामा घेऊनही गेला होता) आता कल्पना नाही
घरासमोरच मोठ्ठा बगिचा आहे.
घरासमोरच मोठ्ठा बगिचा आहे. आताच टेरेसवरुन ५ ७ मिनीट निरीक्षण केल. कबुतर ६, बुलबुल ३, कावळा २, कोतवाल १, पाकोळी २, एक चिमणीसारखाच पण थोड पिवळट पोट, हिरवट पाठ, शेपटी चिमणीपेक्षा लांब, वर गेलेली, ट्विट ट्विट आवाज होता. आणि बेस्ट म्हणजे एक चिमणीपेक्षा बराच छोटा, खूप चमकदार पक्षी दिसला. त्याचा फिरता रंग होता निळा-काळा. खूप मस्त कलर!
परत दुपारी निरीक्षण करेन.
एक चिमणीसारखाच पण थोड पिवळट
एक चिमणीसारखाच पण थोड पिवळट पोट, हिरवट पाठ, शेपटी चिमणीपेक्षा लांब, वर गेलेली, ट्विट ट्विट आवाज होता. आणि बेस्ट म्हणजे एक चिमणीपेक्षा बराच छोटा, खूप चमकदार पक्षी दिसला.
यावरून सदर पक्षी शिंपी असावा असे वाटते. पुढे चित्र देत आहे.

पानांचा शोऊन तो घरटे करतो म्हणून त्याला शिंपी म्हणतात. इंग्रजीतही टेलरबर्ड म्हणतात
एक चिमणीसारखाच पण थोड पिवळट
एक चिमणीसारखाच पण थोड पिवळट पोट, हिरवट पाठ, शेपटी चिमणीपेक्षा लांब, वर गेलेली,
बरीच शक्यता म्हणजे खालील फोटोतला टेलर (शिंपी)

फोटो: www.indianaturewatch.net येथून.
आणि बेस्ट म्हणजे एक चिमणीपेक्षा बराच छोटा, खूप चमकदार पक्षी दिसला. त्याचा फिरता रंग होता निळा-काळा. खूप मस्त कलर!
चिमणीपेक्षा खूप छोटा आणि फिरत्या रंगाचा.. जर चिमणीइतकाच म्हणाला असतात तर आणखी काही ऑप्शन वाटला असता पण या वर्णनावरुन बेस्ट गेस पर्पल सनबर्ड (शिंजीर).

फोटो: www.birding.in येथून.
येत्या पावसाळ्याच्या
येत्या पावसाळ्याच्या सुरवातीला जरा वेळ मिळाला / वेळ काढून बागेत जाऊन शिंप्याचं घरटं शोधायचा प्रयत्न कर. जमिनीपासून ४-६ फुटांवरच, लांब पानांच्या एखाद्या झुडपात/लहान उंचीच्या झाडावर हे घरटे दिसेल. २-३ पाने वळवून, त्याला टिप घालून आत कापूस, काथ्या वगैरेच्या दुलईवर तुझे नशीब असेल तर घातलेली अंडीही बघता येतील
माफ करा, पण...
२-३ पाने वळवून, त्याला टिप घालून आत कापूस, काथ्या वगैरेच्या दुलईवर तुझे नशीब असेल तर घातलेली अंडीही बघता येतील
...घातलेली अंडी बघता येण्याकरिता, २-३ पाने वळवून, त्याला टिप घालून आत कापूस, काथ्या वगैरेच्या दुलईवर नशीब असण्याची पूर्वअट अंमळ जास्तच होत नाही का?
चालेल. चांगली वेळ सकाळची
चालेल.
चांगली वेळ सकाळची जेव्हा पक्षी अतिशय लगबगीत असतात + कोवळं उन त्यांना आवडतं,
नाहितर संध्याकाळी ४-५ वाजल्या नंतर जेव्हा ते अन्न शोधायचा शेवटचा चान्स घेत असतात, अंधार पडल्यावर रात्रीत कोणी साप खाणार नाही या आशेवर बिचारे एखाद्या फंदीवर गपचिप असतात. तसे त्यांपैकी अनेकांना रात्री फारसे दिसतही नाही
उत्तम. मी या काळात बघितलेले
उत्तम.
मी या काळात बघितलेले बक्षी
१. कावळा, चिमणी, पारवे, साळुंख्या, कोतवाल हे रोजचे दिसत होतेच
२. खंड्या
३. वेडा राघु
४. सातभाई
५. सनबर्ड्स प्रकारातः फुल्टोचा, शिंजीर, एक निळा-पांढरा सनबर्ड (निळे डोके, पांढरे अंग चिमणीहून किंचित लहान, चोच फुल्टोचासारखी किंचित बाकदार) - हा कोण माहित्ये का? ठाण्यातच दिसला
६. पोपट
७. हरितालक (पुन्हा ठाण्यातच, फटु नै आलाय नीट, दुसरा आधीच काढलेला फोटो मागवलाय)
८. घार
९. लालगाल्या आणि लालबुड्या असे दिन्ही बुलबुल
१०. बगळ्यांचे ठिपके - नीट आकार कळला नाही, उंचावर होते.
११. पाणकोंबड्या
आमच्या नोंदी
माहितीबद्दल धन्यवाद. आमच्यातर्फे सायटीवर खालील पक्षांची नोंद करण्यात आली.
तारीख १४ फेब्रु. वेळ सकाळी ७ ते ११
१) पारवे (होय होय, तेच ते त्रासदायक इ.इ.)
२) कावळे
३) बुलबुल (रेड वेन्टेड)
४) शिंपी (टेलरबर्ड)
५) मैना
६) चिमण्या
७) कोतवाल (ब्लॅक ड्रोंगो) - ह्याचा फक्त आवाज ऐकला. प्रत्यक्ष दिसला नाही. तशी नोंद सायटीवर केली आहे)
खरे तर, सन बर्ड यावेत म्हणून नेहेमीच काही जास्वंदी झाडावर ठेऊन देतो. पण पठ्ठे फिरकलेच नाहीत!
हा तपकिरी होलाच आहे.
http://apalanisargmitra.blogspot.in/2013/02/laughing-dove.html.
हा तपकिरी होलाच आहे. महाराष्ट्रात दिसतो. मला हैदराबादमध्ये दुपारी २:३० वा. जोडी दिसली.
लिटल ब्राउन डव्ह आणि लाफिंग
लिटल ब्राउन डव्ह आणि लाफिंग डव्ह हे एकच आहेत.
मराठीत "होला" हेच नाव योग्य आहे.
याचाच व्हेरियंट स्पॉटेड डव्ह ("कवडा होला" - कवडा = ठिपकेवाला) हाही दिसतो महाराष्ट्राच्या परिसरात.
आणखी एक रिंग्ड डव्हही असते. त्याचे मराठी नाव विसरलो मानेवर अर्धे वेटोळे असावे तशी काळी रिंग असते.
चिमणीपेक्षा थोडा मोठा पक्षी
चिमणीपेक्षा थोडा मोठा पक्षी आहे. हिरवा रंग, झाडाच्या पानांसारखा. आणि उडताना त्याचे पंख तपकिरी दिसतात. पंखांची शेपटीकडची जी बाजू आहे तिला काळी बॉर्डर दिसते. डोकपण बहुतेक किँचीत तपकिरीच आहे. चोच लांब टोकदार आहे. उडताना पाकोळीसारखा आकार दिसतो याचा, चिमणी कावळ्यापेक्षा वेगळा.
आणि एक साळुंकीएवढाच आकार आहे पण रुंदीने कमी आणि लांबीने जास्त. करडी पाठ आणि पांढरं पोट.
वेडा राघु
होय चिमणीपेक्षा जरा मोठा असतो. तोच असावा. अनेकदा जोड्याने वा गटानेही फिरतात. हे झाडांपेक्षा वायर्स, दिव्याचे खांब अश्या मोकळ्या जागी अधिक वेळा दिसतात (रादर तिथे बसल्यावर सहज दिसून येताता)
या प्रतिसादात फोटो आहे वर.
यांची गंमत म्हणजे हे दगडांत/फुटक्या भिंतीत वगैरे घरटे करतात. अनेकदा एखाद्या भितीच्या जरा मोठ्या भेगेतून हे महाशय बाहेर येताना दिसतील. आजुबाजुला बांधकाम/पडक्या भिंती असतील तर लक्ष ठेव.
टिटवी फार हुषार असते. आपण
टिटवी फार हुषार असते. आपण दिसलो ना की बरोब्बर घरट्याच्या विरुद्ध दिशेला धावते जणू काही तिकडेच तिचे घरटे आहे असे वाटावे म्हणुन.
टिटवीचे मखमली टीएनएजर (बहुतेक) पिल्लु उचलून हातात घेतलय एकदा मी, इथे बहुतेक कॅलिफोर्नियात होते. पाणथळ जागेत आई आणि दोन पिल्लं फिरत अन्न शोधत होती. मात्र लगेच सोडलं ते उंचाड्या पायांनी तुरुतुरु आईकडे धावत गेलं.
.

फोटो स्रोत - https://www.pinterest.com/pin/87538786477447160/?lp=true
या पक्षाचे इंग्रजी नाव काय ?
या पक्षाचे इंग्रजी नाव काय ? टिटवी आहे का ती ? या फोटोतील पक्ष्याच्या पायाकडे बघून शंका येत आहे .
महाराष्ट्रात टिटवीच्या तीन प्रजाती असाव्यात त्यातील रेड wattled lapwing ही सर्वात कॉमन. (कॉमन म्हणजे अगदी आमच्या कॉलेज च्या छप्परावर घरटे करे , दर वर्षी. अवांतर: त्याचा तथाकथित अभ्यास/निरीक्षण करून एक तथाकथित पेपर एका जर्नलात पाडल्याचे स्मरते.
निरागस काळ.)
सॅन्डपायपरला मराठीत तुतारी
सॅन्डपायपरला मराठीत तुतारी असे नाव आहे. याच्याही किमान दोन जाती आहेत. इकडे . ( अवांतर : आणि पूर्वी या जातीची एक बिअरही मिळे. फारशी आवडली नव्हती. सध्या खंड्या जातीच्या बिअरने बाकी प्रजाती जवळ जवळ नामशेष केल्या आहेत. असो.) पक्षी wader आहे. ( त्याच्या पावलांच्या विशिष्ट आकारा मुळे शंका आली होती...)
टिटवी म्हणजे lapwing.
पाणपक्षी वि. रानपक्षी
पाणपक्ष्यांहून रानपक्षी आवडतात
रानपक्ष्यांनध्ये (गविंनी वापरलेला शाखारोही शब्द फार सुरेख आहे) अतोनात रंगांची उधळण असते. याउलट पाणपक्ष्यांमध्ये तितकेसे flamboyant रंग दिसत नाहीत. नर-मादी देखील रानपक्ष्यांत मला वाटतं वेगळे जितके ओळखु येतात तितकेसे पाणपक्ष्यांत नाही येत. अवाज, शीळ यातही रानपक्षी सरस आहेत.
.
पक्षीतद्न्य डॉ. सलीम अली व श्री. किरण पुरंदरे हे चटकन आठवतात.पुरंदरे यांचे लेखन मनस्वी आवडे. त्यांना (मासिकात पत्ता सापडल्यावरती) पाचवीत असताना, पक्ष्यांच्या पिल्लांचे अत्यंत गोंडस ग्रीटिंग दिवाळीनिमित्त मी व माझ्या मैत्रिणीने पाठवले होते.
.
बर्डलव्हर्स अँथॉलॉजी (http://www.aisiakshare.com/comment/73283#comment-73283) माझ्याकडील हे दुर्मिळ जुने पुस्तक निव्वळ आनंदाचा ठेवा आहे.
_______________
मारुती चितमपल्ली हे फक्त पक्षीनिरीक्षक नव्हते ते वन्यजीव निरीक्षक म्हणता यावेत. याकारणाने त्यांचा उल्लेख टाळला होता. त्यांचा धडा होता ना आम्हाला.
किरण पुरंदरे सहव्यसनी , जुना
किरण पुरंदरे जुना मित्र ...
साधारणपणे एका काळात पक्षीनिरीक्षण चालू केले. पण त्याने (आणि अजून एका जवळच्या मित्राने) ते ( आमच्यासारख्या इतर अनेकांप्रमाणे) छंदापुरते मर्यादित ठेवले नाही. तीच वाट चालत राहिले ... अजूनही...
व्यवसाय/संशोधन वगैरे म्हणून.
अवघड काम . भरपूर अडथळे..
भारी आहेत दोघेही...
>> व्यवसाय/संशोधन वगैरे
>> व्यवसाय/संशोधन वगैरे म्हणून.
अवघड काम . >>
हौस म्हणून वर्षातून दोनचारदा अरण्यात जाणे वेगळं आणि कायम तिकडे राहणं वेगळं. एखादा शैक्षणिक / संशोधनात्मक प्रॅाजिक्ट मिळावा लागतो. याबद्दल किरणने भाषणात सांगितलं.
कुवत पाहूनच काम मिळतं.
पशु पक्षी झाडेझुडपे यांची स्टँडर्ड/ युनिवर्सल नावे लक्षात ठेवणे, त्या जाती ओळखणे हे अति महत्त्वाचं. एकदा नाव वाचलं की कायम लक्षात राहिलं पाहिजे. राजेश सचदेव, किहिमकर ही लोकं अशीच पुढे आली.
पोलिटिकल सायन्स. पण नोकरी
पोलिटिकल सायन्स. पण नोकरी घेतलीन बीएनेचेसच्या लायब्ररीत.पण अभ्यास करून घुसला संशोधनात . योग्य जागी संधी महत्वाची , पण सोनं केलन त्याचं. काळाच्या ओघात जनरल मॅनेजर प्रोग्रॅम्स...
मुद्दा माझा असा होता, की आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळाली की काम आणि पोट हे थोडं सुकर होतं.
बाकी अश्या अनवट वाटा बिननोकरीच्या, कुठल्याही आर्थिक पाठबळाशिवाय, स्थैर्याशिवाय वर्षानुवर्षं चालू ठेवणं अवघड असतंय खूप
एवढंच...जवळून बघितलीय धडपड हो लोकांची ...
(हे एवढं झेपण्याइतपत **त दम नव्हता म्हणून मी सोडलं सगळं १९८८ ला !!!)
पुढं गेलाय तो खूप. एनसीबीएसला
पुढं गेलाय तो खूप. एनसीबीएसला आहे. रामनुजम फेलो पण आहे.
(एनसीबीएस ... अजून एक उपकार टीआयएफआर, म्हणजे टाटांचेच उपकार म्हणा ना, थेट नसेल तरी अशा अनेक संस्था स्थापून)
त्याच्या खूप पूर्वी माझा एक कॉलेजवर्ग मित्र , अगदी सात वर्षे माझ्याच बाकड्यावर बसलेला.. एमेस्सी करून मग पिहेचडी ऑरनीथॉलॉजी मधे करून. इथे नाव नाही त्याचं, परदेशी असतो म्हणून...काम जन्मभर याच क्षेत्रात ..
वेड घेतलेली माणसं ..
किरण पुरंदरे मनुष्य महागायक
किरण पुरंदरे मनुष्य महागायक आहे. ठाण्याच्या सहयोग कलामंदिरात त्यांचा कार्यक्रम ऐकण्याचा महायोग आला. पक्षांच्या साठ स्लाइड्स दाखवल्या, पन्नास पक्षांचे आवाज नक्कल करून दाखवतात. पक्क्षी कसा आवाज करतो लागोपाठ किरणची नक्कल - दोन्ही आवाज तेच काढतात!! तो जो काही सुक्ष्म फरक करतात तो अप्रतिम.
एकदा राजमाचीच्या वाटेवर खालच्या ओढ्यात बसलेलो. वरच्या दाट झाडीत एक कोकिळ वर्गातला पक्षी 'crossword puzzle" असं त्याच्या गायनाचं नाव आहे ते गात होता. हा लवकर दिसत नाही. तीनचार मिनिटं लुब्ध केलंन.
नंतर एकदा रत्नागिरी निवळी फाट्याजवळच्या ओढ्यात दोन नवरंग पक्षांची मारामारी दहा फुटांवरून पाहिली आहे. मालगुंडला मोठा धनेश, पाचकवडा ( इमराल्ड डव ) पाहिले आहे.
चणेखाऊ पारवे सोडल्यास कबुतरांच्या इतर बारा जातींपैकी पाचसहा पाहिल्यात आणि त्या सर्व लोभस, त्रास न देणाऱ्या आहेत.
बाकी हिमालयात जाणार नसल्याने मोनाल हुकणार हे माहित आहे.
पाणपक्षांतही, तलावातले फार
पाणपक्षांतही, तलावातले फार मजेदार असतात. कमळपक्षी उर्फ ब्रान्झ विन्ग्ड जकाना, बदकं ( युअरोपात सामान्य असली तरी भारतासाठी पाहुण्यांचं कौतुकच.) पण ती चांगलेच अंतर ठेवतात. मग तलावाच्या कडेकडेने चिखलात फिरणारे पक्षी - जांभळी कोंबडी,कुवाकोंबडी. स्नाइप नावाचा प्रकार शिकारऱ्यांचा आवडता कारण जमिनिवरुन थेट वर झेप घेताना गिरक्या घेत जातो,नेम घेणे अवघड. पावसाळी ढग आले की गावातल्या गिरणिसारखा पुपुक दमदार आवाज करणारी पांढऱ्या छातीची पाणकोंबडी दमतच नाही. भातशेतीवरच्या बांधावरून जाताना आपल्याला टपोऱ्या डोळ्याने चोच वर करून निरखणारा तापस बगळा फटाककन उडून जातो तेव्हा दिसतो! मज्जा असते. नांदुर माध्यमेश्वर एक उत्तम जागा.
समुद्री नको वाटतात. मासेखाऊ आणि भुसका वासही सहन करावा लागतो. म्हणूनच चिलिका सरोवरला गेलो नाही




करकोचा = इग्रेट ? शाळेच्या
In reply to स्टॉर्क असावे by अमुक
करकोचा = इग्रेट ?
शाळेच्या कुठल्यातरी इंग्रजीच्या धड्यात वाचले होते.