ऐसीभारत

आज काही मुद्द्यांबाबत अदितीशी बोलत असताना असं लक्षात आलं हल्ली बर्‍याच मुद्द्यांवर आपलं एकमत होऊ लागलं आहे. अदितीच ती. तिला अजिबात रुचले नाही. मग लक्षात आलं की आम्ही बरेच दिवस भांडलेलो नाही. आता हे म्हणजे आम्हा दोघांच्याही माथा आळ लागे असाच प्रकार आहे. तेव्हा मग ठरलं. आता भांडण करायचंच. पण मग असं नुसतं नाही दोन गोदोंच्या पार्ट्या जशा सर्व माध्यमातून हरप्रकारे भांडत असतात तसे व्यापक पातळीवरचे भांडण करायचे आता. म्हणजे बघा एकदम महाभारतच.

आता महाभारताप्रमाणे साग्रसंगीत भांडण होणार म्हटलं की रीतसर पार्ट्या पाडून इकडे कोण नि तिकडे कोण हे ठरवणे आले. असा प्रस्ताव आला नि मी चपळाईने घासुगुर्जी माझ्या पार्टीत' असे जाहीर करून पहिली चाल केली. (यू हॅव टू बी क्विक टु पिक!) मग त्याबदली चिंतूशेट नि मुसुशेट अदितीला मिळाले (या बार्टरबद्दल चिंतूशेट नि मुसुशेट नाराज असल्याच्या ब्रेकिंग न्यूज लगेच खरडवह्यांतून दिसू लागल्या आहेत) मग भीष्म-द्रोणाप्रमाणे - किंवा पवार-ठाकरेंप्रमाणे - युद्धाचे नियम ठरवायला आम्ही बसलो. 'मी किंवा मेघना या दोघींपैकी एकच पुरे आहे तुम्हा दोघांना' असं अदितीने हिणवल्यामुळे ताबडतोब मेघनाला अंपायर (वर्गातल्या सर्वात दंगेखोर मुलाला मॉनिटर करतात, किंवा फारसे काही जमत नसलेल्या होयबा आमदाराला विधानसभेचा अध्यक्ष करतात किंवा ऐन महाभारत युद्धात कृष्णाकडून 'मी शस्त्र उचलणार नाही' असे आश्वासन मिळवतात तसे. प्रो-मेघना आणि अँटी -मेघना कॅपने आपापल्या सोयीचे कारण निवडावे) करण्याचा प्रस्ताव मांडून 'नाहीतरी तू एकटीच आम्हा दोघांना बोल बोल म्ह्णवता हरवशील असं तूच म्हणतेस ना' असं म्हणत अदितीला हरभर्‍याच्या झाडावर चढवलं. अदितीनेही 'चल होऊ दे तुझ्या मनासारखं. केलं मेघनाला अंपायर.' असं म्हणत 'वत्सा तुजप्रत कल्याण असो' म्हणून आमच्या प्रस्ताव मान्य केला. 'मग मी अर्धवट ला माझ्या पार्टीत घेणार' तिने तिचा पहिला भिडू निवडला. (आता अर्धवट'ने अदितीच्या पार्टीत जाणे म्हणाजे विनायक मेटेंनी महायुतीत जाण्यासारखे आहे. पार्टी बदलली तरी निष्ठा आमच्याशीच राहणार की. पण हे अदितीला का सांगू?) मग तो प्रस्ताव मी चटकन मंजूर करून टाकला.

मग नाव पुढे आलं ते बॅट्याचं. पण हे बेणं नक्की ज्याच्या बाजूने निवडलं जाईल त्याच्याच बाजूने लढेल का सांगता यायचं नाही. थोडंस कौरवांच्या बाजूने लढायचं पण सहानुभूती पांडवांना अशा भीष्मांसारखं होण्याची शक्यता बरीच. शिवाय इतक्या स्वतंत्र विचाराचा प्राणी म्हणजे सैन्याच्या शिस्तीत न बसणारा. तेव्हा सध्या हा प्लेयर 'अनसोल्ड' (म्हणजे काय????? अहो आयपीएलचा लिलाव पाहिला नाही का कधी?) असा शिक्का मारून बाजूला ठेवला. पण मग भांडणातही सैद्धांतिक पातळीवर ष्ट्रांग भिडू हवा, युद्धोत्तर तहाच्या बोलणीसाठी जसा एखादा मुत्सद्दी लागतो तसा. आधी जुने जाणते धनंजय यांना निवडावं असा विचार होता पण अचानक न'वी बाजू समोर आली. तळटीपांचा भडिमार करून मूळ मुद्द्यांपासून समोरच्याला हवे तेव्हा, हवे तसे घुमवून हतबुद्ध करण्याची हातोटी अधिक फायदेशीर समजून ररांनी आणि अदिती दोघांनीही नव्या बाजूसाठी आग्रह धरला. बर्‍याच वाटाघाटी नंतर ररा 'जुने' असल्याने ब्यालन्सिंग च्या दृष्टीने पाहता न'वी बाजू त्यांच्या पार्टीत असायला हवी यावर तडजोड झाली. अशाच दीर्घ वाटाघाटी 'गब्बर सिंग' यांच्या बाबत झाल्या. पण गब्बर आणि ररा यांच्या भांडणांना अनेक शतकांचा इतिहास असल्याने अखेर तो अदितीच्या पार्टीत असेल यावर शिक्कामोर्तब झालं. ऋषिकेश हा भिडू शांत नि सुस्वभावी असल्याने भांडणाच्या अजिबात कामाचा नाही यावर दोन्ही बाजूंचं एकमत झाल्याने हा ही 'अनसोल्ड' प्लेयर चार शिक्का घेऊन बाजूला टाकण्यात आला.

सन्जोप राव, थत्तेचाचा, गवि, ननि, मनोबा असे जुने खेळाडू आणि सतीश वाघमारेंसारखे बरेच काही नवे खेळाडू अजून निवडायचे बाकी आहेत. पण खेळाडूंच्या हिस्ट्रीचा अभ्यास करून निवडीची स्ट्रॅटेजी ठरवण्यास वेळ मिळावा म्हणून (खरंतर अदितीला आधीच चालू असलेल्या दुसर्‍या भांडणात भाग घ्यायला जायचे असल्याने आणि ररांची अन्य 'बैठकी'ला जाण्याची वेळ झाल्याने) उरलेल्या भिडूंचे वाटप उद्याच्या दुसर्‍या राऊंडमधे होईल असे ठरवून आजची बैठक आटपती घेण्यात आली. दरम्यानच्या काळात परस्पर भिडू पळवले जाऊ नयेत यासाठी आपापल्या परीने बंदोबस्त करण्याचे आडाखे बांधत आम्ही उद्यापर्यंत बैठक तहकूब केली.

एवढं सगळं झालं पण भांडायचं कशावर असं कोण विचारतंय ते? एकदा पार्ट्या पडल्या की भांडायला एक का दहा कारणं मिळतील की. तुम्ही सुरुवात तर करा.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

तुम्हा सगळ्यांच्या आचरटपणावर लक्ष आहे बरं का आमचं!

-निळोबा शेषन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तू का आलास बाहेर? तुला सांगितलं होतं ना इतक्यात बाहेर यायचं नाहीस म्हणून. तू आमचा 'स्ट्रॅटेजिक रिजर्व' आहेस. किती कौशल्याने तुझं नाव वगळलं होतं यादीतून, एकदा तर 'सध्या तू कुरुक्षेत्रावर ब्यान आहेस' असं सांगून दिशाभूल केली अदितीची. तर तू म्हणजे ना... बाबाला भॉ: करायला लपून बसलेल्या पोरासारखा बापाचं पाउल घरात पडत नाही तर लगेच बाहेर. हॅ:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तुमच्या महाभारतात कोण कायपण असाल तरी भीम मीच असणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

ररा, अरे त्या अरुण जोशींना आपल्यात घे पाहू पटकन. त्यांच्यासाठी लिलावाची ऑफिशियल लिमिट संपली तरी अंडर द टेबल वगैरे डील द्यायलाही मी तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता एकदा तुला क्याप्टन केला की पुढचे सगळे तुझ्या सल्ल्यानेच करणार. नानावटी सरांना आणि प्रकाश घाटपांडेंनाही आपले म्हणू या म्हणतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अरुण जोशी, मन, नगरीनिरंजन व बॅटमॅन असा तयार होणारा अक्ष मोडण्याचे हे कुटील कारस्थान आहे.
हे म्हणजे युद्धापूर्वीच धर्मराजाने अर्जुनाला "त्या जयद्रथाला आपल्याबाजूने घे बरं" असा आदेश देण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरुण जोशी = जयद्रथ वाचून ह. ह. पु. वा. यावर अरुण जोशींचा पलटवार (हल्ली हा शब्द ऐकून ऐकून कानात घट्ट बसलाय) ऐकण्यास उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तुम्हाला असं वाटलंच कसं कि नगरीनिरंजन हे आपल्याच बाजूच्या माणसाची हसून हसून पुरेवाट होईल अशी स्थिती करतील?

तुम्ही नि अदिती महाभारत वैगेरेच्या गोष्टी करता. मी ते शुद्ध काव्य मानतो. मग आम्ही दाखले देतो ते अलिकडच्या काळातले - दुसर्‍या महायुद्धातले. म्हणजे मन, बॅटमॅन, नगरीनिरंजन, अरुणजोशी, (अनुप ढेरे, सुशेगाद, वाघमारे, ग्रेटथिंकर,) इ लोक हे Axis Powers चे सदस्य आहेत असे म्हणतो. अक्षसत्ता यासाठी कि ऐसीवर आम्ही चौघे प्रचंड मायनॉरिटीत आहोत. इथल्या दोस्त सत्ता नेहमी इतका हंगामा करतात कि आमचा विजयही लोकांना दिसत नाही. या धाग्यात गटबाजीच्या उपमा महाभारत काळात न्यायच्या आहेत्. तेव्हा नगरीनिरंजननी आमच्या गटाला कौरव म्हटले आहे. पण आम्ही जाणून आहोत कि ऐसी अनरियालिस्टीकली पुरोगामी आहे. ऐसीवरचे कौरव म्हणजे समाजातले पांडव आणि ऐसीवरचा जयद्रथ म्हणजे खराखुरा अर्जून !!!

आणि पलटवार वैगेरे काय? पलटवार म्हणजे अगोदरचा झपका झेलला आहे याची कबूली!!! ती मिळेल का माझ्याकडून? आमची सगळी चमू तुमच्या बाजूने हवी का नको ते बोला. घासकडवी राजनाथी राग आळवत आहेत आणि तुम्ही केव्हाचे जसवंती राग लावून बसला आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जालक्षेत्रे ऐसीक्षेत्रे समवेता युयुत्सवः |
अदिती-रमतारामयोर्युद्धं द्रष्टुमागता: ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

युद्ध कब है !!! कब है युद्ध !!! कब !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युद्ध आपल्या सोयीने करायचं रे गब्बर. चार जुलैचा मुहुर्त फळेल आपल्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चार जुलैला जगातील सर्वात सेक्रेड काय काय ते घडले म्हणे, तेव्हाचा मुहूर्त कसा काय धरणार? (स्वगतः आपोजिशन पार्टीत काड्या लावण्याची चांगली संधी आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

चार जुलै ??

त्यापेक्षा (पांकोवि) चार जून काय वाईट आहे ? स्वतः श्रीकृष्ण गीतेत असेच म्हणालेत ना - तव चार जुन |

पांकोवि म्हंजे पांचट कोटीतला विनोद. (पहा - उकोवि - उच्च कोटीचा विनोद) !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण गब्बर आणि ररा यांच्या भांडणांना अनेक शतकांचा इतिहास असल्याने अखेर तो अदितीच्या पार्टीत असेल यावर शिक्कामोर्तब झालं

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सीदन्ति मम गात्राणी अदितीच्या पार्टीत आहे म्हणून की ररांच्या विरोधी पार्टीत आहे म्हणून. मला पहिलीच शक्यता जास्त वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

मला घेऊन कोणालाच काही फायदा नसला तरी मला घासूगुर्जींच्या गटात जायला आवडेल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथले बरेचसे सदस्य शरिराने, मनाने (आठवा मधुबाला vs ज्युलिया रॉबर्ट्स), आणखि कशाकशाने परदेशात असल्याने ऐसियड, ऐसिडि असे काहितरि असायला हवे बॉ.

अवांतर> अरे असे धागे तर संस्थळप्रवर्तकांनि सदस्यांचि मरगळ घालवण्याकरता काढायचे असतात ना. (निगेटिव श्रेणि देणार्‍यांनि जरा हलके घ्या बाबांनो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

भांडणाचा विषय ' बौद्धिक पातळीवर स्त्रिया श्रेष्ठ की पुरुष' हा ठेवावा म्हणजे अदितीला आधीच १०० हत्तींचं बळ येईल आणि विरुद्ध पक्षाचे तीन तेरा वाजतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुर्दैवाने आमच्या सहमतीची सुरुवात याच विषयाबरून झाली. तुम्ही भलत्या गोष्टींची याद देऊ नका, कसम आहे तुम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आमचे देव गुरुजी सांगायचे की महाभारतात दिवसा युद्ध होत असत. पण सूर्यास्तानंतर युद्ध थांबे. रात्री दोन्ही बाजूचे लोक एकत्र येउन 'श्रमपरिहार' करित असत. त्यावेळी युद्धाचा विषय न बोलता अन्य विषयावर गप्पा मारीत असत. असो. एक वे'गळी बाजू मांडायचा प्रयत्न करणे हा आमचा छंद आहे. त्यानिमित्त काही हिशोब चुकते होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

<<पण सूर्यास्तानंतर युद्ध थांबे. रात्री दोन्ही बाजूचे लोक एकत्र येउन 'श्रमपरिहार' करित असत.>> पण तो शास्त्रापुरता असे की अनिर्बंध ते सांगितलं नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

युद्ध हे एक शास्त्र असल्याने त्या निमित्त होणार श्रमपरिहार हा देखील 'शास्त्रापुरता' असे. 'शास्त्रोक्त' श्रमपरिहार हा युद्ध संपल्यानंतर वा तह झाल्यावर होत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

चला, म्हणजे सगळ्या प्रकारची कृष्णनीती करायला मला ग्रीन शिग्नल मिळालेला आहे. शस्त्र करी न धरी वगैरे फेकून हातात चाक घेणे, लोक फोडणे, आगीत तेल ओतणे, कानपिचक्या देणे आणि वर नामानिराळे राहणे. हम्म्म्म्म्म....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खर तर मुद्राज्योतिषाधारे हे भाकीत मी केव्हाच वर्तवले होते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

शांत नी सुस्वभावी काय!
बघा हं, नैतर तिसरी आघाडी उघडली जायची नी अदिती नी रराला युती करावी लागायची Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जिथे होते युती तिथे होते प्रगती. (____ कविवर्य दादा कोंडके)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर साभिनय हे म्हणतोय असे कल्पून पाहिले.
अश्लिल अश्लिल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चला मनोबालाही आपल्या पार्टीत घेऊन टाकू या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

म्हणजे वरवर शांत भासणारा देवेगौडा की काय तू? कल्जी घ्यावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

युद्धासाठीचा नॉमिनेशन फॉर्म भरताना रमतारामांनी आपली अंगवस्त्रे डिक्लेअर करावीत ही नम्र विनंती. पार्टीच्या यशासाठी त्यांना पुण्यातल्या चांगल्या 'बैठकीच्या' जागा शोधण्याच्या, (पक्षी : चारीधाम) यात्रेला धाडले तर सोन्याहून पिवळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ROFL च्यायला हे एक नंबर हालकट आहे बघा. बरोब्बर नको ते विषय काढतंय. सध्या अशी स्थिती आहे की राजकारण्यांची अंगवस्त्रे लोकांना ठाऊक असतात, बायकाच कोणत्या ते ठाऊक नसते म्हणे. काळ मोठा वाईट आलाय बघा. असो. आमच्या प्रतिज्ञापत्रात काय ते लिहिले जाईल, तिथे तो कॉलम मोकळा सोडल्यास वस्त्रे नसल्याने आम्ही तसेच (च्यायला ही अवस्थाही अश्लीलच होते, भलतीच आफत आहे) आहोत असे समजायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

युद्धासाठीचा नॉमिनेशन फॉर्म भरताना रमतारामांनी आपली अंगवस्त्रे डिक्लेअर करावीत...

आणि नाटकशाळांचे काय करायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा सगळा रमताराम यांचा डाव आहे. माझं आणि रमताराम यांचं अधूनमधून, पडद्याआड बोलणं होत असलं तरीही रमताराम आणि आमच्यातले मतभेद संपुष्टात येऊ शकत नाही. रमताराम हे वृद्ध आचारांचे आणि डाव्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते आहेत. आम्ही नेहेमीप्रमाणेच आमच्या तरुण विचार आणि धडक कृतींची कास धरणाऱ्या आहोत. आमचं आणि म.म. रमताराम यांचे जमणे सर्वथैव अशक्य आहे. हा त्यांनी मतदारांना गोंधळात टाकायला केलेला फार्स आहे. त्याकडे मतदारांनी लक्ष देऊ नये.

लक्ष दिलंच तर अनुप ढेरे आपल्या पार्टीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हॅहॅहॅ...
पुणे ३० ची पार्टी बनवाय्चं घाटतय... ती बनली तर आम्ही तिकडे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा लेख युद्धाचि नांदि नसुन तह झाल्याचे लक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

युद्ध करायला (दोहोंपैकी) एक बाजू अरुणजोशींची लागते. अन्यांचा म्हणजे बोलाचाच भात नि बोलाचीच कढी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही माझ्या बाजूला या पाहू. आपण आपली स्वतंत्र 'अ. जोशी' पार्टीच उघडली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला त्यांच्या पक्षात घ्यायला, राजेशजी above the table च काय, under the table डील करायला पण तयार आहेत. तेव्हा त्यांना दुखवून तुमच्या पक्षात दाखल होण्यापूर्वी किमान winnability पाहिली पाहिजे. आणि कलियुगात युद्ध जिंकायचं म्हणजे नितीमूल्यांना तरोड मरोड करायला येणं आवश्यक!

खालिल पैकी कोणताही एक प्रश्न सोडवून दाखवा - (मुद्दा असा मांडा कि बव्हंश ऐसीकरांना खरोखरच पटेल.)

१. समलैंगिकता सर्वांसाठी अनिष्ट आहे.
२. स्त्री हे केवळ पुरुषांच्या भोगाचे साधन आहे. त्यापलिकडे तिला अस्तित्व नाही.
३. झाडून सगळे एन आर आय महामूर्ख असतात.
४. विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे.
५. ब्रह्मचर्य हेच जीवन.
६. गेल्या (२०व्या) शतकात जगाची लोकसंख्या तिप्पट कमी झाली आहे.
७. गणपती हेच, जग निर्मिणार्‍या/ उत्क्रांतीची चावी भरणार्‍या ईश्वराचे स्वरुप आहे.

ऐसीकरांना या पैकी कोणत्याही एका विषयावर रिजनेबली पटवू शकाल तर मी लगेच तुमच्या पक्षात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हां, हे विसरलोच -
८. भारताचे पोलादी फौलादी पुरुष - साने गुरुजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हां हे विसरलोच -
८. भारताचे पोलादी फौलादी पुरुष - साने गुरुजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

४. विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे. >> :O केवढे हे घोर अज्ञान. अहो विश्वाच/ब्रह्मांडाच केँद्रस्थान पुणे-३० होत, आहे आणि सदैव राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्या टाळी!

बाकी, या रिंगणात तुम्ही कधी स्वतंत्र पक्ष काढून उतरायचे ठरवलेतच, तर उमेदवारीअर्ज आत्तापासूनच भरून दाखल करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला तुम्ही आमच्या पक्षात यायचा विचार करताय? _/\_ धन्य जाहले, भरुन पावले, आनंदाश्रु वगैरे वगैरे ;-).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो त्यांचं नावंच न'वी बाजू आहे, ते न'वा पक्ष निर्माण करणार नाहीतर कोण करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'न'वा पक्ष निर्माण झालाच पाहिजे!

सदस्योत्सुक: 'निळी' बाजू, 'न'मुक, 'न'.दन, 'न'वि, 'न'डकित्ता, 'न'डूबाळ, 'न'नुप ढेरे, 'न'टमॅन, 'न'स्मि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा म्हणजे तिसर्‍या आघाडीचे राजकारण सुरु झाले तर. जयललिता, ममता वगैरे कुठे आहेत? रच्याकने भांडणयुद्धात राजकारण आणण्याच्या वृत्तीचा जाहीर निषेध. हे असंवैधानिक आहे हे बजावून ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

<<बाकी, या रिंगणात तुम्ही कधी स्वतंत्र पक्ष काढून उतरायचे ठरवलेतच, तर उमेदवारीअर्ज आत्तापासूनच भरून दाखल करत आहे.>>
अरे हे ऐसीभारत युद्ध आहे, निवडणूक नाही आधीच आट्यापाट्या खेळायला. तुम्ही आमच्या पार्टीत आहात, तिकीट दिले नाही की लगेच 'झाडू' मारायला सुरुवात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अहो विश्वाच/ब्रह्मांडाच केँद्रस्थान पुणे-३० होत, आहे आणि सदैव राहील.

हे अर्धसत्य आहे.

त्या ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानाचे फायनान्सिंग आमच्या ऑस्टिन मधून होते. ते सुद्धा इक्विटी फायनान्सिंग. ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानाचे सीईओ आम्ही इथून ठरवतो.

ज्याप्रमाणे सैन्य पोटावर चालते त्याप्रमाणे सर्व केंद्रस्थाने फायनान्सिंग वर चालतात. फायनान्सिंग इल्ले .... केंद्र्स्थान इल्ले.

(ब्रह्मांडाचे विकेंद्रीकरण करू पाहणारा) गब्बर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<<ब्रह्मांडाचे विकेंद्रीकरण करू पाहणारा>> आयला पलटी? विकेंद्रीकरण हे समाजवादी खूळ आहे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

अ ... हं.

केंद्रीकरण हे समाजवादी खूळ आहे. Central planning is the defining building block of socialism. e.g. Planning commission.

विकेंद्रीकरण ही नेसेसरी कंडीशन आहे व "कल्याणकारी राज्याचे समूळ उच्चाटन" ही सफिशियंट कंडीशन आहे. - आता Condition for what ? हा प्रश्न पडू नये.

(संदर्भ - द फेटल कन्सिट ___ एफ ए हायेक; द रोड टू सर्फडम ___ एफ ए हायेक.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या ऐसीभारताच्या निमित्ताने सरकारविरोधी म्हणजेच ऐसीवर व्यवस्थापकविरोधी प्रचार करणाऱ्या गब्बरला एकदा खोपच्यात घ्यायचं हायेक'दा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केंद्रीकरण हे समाजवादी खूळ आहे.>> एकदा काय ते नक्की ठरव. निदान अध्यक्षीय लोकशाही असलेल्या देशात केंद्रीकरण नाही हे बोलू नकोस. अगदी आपले सहाय्यक मंत्री (तिथे त्यांना 'सेक्रेटरी' म्हणून त्यांचे दुय्यम स्थान अधिकच अधोरेखित केले जाते.) देखील तोच निवडतो म्हणे. इतके टोकाचे केंद्रीकरण दुसरे माझ्या पाहण्यात नाही. का मग तिथे समाजवाद आहे म्हणायचे? आणि मुळात सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्राम-स्वराज्य या समाजवाद्यांनी राबवलेल्या संकल्पना आहेत एवढं मात्र नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तपशील फार होतील ररा.
पण माझ्या माहिती/समजाप्रमाणे बोलतो.
भारत नावाची संकल्पना व अमेरिका नावाची संकल्पना ह्यात मूलभूत फरक आहे.

क्र १ बद्दल बोलू शकतो.
अमेरिकेची स्वतःची स्वतःबद्दलची धारणा व भारताची स्वतःबद्दलची तात्विक भूमिका किमान शब्दांत मांडायची तर :-
USA is destructible union of indestructible states.
India is indestructible union of destructible states
असं काहीतरी म्हणता यावं.
नाही म्हणायला अमेरिकेत चार्-दोन राज्य नव्यानं निर्माण झालीत, पण एकूणात त्यांची भूमिका
"आम्ही एकत्रित आलेले काही देश आहोत" ह्या छापाची आहे. एक देश दुसर्‍याच्या अंतर्गत बाबींत नाक खुपसत नाही!
भारतात राज्ये ही एकत्रित केंद्राच्या तुलनेत वध्य्/विभाजनीय मानली आहेत.
भारतात राज्यांचे तुकडे होणं, दोन तुकडे जोडणं हे प्राशासनिक सोयींचे कारण देउन करता येते.
अमेरिकेत मात्र एक राज्य हे एक स्वतंत्र युनिट असल्यासारखे आहे तात्विकदृष्ट्या.
नेमक्या शब्दांत सांगता येणे कठीण आहे.
अमेरिका ही काहिशी confederate ह्या संकल्पनेच्या जवळ जाते.
तात्विकदृष्ट्या अमेरिकेचा एकत्रित कारभार आवडला नाही म्हणून राज्ये त्यातून बाहेर पडू शकतात.
(अमक्या देशाने तमक्या संघटनेचा राजीनामा दिला, तसे काहिसे. किंवा युरोझोन वा युरोपिअन युनिअन मधून ग्रीस नावाचा देश बाहेर पडणे; अशी एखादी बातमी येउ शकते तसे काहिसे.
युरोपिअन युनिअन व USA ह्या संकल्पना बर्‍याच जवळ जातात एकमेकांच्या .
पण युरोपिअन युनिअनचे fiscal union, monetory union पूर्णपणे होणे, जितके झाले आहे ते consolidate होणे हे बाकी आहे. ते झाल्यास USA व EU ह्या संकल्पना फारच जवळ जातील.
फरक इतकाच रहिल की EUचे एकच एक केंद्र सरकार व एकच कॉमन लश्कर नाही.
)
, पण चीन काय, भारत काय हे केंद्र मजबूत व राज्ये तात्कालिक ह्या भूमिकेवर चालतात.

असो.
हे नेमक्या भाषेत सांगता येणे मला अशक्य आहे.

अमेरिका , पश्चिम युरोप इथे mayor ह्या शब्दांस वेगळेच महत्व आहे.
आपल्या "महापौर" पेक्षा बरेच अधिक अधिकार व मान महानगरांच्या mayor ह्यास असतात असे ऐकून आहे.
बर्‍याच बाबतीत mayorचे अवलंबित्व हे प्रेसिडेंट्,प्राइम मिनिस्टर ह्यांच्यावर फार कमी असते.
अर्थात हा सारा तर्क व ऐकिव माहिती आहे.
लिखित असा एक स्रोत मजकडे नाही.

बादवे, लढाईत तुमच्या साइडला असलो, तरी जे आठवले ते भस्कन लिहीले. (विकर्ण syndrome!)
पुढील मुद्दा समोर आला की गब्बरला गुद्दा घालायला सर्वात पुढे मीच असेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा तुला अगदीच काही कळत नाही बघ. मी वर म्हटलंय ना गब्बर नि माझ्या भांडणांना मोठा इतिहास आहे म्हणून. तेव्हा तो चेंडू गब्बरसाठी होता. तू बॅटिंगला असशील तेव्हा तुला गुगली ऐववी 'दूसरा' टाकेन. फलंदाज कोण त्याप्रमाणे गोलंदाजी करायची की नाही. मधे नॉनस्ट्रायकरने येऊन चेंडू मारलेला चालेल का? म्हणजे डावरा गांगुली ... नको गब्बर इथे स्ट्रायकर आहे ना मग डावरा नको... उजवा सचिन स्ट्राईक घेतोय म्हणून लेगस्पिन टाकावा तर नॉनस्ट्रायकर असलेल्या डावर्‍या गांगुलीन धावत मधे येऊन तो ऑफस्पिन असल्याने मिडविकेटला खेचून षटकार मारावा हा अन्याय आहे. तिकडे फील्डर लावलेला नाही की नै सचिनसाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

चुकलं प्लभो!
नाही ते प्रश्न नको तेव्हा शिरेसली घेतले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

केंद्रीकरण हे समाजवादी खूळ आहे.>> एकदा काय ते नक्की ठरव. निदान अध्यक्षीय लोकशाही असलेल्या देशात केंद्रीकरण नाही हे बोलू नकोस.

अमेरिकेत केंद्रीकरण आहेच. प्रश्नच नाही.

फेडरल रिझर्व्ह (US counterpart of Reserve bank of India) हे केंद्रीकरणाचेच उदाहरण आहे. The value of the most widely used asset in the economy is decided by a bunch of bureaucrats sitting in Washington DC.

तसेच अध्यक्षीय लोकशाही सुद्धा खूप प्रमाणावर केंद्रीकरणच आहे.

संसदीय लोकशाही ही श्रेष्ठ आहे ती त्यामुळेच.

तुझा पुढचा प्रश्न हा असणार आहे - की - Don't multinational corporations do a lot of planning ? Central planning ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे चीटिंग आहे. माझे पत्ते तूच खेळायला लागलास तर काय मजा येणार भांडायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

पुणे -३०? हा आमच्या प्रांतिक अस्मितांचा सरासर अपमान आहे. विश्वाच्या केंद्रस्थानी असलाच तर उदगीरचा चौबारा असेल. तुम्ही पुणे-मुंबैकर आमच्या मराठवाड्याला खूप कमी लेखता ब्वा!

मी मनोबांना review करायला एक कथा दिली. त्यांनी त्यात एकच सुधारणा सांगीतली. त्यात "मराठ्यांचे कुटुंब" असा उल्लेख आला होता. म्हणे कि त्याने 'मराठे आडनावाच्या ब्राह्मणांचे कुटुंब' कि ' मराठा जातीच्या लोकांचे कुटुंब' हे कळत नाही. मी विचारलं कोणाला कळत नाही? तर म्हणे पुण्याकडच्या लोकांना!! (मनोबाचा सद्दुदेश होता यात शंका नाही.) पण तुम्ही जर अख्ख्या मराठवाड्याचा सर्वे कराल तर लोक म्हणतील "मराठ्यांचे कुटुंब" म्हटल्यावर त्यात ब्राह्मणांचा काय संबंध?

तुम्ही लोक आजपावेतोच्या दलित पिडित दुर्लक्षितांची इतकी काळजी करणारे असाल तर सगळी केंद्रे पश्चिम महाराष्ट्रातून शिफ्ट करा ना राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पाठिंबा देण्यासाठी प्रश्नावली देण्याचे दिवस गेले आता. पाठिंबा घेण्यासाठी अटी घालण्याचे दिवस आलेत हे विसरू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

पाठिंबा घेण्यासाठी अटी घालायला आम्हाला आमच्या गालांची काळजी आहे म्हटलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रत्यक्ष युद्धाला जास्त चेव यावा म्हणून, संबंधित पक्षांनी द्यूत खेळायचे ठरवल्यास,काय काय पणाला लावता येईल यावर चर्चा करावी. म्हणजे त्यावेळेस आम्हाला, 'ये क्या हो रहा है' असे विचारत रहाण्याचा रोल तरी करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीचे लाडके कुक्कुले बाळ - अतिरेकी पुरोगामित्व - द्युतावर लावावे. व्यासांची प्रतिभा थकेल, गणपतीची लेखणी थकेल, ...., ऐसीकरांच्या लॅपटॉप्सचे स्फोट होतील, पण ऐसीभारत थांबणार नाही. ऐसीकर परंपरावादाचे, सनातनवादाचे, प्रतिगामित्वाचे, स्थिरतेचे शुद्ध अभिनयात्मक नाटक केल्यानेच अपवित्र होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐसीच्या पुरुगामीत्वाला एकवस्त्रा रजस्वला असूनही अरुण जोशी फरपटत ट्रॅकरवर आणून वस्त्रहरण करत आहेत असं चित्र तरळून गेलं. मग वस्त्रं पुरवण्यासाठी मेघना इच्छा नसूनही कळफलक बडवायला लागणार आणि आपण तो बडवतो आहोत याचाही तिला त्रास होणार हे ओघाने आलंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्रौपदी - ऐसीचे (तथाकथित) पुरोगामित्व
दु:शासन - अरुणजोशी
कृष्ण - (कळफलक बडवणारी) मेघना
भीम - (चडफडणारी) अदिती
दुर्योधन - (सूत्रधार) नगरीनिरंजन
कर्ण - मनोबा
विदुर - (तात्विक पाठिंबा देणारे) थत्ते
धॄतराष्ट्र - (उंडारलेली मुले नियंत्रित करू न शकणारे) ऋषिकेश
गांधारी - शहराजाद
आणि
घासकडवी - (हतबल) भीष्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वैधानिक इशारा - त्या द्रौपदीचे वस्त्रहरण थांबवा ... नाहीतर परंपरावादाचे वस्त्रहरण सुरु करण्यात येईल.

हा हा हा.

आमची स्फूर्तीस्थाने -

1) Why I am not a conservative ___ F A Hayek
2) Why I, too, am not a conservative, (Normative vision of classical liberalism) ___ James Buchanan

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थत्ते चाचा, घाटपांडे काका, अतिशहाणा, घनु, केतकी आकडे, बिपीन कार्यकर्ते, उत्पल, शहराजाद, रुची, रोचना, जयंत फटक व धनंजय यांच्या तिसर्‍या आघाडीत प्रवेशाची घोषणा करत आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमाला बी लढायचंय. आम्हाला बी घ्या की पार्टीत.
नाही तर, आम्ही तिसरी आघाडी उघडून दोन्ही पर्ट्यांना जेरीस आणू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही तर, आम्ही तिसरी आघाडी उघडून दोन्ही पर्ट्यांना जेरीस आणू.

द मोअर, द मेरियर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तापर्यंत किमान सात तिसऱ्या आघाड्या झालेल्या दिसताहेत. अरे लोकहो, कोणतरी लीडर ठरवा आणि तयार करा की आघाडी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तापर्यंत किमान सात तिसऱ्या आघाड्या झालेल्या दिसताहेत.

हरकत नाही. आमची आठवी तिसरी आघाडी. भगवान श्रीकृष्णही आठवेच होते. विजय आमचाच होणार. इश्वराचीच ही योजना असावी बहुधा.

अरे लोकहो, कोणतरी लीडर ठरवा आणि तयार करा की आघाडी.

लिडर कशाला ठरवायला हवा, आम्ही असताना? लिडर ठरवा म्हणायची हिंमत होतेच कशी, म्हणतो मी! तिसरी आघाडी आमच्याच नेतृत्वाखाली काम करणार! आम्ही नेतृत्व करावे, ही लोकांचीच इच्छा आहे. लोकांच्या इच्छेला मान देऊन आघाडीचे नेतृत्व करणे आम्हाला आता भागच आहे. चला आम्च्या विजयाच्या घोषणा द्यायला सुरुवात करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तापर्यंत किमान सात तिसऱ्या आघाड्या झालेल्या दिसताहेत.

अजून सात होऊ देत. मग आम्ही त्यांना जिंकून देऊ. त्यासाठी म.म. रमताराम यांच्याशी आघाडी करण्याची आमची तयारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तेजा, तेरा नंबर आनेका चान्स कम हय.

एक मनोविश्लेषण > घाबरुन काढुन टाकले भौ. जिज्ञासुंनि व्यनि केल्यास मिळेल. धैर्य धरुन परत टाकले आहे. पांधर्‍या ठशात आहे. सिलेक्ट करुन वाचायचा अजिबात आग्रह नाहि.
*इथे सदस्यांविषयि मौजमजेत चर्चा सुरु असल्याने या विश्लेषणाला हरकत नसावि. दुसर्‍या एका संकेतस्थळावर माझे संस्थान व्यवस्थित सुरु होते. मि एक उत्स्फुर्तपणे सुचलेले (माझ्यादृष्टिने) सुंदर ललित या संकेतस्थळावर सादर केले. तिचे इथल्या इंटुकांनि काहि कौतुक केले नाहि. मग मला राग आला. त्याचवेळि इथल्या एका एस्टेब्लिश्ड इंटुकाच्या ललिताचे फार कौतुक झाले. मग मला आणखि राग आला. माझे अनेक शिष्य इथे आहेत. माझ्या संस्थानातुन पोटेन्शियलि मि अनेक लोक आणु शकतो. मग इथल्या ट्रॅकर हलता रहावा यात इंट्रेस्ट असणार्‍या लोकांनि माझि समजुत घातलि. मि परतलो आहे. मि माझे भाटपोटेन्शियल सिद्ध करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

म्हणजे भांडणाचं ऐलान करून आम्ही काही दूरच्या गिरीजनांना - पक्षी: अन्य संस्थळावरचे सदस्य - आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी वाटाघाटी करायला निघून गेलो तेव्हा जरा दोन दिवस आघाडीवर शांतताच होती. दरम्यान इथे सात आघाड्या झालेल्या दिसताहेत. याविरुद्ध अंपायर ऊर्फ मेघनाकडे आम्ही रीतसर तक्रार नोंद्वली आहे. हे राजकारण नव्हे, भांडण आहे तेव्हा इथे त्या वृंदावनातल्या होळीप्रमाणे दोनच पार्टी आहेत, एक बाप्यांची नि एक बायांची. बाप्यांनी पार्टी पारंपारिक मार खाणारी पार्टी आहे, आणि हा इतिहास आम्ही बदलू पहात आहोत. तेव्हा फक्त दोनच पार्ट्या, बाकी सार्‍या आघाड्या - देवेगौडापासून डॉ. जयप्रकाश नारायणांचे नाव मिरवणार्‍या आंध्रातल्या पैसेखाऊ पार्टीच्या नेत्यापर्यंत सार्‍यांच्याच - दोन पैकी एका बाजूला विलीन करण्यात याव्यात असा फतवा काढतो आहे. भारत की पाकिस्तान हे दोनच पर्याय आहेत, संस्थांनांना स्वतंत्र राहण्याचा पर्याय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तुम्ही काहीही म्हणा हो! संधी मिळताच या सातांची एक आघाडी करून दाखवतो की नाही बघा..

बाकी कोल्हटकर, नानावटी, घारेसर यांनाही तिसर्‍या आघाडीच्या प्रवेशाचे आवताण देत आहोत!

समांतरः या सातात माझीच आघाडी सर्वात जास्त मेंबरांची आहे, बाकी सगळा एकला चलो रे प- अपक्ष - मामला आहे हे लक्षात आले असेलच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही फार ट्यँवट्यँव करू नका. शेवटी भाजप आणि कॉंग्रेस एकाच माळेचे मणी आहेत याची जाणीव ठेवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुझ्या आघाडीत मेँबर बरेच आहेत रे, पण त्यातले कचाकचा भांडणारे, दुसर्याँच्या झिँज्या उपटणारे, टाळकी फोडणारे, खळ्ळं खट्याक कोणीच नाय ना. मग काय उपयोग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कचाकचा भांडणारे, दुसर्याँच्या झिँज्या उपटणारे, टाळकी फोडणारे, खळ्ळं खट्याक

ही काम बाकी दोन पक्षांकडे दिली आहेत.
आम्ही फक्त राज्य करणार Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<<तुझ्या आघाडीत मेँबर बरेच आहेत रे, पण त्यातले कचाकचा भांडणारे, दुसर्याँच्या झिँज्या उपटणारे, टाळकी फोडणारे, खळ्ळं खट्याक कोणीच नाय ना. मग काय उपयोग?>> त्यांची भांडणाची पद्धत वेगळी आहे. ते कुरुक्षेत्रावर... आय मिन जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहेत ऐसीभारताला विरोध म्हणून. नि ते संपलं की हा आमचाच नैतिक विजय आहे असा दावा मीडियासमोर करणार आहेत. 'सारे प्रवासी घडीचे' मधले डॉ. रामदास आठवतात का 'आता आपण हिंदुस्थान सोडून जाणे इष्ट ठरेल' अशी तार दर महिन्याला इंग्रज गवर्नरला करणारे? ते ऋषिकेशच्या आघाडीचे प्रेरणास्थान आहे अशी आतल्या गोटातली बातमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तुमच्या आतल्या गोटाचे काम फारच तुटपुंजे आहे.
उपोषणाने वगैरे तुमच्यासारख्या राजकारण्यांचे काही होत नाही म्हणून तर राजकारणात शिरून तिसरी आघाडी उघडत आहोत. एरवी आम्हाला पदात व सत्तेत रस नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काय ठरलं शेवटी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा पुन्हा एकदा वाचला. मस्त मजा आली.
.
पण अदिती आणि पडद्याआड हे दोन शब्द एका वाक्यात आलेले पाहून स्त्रीवाद एका वेगळ्याच plateau वर पोहोचला आहे अशी खात्री पटली -
.
( पळा पळा पळा )
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता कसे बरे युद्ध होणार ? कृष्ण त्याच्या सुदर्शनचक्रासकट पळून गेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0