शतशब्द कथा -विषकन्या

पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती.

च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले.

च्यायला पोरगी पटली. अररे... समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला.

किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला -ट्रक ड्राईवर.

आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते "विषकन्या"

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

ती कसली वीषकन्या, त्या मवाल्याची चूक आहे. क्लिअर चूक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक!

कमीत कमी शब्दात कथाविस्तार चांगला सामावलाय.
ऐसे प्रयोग येत राहुदेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोडक्या शब्दात कथा सांगायची आयड्या आजकाल बळावू लागली आहे पण यात शब्द आणि वाक्यं फार तोलून मापून टाकावी लागतात.
आता ही कथा परिणामकारक झाली असती, पण स्वतःच वाचत असलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे तिचे लक्ष गेले म्हणजे काय? इतका वेळ तिने ते नाव वाचलेच नव्हते की काय असा प्रश्न मनात निर्माण होऊन सगळी हवा निघून गेली.
त्यापेक्षा त्याच्या सॅकमधून त्या नावाचं पुस्तक बाहेर पडलं असं दाखवलं असतं तर त्याच्या एवढं वळून वळून पाहण्याला थोडंसं गूढ कारण तरी मिळालं असतं. असो.
पुढील प्रयत्नासाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणे मुंबई महामार्गावर

एकतर या रस्त्यावर बायका (म्हणजे दुचाक्या) अलाउड नाहीत.

लाल टॅाप घातलेली

मागच्या काळी स्त्रीयांना घराबाहेर जाणे वर्ज्य कसे योग्य होते ते कळावे. किती ठिकाणी बोर्ड लावणार -' पुढे लाल तलम कपड्यांतील गौरांगना उभी आहे. वाहने सावकाश चालवा.'?

ती गाडीला टेकून

काय टेकून याचे चित्र उभे करणारी वाक्यरचना. थेट लिहिले असते तरी इतकी मजा आली नसती.

पुस्तक वाचीत उभी होती.

उन्हातान्हाचं? आपण एक पर्सनालिटी उभी करताय ना? मग किमान आय-पॅड वर म्हणा.

च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी!

नटी असावी? म्हणजे इराणी कि फिलिपीनी कि मिझो होती कि काय? मवाल्याला नटी माहित नसावी?

त्याने बाईकची स्पीड वाढवली

का बाबा? नेत्रसुखाचा काल कमी नाही का होणार?

आणि डोळ्यांना डोळे भिडताच

नजरेला नजर म्हणा हो, फारच जवळ नेताय.

एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले.

हवाई चुंबनामधे चुंबके हवेत असतात. जेव्हा चुंबन हवेच्या माध्यमातून प्रवास करते तेव्हा त्यास उडते चुंबन म्हणतात.

तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले.

बयेचा रिअ‍ॅक्शन टाइम मानला.

च्यायला पोरगी पटली.

हिंदी महासागरावरून ढग निघाले की हा भाऊ पुण्यात भिजलेला असतो का?

अररे... समोर वळण आहे तो विसरला होता.

म्हणजे काय? आता पोरगी पटली तरी न थांबता पुढे जाणार कि काय?

बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला.

ड्रायविंग नव्यानं शिकलेला? कि विदाऊट लायसन्स? एक किस तो द्यायला असा किती वेळ लागतो? आणि साला कोणत्या लेन मधे चालवत होता जो दुसर्‍या बाजूला गेला? अहो, हायवे वर डिवायडर किती मोठा आहे.

किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का?

आता कोणा ना कोणाच्या तोंडी हे वाक्य असणारच.

आता बोंबला -ट्रक ड्राईवर.

का रे, तुला ही तो 'लाल टॉप इफेक्ट' जाणवला कि काय?

आईग! तिने डोळे मिटले.

इतकं इरॉटिक वाक्य! कुठच्या कुठं पेरलंय.

क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे.

बरोबर आहे, आत्ताच एक सेकंदापूर्वी जीवनसाथी मिळाला होता. एका नेत्रपल्लवीपलिकडे त्याचं सुख मिळालं नाही.

तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले.

इतक्या लवकर वाचन कर्म पुन्हा चालू.

मोठ्या अक्षरात लिहिले होते "विषकन्या"

आता पूर्वीपासूनच ती पुस्तक वाचत होती नि वर्च्या एका प्रतिसादाप्रमाणे हे पुस्तकाचे नाव, इ असेल तर ते तिने वाचले नाही म्हणणे म्हणजे जास्तच झाले. हे नाव त्या पुस्तकावर "तत्क्षणी लिहून आले" असा भयसंदेश द्यायचा असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जुन्या महामार्गावर अलौड आहेत दुचाकी.

आता पूर्वीपासूनच ती पुस्तक वाचत होती नि वर्च्या एका प्रतिसादाप्रमाणे हे पुस्तकाचे नाव, इ असेल तर ते तिने वाचले नाही म्हणणे म्हणजे जास्तच झाले.

हे कैच्या कै. वाचत असलेल्या पुस्तकाच्या कवरवर मीही नजर टाकतो बर्‍याचदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वाचत असलेल्या पुस्तकाच्या कवरवर मीही नजर टाकतो बर्‍याचदा.

मी ही तेच / तसलेच काहीतरी म्हणतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शतशब्दकथेची सहस्त्रशब्द चिरफाड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

ठ्ठो!!!!
प्रथमच अजोंचा मेगाबायटी प्रतिसाद आवडल्या गेल्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

प्रतिसाद आवडला. रविवारी कार्यालयात गेलो होता. आजकाल आमचे साती दिवस आले आहे. संध्याकाळी ५च्या सुमार घरी परत येताना 'छावनी भागात, ७४०न. च्या बस मधून बाहेर लक्ष गेल. रस्त्याच्या काठावर एका लाल मारुती उभी होती आणि बाहेर एक लाल टॅाप परिधान केलेली सुंदरी गाडीला टेकून उभी होती.

ही इथे कशाला उभी आहे, कदाचित कार खराब झाली असेल किंवा मनात कल्पना आली. लाल रंग रक्ताचा रंग , तिच्या कडे पाहताना कुणा ही बाईक वाल्याचे लक्ष समोरच्या रस्त्या एवजी तिच्या कडे जाणार, हे सहजच आहे.

मग अपघात, लाल रक्ताचे थारोळे हवेत उडणार. या वरून गोष्ट सुचली आणि १०० शब्दांच्या मर्यादेत बांधण्याचा प्रयत्न केला.

कदाचित ती 'शिकार करायला जाणूनबुजून उभी होती. सावज दिसताच शिकार गेला. म्हणूनच क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. हे वाक्य टाकले. वाचणार्यांना कल्पना यावी म्हणून. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"लैभारी" अशी श्रेणी द्यायची काही सोय करता येईल काय?

नैम्हणजे, "विनोदी" पुरेशी वाटत नाही, म्हणून म्हटले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोशीसाहेब, थंड घ्या पाहू जरा.
ह्याच धर्तीवर शतशब्द प्रतिसाद असा काहीसा प्रयोग तुम्ही का करून पहात नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली!
तुम्ही कथा लाल फाँटमध्ये टंकायला हवी होती Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषकन्या
----------------------
हायवेच्या कडेच्या रेलिंगला रेलून ती लाल टॉपवाली मुलगी पुस्तक वाचत होती. मोबाईकवर भन्नाट वेगाने जातानासुद्धा त्याचे लक्ष तिकडे वेधले - "काय कडक माल आहे!"

एका हाताने त्याने तिच्याकडे फ्लाइंग किस भिरकावला. अलगद चुंबन झेऊन, फुंकर मारून तिने त्याच्याकडे परत पाठवले. च्यायला पोरगी पटली!

अरारा, बाईकचे चाक खळग्यात गेले. एका हाताने बाईक सावरता येईना. बाईक डिव्हायडरवर आणि तो पलीकडे... त्याच्या फरपटण्याच्या आवाजात भरधाव ट्रकच्या ब्रेक किंचाळणे मिसळून गेले.

तिने गाला-ओठावरून रक्ताचे शिंतोडे टिपले. आणि "विषकन्या" पुस्तकाच्या पुढल्या प्रकरणाकडे लक्ष वळवले.
----------------------

(मर्यादित शब्दांत कथा लिहिण्याची कल्पना आवडली. पण पसारा थोडा कमी करता येईलसे वाटले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायवेच्या रेलिंगला रेलून उभ्या असलेल्या लाल टॉपवाल्या रापचिक मुलीने, बाईकवरून भरधाव जाणार्‍या मुलाने दिलेले उडते चुंबन तत्परतेने परतवले खरे. पण आपल्याकडे बघनाता त्याला न दिसलेला खड्डा नी त्यामुळे समोरच्या ट्रकवर त्याचे आदळणे भयचकीत नजरेने बघताना आपल्याच हातातील पुस्तकावर तिची नजर खिळली. पुस्तकाचे शीर्षक होते 'विषकन्या'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पणपरंतु -
१. वाक्ये जरा लांब झाली आहेत.
२. त्या मुलीचा तो असुरी कावा होता, असे मूळ लेखकाचे स्पष्टीकरण आहे. (ते त्यांच्याच मूळ लेखनात स्पष्ट नव्हते, खरे.)

कथा वाचताना सुरुवात-मध्य-शेवट असे ओघवते व्हायला पाहिजे. पुरेसे व्यक्तिचित्रण, पात्रांचे हेतू (निर्हेतुक दुर्भाग्य असल्यास सहानुभूती वाटण्याइतके विझलेले हेतू) वगैरे सांगितले पाहिजेत. मूळ लेखकाने जर हे दिले असतील, तर तो कथानकाचा भाग आहे, आपल्याला ते गाळता येणार नाही, अशी अट हवी! मूळ लेखात काही भागात "तो"चा दृष्टिकोन आहे, तर काही भागात "ती"चा. ही कलाटणीसुद्धा मूळ कथेचा अविभाज्य भाग मानला पाहिजे Smile बगैरे.

अर्थात हे सर्व ८०पेक्षा पुष्कळ कमी शब्दांत होऊ शकेल, मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रविवार दुपार.
तो हायवेवरच्या वळणापाशी सुसाट आला. कडेला ती रूपगर्विता आपल्याच तंद्रीत वाचनात मग्न. पुस्तकातून नजर वर काढून तिनं त्याला ओझरतं पाहिलं, हवेत चुंबनांची कबुतर्रे उडाली.
एका नजरेत पटली ना बाप! आता-
कर्र्र्र्रर्र्र्र्र्र्र्रर्र्र्र्र्र्र....धडाम.
"सावंत,निव्वळ अपघात नाहीये हा", इन्स्पेक्टर म्हणतात. "त्या मुलीची उभं रहायची जागा पाहिलीत का?"
"एक पुस्तकही मिळालंय साहेब तिथे- विषकन्या."

आणखी एका रविवारी पुन्हा ती वळणावर उभी. तशीच, पुस्तक वाचत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी, अगदी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वळण आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छानच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाण तेच्यायला. जबरीच हो जांबुवंता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजो, धनंजय आणि अस्वल यांचे प्रतिसाद लय भारी! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ कथा आणि बाकीची व्हर्जन्स दोन्ही आवडले!

- (हलाहल पचवलेला) सोकाजी

-----------------------------------------------------
: हे फक्त विषाबद्दल आहे, कन्येबद्दल पांचट चौकशी केल्यास अपमान करण्यात येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महामार्गांवर वा प्रमुख नागरी मार्गांवर लाल कपड्यांतल्या गोरट्याल्या बायका हेरून त्यांच्यापूर्वी १०० मीटर वर

"१००
रक्त वस्त्रांकित गौरांगना.
वाहने सावकाश चालवा.
उडत्या चुंबनांची देवाणघेवाण टाळा."

असा फलक लावणारी मोबाईल वॅन फिरवली पाहिजे. हाय वे मिनिस्टर पुन्हा निवडून येतील*.

*आयती सेवा देणार्‍या या व्हॅनमागे किती ट्रॅफिक असेल!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मूळ कथा व सगळ्या आवृत्त्या, विशेषतः अस्वलरावांची आवृत्ती विशेष रोचक वआतली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शतशब्द कथांच्या निमित्तानं सूक्ष्म कथा ह्या प्रकाराची झैरात करुन घेतो :-
http://aisiakshare.com/node/1485

सहा शब्दांच्या कथा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या शब्दकथांच्या चढाओढीत आमच्या 'नि:शब्दकथां'ची जाहिरातही करून घेतो. http://www.aisiakshare.com/node/1997

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तब्बल आठ दहा महिन्यापूर्वीचा धागा दिसतोय.
असे अचानक गायब होणार्‍या रराचा निषेध

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars