"आर्थिक नियोजन" भाग २ - आरोग्यविमा

मागच्या भागात आपण आवक-जावक चा हिशोब का ठेवावा हे पाहिले. हा भाग त्याच्या पुढचे पाउल.

एकदा स्वत:चे राहण्यासाठी घर झाले आणि महिन्याचे आवश्यक खर्च बसतील यापेक्षा जास्त मासिक प्राप्ती (घरातील सर्वांची मिळून) सुरू झाली की मग मला खालील गोष्टी दिलेल्या क्रमानेच रुळावर आणायच्या होत्या
- आरोग्यविमा
- जीवनविमा
- निवृत्तीनंतरच्या बेगमीची सुरूवात

त्याच क्रमाने त्यांचा आढावा घेऊ.

आरोग्यविमा:

नोकरीला लागून स्थिर स्थावर होईपर्यंत मी हा परकार फारसा कधी ऐकलापण नव्हता, ना माझ्या पालकांनी कधी ऐकला वा घेण्याचा विचार केला असावा. बहुराष्ट्रिय कंपनीमध्ये नोकरीला लागल्यावर एकदा एचआर ने जे प्रेझन्टेशन दिले त्यात मला पत्ता लागला की त्यांनी् प्रत्येक कर्मचा-यासाठी आरोग्यविमा आणि सामुहिक जीवनविमा काढला आहे. "बरं" म्हणून मी एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडून दिले.

दुस-या वर्षी परत प्रेझेंटेशन झाले ज्यात आता "प्रेगनेन्सी" पण कव्हर होईल आणि स्वत:च्या पालकांना पण थोडा वैयक्तिक जास्त प्रिमियम भरून ह्या आरोग्यविम्यात कव्हर करता येईल असे सांगण्यात आले. मी विशेष विचार न करता तो पर्याय घेऊन टाकला, जेमतेम ३००० रुपये तर भरायचे होते दोघांसाठी! हेच दुस-या वर्षी पण झाले फक्त यावेळी ३००० चे काहीतरी ४५०० झाले होते, तरीही मी घेऊन टाकले आणि तो माझा एक अतिशय योग्य निर्णय ठरला.

कारण त्यानंतर लगेच माझे लग्न झाले, आणि काही महिन्यात माझी आई आजारी पडली. अगदी आयसीयु मध्ये ठेवण्याची वेळ आली, कोणतेतरी दुर्मिळपणे सापडणारे इन्फेक्शन तिला झाले होते. आम्ही जवळचे सगळे पैसे घरात गुंतवले होते त्यामुळे आम्हाला लगेच मोठी रक्कम उभी करणे शक्य नव्हते. आणि माझ्या निवृत्त वडीलांच्या व्यवसायात घर जरी ठिकठाक चालत असले तरी जेवढे बील आले ते भरता भरता त्यांची तारांबळ झाली असती. पण यावेळी मी विशेष विचार न करता त्यांच्यासाठी घेतलेले आरोग्यविम्याचे कव्हर तेव्हा उपयोगी पडले आणि जवळजवळ १५ दिवसांचे हॉस्पिटल मधले उपचार आणि त्याचे ब-यापैकी जंगी बील, स्वत:चे जेमतेम १००० रुपय़े भरून आम्हाला आरोग्यविम्यात मिळाले.
तो माझ्यासाठी या बाबतीत जागे होण्याचा खरा क्षण होता.

यानंतर या विषयावर बरेच संशोधन केले आणि माझा सल्ला खालीलप्रमाणे आहे.

स्वत:/जोडीदार:

जर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला ( आणि बहुतेकवेळी तुमच्या जोडीदाराला पण) जर आरोग्य विम्याचे संरक्षण असेल. ( बहुतेक वेळी माणशी १ -२ लाख पर्य़ंत असते) आणि तुमचे वय ३० च्या खाली असेल, तर अगदी लगेच याची घाई केली नाही तरी चालेल किंवा घेतलाच तर २ लाख पुरेसा आहे. पण जर का वय ३० च्या वर असेल तर मात्र कंपनी मध्ये कव्हर असो वा नसो, साधारण माणशी ३,००,००० ने सुरूवात करून दर वर्षी २५-५० हजाराने वाढवत नेऊन निदान ४,००,००० तरी करावे.

त्यापुढे जर वैयक्तिक कव्हर नेले तर प्रिमियम बराच वाढतो व मोठ्या आजारपणासाठी कव्हर मात्र ८०-२० किंवा ७०-३० असे राहते त्यामुळे एक सुपर टॉपअप नामक पॊलिसी मिळते ती जास्त उप्योगी पडते आणि प्रिमियम तुलनेने कमी असतो. यामध्ये एका ठराविक थ्रेशोल्ड च्या वर जर बिल गेले तरच वरच्या रकमेसाठी ही पॉलिसी वापरता येते. मी खालील प्रमाणे कॉम्बिनेशन घेतलेय.

प्रपोजर - मी
- नवरा व मी - दोघांसाठी प्रत्येकी ४,००,००० चे कव्हर.

प्रपोजर - नवरा
- नवरा व मी - दोघांसाठी प्रत्येकी ७,००,००० चे सुपर टॉपअप कव्हर. - थ्रेशोल्ड ३,००,०००

*प्रपोजर ला टॅक्समध्ये ८० डी खाली प्रिमियम ची वजावट घेता येते

आता समजा मला काही मोठी शस्त्रक्रिया करावी लागली, खर्च १०,००,००० लाख येतोय,

  • कंपनीच्या कव्हर उपयोगी नाही कारण ते फक्त १,५०,००० आहे.
  • अशावेळी पहिल्या पॉलिसी मधून ४,००,००० पैकी मला हातात २,८०,००० मिळणार (७०-३० नियम)
  • पण बिल ३,००,००० च्या वरती आले म्हणून मी सुपर टॉपअप मधून ७,००,००० क्लेम करेन
  • अशा प्रकारे माझा पुर्ण क्लेम ९,८०,००० होईल आणि मला स्वत:चे फक्त २०,००० भरावे लागतील.

सुपर टॉपअप ला % शेअरिंगचा फंडा नसतो तर सुरूवातीचे ३,००,००० मी माझे भरणार हा नियम असतो. ते मी स्वत:च्या खिशातून भरतेय की दुस-या पॊलिसी च्या मदतीने यामुळे काही फरक पडत नाही.

अर्थात दोन पॊलिसी एकत्र क्लेम करणे थोडे त्रासदायक असते पण ते नियमबाह्य नाही त्यामुळे चालू शकते आणि दोन्ही पॉलिसी एकाच कंपनी कडून असतील तर त्रास थोडा कमी होऊ शकतो.

हे वरचे उदाहरण मी ज्या माणसाकडून पॉलिसी घेतली त्याने मला रंगवून रंगवून सांगितले जसे की शस्त्रक्रिया म्हणजे एखादी परदेश ट्रिपच आहे, मी वैतागून मनातल्या मनात त्याला गोळ्या घालत होते. पण तो म्हणतो त्याच्यात तथ्यही होते शेवटी, मग बरेच वेळेला तो जे म्हणतो त्यात शंका विचारून, इकडे तिकडे वाचन करून मग मी ते पर्याय स्विकारले.

घरातील ज्येष्ठ नागरिक:
मी वर सांगितलेला प्रसंग झाल्यनंतर परत एका वर्षी मी त्यांच्यासाठी ८५०० रू जास्तीचा प्रिमियम देऊन कव्हर घेतले. दर वर्षी प्रिमियम वाढतच होता आणि एवढे करून बहुदा आरोग्यविमा कंपनीला हे सगळे प्रकरण तोट्यात जात होते त्यामुळे पुढच्या वर्षीपासून पालकांना कव्हर करण्याचा पर्याय बंद होणार असे आम्हाला सांगण्यात आले.

आम्ही बराच वाद घातला पण ज्येष्ठ नागरिंकाचे क्लेम येण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने ते बंद करावेच लागेल यावर ते ठाम होते.
मग या गोष्टीचा फायदा एव्हाना लक्षात आल्याने आम्ही वैयक्तिक असा विमा काढता येतो का ते तपासायला सुरूवात केली. त्यातून खालील गोष्टी कळल्या.

  • घेतल्या वर्षापासून वय ८० पर्यंत नियमित प्रिमियम भरून चालू ठेवता येते.
  • वय ३५ पर्य़ंत कोणत्याही मेडिकल टेस्ट शिवाय पॊलिसी मिळते
  • ३५-४५ मध्ये मेडिकल टेस्ट देऊन मग थोड्या हाय प्रिमियम वर पॉलिसी घेता येते
  • ४५ नंतर मात्र सहसा तुमचे पॉलिसी ऍप्लिकेशन रिजेक्ट होते किंवा प्रिमियम अत्यंत जास्त असतो.
  • ६० च्या पुढे नवीन पॉलिसी घेता येत नाही.
  • कोणतेही पुर्वीचे आजार हे पहिले ३ वर्षे पॉलिसी मध्ये कव्हर नसतात, चौथ्या वर्षानंतर मात्र तेही कव्हर होतात.


माझे आई-वडील दोघेही तसेच नव-याची आई ६०+ असल्याने हा आमच्या साठी डेडएन्ड दिसत होता. स्टार हेल्थ वगैरे पॉलिसी देत होते पण त्यांचे % सरसकट ५०-५० होते. याच वेळी आमच्या एजन्टने ( तोच तो रंगवून रंगवून माझे १० लाख चे ऑपरेशन करणारा) आम्हाला एक मार्ग सांगितला. ब-याच बॅंका आणि आरोग्यविमा कंपन्या यांचे टाय-अप असते त्यात ते कोणत्याही वैद्यकिय चाचण्यांशिवाय व एका स्थिर प्रिमियमला त्या बॅंकेच्या सर्व खातेधारकांना (एका कुटुंबात एकच) ५ लाखपर्यंत पॉलिसी मिळू शकते आणि त्यात वय मर्यादा ६५ आहे (विशेष सवलत किंवा नजरचूक ते माहित नाही)

बॅंक ऑफ महाराष्ट्र, ओरिएन्टल बॅंक व अन्य काही बॅंकाची अशी टाय-अप आहेत. आम्ही तातडीने बॅंक ऑफ महाराष्ट्र नवीन खाते (त्यांच्या नावाचे) उघडून आई-वडीलांसाठी एक ५ लाख व नव-याच्या आई साठी ५ लाख पॉलिसी घेतली. ज्यात ५ लाखाला जेमतेम ७००० प्रिमियम आहे. आता तिसरे वर्ष आहे त्यामुळे पुढच्या वर्षीपासून सर्व आजार त्यात कव्हर होतील.

मुले:
माझे स्वत:चे असे मत आहे की जर कंपनीच्या विम्यात मुले कव्हर असतील तर निदान वय ५ पर्यंत त्याना वेगळे वैयक्तिक विम्यात घेण्याची जरज नाही. त्यानंतर मात्र शक्यतो फॅमिली-फ्लोटींग पॉलिसी मध्ये त्यांना सामावून घेणे सुरू करावे. माझी लेक अजून ५ पेक्षा कमी असल्याने तिला वेगळे कव्हर घेतले नाहीये. जेव्हा वेळ येईल तेव्हा पर्याय तपासले जातील.सध्या तरी या बद्द्ल अजून खुप खोल अभ्यास नाही.

कोणती कंपनी:
या क्षेत्रात आता ब-याच खाजगी कंपन्यासुद्धा आल्या आहेत पण लिक्विडीटी रेशो वगैरे मोजमापं लावली तर आजही पब्लिक सेक्टर मधल्या ४ कंपन्याच जास्त विश्वासार्ह वाटतात. त्या चार कंपन्या आहेत - युनायटेड इंडिया, न्यु इंडिया, ओरिएन्टल इन्शुरन्स व नॅशनल इन्शुरन्स.

  • आयोग्य आणि जीवन विम्यात मुख्य फरक हा की आरोग्य विमा क्लेम करण्याची शक्यता बरीच जास्त असते ( आणि एक्दा क्लेम नाही , मी प्रिमियम भरत राहिले तर दर वर्षी!)
  • जीवनविमा घेतल्यानंतर जर २-३ वर्षात मृत्यू झाला तरच सखोल चौकशी आणि काही संशय घेण्यासारखे दिसले, पुरावा सापडला तरच क्लेम रिजेक्ट होतो. पण ३ वर्षांनंतर जीवनविमा क्लेम देण्यास कंपन्या बांधील असतात
  • हेच आरोग्यविमा मध्ये लॉयल्टी वर्षे (तुम्ही क्लेम करण्यापुर्वी किती वर्षे प्रिमियम भरताय) महत्वाची असतात, वयाच्या नंतरच्या वर्षांमध्ये आरोग्यविमा कंपनी बदलणे याच कारणाकरता फायदेशीर ठरत नाही.
  • आरोग्यविमा नाकारण्यासाठी किंवा किमान क्लेम अमाऊंट कमी मान्य करण्यासाठी कंपन्या अनंत कारणे दाखवू शकतात
  • प्रायव्हेट मध्ये ब-याच कंपन्या फारच नवीन आहेत, त्यांचे ट्रॅक रेकॊड अजून तयार होतेय.

या वरील कारणांमुळे मी युनायटेड इंडिया ला माझे मत दिले. तुम्हाला अगदीच जर खाजगी पैकी कोणते निवडायचे असेल तर बजाज एलियान्झ हेच एक नाव मला त्यातल्या त्यात विश्वासार्ह वाटते.


असो हा भाग बराच मोठा झाला त्यामुळे पुढील भागात जीवनविमा आणि निवृत्तीनंतरच्या बेगमीची सुरूवात बघुयात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.833335
Your rating: None Average: 4.8 (6 votes)

प्रतिक्रिया

छान झालाय हाही भाग. बरीच उपयोगी माहिती. विशेषतः ६०+ वाल्यांसाठी घेता येणारी पोलिसी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त झालाय हा भागदेखील.
एक शंका यात फक्त शारीरीक आरोग्यावरचे खर्च क्लेम करता येतात की मानसिक आरोग्यावरचेदेखील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉस्पिटलात रहायला लागले तरच.... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हम्म. माझ्या एका मित्राचे वडील मनोरूग्ण आहेत. बहुतेक सिझोफ्रेनिया. त्यांना सध्या कुठलीही औषधे, कौंसलिंग वगैरे नाही. घरातच एका रूममधे दोराने बांधून ठेवलय. जर तीन वर्षांपूर्वी त्यांचा आरोग्यविमा घेतला असता तर आता त्यांचा रिह्याबचा १५ २० हजारचा खर्च त्या विम्यातून कव्हर झाला असता?
किंवा एका मैत्रीणीचा भाऊ बेवडा आहे. जर त्याला डिअॅडीक्ट रिह्याबमधे टाकलं तर तो खर्च विम्यातून निघेल?
की रिह्याब वेगळं आणि हॉस्पिटलायझेशन वेगळं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरातच एका रूममधे दोराने बांधून ठेवलय.

कायमस्वरूपी??????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'घरातच एका रूममधे दोराने बांधून ठेवलय' हे असंच वाक्य ऐकल. डिटेल्स विचारले नाहीत. पण बहुतेक कायमस्वरूपीच असणार. पळून जाऊ नये किंवा इतरांना इजा करू नये म्हणून. पोलीस केस होउ शकते असा विचार करताय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोलीस केस होउ शकते असा विचार करताय का?

एक म्हणजे हो, पण त्यापेक्षासुद्धा, हा प्रकार अघोरी नव्हे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर काही पर्याय आहेत का? हॉस्पीटलचा खर्च परवडणार नाही किंवा करायचा नाही. सरकारी रूग्णालयापेक्षा घरीच अवस्था बरी आहे म्हणायच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो कमेंट्स.

सरकारी पर्यायांच्या अवस्थेविषयी किंवा सफीशन्सीविषयी माहितीअभावी काहीही म्हणायचे नाही, परंतु (उपचार करण्याची अनिच्छा इथवर एक वेळ समजू शकतो, पण) घरी दोराने बांधून ठेवणे हा पर्याय पटत नाही.

(वर 'नो कमेंट्स' म्हटले आहे खरे, परंतु तरीही: कदाचित, 'सरकारी पर्यायांची सपोज़ेड दुरवस्था किंवा इनअ‍ॅडिक्वसी' ही त्यांच्या वापराचा विचारही न करण्याकरिता - आणि, पर्यायाने, प्रकरण हातात घेण्याकरिता - एक्स्क्यूज असू शकते काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकरण हातात घेण्याकरिता - एक्स्क्यूज असू शकते काय? >> उत्तर माहीत नाही.
दिवसभर घरात फक्त बायका आणि लहान बाळं, मुलं असतील तर मग हिंसक होऊ शकणार्या माणसाच करायच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मानसिक आजार बर्याच आरोग्यविम्यात कव्हर होत नाही.
अधिक माहीती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिह्याबचा १५ २० हजारचा खर्च त्या विम्यातून कव्हर झाला असता?

१५-२० हजार इतकाच खर्च असेल तर त्या खर्चासाठी विमा काढणे शहाणपणाचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

??? अहो महिन्याचा राहण्याखाण्याचा खर्च आहे तेवढा. औषध, कौंसलिंग बहुतेक वेगळे. परत त्यांची केस सिव्हीअर आहे असे वाटतेय. कधी बरे होतील, होतील की नाही हे सांगता येत नाही.

बादवे आरोग्यविमामधे फक्त हॉस्पिटलायझेशन असतं का? की रेग्युलरली घ्यावी लागणारी औषधं, बेडरिडन असल्याने घरी ठेवलेल्या पुर्ण वेळ नर्स वगैरेदेखील कव्हर होतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्यतो फक्त हॉस्पिटलायझेशन कवर करतात. काही टॉप अप कवर्स मिळतात ज्यात वरील गोष्टी घेता येऊ शकतात. अगदी औषधांचे कॅशलेस बेनेफिट्स देणारी कार्डे सुद्धा घेऊ शकता. पण प्रीमियमचे कॅल्क्युलेशन केले तर तो महाग पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागचा भाग ही चांगला होता. पण हा भाग त्यापेक्षा ही जास्त माहीतीपूर्ण आहे. लेखाची मांडणी उत्तम, भाषा सोपी आणि आशय उपयुक्त आहे. आपल्याला कोणता पर्याय हवा आहे हे माहीत असल्यास, तो पोलिसी एजंट कडुन समजून घेणे बरेच सोपे होते.अन्यथा पोलिसी एजंट शी डोके लावणे महाकर्मकठीण काम असते. तुमच्या लेखाचा नक्की उपयोग होइल. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि (माझ्यातरी) कंटाळ्याच्या विषयावर उपयोगी पडेल असं लिहिता आहात. साध्या,सरळ भाषेत .
एक शंका आहे. मी एका कंपनीकडून सलग काही वर्ष आरोग्यविमा घेत असेन आणि आता दुसर्‍या कंपनी कडून घ्यायचा ठरवला तर claim free वर्षांचा फायदा मला मिळेल का? IRDA च्या वेबसाईटवर अश्या वेळेस रिन्युअल बेनिफिट मिळायला हवा असा नियम बघितला आहे. त्या साठी दोन्ही कंपन्यांच्या पॉलिसीज सारख्या असायला हव्यात का ? त्यांची तुलना कशी करायची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_... ताई, देव तुमचं भलं करेल बघा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

लै म्हंजे लैच महत्वाचं काम करताहेत तै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मोगॅम्बो खुश हुआ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आजकाल आरोग्यविमा कंपल्सरी असल्यासारखा झाला आहे.
शक्य तितक्या लवकर हा विमा सुरु करावा, मुलांनाही त्यात इन्क्लुड करावे. अगदी टॉन्सिलचे ऑपरेशन करायचे झाले तरी मोठ्या शहरात १५-२० हजार लागून जातात.
हा विमा कार इन्श्युरन्स सारखा असतो. म्हणजे यंदा भरलेले प्रिमियम वर्ष सरले की गेले. टर्म पूर्ण झाल्यावर परतावा वगैरे काहीही नसतो, हे ध्यानी ठेवावे.
फ्लायबाय नाईट, वा अनोळखी एजंट्स टाळावेत. चांगल्या ओळखीतला एजंट असलेला चांगला.
क्लेम सेटल व्हायच्या वेळी प्रचण्ड त्रास देतात. विशेषतः इन्डिविज्युअल पॉलिसि होल्डर्सना. कंपनी मार्फत काढलेल्या पॉलिसीचे वाट्टेल ते क्लेम पटकन सँक्शन होतात, एकट्याने काढलेल्या विम्याची सेट्लमेंट द्यायला त्रास देतात. बहुतेक क्लेम रिजेक्ट केल्याबद्दल टीपीए ला काहीतरी कमिशन मिळत असावे. अशावेळी शेंडी पकडता येईल असा एजंट हवा.
एजंटला ज्या पॉलिसीत मॅक्स कमिशन मिळेल, तीच पॉलिसी तुम्हाला विकण्याचा ते लोक प्रयत्न करतात. तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेली पॉलिसी तुम्हाला विकणारा एजंट सहसा सापडत नाही. एकादा वेडा असलाच तर विरळा. तेव्हा चांगला रीसर्च, व फाइनप्रिंट रीडींग करणे मह्त्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रचंड माहीतीपूर्ण, फार फार धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणतेही पुर्वीचे आजार हे पहिले ३ वर्षे पॉलिसी मध्ये कव्हर नसतात, चौथ्या वर्षानंतर मात्र तेही कव्हर होतात.
एकाद्याला कसलाही आजारच नसतो त्या वेळी विम्याची गरज वाटत नाही आणि आजाराची सुरुवात झाल्यानंतर तो कव्हर होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना सारखे आजार होत असतात, त्यांना गरज असते पण विमा मिळतच नाही. अर्थातच विमा कंपन्या त्यांचाच फायदा पाहणार हे उघड आहे. असे असले तरी अपघात, आग, चोरी वगैरेंपासून अचानक होणार्‍या (मोठ्या) नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्याचा विमा जितका उपयुक्त असतो साधारणपणे तितकाच आरोग्यविमाही उपयुक्त असतो, त्याने एक मानसिक आधार मिळतो.
या इतर विम्यांमध्ये जसे गैर व्यवहार (खोटी वा फुगवलेली बिले) होतात तसेच यातही होतात आणि यामुळे प्रामाणिक विमाधरकाला भुर्दंड पडतो ही त्याची दुसरी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त लेख. अजून १-२ वर्षांनी या सगळ्या बाबतीत लक्ष घालावे लागणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण प्रतिसादाला +१०१००!.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिशय उपयुक्त लेख.

ऑफीसचा विमा असुनही ३२व्या वर्षी विमा काढावा हे ठरवले होतेच, त्याला लेखाने दुजोरा दिला. (३५ नंतर विमा मिळायला प्रश्न नै. थोडा महाग पडतो). ३२व्या वर्षी घेतले की ३५व्या वर्षापासून बरेचसे अधिक रोग कव्हर होतात.

बाकी होम थेफ्ट, आग, नॅचरल कलॅमिटी यासाठी विमा काढावा का? असा प्रश्न मला अनेकदा सतावतो.

(नॅचरल कलॅमिटी, आगी वगैरेच्या वेळी उपयुक्त अशी प्रत्येक किडुक मिडूक डॉक्युमेंट्सच्या कॉपीज, काही कॅश अशी एक बॅग हाताशी सहज मिळेल अशी ठेवलेली आहे. पण तरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

SBI गृहकर्ज घेताना घरविमा कंपल्सरी आहे. त्यात नॅचरल कलॅमिटी, आग कव्हर नक्की आहे. अजून कायकाय ठाऊक नाय. पण चोरी नसणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय आग नक्की कव्हर आहे. मात्र बहुदा सगळ्या कलॅमिटीज कव्हर नाहित.
चोरी नाहिये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

३२ या आकड्यासाठी काही कारण ?? डॉक्युमेंट्स स्कॅन करून ठेवणे उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्कॅन्डही आहेतच Wink
डॉक्युमेंटस वगैरे ब्युरोक्रॅटिक गोष्टींचे मला लै म्हंजे लैच टेंशन येते. ते असो.

३२ चे कारण असे: तीन वर्षांनी हिस्टरी असलेले रोगही कव्हर होतात. ३५ नंतर विमा महाग पडतो. तेव्हा अल्प किंमतीत उशीरात उशीरा नी जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल अशी विमा घ्यायची संधी म्हणून ३२. बाकी काही विशेष कारण नै. (हाफिसचा विमा हाफिस बदललं की टर्म्स बदलतात, तेव्हा तितका खात्रीचा नै.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बत्तीसची वाट का बघा,? करून टाकावा की आधीच. का आधी काढल्यास प्रिमियम तितका स्वस्त पडत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रिमियम बॅन्ड असतात वयाप्रमाणे २५-३५, ३५-४०,४०-४५ असे. ३५ पर्यंत आजार होण्याची शक्यता खूपच कमी असते त्यामुळे २५-३५ प्रिमियम कमी असतो. आणि एक लक्षात ठेवा जर तुम्हाला काही झाले नाही आनि तुम्ही विमा वापरला नाही तर प्रिमियमचे पैसे भरले त्याचा उपयोग फक्त लॉयल्टी वर्ष वाढवायला होतो.

त्यामुळे तुमच्या बाकीच्या खर्चाच्या प्राथमिकता आणि वय याप्रमाणे केव्हा आणि किती तो निर्णय घ्यायचा.

साधारण ४० नंतर काही आजार डोके वर काढण्याची शक्यता बरीच जास्त असते म्हणूनच मी म्हटले की ३० नंतर काढलेला बरा, लॉयल्टी पिरियड पण ब-यापैकी तयार होतो आणि बाकीच्या अजून महत्वाच्या गोष्टींवर खर्च करायला अवधी मिळतो.

तब्येत नाजूक असेल आणि वारंवार आजारी पडण्याची टेन्डन्सी असेल तरच ३० च्या आधी काढा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

+१
माझ्या बाबतीतः ऑफिसच्या विम्याचे कव्हर आहे त्यामुळे सध्या काही आजार उद्भवल्यास कव्हर्ड आहे. मात्र सविता म्हणतेय तसे फार उशीरा काढले तर लॉयल्टी पिरीयड तयार होत नाही.
दुसरे असे की हा विमा जीवनविम्यासारखा नसतो, एकदा पैसे भरले की आजार झाला नाही तर परत कै मिळत नै (काही प्रायवेट कंपन्यांचे तशा (जीवन+आरोग्य) कंबाईन्ड्ड स्कीम्स आल्या होत्या - अजुनही असतील - पण त्यांचे क्याल्क्युलेशन एकुणात महागात पडते असे दोनेक वर्षांपूर्वीच्या आक्डेमोडीवरून वाटते. पुन्हा नव्या नियमांनंटर करून पहायला हवे). तेव्हा फार आधी गरज नसताना भरून फारसा उपेग नै

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

@सविता, ऋषिकेश धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>दुसरे असे की हा विमा जीवनविम्यासारखा नसतो, एकदा पैसे भरले की आजार झाला नाही तर परत कै मिळत नै

ज्या जीवन विम्यात पैसे परत मिळतात तो खरा जीवनवीमाच नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सपष्टीकरण प्लीज!
समजा मी २० वर्षांचा विमा घेतला नी त्यात नाही मेलो, व माझे पैसे काही ठराविक प्रकारे मला परत मिळाले तरी तो विमा जीवनविमा नै?
त्याकाळात मी मेलो असतो तरच तो जीवन विमा ठरेल असे काही मत आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही पैसे परत न मिळणारा (टर्म इन्शुरन्स) घेतला असता तर खूप स्वस्त पडला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मान्य.
पण त्याचा मला जीत्तेपणी उपेग नसता Wink
अर्थात जीवनविमा हा "माझ्यानंतर" असतो हे कबूल आहेच पण मोह भल्याभल्यांना सुटलाय का?

(अन तो टर्म विमा ३५च्या आत कधीही काढा असा सल्ला आमच्या एजंटबैंनीच दिल्याने एवढ्यात हा काढलेला नै)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थत्तेचाचांशी सहमत आहे. टर्म विमाच बेश्ट असतो. वर्षाला १५-१६ हजारात १ कोटीचा मिळून जातो. परतावावाल्या विम्यात ना पुरेसा इंशुरन्स ना पुरेसे गुंतवणूकीचे परतावे.
यासंदर्भात एक वाक्य मला नक्की पटत. गुंतवणूक आणि विमा या गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या वेगळ्याच ठेवाव्यात. मिस्क करू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मान्य. गुंटवणूकीचे परतवे पुरेसे नसतात हे मान्य.
NPSपूर्व काळात हमीयुक्त दरमहा परतवा देणारे पर्याय अल्प होते हे ही मान्य व्हावे

आता NPS मात्र याचे मार्केट खाईलसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एण पी यस मध्ये हमीयुक्त परतावा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते तुमच्यावर आहे, तुम्ही तुमचे पैसे सरकारने कशात गुंतवायला मान्यता देताय त्यावर आहे
क्लास ई: मध्ये मार्केटमध्ये पैसे गुंततील. हमी कमी, रिस्क फळली तर संभाव्य परतवा बराच अधिक
क्लास सी: फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स (सरकारी सिक्युरीटीज व्यतिरिक्त) इथे अधिक हमी - तरी रिस्क आहेच, परतवा ई पेक्षा कमी पण रिस्क फळली तर संभाव्य परतवा जी पेक्षा अधिक
क्लास जी: सरकारी सिक्युरीटीजः इथे सरकारी बाँड्समध्येपैसे गुंतवले जाणार असल्याने परतवा इतर दोघांपेक्षा कमी असु शकेल पण पूर्ण हमी

शिवाय सध्यातरी नागरीकाला क्लास 'ई'मध्ये पूर्ण रक्कम गुंतवायला मंजूरी नाहिये. जास्तीत जास्त ५०% रक्कमच गुंतवू शकतो. तेव्हा काहीतरी परतव्याची हमी आहेच.

शिवाय एक ऑटोचॉईस नावाचा पर्याय आहे
यात ३५ वर्षापर्यंत E मध्ये ५०%, सी मध्ये ३०% व जीमध्ये २०% रक्कम गुंटवली जाते
३६व्या वर्षापासून हे प्रमाण बदलत जाऊन (ए मधील टक्का कमी व इतर दोघांतील वाढत जातो) ५५ व्या वर्षी ई व सी मध्ये १०% तर जी मध्ये ८०% गुंतवणूक होते.

शिवाय सरकारी स्कीम असल्याने एकुणात अधिक सेक्युअर्ड वाटते - भासते.

या स्कीममध्ये भाग घेण्यासाठी मात्र बहुदा ठराविक विंडो असते.

आत काही दिवसांट बजेट आल्यानंतर याबद्दलचे नव्या सरकारचे मत कळावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एनपीएससाठी यूपीए सरकारने दर वर्षी 1000 असा चार वर्षे बोनस मिळेल हे जाहीर केले होते. तरीही एजंट वगैरे लोकांना एनपीएस साठी काहीही इन्सेंटिव नसल्याने एनपीएसचे मार्केटिंग होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१,
गुंतवणूक आणि विमा या गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या वेगळ्याच ठेवाव्यात!
अगदी मार्मिक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३५ पूर्वी विमा काढावा असल्यास ३४व्या वर्षी काढणे स्वस्त पडेल काय? मीही आता विमा काढावा म्हणतोय. पुढेमागे तो लागणारच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी या बजेटमध्ये FDI इन्श्युरन्स क्षेत्रातही येणार आहे (हा अंदाज -म्हंजे घोढणा बजेटमध्ये होऊ शकते, प्रत्यक्षात कधी येते हे माहित नाही). त्यानंतर वर्षभरात नवे खेळाडू, नव्या योजनांसह सज्ज होतील.
तेव्हा नव्याने अभ्यास करायच्या तयारीला लागावे हे उत्तम! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे असं काही वाचलं की ट्रॅप्ड झाल्यासारखं वाटतं.
विमा कंपन्या आणि हॉस्पिटले यांच्या खेळातलं एक प्यादं असल्यासारखं. आरोग्यविमा आता अनिवार्य झाला आहे हेच खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उघड गुपितांबद्दल पब्लिक अधून मधूनच बोंब मारते तेव्हा आश्चर्य वाटते.
आरोग्य विमा बंधनकारक आहेच असे वाटते --> +१
हे पाश्चात्त्य /विकसित देशांच्या मॉडेलवर चाल्लय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आरोग्यविमा आता अनिवार्य झाला आहे हेच खरं.

हे खरंय पण माझा अनुभव असा आहे की एम्प्लॉयर विमा असतो तेव्हा तो टीपीए, इन्शुरन्स कंपनी, हॉस्पिटले सगळेजण गुमानपणे ऑनर करतात. मात्र तुमचा वैयक्तिक विमा असेल तर रिजेक्शनचा दर खूपच जास्त असतो व फार मनस्तापही सहन करावा लागतो. २-५ लाखाच्या कवरेजसाठी (साधारण तितकेच मिळते) प्रामाणिकपणे पाचदहा वर्षे प्रीमियम भरूनही हा मनस्ताप सहन करावा लागल्याची अनेक उदाहरणे जवळपास पाहिली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुव्यात दिलेला लेख आताच वाचला. डॉक्टर म्हणजे कसाई याचे माझ्याबाबतीत एक आणि वडिलांच्या बाबतीत एक इतके जबरदस्त अनुभव आले आहेत की दवाखान्याची वाट धरावी लागण्याची भीतीच वाटते.

इन्शुरन्स कवरेजइतके बिल व्हायलाच पाहिजे हे तर अगदीच खरे आहे. काही काळापूर्वी कंपनीमार्फत पालकांचा आरोग्यविमा काढला होता. माझ्या वडिलांच्या एका सर्जरीसाठी काही चाचणी होणे आवश्यक होते. त्या चाचणीचा रिपोर्ट यायला म्हणे २ दिवस लागत होते. रिपोर्ट आल्यावर हॉस्पिटलने चुकीचे सँपल पाठवले होते(!) हे लक्षात आले. पुन्हा एकदा सँपल पाठवले. पुन्हा रिपोर्ट यायला २ दिवस लागले. या कालावधीत ५ दिवसांचा हॉस्पिटलाझेशनचा चार्ज फक्त सलाईनची बाटली लावून (+ डेली डॉक्टर व्हिजिट वगैरे) हॉस्पिटलने वसूल केला. नंतर आमचा प्रीमियमही दणकून वाढला. व बहुदा अशा घटनांमुळे कंपनीच्या इन्शुरन्सवाल्यांनी सगळ्यांच्या पालकांचे कवरेजच बंद करुन टाकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरोग्यविमा हा माझ्यासाठी आजपर्यंत ब्लाईंड स्पॉट होता. आता निदान पालकांसाठी या विम्यासाठी हालचाल करावी म्हणतो.

शंकाः एम्प्लॉयर प्रोवाईडेड विमा असेल तरीही स्वतःहून आरोग्यविमा घेण्यामागे काय कारण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर म्हटल्याप्रमाणे ठराविक वय झाल्यावर हा विमा दिला जात नाही. मात्र आहे तीच पॉलिसी ८० वर्षापर्यंत वाढवता येते.
शिवाय ३५ वर्षानंतर विम्याच्या हप्त्याची किंमतही वाढते. शिवाय विमा घेतल्यापासून ३ वर्षे हिस्ट्री कव्हर्ड नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निदान ५० व्या वर्षापर्यंत नोकरी करणार असे गृहित धरले तर तितकी वर्षे एम्प्लॉयर कवरेज असते. मग १५ वर्षे अतिरिक्त प्रीमियम भरल्याने म्हातारपणी नवा विमा काढणे टाळण्यासाठी किती डिस्काऊंट मिळणार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१५ वर्षे अतिरिक्त प्रीमियम भरल्याने म्हातारपणी नवा विमा काढणे टाळण्यासाठी किती डिस्काऊंट मिळणार आहे?

- हा थोडा बाउन्सर गेला. कदाचित वाकयरचना थोडी गंडली आहे.

तरीही:
५० पर्यंत नोकरी कराल पण नोकरी बदलली तेव्ह दोन नोक-यांच्यामध्ये तुम्ही कव्हर्ड नसता. आजच्या स्थितीमध्ये तुमची चूक नसताना ले-ऑफ वगैरे गोष्टी आप्ल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. ६ महिने वर्षात जरी दुसरा जॉब मिळाला तरी मध्ये ब्लाइंड स्पॉट येतो, शिवाय नवीन कंपनी हे सगळे बेनेफिट देईल याची काय शाश्वती? कंपनीचे विमा कंपनीशी डील असल्याने तुम्हाला असा लॉयल्टी बेनिफिट मिळत नाही.

कंपनीचा विमा फक्त १.५-२ लाख असतो. शिवाय माझ्या पालकांच्या केसमध्ये म्हटले तसे कंपनी पॉलिसी चेंज होत राहतात.

५० ला तुम्ही विमा काढायला गेला तर तुम्हाला विमा मिळण्याची शक्यताच मुळात फार कमी आहे.

३५ वर्षे वय असलेल्या एका व्यक्तीचा ४ लाख विमा काढण्यासाठी सध्या खर्च अंदाजे ३५००-४५०० वर्षाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आरोग्यविम्यामागची संकल्पना मला पूर्णपणे मान्य आहे. मला शंका फक्त अंमलबजावणीबाबत आहेत. ज्या आजारांमध्ये खरोखरच विम्याची गरज असते. (न्यूरॉलॉजिकल, बायपास, कॅन्सर वगैरे क्रिटिकल इलनेसेस) त्यात समाधानकारक कवरेज मिळते का? क्लेम्स सेटलमेंट रेशोज कसे आहेत? नॉर्मल प्रेग्नन्सी वगैरेसारख्या गोष्टी मला अभिप्रेत नाहीत. (अनेकदा सी-सेक्शन वगैरे क्लेम्स नाकारल्याच्या घटना ऐकल्या आहेत).

एम्प्लॉयर विमा सगळेचजण ऑनर करतात कारण विमा कंपनीचे साठ-सत्तरहजार गिऱ्हाईक एकदम जाऊ शकतात. मात्र वैयक्तिक आरोग्यविम्याचे अनुभव कसे आहेत? काही दिवसांपूर्वी माझ्या मेव्हण्याला दातातून कानात-व-घशात इन्फेक्शन झाले. आयसीयूमध्ये २ दिवस काढावे लागले. मात्र फाईनप्रिंटमध्ये 'डेंटल' कवरेज नसल्याने त्याचा क्लेम नाकारला. हा तर क्लीअर मूर्खपणा आहे हे लगेच कळते. सध्या तो ग्रीवन्स वगैरे फॉलोअप करत आहे. अशा घटना अपवादात्मक नसून नियम म्हणाव्यात इतक्या सामान्य आहेत. आयआरडीएने ३० दिवसात क्लेम रिजेक्ट किंवा अप्रूव करा असा आदेश दिल्याने विमा कंपन्या बाय डिफॉल्ट रिजेक्ट करत असाव्यात अशी शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग १५ वर्षे अतिरिक्त प्रीमियम भरल्याने म्हातारपणी नवा विमा काढणे टाळण्यासाठी किती डिस्काऊंट मिळणार आहे?

जर ५०व्या वर्षी सहज विमा मिळत असता तर हे क्याल्क्युलेशन करण्यात पॉईंट होता. प्रत्यक्षात तसे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सविताताईंनी वर महाराष्ट्र बँकेचे उदाहरण दिले आहे. तो विमा काढताना मेडिकल चेकपही करावे लागलेले नाही.

मी वादासाठी वाद घालत नसून फक्त विम्यामागचे लॉजिक समजावून घेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो विमा काढताना मेडिकल चेकप - करावा लागत नाही त्याचे कारण बॅन्केच्या मोठ्या क्लायंट बेसला सरसकट स्किम दिल्यामुळे त्यांना हे परवडते.

शिवाय बॅन्केतून काढलेल्या विम्याला मध्ये कोणीही एजन्ट नाही.(बॅन्क फक्त प्रिमियम भरायला) त्यामुळे सेटल करताना ची मगजमारी तुम्हालाच करावी लागणार. फक्त आम्ही आम्च्यासाठी जो वैयक्तिक विमा काढला तो आणि बॅन्क ऑफ महाराष्ट्र हे दोन्ही युनायटेड इंडिया चे आहेत त्यामुळे आमचाच एजन्ट कधी क्लेम करावा लागला तर प्रोसेस मध्ये आम्हाला मदत करेल.

बॅन्क तुम्हाला आठवण पण करत नाही प्रिमियम ड्यु आहे याची, आपणच १-१.५ महिना आधी जाऊन पैसे भरून ते विमा कंपनीला पोचले आहेत ना याची खात्री करायची.

आणि शेवटी जर आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा सरसकट सगळे पैसे खिशातून जाण्यापेक्षा हा एक उपयोगी पडू शकेल असा पर्याय म्हणून आम्ही ठेवला आहे. टोकाच्या केसेस होतात, आपली काय व कशी होईल ते माहित नाही. होप फॉर द बेस्ट.

दुस-यांच्या केसेस मधून मी फक्त काय चुका करायच्य नाहीत ते मनात नोंद करून ठेवते जसे की डिस्चार्ज समरी हे एक अतिशय मस्ट कागद्पत्र आहे क्लेमसाठी, शिवाय सर्व गोष्टींवर हॉस्पिटलचा शिक्का असणे महत्वाचे आहेत. सुरूवातीलाच दहा वेळा तपासून कागदपत्रे दिली तर त्रास कमी होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आम्ही तातडीने बॅंक ऑफ महाराष्ट्र नवीन खाते (त्यांच्या नावाचे) उघडून आई-वडीलांसाठी एक ५ लाख व नव-याच्या आई साठी ५ लाख पॉलिसी घेतली. ज्यात ५ लाखाला जेमतेम ७००० प्रिमियम आहे. आता तिसरे वर्ष आहे त्यामुळे पुढच्या वर्षीपासून सर्व आजार त्यात कव्हर होतील.

हे रोचक आहे, पण बँकेच्या साईटवर कव्हर १ लाखापर्यंतच आणि ६० वर्षापर्यंतच असल्याचे दिसते आहे, तपशील कळू शकेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही हे केल्याला तीन वर्षे झाली त्यामुळे मध्ये बदलले असेल तर माहित नाही.

दुसरे म्हणजे थेट शाखेत जाऊन चौकशी करा, अगदी "या बसा" जरी नाही केले तरी चिवटपणे विचारल्यास ते माहिती देतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

थोडे शोधल्यावर खालील दुव्यावर तुलना दिसली. २०१३ची माहिती आहे. त्यात ५ लाखापर्यंतचे कवर उपलब्ध आहे असे दिसते. महाबँकेसोबत इतरही काही बँका यात आहेत.

http://www.gettingyourich.com/blog/why-health-insurance-offered-by-natio...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.religarehealthinsurance.com/userfiles/file/standard%20list%20... इथे टिपीकल एक्सक्लूजन्सची लिस्ट आहे.
१. माझ्या मते ही जरा जास्तच अन्याय्य आहे.
२. मी तरी अजून मेडीकल इन्शूरन्स घेतला नाही. माझ्या गरजा नि कवरेज हे नीट मॅच होत नाही. मेडिकल कवरचे पैसे देण्याच्या नादात सद्य गरजा बाजूला राहतात.
३. कंपनीचा इंश्यूरन्स मी जरा जास्तदा वापरला (वडीलांना व मुलाला मिळून २००६ ते २०१२ पर्यंत ६ ते ८ वेळा दाखल केले असावे.). माझा अंदाज होता कि कंपनीतल्या इतरांच्या प्रिमियमवर आमचा खर्च चालू असेल. पण इतक्या हॉस्पिटलायझेशन्सचा खर्च माझ्याच तेवढ्या वर्षांच्या काँट्रीपेक्षा कमी होता ! तेही नॉमिनल टर्म्समधे!!
४. आमचे मायबाप आमच्या पॉलिसीत कवर आहेत तसेच आम्ही मुलाच्या (कंपनीच्या) पॉलिसीत असू अशी आहे.
५. माणूस विमा नसेल तर सांभाळून राहतो.
६. सध्याचा कंपनीचा विमा सर्वात बेस्ट आहे. त्यात कसलाच अपवाद नाही, कोणालाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ट्रॅडिशनल मॅन्युफॅक्चरिंग वगैरे कंपन्यांमध्ये पालक सहसा इन्क्लुडेड असतात. माझ्या भावाच्या पॉलिसीत आईवडिलांना क्रिटिकल इलनेस सोडून ५-७ दिवसांच्या हॉस्पिटलायझेशनपुरते कवरेज मिळते. फायदा मोठा नसला तरी कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची सोय आहे. शिवाय त्याची पॉलिसी ही कर्मचारी संघटनेमार्फत घेतलेली ग्रुप पॉलिसी असल्याने त्याला कर्मचारी संघटना + ग्रूप पॉलिसी असे दुहेरी डील करुन प्रीमियमही स्वस्त पडतो. हॉस्पिटलायझेशन वगैरे झाले तर प्रीमियम लगेच वाढत नाही. कर्मचारी संघटनेच्या फंडातून काही पैसे इन्शुरन्सला दिले जातात व सोसायटी मेंबर असल्याचे टॅक्स फ्री डिडक्शन पगारात मिळते.

याउलट माझ्या आयटी कंपनीत पालकांना अजिबात कवरेज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही आयटी कंपनीत कुटुंबातल्या ४ सदस्यांना संरक्षण दिले जाते, ४ कोणते ते सिलेक्ट करण्याचे स्वातंत्र्य एम्पॉइचे असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेले ते दिन गेले

बहुतेक कंपन्यांनी आता ते बंद केलेय

माइंडट्री ही एकमेव कंपनी माझ्या माहितीमध्ये आहे जी अजून ही सुविधा देते, आणि आतल्या गोटातील खात्रीलायक बातमी आहेकी ते कोणत्याही क्षणी बंद होईल

मुख्य कारण प्रचंड गैरवापर! भरलेल्या प्रिमियमच्या ५ पट क्लेम, मग दुसरे काय होणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

- आमचे मायबाप आमच्या पॉलिसीत कवर आहेत तसेच आम्ही मुलाच्या (कंपनीच्या) पॉलिसीत असू अशी आहे.
- माणूस विमा नसेल तर सांभाळून राहतो.

ऑल द बेस्ट!

- माझ्या गरजा नि कवरेज हे नीट मॅच होत नाही, मेडिकल कवरचे पैसे देण्याच्या नादात सद्य गरजा बाजूला राहतात.
- कंपनीतल्या इतरांच्या प्रिमियमवर आमचा खर्च चालू असेल

हॉटेल आणि हॉस्पिटल मध्ये फरक न करू शकणारी मंडळी अवती भवती दिसतात, - आहे मेडिक्लेम - घे एसी रूम बिनधास्त!
अशा लोकांमुळेच मेडिक्लेम कंपन्या जास्त जास्त कडक नियम करत चालल्या आहेत.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आहे मेडिक्लेम - घे एसी रूम बिनधास्त!

हे अगदी मान्य. माझ्या ओळखीतले आहेत एक, त्यांच्या बायकोला मॅटर्नीटी हॉस्पीटल मधे दाखल करताना त्यांचा हट्ट होता की 'ए.सी. रुम' मधेच दाखल करायचे. घरातले मोठे, आजूबाजूचे त्याला सांगत होते की बाबा आधीच हिवाळा त्यात बाळंतिणीला आणि होणार्‍या लहान बाळाला त्या ए.सी. ची काहीच गरज नाही, विशेष म्हणजे त्याच्या बायकोला ए.सी अजिबात नको होता. पण हे साहेब हट्टाला पेटलेले आणि त्याचंच खरं करायला पहात होते. मग खरं कारण विचारलं तर म्हणे मेडिक्लेम मधे होतय तर मग होऊ द्या ना ( होउ दे खर्च मेडिक्लेम आहे घरचं! :P) .. असे एक एक महाभाग असतात, त्रास झाला तरी चालेल पण मेडिक्लेम च्या सगळ्या सुविधा उपभोगून घ्यायच्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्या बायकोला मॅटर्नीटी हॉस्पीटल मधे दाखल करताना त्यांचा हट्ट होता

मेडीक्लेम अंतर्गत फक्त ठराविक रक्कमच मिळते, तारांकीत सुविधांचा हट्ट धरला तरी मेडीक्लेमवाले पुर्ण पैसे देत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्या मेडीक्लेम मधे एक ठरावीक रक्कमच सांगितली होती आणि हॉस्पीटल मधे दाखल करणयाआधी ह्या महाशयांनी इन्शूरन्स कंपनी कडे आधीच चौकशी केली त्यानूसार त्या इंशूरन्श कंपनीने त्या एसी रुम चे पैसे कव्हर होतील असे आधीच खात्रीशीर (confirm) सांगितले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते हे काम धर्मादाय करत नसावेत त्यामुळे सोय असल्यास आणि गरज असल्यास वापरण्यास हरकत नाही, एसी रुममधे एसीशिवाय इतरही सोयी जास्त मिळण्याची शक्यता असु शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे सोय असल्यास आणि गरज असल्यास वापरण्यास हरकत नाही

अगदी मान्य, पण जर त्यांच्या पत्नी - ज्यांच्या साठी ही रुम ठरवणे चालू होते आणि त्याच जर कंफर्टेबल नसतील आणि आवश्यक त्या गरजा नॉन-एसी रुम मधेही मिळत असतील तर केवळ इंन्शूरन्स चे पैसे वसूल करायचे म्हणून का उगाच हट्ट करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारणपणे सहमत आहे, पण नॉन-एसी रुमपेक्षा एसी रुममधे अधिक सोयी मिळणे शक्य आहे, त्या नाकारण्यामागचा पत्नीचा उद्देश समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या नाकारण्यामागचा पत्नीचा उद्देश समजत नाही.

आधी लिहिल्याप्रमाणे तो हिवाळा ऋतू होता, त्यांच्या पत्नीला बाळंतपणात तशीही थंडी वगैरे वाजत (थंडी भरून येणे प्रकार) असायची. शिवाय एसीची त्यांना कधीच सवयही नव्हती (घरात नव्हता, जॉब करत नव्हत्या) मग उगाच कशाला रिस्क म्हणून त्यांचा नकार होता. कदाचित त्यांना एसी बसने प्रवास करताना नेहमी त्रास व्हायचा आणि त्या अनुभवावरुन त्यानी नकार दिला असावा. आणि असं वाटतं अश्यावेळी महत्त्वाचं आणि आधी काय बघावं तर बाळंतीण 'कंफर्टेबल' आहे ना, झालं तर मग.

(त्यात आपल्या बर्‍याच मोठ्या माणसाचं म्हणणं असतं बाळंतीण, बाळाला अगदी घट्ट गुंडाळून ठेवायचं, गार हवा लागू द्यायची नाही नंतर ही ते बाळंतिणीला उब्/शेक-शेगडी देतातच. म्हणून घरातील इतर मोठ्याचा ही विरोध असावा. अर्थात ते किती बरोबर/चूक हे शास्त्रीय दृष्ट्या माहित नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काऊंटरच्या इकडच्या बाजूने सांगतो.

रूमच्या दर्जानुसार सर्व सेवांचा भाव बदलतो. राऊंड चार्जेस जनरल वॉर्डात १०० रुपये असतील तर स्पेशल एसी रूमसाठी १००० रुपये असतात. अन याच प्रमाणात नर्सिंग पासून प्रत्येक प्रोसिजरचे भाव बदलतात. उदा. तुमच्या बुडावर इंजेक्शन टोचण्यापोटी जनरल वॉर्डात ५० रुपये लिहिले गेलेत, तर एसी रुमवाल्याच्या बुडासाठी त्याच इंजेक्शनचा (त्यानेच आणलेले औषध, त्यानेच आणलेल्या सिरिंजमधे भरून, (कधीकधी हॉस्पिटलचा) स्पिरिटस्वाब वापरून टोचणे. No additional skills exercised. Exactly same actions performed in both places.) ५०० रुपये चार्ज लागतो.

अन डॉक्टरच्या स्किल्स बद्दल म्हणायचं, तर स्पेशल रुमवाल्याचं अक्खं अन जनरल वॉर्ड वाल्याचं काय चतकोरच अपेंडिक्स काढतात काहो? की एसी रुममधे पेशंट असला की जरा जास्त अ‍ॅक्युरेट वगैरे डायग्नोसिस होतं?

स्पेशल एसी रूम इ. फक्त पैशाची खुजली असलेल्यांचा खिसा खाली करण्यासाठी तयार केलेले उद्योग आहेत Wink उलट अशा रुम्समधे मिळणारी नर्सिंग केअर अंमळ कमी असते. (तुम्ही घंटी वाजवल्याशिवाय नर्सला कळत नाही तुम्हाला काही अडचण आहे का ते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सोनार ...कान टोचणे वगैरे आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्पेशल एसी रूम इ. फक्त पैशाची खुजली असलेल्यांचा खिसा खाली करण्यासाठी तयार केलेले उद्योग आहेत >>

बर्‍याचदा आजूबाजूचे अनुभव पाहून हे अगदी मान्य असं नमूद करतो.

कित्येकदा तर डॉक्टर किंवा हॉस्पीटल अ‍ॅडमीन वालेच म्हणतात तुमच्या कडे "XYZ" इन्सुरन्स आहे ना मग घेऊन टाका ऐसी रुम (हा स्वानुभव आहे). माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेस ज्या हॉस्पिटलात बायकोला दाखल केले होते तिथे तर नॉर्मल डिलेवरी होऊनही ६-७ दिवस हॉस्पीटल मधे थांबवलं होतं आम्हाला. काय तर म्हणे मुलाला कावीळ आहे, आम्ही ही थोडे घाबरलो फार प्रतिवाद केला नाही. मग नंतर समजलं की जन्मानंतर बाळाला थोडी कावीळ असतेच (कदाचित १५ व्या दिवसापर्यंत असते). हे समजल्यावर मी डॉक्टरांकडे तगादा लावला डीसचार्ज साठी तर ते हसून म्हणाले, "काय एवढं टेन्शन घेता आहे ना इंशूरन्स" :O मी म्हटलं इंशूरंन्स गेला खड्ड्यात, इतर लोकांची धावपळ होते आहे घर-ते-हॉस्पीटल, ते रात्रीचं इथे एकाने थांबा, जेवणाचे डबे, हॉस्पीटलच्या वेळा सांभाळा आणि काय काय वैताग.. हे बाकी काय इंशूरन्स देणारे का भरून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणत्या हॉस्पिटलात गेला होतात?

जनरली असा अनुभव आहे की हॉस्पिटल सदैव भरलेले असेल तर उगाच रिक्व्हरी पेशंटना थांबवण्यात त्यांनाच इंटरेस्ट नसतो.

मला सी सेक्शन असून बाळ तिसर्‍या दिवशीपर्यंत काळजी करण्याइतके पिवळे पडले नाहीये हे बघून चौथ्या दिवशी घरी सोडले.

रूमसाठी तर वेटींग होते, मला डिस्चार्ज दिल्याबरोबर एक तासात जनरल वॉर्डातली एक जण तिथे शिफ्ट झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हे हॉस्पीटल नाशकात असल्याने त्यातही नाशिकच्या सब-अर्ब मधे असल्याने तिथे फार गर्दी नव्हती/नसावी. फार फेमस हॉस्पीटलांपैकीही नव्हतं, पण हे हॉस्पीटल निवडण्याचं कारण म्हणजे घराजवळ होतं (दोघांच्याही - माझ्या व माझ्या सासरच्या) मग मोठ्या लोकांना गाडीशिवायही पायी सोयीचं होतं असं आणि मुळात स्वच्छ होतं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येग़ॅक्टली!!!

अगदीच जनरल वॉर्ड नको असेल, वेगळे बाथरूम नसते, भेटण्याच्या वेळा आणि प्रायव्हसीची अडचण असेल तर सेमी प्रायव्हेट हा पर्याय पुरेसा असतो.

नसला दरवाजा, फक्त पडदा असला तरी चालते. उलट ते बरे पडते कारण नर्सेस सतरा वेळा येतात हे तपास ते तपास करतात. हाक मारली तरी नर्सेस ना ऐकू जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

स्पेशल एसी रूम इ. फक्त पैशाची खुजली असलेल्यांचा खिसा खाली करण्यासाठी तयार केलेले उद्योग आहेत उलट अशा रुम्समधे मिळणारी नर्सिंग केअर अंमळ कमी असते. (तुम्ही घंटी वाजवल्याशिवाय नर्सला कळत नाही तुम्हाला काही अडचण आहे का ते)

तसे तर सरकारी हॉस्पिटलातही तेच काम होते जे प्रायव्हेटमधे होते, अगदी स्वस्तात. ते रेकमेंड कराल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेजे सारखे ऑफ्थॅल्म डिपार्टमेंट महाराष्ट्रात कुठेच नाही. इन्क्लूडिंग सर्जन्स.
केईएम सारखे न्यूरो व कार्डिअ‍ॅक डिपार्टमेंट.
ससूनचे जेनेटिक्स.
निमहॅन्स.
किती नावं घेउ?
बेसिकली अशा ठिकाणी जे निदान व उपचार इ. होते ते कुठल्याच खासगी इस्पितळात होऊ शकत नाही.
सरकारी इस्पितळांतल्या नर्सेसना ६०-७० हजारापर्यंत पगार असतो. फुल्ली ट्रेण्ड, अन एक्स्पिरियन्स्ड असा स्टाफ दुसरीकडे कुठे मिळेल?
तिथल्या वर्क ओव्हरलोडमुळे बकाल वाटते इतकेच.

आत्ता आत्तापर्यंत, सर्व आजारांसाठी सरकारी इस्पितळांत अ‍ॅडमिट होणे व उपचार घेणे ही लोकप्रतिनिधींसाठीही नॉर्मल बाब होती. (आजकाल जेलीत गेले तरच सरकारी इस्पितळाच्या जेल वॉर्डात भरती होतात ती बाब वेगळी Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

+१
सर्कारी रुग्णालयात घरातील/नात्यातील अनेकांचे उपचार अतिशय उत्तम झाले आहेत. तेथील डॉक्टर अतिशय निष्णात वाटतात व गंडवागंडवी पेशंटलाही सहज जाणवेल इतक्या निगरगट्टपणे चालताना दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बेसिकली अशा ठिकाणी जे निदान व उपचार इ. होते ते कुठल्याच खासगी इस्पितळात होऊ शकत नाही.

होऊ 'शकतात' शी सहमत आहे.

तिथल्या वर्क ओव्हरलोडमुळे बकाल वाटते इतकेच.

पण बकाल वाटत नसुन ते बकाल असतेच, बहुदा बकाल मॅनेजमेंट हा प्रॉब्लेम असावा.

आत्ता आत्तापर्यंत, सर्व आजारांसाठी सरकारी इस्पितळांत अ‍ॅडमिट होणे व उपचार घेणे ही लोकप्रतिनिधींसाठीही नॉर्मल बाब होती.

ते जिथे उभे असतात, लाईन तिथुन चालु होते त्यामुळे त्यांना काय कुठेही चालत असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी नुकताच सरकारी इस्पितळाचा अनुभव जवळून घेतला.
अनेक खाजगी नामांकित डॉक्टरांचंही असं म्हणणं होतं, की केईएममध्ये त्याच दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल जी इतर पंचतारांकित इस्पितळांमध्ये (तुम्हांला लुटून) दिली जाईल.
पण वैद्यकीय सेवा वगळता इतर अनेक गोष्टींमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो.
इसीजी मशीनसाठी वेगळ्या खात्यात जाऊन अनामत भरणे, मग ते चालू अवस्थेतले मशीन जिथे कुठे असेल तिथून हुडकून वा वापरणार्‍या रुग्णाच्या मागे थांबून मिळवणे, नंतर परत करणे, चतुर्थ श्रेणी कामगारांची १०० टक्के अनुपलब्धता असल्यामुळे (वैध आणि अवैध कारणांमुळे) ती कामे करणे, निरनिराळ्या तपासण्या करण्यासाठी रुग्णाची निरनिराळ्या खात्यांतून नाचानाच करणे, त्यासाठी व्हीलचेअर वा स्ट्रेचर स्वतः आटापिटा करून मिळवणे, तपासण्यांचे रिपोर्ट्स, औषधे आणून डॉक्टरांना दाखवणे, आपल्या रुग्णाला औषध वेळेवर मिळाले ना याची स-त-त खातरजमा करत राहणे, ग्लुकोमीटरवर साखर तपासणे, इन्शुलिन देणे... इत्यादी इत्यादी.
यात प्रचंड मनुष्यबळ, सहनशक्ती, मानसिक शांतता खर्ची पडते... आपली योग्य अशा निर्जंतुक ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जातेय, असे समाधान रुग्णाला क-धी-ही मिळत नाही.
बाकी पडद्याआडच्या घोटाळ्यांबद्दल तर बोलायलाच नको..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

इसीजी मशीनसाठी वेगळ्या खात्यात जाऊन अनामत भरणे, मग ते चालू अवस्थेतले मशीन जिथे कुठे असेल तिथून हुडकून वा वापरणार्‍या रुग्णाच्या मागे थांबून मिळवणे, नंतर परत करणे, चतुर्थ श्रेणी कामगारांची १०० टक्के अनुपलब्धता असल्यामुळे (वैध आणि अवैध कारणांमुळे) ती कामे करणे, निरनिराळ्या तपासण्या करण्यासाठी रुग्णाची निरनिराळ्या खात्यांतून नाचानाच करणे, त्यासाठी व्हीलचेअर वा स्ट्रेचर स्वतः आटापिटा करून मिळवणे, तपासण्यांचे रिपोर्ट्स, औषधे आणून डॉक्टरांना दाखवणे, आपल्या रुग्णाला औषध वेळेवर मिळाले ना याची स-त-त खातरजमा करत राहणे, ग्लुकोमीटरवर साखर तपासणे, इन्शुलिन देणे... इत्यादी इत्यादी.

+१.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाजगी रुग्णालयातील नर्सेस व कर्मचार्‍यांचे शिक्षण किती व कोणत्या क्षेत्रात असते यावर मला नितांत शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नसते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वाटलंच होतं

इंजेक्शन्समधील बुडबुड्यांकडे दुर्लक्ष करणे, सलाईनसाठी नस मिळता न मिळणे, इसीजी काढताना कोपराला हाताचे लिंब नोड जोडणे (!), पार्‍याचं ब्लड प्रेशर यंत्र नुसतंच घेऊन येणे (स्थेटस्कोप न आणता) वगैरे अचाट प्रकार पाहून मी स्वत:च त्यांना टोकलं आहे.

सर्कारी रुग्णालयात बाकी प्रॉब्लेम्स असतीलही - असतात पण असा जीवाशी खेळ बघितला की चांगल्या चकचकीत सुविधांची भिक नको असे कधी कधी म्हणावेसे वाटते. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एयर इंजेक्शनचा लीथल डोस २००-३०० मिलि इतका आहे. सुमारे ५-१० सीसी हवा एकाच वेळी पुश केल्यानंतर कधी-कधी त्रास होऊ शकतो. तेव्हा एकाददुसर्‍या छोटुल्या बबलचं फार टेन्शन घेत जाऊ नका. हवेतले सगळे ग्यासेस तात्काळ रक्तात विरघळू लागतात. अगदी नायट्रोजनही.
नस मिळणे हे पेशंट व डॉक्/नर्स या दोघांवर अवलंबून असते. काही लोकांच्या फॅट कण्टेण्टमुळे, वा घसरलेल्या बीपीमुळे कोलॅप्स्ड व्हेन्स मिळणे कठीण असते.
पार्‍याच्या रक्तदाबमापकात विना स्टेथो बीपी मोजता येते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ओके. आभार
आमची माहिती बायोमेडला प्रयोग म्हणून केलेल्या एक्सपरिमेंट्सपुरती मर्यादित आहे.

पार्‍याच्या रक्तदाबमापकात विना स्टेथो बीपी मोजता येते

हेही त्या नर्सलाही माहित नसावे. अगंबाई विसरले म्हणत ती परत गेली आणि दुसर्‍याच नर्सला पाठवले. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पाने