संसर्गजन्य जिवाणू

आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो.
म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा.
कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.
आम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग.
काही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग.

तर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो.

इतर माणसांच्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच होते.
इतरांचे रक्त लाल तर याचे रक्त कोठे लाल, कोठे हिरवे, कोठे निळे,
कोठे भगवे, कोठे पिवळे, कोठे दुरंगी, कोठे तिरंगी होते.
जरा जरा वेळाने त्या रक्ताचे रंग बदलत होते.

मी मनात म्हटले की या सर्वरक्तीय प्राण्याच्या शरीरात काही रुजता येणार नाही.
तो माणूस जोरजोतात झिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देत असतांना त्याच्या तोंडावाटे बाहेर पडलो.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडली. विचारप्रणालीला, इझमला संसर्गजन्य रोगाची कल्पना करणं गमतीदार. मीम ही संकल्पनाही काहीशी अशीच आहे.

शेवटच्या ओळीत झिंदाबाद मुर्दाबाद घोषणांऐवजी राजकारण्याची भाषणं अपेक्षित होती. तुम्हालाही अपेक्षित होती असा अंदाज आहे. झिंदाबाद मुर्दाबाद वरून आंधळा पाठिंबा देणारा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे हे हे Smile
छान मार्मिक भाष्य!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!