जसे दृश्य संपादक / यथादृश्य संपादक

'जसे दृश्य संपादक' (’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor) हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने विकिपीडियात लेखन संपादन करू शकेल असा या 'जसेदृश्यसंपादकाचा' उद्देश आहे. सध्या इंग्रजी आणि मराठी विकिपीडिया इतर सर्व विकिंवर बीटा अवस्थेत उपलब्ध आहे. 'जसे दृश्य संपादक' सध्या विकिपीडियावर सदस्य खाते काढून, मराठीच्या विंडोजच्या इन्स्क्रीप्ट वापरकर्त्यांपर्यंत मर्यादीत आहे; आणि मराठी विकिपीदियावर विशेष:पसंती#बीटा येथून VisualEditor हा पर्याय कार्यान्वित करून घ्यावा लागतो. मराठीच्या इतर टंकन प्रकारांवर विकसकांचे अद्याप काम चालू आहे. भविष्यात विकिपीडियावर 'जसे दृश्य संपादक' ही बहुसंख्य लेखकांसाठी मुख्य संपादन पद्धती असण्याचा संभव असून सध्याची संपादन पद्धती केवळ विशेष परिस्थितीतच वापरावी लागेल किंवा ज्यांना ती अधिक सोईची वाटते ते वापरू शकतील.

मराठीच्या विंडोजच्या इन्स्क्रीप्ट वापरकर्त्यांनी आधून मधून मराठी विकिपीडियावरील काही लेखन 'जसेदृष्य संपादन' पद्धती वापरून केल्यास. अधिक परिक्षण , सुधारणांना सुविधांना वाव मिळू शकेल असा विश्वास आहे.

* यथादृश्य संपादक कार्यान्वित केल्यानंतर काहीसा खालील प्रमाणे आणि त्या खाली विकिपीडियाचे लेखपान नेहमी प्रमाणेच दिसेल लेखन बदल ही करता येतील मात्र जतन करा म्हणे पर्यंत आपण केलेले बदल सेव्ह होणार नाहीत.

* जसेदृष्य संपादन पद्धतीत सहजस्फूर्त असण्यावर भर आहे तरी पण साहाय्य लागल्यास प्रश्नचिन्हावर टिचकी मारल्यास तुम्ही या साहाय्य पानावर पोहोचता.
** साहाय्य पान ७० % मराठीत अनुवादीत आहे. उर्वरीत अनुवाद वापर वाढल्या नंतर विवीध कृतींना नेमके कोणते पारिभाषिक शब्द वापरावयाचे या बद्दल जशी जशी सहमती होईल तसे तसे केले जाईल.

* VisualEditor शब्दास मराठी शब्द जसेदृश्य संपादक शब्द अधिक बरा का यथादृष्य संपादक शब्द अधिक बरा ?
** VisualEditor करिता चलसंपादक, सरल संपादक, सहज संपादक, सुगम संपादक, सुलभ संपादक ,दृष्ट संपादिका, हे इतर शब्दही सुचवले गेले आहेत परंतु जसेदृश्य संपादक शब्द मला व्यक्तीशः सरळ सोपा समजणारा वाटतो
* इतरही बर्‍याच संबंधीत संज्ञांसाठी येथे मराठी पारिभाषिक शब्दही सूचवून हवे आहेत जसे की
**Source Edit (सध्याची संपादन पद्धती) सध्याचा वापरातील शब्द:स्रोत संपादन इतर सुचवलेले पर्याय संपन्न संपादन/परिष्कृत संपादन
** Transclusion सध्या "आंतरन्यास/न्यासांतर" परंतु अधिक सहजतेने बोध होणारा शब्द हवा आहे.
** Clear formatting सध्या "प्रारुपण हटवा" परंतु अधिक सहजतेने बोध होणारा शब्द हवा आहे.
** टेंप्लेट एक्स्पांशन ला सध्या "साचा प्रसरण" वापरलय पण बर्‍या पैकी अनकम्फर्टेबल वाटतेय म्हणून अजून सुचवणी हवी आहे.

** DEFAULTSORT सध्या: अविचलवर्ग:, अविचलवर्गकळ:, अविचलवर्गवर्गीकरण; इतर सुचवण्या: आपसूकविल्हेवारी, पूर्वसिद्धवर्गवारी ,पूर्वसिद्धविल्हेवारी (यात खर आव्हान एकाच शब्दावर सहमत होण्याच आहे अर्थात प्रतिसादांपुर्वी DEFAULTSORT हे काम कस करत हे माहित करून घेण जरूरी आहे अर्थात इथली सहमती मराठी विकिपीडियावर कळवून अंतीम निर्णय मराठी विकिपीडिया चर्चा पानांवरच होतात)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माहितीबद्दल आभार. यामुळे विकीपाने बनवणे सुलभ होईल अशी आशा आहे.
वापरून बघेन नी कळवेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय अधून मधून वापरत राहिल्यास विकसकांना अडचणींचा आदमास येऊन अधिक सुधारणा करणे सोपे जाईल. सध्या अडचणी आहेत तरीही मुख्य म्हणजे जसेदृष्य संपादकांच्या विकिमीडिया फाऊंडेशनच्या विकसकांचे युजर ओरीएंटेड अ‍ॅटीट्यूड, आणि चांगली सुविधा देण्याची महत्वाकांक्षा अप्रतीम आहे.

Universal Language Selector विस्तारकाचे मराठी टंकलेखना सोबत अद्याप तांत्रीक अडचणी आहेत त्या सुटण्यास एखाद दिड वर्षाचाही कालावधी लागेल पण त्या आधी इनस्क्रिप्ट यूजर्सनी वापर चालू केल्यास प्राथमीक अडचणी समजून घेणे सोपे जाईल.

सहभाग आणि प्रतिसादा साठी धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.