कामवाल्या पोरीचा वाढलाय तोरा
कामवाल्या पोरीचा वाढलाय तोरा
बायको म्हणाली चढवित पारा
मी म्हटले की काय झाले आता
दांड्या मारते न सांगता सवरता
पुढे म्हणे उद्या मी फ़ैसलाच करते
कालपर्यंतचा पगार हातावर ठेवते
म्हणालो बिनधास्त काढूनच टाक
गेली तर अजूनही मिळतील लाख
दुस-या दिवशी ती आली कामवाली
बायकोच्या अंगाची लाही लाही झाली
आधी मला सांग कुठे होतिस काल?
कशाने इतकी झालीयेस मस्तवाल?
ती म्हणे थोडंसं काम होतं बाई
आवाजात कमालीची होती नरमाई
काम बिम काही नाही खूप झाले तुझे
हिशेब घे सगळा नि घर सोड माझे
असे नका करू माई ऐकुन तर घ्या
कारण पटले नाही तर हाकलून द्या
काय झाले, काल भाऊ दारू पिऊन आला
काम मिळत नाही म्हणून गळफ़ास ल्याला
जीव थोडा बाकी होता,अॅडमिट केला
ते सगळं करता करता माझा दिस गेला
कसला तोरा नि कुठलं काय?
गरीबाची अडचण समजा बाय
गरीबाची अडचण समजा बाय
-----------------------
विजय दिनकर पाटील ’कणखर’
प्रतिक्रिया
:(
वहिनींनी मग काय केले?
वहिनींनी मग काय केले?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
गरीबाची अडचण समजा बाय !!!!
!!!!
काहीतरी जबरदस्त व्यंगात्मक
काहीतरी जबरदस्त व्यंगात्मक वाचायला मिळेल. पण निराशा झाली. तरीही कविता आवडली.
काहीतरी जबरदस्त व्यंगात्मक
काहीतरी जबरदस्त व्यंगात्मक वाचायला मिळेल. पण निराशा झाली. तरीही कविता आवडली.
शेवट
शेवट एकदम 'समाजवादी' वाटला ब्वा!
जनरलच आमच्यावर अन्याय झाला
जनरलच आमच्यावर अन्याय झाला आहे म्हणून रडणार्या (म्हणजे तक्रार करणार्या) आधुनिक सुशिक्षित लिंगनिरपेक्षतावादी इ इ (नि इतरही सार्या) भारतीय स्त्रीया मोलकरणीशी कशा वागतात हे रोचक आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हा हा...
समर्पक प्रतिसाद. मार्मिक श्रेणी दिली आहे.
+१
असेच म्हणतो. बाकी रोचकिझम चा वापर अजोंनीही सुरू केला हे रोचक आहे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कुतूहल
इथे मोलकरणीच्या जागी रामा गडी असता तर मालकाचं वर्तन बदललं असतं असं वाटतं का, याबद्दल कुतूहल आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मालक नि मालकिण दोघेही सारखेच
मालक नि मालकिण दोघेही सारखेच बरे वा वाईट वागतात यात वाद नसावा. माझ्या प्रतिक्रियेत रडण्याच्या अनुषंगाने म्हणून केवळ स्त्रीयांचा उल्लेख आला आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मला तुमची प्रतिक्रिया समजली
मला तुमची प्रतिक्रिया समजली नाही ही एक शक्यता आहे, त्यावर मी काही मतप्रदर्शन करू शकत नाही.
मला प्रतिक्रिया समजली असेल तर प्रतिक्रयेत निव्वळ खोडसाळपणा आहे. तसं असेल तर मला प्रतिवाद करायचा नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इथे मोलकरणीच्या जागी रामा गडी
वर्तन बदललं नसतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मला प्रतिक्रिया समजली असेल तर
माझ्या प्रतिसादांचा कितीही वाईट अर्थ काढायचा प्रयत्न केला तर त्यांत काही तसे आढळायला नाही पाहिजे होते. असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कविता आवडली. मर्ढेकरांची याच
कविता आवडली. मर्ढेकरांची याच विषयावर एक सुंदर कविता आठवली.
विजयराव मस्त कविता ओ. तुमची
विजयराव मस्त कविता ओ.
तुमची मागची (बहुतेक २०१० मधे लिहिली होती तुम्ही.) "पुस्तकांतच जिंकल्या आहेत कासवांनी शर्यती" ही ओळ आज ही आठवते.
:(
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कविता आवडली.
कविता आवडली.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!